Tuesday, April 17, 2018

आजपासून रुबाई घाट.. १ ते ४९९

आजपासून रुबाई घाट.. ओविरूप आजवर शब्दस्रोतामागे कधि धीम्या गतिने अथवा कधि अतिवेगे वणवणलो मी तुडवींत वने अगम्य परि अखेर दिठींत आला प्रदेश रम्य २ या पहिल्या रचनेंतून घाट वेगळा देण्या आशीर्वच संस्कारांचा मेळा मी करितो आहे स्वागत शुभ आरंभी फुटवा प्रसवावा सुखकर आशयगर्भी २ डोकावु लागली भेगाळांतुन बाळे निरखण्या रूप अवकाशाचे आगळे प्रतीक्षा उरली भुऱ्या, कृष्ण मेघांची साकळली स्वप्ने भिजुन चिंब होण्याची ३ दूरस्थ मृदंगी घुमत खर्ज तालाचा मृद्गंधे शहार तरतरेल शरिराचा ढाळित चवऱ्या म्हणतिल तरुवर, ‘त्वरें ये ये ना ! करि बा जिणे सह्य साजिरे’ ४ शब्दांचा गुंफुनि गोफ आपल्याआप बघतां बघतां अवकाशी घेइल झेप अक्षरपुष्पे सहजी गोफण वेधेल कल्पनाविश्व सामोरे कधि येईल ? ५ भवताला देउन छेद आगळे स्थित वेगळ्पणाची जडली याला प्रीत वेधते दिठी हे समग्र पांथस्थांची कवतिके अंतरे विस्मरली हिरव्याची ६ वनराइत असते पीत छटा ‘वार्धक्य’ पाचोळा होण्या आधी शाखा-सख्य निरवांत पानगळ देते परि चाहूल वाळके ‘गूज’ करते पडता पाऊल ७ घनरानी जालामधे निबिड, जणु साद एकांडेपण वा भय पळते निमिषांत अदृश्य चालतो आजुबाजुने सखा मुक्कामावेरी होत नाहि पारखा ८ कोण्या अधमाने केले हे दुष्कृत्य सूडाचि कोणती विपरित असली रीत क्रोधाने इतुका कोण हरपला भान शमविण्यासि वणवा दिले पेटवुनि रान ९ बा तुवा कधितरी वाकावे लागेल ‘आधाराला घ्यावे काष्ठ’ असे वाटेल परि अस्तित्वाला चूड लावलिस ऐसी नाकारत तरुवर देतिल पाठ क्षमेसी १० निद्रिस्त मनुष्ये नशा कारणे कोण्या व्हा पुढती त्यांना भानावर आणण्या ‘भूतांशी’, सांगा ‘वैर असे जर घ्याल’ मोकावि जिणेभर धाय त्यांसि लागेल ११ येऊन स्थिरावत हसती अक्षरबाळे घाटाचे असले रूप जरी आगळे ‘शब्दाचे’ म्हणती, ‘घरकुल मांडू पुन्हा, आशयास निश्चित पुनश्च फुटेल पान्हा’ १२ अक्षरबीजेही धरूं लागली मूळ वेगळिच जरि धरा, पोत तिचा अन् कूळ अंकुरतिल आतां तृणपाती शब्दांची फुलतांच अर्थ, पूर्ती साहित्यकृतीची १३ डाडाडाडा (४) डडडडडडा (३॥) डाडाड (२॥) डाडा (२) डडा (१॥) = १३॥ झडली पाने (४) फिरुनि येतिल (३॥) पालवी पावलांनी (६) मावळतीचे (४) परत क्षितिजी (३॥) रंग येतील भरुनी (६) क्षण गेला जरि (४) सई उरतिल (३॥) सुखविण्याला भविष्या (६) (लघु=१/२, गुरू=१ या प्रमाणे) स्वप्ने सहसा (४) पळवित ठेवति (४) (इथं पळत हवं म्हणजे ३॥) दावित सदा आशा (५॥) (इथं ‘सदा दावीत आशा’ हवं, म्हणजे ६) १४ **** निद्राधीना, करुनि जागे, काय साधेल भाग ? स्थित अवस्था, चलन मिळता, काय घेईल वेग ? पक्वान्नाचे, पात्र दिसतां, कोण टाळेल भोग ? कर्माने फळ, केवळ न मिळे, प्राक्तनी हवा योग १५ ******* हे चार स्वतंत्र प्रष्ण/विधानं आहेंत... यांची शब्दसंख्या भिन्नआहे, पण अर्थवाहित्व नक्कीच आहे.. मग यांना कोणत्या ‘व्याकरणी’ कोंदणानं सजवायचं.. सल्ला द्या मित्र हो ! ******** वेगळाली मते असता, मौन धारण करावे ? इप्सित मनी सुप्त ठेउन मनुष्यें कां जगावे ? भजुनि पूजुनि कांड करुनी पुण्य (?) कैसे मिळावे ? अशा मूढा, उपायाने, कोणत्या भान द्यावे ? १६ ****** हे काय आहे ? निर्मला, सुगंधा, शुभ्रा नितळ, श्वेतांबरा ऋता संचिता अर्पुनी साऱ्या संपन्न सुफला कथा १७ प्रतीक्षेंत चिमुकले कोणी रुजवेल कां ? धरागर्भी मुळे झाकुन अंगांग भिजवेल कां ? १८ मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित. काळाच्या उदरांत जातिल उद्या जळे पाषाण काष्ठ वारूया लिखितास देत अभया संभाव्य ते संकट १९ ***** १९, १९ शब्द दोनीही अर्थवाही पंक्तींत.. सायासें गवसोनि आज मजला शार्दूलविक्रीडित बेअब्रू परतोनि गेलि; भिजुनी तेवली सांजवात २० 👍👍👍👍👍 लोटपोट झाले वारित संस्कारांना दाविते वाकुल्या ढळल्या पिवळ्या पर्णा परि एके दिवशी परिस्थिती बदलेलं काळीज अपेष्टा भोगुनी काजळेल २१ वार्धक्ये सुकुनी झडली वेलीवरुनी गळल्या पानाचे मैत्र धराभूवनी आधार देत पडत्याला धरुनी हात आयू उरली लागते कराया व्यतींत २२ ही कुण्या मनाला फुले वेधु पाहती ? क्षणभंगुर आयू उरली असतां हाती आनंद वाटण्या प्रामाणिक सज्जन असतांतच सज्ज न करता कधि अनमान २३ नाविन्य झळाळी अजून पाडे भुरळ जरि समीप आली पैल जायची वेळ माया ‘मोहा’च्या भवती जाळे विणते तोडीता बंध जाण्याला मन गलबलते २४ व्याधिग्रस्त झाली ज्ञान, कर्म इंद्रिये सजवीत राहती तरि वरवरच्या काये कोणाला करण्या आकर्षित या घडिला पिकल्या पानां जडला गळण्याचा लळा २५ कपिला कां ही प्रवाहांत थबकली कोण्या वत्साच्या प्रतीक्षेंत माउली कांठावर असतिल भुकेजली गोठ्यांत दावणिचि पाडसे हविंत कराया मुक्त २६ बिंबां सीमेवर प्रतिबिंबे चुंबिले अवकाशचि अवघे भवताली उतरले ही जिवाशिवाची अद्भुत, अगम्य भेट आकळण्या यावा दिठिंत भाव हृदयस्थ २७ थंडगार झुळुकेसारखि कधी सकाळं गुदगुल्या करित सुखदाइ सईंचे पळ स्वप्नांत पहाटे दृढ झालेले अनुबंध रुंजी दिसभर घालित लिहिति निबंध २८ अंतरांत मोहोरावर जणु वसंत येतो स्मृतिगंध हळुहळु भवताला भारितो वृत्तींस उधळतो सैरभैर आवेग कधिकधि वाटे, ‘हा उपायकारी रोग’ २९ दु:खे नि वेदना तशा कुणाला परक्या सुखभरल्या काळा सहज करिती पोरक्या कां, कशास ? मग मनमनांत कुढत बसावे विस्मरण्या त्या खदखदून सदा हसावे ३० बांगड्यास वाटण, किणकिण करिं बांगड्या कालवण ओरपून मार ताव तूं गड्या मग घोरत निवांत वामकुक्षि प्रहराची ढळतांच सांज सय मोगरिच्या गजऱ्याची ३१ मी लिहिले जरि कल्पून आज केवळ दावत आहे परि तशीचं, चित्र,सकाळ हा योग जरी कांहींसा योगायोग आनंदविभोर मन घुमतां तोडी राग ३२ ऊर्ध्वगामी झरझर बिंब काढेल जीवांचा राप वरदान असे कीं शाप ऋतुचक्र ? ३३ भास्करानेत्रिची आग रंध्रांत झरे स्वेदौघ सत्कर्में रुजुनी बीजे पदरी फळ रसाळ ताजे ३४ जरा कुठं फटफटतय मात्र तोंच झाली धावपळ सुरूं चित्कार करीत जीवमात्र, यंत्र स्पर्धेंत लगोलग लागली उतरूं ३५ गर्दी क्षणाक्षणाला वाढत जाईल जसजशी तसतशी गुदमरतील श्वास नी मनं बेभान भांडणं तंट्याची होईल सरशी वणव्यानं खाक होतील मनुष्यत्वाची रानं ३६ आशेला अजून जागा आहे ? वाचवायला हातांत धागा आहे ? घाई जाग ‘त्यां’ना करण्याची आहे.. झोपेचे मुखवटे ‘त्यां’चे फाडायची आहे.. येतील भीक्षांदेही करींत खोटं हसूं मुद्रेवर धारींत जोगवा मतांचा मागतील लाचार वागवीत मनांत सत्तार्थ दुराचार ‘कामचुकारांना हाणू’ सांगा ‘भवताली जाळी विणू’ सांगा तुम्ही आम्हीच हे करायला हवं जगण्यायोग्य जग पुन्हा वसवायला हवं... ३७ मनुष्ये कसली ? अंधश्रद्ध मेंढरे कां उगा सजविती पार्थिवास ‘लेकरे’ ? हलवाया याला हवे कुणीतरी ‘पात्र’ राहील अन्यथा पडुनि तिथे दिस-रात्र ३८ कसबाने प्रतिमा घडवुन मूर्तीकार होतसे अलग गुंततां न भावे फार गोजिरे साजिरे रूप दिलेले त्याने झाकोळुनि जाते गंधाक्षत पुष्पाने ३९ झावळ्या पर्णभारल्या, घेऊन सावल्या आल्या पसरुनी पंख स्पर्शाया अवनीवर झेपावल्या कोठेही गेले तरिही साथीला निसर्ग असतो गंध-नाद-दृश्याने वा स्पर्शाने प्रचिती देतो ४० कां जळती अजुनी सौधावरती दीप ? की झाकोळें तेजाचा होइल लोप ? सुख कुणा वेदना कुणा मनी हुरहूर स्वप्नांत मिलन वा भयभरले अंतर ४१ सीमेवर ऋतुच्या द्विधा अवस्था असते स्वागतपर हासूं पांपणींस भारते दिठि कांठि दहिवर देता निरोप सरत्यां यक्षांतरि पाली विरहग्रस्त चुकचुकत्या ४२ तरु-पर्णांची तवान चौकट, मधे देखणी गतिचलिता भोगुनी छाया माया सजली परतुनि सेवाभावव्रता यंत्रे, तंत्रे बहुविध परि विश्रामा भूतांचींच कुशी उत्क्राती जाहली कितिहि तरी नमते व्हा स्रोतापाशी ४४ भणाण वारा धुंवाधार झडि वडवानल वा भूभ्रंश क्षणार्धांत जातील लयाला कोपाचा होता ग्रास नका संपदा ओरबाडुनी वृथा करूं उध्वस्त धरा मारक होइल तारक ! ना कुणि घेइल अवचित अवतारा ४४ मानव निर्मित चलनी नाणी हमीपत्र सारे व्यर्थ भूतांच्या नीरवांत असतो जिण्यांतला स्थितं सत्यार्थ प्रमाणांत भोगा सुख सारे उतूं न जाइलं इतुकेची अतिरेका वेळीच आवरा दुधार टाळा दु:खाची ४५ शाईस कृष्ण वारुनी प्रकटले बिंब ओकण्या आग पळभरांत धारिल कोप संधिकाल सहसा असतो आश्वासक कृतिपूर्तिस वा विश्रामा उपकारक ४६ झटकोनि आळसा करुया कार्यारंभा पाहेल करुं जरि तपोभंग कुणि रंभा कवळीक उषेची प्रीतरंगि भासेल माध्यान्हि दिसाच्या भ्रमनिरास होईल ४७ अंतरि रुजते कार्येच्छा, तोच ‘मुहूर्त’ मांडणे कुंडल्या प्रयास ठरती व्यर्थ मनगटांत वा मगजांत उमटतां कृती वादळे, संकटे अपाप गळून पडती ४८ चुंबण्यास स्थानभ्रष्ट वल्लरि झुकोनि वाकली पोहेचण्या पानांआधीच कलिका सरसावली ४९ तिज ठावे गत निश्चित निर्माल्यवत होणारी वाहुनी, उधळोनि वा श्रद्धेय वा प्रेतावरी ५० मानित उमलणे, झडणे पुनर्जन्म संकल्पना आधार धुंडण्या प्रयास कालापव्यय, वेडेपणा ५१ साधेल यांतून काय ? सुखावेल कोण ? किती ? व्यतित करूं तोच काल चेतविण्या ज्ञानज्योति ५२ कोठेही कधिहि परिसर तेजोभारित सर्वव्यापि भानू अडसर अाहे वारित सोपान, मार्गिका लंघण्यास अंतर दुर्लक्षुनि ! प्रकटे जे सत्य शिव नि सुंदर ५३ गावांत कर्मव्यस्तांच्या अभ्रे ओढुन बसलेली निस्तेज अधोगत ‘उषा’ झाकोळे काजळलेली जराग्रस्त ज्ञानेंद्रिये, परतोनि न होती सजग ‘पिवळी’ कां जळलेली पाहतिल सृष्टिचे रंग ? ५४ निरखून पाहिले नाही प्रकाशचित्र दिपलेलि दिठि देइना पाहु अन्यत्र कवळ्या किरणांची किमया किं कारणे माध्यान्ह जिणे ? प्राक्तन-वन्ही सोसणे ५५ कां पडला झडला तुटलेला हा वासा ? पोखरोनि पोकळ कुणि केली अवदसा ? त्यांतुन डोकावे नवोन्मेष अंकुरला फोफावत जाइल, कितिही घाला घाला ५६ पाहुनी धुमारा झुडुपां गाली हसूं ‘आपणच’ म्हणे, ‘आधारा कंबर कसूं ! जोजवीत अंकावर माया ममतेने अंतरप्रेरित कृति अाचरुं कृतज्ञतेने !’ ५७ कांचनरंगांनी सालंकृतं होवुनि आभाळ क्षितीजी कवळूं पाहे धरणी वारुनि निद्रेला ‘उत्तिष्ठत, जाग्रतं’ मर्यादित जिण्यांत कार्ये असति अनंत ५८ प्रत्येक कृतीला अनेक असती सीमा कालावधि, सुविधा पूर्ण कराया कामा वेळींच हेरुनी पल्याडचे अडसर निग्रहि अंतर करतेचि मात त्यांवर ५९ देठांनि प्रसविली स्वयंप्रकाशित छकुली तमगर्भ निशेला दाविति तीं वाकुली कुणि खुडोनि, वा तुडवोनी पायातळी उचलेल, तुष्टी-प्रौढिची,बेगड्या तळी ६० माती वा धातूंचे असती रिते, कधी भरलेले नशिबी पण कुठला तुमच्या ते जन्मत:च ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे ६१ रक्तांचे धमन्यांमधल्या करून पाणी स्वेदसरितेच्या कांठी वसविलि ज्यांनी ठाणी बिंदू भाळिचे टिपून त्यांच्या आज बाहूंत पेरुं सुकृत साधाया वीज ६२ विकला पोटार्थी स्वाभिमान नी देह काहिलींत असता सदैव पोळत गेह सोसुनि गिळुनी अपमान नि अवहेलना प्रेरतील वणवे चूड लावण्या मना ६३ वेळींच करूंया शांत भडकले रान आत्मियता, जाणिव, क्षणोक्षणी शिंपून अंकुरण्या आधी सुप्त सुडाची बीजे तण खुरपुनि धरणी नांगरिली पाहिजे ६४ प्रीतरंगी प्रफुल्लित कणाकणांतुनी उमलत आव्हान सौंदर्या देत सज्जलि शाखेवरती ६५ शाखांत गुंफुनी शाखा रेखिली नक्षी पार्श्वांत स्वच्छ आभाळ ठेउनी साक्षी धसमुसळि मिठी वाऱ्याची राईभवती आगळ्या तऱ्हांच्या अवखळ त्याच्या रीती ६६ वाऱ्यावर होउन स्वार डुलत हिरवाई सावली अथक थकल्या पांथस्था देई गारवा घडीभर जिरतां क्लान्त शरीरी मार्गस्थ परतुनी होण्या मिळे उभारी ६७ मंडपी निळ्या झुंबरे लावुनी पिवळी स्वागतास सजली धरती, अंबर सगळी इहलोक ? नव्हे ! जणु स्वर्ग उतरला खाली आसुसल्या दिठिची क्षणांत तृषा निमाली ६८ सूडाचि चूड धगधगती सीमेवरती भंगती चुडे शेकडो नववधूंहाती सण-वार-सोहळे करीत बसली जनता गर्दभास देऊन लाथाळ्यांची सत्ता ६९ चुरगळति कळ्या कवळ्याकवळ्या कामांध दुष्कृत्य वारण्या, कुणि घालावा बांध लटकवणे चार मनुष्ये फासावर का ठरेल औषध क्रूर विकृतिवर ? ७० पाचोळ्यावरती तवान पाने, फुले कर्दमांत जैसे कमळ आगळे उमले कुणि खुडोनि घेइल कचपाशी माळण्या प्राक्तनीच त्याच्या दु:ख, मूक विनवण्या ७१ माजावर आला ग्रीष्म ! तप्त वासना कवळित जळराणी भिडेल, फेडुनि वसना परिपूर्ति अखेरी गर्भवती प्रसवेल आषाढ-क्षीर तृष्णा, कृष्णा लुचतील ७२ पक्व भंगुनी पतनपरिणामि स्रावतो रस धरतीस रुधिर अभिषेक ? कांहिसा भास घडवितां निवारे कार्मिक पडझडतांत व्रण तिथेचं ठेवुन श्वासाला मुकतांत ७३ पडले फळ जाते मातीमधे विरून ‘असण्या’चे त्यांच्या क्षणार्धांत विस्मरण जगण्याला असल्या वाटे ‘मरण’ म्हणावे गर्भांतच रुजल्या बीजे जळोनि जावे ७४ सुगरणिचे घर मातींस कुणि मिळविले उन्मादे होत बेभान विकट हासले सूडाने पेटुन कुठल्या भारद्वाजें शमविण्या क्षुधा पाडिले मारुनी टोचे ७५ घडलेचं नाहि जर पाप कसे दिसावे पुण्य रूप कृष्णाविणा आपेआप धवल उमलेल का ? ७६ दिसाविण कैसी निशा क्षुधेविण वा अभिलाषा मुक्तानंदाकरिता बंदिवासा भोगणे अनिवार्य ७७ तारका आज उतरल्या धरेवर भासे परिणामी अंबर कृष्णांगी दिसतसे दृश्यमान होतां तमारि क्षितिजावर लुकलुकता जाइल झाकोळुन संसार ७८ पांपण्या निशेच्या होता अर्धोन्मलित गडग्यांचा लागे फिरावयासि रहाट मग तीच उषा, माध्यान्य नि संध्या क्लान्त बसतील भाबडे प्राक्तनांसि चिवडींत ७९ चाहूल लागता कोणाच्या येण्याची शिरशिरी झुळुकस्पर्शाच्या गंधांगुलिची घंटिका नादतिल किणकिण स्वागत हेतूं पांथस्थांतरिच्या विरतिल शंका, किंतू ८० गजपंचक चाले आपुल्यांच मस्तींतं चित्कार करिति कोणत्या बरें मोदांत ? चौकटींत गोंधळ उभयतांनि घालून प्रहराचि प्रथम आळविली सुरेल धून ८१ बंद दाराबाहेर हिरमुसली परतुनि आलेली चिमुकली फुरंगटून गणवेषांतली, फुगवोनि गोबरे गाल ८२ सानुली बाहुली भुकेजलेली ‘माय’ म्हणे ‘कोठे गेली ? येतांच कळवळून जरि भेटली, घर बांधेन तरी उन्हांत !’ ८३ घसरगुंड्या,गोलचक्कर, झोपाळे बंद फाटकां आंत दिसती सगळे पाटीपुस्तकांचे सांभाळत गाठोळे सांगा खेळावे कसे ? ८४ चालता श्वास मिरवितांत ‘नामां’कित थांबता श्वास परि मिळुन जाति मातीत ऐल-पैल श्वासाच्या भवती असते ‘शव’वासी होता ‘असणे’ गळून पडते ८५ वेगळे परंतू शाखा मुळांत एक देखणे जुळे जणु पिंपळपान सुरेख स्मृति घेउनि सोबत दडेल कुणि पानांत कुणि करुनि पिपाणी, धरेल मुखांत सुत ८६ पिंपळपानाची वळून एक पिपाणी.. वाजवीत छकुली घरांत, रानीवनी कर्कश विरला स्वर तिचा कालडोहांत उरलेत फक्त ओल्या गालावर हात ८७ द्रुमांगी उपजत मोठेपण शिखेवर सूर्य झेलून सावलीं आश्रितां देऊन ठाकतो निरपेक्ष ८८ तरिही लव्हाळी वाचती वृक्ष वादळांत उन्मळती कोणती ऐसी न्याय नीती जगती ! नकळे ८९ म्हणोनि राहाती बोटचेपे लढण्यां अंतर थरकांपे प्रार्थिती पार्थिवाच्या कृपे जनसामान्य ९० छापाच्या, कोरीव वा त्रिमिती विविध जीवमात्रांच्या आकृती ‘कोण फुकेल कां प्राण ?’ पुसती दीर्घ प्रतीक्षेंत ९१ घ्या भरुन ओंजळी, हवी तेवढी फुले नासिका, दिठि अन् मानस ठेउन खुले ठेवा भूते उधळत अक्षय राहातील जरि लक्ष ओंजळी उतूं उतूं जातील ९२ कां बां ऐसा पाठमोरा पिसारा मिटोन मोरा ? कधी वळवशील मोहोरा सामोरा होवून ? ९३ 2 *(ईश्‍वर)* ईश्‍वर भी एक मज़दूर है ज़रूर वह वेल्‍डरों का भी वेल्‍डर होगा शाम की रोशनी में उसकी आंखें अंगारों जैसी लाल होती हैं, रात उसकी क़मीज़ पर छेद ही छेद होते हैं. असलांच ‘तो’ तरी, जुळारि खचित असेल फुललेल्या घेउन ठिणग्या दिठिंत निजेल (पांपण्यांत जिरवुन आग दिठी मिटेल) अंगड्यांस त्याच्या असतिल अनंत छिद्रे रात्रीस अंगभर फिरतिल सुखकर वारे ९४ * 3 *आस्‍था* मेरे पिता मज़दूर थे आस्‍था से भरे हुए इंसान जब भी वह नमाज़ पढ़ते थे ख़ुदा उनके हाथों को देख शर्मिंदा हो जाता था. कष्टकरी होते माझे माय नि तांत भरलेले माणुसकीने ओतप्रोत कर जोडित असतां दोन्ही चिराळलेले लज्जेने काळिज ‘त्या’चेही भंगले ९५ ***** जमलय कां रूपांतर ते कळवा.. एकाच स्रोतांतल्य विलग झाल्या धारा आपापल्या पर्णभारा जोजवीती.. ९६ आधाराने उभी शेजारी शेलाटी नाजूक वल्ल्ररि टांचा उंचावीत अधांतरी लगटूं पाहे.. ९७ काळजांत आर्त ज्योत भवताला प्रकाशित ‘ज्ञाना’च्या प्रवाहांत उचंबळो आली.. ९८ प्रलयाची कल्पून दृश्ये वर्णन करितो रडवेला मनांत भेदरलेला असतो ते होइल तेंव्हा निमिषार्धांत सरेल जाणुन घेण्याला जीव मात्र न उरेल ९९ मी रचूं पहातो शब्दचिऱ्यांचे घरटे कुणि आशयास शोधीत निवारा येते जुळतांत मने अन् भरुन पोकळी जाते पूर्णत्व गेह पावुनी हसंत सळसळते १०० आज रुबाई घाट सुरूं करून ३८ दिवस झाले.. ९९, १०० उमलेलि मोगरी तिथेंच राहूंद्याना ! माळून नका मिरवूं वेळावत माना प्राक्तनांस कुणि कधी हवे तसे बदलेलं ? ठरलेले भविष्य आहे तसे घडेलं १०१ सानुला गोजिरा कर्मयोगि देखणा दिठी भिरभिरते आहे सावध ठेउन भाना ‘उत्तिष्ठत, जाग्रतं’ लागत नाहि म्हणाया ‘शाखें’त सज्ज अवकाशी झेपावया १०२ भूतांनी बहाल ललनांना केलेले बहुमोल असे जगि मातृत्वाचे लेणे वृत्तीत परी वारे कसले अवतरले तागडींत त्याला सौंदर्याच्या तोले १०३ गोंडस सारी जगरहाटींत फिरतांत वरकरणी कृतज्ञ कांसेसहि डसतांत वात्सल्यभावना विरुन कालिरूपांत संहाराक भामिनि नाशवंत ठरतांत १०४ आईसाठी कां दिवस वेगळा असतो क्षण हरेक भवती 'माय' होत वावरतो आनंद, वेदनाशमनि तिचे मुखि नाम स्मरणाने येते फिरुनी लहानपण १०५ कळवळुनि साद घालिता 'आई गं' तिला झणि धावत येइल पुसत हात पदराला कुणि सांगा 'ओ रे' म्हणेल निमिषार्धांत ? केवळ नी केवळ मायचि अथवा संत १०६ कायदे करुन पुस्तकांत दाखल करिती गौरवून वाखाणावी त्यांची महती गांवगुंड काढिंत मोडित ते, हिंडती ना उरलि कुणाला कुणाचींच कशि भीती ? १०७ कशी सांभाळावी त्यानं सांगा बाळं घरभंर झालेली वारं कानांत भरून, शेपटी उभारत खोंडासारखी उधळलेली याला आवरूं की त्याला सावरूं गडबड गोंधळ माजलाय त्यांतंच हलक्या झुळकेनं परिमळ पळवलाय १०८ परतुनि दृश्ये कां तोच खेळ मांडिती भय ! शब्दांचीही होइल पुनरावृत्ती ना ऐल पैल वा ऊर्ध्व अधर बदलेलं अवकाश तरूवर धरा थिजुन जातील १०९ लोपेल कधीं कां उषा निशेच्या रंगी ? टाकील त्यजुन जे स्वत्व बाणलें अंगी ? स्मरणांचि पिशाच्चे पुनश्च जर छळतील असिधार वारण्या सजग होत तळपेल ११० रंगांची स्पर्धा करित राहती मनुष्ये भूतांच्या निर्मितिवरची लटकी भाष्ये संहारक कर्मा करुं जाता ‘उत्क्रांत’ मानिती हार परि ‘तीं’हीं खंतावतं १११ कल्याणहेतुं सठिसामाशि दिसें प्रवृत्तीं राखींत उराशी अतर्क्य फलनिष्पत्ती वेगळा वेगळा करितो न्यायनिवाडा अपराधि मुक्त ! संन्याशा बेडी दंडा ११२ वर्णना पुरेसे गांठिस नाहीतं शब्द घालित रुंजी भवती होते मन लुब्ध रंगांच्या उधळे कोण छटा चहुकडे जन्मजात पडलें, कसे सुटावे कोडे ? ११३ दिठि थकोनि गेली वाट पाहतां ‘त्या’ची अंतरांत स्वागत-कमान उभि केंव्हाची भेटतो पैल स्वप्नांत क्वचित अपवादे व्याधींचे पोकळ फुके सर्व वायदे ११४ शब्दांची बांधत असतां भवती भिंत कवळावे ‘त्या’ने प्राणांना नकळतं राहूंद्यांत मागे अर्धेमुर्धे चरण घ्या ! रचायासि घ्या सुखशैयेचे सरण ११५ बदलाया हवेंत रंग नि अच्छादने गाद्यांवरची ! पडदे अभ्र आसने होईल कालवश शैयेवरचा वृद्ध पालटू रूप, आसमंत करोनि शुद्ध ११६ लावून धूप, भैरवितिलं वाजवु गाणे थांबते कधीं कां कोणावाचुन जगणे तो गेला ! ऐका नव्या जिवाचे रडणे अनिवार्य धरुन पदरांत त्यांस पाजणे ११७ कायेंत आंतल्या इंद्रियांसि रचियले सावळा उजळ वा वर्ण देत सजविले काळजांत भरून धडाडणारा ‘श्वास’ बेगडींच मिळतो अस्तित्वाचा भास ११८ जगण्याची बाजू दुसरी म्हणजे मरणं जाणीव जिणे ! तर मरण पूर्ण विस्मरणं निद्रा ! रोजंचा ‘खेळ’ शून्य प्रहराचा सट्टा असतो चालत अविरत नियतीचा ११९ देहाने जवळी तरी नाहि जवळीक संगे कोणाच्या सांगा वार्तालाप ? भेटीगांठी सामोरे होणे नुरले संगतिस यंत्र ! पण समक्षपण ओसरले १२० थबकली चित्रवत् मार्गी कांही यंत्रे यंत्रेच हलविती क्रमणाऱ्यांची पात्रे ‘मनुष्य’ ? कोडे कुणा म्हणावे आतां मगजाने आहे गमविलि सारी सत्ता १२१ मागणीप्रमाणे मुशिंत धातु पडणारं मागणी नोंदणी कुठे कोण करणार ? यंत्रेचि चहुकडे व्यवहारां असतील छकुली ! सानुली ! साच्यांतचं घडतिल १२२ हसणे, रडणे वा चिडणे आतां विसरा मत्सर, ममता, वा सूड, प्रीत, आवरा बखरींत होवुनी दाखल सारे भाव इतिहासप्रवाही वाहुनि जाइल नावं १२३ मुशि वेगवेगळ्या बहुआयामी सिद्ध परवडले जर तर स्वर्णहि होइल बद्ध संख्येने यंत्रे डोईजड होतील मोडींत काढणे अशक्य मग होईल १२४ मग परतुनि येइल पुनःश्च मानव मर्त्य येतील शोक सुख अंतरि फिरुनी आर्त करतिल स्वागत येणाऱ्याचे भरभरुन प्राक्तना भोगुनी, ठेवतील प्रस्थान १२५ धारुनी शिखेवर सुंदर लोभस तुरा टाळून स्थिरावे पोलादी पिंजरा प्रतीक्षेंत आहे कोणाच्या थबकला ? कीं सोडुनि याला उडुनि सोबती गेला ? १२६ पंखांनि लंघिले अंतर किति योजने ना जाणवले इथवरी कष्ट वा थकणे एकास दुजाचा होता भावाधार राहिलेहि नव्हते इप्सित आतां दूर १२७ परि काळिज त्याचे दगडाचे जाहले ? इतरत्र कसें मन त्याचे वेडावले सावरेन भरुनी पुन:श्च बळ पंखांत जाईन एकली रचिल्या नवविश्वांत १२८ शब्दांनी नकळत कथारूप ल्यायले परकाय-प्रवेशें लेखणींत उतरले विद्रोह-क्रोध विरहोद्भव प्रविष्ट झाली नायिका वेदनादग्ध बोलु लागली १२९ परतेल खचित कारण तो ‘मनुष्य’ नाही सख्यत्व भावना अंतरि तेवतं राही भोगोत्तर त्यजणे जन्मजात अवगुण रस शोषुन चोथा फेकति अवघे ‘जन’ १३० फाटले अभ्र जणु उरल्या केवळ काड्या भवताली बाळे हिरवी करिती खोड्या अंकुरली मखमल मिळेल संधी जिथे छकुल्यांच्या पायी नको रुताया काटे १३१ हरि, हरिण सानुले, वा पाडस गाऊलिचे मुसमुसले वारा भरले उधळायचें टवकारुनि कान अन् दिठीस घेण्या वेध माउलीकंठि घुंगरु करी सावध १३२ सोन्याने मढवूं याची चोंच नि पाऊं चंदेरि मुलामा कृष्णशरीरां देऊं हेटाळणि, निंदा करिंती प्रगत मनुष्ये व्हा नम्र ! फुका ना करित निरर्गल भाष्ये १३३ नको यांसि मान सरोवरि विहराया वा तुरा शिखेवर नको उगां मिरवाया सैनिक हा अनाम निर्मळता-आग्रही चपराक ‘गालि’ हेतूंविण नकळत देई १३४ बदकांची बिंबे साकळल्या जळनिधित स्वल्पाल्पाविराम वा कंस रूप धारित एक मात्र बेटावर तिष्ठत स्थितं की ‘जात’ मनांतुन अजून नाही जातं ? १३५ सत्ता ‘त्यां’ची मज घेइल सामावोनी ? घटकेघटकेला की मनधरणी प्राक्तनी शंका आशंका ! घरांतरी मोहोळ की खणुन काढतिल माझे मूळ नि कुळ १३६ बॅदिवान होवुनी कुपित उभा संसार दिसताहे तवान तरीहि हिरवागार पिवळेपण अंती असे तसे वा येते द्रुम शिखा असो वा शाखा ते अखेर गळून पडते १३७ लक्षिते नेहमी क्षितिजावर असतांत कवळण्या धावता दूर पळूं पाहातांत कोरून जपाव्या उरांत म्हणुनी प्रतिमा स्वप्नांतं भोगण्या किमान येती कामा १३८ एके काळीचा अनभिषिक्त सम्राट परि विसावण्याला नुरले आतां बोट हरि गर्जत असतां मुकाट तारे वारे हरि चाळे करिता दुर्लक्षिति जन सारे १३९ (HARI (2) हरि Sanskrit Sanskrit element meaning "yellow, tawny", and by extension "monkey, horse, lion".) बहु संत आपुले बारा बलुतेदार वाणी, माळी, तेली, धेड, कुंभार कर्मयोगि होती आदर्श सारि मनुष्ये मग अर्पिलि कां जो नाही ‘त्या’सि आयुष्ये ? १४० पर एक सोडुनी द्विज झेपावत गेला घरटे त्याचे रचलेले त्यांच दिशेला ‘उगवेल पीस अंकावर’ दृढविश्वास चिवचिवाट ‘त्यां’चा असेल रोखुनि श्वास १४१ आप्तेष्ट मंडळी करून भवती गोळा मरणाचा करुद्या मला भव्य सोहळा भोगले जिणे सुख-दु:खे झेलित पुरे अंतरी भणाणे निवृत्तीचे वारे १४२ व्याधींनी असाध्य ग्रासेवेरी देह अंधुकल्या दिठींत पुसट होइतो गेह जगतांना मृत्यू नको नको कवळाया विरघळुंदे चढल्या नशेंत श्वास नि काया १४३ चुंबिते झुकोनी मातामहेस खाली पुष्कळा, पर्णभारिता नवोढा बाळी कुजबुजे नातिशी आजी प्रेमभराने अवलोकिति भूतें कौतुकभरल्या दिठिने १४४ (लायी हयात (जन्म) आये, कजा (मृत्यू) ले चली, चले । अपनी खुशी न आये, न अपनी खुशी चले ।।) जन्माने आलो ! शिर खाली वर पाय क्रमप्राप्त जिणे ! ना दुजा कांही उपाय जायाचे आलो तसेंच एके दिवशी अन शुष्क धूळ मिसळेल मूळ मातीशी १४५ मज शिदोरींत द्या साखर घोळुन मद्य मृत्यूशी होइल भेट खरी मग हृद्य पांपण्या जडावुन संवेदन बधिरेल हिम कणाकणाने देहाचा होईल १४६ जर खरेच ‘तो’ जागला लागुनी भूक नैवेद्य लागला सेवूं राहुनि मूक धावतील इकडे तिकडे रांगेमधले तो मागे त्यांच्या पळेल सोडुन सगळे १४७ ‘मज फुले, धूप नि ज्योत काय कामाचे ते पाहुन हुंगुन उदर भरावे कैचे आधी आणा नैवेद्य राधला रुचकर खाऊन जरा मग लवंडेन पळभर’ १४८ कानांत शिशासारखे घुसतिल बोल ‘भक्ती माझी कां ठरते आहे फोल ? आधीच भ्रांत घासाची मम संसारी नव्हते ठावुक अशि लोभी असेल स्वारी’ १४९ कष्टावे आम्ही यास भरविण्या घास ? स्वेदाचे लेवुन बिंदू सर्वांगास ? त्यापरते अस्तुरि, पोरां सुखवित राहूं तात-माय, आप्तां दिठिंत तृप्ततां पांहूं १५० मज चंचुप्रवेशा इवली जागा पुरते दिवली, पुरेशी दीप्ती घरांस देते सानुली सर्व साजिरी जरी बागडती कुळ संस्काराने लोपति वा प्रखरती १५१ मुखवटा विदूषक कधीतरी फाडेल आसवे अनावर दिठींत ओघळतील ओठांना भिडतां खारट ऊष्ण प्रवाह पांपणींस शरणागतिचा मग अवरोह १५२ 'वाहवा' कराया हवें अन्य कुणि नेहमी आंतली अन्यथा घुसमट म्हणते 'मी s मी s' आदळते कांठावरी फिरुन माघारी ठरतो मग पुटपुटणारा 'वेडाचारी' १५३ बुद्धीबळ जोखे पट पसरुनि प्राक्तन रचियल्या चौकटी श्वेत भुऱ्या गुंफुन फुलदाणी कौतुक मिरवित होती काल निर्मीक खेळतो रोज वेगळी चाल १५४ पालटून केली श्वेत-भुरे मांडणी आशा नि निराशा हात हाति गुंफुनी इप्सितांस दिसतां कांठ पूर्तीचा दूर आणते क्षितिज पळणारे भानावर १५५ श्वासांत तवानी भरुन कोण हुंकारे धरतीस समांतर होत कोण थरथरे सोहळा, शोक कोणाचा कोणासाठी हांसू वा आंसूं त्यांच पांपणि कांठी १५६ रेखिल्या चौकटी आंतच नित्य रहावे ? ओलांडित सीमा कां न अनुभवा घ्यावे ? वाईट वा बरे खचित मिळेल शिकाया धरणींत खोल दृढ होतंच जाइल पाया १५७ भूतांची अतर्क्य वदति वृथा भाकिते कुणि वादळ वर्षाराणिस पळवुनि नेते कारणे मिमांसा दमड्यांसाठी करिती विज्ञानासंगे वेसण घालुं पाहाती १५८ वठल्या कळकांनी धरिला भवती फेर धावती मंजिरा-फुले लव्हाळीवर कांकणे लेवुनी पिंजर मिरवें भाळी रसरशित नारिची लोभस नवी नव्हाळी १५९ समगर्भी मुळांतुन विकर्षली चहूंकडे घर टाकुन मागे हुंदडली भावंडे वेगळ्याच रुपें पंचकांत अवतरली बहिणाई हळदी-कुंकुमांत सजलेली १६० पंढरीच्य वाटे हाती घेत टाळ नि चिपळी वारायाला वारीवाटे पापे चालती सगळी भाबड्यांस मोठी बारी, गर्भि वेगळाच दर पडलाहे घोरतची, कुशी बदले ‘ईश्वर’ १६१ भाळी बुक्का गंध नाम, डोईवर नी तुळशी बडव्यांनी वसविलि भीमाथडी प्रती काशी निगुतिच्या संसारांत थोडे जोडीयले धन ‘तीर्थां’ तृप्तीची ढेकर ‘नैवेद्यासी’ वोरपून १६२ शिडकले धरेवर चार थेंब इवलाले स्पर्शाने केवळ चित्त, वृत्ति सजगले द्रुम शाख शिखेसी कांती जणु स्फटिकाची की झाली किमया साकळल्या बिंदूंची ? १६३ गर गर गर वारा चाहुल देउन जातो झर झर झर धारा संतत अभिषेकितो सर सर सर कांटा कायेवर जगताच्या चर चर चर वाटा विरहिणिच्या हुर्दाच्या १६४ (चर चर चर वाटा कांळजांत विरहिणिच्या.. कसं वाटेल ?) घर घर घर ओवी प्रसवे जात्यावर थर थर थर अभंग पंक्ती ओठांवर हर हर हर ओठी भक्तांच्या उच्चार कर कर कर कराल दंतध्वनि भयपर १६५ (थर थर थर अभंग अस्फुटं ओठांवर.. कसं वाटेल ?) ***** हा केवळ अनुप्रासाचा हव्यास... उंचावुनि बाहूं पुष्पांजली कुणास ? कोसळत्या अविरत दुर्लक्षुनी जळास हा युगायुगांतुन उभा प्रतीक्षारत निखारा वारा धारा, कितिहि छळुंद्यांत १६६ जरी दिनक्रमा आड पावसाची आली झड तरी पडाया खंड कर्मांत, नको १६७ कोण दीडक्या देईल ? फुका भीक कां घालील ? घाम कष्टाचा जो गाळील कमावेल तोची घास १६८ खरं तर, ‘धरती भेगाळलि शुष्क उडविते धूळ धरती आर्द्र पदरांत कवळिते मूळ धरती कर्दमी, कमलपुष्प उमलविते धरती, कृषिवला मातेसमान असते’ १६९ असं सुधारित लिहिलं नंतर.. हरि धावत वेगे द्रुमशाखीं अडकला हरि कि वेधत हरि वृक्षारोही झाला ? प्रकटले चित्र मेधेंसि देत प्रेरणा शोधिता अर्थ अवचित स्फुरली कल्पना १७० खरकटे शोधिते ऊकिरड्यावर पोर शेजारी हिंडती श्वान आणि सूकर रिचवीत नशा बेधुंद मनुष्यें सारी धरणीवर रोजंच दृश्ये अशी अघोरी १७१ काळजांस फुटेल पाझर ? सांगा कोणी सत्तेच्या गणिती व्यस्त राजकारणी अंतरी पोर रुजवेल द्वेष नी सूड महालांना त्यांच्या लावित सुटेल चूड १७२ सत्तेवर ज्यांना श्रद्धेने चढविले सरतांचि निशा अर्वाच्य बरळुं लागले अश्लाघ्य मिथुनहेतुने लाविले पाट रयतेची केली दशा करोनी लूट १७३ पाषाण असो वा कर्दम पायाखाली असते बीजांतरि ऊर्मी अंकुरलेली भंगुनी सहज जरि प्रस्तर अभेद्य असला दुर्दम्य जिगीषा सजवि फुलांचा मळा १७४ ही फुलें की जणू बगळे करिती तप एकाक्ष ठेवुनी बंद जोजविति पाप फसवा सारा भवताल जळा कांठीचा पळविण्यास नकळत सज्ज ग्रास ओठीचा १७५ धाराशायी पाडला ऐन तरुणांइत कोण्या दुष्टाने क्षण बेसावध वेधित कल्याणहेतु सांडिले रुधिर लढतांना सत्ताभोगीं पडले परि सोडुनि भाना १७६ किंवा.. शेवटचा चरण.. प्रतिनिधीगृहांतच लटकवुं फासावर तो दिवस आतांशा दूर राहिला नाही उसविते तिडिक येउनी बाहुवर बाही बेमुर्वत नेते नालायक गद्दार मांडती मोडुनी कोट्यवधी संसार १७७ शेजेवर प्रपात नितंबवेरी मुक्त स्नानोत्तर ओला बांधुन न्हाणिघरांत प्रतिनिधी पतित जर आढळला पात्रांत गृहिणीस धनी टीकेची कां करतांत ? १७८ कोण्या दैत्याने चुरगळिली ही ऐशी भोगोत्तरि झाली जवळिक त्यास नकोशी ? रंगावलि भासति सुमने त्यांहि स्थितींत नि:शब्द पहुडली क्लान्त दिठिस सुखवित १७९ वाकले नमन हेतूं की वार्धक्याने जोडणे मोडणे अविरत भवती चाले उमलती तवानी डुलताहे शेजारी भावंडे शाखांवर पीतांबरधारी १८० कमळीणी बाई माझे रंगभेदी वस्त्र तुझे गर्द पिवळा घेरून जिंकू पाही तुझे मन १८१ लालचुटुक उर्ध्वाधर सुमने रविकिरणां स्वागतपर राने हिरवाइ तरारलि पानोपानी रोज आगळी सुफळ कहाणी १८२ उगांचंच.. वस्तीवरचे वास्तव वेदनाकारी विस्तव वेदांतिल वरुणाष्टक व्याधि वारण्या वेधक याला अनुप्रास म्हणावं कां ? १८३ वाराने निर्घृण अवयव गळोनि पडला गाभा अनावृत दिठीस असह्य झाला परि रोपण पुन:श्च कोणि कसे साधिले सुश्रुतास बोलावणे कुणी धाडिले ? १८४ माळिले शिखेंवर शुभ्र पुष्प पंचक निष्पर्ण शाख तरि रौप्यधारि मस्तक अतिवृष्टि कुठे तर कुठे शुष्क भेगाळ साधण्या तोल भूतांचा चाले खेळ १८५ पांकळ्या कि पुष्पपराग ? कांहि कळेना कलिकारूपी जे दडले ते उकलेना दिवसांची दोनच, क्रीडा रानफुलांची थकलेल्या क्लान्त मनांना शांतविण्याची १८६ कोसळला घन परि पानांवर सांकळ थरथरे कोंभ झेलोनी सर अवखळ मेघां वारोनी प्रविष्टेल रविकिरण रेंगाळत बसल्या जळांस देइल भान १८७ थेंबाथेंबांतुन रंगधनू उसळेल आसमंत सारा रंगधून छेडेल गदगदले क्षणकण जपून उरांशी ठेउ भोगण्या जिणे सामोरे पुन:श्च होऊं १८८ अनमानत कां हा पाऊस येतो आहे ? अधिकाचा मान जरा कीं ठेवूं पाहें ? प्रतीक्षा राजा नको कराया लावू ! साहणे आतांशा असह्य लागे होवूं १८९ मुखीचा कवळ अकारण पळविला कोणी ? कवळुनी कशास कळकांस सांगो जाय गाऱ्हाणी ? १९० प्रफुल्लितं, अर्धोन्मलितॅ, पतितं अवस्थात्रय संगतीनं धराशेजेंत पांकळ्या, कळ्या, वा परागतुऱ्यांत चेतना फुंकणे असते दुरापास्त १९१ वेळावुनि इतुकी मान कुणां निरखितो ? हुर्दांत दाटला पीळ दिठिंत साकळतो पुष्पांच्या अभिषेकाने अविरत नटतो दररोज तेच ते पाहुन की हा विटतो ? १९२ कृशकटिवर स्नायू कणखर कमावलेले नाभींत सुमन कुणि प्रीतरंगी ओविले दृश्यमान निश्चय व्यक्त देहबोलींत तापस की व्यतींत अविरत बलपूजेत ? १९३ झुळुकेच्या स्पर्शें केवळ ऊर्ध्वाधरि नाचूं लागे ‘देहांतिल रंगधनूची उधळण मी करेन !’ सांगे १९४ फुलांची ओंजळ आतां वोसंडेल झडीच्या आवेगे निखळून जाईल आवरा आवरा कोणातरी वारा माळला गजरा द्वाड, विस्कटेल १९५ पागोळी भिजवे चिंब नवेला फुटवा खुलुनी वर येताहे तवान हिरवा छकुल्याचे धरोनि बोट माय नी तांत रोवोनि उभे चरणद्वय घट्ट धरेंत १९६ हुडहुडली माऊं विसावली कट्ट्यावर पाहते कुंपणापल्याड संतत धार भिजणाऱ्या हिरवाईचा हेवा वाटे फुलविते झुळुक परि अंकी सरसर कांटे १९७ डोईवर मळभले आकाश अंतरोर्मी उदास उदांस सईंच्या भरती लाटेस पांपणीकाठांत उचंबळ १९८ हे असे आताशा वरचेवर कां होते ? मन सर्वांपासुन दूर जाऊं पाहते सुटका नाही जोवेरि दिसत कान्हाई तोवेरि आळवूं कांळजांत अंगाई १९९ वादळासंगे घोर संगरांत ऐन तारुण्याच्या उमेदीत शाखाधार थकोनि सोडीत जवळ कीं केले धारातीर्थ ? २०० आठवा वायव्य सीमा प्रांत क्रांती रगारगांत मिरवित अनल धगधगता झेलित अगणित झाले मृत्युशरणागत २०१ (शाखा पर्ण विदीर्ण तरुण धाराशायी रचनेंत अधोरेखित कट्यार तरवारीचे पात) आकर्ण अकारण ताणुनि प्रत्यंचेला कर्णां नाकारुन पांडव संगरि फसला रुजला अंकुर तेथेंच ज्ञातिभेदाचा आधारा गेले शरण ‘कृष्ण’भेदाला २०२ हरळीस दिले हत्तीच्या पायी कोणी ? चित्कार आर्त पडतील कुणाच्या कानी ? गतप्राण होवुनी तृण पिवळे होईल अंत:स्थ चेतवुनि सूड रान जाळेल २०३ शोषुनी दिठी मगजा संवेदन देते प्रतिक्षिप्त तरंगा शब्दरूप लाभते म्हणुनी अर्थाअर्थी नाते नसतेचं ना ते दृश्यां परिपोषक सहसा होतं २०४ माणीक तुरा शिरपेचांतुनि सांडले शोणितबिंदूनि धरेस जवळी केले सेनानि अनामिक जखमी परतुनि गेला बांधुनी फळी चढविण्यास गनिमी हल्ला २०५ म्हणुनीच धरुं नका पराभुतांस कुणि गृहित पेटला हुताशन सहजी नाही शमतं खिळखिळी व्यवस्था अविरत वेधित असतो तो बंड पुकारित साम्राज्ये उलथुनि देतो २०६ रात्रींत एकची गळून गेला मोजा कळतां खदखदलो, खूपचि आला मजा पळ कांही ‘नाचिव पाय एक गोविन्दा’ तान्हेपण फिरुनी जागले देतं आनंदा २०७ कोण्या रात्री असेचि गळावे जिणे खदखदण्या नसेल भान स्वाभाविकपणे पांखरूं न कळता गज तोडुनी झेपावे चित्त, भवताल नि वृत्ती नेणीवेंत विरावे २०८ गळक्या आभाळातळी धरत्री न्हाते प्रसवते माय तृणभारित सृष्टी होते जळ साकळते उतु जात वाहते तळे श्रावणा हाळि घालींत रंगती ‘खेळे’ २०९ अस्तित्व संपले तरी जपाव्या सईं श्रधेय भास गाभारी देते समईं.. फडफडे ज्योत सावरते तळवांजुली दिठि दहिवरता कां कंठि ओवि दाटली.. २१० अस्तित्व संपले परि बिंब न सहसा विरते ठेऊन खूण अंतरी जखम ठसठसते चव गोड कडूं रेंगाळे रसनेवर पांपणि मिटतां कां सहजि होइ विस्मर.. २११ भर दुपारि शाखा शिखेवरी निष्पर्ण आभास असे कीं खरेंच आरोहण ? होताहे कशास ? कुणास ? मार्गप्रदीप कंदिल ? की सजला मंदिल शुभ्रस्वरूप ? २१२ वर पसारा शाखांचा तळीं तृणांचा गालीचा दोघां सारखेच नभ पूरवाया साऱ्या वांछा २१३ जुळी मायेच्या गर्भांत एका तेज, दूजे मंद पान्हावते परी ऊर दोघांसाठी, नाही भेद २१४ जळेविणा ? कां अच्छादिला घट ? नंदी ! न रुचे संकोचावस्थ, संपुटं दीपकळ्यांविणा समई कांठ न शोभे ! मयुर जरी वरती स्थितं २१५ प्रतिष्ठापुया फुंकोनि प्राण उजळुया भवताल, पूर्ण सदन जळ नि बळ विधिवत् आमंत्रुनं चित्र-चौकटीला देउंया भान २१६ पायऱी ! लंघुनि गेले थोर । पायऱी ! सोडून वागले चार । निद्रिस्त कांही बिनघोर । धरून पायरी ॥ २१७ श्वापदांत शिरतो कधीतरी माणूस दावीतं आगळां ‘परकायेंत प्रवेश’ देउनी झुगारित मगजाला उत्क्रांत(?) विस्मरतो सहजी आप्तस्वकिय गणगोतं २१८ गोलार्धांत अर्धोन्मिलिंत पांपण्यांची पाती हळूहळू त्यांतून तेवतील लक्षलक्ष ज्योती ऊर्वरित विश्व निवांत होईल निशेला शरण जांत स्वप्नांची भातुकली मांडुन वाट पहाटेची पहांत २१९ ‘त्यांना’ कसं ‘दिसंत असेल उघडलेलं नवं पान वेध घेत नाद, साद ‘जाग्रतं’ म्हणंत असतील कान संधिकालचा ताजा गंध नव्यानं भरून घेत उरांत दाखल सर्वांसवे ‘ते’होतील कर्मयोगाच्या प्रवाहांत २२0 परिचितांस कळवू नका माझि निवृत्ती आप्तासि नका सांगू माझी स्वीकृती उडतील पांखरे उर्ध्वगामि श्वासाची नीरव व्हा माती होतांना देहाची २२१ शब्दांचे मोती स्वराचरणि अर्पिणे हेतूंने, 'होइल सुंदर त्यांचे गाणे !' योग्य ! परि उद्भवतां गोंगाट बुडबुडत जाय भावोत्कट आशय घट २२२ जनमानस होते स्वरांकडे आकृष्ट भावार्थ प्रतीक्षित असतो पाहांत वाट गुणगुणण्याला कां लागतांत अक्षरें ? 'शब्दांसि क्लिष्ट टाळणेचि' म्हणती, 'बरें !' २२३ कवितेचे होणे गाणे, म्हणती, इष्ट शब्दां करण्यां भाबड्या मनांत प्रविष्ट वाचावी कविता स्वयेंचि किंवा गावी धडपडणाऱ्या सुरांत तशीच अळवित जावी २२४ वेगांत आपुल्या मस्तिंत धावत आहे मागे वळुनी ना कधींच पार्श्वा पाहे अविरत क्रमणा शक्ती वा पंख न घेत थकतील मर्त्य ! माहींत त्यांसि आहेंत २२४ वारा, पाऊस, झडी, सरी यंत्राचा हात. वारी भाबडा, भोळा वारकरी चिंब इटूच्या द्वारी २२५ ओठी नाम हरी हरी भाळावर ‘नाम’ धारी टाळ चिपळ्यांच्या गजरी पंढरीची स्वप्ने उरी २२६ मगजांत वैभवोद्भव सत्ता बेभान, बेबंद, देहांत उतरता ‘सावध’ करण्या चित्ता लक्षवेध निष्फळ.. २२७ परिणामी दुर्घटना रक्तपात, यमयातना अकारण करदात्यांना मुद्रादंडयोग २२८ निद्रेंतुन जागी होते आहे धरा भवताल निरव अन् मुकाटलाहे वारा भानू भानावर जागल्यांसि आणेल रंगांची किमया मोकाटुनि उधळेल २२९ खांब खांब खांबोळितला एक खांब रुसला तिररसटराव वाकडा होत फारकत घेत बसला२३० निळ्या पिवळ्या हिरव्यालाही जुमानत नाही लाल सरळसोटाला तर तो पाण्यांतंच पाही२३१ चारचौघे येतील नी काढतील बसून समजूंत ‘बाबा असं करूं नये’ म्हणंत बघतील ठेऊं काबूंत. २३२ असला तर येईल समोर सुतासारखा सरळ नाइतर भांडत ओकत राहिल भुतासारखं गरळ..२३३ कांहीच सुचलं नाही म्हणून अशी हबेल हंडी कधीतरी गर्वहरण आणि शब्दांची कोंडी..२३४ पतंगाच्या कण्यावर रंगांत आलाय प्रणय मागं अनंत निळं अवकाश मग उगा कशाला कुणाचं भय ? २३५ बेगडी पदपथ सजविण्या नक्षी मातीमाये कां अकारण भक्षी तवान पर्णांची फौज सीमेशी परतविण्या आक्रमण २३६ सैन्यांत वर्णभेद वा जात ना धनवान, हीन, जमात जैसा तरवारीचा पोत धारदार, निधर्मी २३७ मूळां गर्भस्थ धरून धरा सावरूं पाहाते रूजवील्या मनुष्यांची ‘ऊतरा’ई आज होते २३८ सैलावल्या दरडींची थांबवीण्या घरंगळ वनराई येते कामा धरित्रीले देते बळ २३९ बहीणाईने घातले धरित्रीले दंडवतं लेकरें तीचींच काहूनं गैर आज वागतांत ? २४० पाउले दोन शोभिवंत ऊर्ध्वगामी, कोनाड्यांत थबकलेली प्रतीक्षेंत कोणाच्या ? २४१ क्षेमांगी, पुढे झेपावे वामांगी , स्थिर असावे दृढपणे धरोनि राहावे धरेस सदा २४२ पार्श्वी पसरली आभा कोण्या चैतन्याचा गाभा कवळण्या निळ्या नभा संगमोत्सुक ? २४३ (क्षेमांगी हा शब्द उजवा या अर्थी वापरला ! कां ? माहीत नाही..) हिरवा भडक, लाल शार, निळा गर्द, पिवळा गार पाढरा कुट्ट, काळा शुभ्र कां नये म्हणू ? २४४ संकेतांचे लोढणे चाळांसारखे बांधणे अडखळून भेलकांडणे कुठवर मी साहूं ? २४५ भडकला कां वणवा ज्वाळा उंच शुष्क रानी शमवाया आतां याला कोठे, कसे शोधू पाणी २४६ काष्ठांऊरी खोलवर निद्रा घेईल निखारा राख वरची फुंकोनी चेतवील द्वाड वारा २४७ जोजवींत ऊरीं आग बेवारस वाढतील ऊब मायेची मीळतां कढं गीळूं पाहातील २४८ पौर्णिमेचे चांदिणे क्षीणावत जाय अवसेचे, परि वर्धमान होय छकुल्यासि पाहतां माय पान्हावते जैसी २५० मंच झीजवोनी गेले प्रथीतयश झाले आकाशांत झेपावींतं धरित्रीला विसरले २५१ सान-थोरांचे उन्मळले वालभ सारखेंची नभ एकरूपासाठी २५२ उबेच्या ओढीने बिलगतां छकुले वात्सल्य झरले शिरांतून २५३ आकाश निळाई ल्याले, वाटे फिरुनी तेजोनिधि तळपे मळभ दूर सारोनी निथळोनि आर्द्रतां ऊब शोधते मन आंखडल्या गात्री फुंकु पाहंते भान २५४ सरि सरल्या कां ? परतुनि येण्या पुन्हा भेगाळा पाजित नवचैतन्याचा पान्हा चक्रनेमिक्रम हा कालांतित भोगणेणे भूतांचे जगण्यामधलें अपूर्व लेणे २५५ फोडुनि नरडे शोणितोष्ण पशु प्राशिती आरण्यामध्ये तेचि विजेते ठरती पांघरती विकृति ‘उत्क्रांत’ कांही मनुष्ये हांसत विकट, उधळती सहज आयुष्ये २५६ काळजांत अजुनी वन्ही जागृत आहे ठसठसत्यां नसांत सुप्त वेदना वाहे जो तो जगतो घेऊन आपुले नशिब वंचितां अंतरी तरि सूडाचा कोंभ २५७ कोण्या दिशि एका राख उडुन जाईल धगधगतं निखारा जाळ रूपें फुलेल भेदरली पापे धरणींत शोधित ठाय आक्रंदत म्हणतिल ‘घे गे पोटी माय !’ २५८ लपलिये पानांच्या गर्दित कोण्या प्राण्याची मुद्रा उधळेल चौखूर वारू कानांत भरून वारा ? २५९ शोधक दिठी झाली चाप नि शब्द लक्षवेधी शर अमूर्ताला आकार देत टपटपला अर्थ घरभर २६० किती किती वळेसर जाळीदार सज्जावर दिठी पडतां त्यांवर घर आनंदविभोर... २६१ ***** (काय सूचना झालं.. मग म्हनलं.. हान तुक्या न् काय ?) विजनवासी शुष्क शाखेवर चित्रवत् स्तब्ध निश्चल स्थिर ? अवकाश अनंत असीम अपार लंघेल सहज पसरोनि उभय पर २६२ उंबऱ्यांत कां हे ऐसे खिन्न नि खट्टू बसले कोणाच्या हौसेपोटी मायेंतुन ओढुन आणिले २६३ साकळे दिठिंत प्रतीक्षा पाहून कळवळे मन त्याने गिळली आंसवे पांपणि जाति भिजवोन २६४ रुळले !... रुळतांतंच सगळे पांघरोनि तरतरि बळे परतवींत बहुकष्टाने अंतरिचे ऊष्ण उमाळे २६५ आयुष्य.. ‘खेळणे’ झाले इतरां हसवींत पळावे आयुष्य.. अपेक्षा सांधित बंदिवान होत जगावे २६६ जन्मतांत जगि जुलुमाने जगण्यांत जागतो जाळ भूतांचा भीषण चाळा हा डोंबाऱ्याचा खेळ २६७ ही तारेवरची कसरत अनिवार्य रोज जगण्यांत दु:खाचे, क्षणिक सुखाचे मुखवटे हरघडी बदलंत २६८ ढांसळे चुना, दृग्गोचर होती विटा कांचनसांजेच्या स्वप्नी पहांटवाटा तान्हें लुचला पान्हा परत पाझरतो पिचला मृद्घट परि पुन्हा सांधता येतो ? २६९ उंचावोनी पाय, दोन वल्लरी पाहांती भिंती अल्याड-पल्याड तरूं मोठाले डोलती ‘सरोनि बाल्य साऱ्या कधी वोलांडेन सीमा ? माथ्यावरी धरेन कां कधी सांवली विश्रामा ?’ २७० सरोनि बाल्य साऱ्या कधी वोलांडेन सीमा ? माथ्यावरी धरेन कां कधी सांवली विश्रामा ?’ २७१ इथं काय करताय रे कामाला लागा आकारानं ठरवलंय तसेच तुम्ही वागा २७२ लिहितांना आपोआप येत होतं हसू चित्र पाहून म्हटलं ‘तसांच कसा बसूं ?’ २७२ असे उलटे लटकून जर भिंत तुम्ही सजवाल थाळी समोर बसलेल्याची भूक कशी मग भागवाल ? २७३ ज्यांनी दिला आकार तुम्हाला नी जिण्याला अर्थ भाकरतुकडा मोडींत आला दिवस करतील सार्थ नुसत्या लाकुडतुकड्याला जाळ करतो भक्ष नशीब ‘त्या’च्या कसबानं तुम्हाला केलं लक्ष २७४ काय बाय सुचंल तसं लिहा की मग लेको मनांत उमटल्या अक्षराला म्हणूं नका ‘नुक्को’ ! २७६ अशा सुंदर क्षणी शेवटावा श्वास हीचं केवळ इच्छा पण दैव दोऱ्या हलवतां असतो आपण फक्त 'नाच्या' २७७ आहे टाकून नांगर खोल सागरांत होडी कां थकून भागून आज नीजला नावाडी ? ना सुकाणू ना शीड, वल्ही गेली दूरवेरी माय तातं चिंतेंत उभी अस्तूरी किनारी २७८ ऊमटते मुद्रेवरी हसूं कांही होता अती राहावे तसेचं तेथे मीळतांना मूठमाती २७९ स्वकीयांत की रानांत कोण जाणते कां अंत राहावे नित्य बरी स्वप्ने सुखाची पाहांत २८० निर्वालन करण्या सदैव तत्पर स्नायू वारण्या संकटे उठती सहस्र बाहू ना जात पात वा धर्म अडथळा ठरतो अंतरिचा माणुस केवळ जागा होतों २८१ रुजल्या बीजाने वाढायचे जग कुंपणा आंतून बघायचे उंचावेरी पोहोचतील शाखा हसतील भेटून एकामेका आभाळ मोकळे हुंगायचे उरांत चैतन्य भरायचे २८२ लेकाची काळजी मायेला माघारी काळजांत सईं जडावती भारी मागे न वळून पाहायचे पाऊल पुढचे टाकायाचे २८३ जगाची सहसा हीच रीत थांबती कांही पदरांत वारं ना भरतां छातींत, पंखांत बसती दैवाला दोष देतं २८४ भक्कम असली मुळं तर क्षुल्लक ठरतांत वादळं रखरखता दाह ग्रीष्माचा किंवा मारा वर्षेच्या झडींचा नवोन्मेषाची चाहूल देते शिशिरांतली पानगळ ऋतूं येतांत, थबकून परततांत तो उभा असतो ठाम कुणा अमानुषाची कुऱ्हाड लावते अखेरचे म्हणायला ‘राम’ दांडे सगळेंच कां होतांत गोतांस काळ ? कृतघ्नांच्या काळजांत कां असतो अखंड धगधगतां जाळ ? २८५ झाकूं पाहाता