Friday, August 30, 2024
संचित
[30/08, 13:08] 24ak47@gmail.Com: थंडी पाऊस ऊन वारा
कडेकपारी दऱ्यां आसरा
मिठीसाठी मित्राचं कलेवर
आप्त त्याचे गांवी दूरवर
ऊब कुशींतल्या बंदुकीची
अंगाई रात्री उखळी तोफांची
स्वस्थ शांत भवताल ? सपान
तांत-माय अस्तुरी ? सईंचं रान
कौतिक शंभर दिवसांच इथं
हात घालींत जिथं तिथं
उरावर एकमेक कधी
क्षणोक्षणी मिठ्यांची व्याधी
रोजगार ? दशसहस्र किमान
तरी रडारड, देह बेभान
मागे निंदानालस्ती मुखांत
वरवर मात्र बेगडी प्रेमांत
आम्ही मूर्ख ! बघत बसतो
जरी पर्याय अन्य असतो
टाळलं तरी पडेल फरक ?
धीट होत दावतील भडक
न्याहाळून पाहा उभय चित्रं
कशानं शहारतांयत गात्र ?
मनाला एकदा नीट विचारा
आवडेल ते उराशी धरा
[30/08, 14:33] 24ak47@gmail.Com: प्रेम, ममता, माया वात्सल्य,
दया, करुणा, सत्कार
वैर, तिरस्कार, सूड, फसवणूक
अत्याचार, नी बलात्कार
ढळल्या मनुष्यतत्वापुढं
जंगली हिंस्र पशुत्व लाचार
जात पात धर्म पंथ यांचा
होतो कुणाला साक्षात्कार ?
काळजात उसळला आगडोंब
की उखड कोंभ, जबरी झोंब
छाटून टाकतांत जिभा साऱ्या
टाळायला गांवभर होणारी बोंब
संस्कृतीच्या बरोबरिनं
फुलते फळते विकृती
कथेच्या गर्भित व्यथेची
हीच वैश्विक परिणिती..
आर्त आक्रोश हाळी कोती
बेगडी ठरतात अवघी नाती
रक्त मांस सांडलं, सडलं
सहज रिचवते निर्विकार धरती
पोटच्या छकुलीवर जिथं
हवी होतो बाप
कसली कर्माची उत्क्रांती
पुण्य नि पाप..
सत्ता, संपदेचे बेमुर्वत लगाम
असतांत ज्याच्या हाती
मागे भेदरलेले सगळेच दलित,
उरतात बाळगत मनांत भीती..
-अरुण काकतकर.
केंद्र शासनाच्या, मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली, या शिखर संस्थेनं, १९८९ मधे म्हैसूरच्या भाषा विज्ञान संस्थेंत आयोजित केलेल्या, पहिल्या शैक्षणिक दृक्श्राव्य कार्यक्रमांच्या, गुजराथ, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आणि केंद्रीय संस्था या सात राज्यांतील, शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थांमधले कार्यक्रम मागवून घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेंत, महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार मिळाला होता.
एकूण तीन कार्यक्रम, बिपिनचंद्र चौगुलेचे दोन.. 'वसंतातली घरकुले' आणि 'ओळख संगणकाची' आणि माझा एक.. 'गंमत जंमत शब्दांची', असे स्पर्धेंत अव्वल क्रमांक मिळवून पुरस्कार विजेते घोषित झाले होते..
तर..
...हे सगळं आज लिहिण्याची प्रयोजन म्हणजे, तो पुरस्कार आणि करंडक, मी, *बालचित्रवाणी* चा निर्मिती विभाग प्रमुख या नात्यानं, प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आदरणीय शिवराम कारंथ यांच्याहस्ते स्वीकारला होता.
भटियार, शुद्ध कल्याण, अभोगी, नंद, बिलासखानी, यमन, मालक�
[30/08, 14:35] 24ak47@gmail.Com: १)नाते रुजलेले खोल, खुंटत कधिहि नाही..
...
नात्यांचा रेशिमबंध, तोडता कुणि तुटतचि नाही...
