Friday, August 30, 2024

संचित २

हे थेंबच श्रावणसरिचे , कीं अश्रू शोकोद्भव ? कीं तरुचे गळले पान, घेई धरणीचा ठाव ? वाळक्यांत पाउल पडता कुरकुरती ठाई ठाई मग उरे प्रतीक्षा केवळ कधि गिळेल मृत्यूखाईं मातींत मिसळुनी जावे, अन् मुळांसि धरुनि राहावे धमन्यांत शोषिले जाऊन झाडांत पुन्हा उगवावे... शिड उभारुनि, भरुनी वारा, नाव जाउंद्या वेगे .. तांत-माय,अस्तुरि-छकुली अजुनी असतिल जागे.. शिणल्या चाकरमानी देहा, दोन दीस विश्राम परतायाचे पुन्हा गाळण्या चरितार्थार्था घाम.. पैल गाठण्या, उत्सव करण्या सारे कष्ट वाहावे मिठिंत साठवुनि कुटुंब सारे मना उभार करावे.. अधुरे, अपुरे जिणे असावे, अन् थोडी अतृप्ती मग आनंदा उधाण येते कांहीं होता प्राप्ती.. -अरुण काकतकर. आभाळतळी हिरवाइच्या सावळ्या कथा तमारि सहजी वारी रानांच्या व्यथा जळीस्थळी भूतांच्या वरदायी प्रथा शाखांवरी फुटव्यांच्या लक्षवेधी गाथा लख्ख उजळले मंडल तृणगात्री चैतन्य झुळक गार वाऱ्याचिहि ऊब पिऊनी धन्य -अरुण काकतकर. अवकाशगामी पक्षी लोमस झेपावला वरुणास्त्रधारि कळिकाळ कि अवतरला कीं लाटांनी उंच उडविली नावं ज्याला जे जे सुचेल ते समजावं काचाचे तुकडे घेउनी दर्पण सांधू बिंबांत भंगल्या ध्वस्त मनाला शोधूं अंगांगातुन फुटवे नवोन्मेष कोंभांचे अनुभवत अनंतासीम स्वरूप नभाचे ऊर्ध्वगामि सळसळ मातींतुन चेतली तोडींत बंध बीजे स्वतंत्र जाहली स्वातंत्र्याचा सुगंध हुंगत भरून फुगली छाती विकृत कांही करूं पाहती यशोध्वजाची माती तण ऐसे हेरुनी उपटुनी फेकुन देऊं दूर जळांत खळखळत्या उसळूंदे निर्भयतेचा पूर फुगा फुगावा इतुकां ठेउन भवतालाचे भान कांटेरीचे सीमेवरती माजंत आहे रान स्वकीय होती , फुंकित अस्तनीतचि निखारे पिसाळ पिसाट पशु वारावे मोकटलेल्यां वारें मन ! अतर्क्य तवंग, गाळ मन ! विकृतान्हिचा लोळ मन ! दु:ख सुखांची माळ प्रसंगोपात्त || मन ! अदृश्य संतत बोच मन ! अपारदर्शी कांच मन ! उदात्त कधि, कधि नीच प्रसंगोपात्त || मन ! उत्क्रांतीचा शाप मन ! सहसा शांतस्वरूप मन ! अस्वस्थावस्थ कोप प्रसंगोपात्त || मन ! सप्तरंगी धनू मन ! सप्तस्वरगृह वेणू मन ! कठोर अभेद्य पाषाणू प्रसंगोपात्त || -अरुण काकतकर. इथं काय करताय रे कामाला लागा आकारानं ठरवलंय तसेच तुम्ही वागा लिहितांना आपोआप येत होतं हसू चित्र पाहून म्हटलं ‘तसांच कसा बसूं ?’ असे उलटे लटकून जर भिंत तुम्ही सजवाल थाळी समोर बसलेल्याची भूक कशी मग भागवाल ? ज्यांनी दिला आकार तुम्हाला नी जिण्याला अर्थ भाकरतुकडा मोडींत आला दिवस करतील सार्थ नुसत्या लाकुडतुकड्याला जाळ करतो भक्ष नशीब ‘त्या’च्या कसबानं तुम्हाला केलं लक्ष काय बाय सुचंल तसं लिहा की मग लेको मनांत उमटल्या अक्षराला म्हणूं नका ‘नुक्को’ ! अशा सुंदर क्षणी शेवटावा श्वास हीचं केवळ इच्छा पण दैव दोऱ्या हलवतां असतो आपण फक्त 'नाच्या' ओसरल्यावरती धारा, मग ओला सुसाट वारा, गारठल्या देहावरती येईल शिशिरशहारा चक्रनेमिक्रमे अविरत भूतें खेळति खेळ अतर्क्य त्यांच्या लीला, ना कशा कशाचा मेळ जपजाप्य हवंन वा पूजा, करूं जालं उगा श्रद्धेने विक्राळ कराल करांनी चिरडतील सारी स्वप्ने जन्मापासून धरेच्या कळिकाळ ग्रासितो जीवा अनुभव सारे गाठीं तरि बेसावध मनूं राहावा ? -अरुण काकतकर. हिरव्या पोपटी छटांचा तरार आणि खळाळाची अवखळ धार बयो रानाई ! साडतिया पिंजर, जरा खट्याळीला घाल आवर ! किती नी कसं घ्यावं मनांत भरूंन ? कांठोकांठ होवून उसवलं तर सांधायचं कुठून कुठूंन ? दृष्ट लागेल म्हणून मेघावळी काळी पण ती तर आणखीनच खुलतेय भाळी गाभुळल्या वसुधेचे पुरवताना डोहाळे आभाळमायेचे भरून आलेंत डोळे.. -अरुण काकतकर. नको लळा, अक्षरबाळा | लावूं ! वेल्हाळा, लडिवाळा | गिळाव्या लागतीलचि कळा | तुटण्याच्या, कधीतरी || लेखणी मागचा हात | विरून जाईल अज्ञातांत | जन्मते ते नाशवंत | यमनियम || अ क्षर अस्तित्व अबाधित | तुझे टिकून काळचक्रांत | राहील ! खूण, होतो जिवंत | मागे, माझ्या || -अरुण काकतकर. खळाळ ओढाळ अनावर धाव जळा तळाचा हरवेल ठाव सारं होईल निरभ्र अन् शांत पाखरं निळाईंत झेपावतील निवांत गलबलतो शब्द, खालावतो नाद, पुनरागमनाय पांच वेद, होता मार्गस्थ.. Vision and mission of late bhaiya ji aaj apart of cunning policy of British the Christian missionaries came to the North Eastern region. गेल्या साडेचार महिन्यांच्या, lock down चर्या काळांत, आम्ही उभयतांनी, इतक्या web series आणि वेब् पट दिसून काढले की, चिरंजिवांनी गेलेल्या दिवाळींत भेट दिलेली fire stick, बहुतेक झिजत चाल्ली असणार.. याच सिलसिल्याचा भाग म्हणून, काल browsing करतांना, झी५ वर एका मालिकेचं शीर्षक दिसलं.. अभय.. पहायला सुरुवात केली.. पहिल्याच कांही दृश्यांत, ऊत्तर प्रदेशांतल्या एका गावांत, एक बाई पळतिये.. तिच्या मागे नागरिकां(?)चा, लाठ्याकाठ्याधारी घोळका पळतोय.. अखेर हात जोडून क्षमा याचना करणाऱ्या तिच्या अंगावर ज्वालाग्राही द्रव टाकून तिला पेटवलं जातंय.. ती पेटल्या अवस्थेंत जीवाच्या आकांतानं धावत जाऊन एका नाल्यांत उडी मारतेय.. वगैरे.. पुढच्या दृश्यांत, पळवून आणलेली दोन शाळकरी भावंडं, एक अंधाऱ्या गॅरेज मध्ये भयभीतावस्थेंत डांबलेली दिसतात.. त्यापैकी मुलीला, गुंगीचे औषध पाजून, तिची, एक (अ)मानुष, खाटकाच्या चॉपरनं नं खांडोळी.. वगैरे.. निरंजनानं जेवायला सुरुवात केलिवती, ती खेकसली (जेवण होईपर्यंत) 'पॉज् ला टाका ना.. जेवतिये ना मी ?'.. पॉजलो.. काय करणार.. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखा.. पण.. मानवत हत्याकांडांतल्या भाडेकरूं पारधी मारेकऱ्यांच्या फाशी प्रक्रियेंत, येरवडा बंदीशाळेंत, माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून, एक निरीक्षक/अभ्यासक या नात्यानं सहभागी झालेला.. आणि त्याच दरम्यान, रामन राघव, जक्कल, सुतार, शहा, फिरोज दारूवाला यांसारख्या खांडोळी विशेषज्ञांना, तेंडुलकर.. आणि सहलीला आल्यासारखे, TA तले, गोखल्यांच्या मोहन, गद्र्याचा भगत.. म्हणजे श्रीकांत, रानड्यांचा राम.. (आणि रानड्याचा प्रकाश पण होता कीं नाही ? स्मरत नाही..) अश्या कांही हौशांना घेऊन भेटलोवतो.. (कांहीं स्त्री सदस्य इच्छाअसूनही नाही येऊं शकल्या.. अगदी तुरुंग महानिरीक्षकांच्या पत्नी सुद्धा.. कारण बाई बघीतली रामन राघव च(वता)ळायचा म्हणे).. पण 'असा' मी सुद्धा क्षणभर अस्वस्थ झालोवतो कालच्या मालिकेंतल्या दृश्यावलोकनोत्तर.. पण.. एक धीट आई बघायची असेल तर THE SKY IS PINK नावाचा वेब् पट आवर्जून पाहा.. हे तुम्हाला सुचवतांना सुद्धा माझ्या पांपण्या पाणावल्यांत.. मला, माझ्या १५,२० वर्षांपूर्वी केलेल्या एका रचनेंतल्या, पांच, सहा, सात आणि आठ क्रमांकाच्या पंक्ती आठवल्या.. मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी' शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी.. आणि हो.. धर्मानं दिलेल्या, माणसाचा माणूस म्हणून विचार न करतां, अन्य धर्मियांची हेटाळणी करण्याच्या, कुठल्याही धर्माच्या कर्मठ संस्कारांच्या पलीकडल्या माणूसकीचा अनुभव घ्यायचा असेल तर 'काफिर' शीर्षकाची वेब् मालिका चुकवूं नका.. बघा तुमच्या.. धर्मकांडविषयक मतांत कांहीं फरक पडतो कां ते.. अस्वस्थ निद्रेनं चिराळलेली निशा ठिसूळ भंगल्या घटागत झालिये दशा खापरं घेऊन गेलो, मागूं लागलो भीक मुरडल्या नाकानं सांगतायत 'बाबा ! स्वत:ला वीक!' चार तुकडे मग त्यातले उशाला घेतले चघळायला आणि दोन ओठांत लोटले खरपूस वासानं, हरपली शुद्ध ? की ग्लानी ? की नशा ? हलवून जागं करतय कोण ? की फटफटली उषा ? -अरुण काकतकर. अभंग १०९ मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे । हे चि देवाचे दर्शन सदा राहे समाधान ॥ शांतीची वसती तेथे खुंटे कालगती । आली ऊर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे ॥ ** उभ्या जिण्याच्या राड्यांत, प्रत्यक्षांत वा स्वप्नांत, त्यांच्या दर्शनाची भ्रांत, पडावी ? काहून ? ज्याचं नेसूं पितांबर, चक्रपाणि गदाधर, किंवा कर काटिवर, दावाना बापेहो.. जळ, आभाळ,धरेवर, दूध प्रपात अनावर, न मानीत अवतार, शोधिती हरी.. गोठ्यांत दुभते जित्राप, वावरांत रब्बी, खरीप, कणसावले जरी मोप, शोधिती हरी.. दिठी घेता ठाव, प्रमाणाचि अनुभव, जडविती अंधभाव, अदृश्यासि.. -अरुण काकतकर. No..no magic..now, no wand It's time for self reprimand Far away gale. sent a faint clutter Ignorance made the mankind to shatter Greed exceeded, all the need Growing all over a poisonous weed A journey to a black hole has finally begun All the sin-force'll gulp, glow and sun To defend the globe, nothing in the sight Possibility of a megafinish ? Umpteen and infinite -Arun Kakatkar. पापी मी, माझी कलंक भारित गाथा तुज नविन कोणती माहिती झाली कथा ? लपविले नाहि मी जगापासुनी काहीं अन् खोट्याचीही धरली नाही बाही खोट्यापरती, ढोंगाची अघोर रीत जाळ्यांत पडुनि भल्भले जाति गर्तेंत मुखवटे नि बुरखे फाडा जे दिसतील फुत्कार विखारी उघडे मग पडतील मज नाही ठाउक, कां जडली ही व्यथा जळते पण काळिज, शुभ्र सत्य काजळता -अरुण काकतकर. सत्य शिव सुंदराला मिळालाय विस्मरणाचा शाप कुरूप कृतघ्न कुकर्माच्या पदरांत आठवांचे माप काळजात राहायचं असेल तर खुशाल हो खुपणारी सल गाठींचं पुण्य त्यजून पांघर, खलत्व काजळलं अव्वल शिंगं झोकदार गेरूनं रंगलेली बांकदार वशिंडामाग पाठीवर सोबतिया झूल नक्षीदार गाड्याला बैलजोडी जोडलिया खरं.. पण जिमिनीला कां बरं जखडल्यांत खुरं ? पुढं जायाचं तर सोडवायला होवो बेगिन त्यांन्ला हलनारच न्हाई सर्जा-राजाला किती जरी हान्ला -अरुण काकतकर. नशील्या निशेचे ढळलय नेसूं शृंगारोत्तर उत्फुल्ल उरुद्वय विस्फारलय आभाळभर भूतांच्या चुंबाचुंबींतून प्रसवतांत प्रतिमा सर्जक प्रतिभेची जोखतांत परिसीमा सगळंच अनावृत अश्लाघ्य नसतं रसिक अंत:चक्षूंनी पाहावं तसं दिसतं.. -अरुण काकतकर. एक रुग्णवाहिका.. तांतडीनं रुग्णालयांत जखमी व्यक्तीला घेऊन चाल्लेली.. आंत अपघातांत रक्तबंबाळ झालेली व्यक्ती.. रुग्णवाहिका आंत येते आणि जखमी अत्यवस्थाला stretcher वरून आंत नेलं जातं.. सचिंत हवालदिल आप्त दिसतात आणि गाणं सुरूं होतं.. 'तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंता..' दीदींना कडे, पूर्वावलोकनासाठी SA RE GA MA नं चित्रफीत पाठवली, ती पाहून दिदी गंभीर झाल्या एकदम.. एक मिनिटभर सगळे टेंशनमधे.. म्हणाल्या, 'रक्त बिक्त कशाला घातलय आधी ? प्रार्थना करण्याकरिता इतकं गंभीर कांहीं घडावंच लागतं कां ? कां बाबांच्या नावाचं रुग्णालय आहे म्हणून रुग्णवाहिका वगैरे पसारा आणलाय ? बदला बदला ती दृश्य..' ज्यानं ही दृश्यं योजली होती त्याचा उद्देश चांगलाच होता.. कीं या निमित्तानं, बाबांच्या स्मृती जागत्या राहाव्या म्हणून मंगेशकर भावंडांनी उभारलेले बहु उद्देशीय रुग्णालय, तिथली, Ventilatior.. Oxygen वगैरे सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका वगैरे सर्वसामान्य जनतेला परिचित व्हाव्या..पण.. कधी कधी अंदाज चुकतात.. तसं कांहींच झालं असावं.. असो.. निमित्त होतं, 'गणपती आरती आणि अष्टविनायक गीते' या दृक्श्राव्य तबकडीची, SA RE GA MA नं योजलेली निर्मिती.. या तबकडींत दिदींची पांच आणि उषाताईंनी नऊ अशा चौदा रचनांचा सादरीकरण करायचं होतं.. त्यातली कांहीं गाणी, तुकड्या तुकड्यांनी आधी चित्रित झाली होती.. ते तुकडे आणि नवीन होणारं चित्रीकरण.. यांची सांगड घालायची होती.. आणि या नवीन चित्रीकरणाची जबाबदारी, मोठ्या विश्र्वासानं, बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवली होती.. चित्रीकरणासाठी, दिदी, उषाताईंना मोकळेपणानं वावरता येईल अशी जागा हवी होती.. पूर्वपरिचयांतूंन, वेदाचार्य घैसास गुरुजींनी, पुण्यांत, कोथरुड भागांत उभारलेले गणपति मंदिर नी वेदपाठशाळा, ही जागा निश्चित केली, बाळासाहेबांनी.. एका दिवसांत, उषाताईंची तीन आणि दिदींची तीन अशी सहा गाणी चित्रिंत करायची होती.. नियोजित दिवशी, चित्रीकरण सामुग्री घेऊन मी सकाळी आठ वाजता पोहोचलो मंदिरांत.. उषाताईंना नऊ चा आणि दिदींना दुपारी दोनचा call time दिला होता.. (क्रमश:) साधारण साडे नऊं ते साडे बारापर्यंत उषाताईंची दोन गाणी संपत आली होती.. दरम्यान.. उषाताईंंच्या कांहीं गाण्यांत गायकवृंद हवा होता.. ती सर्व मंडळी एकेक करून दाखल झाली.. त्यांची रंगभूषा वगैरे होईपर्यंत, उषाताईंनी पार पडलेल्या चित्रीकरणांतल्या दृश्यांचा आढावा घेतला... आणि पुढच्या गाण्याच्या तयारीला लागण्या आधी जरा कांहीं वेळ सगळेच दोन मिनिटं स्तब्ध उभे होते तोच एकदम कालवा झाला.. माझ्याबरोबर माझे दोन साहाय्यक होते.. राधिका, माझी सुकन्या आणि सुपुत्र अंकुर.. वेदभवनमधल्या गणेशमंदिर प्रवेशासाठी तीन द्वारं आहेंत.. दोन सभागृहांत उघडतात तर तिसरं ब्रह्मवृंदाला गर्भगृहांत जाण्याकरितां.. त्या दिवशी मोरेश्वर शास्त्रींनी नियम जरा शिथिल केले होते.. त्यामुळं अंकुर गर्भगृहद्वारांत, गजाननाच्या, जयपूरहून घडवून आणलेल्या संगमरवरी अप्रतिम मूर्तीकडे बघत उभा होता, तो एकदम भोवळ आल्यासारखा पडला आणि त्याची बोबडी वळली.. झालं काय की त्याला मागून कुणीतरी म्हणालं, ' मी जरा आंत जाऊं कां ?' त्यानं मागं वळून बघीतले नी त्याला झटका सहन नाही झाला हो .. मागं, ती उभी होती.. साक्षांत जितीजागती सरस्वती.. पुढं गणेश नी मागं सरस्वती.. लहान होतं हो पोरं हे सत्य झेलायला.. बाहेर सायरन, शिट्ट्या वगैरे चालूच होत्या.. सगळ्यांनी एकमेकांकडे बघून माना डोलावल्या.. 'आल्या' या अर्थानं.. दोन च्या आधी कशा ? 'अगं आवरलं माझं ! मग बसून कंटाळा आला.. म्हणून म्हटलं जाऊंया' उषाताईंना सांगत होत्या, 'तूं तुझी गाणी संपव.. मी जरा हिंडते.. कॅमेरा आणलाय.. तुझे फोटो काढते.. मी स्वागत केलं दिदींचं आणि मग अंकुरजवळ जाऊन त्याला आधी भानावर आणला.. (क्रमश:) सरोद (पधप सासासा निधप गरे नीरे गमग रेगरे सा) तू ज.. (नी ध) अगदी सुरुवातीला ज्या 'प्रार्थने' चा उल्लेख केलावता, तिचा M0, आणि पहिला शब्द माझ्या अ-सुर, अल्पमतीला आकलन झाला तेवढा, लिहितोय.. गमग.. पहिलं पाऊल.. रेगरे.. दुसरं पाऊल.. सा.. तिसरं पाऊल.. (establishing shot) cut to पसा पसरून.. तूज.. (mid close).. असे दृश्यांश योजले होते.. त्या प्रमाणे तंतोतंत, दिदींनी अगदी सहजपणे, first take, OK दिला.. चित्रीकरणापूर्वी, मोरेश्वरशास्त्रींच्या अनुमतीने गर्भगृह उघडून, दिदींनी आंत जाऊन पाहिलं.. तेंव्हा उंबरठा ओलांडून आंत जातांना, त्यांनी आधारासाठी बाजूला बघीतलं.. विवेकनं पटकन हात पुढे केला.. त्यांच्याकडे.. ते त्यांचं जगप्रसिद्ध smile देत, त्याच्या आधाराने आंत गेल्या दिदी.. विवेकचा जन्म धन्य झाला.. आरती मधे बरंच वृंदगान असल्यानं, सर्वांनाच आंत उभं करणं आवश्यक होतं.. अशा रितीने.. 'तूज मागतो..' पर्यंत आम्ही दिदींना, गजानना बरोबर composite shot मिळावा म्हणून, आणखी पुढं उभं राहायची विनंती केली.. म्हणाल्या, 'काकतकर, पुढच्या shot ला आताचं तुम्ही बहुतेक मला गणपतीच्या मांडीवर बसविणार बहुतेक..' आणि आम्ही सगळेच हसलो जोरात.. सगळ्यांच्या मनावरचा ताण हलकां झाला.. मी मनांत म्हटलं, ' बयो, तीच तुझी खरी जागा आहे.. सरस्वतीची.. हक्काची..' 'उठा उठा सकळ जन..' मधल्या M0, M1, M2 करितां,, शास्त्रीबुवांची मुलं फुलं खुडतायत, हार गुंफतायत, ऐश्वर्या वहिनी रांगोळी काढतायत, तुळशीला पाणी घालतायत, गोशाळेंत, शिष्यगण, दुभत्यांना स्नान घालून, धारा काढून, चरायला नेतांयत, शास्त्रीबुवांसमोर घनपाठाची दीक्षा घेतायत अशी दृश्यं चित्रित करून अंतर्भूंत केली होती.. चित्रिकरण संपलं, दिदी निघाल्या.. आणि एक सुंदरसा Master stroke मारला तर यांनी.. जगांतल्या यच्चयावत बुजुर्गांनी धडा घ्यावा असा.. दोन पावलांवर थबकल्या.. मागं फिरल्या.. ' मला महिताय, तुम्हालाही माझ्याबरोबर एक फोटो हवाय.. मलाही हवाय..' असं म्हणंत, आमचा still photographer मिलिंद कवडेला बोलावून शेजारी उभा करून, छानसा फोटो काढून घेतला दिदींनी.. कलाकार, जरं असं माणूसकीच्या जाणिवेनं वागले तर ते, ' दशांगुळे उरला' असे दिसतात.. आपेआप.. (इति). ळ ! कर्नाटकि उद्गम ळ ! ऊर-उरुवर धाम ळ ! सजग करितो काम धमन्यांमाजि.. ळ ! कमनीयतेचा थाट ळ ! अखंड वळणांचा घाट ळ ! एकचि मधे निरगांठ मोकळण्या जोड.. ळ ! पागोळ्यांचे पाणी ळ ! शशिधर आणि धरणी ळ ! ठेविली शेजारी आवळोनी गाठोडी दोन.. जिणे तसेही सोपे असतें कांहो संकटे आपदा फोडिति अखंड टांहो दुर्लक्ष करोनी कांहीं सोसंत थोडे हे असेच असते दामटायचे घोडे वारींत राहावे निढळावरचे थेंब अधिकाच्या हावेपासुन जावे लांब प्रत्येक रोवुनी पाउल जावे पुढे अन् वृथा कुणा घालोचि नये सांकडे सत्कर्में होती यशशिखरे सर सारी सत्य हे चि अन् ! उरते अखेरवेरी -अरुण काकतकर. (भावानुवादाचा एक गरीब प्रयत्न) हात जोडून, करुणा भाकीत, करीत दातांच्या कण्या म्हणंत राहावं वाटतं 'इतका साधा कां तूं जिण्या ?' रोजमराच्या धूळ वाटेला काट्यांची परिसीमा मऊ हरळी पावलांना मिळेल जातांना निजधामा ? जगतांना जेंव्हापासून निर्मळ सरळमार्ग चोखाळला चाहूल कृष्णविवराची लागून तेंव्हा, मुठींतला हिरा मात्र निखळला कुणी मला द्याल थोडी वक्रोक्ती, युक्ती उसनी ? इप्सित साध्य झालं कीं अलगद ढकलेन विस्मरणी... -अरुण काकतकर. जवळीकी ऊतूं जाती, तेथे बेरंगांची भीती सारी मानलेली नाती , होताती, बोचरी पुढे... कशाचाही अतीरेक, अंती जाचकं, घातक.. ज्याला लाभला सीमांक वेचक, वेधक जाते होत... -अरुण काकतकर. धराईच्या उदरी खोल बीजाचे फळणे अबोल शुष्ककाष्ठांचे पतन-ढोल भूमंडळी कडाडती सुरवंटाचे फुलपाखरू कोषांत येता आकारूं वंशवृद्धिहेतु चमत्कारूं नादेविण, भूतांचा नाद भयावह कधि अपार नीरवासि मात्र निर्भयवर कृष्णमेघांचा निर्ध्वनि वावर भिडता, परि तडिता चित्कारें... कोलाहल कल्लोळ कालवा टाँहो आक्रोश वा धावा कुजबुज वा केका, मूलतत्वा नीरवाच्या भेदिती... भूत होते कालातीत, भविष्य सहसा अनिश्चितं वर्तमान ठेवोनि दृष्टिपथात ओढावे जिणे... कंठावर पिसावलाय लोभस निळा साऱ्या देहांपेक्षा लक्षवेधी आगळा त्या मागे आहे कां पण हरवलेलं गाता गळा ? चंचूं उघडून जरास वाईंच बोल कीं बाळा.. धुकं गडद पसरतंय झुंजुरका, शरदपुनव सरली शिशिरची शिरशिरी, वाकळींत लगोलग शिरली थव्याथव्यानं सवंगडी तुझे देशोदेशींचे येतील तळ्यापाळी कांहीं दीस विसावून परत जातील साऱ्या सृष्टीनं घेतलिये धुक्याची झूल... सरी ओसरल्यावर, आतां थंडीची चाहूल... शेकोटींभवती गप्पा, त्यांत पिशाच्च नी हडळ.. घरला परतल्यावर, अस्तुरीसंग एकच वाकळ.. कोरडल्या कायेवर कोकमतेल फासून.. च्या पीत आळसावायचं चुलीसमोर बसून.. अष्टमीच्या चांदाला, शुभ्र शालींचं वळ.. चांदण्या घुसूं पाहात्यांत, आंत बळबळं.. -अरुण काकतकर.

संचित

[30/08, 13:08] 24ak47@gmail.Com: थंडी पाऊस ऊन वारा कडेकपारी दऱ्यां आसरा मिठीसाठी मित्राचं कलेवर आप्त त्याचे गांवी दूरवर ऊब कुशींतल्या बंदुकीची अंगाई रात्री उखळी तोफांची स्वस्थ शांत भवताल ? सपान तांत-माय अस्तुरी ? सईंचं रान कौतिक शंभर दिवसांच इथं हात घालींत जिथं तिथं उरावर एकमेक कधी क्षणोक्षणी मिठ्यांची व्याधी रोजगार ? दशसहस्र किमान तरी रडारड, देह बेभान मागे निंदानालस्ती मुखांत वरवर मात्र बेगडी प्रेमांत आम्ही मूर्ख ! बघत बसतो जरी पर्याय अन्य असतो टाळलं तरी पडेल फरक ? धीट होत दावतील भडक न्याहाळून पाहा उभय चित्रं कशानं शहारतांयत गात्र ? मनाला एकदा नीट विचारा आवडेल ते उराशी धरा [30/08, 14:33] 24ak47@gmail.Com: प्रेम, ममता, माया वात्सल्य, दया, करुणा, सत्कार वैर, तिरस्कार, सूड, फसवणूक अत्याचार, नी बलात्कार ढळल्या मनुष्यतत्वापुढं जंगली हिंस्र पशुत्व लाचार जात पात धर्म पंथ यांचा होतो कुणाला साक्षात्कार ? काळजात उसळला आगडोंब की उखड कोंभ, जबरी झोंब छाटून टाकतांत जिभा साऱ्या टाळायला गांवभर होणारी बोंब संस्कृतीच्या बरोबरिनं फुलते फळते विकृती कथेच्या गर्भित व्यथेची हीच वैश्विक परिणिती.. आर्त आक्रोश हाळी कोती बेगडी ठरतात अवघी नाती रक्त मांस सांडलं, सडलं सहज रिचवते निर्विकार धरती पोटच्या छकुलीवर जिथं हवी होतो बाप कसली कर्माची उत्क्रांती पुण्य नि पाप.. सत्ता, संपदेचे बेमुर्वत लगाम असतांत ज्याच्या हाती मागे भेदरलेले सगळेच दलित, उरतात बाळगत मनांत भीती.. -अरुण काकतकर. केंद्र शासनाच्या, मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली, या शिखर संस्थेनं, १९८९ मधे म्हैसूरच्या भाषा विज्ञान संस्थेंत आयोजित केलेल्या, पहिल्या शैक्षणिक दृक्श्राव्य कार्यक्रमांच्या, गुजराथ, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आणि केंद्रीय संस्था या सात राज्यांतील, शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थांमधले कार्यक्रम मागवून घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेंत, महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार मिळाला होता. एकूण तीन कार्यक्रम, बिपिनचंद्र चौगुलेचे दोन.. 'वसंतातली घरकुले' आणि 'ओळख संगणकाची' आणि माझा एक.. 'गंमत जंमत शब्दांची', असे स्पर्धेंत अव्वल क्रमांक मिळवून पुरस्कार विजेते घोषित झाले होते.. तर.. ...हे सगळं आज लिहिण्याची प्रयोजन म्हणजे, तो पुरस्कार आणि करंडक, मी, *बालचित्रवाणी* चा निर्मिती विभाग प्रमुख या नात्यानं, प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आदरणीय शिवराम कारंथ यांच्याहस्ते स्वीकारला होता. भटियार, शुद्ध कल्याण, अभोगी, नंद, बिलासखानी, यमन, मालक� [30/08, 14:35] 24ak47@gmail.Com: १)नाते रुजलेले खोल, खुंटत कधिहि नाही.. ... नात्यांचा रेशिमबंध, तोडता कुणि तुटतचि नाही... .. तरंग उठता हृदयी, सुखावे दुखरी कळही... ... बेभान होत पुळणीवर कल्लोळ धडकण्या पाही... .. २) पाहिले नाहि जरी त्याने, हुरहुर तरि जागत राही.. .... अस्थायीइ संपण्या आधी, अंतरा खुणावत राही, ..... पापणीआड असलेला साकळ तो टिपतचि राही, .... चरचरत्या घावावरती ,घालण्यासि फुंकर बाही, .... ना शब्द नाहि हुंकार तरि, मूकपणे बोलत राही, (१ आणि २ हे वेगवेगळे पर्याय आहेंत.. ज्याला जैसे भावे, त्याने ते निवडुनी घ्यावे.. वा वेगे फेकुनि द्यावे..) [30/08, 14:40] 24ak47@gmail.Com: ‌‌Up हे थेंबच श्रावणसरिचे , कीं अश्रू शोकोद्भव ? कीं तरुचे गळले पान, घेई धरणीचा ठाव ? वाळक्यांत पाउल पडता कुरकुरती ठाई ठाई मग उरे प्रतीक्षा केवळ कधि गिळेल मृत्यूखाईं मातींत मिसळुनी जावे, अन् मुळांसि धरुनि राहावे धमन्यांत शोषिले जाऊन झाडांत पुन्हा उगवावे... शिड उभारुनि, भरुनी वारा, नाव जाउंद्या वेगे .. तांत-माय,अस्तुरि-छकुली अजुनी असतिल जागे.. शिणल्या चाकरमानी देहा, दोन दीस विश्राम परतायाचे पुन्हा गाळण्या चरितार्थार्था घाम.. पैल गाठण्या, उत्सव करण्या सारे कष्ट वाहावे मिठिंत साठवुनि कुटुंब सारे मना उभार करावे.. अधुरे, अपुरे जिणे असावे, अन् थोडी अतृप्ती मग आनंदा उधाण येते कांहीं होता प्राप्ती.. -अरुण काकतकर. आभाळतळी हिरवाइच्या सावळ्या कथा तमारि सहजी वारी रानांच्या व्यथा जळीस्थळी भूतांच्या वरदायी प्रथा शाखांवरी फुटव्यांच्या लक्षवेधी गाथा लख्ख उजळले मंडल तृणगात्री चैतन्य झुळक गार वाऱ्याचिहि ऊब पिऊनी धन्य -अरुण काकतकर. अवकाशगामी पक्षी लोमस झेपावला वरुणास्त्रधारि कळिकाळ कि अवतरला कीं लाटांनी उंच उडविली नावं ज्याला जे जे सुचेल ते समजावं काचाचे तुकडे घेउनी दर्पण सांधू बिंबांत भंगल्या ध्वस्त मनाला शोधूं अंगांगातुन फुटवे नवोन्मेष कोंभांचे अनुभवत अनंतासीम स्वरूप नभाचे ऊर्ध्वगामि सळसळ मातींतुन चेतली तोडींत बंध बीजे स्वतंत्र जाहली स्वातंत्र्याचा सुगंध हुंगत भरून फुगली छाती विकृत कांही करूं पाहती यशोध्वजाची माती तण ऐसे हेरुनी उपटुनी फेकुन देऊं दूर जळांत खळखळत्या उसळूंदे निर्भयतेचा पूर फुगा फुगावा इतुकां ठेउन भवतालाचे भान कांटेरीचे सीमेवरती माजंत आहे रान स्वकीय होती , फुंकित अस्तनीतचि निखारे पिसाळ पिसाट पशु वारावे मोकटलेल्यां वारें मन ! अतर्क्य तवंग, गाळ मन ! विकृतान्हिचा लोळ मन ! दु:ख सुखांची माळ प्रसंगोपात्त || मन ! अदृश्य संतत बोच
थंडी पाऊस ऊन वारा कडेकपारी दऱ्यां आसरा मिठीसाठी मित्राचं कलेवर आप्त त्याचे गांवी दूरवर ऊब कुशींतल्या बंदुकीची अंगाई रात्री उखळी तोफांची स्वस्थ शांत भवताल ? सपान तांत-माय अस्तुरी ? सईंचं रान कौतिक शंभर दिवसांच इथं हात घालींत जिथं तिथं उरावर एकमेक कधी क्षणोक्षणी मिठ्यांची व्याधी रोजगार ? दशसहस्र किमान तरी रडारड, देह बेभान मागे निंदानालस्ती मुखांत वरवर मात्र बेगडी प्रेमांत आम्ही मूर्ख ! बघत बसतो जरी पर्याय अन्य असतो टाळलं तरी पडेल फरक ? धीट होत दावतील भडक न्याहाळून पाहा उभय चित्रं कशानं शहारतांयत गात्र ? मनाला एकदा नीट विचारा आवडेल ते उराशी धरा