झाकेना पुंजाळले तेज वाटते, निशेची कां पूरी झाली नीज ? २८६ नागमोडीसे पोपटी लोंबतांती फूटवे जळ, ओज कां करीती प्रेमे चुंबायाचे दावे ? २८७ चिंब चिंब भवताल थेंब दीठीस ना दीसे भारावल्या मनां परी भावार्द्रता खोल भासे २८८ वाटे सूटावे पळत क्षण क्षण वेचावया कण कण आनंदाचा ऊरी भरून घ्यावया २८९ प्रमादासी प्रमोद आज दयार्णव व्हावा कळकाच्या वनातून आज घूमताहे पावा २९० कधीतरी पांदीमधे घेतो येऊन विसावा पंख मिटून थकले वळचणींत पारवा २९१ ‘बरोबर’ च्या खुणांचे चित्रांतले पक्षी ‘चित्रकला येतेय’ याचे असंत साक्षी मज्जा मज्जा करींत सरलं बालपण कंठांत कढ आणत काढायची आठवण २९२ वर्णव्यवस्थेची ऐसी की तैसी साऱ्यांनाच तरार तवान मातीमायचे फेडायचेंत पांग एवढंच अंतरी भान.. २९३ कुणी काळपट हिरवा तर कुणी हिरवट काळा उर्ध्वगामी वेधवेणांच्या सगळ्यांनाच कळा हात गुंफून हातांत आनंदांत चूर हसतां हसतां दिठींत आसवांचा पूर २९४ धरित्रिले चुंबूं पाहतं झेप वल्लरी घेई सीमा लंघण्या साऱ्या झाली अनावर राई २९५ धरूं पाहतां ईवली सारे आभाळ अंजूलीं मनुष्यांच्या जीगीषेला भूते हसांया लागली २९६ किती रोधाया पाहाल किती घालाल आवर भूतांच्या संसारांत त्यांची केवळ लहर २९७ झंजावात, जळ, जाळ, डोईवरले आभाळ ऊतूं सहज जातील जर वारायला जाल २९८ जगूनघ्या जीणें रोज श्वास कूडींत जोवर मुक्त झालेल्या आत्म्याला मग असीम वावर २९९ माड मान उंचावून, करिताहे आवाहन जलदाचे सांकळण, कीं मागताहे ? ३०० मातीमाय नांगरून, बीजे गर्भी रूजवून फुंकाया त्यांत प्राण, ‘येई राजा !’म्हणताहे ? ३०१ चक्र शीखेचे करून, बाहे चला मेघावळं गर्भी डुचमळे जळं, ‘सांड’ म्हणताहे ? ३०२ शतधारांनी झडले, भूईभर वोसंडले धावूं लगेचं लागले, इतस्तत: ३०३ भाळी पिंजर लेवून, हिरवी पैठणी नेसून, संधी श्रावणी साधून, प्रतीक्षित प्रोषितभर्तृका ३०४ मावळतीच्या नभा हळदीवी प्रभा सुवर्णाची आभा भवताला.. ३०५ प्रेमे कवळायासं आप्तस्वकीयांसं उभय बाहूंस पसरोनि ठेला.. ३०६ भवताल भारलेला हिरवा केंद्री लक्षवेधी भगवा भूतांच्या सर्वसमावेशक गावां मनुष्यांना चाप बरवा ३०७ उललेल्या फुललेल्या ओल्या जखमा निखाऱ्यासारख्या वाहणाऱ्या झोंबणाऱ्या जीवघेण्या जखमा विखारासारख्या घालमेली द्वारी कसनुश्या प्रहरी कातर किनारी शिकारा स्वेदचिंब भाळी शहारल्या त्वचेंमुळी काळजांत खोल चरा ३०८ चोंच, डोळे मिटुनी द्विज बसलासे मोरपंखाच्या शिखेंत, दृश्य असे भासे दिठी उघडतां जडेल त्यांसि सहज पिसे लावण्य-रूप शेजारी सवंगडी मिरवितसे ३०९ हर्षोद्भव पिसे । लागलेसे वाटे । जिथे मज भेटे । मनुष्यत्व ॥ वेदनांची आंचं । तीवर फुंकर । त्यजून विकार । मनुष्यत्व ॥ धर्म-कर्मकांड । तोडून शृंखला । मर्दणे खला । मनुष्यत्व ३१० घट तुटती फुटती रिते, कधी भरलेले ज्यां त्यां नशिबी पण 'घट कुठला ?' ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे ३११ अक्षरे चार जुळवीन द्यावया धीर छातीवर अरिच्या वार करिति जे वीर करिग्रहण करून कीं कृपाण कराल क्रूर कृपणासि धाडण्या इहलोकाच्या पार ? ३१२ रक्तिमा उतरला कपोलि कल्लोळाच्या संधीवेळा या असति असिम विरहाच्या सोडून प्रीत लागते जावया दूर कर्तव्य टाकते भारून जेंव्हा ऊर लोळे जळ, जळ अंकी, करित कल्लोळ निरखे होत स्तिमित, जळे आभाळ अवकाश लागले जर ऐसे उलथाया प्रणयाच्या क्षणि प्रलयोद्भवि होइल माया ३१३ सत्याशी चुंबू पाहे बिंब अंजुली अर्धी जळांत चिंब सरोवर सामावूं पाहे नभ माथ्यावरले ३१४ स्तब्धता निरवांत गुंफलेली दूर वस्ती अजून निजलेली टेकडी हिरवाई ल्यालेली पाठीशी निश्चल ३१५ निवावे ऐशा घटिकेला वाटे ! हपाप खूप भोगला कटु-मिष्ट भिडणे रसनेला सरावे आतां ३१६ काळ परतुनि आलेला सांगा ! कोणे कां पाहिला उसंत वळून पहाया त्याला नाही युगायुगांतुनी ३१७ जरा, वेदना, मरण परतविण्या आहे अपूर्ण कोतेपण मनुष्यांचे जाणून फिरविली कां पाठ ? ३१८ दावूं समोर उभे राहून भूतांचे दयार्णव भान देऊं संघर्षाचे वाण समजावून जिण्यांतल्या ३१९ संगरांत रोज आम्ही भोगतो कराल वन्ही पोळतो जरि चहूं बाजूंनी बाहूंनी वारतो धीराने ३२० देहाची पुरल्यावर हौस अस्तुरि पोरे माय-तातांस त्यजणाऱ्या पळपुट्यांचा आदर्श दुर्लक्षिणेचि बरें ३२१ ‘दास बरें !’ वाखाणा म्हणोनी पाठ अंतरपाटासि दावोनी परतले मागल्या पावलांनी रानोमाळी धुंडण्या ‘मन’ ३२२ बारा बलुतेदार संत अखंड संसारी कार्यरत फावला वेळ भक्तींत व्यतींत केला ३२३ तेली, महार, माळी, साळी, वाणी कुंभारादि मांदियाळी खेळत संसाराच्या खेळी प्राप्य केले संतत्व ३२४ स्व’धर्मां’(?)सि गोंजारणे अन्य शैलींसि हेटाळणे कोठल्या कोठींतल्या शिक्षणे साधतें बा ?३२५ सर्जकाने साकारले सुंदरसे चित्र प्राणं त्यांत मात्र नाही भरूं पावला.. ३२६ लांबी, रुंदी, खोली तिन्ही अप्रतीम साकारल्या मिती परि चेतनेची चला संगती नाही देउं पावला.. ३२७ ‘तो’ नसला दिसत जरी शब्दांची जडवोनि जरी वस्त्रालंकारांना अंगभरी गिर्वाणवाणीने गौरविले.. ३२८ असेल दावायचे जर अस्तित्व त्यजुनी मृत्तिकेचे ममत्व धारोनि अरिवारक मनुष्यत्व संहाराव्या विकृती.. ३२९ परंतु हे कदापि होणे नाही भाबडा समोर बसोनि राही ‘वरद’हस्ताची वाट पाही युगायुगांतुनी जरी.. ३३० मोदभरे विभोर आप्तेष्ट मात्र घरभर आनंदासि पारावार त्यांच्या नाही.. ३३१ फलित हेचि जाणावे सण म्हणोनि साजरे करावे तद्नंतर कर्तव्यमग्न व्हावे जिणे रेटण्यां सामान्य.. ३३२ ‘ईद’काली पशुयुक्त सामिष ख्रिस्तमासी उंचावती चषकांसं पुरणाविणा कैसा श्रावणमास ? तंडती तरी ‘धर्म’कारणे.. ३३३ पांघरुनी धरतीवर हिरवि गर्द शाल अलिकडेच वाटले कि, मेघवळि परतेल परि विरहोद्भव वाटेवर गाठं दुराव्याशी वळूवळून पाहतसे अंतरिचि कसनुशी ३३४ शांता, दुर्गा, सरोजींदिरा, शब्द समृध्दीचा देखणा पिसारा कल्पनाविश्वासि आधारा पाहे होऊं ३३५ भक्ती गौरी, स्मिता गौरी सुहासिनी, चारूहि गौरी नक्षत्रसरितेच्या किनारी स्वागतसज्ज तत्काली ३३६ प्रकटली हिरकणी निवासा प्रांगणी अस्तित्वांची लेणी उजळींत साऱ्या.. ३३७ उदयास्ती वा माध्यांनी चेतनोत्सर्जी अंगारला वन्ही चलाचल जीवजंतूं, प्राणी आश्वासक जगविण्या.. ३३८ उंचावोनि शिखा, बाहूं पळणाऱ्या पाहें धरूं उजळले नभ निळे आनंदे भारलें तरुं ३३९ उंच उंच आभाळांत छटा गडद गडद चराचरांत घूमती नवी सूक्ते नवे वेद ३४० सोडतां निजवास गळले जरि पीस दूरवेरी अवकाश लंघेल सहजी ३४१ ल्याले पाहा धरेने आभाळाचे लेणे मोठ्या दिमाखाने मिरविताहे ३४२ कां बरें धरेवरि कांक साधोनि मैत्री-पंचक उतरले होवोनि भक्षक आज, कुणाचे ? ३४३ हे कसले अवलक्षण सोडोनि विस्तीर्ण नभांगण अवनीवरी बैठक अकारण आज काहून ? ३४४ पिंडासि टोचं मारोनी आत्म्यासि पूर्ण मोकळोनी कर्तव्य बजावयाचे सोडोनी इकडे कां बां मोहोरा ? ३४५ हा हा:कार तिथे माजेल वारस कासावीस होतील आणावयांसि धडपडतील दर्भाचा लावाण्या.. ३४६ पांच दिवस आहेत अजून येण्या दाहीं दिशांतून पितर, खिरी-वडे ओरपोन व्हावया तुष्ट ३४७ आसक्त मन.. आणते खुडोनं.. पात्रांत ठेऊनं.. म्हणे ‘माझे माझे’.. ३४८ नक्षीदार जरी.. सर्वांगभरी.. पोरक्यांसि कांटेरी.. तरी भासे.. ३४९ उमलेल्या कळींस.. करींत प्रयास.. कोठे शोधायास.. वल्लरिने जावे.. ? ३५० मातीच्या बंधासी.. मुळांच्या गुंत्यासी.. तरुपरिवारांसी.. कैसे त्यजावे ३५१ सारेंचं नश्वर.. धुळींसं मिळणारं.. नियमानुसार.. अनिवार्य.. ३५२ म्हणोनी स्वगृही.. सुखाच्या प्रवाही.. आप्तांचींची बाही.. आधारार्ह ३५३ हा वैनतेय ! रक्षेतुन पुन्हा उठेल हा वैनतेय ! पर पसरुन झेपावेल हा वैनतेय ! तरुवरांत अशोक उंच हा वैनतेय ! अरि नमविल परी पुन:श्च ३५४ तिमिरांतुनि तेजांत प्रकटल्या फुलल्या लाख कळ्या शुभ्र-हरित संमिलित मधोमध रक्तवर्णि पेरल्या ३५५ पाहुनि बहर भादव्यांत सरत्या सुखावले जन सारे पितरांना पिंड आणि नंतर नवरात्रींचे वारे ३५६ गुंफोनि पांचपेडि शाखांची वेणी परतल्या जित्रापा छाया दे वनराणी दूरवरी दिसतांती मनुष्ये उत्क्रांत असतील शांत मने तिथें बेगडी सुखांत ? ३५७ अंतरी अविरत जळते प्रज्ञेची ज्योतं सहस्रकरे घडते जे पाहिले स्वप्नांत मांडले ते सांडणे नित खेळी भूतांची जपण्यांतच उभा जन्म, बुद्धी पडती खर्ची ३५८ मातिमाय प्रस्तर अन् तरुवर भंगोनि जिणे विलासी भोगत जातीं रंगोनी कधिकाळी मूलतत्व आक्रमेल ‘जेते’ फाडुनि जे जगतांहे, प्रलयवेळ नेते ३५९ प्रलयंकारी.. आळा तुटला सुटला, सैरभैर नक्षत्रे डगमगत्या मंचावर थरथरणारी पात्रे तांडवांत तडकतील तम तेजांकित तथ्ये मिटतिल मृतवत् ‘मनु’ज मगजांतिल मिथ्ये ३६० कृष्ण-भुरे सैरावैरा अजून इतस्तत: ‘नाही झरणार सर’ कुणी भरवसां देता ? ३६१ सुबक वास्तू काटकोनी उभी दिमाखांत चिमुकल्याची दुचाकीही सज्ज अंगणांत ३६२ माडांची चक्रे अधुरी पसरून पंख उभी आभाळमायेंत सुप्त कुठली लपलिये आंस गर्भी ? ३६३ श्रावण सरला ! भादव्यांतही लहरीपणाचा कहर उसंत घे बाबा आतां उद्या उजवायचेंत पितर ३६४ कलिका तशांच ओल्या, अजुनि न उलेल्या ठाकोनि शिखेवरि तिथेंच स्थिरावलेल्या स्थानावर बसुनी उंच, विश्व निरखणे स्वाभाविक असते बालपणीचे लेणे ३६५ होतांच पूर्ण विकसित खुडुनि वाहातांत प्रेतासी वा पार्थिवास सजवु जातांत निर्माल्य होंत खुडणाऱ्याने तुडविणे नशिबांतचि असते जगण्यापूर्विच मरणे ३६६ वालभ ! पक्ष्यांचे, मुक्त मोकळे नभ वालभ ! वृक्षांचे, पांथस्थांचा लोभ वालभ ! गाउलिचे वत्साकरिता पान्हा वालभ ! माउलिचे गोंडस अवखळ तान्हा ३६७ कनककांतिचा तेजोनिधिरथ उगवतीस, आश्वासक विहरत तमारि, सकलां ऊर्जा वितरित क्रमताहे वेगाने नभांत ३६८ काळोखांतुन स्पष्टवणारे तरुवर, हिरवाई, नि गोपुरे प्रतिबिंबित जळपृष्ठि साजिरे स्वर्णमयी जग, घरे, मंदिरे ३६९ दीपदमन करण्याचा प्रहरी देहावर शिरशिरी बोचरी स्वप्नांचे गारुड जरतारी त्यजुनि, अंतरा द्यावि उभारी ३७० क्लान्त वृद्ध, युवा वा पोक्त स्वकर्मांतूनि जरांसे मुक्त विरंगुळाहेतु, स्थिरांवतांत सहनिवासतळांत, आसनांवरी... ३७१ आच्छांदित तरी खेळते हवां तनां-मनांसि हवा हवा वाटतसे, जो गारवा मिळत असावा, खचित इथें ३७२ सज्जा जरि, भासतसे कारा अभावेंचि फिरे स्वातंत्र्याचा वारा म्हणोनि एकमेव आधारा सवे शेजारा, अबोल तरी ३७३ उगवतीस तेजोनिधि मावळतिस क्लान्त दिनकर कर दिनभरांत कर्मोर्जा स्रोत ३७४ उषा निशा भगिनीद्वय भारतांत भवताला संधिकाल गूढरम्य हुरहुरभरली वेळा ३७५ डोईवर तेच आभाळ रंग बदलतांत वेळा नि ऋतू भूरा कबरा कधी लाल निळा तर रोजंच जातो उतूं ३७६ एकांच देहांत मनाच्या छटा सुख-दु:खाची भरती नी परती प्रीती, द्वेष, विरह, ममता साऱ्यांसह टिकतांत नाती ३७७ पोपटी हिरवाईला शुभ्राचे कांठ समृद्धीची बांधलिये शांतीशी गांठ धवलांकित असतं सारं रंगधनू प्रकटतं, जळधारेला कवळतांच भानू ३७८ जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुप्त अंतरंगी लक्ष छटांची लेणी काळजाचा खोलवर घेत त्यांच्या ठाव शोधक दिठी, वसवते सुंदरसं गांव ३७९ कंच गालिच्या खाली वर नाजुकसं झुंबर फटफटलेलं गुलाबी निळं शांत निवांत अंबर ३८० जिण्याचे चक्र मात्र नेमिक्रमाने विनाउसंत चार घास क्षुधेसाठी कर्मयोग अविरत ३८१ घन रिते होत फिरतील पाने शाखेवरून गळतील प्रतीक्षेंत चांदणरातींच्या हांत हातांत गुंफतील ३८२ भरतील दुधाने दाणे पाखरांची होतील आक्रमणे वारण्यासि मचाणावरुनी गोफणी फिरतील वेगाने ३८३ शिशिराची हुडहुडी भरेल युगुले घोंगडींत शिरतील वास्तव दाहक भोगतांना जीव, भाव झगडतील ३८४ ओसरतां ओढ धरेची जळ आभाळा चुंबेल वन्ही उसळुनी वरचे पार्थीव कवच भंगेल ३८५ धमन्यांत जीवजंतूंच्या रक्तचाप होत अनावर होत्याचे करुनी नव्हते मृत्यूचे होइल वावर ३८६ शेलाट्या ललनांमध्ये कां मुरडंत आहे प्रौढा भवताली धरुनी फेर नाचति बेभान नवोढा ३८७ ओसरतां ओढ धरेची जळ आभाळा चुंबेल वन्ही उसळुनी वरचे पार्थीव कवच भंगेल ३८८ तमारि होउन उभे दूरवर मार्गस्था दावींत दिवा रिचवुनी देहामधे दूषिते तरुवर करिती शुद्ध हवा ३८९ ओठ शिवोनी असति कार्यरत कर्मव्यग्र सारे जगती रित्या मनांतिल सैतानांची जित्या जिवां असते भीती ३९० मेघाभ्र पांघरून पहुंडते निशा तांबडं फुटता दूर सारूं पाहते उषा संधिकाली ऋतूं, वेळा मांडतांत खेळी क्षणोक्षणी चराचराची भूषा आगळी ३९१ स्नुषा, पुत्र पौत्रांच्या विळख्यांत बद्ध आहे वृद्ध कोण्या कराल करांनी याला केले वीद्ध ३९२ संसारांतून ओढून याचे शिरकाण कोणी केले त्या क्षणी आप्त गणगोत सोडून कसें गेले ३९३ किंवा वल्लरि पर्ण सुमनांत जखडला तरु वृद्ध कोण्या कराल करांनी याला केले वीद्ध संसारांतून ओढून याचे शिरकाण कोणी केले त्या क्षणी आप्त गणगोत सोडून कसें गेले पर्णावळींस सारून अवतरे सूर्यप्रभा ओल्या धरें बीलगून सावल्यांसी म्हणे ‘थांबा !’ ३९४ पळापळांत वेगळा भादव्यांत आसमंत दवं भारली पहाट स्वेद भाळी माध्यान्हींत ३९५ चंचूप्रवेश करून व्योम टाकेल व्यापून क्लान्त थकून निमेल कर्मोत्तरी ऊर्जाधून ३९६ कवळाई जन्मतांच होते असह्य माध्यान्ही चराचरा जाळणारा प्रकटतो जेंव्हा वन्ही ३९७ येते झुळूक घेवोन मग मंदावली ज्योत जाते करोनी आश्वस्त वेगवेगळ्या रूपांत ३९८ लेउन अंकी एक कवडसा माड स्तब्ध कां असे ऊभा ? निरखतसे हा कीं उंचावुनि निरभ्र निखळ नि निळ्या नभा ? ३९९ किंवा.. लेउन अंकी एक कवडसा माड स्तब्ध कां असे ऊभा ? पर्णपसा पसरुनी प्रार्थितो निरभ्र निखळ निधि निळ्या नभा ? (निधी=संचय) शिवाय अनुप्रासाचा लाभ वेगळांच.. साठीशांत की अशीतक गोतावळा जमलाय सारा सुखावलेंत आज पितामह विस्मरून व्याधी,वेदना,जरा ४०० कुणी नातवंडं अति अंगलटीस कुणी कानाशी क्षेम खुशालीस कुणाच्या स्वप्नांत वारशाचे इमले कुणी बेगडी हसत, शब्द सारे झेले ४०१ कांहीं का असेना ! थोडा विरंगुळ्याशी मेळ एकांड्या जिण्यातला पळभराचा खेळ पांगतील सारे दहा दिशांना सरतांच ‘सण’ उरल्या क्षणी घोकायचं ‘कधी येईल मरण ?’ ४०२ दोन भानू दोन माड दुणावली धरा प्रतिबिंबी गडद परी रंगछटा जरा ४०३ मुकाटला वारा, पृष्ठी संथावले जळ दूरावले मेघ, मागे ठेऊन साकळ ४०४ एक भान दुजे स्वप्न सारे तंतोतंत नीजेंतल्या जागेपणी धूसर सीमांत ४०५ धरतीने धारीली विस्तीर्ण भाळी पिंजर बिंबाची रेखिव आभाळी ४०५ सौम्य गुलाबी फाकली प्रभा उजळित जाताहे कृष्णभुऱ्या नभा ४०६ येऊन सामोरे, विक्राळ रूपें भासें जणु सर्वांगे भवताल व्यापे ४०७ ऐसे अतर्क्य त्रिमितीने साधले त्रिपर्णिने पार्श्वपटल अर्धे झाकले ४०८ हिरव्या पैठणि पदराखाली कुंकू लाल चुटुक कपाळी ४०९ कुठे निघाली असेल प्रौढा भल्या सकाळी, निवांतवेळी ? ४१० जगणे त्यां, ना कळले हो.. ४११ दिल्या मना देहा ठेवोनी वंचीतं दातं ओठ उगा खाती कां हो ?.. ४१२ युवा वयांतले आवेगी प्रमाद फोडती, विसरूं न जाता, टाहो.. ४१३ स्राव शुष्कावले, हुर्द तडकले असह्य होतो तेंव्हा दाहो.. ४१४ कुकर्म कोणाला कधीं कां टळले पूर्णत्वे सत्कर्मी दावा ना हो.. ४१५ विरहांकित निशोत्तरी आवेगे बेभान तोडुन बंधन कीं सांधेल ‘मी-तू’ पण ? ४१६ (Me too पण ?) हे माझे नि केवळ माझेच विचार आहेंत... तुम्ही आम्ही राहूं दोन तीरांवरी विचार उफराटे भले प्रवाहो.. ४१७ कामशांती वेळी मनुष्ये सगळी श्वापदांच्या कुळी असतांत ४१८ भरताने त्याज्य ठरवीले भोज्य भोगहेतू शेज मंचावरी ४१९ विचलीत भावना अतर्क्य कृत्यांना सामान्य जनांना प्रवृत्तांत ४२० भोगोत्तरी पाठ शब्द रुक्ष राठ विरक्तीचे बोटं धरतांत ४२१ शुष्कावल्या ‘बाणां’खाली गंगा मायेनं शोषली तीरावरी हिरवाइले काळजाची ओलं दिली ४२२ ऐसे उजळत जाई नभ जैसे संगतींतूनि वालभ काठोकांठ अथांग कुंभ तृष्णाशामक दिठीला ४२३ काजळिच्या काळजांत तेवता तमारि ज्योत प्रीतरंग निळाईंत पंचपंच उषःकालि.. ४२४ कांहींच आकळेना, भरले कशासि पात्र मधु व्यंजने टिपाया मी पूर्णत: अपात्र ४२५ वठल्या कायेवरी माउली उरीं पालवी धारी कंठ-कटी भवती बिलगली छकुलि गोडं गोजिरी ४२६ पसरित पूर्ण पर्णभार पोपटी फुलवित पिसार पोलादि पाश लंघणार धिटुकला, सानुला जरी ४२७ पारदर्शी कांचपात्र आणि टवटवीत फुले द्विधा मनांत एक प्रष्ण ‘कुणी कुणांस सजविले ?’ ४२८ वेलीवरुनी खुडिली शोभिवंत करण्या गृह कोमेजुनि परि जातिल जाणवतां विरहदाह ४२९ विविध रेखिल्या नक्षी कसबाने पात्रावर त्या तशाच राहणार अखेरवेरि गात्रांवर ४३० क्षणभंगूरचि असते धरेवरी स्थिर अस्थिर नियमा अपवाद नाहि सत्य हेचि सर्वदूर ४३१ उंच ताठ सरळसोट रापल्या अंगाचा पोक्त राकट फुलं माळून वल्लरी तळांस फेर धरून रचतायत रास ४३२ पावलं कणखर धरेंत रोवून उभा राहील युगायुगांतून लव्हाळी येतील, चुंबून जातील विचलित त्याला करूं पाहातील ४३३ तापस योगव्यग्र तिथंच राहील जरी कुणी तप भंग करूं पाहील कुण्या भाळल्या मनीची परिक्रमा भानावर आणायला येईल कामा ? ४३४ (🙏🙏 उंच उंच सरळसोट ताठ रापल्या अंगाची राकट पाठ असा बदल अधिक तालबद्ध वाटेल ?) एक स्थिरावला कोण्या आधारे दुजा धरूं पाहे, मेघावले नभ सारे सावलीच्या अप्रूपें मन भरे स्वत:च्यांचि, त्याचे ४३५ तमगर्भी आसमंत डोह खोल खोल निवांत त्यांस तेजोमय ज्योत पाहाते आहे उजळू ४३६ सरले गर्भारपण नि अंकुरले छकुले नवोन्मेषि भूतांचा येथ खेळ चाले देहबोलितही प्रकटे उर्ध्वगामि झेप पसरले आहेंत पंख घ्यावया निरोप ४३७ परततांना थबकल्या कां या अशा मेघावळी ? हरपुनी भाना पाहाती उषा-शोभा आगळी ४३८ डोलतांना तरुशिखा दावीत त्यांना वाकुल्या तेजोनिधि स्वागतांस स्वर्णकांतीने सजल्या ४३९ थोडं भूतकाळांत गेलं मन.. ५०,६० वर्षं मागे.. ******** तुझी एक सकाळ अर्धोन्मलित पापण्यांची पहाटेच्या अधूऱ्या स्वप्नांची.. ओझरत्या स्पर्शानं थरारल्या गात्रांची.. तांबारल्या डोळ्यांची आळोख्यापिळोख्यांची न्हाणुल्या बटांची शिकेकाईच्या गंधाची.. सकाळ.. देशील ? झटकल्या कचपाशाची शिकेकाईच्या गंधाची.. पाठीच्या पन्हाळींतून चंद्रकोरींवर निथळणाऱ्या थेंबांची धूपाच्या शेकाची.. सकाळ.. देशील ? लालचुटुक टाचांची कवळणाऱ्या सुती साडीची कसून बांधल्या पदराची खांद्यावरुन मागे पाहून मला 'टुकटुक माकड' करींत हसणारी तुझी एक सकाळ.. देशील मला.. -अरुण काकतकर. ४४० रानावनांत सजतेय भूतांची दिवाळी, फांदीवर खुल्लिये कळी नि कळी फुलबाज्याच जणू सुखवायला दिठी गंधावतील जळी, स्थळी, पाषाणी, काष्ठी ४४१ जळ पुष्प शुभ्रसे निधीमधे अवतरले अन् तुषार उधळित तरंग-कारण झाले हिरवाई भवती कािंकारण अस्वस्थ ? दुर्लक्ष तिजकडे की करतिल पांथस्थ ? ४४२ तम उजळून निशेतला आता निमालेंत कंदिल दिवसाच्या आरंभाला उजेडाचा मंदिल ४४३ दिवाळी आंत, बाहेर दिवाळी दिवाळी सर्वदूर अबालवृद्ध जनां मनांत उत्सवोत्साहाचा महापूर ४४४ ज्याची त्याची सुख, दुःख आपापले असतांत भोग आतां स्वप्नंच पाह्यली केवळ तरी भंगण्याचांच असतो योग ४४५ जर ऐसि वाकली धरा काय शोधावे आधारा कैसा लाटेसि निवारा किनाराचि जिथे उध्वस्त (‘ऐसी कलेल जर धरा’ असा सुधारित पहिला चरण वाचावा..) ४४६ सारा भवताल स्वच्छ निवांत परि हाईना पाऊल स्थित चराचर, केंद्राकर्षी धरित्रित वोसंडतं डगमगणारची ४४७ कविता म्हणजे निव्वळ आत्मघात वार करणाऱ्या अक्षरांमागे आपलांच हांत ४४८ आरसा दाखवत हिंडतोय कवी.. नकळत पोहोचतो आंधळ्यांच्या गांवी.. ४४९ **** एका हिंदी रचनेचं रूपांतर छोटासा हा चढाव सर छोट्याचा आनंद मुद्राभर ४५० लुटून घे आनंद बाबा पुढे घेईल दैव ताबा ४५१ एकेका मग पायरीला धाप प्रत्येक श्वासाला ४५२ खेचतील मागे कोटी हात त्यांना घालावींच लागते लाथ ४५३ पण कशाला उद्याची बात नी चिंता आज दिलियेस तूं मात नी सोडवलायस गुंता ४५४ ऐल नि:शब्द अंगण ऐसपैस विस्तीर्ण पैल माणसांची वीण त्यांत निर्ढावली जाण ४५५ ऐल कांही शुष्कावती परी बहर सांगाती पैल श्वापदांशी नाती सांगणारी नांदतांती ४५६ ऐल साम्राज्य भूतांचे धरेवरी तृण नाचे पैल एक दुजा खेचे जग बेभान श्वासांचे ४५७ माडांच्या वर खाली सजली कनकावली उचंबळा भवताली स्वर्णप्रभा अवतरली ४५८ उभ्या ढाळत चवऱ्या कुंद किनाऱ्यांत पऱ्या पुळणीवर कृष्ण-भुऱ्या कल्लोळाच्या स्वाऱ्या ४५९ खोल धरागर्भि जेथं पाट स्वेदाचे जिरले सुखासीन त्यावरी मिरवती पाहा इमले ४६० छकुली जन्मली कितेक मजुरांच्या झोपड्यांत पाले उठता ती परी गेली आसवे गाळित ४६१ कुणी आणि कितिवेळा सांगा त्यांना स्मरले ? वास्तु उभ्या सुबक करून निघुन निमुटं जे गेले... ४६२ "The subject today is Love And for tomorrow as well, As a matter of fact I know of no better topic For us to discuss Until we all Die!" - Hafiz वालभ वात्सल्य प्रेम ममता माया किती परी शब्द एक विविध छटा रंगधनू वैखरी ४६३ प्रिय वदता सुख वाटे पाझर दगडांसि फुटे चोहिकडे स्मित दाटे निरवांतहि स्वर उमटे ४६४ -अरुण काकतकर. मंडप्या सुबक घडविल्या चिऱ्यांच्या लाल विहरती निवांत क्षणि वृद्ध पोक्त अन बाल पलिकडे चुंबु पाहती ठोकळे गगन तेथूनचि येती क्लान्त, रिझविण्या मन ४६५ बुडुं जाऊं पाहतां थकोनी दिवस, लांबल्या हरळीवर पसरुनि देह स्वस्थ सावल्या सांजेला जाते गजबजून भवताल जागल्या कमानी रित्या भोगतिल रात ४६६ एक ऱ्हायनो एक जिराफ पळता पळतां लागल्ये धाप लठ्ठ मुठ्ठ, ताड माड शूर वीर सगळे भ्याड ४६७ चिडीचिप आवार सार कुटं पळाले थोर नि पोरं दोघं त्यांना हुडकुन आणतिल जंगलांत लांब घेउन जातील ४६८ मूल स्रोत धवल मधे हिरव्याचा जल्लोष कुणी देइ अर्घ्य तर कुणा कमानीचा सोस ४६९ उमल्लियेत आत्ता कुठं सुखवायला दिठी कोमेजून गळल्यावर फक्त आसवं तिच्या गांठी ४७० अष्टवक्र झाला तरी जिद्द जागवतोय हुर्दांत कवळू पाहातोय अाकाश सारं पसरुन वरचं चतुर्भुजांत ४७१ पाना फुला काष्ठांत पक्ष्यांत रंगांची उधळण अपरंपार त्यागरंगी लेवून वसन चोंच सज्ज अणकुचिदार ४७२ सहज मिसळून भवतालांत भोगतांना मुक्त जिणं नका टिपू उगा ! हे तर निसर्गाचं अद्भुत लेण ४७३ हंसाचा डौल की फणा काढलेला नाग ना जळाशय वा धराधार कुणाचा काढतेय माग ४७४ कवळी शाखा धावरी पोपटी हिरवाईचा विळखा मधे आडवी शेलाटी ४७५ आसपास नाही चाहूल श्वासांची जिवंत नादांत स्वैर उधळल्या तरुणाईला कसली भ्रांत ? ४७६ शेजारी बहरलेले फुलुनि अलवार पडले संपुट पर्णें झेलले सवतीसाठी कोण्या ? ४७७ युगांनुयुग मत्सरांत जळताहे पारिजात क्रोधाच्या परिमळांत चतुर सुखावे हरी ४७८ रागेजली सखी प्रिया स्वेदें नाहलि तनया विरहाच्या कशी भया साहेल भामिनी ? ४७९ झाडतांना मागे राह्यली छोटिश्शी खडी ‘सोबत देते तुला’ म्हणत एक पडली काडी पायवाट म्हणाली ‘पडा निवांत येथे! सक्काळ पर्यंत कोण इथं नी कशाला येते ?’ ४८० (आतां या घालमेलीचा नि सुखासीन आयुष्य जगतांना उगा येणाऱ्या ढोंगी उमाळ्यांचा दुर्गंध यायला लागलाय..) खंडतां श्वास मुक्ततांत अवघे स्नायू मग सुटती सारे श्राव, अनावर वायू खळगल्या पोटि ना पडत पुरेसा घास ते निवर्तले तरि नसतो कसला त्रास ४८१ लागता त्याचि चाहूल त्यजावे सर्व सर्वथा रितेपणि जावे सरता पर्व वाऱ्यावरी होवुनि स्वार उडावी रक्षा धूसरती इथेच अस्तित्वाच्या कक्षा ४८२ या अशा तुताऱ्या गर्जति कोणासाठी सोडवीत गुंता, उराउरी भेटती भेटीगाठींचा अजब सोहळा रंगे पाहतांत जे त्यांचे मन थबकुनि दंगे ४८३ They tried to bury us, They did not know we were seeds -Mexican Proverb पाहिले पुरूनी धरेंत त्यांनी आम्हा अनभिज्ञांचे त्यां मांद्य न आले कामा ठावकेच नव्हते क्रांतिबीज ते रुजले फोफावत तरुने मुळांत त्यांना चिणले ४८४ थवे द्विजांचे कुठूनि येती स्थलांतरा शिशिरांत मने भावना दिठी सुखावुन उडुनि पुन्हा जातांत ४८५ की अरिची अतिरेकी चाहुल सजग दला लागली दमनहेतु अन् वायूयाने वेगे झेपावलि ४८६ मला कुशींत घे ना माय माती लागतिया गार गारठा बी खूपच हाय हाडं फुटत्यांत पार ४८७ गर गर गर गर चाहूल वादळे देती झर झर झर धारा संतत अवनीवरती सर सर सर कांटा कायेवर जगताच्या चर चर चर वाटा विरहिणिच्या हुर्दाच्या ४८८ घर घर घर ओवी प्रसवे जात्यावर थर थर थर अभंग पंक्ती ओठांवर हर हर हर ओठी भक्तांच्या उच्चार कर कर कर कराल दंतध्वनि भयपर ४८९ (नि:शब्द झालोवतो.. पण हावरट मनानं हाळी घातलींच शब्दांना.. नी ओढले चार फराटे.. चहा पितापिता.. ढोंगी साला मी..) कां झाकूं पाहे रडवेला चेहरा झेलण्या वेदना सज्जच असते धरा प्रसवेल आसंवातुनी दया कधितरी ? तुटल्या नाळेचा नाही मिळत जुळारी.. ४९० त्याच्या आवेगी झेपेला निळाईचं गालबोट ऊंच उडत भेदून तिला सूर मारेल सरळसोट ४९१ आडव्या तिडव्या क्षीण रेखा असीमाला पाहतायत धरूं त्याला दाखवीत वाकुल्या कधींच पार गेलंय पाखंरू ४९२ द्विजत्रयिने आहे भरलेले उड्डाण हेतू वा अंतिम अंतरि कुठे ठिकाण ? जरि एक गुंतला वाटे जंजाळांत आहे तो केवळ दृष्टीभ्रम द्विमितिंतं ४९३ अखिल जीवमात्रांची सृष्टी ठेवणे सर्वांप्रती समदृष्टी मनुष्यतत्वाची समष्टी येथ जाणा.. ४९४ (एक प्रक्रिया.. पिशाच्चवेळ, मानणाऱ्यांकरिता.. गच्च रात्रींच जाग आली.. शरीरधर्म, वयाच्या या टप्प्यावर, ऊर्मी कूर्मी झाल्यावर जो उरतो तो शरीरधर्म.. त्या साठी जाग आली.. नुकतेंच fb वर भेटून त्यांच्या कवितेच्या प्रेमांत पडलो मी.. लक्ष्मण खेडेकर.. त्यांनी काल एका रचनेंत गोवलेले.. मराठींतले मरूं घातलेले शब्द रुंजी घालत होते मनांत.. एकदम मला पण शब्द आठवला.. पितळींत जे जेवलेंत त्यांना कदाचित माहीत असलेला.. कळकणे.. मग त्या उच्चाराच्या जवळपासचे दोन.. कलंकणे आणि कनकणे परत पडता पडता आठवले.. मग म्हटलं कशी सांगड घालायची.. घोळवत, पाठ करंत, घोकत काढले कसे बसे दोन तास अन् लिहिलं आत्ता..) कनकणे ! दिठीस आगळा स्वर्णभास कलंकणे ! गालबोट लखलखत्या प्रभेस कळकणे ! सौख्यभंग स्रावल्या रसनेस मराठींत माझ्या ४९५ तुझ्या नसलेपणाच्या पुनरावृत्त घावांचे घट्टे, बेरड होवून माझ्या असलेपणावर साकळले कीं माझ्या बधीर संवेदनांसह जिणं कसं सोप्प होवून जाईल.. म्हणून.. जमेल तितकं आणि तितक्या वेगानं दूरदूर जा.. किंवा मला लोटून दे मिट्ट काळोखाच्या शेवाळल्या डोहात.. ४९६ पहुडली निळाई होति निशेंत निवांत पाहातो गुलाबी धसमुसळि करूं प्रीत त्या उचंबळांतुनि तेजप्रभा प्रसवली झटकूनि आळसा धरित्रि जागी झाली ४९७ शाखा बघती झेलण्या,तारका मावळतीची विखुरलय चांदण ? की प्रभा रामप्रहरीची ? ४९८ ना ठाउक मजला येती कां कढ कंठी गदगदतो मी पण कशास नि कुणासाठी सुख दु:खांतहि वा दिठींत जळ साकळते काळीज भंगुनी अवचित कळ कां उठते ४९९