..
तरंग उठता हृदयी, सुखावे दुखरी कळही...
...
बेभान होत पुळणीवर कल्लोळ धडकण्या पाही...
..
२) पाहिले नाहि जरी त्याने, हुरहुर तरि जागत राही..
....
अस्थायीइ संपण्या आधी, अंतरा खुणावत राही,
.....
पापणीआड असलेला साकळ तो टिपतचि राही,
....
चरचरत्या घावावरती ,घालण्यासि फुंकर
बाही,
....
ना शब्द नाहि हुंकार तरि, मूकपणे बोलत राही,
(१ आणि २ हे वेगवेगळे पर्याय आहेंत..
ज्याला जैसे भावे, त्याने ते निवडुनी घ्यावे..
वा वेगे फेकुनि द्यावे..)
[30/08, 14:40] 24ak47@gmail.Com: Up
हे थेंबच श्रावणसरिचे , कीं अश्रू शोकोद्भव ?
कीं तरुचे गळले पान, घेई धरणीचा ठाव ?
वाळक्यांत पाउल पडता कुरकुरती ठाई ठाई
मग उरे प्रतीक्षा केवळ कधि गिळेल मृत्यूखाईं
मातींत मिसळुनी जावे, अन् मुळांसि धरुनि राहावे
धमन्यांत शोषिले जाऊन झाडांत पुन्हा उगवावे...
शिड उभारुनि, भरुनी वारा, नाव जाउंद्या वेगे ..
तांत-माय,अस्तुरि-छकुली अजुनी असतिल जागे..
शिणल्या चाकरमानी देहा, दोन दीस विश्राम
परतायाचे पुन्हा गाळण्या चरितार्थार्था घाम..
पैल गाठण्या, उत्सव करण्या सारे कष्ट वाहावे
मिठिंत साठवुनि कुटुंब सारे मना उभार करावे..
अधुरे, अपुरे जिणे असावे, अन् थोडी अतृप्ती
मग आनंदा उधाण येते कांहीं होता प्राप्ती..
-अरुण काकतकर.
आभाळतळी हिरवाइच्या सावळ्या कथा
तमारि सहजी वारी रानांच्या व्यथा
जळीस्थळी भूतांच्या वरदायी प्रथा
शाखांवरी फुटव्यांच्या लक्षवेधी गाथा
लख्ख उजळले मंडल तृणगात्री चैतन्य
झुळक गार वाऱ्याचिहि ऊब पिऊनी धन्य
-अरुण काकतकर.
अवकाशगामी पक्षी लोमस झेपावला
वरुणास्त्रधारि कळिकाळ कि अवतरला
कीं लाटांनी उंच उडविली नावं
ज्याला जे जे सुचेल ते समजावं
काचाचे तुकडे घेउनी दर्पण सांधू
बिंबांत भंगल्या ध्वस्त मनाला शोधूं
अंगांगातुन फुटवे नवोन्मेष कोंभांचे
अनुभवत अनंतासीम स्वरूप नभाचे
ऊर्ध्वगामि सळसळ मातींतुन चेतली
तोडींत बंध बीजे स्वतंत्र जाहली
स्वातंत्र्याचा सुगंध हुंगत भरून फुगली छाती
विकृत कांही करूं पाहती
यशोध्वजाची माती
तण ऐसे हेरुनी उपटुनी
फेकुन देऊं दूर
जळांत खळखळत्या उसळूंदे
निर्भयतेचा पूर
फुगा फुगावा इतुकां ठेउन
भवतालाचे भान
कांटेरीचे सीमेवरती
माजंत आहे रान
स्वकीय होती ,
फुंकित अस्तनीतचि निखारे
पिसाळ पिसाट पशु वारावे
मोकटलेल्यां वारें
मन ! अतर्क्य तवंग, गाळ
मन ! विकृतान्हिचा लोळ
मन ! दु:ख सुखांची माळ
प्रसंगोपात्त ||
मन ! अदृश्य संतत बोच
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment