Wednesday, March 25, 2015

'मी मराठी' साठी समीक्षा: 'पडद्याबाह्रेर': रविवार दिनांक १५, २२, २९ मार्च

'मी मराठी' साठी समीक्षा: 'पडद्याबाह्रेर': रविवार दिनांक १५-०३-३२०१५ साठी. ********* पडद्यामाजी काळे-गोरे । पात्रांमजी भले-बुरे । विकृत, विपरित यांचे होरे । जनसामान्या रिझविती (?) ॥ ’वृंदावनी’ एक तुळशी । निवडुंगाच्या भवती राशी । चित्रविचित्र सूडानिशी । चिरडू पाहती अविरत ॥ ऐशा एककल्ली कथा । फिरुन त्याचं, त्याचं व्यथा । वाहिन्या रोज मांडू पाहाता । कैसे संतोषावे आम्ही ? ’हं ! असो’....असा निश्वास । टाकुन होती सुजाण हताश । ’होतील कां पात्र शिक्षेस ?’ । मनांत करिती प्रतीक्षा ।। असो... आतां गत सप्ताहांतल्या, छोट्या पडद्यावरच्या घटनांचा आढावा...जो या स्तंभाचा मुख्य हेतू...तो घ्यायला सुरुवांत करूया... प्रेमविवाहोत्तरी दुरावले । जगणे कशास मग उरले । एकलेपण सुध्दा परवडले । तुलनेंत ।। २२६ ही तर शुध्द अनुभव-कथा । पोटार्थी पति-पत्नीची व्यथा । सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा । लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। भोगणाऱ्यास कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ जशी जाय पुढे कथा । मनांत दाटून येते व्यथा । दुराव्याचे प्राक्तन माथा । लागले ! ना इलाज ।। जरी 'आऊ' असती संत । नवरे होवू पाही 'महंत' । सहकारी कर्मचाऱ्यां हाकत । राहाती ! मेंढरे जणू ।। आतां एवढं (पेरूची) फोड़ करून लिहिल्यावर तरी तुमच्या लक्षांत यायला हवं हं ! ओळखलंत की नाही मालिकेची नांव ? सध्या, छोटा पडदा सायंकाळी, विरंगुळावेळी, अर्धातास व्यापणारी, ही त्यांतल्यात्यांत सुसह्य मालिका.. झी वाहिनीवरची, 'कां रे दुरावा' ! 'मी मराठी' हे दैनिक, कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ विष्णु वामन शिरवाडकरांच्या स्मृतिदिनी, म्हणजे २७ फेब्रुअरी, राज्यभाषा मराठी दिन, या सुमुहूर्तावर दिमाखदार सोहळ्यांत प्रथम अंक प्रकाशनानं सुरू झालं ! आंता स्वाभाविकपणे, त्यां साठी स्तंभलेखक करणाऱ्यांच्या खांद्यावर शुध्द मराठीठींत बूज राखणं आणि भ्रष्ट मराठीचा निषेध करणं क्रमप्राप्तच झालं ! सर्वाधिक प्रमाणांत, जनमानसांत या भ्रष्ट मराठीचा प्रादुर्भाव जर कुठून होत असेल तर तो विविध मराठी(?) वाहिन्यांवर च्या मालिकांमधल्या 'पात्रां'च्या तोंडी संवाद-लेखकानं कोंबलेल्या संवादांतून ! 'माझी' मदत, 'त्या'ची मदत ? कुठे शिकवतात अशी मराठी ? यांतल्या एक अभिनेत्रीनं तर मराठीत डाॅक्टरेट् मिळवलिये ! तरी त्या इतर सहकाऱ्यांबरोबर तशीच भ्रष्ट मराठी रेटताहेत ! पण सुंदर कथाबीज, पटकथेंत प्रसंगांची जाणीवपूर्वक मांडणी.. खिळवून ठेवणारी.. उत्तम पात्रयोजना, अभिनयाची तर जणू स्पर्धाच असते प्रत्येक भागांत ! पात्रयोजनेंत, एका मुळांत, अभिनयाची उत्तम अभिनेत्रीला, 'पुढचं पाऊल' या चित्रपटाच्या ( त्या ईटीव्ही वाहिनीवरच्या, भीषण मालिकेच्या नाहीं हं ) नायिकेला 'गोट्या' मालिकेंतल्या माउलीला, डॉ. मानसी मागीकरांना स्थानं दिल्याबद्दल दिग्दर्शकाचा मन:पूर्वक अभिनंदन ! आणि नटवर्य अरुणची नलावडे ? कोकणी माणसांचं नारळ, फणसासारखं बहिर्रूप आणि अंतरंग, काय सुंदर अभिनित करताय सर ! सलाम ! आणि आण्णांची मोठी सून ! तिनं पहिल्याभागापासून ठेवलेलं पात्राच्या व्यक्तिरेखेचं भान, जरास जास्त भडक वाटलं, तरी अप्रतिम ! खरंतर नकारात्मक भूमिका साकारतांना, जास्त परिश्रम घ्यायला लागत असावेंत ! अगदी भडकपणासहित, होसूत्याघ मधली जान्हवीच्या आई, दुर्वा मधली मोहिनी, आणि हिंदी मालिकांमधल्या अनेक 'व्हॅंपा' यांचा स्त्री-प्रेक्षकांना येणारा राग, हेच त्यांच्या अभिनयांच्या यशाची पावती असते, नाही कां ? आंतां या मालिकांमधला एक 'फंडा' (हा शब्द सध्याच्या तरुणाईत बरांच रूढ झालाय म्हणून वापरतोय हं ! माझ्यावरंच तो बूमरँग व्हायचा धोका पत्करूनसुध्दा !) पाहूया हं ! खूप बोलायाचे आहे, परि बोलणार नाही.. संपेल मालिकां ही धास्ती, मना कुरडतडून खाई खूप बोलायाचे आहे, परि बोलणार नाही.. लांबवाया मालीका, ऊपाय सांगा आहे कांही ? आतां वरच्या ओळींत मी, मालिका ऐवजी 'मालीका' लिहिलय ! कां ? तर तो काव्यरचनेचा जन्मसिध्द हक्क आहे ! त्याला म्हणतांत कवित्वास बहाल केलेला परवाना ! इंग्रजीमधे Poetic Licence... वृत्तबध्द किंवा छंदबध्द रचनेंत, लघु-गुरु साधण्यासाठी वैयाकरण्यांनी दर्शविलेली सहमती ! तर... जान्हवी, 'होसूत्यघ'... तिचा भाऊ पिंट्या, तिकडे, काॅंग्रेसगवत झालेली दुर्वा, केशव, सारेगमप मधले आण्णा, त्यांचा, बायकोच्या ताटांखालच मांजर झालेला मुलगा, धाकटी सून आदिती, मामतूझा मधली शुभ्रा... सगळे जर भडाभडा बोलायला लागले तर ? अनर्थ होईल ना ! मग त्यांच्या 'मूकाभिनयानं' साधणाऱ्या अनर्थाचा फायदा, तक्षकी राक्षसी पाश...TRP...प्रेक्षकांचा भाबड्या मनाभवती आवळायला कसा मिळणार ? पण, 'कन्यादान' या शीर्षकानं, गतस्मृती जागवत, दाखविलेल्या आशेच्या किरणांची ऊब मिळेल या भावनेनं पाहायला लागलो तर तिथंही अशुध्द मराठीची माशी शिंकलीच ! म्हणतांत ना, प्रथमग्रासे मक्षिकापात:.. तसं कांहीसं ! कार्यतत्पर, कडकशिस्तीचा, कर्तव्यकठेरतेचा भोक्ता, बेडर, निधड्या छातीचा अधिकारी, आपल्या 'कीर्तने' या आडनांवाच्या, कार्यालयांतल्या कक्षाच्या दारावरच्या नामफलककावर, 'क' चा ईकार ऱ्हस्व कसा सहन करूं शकतो ? कीर्तने च्या ऐवजी किर्तने ? काय हे पोंक्षेजी ? आणि तो घृणास्पद हांवभाव करणारा, अतर्क्य...इतके अतर्क्य की समाजानं मुख्य प्रवाहांत सामावून घेतलेल्या, तृतीयपंथियाला सुध्दा अपमानास्पद वाटांव....नृत्य शिक्षक ! हे गृहस्थ (?) एके ठिकाणी, Any excuse ऐवजी Any complaint ? असं म्हणाले हो चक्क ! हायरे दुर्दैवा ! मराठीबरोबर इंग्जीचाही खून ? डबल धमाका !!! आणि एका मोठ्या वस्त्रोद्योगाचा मालक असलेला नायक, निरुद्योगी असल्यासारखा, एका महाविद्यालयाच्या, आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेच्या तालमीला येतो ? रोज ? अरे काय रे हे ! कसले आदर्श ठेवता मुलांसमोर ? असो... आतां परत थोडंसं बरं कांहीतरी ! मंगळवारच्या 'होम मिनिस्टर्' या आदेश बांदेकरनं , गेली १० वर्ष अथक परिश्रम करून नावापूपाला आणलेल्या निर्व्याज, निर्मळ, अधिकाधिक सर्वसामान्यांना सामावून घेणाऱ्या कार्यक्रमांत, आमच्या परीचा...परिमला भटचा सहभाग म्हणजे छोट्याछ्या कारणांनी, हताश, निराश होणाऱ्या सर्वांनाच एक प्रेरणादायी, धगधगता वस्तुपाठच होता. माझं हे लिखाण आज महिलादिनी प्रकाशित होतय ! म्हणून परीला दंडवत ! तुम्हाला कार्यक्रमांत दिसली ती, हिमनगाचं पाण्यावर दिसणारं, १/८ शीर्ष ! ती आम्हा सगळ्यांचा म्हणजे मी, सुधीर मोघे, चंद्रशेखर गाडगीळ, सुधीर गाडगीळ अशा, १९८० ते १९८७ या काळांत, दादरला एकत्र राहाणाऱ्या सर्वांची,मैत्रीण ! ..तुमचे कार्यक्रम 'बघते' म्हणतांना, हळूच अखेरीस, 'सादरकर्त्यांची नांव नुसती दाखवता ती सागतसुध्दा जा ना ! आम्हाला कशी कळणार ?' म्हणायची ! ही सूचना सर्व वाहिन्यांनी ध्यानांत घ्यायलाच हवी ! तिनं, जन्मापासूनच, कुठल्या कुठल्या संकटांशी दोन हांत करीत, हसतमुखानं, धैर्यानं मार्गक्रमणा करीत इथवर पोहोचली आहे, ते ऐकलंत, तर तुमचा थरकांप उडेल.. पुढील भागांत गंगा...&tv या नव्या वाहिनीवरच्या मालिके विषयी.. &tv चं प्रसारण सुरू झालं सोमवारी,रझिया सुलतान या वाघिणीच्या ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेनं... ************ अरुण काकतकर. पडद्याबाहेर: दिनांक २२-०३-२०१५ साठी ********** मुघल सम्राट क़ुतुबुद्दीन ऐबक याच्या ऐतिहासिक काळांतली ही धीट बेदरकार आक्रामक प्रवृत्तीची ही युवराज्ञी.. रझिया सुलतान ! पहिल्याच भागांत, हिला दिग्दर्शकानं तिला थेट वाघोबाच्या पिंजऱ्यातच धाडलं ! म्हणजे धार्ष्ट्य दृश्यमान झालं ! नंतर त्याला मशाल हातांत घेऊन चिडवत, त्याच्या हल्ल्याच्या टप्प्यापासून दूर राहाण्यासाठी साध्या उड्या, कोलांट्या उड्या मारायला लावल्या ! म्हणजे अंगभूत लवचिकपणा प्रतींत झाला. आणि अखेरीस, उघड्या पिंजऱ्याचं दार बंद व्हायच्या आंत च तिनं बाहेर चक्क सूर मारला ! एकही शब्द, संवाद न वापरतां, दिग्दर्शकानं रझिया सुल्तान चं 'रझिया सुल्तान' हे ऐतिहासिक विशेषण करून टांकलं... क्या बात है.. याला म्हणतांत दृश्यदिग्दर्शन.. &tv या नवीन वाहिनीवरची या सुरुवातीच्या मालिकांपैकी या मालिकेला, कसबी दिग्दर्शक लाभला आहे, आणि तो ही मालिका अधीकाधिक मनोरंजक आणि ऐतिहासिक सत्याशी प्रामाणिक राहून लोकप्रिय करेले अशी आशा बाळगूया... गतवर्षी, 'महाराणा प्रताप' आणि 'अकबर' या दोन मालिका, सोनी आणि अन्य एका वाहिनीवर दाखलं झाल्या, आणि अशाचं, उत्तम निर्मितीमूल्यांमुळं लोकप्रिय झाल्या आणि भाव खाऊन गेल्या. त्यांतला छोटा प्रताप आणि त्याचा पिळदार शरीरयष्टी म्हणजे काय याचा कृतिपाठच जणू, असा, गुरुकुलस्वामी, यांनी मी विसरूंच शकणार नाही.. रझिया सुल्तानच्या दिग्दर्शकानं, त्या निर्मितीमूल्यांचा वस्तुपाठ, आदर्श म्हणून समोर ठेवायला हरकंत नाही ! आणि या भागांत, एका महत्वाच्या घटनेची नोंद घेतली नाही तर सर्व वाहिन्या आणि विशेषत: क्रिकेट पाहाणारे प्रेक्षक माझी, निष्काळजापणाबद्दल निर्भत्सनाचं करतील. सध्या देशांतलं आणि परदेशांत जिथं जिथं भारतीय नागरिक, निवासी वा आहेत.. तिथं तिथं सर्वत्र, घराघरांत, मनाननांत, वातावरण क्रिकेटमय झालय ! जागतिक करंडक स्पर्धेमुळ.. सूर्योदय कधीही न पाहू पावणारी मंडळी, आजकाल अगदी गजर लावून पहाटे तीन उठून चित्रवाणीच्या खोकड्यासमोर, खेरड्याच्या कमाल सजगतेनं ठाणे मांडून बसतायत्.. त्यातूनही.. नवलं वर्तले गे माये। उजळला प्रकाशु । विजय पाक वरती मिळाला । प्रवाहित आनंदांसूं ।। हे चक्षुर्वैही सत्य, वाहिन्यांवर याचि देही याचि डोळा अनुभवल्यामुळं, जणूं कांही करंडकावर, भारतातं नांव चक्क तिसऱ्यांदा कोरलं गेल्याचं स्वप्नं, प्रत्येक भारतीय पाहात आहे. आणि हे स्वप्न सत्यांत उतरवायचा संकल्प धोनी आणि मंडळींनी सोडलेला दिसतेय.. पाकिस्तान (खरंतर तिथंच, विश्वकरंडक खिशांत टाकल्याच.. अं हं.. आपल्याच खिशांत राहाणार याची खात्री, भारतीयांच्या मनांत रुजली) पाठोपाठ, दक्षिण आफ़्रिका, काल, रडतखडत कां होईना, धुळवडीच्या धुरळ्यांत, विजयाचे रंग मिसळण्यांत संघ यशस्वी ठरला (एकदाचा).. पाठोपाठ सर्व म्हणजे साहीही सामने, प्रतिस्पर्धी संघांना चारीमुंड्या चीत करीत, धोनी आणि मंडळींनी सर्व फटाके उडवून जल्लोश केला..। काय गंमत आहे या माध्यमाची ! घर बसल्या, चहाकॉफीचे घुटके घेत, 'अरेरे', ए ठोंब्या, हाण की ल्येका', क्या बात है ! इट्स डेफिनेट्ली अ सिक्स्..' अशी टीका, कौतुक करण्याची संधी आपल्याला हे माध्यम गेली जवळपास ४३ वर्ष मुंबई, महाराष्ट्रांत, (५६ वर्ष दिल्लींत), सातत्यानं देतय ! या माध्यमांत, प्रत्यक्ष मैदानावर घडणाऱ्या घटना दृश्यस्वरूपांत उपलब्ध झाल्यामुळं, खेळांतले बारकावे आपोआपच कळतांत. उदाहरणार्थ रिव्हू मागितल्यावर, पहिल्यांदा टाकलेला चेंडू 'नो बॉल्' तर नाहीना ? झेल घेतांना, आधी टप्पा तर पडलेला नाहीना ? यष्टिचीत करतांना, फलंदाज क्रीझ् च्या नक्की बाहेर आहेना ? चेंडू बॅट ला स्पर्श करूनं तर गेला नाहीना ? सीमेजवळचा झेल घेतांना, पायाचा स्पर्श तर सीमारेषेला झाला नाहीना वगैरे बाबी 'हाॅट् स्पाॅट्' वा अन्य तंत्रज्ञानाच्या साहाय्यान प्रेक्षक, संथदृश्यप्रक्षेपण बघत असतांना, नकळतच त्यांच खेळाविषयीच उद्बोधन होतच ! आत्ता माझ्यासारखा, दक्षिण आफ्रकेच्या फलंदाजीच्या पडझडीची दारूण अवस्था पाहतोय मी ! अखेर पाकिस्ताननं ३२ धावांनी विजय मिळवून, उपउपान्त्य फेरी गांठण्याच्या दिशेन एक 'पुढचं पाऊल', टाकलय ! .(अरे बापरे ! 'पुढचं पाऊल' ? नुसतं नांव काढलं तरी, मुघल सेनेच्या घोड्यांना पाणी पितांना संतांजी-धनाजीचं प्रतिबिंब दिसायचं या आख्ययिकेची आणि अतर्क्य आक्कासाहेबांची मूर्ती, डोळ्यासमोर उभी राहाते..) दक्षिण आफ्रिका नाहीतरी त्यांच्या अवसानघातकीपणाबद्दल प्रसिध्द आहेच.. अगदी १९८४ च्या विश्वकरंडकापासून.. फटाक्यांची जाहिरांत..चित्रीकरणाचा सुमार दर्जा असून, त्यांतला तिरकस, हरलेल्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा, आणि जेत्यांच्या मुद्रेवर स्मित पेरणारा आशय मात्र पुरेपूर पोहोचला अपेक्षित प्रेक्षकवर्गापर्यंत ! 'मासा काढ जा !' कोळीवाड्यातली हाळी वाटली ना तुम्हाला ? नाही.. नाही.. ! हे झिंबाब्वेच्या आघाडीच्या फलंदाजाचं नांव आहे ! खरंच ! विश्वास नाहीना बसत ? तर ती झिंबाब्व्मधल्या कोळीवाड्यांतली हाळी आहे. पहा.. तिथं झींबाब्वेंतसुध्दा मराठी हळ्य देतांयत आणि इकडं ? 'तू पण हस माझ्या'वर' ?', 'हस मला' ऐवजी ? चक्क अतुल परचुरेतोंडी ! होसुत्याघ मधले बोरकर आंडनावाचे शाखाधिकारी ! अतुल काय किंवा कोणी असो ! पापी पेट के लिये राष्ट्रभाषाका ग़ुलाम होना पड़ता है भौ ! पार अगदी इतिहासकालीन लोधी पासून सद्यकालीन मोदींपर्यंत.., आम्ही मराठी मंडळी दिल्ली तख्ताचे गुज़रे, ग़ुलाम... पापी पेटका सवाल है भौ... 'मराठी असे आमुचे माय बोली' ! ही असली ? आणि या सर्वांनी कविवर्य सुरेश भटांचे, ' लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी' हे मराठी अभिमानगीत गायलय म्हणे ! दुर्भाग्य भटांचं..दुसरं काय ? असो.. 'तुम्हे ऐसा बर्ताव शोभा नही देता । मीठाई खाना मना है तुम्हे !' 'क्यूं ?' क्योंकी तुम विधवा हो । पती मर चुका है तुम्हाला ।' 'स्किन मैं तो जिंदा हूं ना !' हे संवाद.. कलर्स वाहिनीवरच्या, अनेक वर्ष चालू असलेल्या आणि आतां घरंगळत चाललेल्या.. 'बालिकावधू' या मालिकेंतल्या, सुरुवातीच्या कांही भागांची आठवण करून देतायत कां नाही ? प्रसंगांचं साम्य असलं तरी, &tv च्या 'गंगा' मालिकेतल्या तत्सम व्यक्तिरेखेंच्या स्वभावाचं मनोदर्शन, तिची परंपरा, रूढींशी टक्कर घेण्याची आक्रमकतेची प्रचिती, वर उल्लेखिलेल्या संवादांतून, स्पष्टपणे देते ! अगदी 'उडान' च्या बाल-नायिकेच्याही पुढची ! ईटिव्ही वाहिनी वरची मराठी मालिका मामतूझा मधे, हम शकलची जुनाट वापरून वापरून झिजत चाल्लेली शक्कल... काय दाखवतेय ? पटकथा लेखक दिग्दर्शकाची सुमार अक्कल? अरे, तो स्वत:ची सुटका करून घेतलेला 'खरा', का नाइ करतोय शुभ्राला हाक मागायचं धाडस जरा ? आणि नायकाच्या भावाचं पात्र म्हणजे, दिग्दर्शकाच्या सुप्तेच्छांच प्रतिबिंबच वाटतय ? इतका मूर्खपणा ? आणि सगळ्यां धाकटा गायबच आहे गेले कित्येक महिने.. अरे हो.. तो तिकडं होसुत्याघ मधे चित्रीकरणाचा व्यस्त आहे ना ? पण कांही म्हणा, होसूमीत्याघ मधे, 'फूटेज्' जरी रोहिणीला मिळत असलं तरी भूमिकेच भानं पहिल्या भागापासून राखायचं कसब डोळ्यांत भरती ते रत्नांगिरिकर कोल्हटकरांचं ! हॅट्स आॅफ् टु यू सर ! ********** अरुण काकतकर. 'पडद्याबाहेर': रविवार, दिनांक २९-०३-२०१५ साठी पारं'पा'रिक ? अरे नकारे माझ्या वाघिणीसारख्या मायबोली मराठीला रोजरोज भोसकू ! कार्यक्रम:राम कदम-मानाचा मुजरा.. निवेदक:प्रसाद ओक..वाहिनी:ईटीव्ही.. आंता एव्हाना कलर्स मराठी...झाली असणार ! ह्या 'अमुक' मराठी, 'तमुक' मराठी वगैरे शीर्षकांच्या वाहिन्यांमधला 'मराठी' आपला, कुकवाला धनी असावा तसा असतो. त्यापेक्षा सरळ, 'अमुक' भ्रष्ट मराठी असं म्हटल तर ताकाला जाऊन भांड लपविल्याचा दोषारोप तरी टाळता येईल त्यांना . किंवा अमुक 'भ्रम' (भ्रष्ट मराठी) वाहिनी असं म्हणावे ! नाहीतरी सगळ्या दृक्श्राव्य माध्यमांचा कणा म्हणजे सादर होणाऱ्या आशयांतला भ्रामकपणांच असतो की..म्हणजे जे सृष्ट ते थोड अतिरेकी, अतिशयोक्त दाखवायचं म्हणजे, असत्यावरची विश्वासार्हतावृध्दी.. Make believe.. किंवा ज्याला आमच्या व्यावसायिक विशेषणांत, Day-For-Night असं म्हणतांत ! म्हणजे, कृत्रिम उपकरणांद्वारे दिवसाची रात्र करून टाकणं ! पूर्वी ८,१६, ३५ मिमि छायकांच्या काळांत अशी एक गाळण कांच, म्हणजे Filter वापरले जात ! असो.. विषय वाहवला तरी तुमचं तांत्रिक प्रबोधन झालं की नाही ? या शीर्षकाचा एक इंग्रजी चित्रपट पण अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालाय ! चित्रपट-निर्मिती याच विषयावरचा.. त्रूंफॉं नावाच्या दिग्दर्शकानं यांत दिग्दर्शकाचीच भूमिका केलिये ! संधी मिळाल्यानं ज़रूर बघा... तर आतां यापुढे मराठी वाहिनी म्हणजे, 'भ्रम' ? ठीकै ? आणि गंमत म्हणजे, नंतरचे प्रहसन, उत्तरप्रदेशांतून आलेल्या लोकांनी बिघडलेल्या शुध्द(?) मराठी बद्दल.. हाय रे दुर्दैवा !!! 'दुनियादारी' ही नवी मालिका दाखल झाली आहे 'झी' वाहिनीवर !.. शीर्षक संगीत: नीलेशचं खूप छान, खळाळत्या निर्झरासारखं, उसळत्या कारंज्यासारखं आहे.. विषयाला साजेसं ! नीलेशची वाटचाल, अशोक पत्कींच्या पावलावर पावलं टाकंत चाली आहे. संगीतकार म्हणून आणि माणूस म्हणून ! इतक्या यशानंतर, अजून ते डोक्यांत गेलं नाहिये नीलेशच्या ! नाहीतर कांही पुणेकर संगीत-व्यपारी ! वाहीन्यांवर दुकानं मांडत हिंडतायत ! परत एकदा असो... तर..कांही तरुण मंडळी..युवक, युवती.. आपलं काम शोधायला, मुंबईंत आली आहेंत. एक शयनगृह, बैठकीची खोली, त्यतच अर्ध्या भागांत पाकगृह आणि एकच स्वच्छतागृहांत, अशा रचनेचा हा गाळा ! त्यांत तीन मुलं नि दोन मुली असे हे पांचजण राहातायत ! 'कुठल्यातरी मैत्रिणी किंवा एकत्रित पाहायच्यांत गरजेंतून निर्माण झालेल्या मैत्रिणींबरोबर राहाण्यापेक्षा, परिचित मित्रांबरोबरं राहाणं सुरक्षित वाटतं गं !' हे त्यांतल्या एका युवतीच्या तोंडचं विधान, नव्या पिढीपुढच्या.. विशेषत: युवतींपुढच्य... अनोख्या आव्हनांचं विदारक सत्य आपल्या समोर आणतं ! स्वच्छतागृह एकच असलेयामुळं, ते वापरत असलेला युवक असल्यासारखा, बाहेर GENTS अशी पाटी, तर युवती वापरतांत असल्यास LADIES अशी पाटी, ही योजना तर भन्नाटच वाटली ! दिग्दर्शकाला १०० गुण ! आतांतरी वेगळा वाटतोय मालिकेचा बाज. पुढं ? देखतें है आगे आगे होता है क्या ? यशवंतराव चव्हणांवरचा चरित्रात्मक माहितीपट, झी वाहिनीवर, रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत असा तब्बल ४ तास..प्रायंजकांच्या जाहिरातींसह दृक्श्राव्य माध्यमांत या सादरीकरण घाटांला, चित्रपट न म्हणतां, 'डाॅकुड्रामा' असं म्हणतांत. म्हणजे हयात नसलेल्या वव्यक्तींसाठी सुयोग्य पात्रयोजना.... आणि चित्रपट प्रभागाकडून, उपलब्ध असलेला आणि मिळवलेली तत्कालीन प्रत्यक्ष दृश्ये, यांचा बेनालिम मेळ ! दिग्दर्शक जब्बार पटेल या प्रकल्पांत बऱ्याच अंशी सफल झाले असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला आठवतय ? मुंबईत रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा रविवारी सकाळी ९ पासून तब्बल एक तास. 'रामानन्द सागरांची 'रामायण' मालिका इतकी जनप्रिय झालीवती की अबालवृध्द, आपली सर्व कामं सोडून किंवा उरकून, त्या खोक्यासमोर ठाण मांडून बसायची ! तितकीच नसली तरी तशीच जनप्रिय झाली आहे 'जय मल्हार' शीर्षकाची, झी वरची मालिका ! अप्रतिम नेपथ्य, बाह्यचित्रीकरणस्थळं..वेश-केशभूषा. सुयोग्य पात्रयोजना.. खंडोबाला स्वपत्नीनं दिलेल्या शापानंतर, म्हातारबाबा, ..'बानूबाय' अशी अत्यंत मार्दवानं ओतप्रोत हांक मारीत संबोधन करतो, ती फार गोड लागते कानाला. एकूणच पटकथा, संवाद सर्वच निर्मितीमूल्य दर्जेदार आहेंत. आशयाला लाभलेल्या सहानुभूती, आत्मीयता, श्रध्दा या पलिकडे या मालिकेच यश दिसतंय मला ! चैत्र-चाहूल ? चैत्र सुरू झाल्यावर ? अरे शब्दांचे अर्थ तरी ध्यानांत घ्या की, त्यांचा उपयोग करायच्या आधी.. 'जरासी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं' मदन मोहन-लता... एक अद्वितीय रचना.. लतानं सोने करून टाकलेली.. अं हं ! रसिकांसाठी सुवर्ण-स्वर नजराणा... तर यांतली 'आहट' म्हणजे चाहूल ! कुणी यायची वाट पाहांत असलेल्याला वारंवार होणारे भास.. काय दिवस आहेंत ! मराठी शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी, हिंदी-ऊर्दूचा आधार घ्यायला लागावा ? अर्थ माहीत नसला तर, चैत्रउत्सव किंवा वसंतोत्सव म्हणा की रे ! पण बहुधा दुसऱ्या कुठल्या वाहिनीनं वापरला असणार.. मग 'वेगळ' कांहीतरी म्हणून चुकीची शीर्षकं ? काय हे 'प्रवाही ताऱ्यां'नो ? अरेरे , मी पण कसा बिनडोक, ठोंब्या.. म्हणजे कार्यक्रमाचे, थेट प्रक्षेपण थोड़च असणार ? मी चौकशी केलीना ! त्यांच्याशी संपर्क कांही केल्या होईना.. मग अन्य स्रोताकडून माहिती मिळाली, 'कार्यक्रम पूर्वमुद्रित आहे' ! मग बरोबरच आहे. त्या चित्रीकरणाच्या वेळी वाहिनीला 'चाहूल' लागली होती चैत्राची, म्हणून चैत्र चाहूल, बरं का !! असो.. दुसरा काय म्हणणार ? पण आत्तांच, होसूमित्या मधे 'पाठकोरा' शब्द ऐकला आणि सुखावलो जीव ! मराठी भाषा संवर्धनाच्या आशा अचानक पल्लवित झाल्या... वाघा सीमा संचलन सोहळ्याला आधारित जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असणार. विश्वकरंडक सामन्यांदरम्यान वारंवार दाखवातायत !.. पाकिस्तानी सैनिकी अधिकाऱ्याचं फाटकं पादत्राण, भारतीय सैन्याधिकारी, अत्यंत सैनिकों शिस्तींत, देहबोलींतून हेटाळणीमिश्रित दया मुद्रेवर धारण करींत, फेविकॉल् लावून दुरुस्त करतो.. जाहिरातींतून सुध्दा माजोऱ्या शेजारी देशाची मिजास उतरावायला उत्पादकानं प्रवृत्त व्हावं म्हणजे, प्रत्येक भारतीयाच्या मनांत किती भडास खदखदतो आहे, याची प्रचिती येते ! समोर भारत-बांगलादेश यामधे, विश्वकरंडकाच्या उपउपान्त्य फेरीचा सामना सुरू आहे. विजय समोर दिसतेयस. आतां उपान्त्य लढत ! अरे अॉस्ट्रेलियन 'शिवीगाळेकर' आले की समोर ! पण पाकिस्तान आलं असतं तर मजा आली असती... बिच्चाऱ्यांना, फटाक्यांच खोकंपरत घेऊन जायला लागणार. विमानांत वज़न जास्त नको म्हणून, मधेच समुद्रांत टाकून द्यायचे फटाके, असं कांहीतरी शिंजतय त्यांच्या गोटांत.. उड़त उड़त कानावर आलं माझ्या... आणि हो ! त्या 'कन्यादान' मालिकेच खरं नांव असायला हवं, 'कन्यानाच'.. घरी,दारी, महाविद्यालयांत, पहिल्या भागापासून, सगळ्या कन्या नुसत्या नाचतायत ! आतां तर गायत्रीची आईपण तिला घरीच पाश्चात्य नृत्य शिकविणार आहे म्हणे ! बाकी उपायुक्तांना, तालमीच्या ठिकाणी जावून, बहुधा सगळ्यांना हिडिस फिडिस करण्याव्यतिरिक्त अन्य उद्योगों नाहिये ! ********** अरुण काकतकर.

।।भासबोध।। १००६ ते १०६७

।। दास-वाणी ।। जैसें बोलणे बोलावें । तैसेंचि चालणे चालावे । मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०९/२३ आपण जसे बोलतो, जे विचार लोकांना समजावून सांगतो त्याप्रमाणेच जर आपली वागणुक असेल तर सहजच सामान्य जनांचा आपल्यावर विश्वास बसून ते तुम्ही सुरू केलेल्या सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेतील. समर्थ आपल्या महंतांना ताकीद देतात. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. वचने लागती पाळावया । नको वाटते पळावया । अपेक्षापूर्ती टाळावया । मन नाहि धजावत ।। १०५७ कशासि फसवावे कोणासी । वचने देउनि अश्यक्यशी । अपेक्षाभंग मनासि । दाहक असतो साहावया ।। १०५८ ।। दास-वाणी ।। करूणाकीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटे । श्रोतयांची श्रवणपुटें । आनंदे भरावी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०२/१२ कीर्तनभक्तीमधे नवरसांपैकी करूणारस प्रधान असावा. करूणा म्हणजे कींव नाही. अपार निस्वार्थ प्रेमभाव म्हणजे करूणा. त्या करूणानिधी परमेश्वराची कथा स्पष्ट, स्वच्छ खणखणीत आवाजात करावी की त्यायोगे श्रोत्यांचे कान इकडचेे तिकडचे ऐकूच शकणार नाहीत. त्या सर्वांची मने आनंदाने तृप्त होऊन तेही भजनामधे तल्लीन होतील. 'करुण' ! राजा सर्व रसांचा । 'करुण' ! स्रोत माउली हृदयिचा । 'करुण' ! पहावा गाउलीच्या नेत्रिचा । रुध्द होतसे कंठ ।। १०५५ कीर्तन ! सहज सोपे माध्यम । कीर्तन ! वाचा, देहबोलींचे धाम । कीर्तन ! थकल्या, श्रवणी विश्राम । उभारी आणण्या परतुनी ।। १०५६ ।। दास-वाणी ।। भेद ईश्वर करून गेला । त्याच्या बाचेन व वचे मोडिला । मुखामधें घास घातला । तो अपानी घालावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२७ ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, स्त्री पुरूष, पशू पक्षी प्राणी यांनी काय काय कामे करावीत हे ईश्वराने ठरवून दिलेले असते. कर्म आणि उपभोगातील विविधतेला भेद असे म्हणतात. 'सर्वं खलु इदम् ब्रह्म ' हे सर्व जग एकच ब्रह्म आाहे हा अध्यात्मिक सिद्धांत आहे. पारमार्थिक पातळीवर योग्यही आहे. परंतु व्यावहारिक दृष्टया भेद असणारच ना ? अन्नाचा घास तोंडातच घालावा लागतो ना ? सर्वच ब्रह्म आहे असे मानून तो गुदद्वारात घातला तर चालेल? ईश्वरनिर्मित कर्मभेद हे कुणाच्या बापालाही बदलता येणार नाहीत. तसा प्रयत्नही कुणी करू नये. निसर्गे निर्मिले जीव । विज्ञान, दृश्य विश्वांत धाव । तरी घेऊ बघती अखंड ठाव । दूरदूरच्या अज्ञाताचा ।। १०५२ ।। दास-वाणी ।। उफराटया नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१६ लोकांना मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. राम च्या उलट मरा हे उलटे रामनाम. इतकेच नव्हे तर शंभर कोटी श्लोकांचे रचलेले रामायण हा आपणा सर्वांसाठी वाल्मिकी ऋषींचा प्रसाद आहे. याचा अजून एक अर्थ निघतो. आपण वैखरी वाणीने प्रत्यक्ष उच्चार करून रामनामाचा जप करतो. परा हे वाणीचे पहिले स्फुरण, जिथे शब्द,अर्थ, श्वास काहीही नसतानासुद्धा नामस्मरण सुरूच असते. म्हणून परावाणी हे उफराटे नाम. सर्वश्रेष्ठ नामस्मरण. वाल्मिकींनी या उफराटया नामाने स्वत:चा उद्धार केला आणि समाजाचाही. नामस्मरणाचा महिमा समर्थ साधकांना सांगताहेत. बोकाळिले 'उफराटे' कर्म । साधूचि देउ लागले दम । नग्नावस्थेंत वसविण्या ग्राम । 'कुंभ'स्थळी, आग्रहती ।। १००६ ठाइ ठाइ करा उफराटे । इठा इठा म्हणोनि 'इटु' भेंटें ?। समज ग़ैर भ्रामक खोटे । प्रसविती कोण्या गर्भी ?।। १००७ आंता येईल कुंभमेळी । नग्न साधूंची मांदियाळी । 'तपश्चर्या' करणे रानोमाळी । सोडोनि, लांजवितील बाया-बापड्या ।। १००८ राष्ट्राला काय उपयोग यांचा । वृथा अपव्यय मनुष्यबळाचा । लावुनि चाप प्रशिक्षणाचा । पाठवा सीमा रक्षिण्या ।। १००९ पोशितो कोण यांना सांगा ?। सांगतो कोण 'भिक्षा' मागा ?। फसवे तापस, खोट्या योगा । भुलू नका बापडे हो !।। १०१० ।। दास-वाणी ।। संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण । सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०४/०८ वस्तू किवा व्यक्तीविषयी अनाठायी आसक्ती, आपुलकी नसणे. स्वत:चे संपूर्ण समर्पण. देहाच्या कोडकौतुकाविषयी यत्किंचितही प्रेम नसणे. अनुकूल, प्रतिकूल घटनांपासून पूर्ण अलिप्तपण. समाधानी शांत सहजावस्था. उन्नत अवस्थेतील मन. परमेश्वराची साक्षात अनुभूती (विज्ञान). या साधकाच्या सातही अवस्था एकच असून सिद्धावस्थेकडे प्रवास होत होत मुक्ती हे अंतिम फलआहे. सगळी व्यवधाने अबाधीत । लागती राखावी संसारांत । सुख-दु:ख-आपदा-आनंदांत !। सहभागी स्थितप्रज्ञेने ।। १०११ भवसागरी नौका वल्हविणे । सिध्दीपेक्षा अवघड साधणे । एकटे राहोंनि 'विश्वचिंता' करणे । अकारण निरुद्योग ।।१०१२ ।। दास-वाणी ।। नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवांचें पूजन करावें । नाना उपचारी आर्चावें । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/१७ परमेश्वराचे वास्तव्य, संतांचे जन्मगाव, कार्यक्षेत्र, समाधीस्थल ही तीर्थक्षेत्रे मानावीत. त्या ठिकाणी अध्यात्मिक स्पंदने तीव्र असतात. वेगवेगळया तीर्थक्षेत्रांच्या वारंवार यात्रा कराव्या.तेथील गैरसोयींचा पाढा न वाचता अत्यंत श्रद्धेने त्या दैवताची मनोभावे पूजा करावी. पत्र, पुष्प, फल, तांबुल, वस्त्रे इ अर्पून मुख्य परमेश्वर एकच सर्वव्यापी आहे या भावनेने ते ते दैवत पुजावे. ही खरी अर्चनभक्ती. बहुस्थली प्रवास, निरीक्षण । हे जाणत्या शहाण्याचे लक्षण । तेथल्या कार्याची शिकवण । रुजविणे मनोमनी, हीच अर्चना ।। १०१३ ।। दास-वाणी ।। नमस्कारें दोष जाती । नमस्कारे अन्याय क्ष्मतीं । नमस्कारें मोडली जडतीं । समाधानें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/१५ मनापासून विनम्र भावाने परमेश्वराला केलेला नमस्कार भाविकाचे काम, क्रोध, लोभ, अहंकारादि दोष नष्ट करतो. आपणाकडून केल्या गेलेल्या अन्यायाचेही परिमार्जन होते. व्यावहारिक जीवनात सुद्धा कोणाशीही वर्षानुवर्षे बिघडलेली नाती निव्वळ एका सप्रेम नमस्काराने समाधानपूर्वक पुन्हा प्रस्थापित होतात. वंदनभक्तीचे पारमार्थिक आणि ऐहिक असे दोन्ही लाभ समर्थ सांगताहेत. नमस्कार जणु शरणागती । व्यक्तण्या आदर, आपुलकी, प्रीती । स्मितमुद्रा असावी सांगाती । अभ्यागता सुखविण्या ।। १०१४ ।। दास-वाणी ।। भंगली देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं । सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतन चि कार्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०७/०४ दास्यभक्तीमधे देव माझा मालक आणि मी त्याचा दास म्हणजे इमानी तत्पर नोकर असा भाव मनात हवा. या दासाने जुनी पडकी देवळे पुन्हा बांधून काढावीत. त्यासमोरील मोठे जलाशय, तलाव डागडुजी करून पाय-या कठडे व्यवस्थित करावे. ओवरी, धर्मशाळा इत्यादी भाविकांच्या राहण्याच्या जागा साफसुथ-या ठेवाव्या,गरज पडल्यास नवीन बांधून सुद्धा काढाव्यात. या सर्व गोष्टी विनम्रपणे करून दास्यभक्ती पार पाडावी. भंगली मने दुविधांनी । त्यांसि सांधावे प्रथम करोनि । जातिल रानोमाळी उडोनि । बांधिली नाहि जर आळ्याने ।। १०४६ मग देवोनि अन्न-पाणी पुरेसे । क्षुधाशांती-तृषा शमवीलसे । ज्यामुळे निरामय होतसे । तवाव देह ।। १०४७ आजकालची मंदिरे वेगळी । विज्ञान मूर्त अवतरते स्थळी । संशोधक, शास्त्रज्ञांची मांदियाळी । मोहोळ जणु मधुमक्षिकांचे ।। १०४८ पायऱ्यांवरी जीवजंतू । मनुष्यांसि अपायह्तु । आढळले तर नि:पातू । त्वरित करणे अनिवार्य ।। १०४९ विज्ञानांमृतांच्या पुष्करणी । दिठींत साठवाव्या क्षणोक्षणी । होईल प्रतिबिंब त्यांत पाहोनि । तर्क-बुध्दी प्रयोगक्षम ।। १०५० ऐशा कांही निवडक ओव्या । बालकांनी अभ्यासाव्या । निश्चित देतील दिशा नव्या । विज्ञाननिष्ठा बळावण्या ।। १०५१ ।। दास-वाणी ।। सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/०७ संसारातल्या अडीअडचणी येत जात राहणारच. त्यांची चिंता करून त्या कमी होणार नाहीत. उलट प्रापंचिक अडचणीत सुद्धा जो फक्त परमेश्वराचेच स्मरण ठेवतो . निरूपण, कीर्तन, कथा जे जे काही बोलायचय ते फक्त ईश्वराविषयीच बोलत राहातो तो खरा देवाचा सखा. सुदाम्याने श्रीकृष्णभेटीमधे स्वत:च्या दारिद्रयाचा उल्लेखसुद्धा केला नाही. भगवंताने त्याची अडचण जाणून त्याला भरभरून समृद्धी दिली. निरपेक्ष सख्यभक्तीचे फळ हे मिळतेच. संसाराची अखंड चिंता । पोखरीत मनास असता । कसले कीर्तन, नामस्मरण, कथा । भाकड सारे कां सांगावे ?।। १०१५ तत्वांशी फारकत घेणे । एकमेकांसि 'समजुन' घेणे । वेळप्रसंगी 'वेल्हार'ही करणे । म्हणजेचि राजकरण भौ !।। १०१६ विधानगृहांत 'हमरी-तुमरी । खुळ्या कार्यकर्त्यांत सुरामारी । हाकलली जाती मुक्ती 'बिचारी' । गळ्यांत गळे विरेधकांचे ।। १०१७ कधी उघडणार डोळे जनता ?। कधी मिळणार महत्व मतां ?। कधी आपदांतुनि मुक्ता ?। मिळणार ।। १०१८ 'निर्लज्ज' प्रतिष्ठित सिंव्हासनी । आपलीचि पापे, कर्मकहाणी । केवळ भूल-थापांची खेळणी । गाजरासम निर्दय दाखविती ।। १०१९ अपंग, अजाण बालके, गर्भवती । सोडोनि, इतरांच्या न पडो कवळ हाती । कष्टेविण ! व्हावी राष्ट्रनीती । स्वप्न माझे ।। १०२१ न टाळती समागम । शेधित हिंडती शृंगारधाम । हेटाळिति परि अपत्यजन्म । श्वापदांपेक्षा अक्षम्य ।। १०२६ 'त्याची' म्हणजे कोणाची । आंस आहे दृढभेटीची । युगानुयुगे मनुष्याची । न ढळे पांपणी ।। १०२७ भेंटवाना एकदा 'त्या'ला । वाजत गाजत कधि आलासे वाटला । परंतु प्रस्तर वा मातीचाच् निघाला । कृतिशून्य ! देखता ।।१०२८ पंचमहाभूते हरघडी भेटतांत । दुखवित, सुखवित येत-जातांत । भवसागरी कधि नाव बुडवित । मार्ग पैलाचा दाविती ।।१०२९ म्हणोनि निसर्गा द्या मान्यता । तोचि जन्म-स्थैर्य-विलय दाता । 'त्य'च्या, बासनांतल्या भाकड कथा । जाउद्या विस्मरणांत ।।१०३० लागेल कटु, पण आहे सत्य । आपदेंत कधि सख्खे अपत्य । 'कर्तव्य' म्हणोनीही नाही कृत्य । धजते करावया ।।१०३१ धुडाळण्या वेळ हवा । कष्टकऱ्या कसा मिळावा । घरी परततां आप्तांचा मेळावा । घेरतो घासासाठी ।।१०३२ श्रीमंतास उत्तम उद्योग । शोधुनि सापडला तर माग । काढोनि, गरिबांसि थांग । सांगा सत्वरी ।।१०३३ युगानुयुगे मनुष्ये शोधला । कर्महीन होवेनि वेडाचार केला । तन-मन-धने, प्रार्थिला, पूजिला । दिसला, श्रविला, जाणवला नाही 'तो' ।।१०३४ स्वीकारिता आव्हाना ? दाखविता 'तो' ? उगा वल्गना । गरिबांच्या शिणल्या तना-मना । कृपया सोडा मोकळे ।।१०३५ चमत्कारास नाहीच अस्तित्व । विश्वांत सारे निसर्गाचे कर्तृत्व । कार्यकारणभावे युक्त । संपृक्त विज्ञान सर्वदा ।।१०३६ कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। अभावदेवासंबंधी भ्रामक समजुती । भाबड्यांच्या ऐशा ।। १०३७ एकतरी मुहूर्त ओवी । आजच्या दिशी रचावयास हवी । फटफटतांना पहाट नवी । पाडव्याची।। १०३८ ।। दास-वाणी ।। काया माया दो दिसांची । आदिअंती अवघी ची ची । झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०८/३८ हे शरीर आणि त्याने आयुष्यभर हाडांची काडे करून मिळवलेली संपत्ती दोन्ही नाशिवंत आहेत. ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार आपले आयुष्य एक क्षण सुद्धा नाहीये. जन्माला येतानाही वेदना, मरताना सुद्धा त्रास हालअपेष्टा आणि अतृप्ती. एकंदरीत कायमच फजितीचे आयुष्य जगणा-या मानवाने संपत्ती आणि उत्कृष्ठ पेहरावाच्या बळावर स्वत:ची थोरवी मिरवावी काय ? मान्य करीता ना 'पुनर्जन्म' ? मग, काया नाशवंत कायम । हाड़ा-मांसाशि नेइल यम । कां सांगता बरे ?।।१०३९ जगत असतांना समाजांत । हसत राहाणे अप्रस्तुत ?। पेहेराव, बोलणे, चालणे इत्यांदितं । थोरवी कां वर्ज ?।। १०४० काया वाचा नि मन । तिन्ही एकत्र करून । क्रमणे म्हणजे जीवन । क्षणार्धांत नाशवंत ।। १०४१ चित्तवृत्ती मोकळून । द्यावे स्वत:ला झोकून । खुलवून फुलवुन मन । जगणे यापुढे ।। १०४२ आले आले संमेलन । लोटले अवघे भक्तजन । देखण्या, अनुभवण्या घुमान । 'नामा' मुळे नांवरूपास ।। १०४३ व्यासपीठावर आजी माजी । सिंव्हासनी प्रतिष्ठापित पंतोजी । परंतु साहित्यिक 'फौजी' । 'नेमा'ने राहती अनुपस्थित ।। १०४४ उभे राहतिल देखावे, प्रदर्शने । मंडप सजतिल झालरीने । फांशी घेतल्यांच्या नांवाने । कवियंमेलने 'गलबल'तील ।। १०४५ सण वार गृहिणींस पर्वणी । त्या दिशी मिळून साऱ्याजणी । सजुनि, आभूषण् अलंकारांनी । मुक्तांगणी खेळतं असतं ।। १०५३ परा, पश्यन्ती, वैखरी । संस्कृत अर्थवाही जड जरी । व्यक्तण्या योजना त्रिस्तरी । समजाववावी तत्वज्ञांनी ।। १०५४ आकर्षण असणे नैसर्गिक । प्रतिसाद तेवढाचं आवश्यक । अन्यथा विकृत कृति जनक । नर-नारींमधे ।। १०६० 'हे भ्रामक, खोटें' सांगोनि अस्वस्थ । करणे ! त्यांसि, नाही रास्त । अभावदेवावरी भिस्त । ठेविती भाबडे ! ही चिंता ।। १०६१ पण जाणीव सत्याची देणे । लिहित चाललो याचि कारणे । कर्मावर श्रध्दा वळविणे । श्रेयस्कर ! सांगा कोणीतरी ।। १०६२ पाहता पाहता दृष्टांत झाला । 'राम' मनुष्यांत आणुनी बसविला । सामोरा गेला सुख-दु:खाला । कर्मयोगी सामान्य ।। १०६३ परि तत्वनिष्ठा राजपदाची । त्यजुनी प्रीती स्वपतिनीची । अपेक्षापूर्ती सर्वसामान्यांची । मूकपणे केली 'आदर्श' ।। १०६४ कोण कुठला य:कश्चितं । सारेच माझे अनिश्चितं । भयावह गर्दी गोंधळांत । दिवाभीत मी ।। १०६५ मी कां अजुनी 'आहे' ?। कोणत्या कारणे श्वास वाहे ? । प्राण कां न सुटो पाहे ?। देहांतुनी ।। १०६६ मन आजकाल अशांत । म्हणे, 'चल विजनवासांत । नसेल कोणी स्वकीय आप्त । अपेक्षिण्या परस्पर ।। १०६७ परंतु 'पळणे' योग्य नव्हे । अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये । न अधिकार ठेवण्या नांवें । ऐशास ! मजला राहील ।। १०६८

।।भक्तिबोध।। दमड्या अव्हराव्या...? पर्यंत

भक्तिबोध-40 दमडय़ा अव्हेराव्या आम्ही? निस्पृहता धरू नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडो नये । वोळखीमधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 14/01/04 स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृह म्हणजे निरिच्छ. स्वतःसाठी काही हवे असे मनात सुद्धा न येणे.निस्पृहलक्षणात लालसेला स्थान नाही.निरिच्छपणे, निरपेक्षपणे, काहीही लाभाची अपेक्षा न धरता, कार्य करून, कुणाचे आशीर्वाद घेत, ज्याची इच्छापूर्ती झाली, त्यांच्या नजरेंतला कृतज्ञभाव बघत सुखावण कुणाला आवडणार नाही ? पण हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा अंतरी बाळगत जगत राहाणे, भवसागरात आधीच गटांगळ्या खात, आजूबाजूला तशाच अवस्थेत इतस्ततः तरंगणार्या कुटुंबियासाठी. बुडत्यांसाठी आधाराचा ओंडका हेणार्याला शक्य आहे. हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा, सहज म्हणजे जन्मतः थोडासा प्रमाणांत कां होईना बालकाच्या अंगी असावा लागतो, जो पुढे, योग्यता संस्काराने वृध्दिंगत करता येतो. याची पहिली पायरी म्हणजे मिशलेले एकटयाने न हडपता त्यात इतराना वाटेकरी `करून’ घेण्याचा संस्कार ! वस्तींत, जमांतींत, समाजांत राहाणार्याला हे शिकवावे लागत नाही. `जीवो जीवन्त जीवनम’ या उक्ती प्रमाणे, एकमेकां साहाय्य करींत, आला दिवस साजरा करींत, पुढे पुढे चालावच लागतं. दासांच्या कालांतर ते तपश्चर्येनं ज्ञानार्जन करून, सदुपदेश करीत असतांना त्यांचे शिष्य’गण’, रघुवीराच्यानांवानं आरेळ्या देत कुठलं `समाजकार्य’ करीत, झोळी सामान्यांच्या द्वारांत, त्यानं घाम गाळून मिळविलेल्या कमाईंतून शिजवलेल्या घासांतला वाटा मागण्यासाठी रुंदावत, `भिक्षांदेही’ करीत होते, कोण जाणे ? दात्याच्या अंगणांतली लांकड, सरपणासाठी, भिक्षेच्या बदल्यांत कुणी फोडून दिल्याचे कुणाच्यातरी ऐकिवांत असलं तर मला कळवाल ? ते काळी ते श्यक्य होते । निष्क्रिय भोंदू `संत’ कोते । पोट भिक्षेने भरत होते । कार्मिकांच्या दानांतुनी ।। 57 निस्पृहता कशासाठी ? । फुकटे फिरती अवती-भवती । कष्टसाध्य प्रयत्नांती । दमडय़ा अव्हेराव्या आम्ही?।। 58।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-40 दानाने माजती फुकटे। श्रीमंती वाढवू। कष्टेविण मागील भागातल्या आशयाचा संदर्भ घेऊनच आजचा विचार मांडत आहे! जेव्हा, भिक्षेकर्यांना उमगते की भाबडी जनता, दानाने मिळणार्या `पुण्या’च्या लोभाने, आपल्या `आशीर्वादा’साठी, झोळीत भिक्षा `पाडता’ यत.. म्हणजे इकडून भिक्षादान केले की तिक डे पुण्याच्या घडय़ात भर पडून आपण हळूहळू `पुण्यात्मा’ होणार या भ्रामक (अंध)श्रध्दापूर्वक भावाने हरखून जात…आणि परस्पर आपली `12′ चा वेळ भागवतायत, तेव्हा त्यांची कर्माबाबतची स्पृहाच नाहीशी होवून, त्या दृष्टीने कां होईना `निस्पृह’ होतात ! भिक्षेची झोळी रुंद । भोजन करी अनिर्बंध । दात्यापाठी बोल अर्वाच्य बेबंद । उच्चरिती ते भोंदू ।।69।। निष्क्रिय आळशी गांजेकस । फासुनी रक्षा अंगास । तप्श्चर्येचा उभारती आभास । सावध ऐशांपासून ।।70।। दानाने माजती फुकटे । कुरण आपले ऐसे वाटे । तुपाचे भरुन नेती लोटे । स्वगृही वोतावया ।।71।। दानें माजविले ऐतखाऊ । मिळेल ते वोरपून घेऊ। म्हणति `श्रीमंती’ वाढवू । कष्टेविण ।।73।। भाबडय़ा `दानशूरांना’ हे कळत नाही की अशा `अपात्री’ दानाने ते अशा फुकटय़ांची जमांत वाढवून, कर्मपरावृत्तीला नकळत प्रोत्साहित देतायत ! ‘अरे, एवढा धडधाकट आहेस ! भिक्षा मागण्या ऐवजी काम माग की ! ते कर आणि पुरेपूर मोबदला घेऊन जा ! कष्टाने मिळवलेली भाकर जास्त ग्वाड लागते मांडय़ा ल्येकरा !’ असे कोणी अनुभवी वृध्दा, या ऐतखाऊंना कानपिचक्या देऊन कां त्यांच्या डोळ्यांत झणझणींत अंजन घालीत नाही ? अर्थांत, भीक मागणे आणि कवळ्या कच्च्याबच्च्याचेच अपहरण करून, त्यांना अपंग करून भीक मागायला लावणे हा जिथे आपल्या `महान भारत’ देशातला एक व्यवसाय आहे, तिथे ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. गरीबाला गरीबच ठेवण्याचा `उद्योग’ राजकारण्यांमध्ये जारी आहे, तसेच काहीसे हे ! नाही कां ? अरुण काकतकर 9822021521… जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त । तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल पण श्रीकृष्ण आणि ज्ञानोब्बा माउली या वैश्विक अद्वितीय विद्वत्तामूतvची जन्मरास एकच म्हणजे वृषभ होती, असं मी कुठतरी कुणा तज्ञाकडून ऐकल्याचं स्मरतो ! वृषभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे आसक्ती आणि विरक्तींचा विलक्षण संगम! कृष्ण तर भोगी होता हे सर्वश्रुतच आहे, आणि तो योगेश्वर होता याला गीतेपेक्षा आणखी प्रमाण काय हवं? माउलींची विरक्ती वादातीत! तरीपण कधीतरी मांडे खायचा मोह झालांच की ! म्हणूनच `संभवामी युगेयुगे’ झाली तरी ती `मनुष्येच’ होती. सत्व-रज-तमाचा योग्य मेळ । मन-शरीरासाठी सर्वकाळ । घालोनि करी प्रतिपाळ । तोचि गोपाळ योगि-भोगी।।74 ऐसा ठेवावा आदर्श । शिरोधार्य ज्याचा स्पर्श । पंचमहाभूत सदेह सदृश । अंतर्लहरी कल्लोळवी ।।75 तारे-वारे-धरा-तेज । जळाचे सुखद हितगुज । सत्य-शिव-सुंदराचे बीज । एकवटले ते ठाई ।।76 तरीसुध्दा, `साधु साधु’ म्हणत, भाबडे-भोळे आणि त्यांच्या भोवती, मोक्ष-गत्यादि मोहक मोहोळांचे जाळे विणायला उत्सुक ऐतखाऊं साधूंची पिलावळ हा या विश्वाला मिळालेला शाप म्हणावा लागेल ! `स्वखर्चानं या आणि मंदिर उभारणीसाठी कार्यसेवा करा हा नारा कांहीवर्षांपूर्वी घुमत होता, आठवतय! त्या नेत्यांना राष्ट्रउभारणीसाठी अधिक प्रमाणांत कार्यसेवा करायला `भाविकां’ना उद्यपक्त करांवसं कां वाटलं नाही हे मला तरी कोडच आहे. जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त । श्रवणेंद्रिये राखिती निद्रिस्त । `असल्या’ हाका ऐकावया ।।77 काय म्हणोनि `कारसेवा’ । अन्य बसून सेविती मेवा । श्रेयाप्रती दावीत दावा । तथाकथित संत, ज्ञानी ।। 78 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-42 नात्यातले बंध टिकवण्याची जबाबदारी नवदाम्पत्यावर संसार उधळतां वार्यावरी । तरिहि चित्त थार्यावरी । ठेवोनि, प्रयत्न परोपरी । करिती तें धैर्यशील ।।87 माय-बाप-अस्तुरी । पोरे-सोरे किनार्यावरी । सोडून उपदेशाच्या आहारी । जाय तो शतमूर्ख ।।88 इथं, कुसुमाग्रजांच्या, गाजलेल्या, `कणा’ या कवितेचा नायक आठवतो ! तो म्हणतो, `मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून, सर फक्त लढ म्हणा’ पण हा संसार थाटतांना विचारपूर्वक नियोजन करांवं लागतं ! उतावळा गाठे बोहले । बाशिंग गुडघ्याला बांधिले । सजवे `तच्या’ कंठी डोरले । पाही स्वप्ने बेभानं ।।89 तरुणपणी शारीर इच्छापूर्तीसाठी विवाहोत्सुक होणं, समाजनीतीप्रमाणं अगदीच स्वाभाविक असतं. पण केल्या विवाहानं, नुसती दोन माणसंच पति-पत्नी नात्यानं जोडली जात नाहींत, तर दोन कुटुंब, त्यांच्या आप्तेष्टांसहित जोडली जावून, अतूट बंध निर्माण होतांत. मग हे बंध टिकवण्याची, दृढ करण्याची जबाबदारीही नवदांपत्यावर पडते. यालाचं म्हणतांत संसार ! मग पुढच्या काळांत, अध्यात्म वगैरे बाबींच्या मागं लागून संसार दुर्लक्षिणारा महत्पापी समजावा ! क्षणोक्षणी सावध राहाणे । हे आम्हा सामान्यांचे जिणे । दृश्यादृश्य शत्रूंशी दोन हात करणे । मार्गक्रमितो अहोरात्र ।।90 परंतू याची खंत । मनाशी नाही यत्किंचित । जिणे `तसले’ गुळगुळित । संघर्षाविणा ओशाळवाणे ।।91 अशा संघर्षांतून वाटचाल करणार्या `भल्या’ मंडळींना, अध्यात्मा’चं व्यसन लावून, त्यांना कळपांत ओढीला उत्सुक असणार्यांपासून सावधच असायला हवं! अर्धपोटी उपदेश कैसा । रुचतो-पचतो न तो सहसा । पसरता जाणिवांचा पसा । अपेक्षा क्षुधाशांतिची ।।92 बाष्फवत् जिणे तुमचे-आमुचे । धरू पाहाता हाती न यायचे । कोणा नकळत विरून जायचे । जाणिवे पल्याड ।।93 अरुण काकतकर 9822021521… भाकरीसाठी अखंड भय आपापल्या श्रध्येयाच्या दर्शनार्थ, भाविक, भक्त ठिकठिकाणी, मंदिरांत प्रार्थनास्थळी, तीर्थक्षेत्री जात असतात. तिथे श्रध्येयाच्या प्रस्तराकृती समोर बहुधा डोळे मिटूनच कां उभे राहतात, हे मला एक कोडच आहे. खरेतर उघडय़ा डोळ्यांनी न्यहाळले तर पंढरपुरची विठ्ठलमूर्ती म्हणजे वात्सल्यमूर्ती. डोळ्यात अपार प्रेम, माया ओतप्रोत भरलेली, मूर्तिकाराने घडवली आहे हे ती `दृष्टी’ असणार्याच्या सहज लक्षांत येतं ! तशीच, श्रवणबेळगोळाची महावीराची भव्य, एक प्रस्तरचा डोंगर फोडून घडविताना, त्या मूर्तिकाराच्या सर्जनशीलतेबरोबरच त्याच्या रचना ज्ञानाचेसुध्दा कौतुक करावे तेवढे थोडेच असे वाटते ! पण लक्षांत कोण घेतो ? कसबी निपुण मूर्तिकार । आभूषणे वस्रालंकार । सजविण्या प्रस्तर निराकार । कोरिती छिन्नि-हातोडय़ांनी ।। 107 त्यास ना धर्म, संप्रदाय । कारागिरी हेचि कार्य । भाकरीसाठी अखंड भय । टोचतसे उदरांत ।ऑ। 108 मी माझ्या एका ।ऑ।भक्तिबोध।ऑ। भागांत `रंगमहती’ वर्णन करणार्या कांही ओव्या लिहिल्या होत्या. माझे सुहृद सुधीर जोगळेकरांना मी त्या पूर्वावलोकनार्थ पाठविल्या. त्यांना त्या भावल्यामुळे, त्यांनी त्या, झी वाहिनीच्या एक माजी निवेदिका शिल्पा देशपांडे यांना पाठविल्या. त्या वाचून त्यांच्या मनांत उचंबळलेला’रंगोत्सव कल्लोळ’ (कल्लोळ म्हणजे बंगाली भाषेंत `लाट’) मला पाठविला तो ओवी रूपांतच. तो असा.. रंग ! रंगाचिये डोही रंग ! एकला स्वतःही रंग ! धरुन राहतांत बाही अस्तित्वहेतु, शुभ्राची ।ऑ। रंग! वेदनेचे गीत रंग ! आराध्याचा हात रंग ! प्रभु अंतरात जणू वसे ।ऑ। रंग ! निर्मळाची साद रंग ! ईश्वरी संवाद रंग ! परा सर्व भेदाभेद मानवता जैसी ।ऑ। अशी ज्योतीनं ज्योत उजळत राहिली तर, ओवी चालत राहील अविरत। शब्द-भाव ओवीत स्वच्छंद। कांटेकोर पाळीत निर्बंध । वैयाकरणींचे ।ऑ। 109 अरुण काकतकर 9822021521…

Wednesday, March 18, 2015

।।भक्तिबोध।। नवशक्ती साठी ०५-०१-२०१५ पासून, सोमवार त् शनिवार दररोज

भक्तिबोध-1 ू प्रभाते करदर्शनम् तुम्हाला आठवतंय की नाही माहीत नाही , पण माझ्या लहानपणी, संस्कारक्षम वयांत, मला एक पुस्तक माझ्या वडिलांनी आणून दिले होते. ! त्या पुस्तकाचं शीर्षक होतं `जगांत कसे वागावे’ ! रोजच्या दिनक्रमांतल्या अगदी साध्या साध्या गोष्टींची, घरांत, वस्तीत, गावात किंवा समाजात वागताना कशी आणि कां काळजी घ्यायला हवी याचं, अगदी सोप्या भाषेंत विवरण या पुस्तकात होतं! जवळपास चार शतकांपूर्वी, समर्थ रामदासांनी, ह्याच प्रकारची, अबालवृध्दांना बोधप्रद अशी विविध विषयांचा परामर्श घेणारी सूत्रे, त्यांच्या दासबोध या ग्रंथांत ओळींच्या घाटांत मांडली. त्यापैकी कांही निवडक ओव्यांचा विचार, आपण या सदरात करणार आहोत पंचपंच उषःकाली, जाग येतांच, संस्कारी व्यक्ती प्रार्थना करते ती सर्वपरिचित आहे, कराग्रे वसते लक्ष्मीः। करमध्ये सरस्वती । करमूलेतु गोविंदः । प्रभाते करदर्शनम् ।। अरुण काकतकर… ******** भक्तिबोध-2 करदर्शनाचं महत्त्व कराग्रे वसते लक्ष्मीः। करमध्ये सरस्वती । करमूलेतु गोविंदः । प्रभाते करदर्शनम् ।। कुठल्याही कर्मयोग्यासाठी, सकाळी जाग आल्यावर, स्वतःचे दोन्हीही तळवे सुरक्षित, सजग आहेत की नाहींत हे जाणून घेण्यासाठी हे करदर्शन ! मग तो कर्मचारी लेखनिक असो वा कृषिवल वा अगदी हातगाडीवरून ओझी वाहणारा, अक्षरशः हातावर पोट असणारा भारवाहक असो ! सर्वसामान्यांना या करदर्शनाचं महत्त्व किती असतं हे कांही नव्याने सांगायला नको… हेच दोन्ही तळवे नंतर जोडले जातांत, `नमस्कारा’चे रूप घेऊन ! आणि ओठांतून आपोआपच उच्चारण होतं, `मातृदेवोभव । पितृदेवोभव । आचार्यदेवोभव ।’ अग्रभागी माता, नंतर पालनकर्ता, आणि अखेरीस विद्याभ्यास मार्गदर्शक गुरु.. परंपरेनेच नव्हे तर निसर्गदत्तसुध्दा हाच क्रम.. वंदनासाठी… कारण जन्माशिवाय पालन-पोषण नाही, आणि वृध्दीशिवाय ज्ञान समृध्दी कशी होणार ? अरुण काकतकर… ********** भक्तिबोध-3 वंदनभक्ती जन्मदात्री किंवा जन्मदात्री नसली तरी जोपासणारी निगराणी करणारी माता, नंतर पालन-पोषणासाठी अर्थार्जन करून सांसारिक जबाबदार्या पार पाडणारे तात किंवा वडील नंतर, आयुष्यांत यशोमार्गप्रदीप होणारे गुरुजन आणि शेवटी जे कोणी `श्रध्देय’….. म्हणजे कसबी मूर्तिकारानं, आपल्या हातांनीच धातूंना किंवा प्रस्तराला, स्वतःच्या कल्पनाचित्रांतून घडवून दिलेले मोहक आकार…मानलं असेल त्यापुढं नतमस्तक होण्यासाठी! असा एक पारंपरिक कृतिक्रम मनांत ठेवत, समर्थ रामदासांनी दासबोधांत ओवी लिहिलीः नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 04/06/14 निरूपणकारांनी त्यांचं सर्वसाधारण स्वरूप विषद करतांना लिहिलंः वंदनभक्ती म्हणजे नमस्कार. आपण श्रेष्ठ व्यक्तीसमोर नमस्कार घातल्याने नतमस्तक लीन होतो. अरुण काकतकर…. भक्तिबोध-4 जिव्हाळा आणि मैत्री काही कारणाने मनात अढी निर्माण झाली असेल तर ती नमस्कारामुळे दूर होते. अनेक लोकांबरोबर जिव्हाळा अन् मैत्री जुळून येते. मानव हाच परमेश्वर मानून वंदनभक्ती केल्यास आपले कल्याणच होईल ! पण ज्या सद्भावनेनं, दासांनी, नमस्कारानं काय कल्याणकारी कृती आयुष्यांत घडू शकतात, घडतात याचं वर्णन ओवीबध्द केलेलं आहे, ती परिस्थिती, परिणाम सद्यकालांत तसच राहिलेत का हे अभ्यासणे, मला वाटतं आवश्यक झालं आहे. या विचाराने कांहीसा प्रेरित होवून मनांत आलं नि ओवीबध्द झालं! त्यांचाच आढावा आपण घेऊयां! आजकाल विविध माध्यमांतून छायाचित्र, किंवा तलत्चित्रांद्वारे, नमस्कारांचे विविध प्रकार आपल्या दृष्टोत्त्पत्तीस येतांत. अगदी ओझरत्या, अंगुलीमाला जुळण्यापासून ते कोपरापासून नमस्कारापर्यंत! नमस्कार हो नमस्कार! नुकतीच कार्तिकी एकादशीची महापूजा, महाराष्ट्रांचं प्रांतिक दैवत, `कानडाउ विठ्ठलू, करनाटकू’ च्या चंद्रभागातीरीच्या राजधानींतल्या राजवाडय़ांतल्या गर्भगृहांत, एका नवनिर्वाचित मंत्र्यांच्या हस्ते, रूढीनुसार, मोठय़ा दिमाखांत पार पडली. तेंव्हाची दृश्यं, अर्थातच दुसर्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांत, अगदी मुखपृष्ठावर झळकली ! अशा अनेक प्रसंगांची छायाचित्रे, रोज बघतांना ज़र काळजीपूर्वक न्याहाळली तर त्यातलं एक साम्य सहज लक्षांत येतं ! प्रसिध्दीहेतु छापलेल्या या सर्व दृश्यांत, ज्या श्रध्देयाला वंदन करायचं, त्याच्या दिशेनं, दोन्ही हात जुळविलेले दिसतात ! पण ते ज्याचे असतांत त्याची, खोटं हास्य धारण केलेली चर्या, `छायकाच्या कक्षेंत व्यवस्थित येते की नाही ?’ याचं भान त्या व्यक्तीनं काळजीपूर्वक राखलं असतं ! आतां या तथाकथित `नमस्कार’ क्रियेला, दासांना अभिप्रेत असलेलं `वंदन’ म्हणायचं का ? अरुण काकतकर… भक्तिबोध-5 नमस्कार अष्टांग असावा । पदस्पर्शे ऊर्जास्रोत व्हावा।। तर`त्या’ नमस्काराला आदरपूर्वक अभिवादन म्हणायचं की `नाविलाजा’नं केलेली केवळ तळवे जुळणी म्हणायचं हे सुज्ञास समजावणे आवश्यक नाही असं मला वाटतं! कधी कधी हा तथाकथित नमस्कार तर, ज्यासाठी केलेला असतो त्याच्या श्रध्देपोटी, आदरापोटी नसतोच! तो असतो, मूर्तिकाराकडून, त्याच्या कल्पनारूपाप्रमाणं साकारलेलं पार्थीवरूप घडवून घेऊन, विधिवत् प्राणप्रतिष्ठा करून, प्रस्थापित केलेल्या श्रध्देयाच्या प्रतिमेच्या पूजेसाठी दाखल झालेल्या महनीयांना सुखावण्यासाठी! आपल्या संस्कारी बाह्यरूपाचं प्रदर्शन करून, ते लक्षवेधी करण्यासाठी! महनीयांच्या मनांतली आपली प्रतिमा उंचावण्यासाठी केलेला खटाटोप! कधी कधी ज्याला नमस्कार, वंदन केलं, त्याची पाठ वळतांच, त्यासाठी जोडलेले तळवे विलग होवून मुष्टिरूपही धारण करूं शकतांत, त्या व्यक्तीबद्दल मनांत साठलेली मळमळ, राग, द्वेष, देहबोलींतून व्यक्त करण्यासाठी! या भावनेतूनच मला शब्द सुचत गेले! जे व्यक्त करायचं ते उलगडत गेलं आणि त्यांनी अल्पाक्षरी प्रकारांतला, `ओवी’ याच घाटाचा आश्रय कधी घेतला. कळलच नाहीः नमस्कारा आड येगळेची । कल्पना न केलेलि बरी त्याची । पाठीवर कधि राळाची । आग उसळे ।। 1 नमस्कार अष्टांग असावा । पदस्पर्शे ऊर्जास्रोत व्हावा । नमस्कारे योग सराव करावा । नित्यनेमाने ।। 110 नमस्काराने प्रसन्नचित्त । होती सहसा अभ्यागत । सभेची चर्या क्षणार्धांत । आशंकाविरहित होतसे ।। 111 दोन हस्तक, एक मस्तक । सामुग्री इतुकीच आवश्यक । धूप-दीप गंधपुष्पादिक । अवडंबर, तुम्हि जाणा ।। 112 अरुण काकतकर…. भक्तिबोध-6 सद्भाव, प्रेम, आपुलकी, आदर.. खरं म्हणजे नमस्कार, दंडवत रूपांत असला तर आपोआपच, शरीराच्या नैसर्गिक उभ्या स्थितीचा भंग होऊन, पूर्णांगाचा तोलबिंदू, धरणीच्या पातळींत येतो, जी अवस्था नसांना लाभदायक ठरते. नमस्कार करताना पदस्पर्श केला तर, वंदनीयांच्या ठाईची ऊर्जा संक्रमित होते असं म्हणतात. योग प्रकि येत साष्टांग म्हणजे, सर्वांगाला समाविष्ट करून घातलेल्या नमस्काराचं महत्त्व तर सर्वश्रुतच आहे. शिवाय, पाहुण्यांचं स्वागत करताना, नमस्काररूप जुळलेल्या दोन तळव्यांबरोबरच, त्यांनाही चर्या स्मितहास्यधारिणी असेल, तर अभ्यागत, साहाजिकच मनोमनी सुखावतो. समुदायांत किंवा सभास्थानी, प्रवेश करतांनाच जर नमस्कारासाठी हात जोडले गेले तर वातावरण क्षणातच सकारात्मक आणि कुशंकाविरहित होतं. नमस्कारासाठी भांडवल आवश्यक असतं ते फक्त सद्भाव, प्रेम, आपुलकी, आदर.. व्यक्तिविशेषाप्रमाणे! दोन हस्तक, एक मस्तक आणि नम्रभाव असले की भागतं! अगदी हात नसलेली व्यक्तीसुध्दा प्रसन्न मुद्रा आणि देहबोलींतून! नमस्कार’ इप्सितस्थळी पोहोचवू शकते… असो… आज आणखी एका वेगळ्या संकल्पनेचा विचार सुरू करू समजा तुम्ही सडकेवरून चालत असताना आपल्याच विचारात आहात. समोरून योणारी वाहन, गर्दी यांना चुकवीत सडक ओलांडणं वगैरे क्रिया सवयीच्या झाल्यामुळे प्रतिक्षिप्तपणे घडतात! अचानक समोरून येणारी व्यक्ती स्वतःशीच बोलत किंवा पुटपुटत, हातवारे करीत जाताना दिसली तर… अरुण काकतकर…. भक्तिबोध-7 शुभ विचारातून सत्कर्माची प्रेरणा अचानक समोरून येणारी व्यक्ती स्वतःशीच बोलत किंवा पुटपुटत, हातवारे करीत जाताना दिसली तर… ते न जाणवता जर कोणी तेआपल्याला सांगू लागलं की, `ते आहे तिथं! तू ते जाणून घे, जरी त्याच अस्तित्व जाणवलं नाही तरी!’ एकाचं विधानांतला हा परस्पर विरोधी `आदेश’ सरवसामान्याला बुचकळ्यांत पाडणारांच ठरेल की नाही? पण दासांनी दासबोधांतल्या एका ओवींत म्हटलंयः देव सख्यत्वे राहे आपणासी। तें तों वर्म आपणाचि पासीं। आपण वचनें बोलावीं जैसीं। तैसी येती पडसादें।। निरूपणकारानं याची केलेल्या फोड अशी कीं, देवाशी सख्य भक्ती करायची तर त्याचे वर्म आपल्यापाशीच असते. आपण जसे विचार मनात आणतो तसाच प्रतिसाद आपला अंतरात्मा म्हणजे मुख्य देव देत असतो. तात्पर्य शुभ विचार सत्कर्माची प्रेरणा देतात. ।। दास-वाणी ।। मुख्यतः जनसामान्यांचा `देव’ या संकल्पनेशी, केवळ एक सर्वनाम, शब्द या पलीकडे कितीसा संबंध असतो हेच मुळी कोडं आहे! अरुण काकतकर…. भक्तिबोध-8 अनन्य होतां अहं सोहं मावळलीं दासांनी `दासबोधां’त मनुष्याला उगाचंच पडलेल्या, `कोहं’, म्हणजे मी कोण आहे या कोडय़ाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेक पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ।। ।जय जय रघुवीर समर्थ । दासबोध ः 06/03/35 पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्त्वांपासून मी बनलो असे मानतो तेव्हा मला प्रश्न पडतो मी नक्की कोण? नीट विचार केल्यावर समजते की ते ब्रह्म म्हणजेच मी. जर मी खरोखर ब्रह्मरूप झालो, तर माझ्यातला देहरूप मी म्हणजे अहं आणि आत्मरूप मी म्हणजे सोहम्, या दोन्ही भावना संपुष्टात येतात. कल्पनेचा प्रांत जिथे पूर्ण मावळतो ती नववी आत्मनिवेदन भक्ती ! ।।दास-वाणी ।। खरं तर असल्या कोडय़ांची उकल करीत, वृथा कालापव्य करीत बसणे, याने काय साधते! साधत तर नाहीच उलट वेळ वाया गेल्यामुळं, कार्यसिध्दी ऐवजी कार्यनाशच संभवतो. तान्ह्याचं शिशुत आणि शिशुचं बालकांत रूपांतर होतांनाच ज्ञानवृध्दीचा प्रारंभ होतो. सुरुवातीला, माय-तांत, आप्तस्वकीयांनी केलेले घरगुती संस्कार, नंतर गुरुगृहात, म्हणजे आजकाल शैक्षणिक संस्थेत, सर्व व्यवसायाभिमुख विषयाची ज्ञानप्राप्ती सुरू होते. तदनंतर, प्रत्येकाच्या आवडीनुसार, चरितार्थार्थ प्रशिक्षण पूर्ण होऊन, व्यक्तीचा `कोहं’ हा प्रश्न संपतो. ही सर्वसामान्य परंपरा सोडून, मंडळी `ब्रह्म’ या संकल्पनेभवती फेर धरून, आयुष्याची कर्म-कर्तव्यपूर्तीची वर्ष कां वाया घालवतांत हे अनाकलनीय वाटतं मला तरी ! अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-10 जाणीव जागृत होण्यासाठी `कांहीतरी’ घडावं लागतं. आणि हे घडणं निसर्गनियमांचा भाग असतो. यालाच `दैवी चमत्कार’ म्हणा आणि ते अदृश्य असलं तरी त्याला भजा-पूजा, त्याचा जप-तप करा, अनुष्ठान करा!’ असा उपदेश भोळ्याभाबडय़ा अशिक्षित, निरक्षर जनतेच्या माथी मारण्याचा खटाटोप तथाकथित, कर्मकांडांत व्यस्त भोंदू करीत असतांत! म्हणून मला म्हणावसं वाटलं की, दिसेना त्याशि सख्य कैसे? जाणिवेविणा वर्म तैसे । अनुभवांति कर्म होतसे । जनसामान्यांचे ।। 2 प्रवास दूरचा असला आणि तो वायुयानानं करणं परवडणारं नसलं तर तो, एक तर झुकझुकगाडीच्या, हवेंत काढलेल्या धुरांच्या रेषा बघत, किंवा `यष्टी’च्या लाल डब्ब्यांत बसून (आजकाल `शिवनेरी’ वगैरे, आराम निमआराम असतांत म्हणा) नशिबानं गवाक्षानजिकचं आसन मिळालं तर, बाहेरची, ‘पळती झाडे’ पाहांत, मनांतल्या ण काकतकरभावभावनांी, आठवणींभवती पिंगा घालीत पार पाडून, मुक्कामाला पोहोचायचं असतं ! नाई कां ? रात्रीचा प्रवास असला, अमावस्येचे असली तर, अवकाशस्थितं ग्रह, तारे, कधी त्यांतूनच दृश्यमान होणारा उल्कापात बघत, किंवा पूर्णचंद्रदीप प्रज्वलित असेल तर त्या ‘सौम्य’ प्रकाशांतली अवर्णनीय दिसणारी निसर्गशोभा अनुभवत हा प्रवास सुखकर होतो, पण त्यासाठी दृश्य जाणीवेची साथ आवश्यक असतेच ना? अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-11 `ॐभवति भिक्षांदेही।’ धरणी आणि आकाश जिथे एकमेकाला मिळताना दिसतात ते तसे खरेच असते का? हा आभास असतो हे सर्वश्रुतच आहे ! आपण मिट्ट काळोखात चालत असताना जेव्हा प्रकाशाची रेघ दिसते तेव्हा डोळे उघडे असल्याचे जाणवते! निरव शांततेतून चालताना, किंवा अवकाशाखाली निर्जनस्थळी असताना, शुष्कपर्ण खाली पडतानाचा ध्वनिसुध्दा, श्रवणेंद्रिय सजग असल्याची जाणीव आपल्याला करून देतो. तुम्ही शांततेशी बोला, काळोख डोळे भरून पाहा, हवा चवीचवीने खा आणि क्षुधाशांती करा, या तपश्चर्येने, तुमचे तो `देव’ भले करेल ! असा फालतू `उपदेश’ जर कोणी करू लागले, तर हताश, रंजले-गांजले, व्यथित गोरगरीबच, नाइलाजाने, खोटय़ा आशेने विश्वास ठेवतीलही कदाचित ! पण गंमत अशी की हा उपदेश करणारे स्वतः `हवे’ला भूक लाडू, तहान लाडू मानतात कां हा एक गंभीर संशोधनाचा विषय आहे. कारण दुपारी बाराची वेळ झाली की यांना झोळी पसरून `ॐभवति भिक्षांदेही।’ अशी आरोळी किंवा हाळी देणे अनिवार्य असते, हे सर्वदूर सर्वांना माहीत आहे. कारण उदरभरण झाले नाही तर `उपदेश’ करायला शारीराद्वारे चालना, चेतना कशी मिळणार ? अरुण काकतकर मोबाईल- 9822021521…. भक्तिबोध-12 आप्तस्वकीयहितार्थ, कर्तव्य-कर्म करावे… `चांदणराती’ वर आकाशात `दिसणारे’ काही तारे सद्यकाळात तिथे नसतातच असे अवकाश-विज्ञान सांगते. आपल्याला `जाणवते’ ते त्यांच्या जिवंतस्थितीत, उत्सर्जित झालेले तेज! अनेक प्रकाशवर्ष प्रवास करीत आपल्या नजरेच्या टप्प्यापर्यंत वर्तमानात पोहोचणारे! जसे व्यक्ती निवर्तली, `भूत’ झाली, म्हणजे इतिहास-समर्पित झाली, तरी तिची बरी-वाईट किर्ती, आठवणी अनेक वर्षं जाग्या राहातात तसच कांहीसे! मी बालचित्रवाणीत असताना, विद्यार्थ्यांना, अवकाश विज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने, जगद्विख्यात वैज्ञानिक संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांच्या आठ भाषणांची मालिका, चित्रमुद्रित करून, दि. 1 जानेवारी 2001 या नवसहस्रकाच्या प्रथमदिनापासून सलग आठ दिवस `सह्याद्री’ वाहिनीवरून प्रक्षेपित केली होती. मोक्ष, गति, अध्यात्म आणि पर्यायाने निष्क्रियतेच्या मागे धावणारा, एकपेशीय जीवापासून `उत्क्रांत’ झालेला, मनुष्यप्राणी, या अनंत, अगम्य विश्वपसार्यात किती क्षुद्र आहे हे समजावण्यासाठी एक अप्रतिम उदाहरण दिले होते! `एका मोठय़ा मालवाहू जहाजात, शेकडो गोणी भरलेल्या आहेत’ जयंतराव त्यांच्या मृदुबोलीत सांगत होते, `त्या गोणींमधे हजारो मण बटाटे भरलेले आहेत. त्यापैकी एका बटाटय़ात, एक अळी वळवळते आहे. आता त्या अळीचे आणि जहाजाबाहेर पसरलेल्या अथांग जलनिधीतल्या एका थेंबाचे जेवढे नाते असेल त्याच्या निखर्वपटीत आपले त्या अवकाशस्थ तार्याचे नाते असते!’ माझी प्रतिक्रियात्मक ओवी लिहिली गेलीः जळी-स्थळी-काष्ठि-पाषाणी । निसर्गाची अगम्य लेणी । अनादि अनंताची खेळणी । त्यांतलाचि म्यां येक ।। 3 ।। पण म्हणून मिळालेले जगणे, `अध्यात्म, मोक्ष, गति, ईश्वर’ या अदृश्य संकल्पनांच्यामागे धावण्यात न दवडता, आप्तस्वकीयहितार्थ, कर्तव्य-कर्म करीत व्यतीत करावे हेच श्रेयस्कर! नाही कां? अरुण काकतकर 9822021521…. भक्तिबोध-13 मरोन कीर्तीस उरवावे। दासबोधांतल्या कांही निवडक ओव्यांनी मला प्रेरित केलं! दासांचा आदर्शवाद आणि त्यावर माझी सद्य कालातली, मुंबई, पुण्यांतल्या गेल्या 55/58 वर्षांतल्या वास्तव्यांत राहिलेली, अनुभवलेली, वास्तववादी, सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या नजरेंतून उमटलेली प्रतिक्रिया. तरंग; पण ओवीबध्दच, असं याचं स्वरूप आहे ! किंवा हा दासबोधांतल्या कालबाह्य संकल्पनांचा, ओविरूपांतूनच घेतलेला परामर्श आहे असं म्हणू हवं तर ! मी त्याला `भासबोध’ किंवा `काकावली’ असं नांव ठेवलय ! सादरीकरणादरम्यानं मी वारंवार हे ठसे तुमच्या समोर ठेवेनच ! ।। दास-वाणी ।। मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावें । मरोन कीर्तीस उरवावे । येणें प्रकारें।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 12/10/13 कधीतरी आपण नक्की मरणार आहोत.आपल्या चांगल्या वाईट कृत्याची वर कुठे तरी पक्की नोंद होतीय ही जाणीव म्हणजे मरणाचे स्मरण. व्यावहारिक, प्रापंचिक, सुखविलासापेक्षा जो हरिभजनात प्राधान्याने दंग असतो अशा उत्तमपुरूषाची कीर्ती तो मृत्यू पावल्यावरही खूप काळ टिकते, वाढतच जाते. सद्यकाली, कीर्ति, त्याबरोबर येणारी सत्ता, संपत्ती मिळविण्यासाठी काही जन-प्रतिनिधी(?), कुठलंही सत्कृत्य किंवा दुष्कृत्य करायला सहजी तयार असतात. पण ज्यांना सर्वसामान्य जगणं जगायचं असतं ते दिवसामागून दिवस, वर्षांपासून वर्ष, मनाला मारत, क्षणोक्षणी मरण अनुभवत, अबलंबितांना समजावत आयुष्य ढकलत असतात. आणि मग उद्वेगजन्य व्यथा उपरोधानं मांडायला लागतातः मरण कसले ?, म्हणाना `मोक्ष’। `आत्मा’ शोधितो नवा `कक्ष’ । अध्यात्माला कोरे `भक्ष’ । आपोआप ।। 241।। अरुण काकतकर-9822021521… भक्तिबोध-14 स्मरण कोणाचे? किती? दास म्हणतांत, मरोन कीर्तीस उरवावे । येणें प्रकारें ।। पण अगदी जितेजागते असतांना स्वतःचे पुतळे, अनुयायांना, भक्तांना उभारण्यास प्रवृत्त करणारे, `कीर्ति(?)वंत महाभाग’, `बाहुबली’ आणि राजकारणी, सत्तेची समिकरणं बदलतांच, त्यांची होणारी, केली जाणारी दुरवस्था, कधीकधी हत्याही, (मध्यपूर्वेंतल्या बहुतेक देशांचे जुलुमशहा दहशतवादी गटांचे ‘नेते’ वगैरे), कष्टकरी कर्मयोगी बघतोय रोज, आणि भेदरून म्हणतोयः कशास हवी, कुणास कीर्ती? सय येतां पांपण्या पांणवती। हृदये आप्तस्वकीयांनी हेलांवती। पुरेसे असते जनसामान्या।।242।। स्मरण कोणाचे? किती? कृत्ये विविधांगी करिती। प्रमाणांत त्यांच्या, व्यक्ती। राहती आठवांत।।243।। गद्गद होवुनी कुणी वंदे। आठवुनि जखमा कुणि क्रोधे। उच्चारण्या अपशब्द, ओठामधे। कर्माजोगी प्रतिक्रिया।।244।। नको कीर्ती नको पुतळे। टाळक्यावर बसतिल कावळे। `कावकाव’त मिळुनि सगळे। मुद्रा भरतिल विष्ठेने।।245।। म्हणून भक्तिभाव, श्रध्दा मनांत असावी, राहावी ती व्यक्तीसापेक्ष नसावी तर कार्य, अर्थांत सत्कार्यसापेक्ष असावी. कारण आजकाल, सर्व ऐहिक सुखं उपभोगत, भोळ्या-भाबडय़ांना अंधश्रध्देच्या गारुडाच्या जाळ्यांत अडकवून, त्यांना कायदा मोडत सुशासनाला विरोध करणार्या भोंदू बाबा, महाराजांच किती माजलय, ते रोज सकाळी वृत्तपत्र उघड़लं की दृष्टोत्पत्तीस पडतच आहे आपल्या ! नाही कां? अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-14 तो सद्गुरू, अध्यात्मिक अनाथांचे माहेरच फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवि निजसार । तोचि गुरू माहेर । अनाथांचें ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। आपल्या धर्मग्रंथांमधील सिद्धांत आणि तत्वे सोप्या शब्दांत उलगडून साधकांना आणि भाविकांना निर्गुणाची वाटचाल सुरू करून देतो तो सद् गुरू, अध्यात्मिक अनाथांचे साक्षात माहेरच ! शब्द आणि भावार्थ । भुकेल्याला सर्व निरर्थ । ग्रासाचीच घेते साथ । जाणीव, मनी प्रकटण्या ।। 5 फोडिता शब्दांची अंतरे । त्यांतूनि प्रसवतील धनधान्यांची कोठारे ।। सुखावतील अस्तुरि आणि पोरे ।। क्षुधाशमनोपरान्त ।। संधी गरजूंना काबाडकष्टांची । त्यांतूनि चरितारार्थ अर्थार्जनाची । भवसागर तरून जाण्याची ।। व्हा प्रदीप त्यस्तव संतहो ! ।। म्हणे `अध्यात्मिक अनाथ’ । आणि सद्गुरू तारिल धर्माचरणांत । पण जगण्यासाठी घास ओठांत । देइल ऐसा गुरू ?।। उपदेश हवेंत विरेल । जर श्रोता पुढती नसेल । भरल्या पोटीच सहसा पचेल । व्यर्थ बोध वा भक्तिधारा ।। आधी भागवा शारीर गरजा । विशेषतः चालना देण्या मगजा । सजग करण्या चेतना,संवेदना, समजा । तवान हवे ना तन-मन?।। तर, भावभोळ्या जनसामान्यांना `अध्यात्म, गति, मोक्ष’ आदी निरर्थ संकल्पनांमागे, दिशाहीन मेंढरांसारखं पिटाळत, गर्तेप्रत नेणारे जर असले `सद्गुरू’ भेटले तर आता आपण मंडळींनी ही भूमिका घेऊन ठाम उभे राहिले पाहिजे. अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-14 कर्मावगुंठित प्राक्तन समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवि जो दूषण । गुण सांगता अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। संपूर्ण पुस्तक लक्षपूर्वक समजून उमजून वाचावे मगच काय टीकाटिप्पणी करायची ती करावी. असे न करता जो नुसताच पूर्वग्रहदूषित विचारांनी ग्रंथाला जो शिव्या देतो, त्यातील सुविचारांनाही जो कुविचार मानतो तो एक पढतमूर्ख. शिक्षित असला तरीही मूर्खच ! अनुभव उपदेशाहुनी अस्सल । दुर्लक्षुनी ‘समूळ’ ग्रंथ लिहील । माथा जनसामान्यांच्या मारील । वो कुठला शहाणा बा ? ।ऑ। 59 कालपरत्वे बदले स्थिती । जो न बाळगे त्याची क्षिती । रेटित जाय संतांची नीती । शिष्य कसला ? तो भोंदू ।ऑ। 60 जो जे वांछील ते कां मिळते ? । अन्याचीच ओंजळ भरते । माउलीसही माहित नव्हते । वैश्विक अंतिम सत्य हे ।ऑ। 61 परमपूज्य, ‘संभवामि युगेयुगे’ अशी ज्ञानोबा माऊलींनी, पसायदानात, केवळ सद्भावनेपोटी म्हटलं आहे की, ‘ जो जे वांछिल तो तें लाहो’ ! कारण या जगांत अतृप्तेच्छाधीन कोणी असणं हे, त्यांच्या, वात्सल्यानं ओतप्रेत हृदयाला सहन होणंच मुळी अशक्य होतं ! पण वास्तवांत, व्यावहारिक जगतांत हे श्यक्य होईल कां हो ! समजा की, प्रत्येकाला राष्ट्रपती व्हायचंय ! होईल साध्य, की राहील स्वप्न ?। ज़रि अर्पिले तन-मन-धन । जैसे ज्याचे कर्मावगुंठित प्राक्तन । तेचि पदरी पडेल ना ?।ऑ। अरुण काकतकर 9822021521…. भक्तिबोध-15 महनीय व्यक्तींचे समाजकारण संतसाहित्याचा अभ्यास करून, त्यातले, लोकोत्तर व्यक्तीनी सांगून ठेवलेले त्तत्व-सत्व अंतरंगात रुजवून, ते समाजमनाच्या सहजी पचनी पडेल अशा रीतीने निरूपणस्वरूप सांगणे हे खरे तर अनुयायी, शिष्य, महंत कार्यकर्त्यांच कर्तव्य! त्या योगे महनियनांचे समाजकारण सांप्रतकाळी पुढे नणे हे ही त्यांच्याकडून अपेक्षित असते. पण कांही कुशिष्य, प्रवचन-कीर्तनांत, दुःख, वेदना, व्याधींनी त्रस्त भाविकांनी, भाकडकथांचे दाखले देत, गंडे-दोरे, होमहवन यासारखे अनावश्यक उपाय सुचवून, भाबडय़ांचे खिसे रिकामे करीत स्वतःची संपदा वाढविण्याच्या `उद्योगांत’ व्यग्र असतांत. अशा, सावज शोधीत, गावोगावी झोळी घेऊन, केवळ भिक्षेवर निर्वाह करणार्य भोंदूपासून अंतर राखून, सावध राहाणेच इष्ट! उघडुनि जबडा बडबड करिती । भिक्षेद्वारे झोळी भरिती । मेद वाढवुनि चिलिम फुंकिती । मवाली गुंड समकक्ष ।।62।। भरल्यापोटी करि उपदेश । अंधश्रध्देचे फेकुनी पाश । अबालवृध्दांचा `समूळ’ नाश । करि, तो कुशिष्य समजावा ।।63।। ऐसे पुण्यपत्तनी खूप । `चिंचोळ्या’ बोळांत सेविती तूप । लुंग्या लावुनि लपविती `स्व’रूप । सावध ऐशांपासुनी ।। 64 राष्ट्रपती, येक पद । करोनी एकसमयावच्छेद । बाया-बापडय़ा, अबाल-वृध्द । वांछतील जरि, मिळेल कां ? ।। 65 कुणि गफक़ीर, बाबा, मौला । पोटार्थी भरण्या ग़ल्ला । अंधश्रध्देच्या उतरविती हलाला । गांजल्यांच्या नरडय़ांत ।। 66।। म्हणे दासें प्रेतांत । फुंकोनि प्राण केले जिवंत । भाकडकथा ऐशा अविरत । लुंगेसुंगे प्रेरिती ।। 67।। शोधुनि काढा ऐशा नरा । हाती घेउन पैजारा । मार्ग `मोक्षा’चा दावा खरा । मिळूनि तुम्ही सकळजन ।। 68।। अरुण काकतकर 9822021521… मुखपृष्ठ » संपादकीय » भक्तिबोध-16 तो कसला गुरू? सुभूमि आणि उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 05/03/08 जमीन कसदार उत्कृष्ठ आहे, पेरायचे बियाणे सुद्धा अव्वल प्रतीचे आहे. परंतु पाऊसच जर पडला नाही तर पीक उगवणारच नाही. त्याचप्रमाणे सद् गुरू सत् शिष्य दोघेही यथायोग्य असले तरी अध्यात्म निरूपणाची क्रियाच घडली नाही तर ज्ञानसंक्रमण होईल का? ।। दास-वाणी ।। काळ्या आईला पेरणीवेळा । पाणियाचा लागला लळा । म्हणे `येइ माझ्या बाळा । पान्हा कैसा तुजविण ?’ ।। 6।। ऐसी ठेवावी गुरुने धारणा । ज्ञानतृषार्था शिष्य म्हणा । जळनिधी जगति कधि कोणा । अव्हेरतो कां ?।। योग्यता जोखावी गुरुंची । तेथे `आवड-निवड’ त्यांची । तीक्ष्णबुध्दी शिष्योत्तमांची । क्षीणबुध्दी बालकांवर अन्याय ।। भेगाळल्या भुईवर बीज रुजवी । निगराणी करुनि फुलवी, फळवी । झेलण्या वादळ-वारे मार्ग दावी । तोचि कसबी कृषिवलां ।। धरुन हाती हिरा मुळांतला । घासुनि-पुसुनी चमकविला । `वल्गना’ करितो, `मीच घडविला’ । तो कसला गुरू ?।। आजकाल कांही शिक्षणसंस्थांमध्ये, अगदी शिशुवर्गांत चिमुकल्याना प्रवेश देतेवेळीसुध्दा, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा आणि पालकाचा बुध्यांक, चिमुकल्यांच्या ज्ञानग्रहणातली गती, यांचा शोध घेऊन, सराव कसोटय़ांमधून तावून-सुलाखून `योग्य’ ठरल्यासच प्रवेश देण्याची प्रथा पडली आहे. त्या विरोधधात शासनाने कायदे करूनसुध्दा काही संस्था तीच प्रथा अजून रेटत आहेत! अशा रीतीने राजपुत्र आणि एकलव्य असा भेद योग्य आहे कां ! मुळांत हिरा घेऊन त्याला केवळ झळाळी देण्यापेक्षा, खाणींतून खड़े येताच त्यांना पैलू पाडून त्यांचे हिर्यांमध्ये रूपांतर करणे ही अपेक्षा असते सद्गुरूकडून ! अरुण काकतकर 9822021521…. मुखपृष्ठ » संपादकीय » भक्तिबोध-17 यत्न तो देव जाणावा तळघरामधे उदंड द्रव्य । भिंतीमधे घातले द्रव्य । स्तंभी तुळवटी द्रव्य । आपण मधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध – 17/05/21 पूर्वजांनी घराच्या तळघरात, जाड भिंतींच्या पोकळीमधे, खांबामधे आणि तुळई मधे जागोजागी अमाप संपत्ती भावी पिढीसाठी जपून ठेवलीय परंतु हे माहीतच नसल्याने हलाखीत दिवस काढतोय. त्याचप्रमाणे परब्रह्म आपल्या चारी दिशांना कोंदाटले असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. अज्ञानापोटी ओढवून घेतलेले हे पारमार्थिक दारिद्य्रच नव्हे काय ? अवघा निसर्ग धनभारित । जीवमात्र सारा ऋणाइत । आपल्याचि कर्माचे फलित । कु-हाड घाली पायावरी ।। 142।। `ये रे बाळा’ म्हणे काळी आई । परंतु माजली `इमलेशाही’ । वपन करुनी वृक्षवल्ली, वनराई । कुठे फेडतिल ही पापे ? ।। 143।। समोरचे सुवर्णपात्र । अव्हेरित मनुष्यमात्र । कथिला देउनि मानपत्र । डोहाळे जाणा भिकेचे ।। 144।। रापाच्या मिशें वणवे । लाविती कृषिवव अननुभवी नवे । भडकतां अवघे रान पेटवे । विक्राळ पावक ।। अमर्यादित त्याची व्याप्ती । मरुतादी भूते साहाय्य करिती । शमविण्यासि जळनिधी अपुरे ठरती । प्रसंग बांका ठाकतो ।। असा `प्रसंग बांका’ उभा ठाकतो, तेंव्हा अनुभवी शेतकरी, पसरलेली आग विझवण्यासाठी पाणी शिंपडून, शेतीसाठी महत्वाच्या या घटकाचा अपव्यय टाळून, भडकत्या ज्वाळांवर माती टाकून किंवा गोणी किंवा अन्य वस्तूंनी झोडपून त्यावर ताबा मिळवितो. तेंव्हा अनुभवाला वंदन करून त्याची भक्तीच कामी येते. कर्मोत्तरीच अनुभव । तोचि जाणा योग्य `देव’ । त्याचाच जर असला अभाव । तर `शोधेनि गवसेना’ अशी स्थिती ।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-18 झगडणे जगण्यासाठी प्रत्येक क्षण इकडे दृश्य तिकडे देव । मध्ये सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 08/10/66 दृश्य म्हणजे जे इंद्रियांच्याद्वारा समजते, उपभोगता येते ते. निर्गुणाच्या साधनेला लागल्यावर एक एक गोष्ट निरसन करता करता शून्यावस्था प्राप्त होते. यापलीकडे खरा आत्मदेव असतो. साधक अज्ञानाने शून्यावस्थेलाच ब्रह्म मानतो. हे मानणे सुद्धा जिथे संपते ती ब्रह्मस्थिती . इंद्रीया जाणवे तेचि खरे । अदृश्याचे वर्णन, अंदाज सारे । `कालापव्ययी’ व्यर्थ पसारे । निरुद्योगी मांडिती ।ऑ। 145 शिशु, वृध्द, रुग्ण, गर्भवती । कर्मकांडापासून यांना मुक्ती । करिमठ मार्तंडही देती । हे ही नसे थोडके ।ऑ। 146 हृदयस्थ माया-ममतेची निगराणी । सत्य-शिव-सुंदरदर्शने पांपणींत पाणी । `माणुसकी’ धर्माचरणी । हेचि पाळू व्रत ।ऑ। 147 जपू झरा, धरा, तारा । भवतीचा संपन्न निसर्गपिसारा । हव्यास, आक्रोशापरता बरा । उपकारक सर्वदा ।ऑ। 148 जे जे सहजी दिसते । सायास, कष्टेविणा जाणवते । जो कदापीहि न भेटतो तेथे । `देव’ म्हणती भाबडे ।ऑ। तमांतरी क्षीण तेजोरेघ । इतुकेचि असते श्वासाचे जग । `नसलेपणा’चा काढणे माग । मंदबुध्दीलक्षण ।ऑ। जन्मतः पहिल्या श्वासापासून । झगडणे जगण्यासाठी प्रत्येक क्षण । तनि-अधिक बहुतांचे हेच प्राक्तन । वैश्विक हे सत्य असे ।ऑ। सांगा बरं हा अ-दृश्य `देव’ शोधणे, हे कसले कर्मप्राविण्य दर्शवेल ? अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-18 अंधश्रध्देचा वधारतो भाव । लोकशिक्षणाचा अभाव । थोडे बोलोनि समाधान करणे । रागेजोन तरी मन धरणे । मनुष्य वेधींच लावणें । कोणी येक ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। निरूपणकाराने अचूक शब्दात थोडक्यात विषय मांडून श्रोते समाधानी करावेत.सभा गैरशिस्त असल्यास रागवावे परंतु श्रोते उठून जातील एवढे नाही. त्यांना आपल्या बोलण्याने खिळवून हळू हळू परमार्थाकडे वळवावे. प्रास्ताविकी बडबड करिती । बीज भाषण दुर्लक्षिती । लक्षवेधाची `अति’ प्रीती । हौश्यागौशासि सर्वदा ।ऑ। 96 ।ऑ। `हुश्श’, `हाड् हाड्’ वा `वाव्वा’ । निरर्थक अक्षरे, तरि भावा । व्यक्तण्या कौतुक, किळस, कावा । बोलीभाषेंत उपयुक्त ।ऑ। 97 ।ऑ। संत, विद्वान उच्चारता `देव’ । अंधश्रध्देचा वधारतो भाव । लोकशिक्षणाचा अभाव । सदैव दुर्लक्षित ।ऑ। 98।ऑ। योगोयोगोनं, हा भाग लिहिण्याआधी लक्षांत आलं, की कांही दिवसांतच, पंजाबमधे घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यंदाचं पर्व संपन्न होणार आहे. तेंव्हा त्या संदर्भांत सुचलं ते मांडतो आहे. 1977 चं पुण्यांतल वादळी संमेलन मी दूरदर्शनसाठी ध्वनिचित्रमुद्रित केलं होतं. साहित्य`दुर्गा’, शब्दाने, पु. भा. भावे यांच्यांतले तात्विक शब्दयुध्द वगैरे.. यंदा… संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।ऑ। 140 ।ऑ। कांही साहित्य`दुर्वास’। परस्परांचा करिती दुस्वास। घरकुल जरि साहित्य`सहवास’। `वांदरे’ स्थितं ।ऑ। 141।ऑ। फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी। चढती! `समीक्षण्या’ कलाकृती ।ऑ। 142 ।ऑ। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-19 शिस्तीतच उत्क्रांती घडते ।। दास-वाणी ।ऑ। मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 05/03/64 राजहंस पक्षी मानस सरोवरावर आढळतात. ते फक्त मोत्यांचा आहार घेतात अशी कवीकल्पना आहे. राजहंसाच्या कळपात त्यांच्यासारखाच काळया रंगाचा एक डोमकावळा घुसला. विष्ठेचा गोळा दिसतांच झडप घातली अन् त्याचे नकलीपण सिद्ध झाले. शिष्य म्हणून सगळेच सारखे दिसले तरी विषय प्रलोभने समोर येताच अनधिकारी शिष्य लगेच उघडा पडतो. दासांचा ही ओवी मी वाचली. त्याचे निरूपणही वाचले. कुशिष्य जोखण्यासाठी दिलेला दाखला, दृष्टांतही ध्यानांत घेतला पण पटला नाही. जगातल्या सर्वच प्राणिमात्रांची, अनंत अवकाशातल्या अगणित तारकापुंजापैकी एकांतवास, एक सूर्य, त्याची ग्रहमाला, त्यांच्या अनेक ग्रहांपैकी पृथ्वीवरच्या, अगदी एकपेशीयां पासून मानवापर्यंतची, निर्मिती, उत्क्रांती, प्रगती निसर्गानेच केली आहे. जिथे जळ आणि कर्ब आहेत तिथेच हे घडू शकतं किंवा ते दोन घटक अत्यावश्यक असतात हे एक विज्ञानसिध्द सत्य आहे. निसर्गानंच त्यांची जीवन पध्दती, गर्जा, आयुष्यमान हे आखून दिलं आहे. ज्या जीवांनी ती शिस्त पाळली ते उत्क्रांत होत गेले. अनेक प्रजाती त्या अभावी नष्ट झाल्या. वाचलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला, क्षुधाशांतीसाठी काय भक्षण करावं ? तृष्णा शमनार्थ काय शोषून ? मुखातून, नासिकेंतून की त्वचेद्वारे ? ते सुध्दा निसर्गानच नेमस्त केलं आहे. कावळा, गिधाड , सूकर यांच्याकडून,उच्चवर्णीय प्रणिमात्रांचे उत्सर्जितअन्न भक्षून पर्यावरणशुध्दीचे कार्य अपेक्षित आहे. त्यामुळं, जो `शकून गे सांगे’ त्या `सोन्याने मढविन पाऊ’ अशी योग्यताप्राप्त ‘काऊ’ चा दृष्टांत दासांनी, कोणाची कमतरता दाखविण्यासाठी करावा, याचं नवल वाटलं नी खंत सुध्दा- कधी काकांचा येई कळप । `भक्षिन’ म्हणे तुमचे पाप । मग `गति’ आपोआप । मिळेल आम्हा पहा तुम्ही ।। 7।। अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-19 अध्यात्माचा श्रीगणेशा जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। जो संतांना, सद् गुरुला मनापासून संपूर्ण शरण गेला. त्याची खात्री पटल्यावर संतानी आश्वस्त होवून ज्याला जवळ केला आणि अध्यात्माचा श्रीगणेशा घालून दिला तो साधक अशी व्याख्या ग्रंथांमधे आढळते. साधकलक्षण समास. पण माझ्या व्यवसायांतून भेटले, त्या सद्यकालीन, संत सदृशांनी जे दिलं ते म्हणजेः स्वर-शब्द-भाव संतांनी । आम्हा आश्वस्त करोनी । शुध्द केली क़रणी वाणी । नियमितपणे ।ऑ। 8 भगवी छाटी अंगांत, किंवा नुसती लंगोटी, खांद्यावर झोळी, हातांत कमंडलू, वाढलेल्या जटा आणि दाढी, अंगालाए उष्णता किंवा थंडी यापासून रक्षण करण्यासाठी फासलेली रक्षा, असा वेश म्हणजे कुणीतरी साधू, हटयोगी तापस, ज्यांनी,` याच्या आवडी संसार त्यजिला’ (ज्ञानोब्बां माउलींच्या अभंगातील चरण), टाळलाच असा संत अशी सर्वसाधारण धारणा असे. पण त्याच काळांत, संत तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी, गोराकुंभार यांनी संसाराचा गाडा ओढत, अनुभवांतून आलेलं शहाणपण इतरेजनांना ओव्या, अभंग सांगत, एकतारी छेडत, गांत, सत्कृत्यबळे संतपद प्राप्त केलं. या सत्पुरुष/स्रियांच अक्षरसाहित्य वाचतच माझी पिढी जोपासली गेली. पण गाडगेबाबा, ज्यांना मी `खरे’ संत मानतो, त्यांच्या शिकवणीचा पगडा मनांत ठसला. कारण त्यानी शिणणाचं महत्त्व जाणून, `गोपाळा गोपाळा, देवकिनंदन गोपाळा’, हो भजन केवळ जनसमुदाय एकत्र करण्यासाठी केलं. पण सांगीतलं काय ? ‘ भाकरी हातावर घेऊन खा ! ताट-वाटय़ा इका ! पण पोरा-बाळाले शिकवा बाप्पा.. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाई बरं जगायले..” आणि हे ते कुठं जाऊन सांगायचे? तर पंढरपुरच्या विठ्ठलनंदिराच्या द्वारांत ! `आंत इट्टल बिट्टल कुणी नाईबाप्पा.. थितं हाय नुस्ता फत्तर.. !’ केवढ धाडस, आत्म विश्वास ! पण, दूरदर्शनवर मला आधुनिक अक्षरसाहित्यसंतांच्या मादियाळींत, त्या नक्षत्रसरितेंच्या प्रवाहाच्या मधोमध नेऊन ठेवलं.त्यांनी काय `संस्कार’ दिले तें पुढच्या भागांत बघू! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-20 नको ऐहिकाचा आता व्यर्थ बडिवार `नको जनन मरण आता, नको येरझार, नको ऐहिकाचा आता व्यर्थ बडिवार’ म्हणणारे `बाकीबाब’ पोएट् बोरकर, `कशि तुज समजाउ सांग ? का भामिनि धरिशि राग’ या रचनेत, भामिनि हे, संस्कृतोद्भव विशेषण वापरतांत. `मोकाट वारियांनो, थोडे मुकाट व्हारे!’ किंवा ‘माझ्या दूरस्थ लाडक्यांनो’ या रचनेत, तुमच्या आंतडय़ांतून इतके ऍसिड स्रवूदे की, व्यसनांचे पोलादात आकडे त्यात विरघळून, तुमच्याशी चाळे करणार्या `पंण्यांगणेची पुण्यांगना’ होऊन जाईल’ अशा, `आ’ कार, `उ’कार, `ओ’ कार एकाच व्यंजनाला, वेगवेगळ्याप्रकारे जोडून, दोन भिन्न टोकांचे अर्थ व्यक्त करीत असत. हे मला सहवास लाभलेले, ऐहिक सुखाचा परमोच्च आनंद घेत, कविता गाणारे, माझे गुरु! `उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ म्हणतानाच, `केव्हातरी पहाटे, उलटूनि रात्र गेली असं म्हणतात, `गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे’ म्हणत, `आज गोकुळांत रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ असं, प्रेमिकेला सावधही करतांत’ ते कविश्रेष्ठ सुरेश भट. `मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ म्हणतानाच `सर्वात्मका सर्वेश्वरा’ अशी प्रार्थना ज्यांच्या मनांत उमलून, लेखणीतून उतरते ते कविवर्य `कुसुमाग्रज’ तथा विष्णु वामन शिरवाडकर, हे माझे अक्षर गुरु! `असेन मी, नसेन मी, परी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या तरी हसेल गीत हे’ असे सांगतानाच, `तोच चंद्रमा नभांत, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तूही कामिनी’ या गीताचा आधार, जो मूळ संस्कृत श्लोक, अस्खलितपणे उद्धृत करणार्या शांताबाई, ह्या माझ्या गुरु! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 कल्पना, बीजरूपी कवित्व । `भय इथले संपत नाही’ हे वैश्विक सत्य साध्या सोप्या ओळींत सहज सांगत, ‘ ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता… ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो’ अशी स्वतःची शोकमग्न अवस्था सांगणारे, ‘ग्रेस’ तथा माणिक गोडघाटे, ‘तान्हुल हसत असतं तेंव्हा सर्वांच असतं, पण रडतांना ते फक्त मायमाउलीचंच असतं’ हे आणखी एक वैश्विक सत्य सांगणारी, माझ्या व्यवसायान्निमित्त भेटलेली एक सर्वसामान्य माता,ह्या सर्वांचा सहवास मिळण्याचं किंवा संपर्कांत येण्याचं भाग्य मला `दूरदर्शन’नं दिलं! कोणी मातृभक्ती, तर कोणी मधुरा भक्ती; कोणी राष्ट्रभक्ती तर कोणी, भानावर आणणारी जीवनदृष्टी शिकविली! संतांनी यापेक्षा वेगळं काय सांगीतलं? म्हणून हे, संन्यास न घेतां, दाढय़ा-मिशांची जंजाळं न वाढवता, आधी स्वतःला नी मग सुखी सांसारिकाला `अध्यात्मा’चं व्यसन लावत, त्याच्याही खांद्यावर भिक्षेसाठी झोळी न अडकवणारे `अ’क्षरसाहित्यकार माझे गुरूच मानतो मी । `संत’ या विशेषणाला योग्य… कल्पना, बीजरूपी कवित्व । त्याचीच निर्मिती `देवत्व’ । `नसलेपणास’ अस्तित्व । देती कवी ।। 326।। अंतरंगी हरेकास होते प्राप्ती । अनुभवसमृध्दिची व्याप्ती। व्यक्त करण्या अल्पाक्षरी क्लृप्ती । अवगत असते कवीस ।। 327।। विश्रामाच्या क्षणी कधी । थोडा शोधून त्यांत अवधी । देहधार्यांच्या व्यथा, व्याधी । जाणा कवित्व वेदनांचे ।। 329।। कवित्व म्हणजे स्वप्न पाहाणे?। कवित्व म्हणजे दिव्य लेणे ?। कवित्व म्हणजे प्रतिबिंबापल्याडचे जोखणे ?। व्याख्या उलगडा !।। 330।। सामान्य पाहातो स्वप्ने। सामान्य जाणतो मरण्यांत जगणे । सामान्यास सुख-दुःख, संसारलेणे । मातीतला कवि-प्रतिनिधी ।। 331।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-19 शिस्तीतच उत्क्रांती घडते ।। दास-वाणी ।ऑ। मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 05/03/64 राजहंस पक्षी मानस सरोवरावर आढळतात. ते फक्त मोत्यांचा आहार घेतात अशी कवीकल्पना आहे. राजहंसाच्या कळपात त्यांच्यासारखाच काळया रंगाचा एक डोमकावळा घुसला. विष्ठेचा गोळा दिसतांच झडप घातली अन् त्याचे नकलीपण सिद्ध झाले. शिष्य म्हणून सगळेच सारखे दिसले तरी विषय प्रलोभने समोर येताच अनधिकारी शिष्य लगेच उघडा पडतो. दासांचा ही ओवी मी वाचली. त्याचे निरूपणही वाचले. कुशिष्य जोखण्यासाठी दिलेला दाखला, दृष्टांतही ध्यानांत घेतला पण पटला नाही. जगातल्या सर्वच प्राणिमात्रांची, अनंत अवकाशातल्या अगणित तारकापुंजापैकी एकांतवास, एक सूर्य, त्याची ग्रहमाला, त्यांच्या अनेक ग्रहांपैकी पृथ्वीवरच्या, अगदी एकपेशीयां पासून मानवापर्यंतची, निर्मिती, उत्क्रांती, प्रगती निसर्गानेच केली आहे. जिथे जळ आणि कर्ब आहेत तिथेच हे घडू शकतं किंवा ते दोन घटक अत्यावश्यक असतात हे एक विज्ञानसिध्द सत्य आहे. निसर्गानंच त्यांची जीवन पध्दती, गर्जा, आयुष्यमान हे आखून दिलं आहे. ज्या जीवांनी ती शिस्त पाळली ते उत्क्रांत होत गेले. अनेक प्रजाती त्या अभावी नष्ट झाल्या. वाचलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला, क्षुधाशांतीसाठी काय भक्षण करावं ? तृष्णा शमनार्थ काय शोषून ? मुखातून, नासिकेंतून की त्वचेद्वारे ? ते सुध्दा निसर्गानच नेमस्त केलं आहे. कावळा, गिधाड , सूकर यांच्याकडून,उच्चवर्णीय प्रणिमात्रांचे उत्सर्जितअन्न भक्षून पर्यावरणशुध्दीचे कार्य अपेक्षित आहे. त्यामुळं, जो `शकून गे सांगे’ त्या `सोन्याने मढविन पाऊ’ अशी योग्यताप्राप्त ‘काऊ’ चा दृष्टांत दासांनी, कोणाची कमतरता दाखविण्यासाठी करावा, याचं नवल वाटलं नी खंत सुध्दा- कधी काकांचा येई कळप । `भक्षिन’ म्हणे तुमचे पाप । मग `गति’ आपोआप । मिळेल आम्हा पहा तुम्ही ।। 7।। अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-19 अध्यात्माचा श्रीगणेशा जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। जो संतांना, सद् गुरुला मनापासून संपूर्ण शरण गेला. त्याची खात्री पटल्यावर संतानी आश्वस्त होवून ज्याला जवळ केला आणि अध्यात्माचा श्रीगणेशा घालून दिला तो साधक अशी व्याख्या ग्रंथांमधे आढळते. साधकलक्षण समास. पण माझ्या व्यवसायांतून भेटले, त्या सद्यकालीन, संत सदृशांनी जे दिलं ते म्हणजेः स्वर-शब्द-भाव संतांनी । आम्हा आश्वस्त करोनी । शुध्द केली क़रणी वाणी । नियमितपणे ।ऑ। 8 भगवी छाटी अंगांत, किंवा नुसती लंगोटी, खांद्यावर झोळी, हातांत कमंडलू, वाढलेल्या जटा आणि दाढी, अंगालाए उष्णता किंवा थंडी यापासून रक्षण करण्यासाठी फासलेली रक्षा, असा वेश म्हणजे कुणीतरी साधू, हटयोगी तापस, ज्यांनी,` याच्या आवडी संसार त्यजिला’ (ज्ञानोब्बां माउलींच्या अभंगातील चरण), टाळलाच असा संत अशी सर्वसाधारण धारणा असे. पण त्याच काळांत, संत तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी, गोराकुंभार यांनी संसाराचा गाडा ओढत, अनुभवांतून आलेलं शहाणपण इतरेजनांना ओव्या, अभंग सांगत, एकतारी छेडत, गांत, सत्कृत्यबळे संतपद प्राप्त केलं. या सत्पुरुष/स्रियांच अक्षरसाहित्य वाचतच माझी पिढी जोपासली गेली. पण गाडगेबाबा, ज्यांना मी `खरे’ संत मानतो, त्यांच्या शिकवणीचा पगडा मनांत ठसला. कारण त्यानी शिणणाचं महत्त्व जाणून, `गोपाळा गोपाळा, देवकिनंदन गोपाळा’, हो भजन केवळ जनसमुदाय एकत्र करण्यासाठी केलं. पण सांगीतलं काय ? ‘ भाकरी हातावर घेऊन खा ! ताट-वाटय़ा इका ! पण पोरा-बाळाले शिकवा बाप्पा.. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाई बरं जगायले..” आणि हे ते कुठं जाऊन सांगायचे? तर पंढरपुरच्या विठ्ठलनंदिराच्या द्वारांत ! `आंत इट्टल बिट्टल कुणी नाईबाप्पा.. थितं हाय नुस्ता फत्तर.. !’ केवढ धाडस, आत्म विश्वास ! पण, दूरदर्शनवर मला आधुनिक अक्षरसाहित्यसंतांच्या मादियाळींत, त्या नक्षत्रसरितेंच्या प्रवाहाच्या मधोमध नेऊन ठेवलं.त्यांनी काय `संस्कार’ दिले तें पुढच्या भागांत बघू! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-20 नको ऐहिकाचा आता व्यर्थ बडिवार `नको जनन मरण आता, नको येरझार, नको ऐहिकाचा आता व्यर्थ बडिवार’ म्हणणारे `बाकीबाब’ पोएट् बोरकर, `कशि तुज समजाउ सांग ? का भामिनि धरिशि राग’ या रचनेत, भामिनि हे, संस्कृतोद्भव विशेषण वापरतांत. `मोकाट वारियांनो, थोडे मुकाट व्हारे!’ किंवा ‘माझ्या दूरस्थ लाडक्यांनो’ या रचनेत, तुमच्या आंतडय़ांतून इतके ऍसिड स्रवूदे की, व्यसनांचे पोलादात आकडे त्यात विरघळून, तुमच्याशी चाळे करणार्या `पंण्यांगणेची पुण्यांगना’ होऊन जाईल’ अशा, `आ’ कार, `उ’कार, `ओ’ कार एकाच व्यंजनाला, वेगवेगळ्याप्रकारे जोडून, दोन भिन्न टोकांचे अर्थ व्यक्त करीत असत. हे मला सहवास लाभलेले, ऐहिक सुखाचा परमोच्च आनंद घेत, कविता गाणारे, माझे गुरु! `उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’ म्हणतानाच, `केव्हातरी पहाटे, उलटूनि रात्र गेली असं म्हणतात, `गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे’ म्हणत, `आज गोकुळांत रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ असं, प्रेमिकेला सावधही करतांत’ ते कविश्रेष्ठ सुरेश भट. `मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ म्हणतानाच `सर्वात्मका सर्वेश्वरा’ अशी प्रार्थना ज्यांच्या मनांत उमलून, लेखणीतून उतरते ते कविवर्य `कुसुमाग्रज’ तथा विष्णु वामन शिरवाडकर, हे माझे अक्षर गुरु! `असेन मी, नसेन मी, परी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या तरी हसेल गीत हे’ असे सांगतानाच, `तोच चंद्रमा नभांत, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तूही कामिनी’ या गीताचा आधार, जो मूळ संस्कृत श्लोक, अस्खलितपणे उद्धृत करणार्या शांताबाई, ह्या माझ्या गुरु! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 कल्पना, बीजरूपी कवित्व । `भय इथले संपत नाही’ हे वैश्विक सत्य साध्या सोप्या ओळींत सहज सांगत, ‘ ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता… ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो’ अशी स्वतःची शोकमग्न अवस्था सांगणारे, ‘ग्रेस’ तथा माणिक गोडघाटे, ‘तान्हुल हसत असतं तेंव्हा सर्वांच असतं, पण रडतांना ते फक्त मायमाउलीचंच असतं’ हे आणखी एक वैश्विक सत्य सांगणारी, माझ्या व्यवसायान्निमित्त भेटलेली एक सर्वसामान्य माता,ह्या सर्वांचा सहवास मिळण्याचं किंवा संपर्कांत येण्याचं भाग्य मला `दूरदर्शन’नं दिलं! कोणी मातृभक्ती, तर कोणी मधुरा भक्ती; कोणी राष्ट्रभक्ती तर कोणी, भानावर आणणारी जीवनदृष्टी शिकविली! संतांनी यापेक्षा वेगळं काय सांगीतलं? म्हणून हे, संन्यास न घेतां, दाढय़ा-मिशांची जंजाळं न वाढवता, आधी स्वतःला नी मग सुखी सांसारिकाला `अध्यात्मा’चं व्यसन लावत, त्याच्याही खांद्यावर भिक्षेसाठी झोळी न अडकवणारे `अ’क्षरसाहित्यकार माझे गुरूच मानतो मी । `संत’ या विशेषणाला योग्य… कल्पना, बीजरूपी कवित्व । त्याचीच निर्मिती `देवत्व’ । `नसलेपणास’ अस्तित्व । देती कवी ।। 326।। अंतरंगी हरेकास होते प्राप्ती । अनुभवसमृध्दिची व्याप्ती। व्यक्त करण्या अल्पाक्षरी क्लृप्ती । अवगत असते कवीस ।। 327।। विश्रामाच्या क्षणी कधी । थोडा शोधून त्यांत अवधी । देहधार्यांच्या व्यथा, व्याधी । जाणा कवित्व वेदनांचे ।। 329।। कवित्व म्हणजे स्वप्न पाहाणे?। कवित्व म्हणजे दिव्य लेणे ?। कवित्व म्हणजे प्रतिबिंबापल्याडचे जोखणे ?। व्याख्या उलगडा !।। 330।। सामान्य पाहातो स्वप्ने। सामान्य जाणतो मरण्यांत जगणे । सामान्यास सुख-दुःख, संसारलेणे । मातीतला कवि-प्रतिनिधी ।। 331।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 आत्मनिवेदन भक्ती सर्वश्रेष्ठ भक्तिबद्दल दास म्हणतांत की, जेथून हें सर्वही प्रगटे । आणी सकळही जेंथें आटे । तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। सर्व चराचर सृष्टी आणि ब्रह्मांडे जेथून निर्माण होतात आणि प्रलयाअन्ती ज्यात विलीन होऊन जातात, त्या परब्रह्माचे ज्ञान एकदा प्राप्त झाले की मी, माझा देह, माझे लोक, माझी संपत्ती अशा सर्व बंधनांपासून मनुष्य मुक्त होतो. ही आत्मनिवेदन भक्ती. सर्वश्रेष्ठ भक्ती ! ।ऑ। दास-वाणी ।ऑ। पण वाचतांना मनांत विचार आला, शंका-कुशांकांचे मोघ कल्पनेच्या नभांगणांत दाटून आले ! वाटलं माता-पित्यांनी जन्माला घालून, लाडाकोडानं पालन-पोषण करून, संस्कार, शिक्षण देऊन, कर्म-कर्तव्यांची जाणीव गुरुजनांद्वारे दोऊन, या भवसागरांत तरूनजाण्यायोग्य व्यक्तिमत्वाला आकार दिला. ज्या समाजांत आपण राहातो, त्याच्या रीतीरिवाजाप्रमाणं, विवाहयोग्य वय होतांच, आप्तस्वकीयांच्या सल्ल्यानं, आणि वधूची निवड झाल्यावर, परस्परांच्या सहमतींनं विवाहोत्तर गृहस्थाश्रमांत प्रवेश केला. त्या योगे अनेक नवी नाती जोडली. आणि आंता, जीवितोत्तर विश्वाच्या भ्रामक कल्पनांचा विचार करीत, अंधारांत चांचपडत, ती ‘ज्ञानशलाका’ कोठे भेटेल ते शोधत, आपल्यावर अवलंबित कुटुंबाची हेळसांड करीत, कर्मयोगाचा छेद देत, सर्वश्रेष्ठ भक्तयोग वगैरे साधण्याचा प्रयत्न करण्यांत महत्वाचे वर्ष वाया घालवायची, यांत पुरुषार्थ तो कोणता? आणि विचार ओविबध्द झालेः मियें उभारला संसार । कसा म्हणू आतां असार ? भक्ती-पूजन-भजन-उक्ती निरंतर । होई उदरभरणा कैची ? ।ऑ। 4 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 `त्या’च्या वाटेकडे डोळे लावून बसलेली `राज्ञी’ मागील भागांत मी उल्लेखिलेल्या संतांच्या प्रतिनिधींमधे, गोरा कुंभार, सावता माळी, कबीर, या सर्वसामान्य परिस्थितींतील व्यावसायिकांबरोबरच राजराणी मीराबाईंचासुध्दा अंतर्भाव करणं आवश्यक आहे. आपला व्यवसाय, व्यापार उदीम, कसबकारी करीत असतांना त्यांच्या ओठांतून सहजस्फूर्त उच्चारिल्या गेलेल्या, किंवा कधीकधी हेतुपुरःसर आर्ततेनं आळवलेल्या पंक्तींना, त्यांत विठ्ठल, राम, कृष्ण इत्यादि, जनतेनं `देव’त्व बहाल केलेल्या विशेषनामांचा उल्लेख असल्यामुळं, संत साहित्य, अभंग, बहुलवाणी किंवा ज्याला बाळासाहेब मंगेशकरांनी `फक्कड’, -फकीर गात असतो म्हणून- नामाभिधान केलंय, तो बहुमान मिळाला. या सर्वांनी आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळीत, जनाबाईसारख्या विवाहितेनं गृहकृत्यदक्षपणे, सांसारिक जबाबदार्या ‘भक्ति’भावानं सांभाळीत, कान्होपात्रेनं त्या काळांतल्या गावकीचा, जनरंजनासाठी आवश्यक, अविभाज्य पण हिणकस, ओवळा मानला गेलेला, नायकिणीचा व्यवसाय करीत, आपल्या श्रध्देयाची स्तुती करणार्या विविध घाटांच्या, अल्पाक्षरी रचना केल्या. कुंभार, माळी, विणकर, तेली । अनंत भाषा, विविध बोली । ‘उक्ति’वल्लि उमलत गेली । उन्मनावस्थी, ‘इटु’ कारणे ।ऑ। 343 कोणीच नव्हते ‘पदसिध्द’ संत । कष्टकरी, संसारी कार्यरत । शब्द, सहज आले ओठांत । कौतुकास्तव ‘त्या’च्या ।ऑ। 344 `मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरा न कोई’ किंवा, `माई री, मैं कांसे कहूं ? अपने पियाकी’, अशी आर्त, कळवळती पृच्छा करीत , `त्या’च्या वाटेकडे डोळे लावून बसलेली `राज्ञी’ मीरा, कंटाळून, अखेरीस राजवाडा सोडून, एकतारीवर गात, शोध घेत वृंदावनात गेली, नंतर वाळवंटात, एकतारासुध्दा जड़ झाल्यामुळं, तसाच सोडून पुढे पुढे जात राहिली, अखेरच्या श्वासापर्यंत. ‘कांदा, मुळांत भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणत, सावतामाळ्यानं, आपल्या कृषिउत्पादनांनाच, ‘देव’त्व प्राप्त करून दिलं… या सगळ्या ‘संत’पदप्राप्त व्यक्तींनी, आपली रचना, ऐकणार्या, वाचणार्यांना कळावी, म्हणून रचनेच्या अखेरीस, स्वतःच्या ‘नाममुद्रेची’ योजना केली.. जसं, ‘मीरा कहे’, ‘कहे कबीरा’, ‘जनी म्हणे’, ‘नामा म्हणे’ वगैरे… जी सद्यकालीन अक्षरसाहित्य संतांनी केलेले सहसा आढळत नाही. अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-19 हां सत सत्कर्म करोनि कृतार्थ झाला । कोण ‘संत’ म्हणोनि अवतारिला ?। अनुभवाने सुविचारी वचने बोलु लागला । हां सत सत्कर्म करोनि कृतार्थ झाला । ‘हा संत’ म्हणति सामान्य जन ।ऑ। 377 त्याला कुठे, कधी कां भेटला ‘देव’ ?। वाढला, जगला कटु-गोड घेत अनुभव । निगळुनि ! तरि अमृत शब्द-स्वर-भाव । बोलला, वागला तो ‘संत’ ।ऑ। 378 उदाहरणार्थ वात्सल्यमूर्ती सानेगुरुजी.. प्रथमतः,मागील एका भागांत, मजकडून अनवधानान् घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागतो. ‘कैवल्याच्या चांदण्याला, भुकेला चकोर’ या रचनेचे गीतकार आहेंत, अशोकजी परांजपे. मी त्यांतल्या पंक्ती उधड़ते करून, त्याच श्रेय ‘बाकीबाब’ बोरकरांना दिलं होतं. क्षमस्व ! महाराष्ट्रांतल्या आणि अन्य कांही प्रदेशांतल्या. ‘संत’पदप्राप्त, ‘सांसारिकांचा, त्यांच्या, सहजस्फूर्त रचनांच्या स्मृतींत आपण रमलो. ‘संत’पण उरांत सद्भावनारूपानं, जन्मतःच प्रविष्ट झालेलं असतं. फक्त ते उक्तींत, कृतींत उतरून समजावा अवगत होण्यासाठी, सत्कृत्यांच्या चंदनांचा मंद परिमळ, जनसामान्यांपर्यंत पोहोचायला कांही काळ जावा लागतों. महिनोंमहिने, वर्षानुवर्षे, युगानुयुगे अशी सत्कृत्ये घडत गेली आहेंत आणि घडविते ‘संत’पदधारक ठरले आहेंत. मग थोडी संतपदाची व्याख्या जाणीव घ्यावा, असं वाटलं ! सकारात्मक, रचनात्मक देइ विचार । विशुध्द समृध्दीचे निर्देशितो द्वार । लावितो विवेके जगण्या सारासार । मार्गप्रदीप ‘संत’ जाणा ।ऑ। 379 उक्ती-कृतींत समाधानि घरी संसारी । झोळी घेउनि न ठाकितो परक्या द्वारी । पालकत्व आप्तांचे स्वीकारी । रयतेला नकळत उध्दरी, ‘संत’ ।ऑ। 380 उदाहरणार्थ गाडगेबाबा, तुकडोजी, विनोबा भावे… मनस्वी, सहृदय सेवाभावधारी । वेदना पाहून होतो व्यथित उरी । उपकारक कृतींस कार्यप्रवण करी । स्वतः ! तो ‘संत’ ।ऑ। 381 वेदनामुक्त ज्यांस त्याने केले । ओठावरी त्यांच्या स्मित पेरिले । उपजत मायेने उराशी धरिले । ते ‘बाबा’ म्हणती स्वयंस्फूरतीने ।ऑ। 382 मूलस्रोत माया, ममता, वात्सल्य प्रीतीचे । उर्जाबल ‘कर्म’कारी, मधुराभक्तिचे। अ’धर्म’गर्भी धर्मकांड निराकरणाचे । कृतिपाठ देई तो ‘संत’ ।ऑ। 383 आणि अगदी अलिकडचे बाबा आमटे.. हे खरें संत नव्हेंत कां ? अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-19 सगुणभक्ती कधीच सोडू नये, अगदी देह सुटेपर्यंत! ।ऑ। दास-वाणी ।ऑ। त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरितां जाले ज्ञान । तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल की ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 06/07/22 आमच्या कुळामध्ये श्री रघुनाथाची उपासना आहे. त्या रामरायाचे आम्ही पिढयानपिढया सेवक आहोत. आजवर केलेल्या दास्यभक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त झालंय. आता जर अभिमानापोटी ही उपासना सेवा मधेच सोडली तर साधकाचे अधःपतन निश्चित आहे. सगुणभक्ती कधीच सोडू नये, अगदी देह सुटेपर्यंत ! राम होता मानव । नाही झाला कधीच `देव’ । वर्तनि ठेविला आदर्शभाव । म्हणोनि त्यासि स्मरावे ।ऑ। 11 रामाचं `मनुष्य’पण समजावून घेण्यासाठी, वक्तदशसहस्रेषु प्राचार्य राम शेवाळकरांचं, 1979 मधे नाशिकच्या एका व्याख्यानमालेतलं भाषण ऐकायला हवं जनसामान्यांनी. राम होता ना देव ?। मग चंद्रप्राप्ती कां झाली असंभव ?। कौसल्या मायेची धाव । झाली प्रतिबिंबित ।ऑ। 267 म्हणे होता बालहट्ट । वसतो जो `बिंदू’ पासुनि सिंधूंत । बाल, युवा वा जर्जराशक्त । `देव’ कसा असेल हो ?।ऑ। 268 केवळ म्हणे पदस्पर्शबळे । शीळेंतुन अहल्येस मुक्त केले । मग स्वपत्नीस कां धाडिले । वनांत ? ।ऑ। संकटे झेलीत राज्ञी सीता । परपाशांतुन सोडवुनि आणिता । झाला राम आज्ञा करिता । अग्निदिव्याची ।ऑ। 270 राम अयोध्येचा राजा होता. राजाला वैयक्तिक सुख-दुःख नसतात. त्याला जनतेपुढे आदर्श ठेवायचे असतात. नाहीतर लोकक्षोभ होतो. त्यामुळे, सीतेच्या चारित्र्यावर एका नागरिकाने व्यक्त केलेल्या संशयामुळे त्याने प्रिय पत्नीचा त्याग केला. नंतर सप्ताहभर अंतःपुरांत, दोन्ही गुडघ्यांवर चेहेरा लपवून, अश्रूपात करीत, बसून शोक केला तेव्हा भरताने त्याची, कर्तव्यच्युत झाल्याबद्दल निर्भर्त्सना केली. प्रष्नांची उत्तरं रामचरितातं । उत्तरे सारी मिळतांत । आणि सिध्द करतांत । `मनुष्य’पण रामाचे ।ऑ। विरंगुळा कथेचा रयतें । करमणूक आयती होते । परस्पर `कार्य’ सिध्दीस जाते । भाकड भाटांचे ।ऑ। 269 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-19 परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद्गुरू भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद् गुरू जाणावा ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 05/02/11 भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. गो म्हणजे गाय परब्रह्माचे प्रतीक. वत्स म्हणजे संसारात अडकलेला जीव. प्रपंचरूपी वाघाने मनुष्यावर उडी घालून त्याची परमेश्वरापासून केलेली ताटातूट जो थांबवतो आणि जीवब्रह्माचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करतो तो सद्गुरू ! थोडक्यात सामान्य प्रापंचिकाला जो परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद्गुरू होय. हे झालं तत्कालीन परिस्थितीला अनुसरून केलेले निरूपण. पण आज कष्टकरी प्रापंचिक म्हणतोः कां करता बा ताटातुट । ब्रह्मभेटी साठी आटापिट । सुखदुःखांशी भव भेट । होता आम्ही समाधानी ।ऑ। 327 नका होवू कल्याणकारी । तोडून आम्हा विविधपरी । जिवाभावाच्या संसारी । पोरके करण्या सरसावू नका ।ऑ। 328 नका होवू कराल दैत्य । तुम्हा जरी `ब्रह्म’ सत्य । ना संसार, आप्त, अपत्य । म्हणोनि हेवा करू नका ।ऑ। 329 तरुणहो वेळच्या वेळी । भोगसुखे, मिळवा सगळी । काळ पळतो न देता हाळी । अन्यथा उरते विदग्धता ।ऑ। 330 ग्रंथ वाचणे, अभ्यासणे । आशयांत न गुंतोनि जाणे । रुचेल, रुजेल ऐसे निवडणे । श्रेयस्कर ।ऑ। 331 निरुद्योग्यांशी अध्यात्म । भजनि लागा सोडोनि काम । नसल्या `देव’ `मोक्षा’चा नित्यनेम । व्यसनांचे हे व्यपारी ।ऑ। 332 म्हणती ठेवा दक्षिणा । फळे-फुले मिष्टान्न आणा । मग दावीन चमत्कार नाना । ऐसे लोभी हे `महाराज’ ।ऑ। 333 सावध राहा ऐशांपासुनी । लाथाडा फोलपट त्याची वाणी। उधळा, जाळा काळी करणी । म्हणा, ` जा मोक्षाप्रती !’ ।ऑ। 334 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-20 पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 04/09/24 पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वतःचे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।ऑ। 152 खरंतर पंचमहाभूतच केवळ ज्ञानेंद्रियांना जाणवतांच. आणि त्यांच महत्व जाणून घ्यायचं असेल तर एक प्रयोग करा, अगदी मनांतल्या मनांत ! जर एकेका महाभूताची कांहीकाळ अनुपस्थिती झाली तर कार्यकाल होईल याचा अंदाज घ्या. जळ नाही तर कंठशोष, सुपीक माती व्याकूळ, वायू नाही तर परागवहनापासून, वायुयानाला आवश्यक हवेचेउर्ध्वगामी ऊष्णप्रवाह खंडित. तेजनाही तर अंधाराचा साम्राज्य विस्तारून हिमयुग येईल. अवकाश नाही तर आकाशगंगेचे, तारकापुंज, सूर्यमाला, पर्यायाने अवनीसह ग्रहमाला नाही. आणि पृथ्वी नाही तर उत्क्रांत जीवजंतू, अगदी आतां आपण डेलियाकडे करायलासुध्दा आपण स्वतःःच नाही. ही फक्त वानगीदाखल कांही उदाहरणे ! पण म्हणूनच, यांच्या अस्तित्वाला कांहीतरी विशेष नाम हवं ते ‘जगदीश’ असं ऋषी-मिनिट-तत्ववेत्यांनी ठरलं असांवं ! म्हणून पंचमहाभूतांची, अस्तित्वासाठी प्रार्थना आवश्यकः कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती। भीती भारते अंतर ।ऑ। 153 पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखदःखा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी। आपणची जाणा ।ऑ। 154 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 कोणी टिपिले ‘त्याला’ नजरेने ?। एक अगणित लांबीची लेखणी आणि अगणित, कधीच न संपणारी शाई घ्या. समोर वृध्दिंगत होणारं वलय, अखंडपणे रेखीत राहा. कांही काळानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्या वलयाच्या केंद्रस्थानी आहात. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. अशीच रचना आपल्या धमन्यांमधून वाहाणार्या रक्ताच्या थेंबांत असते. `पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणतात तेच हे तत्वः अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंद्रस्थानि कोण ?। आकळेना ।ऑ। 155 ऐसी कोठली अवजड `ज्ञान’मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । `भीक्षांदेहि’ देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।ऑ। 156 सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या `नामे’ साधते ।ऑ। 143 `नाम’ घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।ऑ। 144 अरे, संकटांनी, समोर दिसत, वावरत असलेले आप्तस्वकीयसुध्दा या ना त्या कारणावरून पळ काढतात. मग जो कधी दिसला-जाणवलात नाही त्याचे कुणीतरी परंपरेने उच्चारलेले नामस्मरण करून, धावा करून कसा येईल `तो’ जो नाहीच… अमुक-तमुक म्हणे केले `त्याने’ । कोणी टिपिले `त्याला’ नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दुःखाने । भारिले मनुष्ये पळ स्व’कर्मे ।ऑ। 145 चिमणी चिल्ली घरटय़ांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।ऑ। 146 जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।ऑ। 147 मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषतः रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।ऑ। 148 म्हणून आईला, सर्व शस्त्रास्त्रधारी `दुर्गा म्हणतांत, ते उगाच नाही… अरुण काकतकर 9822021521…. भक्तिबोध-21 रजोगुण कसा, कोणी आणि का ठरवावा? धनधान्यांचे संचित । मन होये द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 02/05/13 धनधान्याने आपली कोठारे तुडुंब भरलेली असावीत. मनामधे सतत पै आणि पै जोडण्याची अनावर इच्छा. अमाप संपत्ती जोडून सुद्धा राहणीमान अत्यंत कंजूष आणि दरिद्री. येथील येथे अवघेचि राहाते हे न समजल्याने उपभोग न घेताही फक्त साठवत राहातो तो रजोगुणी. संचय करणे उपकारकचि । संसारांत गरज असतेचि त्याची । मुंग्यासुध्दा करिती कणाकणाची । वर्षाऋतूसाठी साठवण ।ऑ। 354 ज्याला संसार सांभाळायचाय, आई-वडील, घरातील इतर ज्येष्ठ, पत्नी, मुलेबाळे यांचा प्रतिपाळ करायचाय, आणि स्वतःच्या निवृत्योत्तर निर्वाहाची व्यवस्था करून ठेवायची आहे, त्याला दरमहा, काही रकमेची बचत करणे अपरिहार्य आहे. कारण मुलाबाळांना शिकवून सावरून मोठं केल्यावर, ती, तुमच्या वृध्दापकाळाची आधारकाठी होतीलच, याची ग्वाही आजकाल कोणीच देऊ शकत नाही. म्हणून `संचयिनी’ ही आवश्यकच ! ज्याला वाटे विरक्त व्हावे । त्याने जन्मासचि न यावे । जगल्यांचे घास वाढवावे । स्वप्नी सांगोनि मायबापा ।ऑ। 355 ज्याला सर्वसंगपरित्याग करायचाय, त्यानं, 9 महिने 9 दिवस त्या माऊलीला शारीर कष्ट देऊन, पापाचा धनी तरी कां व्हावं ? आणि कष्टसाध्य संपदाप्रापती हा रजोगुण कसा, कोणी आणि का ठरवावा ? महारूपे गरिबांसाठी । रिकामी करविली धान्यकोठी । केवळ `रजोगुणा’ पोटी । केले सत्कृत्य ?।ऑ। 356 कोठारे भरली शिगोशिग । लुटावयास गरजू भुकेल्यांची रांग । लोकोपयोगी उदरभरण योग । साधणे.. काय पाप ।ऑ। 357 घरधन्यास राहावेच लागते साधेपणी । अन्यथा ओंजळिची होते चाळणी । राखणे आप्तांसाठी अन्न-पाणी । होउन बसते अवघड ।ऑ। 358 एवढं करूनसुध्दा अखेरीस म्हणावे लागतं, ‘ मी आलों तैसा जाणारहि नागडा’ ! अखेरीस संपदा न येते कामा । जेंव्हा जायची वेळ निजधामा । सुकृते दुष्कृत्ये केलेली ‘जमा’ । न बांधती तिरडीवरी ।ऑ। 359 आणि मग हे ‘मोक्ष-गति’ प्रचारक सांगतांतः मग ‘पिंडा’ वरली शिते । टोचावी लागतांत होवुन भुते । विसरतांत सर्वजण नाते । घरोघरी पोचता ।ऑ। 360 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-21 खरा सेवाभावी कार्यकर्ता, स्वयंप्रेरणेने सेवक होतो दिसे सकळांस सारिखा । पाहाता विवेकी नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 12/01/19 समर्थांचा जो पारमार्थिक प्रचारक आहे, महंत हा सर्वांशी सारख्याच आपुलकीने वागताना दिसतो. कुणालाही कमी लेखत नाही, काही कमी पडू देत नाही. परंतु त्याचा विवेक सतत जागा असल्याने कोण कामाला येईल, कोण कोण निकम्मे आहेत याचा निवाडा त्याच्या मनामधे सतत सुरू असतो. सामाजिक कार्यामधे कार्यकर्त्यांची अचुक निवड ही त्या प्रकल्पाचे यशापयश ठरवत असते. ‘ते’ तर त्यत्तिसकोटी । त्यातला उपकारक जगजेठी । निवडून, दीन दुबळ्यांसाठी । नेमस्तेल, तो महंत ।ऑ। 27 महंत ? मी तर यांना संप्रदायाचे दलाल म्हणतो. खरा सेवाभावी कार्यकर्ता, स्वयंप्रेरणेने सेवक होतो. हृदयांत कणव दाटते म्हणून पीडितांची सेवा करतो, निरपेक्षपणे ! सद्गुरु नंतर, मलाच पट्टशिष्य म्हणून, ‘गादीचा’ वारसा हवा’ असा आग्रह स्वयंप्रेरित प्रचारक कधींच करीत नाही. पण…. गरीबांस कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दुःखचि ! सुख कसे मिळावे । काटय़ांच्या वाटेंत ?।ऑ। 28 म्हणे ‘ते’ त्यत्तिसकोटी । वसंत असता उरी-पोटी । तरी क्षुधाशांतीसाठी । कपिला गोमाता रानोमाळ ।ऑ। 29 म्हणे ‘शोध घ्या स्व अंतरी,। भेटतील तिथे ‘दैवते’ सारी !’ । मग कशास करण्या वारी । प्रेरित वृथा करिति ‘संत’ ? ।ऑ। 30 जो कणाकणाच, मनाननांत क्षणोक्षणी वसतो, तो असलाच तर त्याच्या भेंटीसाठी महंतरूपी दलाल कशास ? सांगा बरे ! कशास हवा महंत ? अंकुश घेवुनि जणु माहुत । अगम्य गति-मोक्षाप्रती जनमत । कोण्या कारणे रेटावया ? ।ऑ। 31 तर्क बुध्दीच्या विश्लेषक कसोटय़ा । देणग्या निसर्गाच्या मोठय़ा । ढोंगी, भोंदू संत ‘माणसांच्या’ । स्वार्थी हेतूंनी गाडल्या ।ऑ। 32 संत-महंताना नकोच जाणकार । जनता राहिला जर भाबडी निरक्षर । तेंव्हाच झोळींत पडेल भरपूर । भिक्षा, दक्षिणा नि संपदा ।ऑ। 33 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-23 श्वास थांबता काहीच न उरे । येकदा मेल्याने सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वाचविना । तो आत्महत्यारा ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 18/07/09 शिल्लक राहिलेल्या इच्छा (वासना) भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे एकदा मरून जीवाची सुटका होत नाही. पुन्हा जन्म घेतला की गर्भवासापासून, बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळया यातना भोगाव्याच लागतात. अशा जन्म मरणाच्या फेर्यातून मुक्तीसाठी साधना करून जो स्वतःला वाचवत नाही तो आत्मघातकीच मानावा. ज्यांना पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास आहे, त्यांना हे निरूपण रुचेल आणि रचेगा कदाचित. पण विज्ञान सांगते की ऊर्जेसच केवळ क्षति नाही. ती ‘अक्षत’ आणि या अगम्य अनाकलनीय अवकाशांत, अत्यंत विकल, तरल अवस्थेंत पसरलेली असते. निसर्गाचे, नवीन जीव, मग तो कुठल्याही प्राण्याच्या मादीच्या गर्भांत, अंडकोषस्वरूपस्थित असतात, त्या, पूंबीजाच्या संयोगाने फळविताना, त्या विरलावस्थेंतील ऊर्जा काही प्रमाणात संक्रमित होतच असणार ! पण याला पुनर्जन्म म्हणायचय कां ? ते तर्क- बुध्दीच्या कसोटय़ा, ज्या वैज्ञानिक सत्यशोधनासाठी आवश्यक असतातच- लावून सप्रमाण अजून तरी सिध्द झालेलं नाही. गर्भस्थित अंडकोषी बीज फळले । बाल-युवा-पोक्तासि, वार्धक्य आले । जो जन्मला त्यासि न टळले । मरणही ।ऑ। 389 पुनर्जन्म ही कल्पनाच, चार्वाकापासून अनेकांनी, `थोतांड’ म्हणून, अग्राह्य ठरविली. म्हणूनच.. सुख-दुःख भोग जगतांना सारे । इथेच मांडायचे पसारे । श्वास थांबता कांहीच न उरे । पार्थिव होई रक्षारूप ।ऑ। 390 जनन मरण एकवार । तमगर्भच त्या आधी, नंतर । पुनर्जन्मादि भाकड वारंवार । जरि रुजवू पाहाती `ते’ ।ऑ। 391 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-24 जनसामान्यांना, सद्यकालांत, `जगणं’ हीच फार मोठी साधना असते आणि खरोखरंच त्यांना पुनर्जन्माची संकल्पना कुणी पटविली तर त्या `भीती’ पोटीच ते `साधना’ करणं थांबवतील.. साधना करणे सवयीचे । सामान्यासि वर्म त्याचे । उपजतचि अंगी असायाचे । साध्यहेतु कष्टकर्म ।ऑ। 392 आनंद भोगता ना वरचेवर ?। मग यातनांचे ओझ कां मनावर ?। जगण्याच्या या `तर्हे’वर । नको कदापि नाराजी ।ऑ। 393 फुले काढताना काटे, कर्दमाची गाठ; फळ काढताना, पडझड, जखमा या भेटायच्याच ना? सुख-दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू ! हो की नाही ? वासना, विकृती देहधारी । सत्कर्म-हंस मानस सरोवरी । परंतु मरणोत्तर सर्वोपरी । पावते लोप ।ऑ। 394 कोणीही, कितीही सांगितलं तरी कर्मांतरी मिळविलेल्या संपदेचा उपभोग घ्यायला मंडळी, अगदी स्वाभाविकरित्या उत्सुक असतात. आणि, कळिकाळानं झडप घालायच्या आधी, शरीरस्वास्थ साथ देतंय तोपर्यंत संधी साधायच्या घाईंत असतात.. म्हणोनि धावती, करिती घाई । समोर दिसते नसलेपणाची खाई । सौख्यभोग मिळणे नाही । अंधार दाटता चहूकडे ।ऑ। 395 माणसं, अगदी अबालवृध्दत्वाच्या कोणत्याही अवस्थेंत, व्याधिग्रस्त होऊ शकतात. सर्वतोपरी उपचारोत्तर सुध्दा ता व्याधिमुक्ततेसाठी होऊ शकत नाहीत, तेंव्हा मग, जगण्यापासूनच मुक्तीची घटिका येऊन ठेपते. पण… अखेरीस संपदा न येते कामा । जेंव्हा जायची वेळ निजधामा । सुकृते दुष्कृत्ये केलेली `जमा’ । न बांधती तिरडीवरी ।ऑ। 359 आणि मग हे `मोक्ष-गति’ प्रचारक सांगतांतः मग `पिंडा’ वरली शिते । टोचावी लागतांत होवुन भुते । विसरतांत सर्वजण नाते । घरोघरी पोचता ।ऑ। 360 त्यांचे हे, जळमटाप्रमाणे, अज्ञानाच्या वैचारिक तमगर्भी तगमगणारे, कोणाच्या भाबडय़ा मालगुज़ार बसायला तडफडणारे प्रयत्न, `इतिहासजमा’ करून खोलवर गाडायची वेळ आली आहे आता ! अरुण काकतकर 9822021521…भक्तिबोध-25 पापपुण्याचा एकत्रित जमाखर्च मांडता येत नाही पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचे फळ तें सुख । पापपुण्य अवश्यक । भोगणे लागे ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 08/07/07 ` करावे तसे भरावे ‘ हा नियतीचा नियम आहे. चुकीच्या व्यवहाराचे फळ दुःखद आणि योग्य वर्तनाचे फळ सुखद असते. पाप आणि पुण्य यांची फळे वेगवेगळी भोगावीच लागतात, टाळता येत नाहीत. मुख्य म्हणजे पापपुण्याचा एकत्रित जमाखर्च मांडता येत नाही. त्यांची खातीच वेगवेगळी आहेत. पण एकाचे पाप ते दुसर्याचे पुण्य ठरू शकतेच ना ? उदाहरणार्थ, राष्ट्रप्रेमापोटी स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात, अनेक प्रज्वलित युवकांनी, हातात शस्र धारण करून, ब्रिटिशसत्तेचे जुलमी अधिकारी आपल्या पिस्तुलाच्या गोळीनं टिपिले ते पाप म्हणायचं की पुण्य ? ते खुनी म्हणायचे की क्रांतिकारक ? चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, राजगुरू.. त्यांनी केलं ते पुण्यकृत्यच होतं ! पण ब्रिटिश न्यायासनाच्या दृष्टीनं, ते मनुष्यवधाचं पाप होत, आणि म्हणून त्यांना फासावर चढविलं गेलं ते इंग्लंडचा राजसत्तेसाठी पुण्य होतं ! कर्म केल्यावर त्याचा परिणाम कोणावर कसा होतो त्यावरून त्याची रवानगी पुण्याच्या किंवा पापाच्या घडय़ांत करणं श्रेयस्कर.. पुण्य कोणते आणि पाप । तुळसी की अफूचे रोप । होतो निवाडा आपोआप । परिणामांतरी ।ऑ। 40 माया ममता वात्सल्य । शत्रूच्या यशाचे शल्य । वा विध्वंसाचे कौशल्य । विविधांसाठी भले-बुरे ।ऑ। 41 तसंच, ज्या श्रध्देयांची, ते दिसेल, भेटेल म्हणून वाट पाहावी, ते समोर उभं ठाकलं तरच त्या प्रतीक्षेचं सार्थक. पण आयुष्यभर उपासना, प्रार्थनोत्तरसुध्दा जर ते दिसलं, कमीतकमी जाणवलंसुध्दा नाही तर तो फेलपणा सामान्यानं कसा सहावा ? प्रार्थना पूजा आरती अर्चना । प्रसन्न करण्या उपाय नाना । परंतु शोधता दिसेना जाणवेना । अट्टाहास ज्यासाठी ।ऑ। 42 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-26 कां नसावा विश्वास कर्मावरी? दुश्चीतपणे नव्हे साधन । दुश्चीतपणे न घडे भजन । दुश्चीतपणे नव्हें ज्ञान । साधकासी ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 08/06/22 एकाग्रता हा चित्ताचा गुण. दुश्चीत म्हणजे मन विचलित होणे. साधनेला बसला पण मनाने भरकटला. परमेश्वराचे भजन सुरू केले पण मनात भलतेच भजन सुरू. अशा साधकाला आत्मज्ञान होण्याची शक्यतासुध्दा नाही. ज्ञानदशक, दुश्चीतनिरुपण समास. संसारांत, गृहस्थास वा गृहिणीस आजकाल `आत्मज्ञान’ वगैरे करून घ्यायला वेळ असतो. तुम्ही जरा स्वतःचा आणि पत्नीचा दिनक्रम सहज गंमत म्हणून तपासा. तुमच्या लक्षांत येईल की ही `गंमत’ सुध्दा विनाकारण वेळकाढू ठरेल इतके तुम्ही दिवसभर व्यग्र असता. आणि एकाग्रतेसाठी आवश्यक, गर्दी, गदारोळविरहित स्थळ कसं मिळणार ? पण कल्पना करणं, स्वप्न पाहाणं हे आपल्या अखत्यारीत असतं की ! एकाग्रता कल्पनेचा चाप । कल्पना देई अरूपासि रूप । साधनोत्तरी कल्पितास धूप-दीप । दावावा, `भातुकलीं’तला ।ऑ। 830 ज्याने कल्पिले त्यत्तीस कोटी देव । म्हणे कपिलागर्भी घेतला ठाव । देवोनि प्रत्येकी एकेक नाव । भयकंपित केले भाबडे ।ऑ। 831 कल्पनेतचि राहुद्या देव । सगुणरूप साकारणे असंभव । शोधितो, त्यासि, `थांबव’ । सांगा, ‘वृथा वेळ दवडू नको ।ऑ। 832 जे सापडणारच नाही, कारण ते अस्तित्वातच नाही ! हे रोज जगतांना आलेले अनुभव घेऊनही, भोळ्या, भयकंपित भाबडय़ांना समजावून देखील समजत नाही. याला काय इलाज ? मग समोर चित्र किंवा मूर्ती ठेवून, त्यांत वेदनाशमन, आपदाहरण शोधींत बसतांत.. चित्र, आकारांचे सजीवन । नाही भरू शकत त्यांत प्राण । म्हणोनि करिती प्रतिष्ठापन । पुरोहित, घालण्या समजूत ।ऑ। 833 उपचार कां हा भीतीवरी ?। कां नसावा विश्वास कर्मावरी ?। यशाचे सुवर्ण झळाळता मुद्रेवरी । `हा तर देव’ म्हणतील ।ऑ। 834 अरुण काकतकर 9822021521… ।।भक्तिबोध।। दिनांक २१-०२-२०१५ शनिवार साठी उपाय तापास, उपासना, जपजाप्य, तपश्चर्या, साधना करून सुध्दा 'कांही साधना बा ' या निर्णयात्मक येवून ठेपणाऱ्या आणि त्यांना, हा अयोग्य मार्ग दाखविणाऱ्या साधू, बाबा, स्वघोषित स्वामींना माझा एक प्रष्ण आहे. 'अरे आदरणीय सद्गृहस्थांनो, ज्ञानेंद्रियांना जे दिसत, जाणवत नाही, त्याचा शोध घ्यायचं व्यसन लावण्यापेक्षा, पंचमहाभूतांच्या रक्षणशक्तीची आणि संहारक्षमतेची जाणीव त्यांना करून द्या, म्हणजे आपोआपच विज्ञानाच्या मर्यादित साहाय्यानं ते त्याला वेसण घालायला शिकतील '' आपण आता फक्त जलत्त्वाचा विचार करू.. आधी रुसली वर्षाराणी । भेगाळे भुई, शुष्क पांपणी । मग आले मुसळधार पाणी । धरे घरी सुखवाया ।। ८० पहाड फोडित धबाबा । निसर्गाचा सुटला ताबा । कळिकाळाच्या विक्राळ जिभा । स्पर्धा करिती गिळावया ।। ८१ माळीणीचा गांवकऱ्यांनी काय कमी आळवणी केली असेल त्या 'ढिम्म' उभ्या मूर्तींची ? पण अखेरीस, निसर्गाचा समतल बिघडल्यानं, काय घडलं ? भक्तीने तारले जीव ? पूजिला त्यांनी कुठला 'देव' ? कृषिवलांवरी नाहक घाव । कां कुणी घातला ।। ८२ बाया-बापड्या, वृध्द नि तान्ही । निद्रिस्त होती समाधानी । आक्रोश त्यांचा कां कसा कानी। 'अभाव-देवा'च्या पडेना ? ८३ असं हे 'पाणी', जलत्त्वाचा, आपल्या विविध मुद्रा दाखवितं तेंव्हा पळतां भुई थोडी होते... पाणी ! तृषेला आधार । पाणी । रूप कधी अघोर । पाणी ! अश्रूंची संतत धार । पाहुनि हसे खदखदा ।। ८४ प्रदीर्घ ओढ कधि देई पाणी । वर्षत अविरत सुखवी धरणी । कधि हृदय दावी पाषाणी । हाहाक्कार माजवी ।। ८५ 'परिपूर्ण' ऐशा पाण्याच्या त-हा । मग कोत्या जन्मजात नरा । दावता विकृतिच्या पदरा । 'पाप अय्यो' आरडती ।। ८६ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २३-०२-२०१५ सोमवार साठी सद्यकाली उभयता पति-पत्नी । रोजगार, अर्थार्जनाच्या प्रयत्नी । निवृत्ती जर आली गृहिणीच्या मनी । गृहस्थासि चालेल कां ? म्हणून, संसार करावा नेटका । या दासांनी म्हटलेल्या वचनाला माझी आजच्या काळाच्या गरजेनुसार जोड देतो.. थोडा पाठभेदाचा आरोप स्वीकारून .. नाही, नकाच करू सुटका ! भोगोत्तरी पळणाऱ्यास झटका । द्यावा अस्तुरिनेचि ।। म्हणून, दासांच्या तत्कालीन विचारांचं मला वैषम्य वाटतं.. ।। दास-वाणी ।। विवेके अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । नि:संग योगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०४/१२ सार असार किंवा नित्य अनित्य विवेक केल्यामुळे कुठल्याही वस्तु विषयी आकर्षण उरले नाही. विरक्ती मुळे व्यावहारिक गोष्टींशी फारकत घेतली. अंतर्बाह्य मोकळा झालेला हा नि:संग साधक योगी मानावा. या, उपदेशाच्या नुसता वैषम्य वाटत नाही, तर मनापासून राग येतो ! कारण, त्यांच्या शिष्यांनी, तोच उपदेश सद्यकालांतही रेटायचे उद्योग चालवलेंत ! ऐसा कैसा अतर्क्य निष्कर्ष । काढिती समर्थराम दास । नि:संग, विरक्त पळपुट्यास । म्हणती साधक योगी ?।। ३६५ शेजेवरी वर्षे इतुकी । कुठल्या 'योगे' भोगिली सखी । लुटावयास ना उरले बाकी । म्हणुनि पळे पाहा 'चोर' ।। ३६६ म्हणे हे आदर्श रामभक्त । नशीब, राम नाही सद्यकाळांत । धरुनी छाटी, कमंडलूस । असते दिले सुळावरी ।। ३६७ कदाचित, आजची परिस्थिती, मनुष्यानं स्वत:हूनच वाढवून ठेवलेल्या गरजा, त्यासाठी करायला लागणार् अथक परिश्रम, हे सर्व अवलोकून, दासांनी स्वत:च उपदेशांत यथोचित बदल केला असता, असं मला वाटतं.. अं हं.. खात्री वाटते... शोषितासि निराधार सोडे । त्या मातीवरी उभारी वाडे । त्यांच्या मनगटी सुवर्णकडे । चढवू पाहाती कां दास ।। ३६८ हे तर जाणा नारी अरि । संसारास म्हणती उघड्यावरी । न्हाणुल्या लेकी, सुना घरी । टाकुनि ! म्हणति 'व्हा साधक' ?।। ३६९ भक्तिबोध-28 तोच खरा साधक मानावा शैन्य अवघेचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ।ऑ। ।ऑ। जय जय रघुवीर समर्थ ।ऑ। दासबोध ः 08/08/39 राज्याचे सैन्यदळ जिवंत आणि ताकदीने सक्षम असताना राज्यकारभार करावा का एकूणएक सैनिक मरून गेल्यावर प्रशासन चालवावे हेही ज्याला कळत नाही त्याला राजा म्हणावे काय ? त्याचप्रमाणे आत्मा देहात असताना आणि देहरूपात आपण जिवंत असतानाच साधना करून मुक्ती मिळवली तरच त्यात अर्थ आहे. तोच खरा साधक मानावा. आत्मदर्शन समासात समर्थ सांगताहेत. `मुक्ती मुक्ती’ सर्वदा आरडती । `उक्ती उक्तीं’ त्रिकाल सांगती । `भक्ती भक्ती’ कां न आग्रहिती । कर्मयोगाची हे ?।ऑ। 9 पाठपुरावा पळण्याचा । कर्मनिष्ठेपासून ढळण्याचा । सर्वसंगपरित्यागाचा । उपदेश, सांगा, योग्य कां ?।ऑ। 10 रणांगणी वा भवसागरी लढतां । कमकुवत शरीर, मने होता । सैन्य, प्रजा कामी येतां । सत्ता गाजविण्या कुणि नुरेल ।ऑ। 11 सत्ता ही गाजवण्यासाठी नाही तर समाज जीवन, उत्तम सुविधा, कल्याणकारी योजना, आयुरारोग्य, धनसंपदा यांनी सजविण्यासाठी मिळवायची असते. म्हणुनि राखावे समाजभान । `मी’ म्हणावे, `सेवक प्रधान’ !। ऐसेचि वदले असावे, `जाण, । राजा’ दास शिवबासी ।ऑ। 12 मग आपोआप स्वानिनिष्ठा । जागेल स्वादिल्या मिठा । उद्योगारोग्य, संपन्न पेठा । सजवितील नगरि-देशा ।ऑ। 13 पण लोकशाहींत, आधी मतांसाठी भिक्षा मागत प्रलोभने दाखवत, एकदा कां `खुर्ची’ मिळाली की वर उल्लेखिलेल्या बाबींकडे दुर्लक्ष करणार्यांची `जमात’च दिवसेंदिवस वृध्दींगत होतेय. परिणामतः न्हाऊ-माखू घातलेली घरी । धुळींत लोळति सडकेवरी । रक्त-मांस एकचि जरी । गोमटय़ासि न्याय वेगळा कां ?।ऑ। 14 `देव’ तुमचा आंधळा । प्रसाद भक्षुनी निद्रिस्त गोळा । काणा करोनिही डोळा । न पाहे तिकडे ।ऑ। 15 दुर्दैवी, प्रतीक्षेंत मूढ । कधी मिळेल सुवर्ण कु-हाड । वाकोनि पाहती आड । तोल जाता होति मुक्त ।ऑ। 16 गति मिळता गर्तेंत जाती । `मोक्ष’ लोभाने सर्वस्व त्यजती । उखळे पांढरी करिती। बुवा, बाबा, भोंदूंची ।ऑ। 17 अरुण काकतकर 9822021521… ।।भक्तिबोध।। दिनांक २५-०२-२०१५ बुधवार साठी ।। दास-वाणी ।। श्लोक अथवा श्लोकार्ध । नाही तरी श्लोकपाद । श्रवण होता येक शब्द । नाना दोष जाती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०६/३२ वेद, पुराणे, उपनिषदे यांमधील एखादाच श्लोक किंवा अर्धा श्लोक अथवा नुसती ओळच काय निव्वळ एक शब्द जरी कानावर पडला तरी अनेक दोष नष्ट होतात. मग जर समजुन उमजून गुरूकृपेने जाणून घेउन तो आचरणात आणु शकलो तर किती पुण्यराशी जमतील? झालं ? परत या बोधानं मला, नाल्यावर कोळ्याची 'पुराणांतली वांगी' कथा आठवणी ! काय ? त म्हणे 'मरा मरा' म्हणतांना अनवधानानं 'राम राम' असं 'तो वरचा, सर्वभरचा', त्याला एकू आलं ? गंमतजंमत आहे ! 'त्या'ला सगळं उलटंच कानावर पडतं, म्हणूनच सत्कर्म करणारे हाल अपेष्टेंत मरत जगतांत, आणि दुष्कीर्तांना कुमार्गानं संपदा, सु(?)कीर्ती यांचा लाभ होतो. एक शब्द ऐकान्तिक जर 'पुण्य' वगैरे लागत असेल तर लहान मुलांना फक्त 'एक' अंक शिकवला की झालं ! संपूर्ण अंकगणित पुढे हात जोडून उभं ! तैसे कोठलेही ज्ञान । शोषित गेले कण कण । तर्काने परस्परांशी सांधून । विषय आकळतो परिपूर्ण ।। ५ उदाहरण एकलव्याचे । वा गर्भस्थित अभिनन्यूचे । अंकुरल्या, जोपासल्या कोंभांचे । त्यांनी केले वटवृक्ष ।। ६ म्हणून, ज्ञानाचं भांडार हे गुरुसमोर बसूनच उघडतं असं नाही तर ज्याला गरज आहे तो लौकिकार्थानं 'चोरी' करून सुध्दा ते मिळवतोच ! फक्त सर्व ज्ञानेंद्रीये शिष्यानं सदैव सजग आणि शोषणक्षम ठेवायला हवींत ! पाहाता, ऐकता चाणाक्षपणे । विश्लेषतां परिणाम, कार्यकारणे । समोर येतो सहजपणे । अन्वयार्थ ।। ७ म्हणोनि गुरु चराचर स्थीत । जेथून जावे तेथे संगत । वावरती ! राखोनि सावधचित्त । असावे आपण ।। ८ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-०२-२०१५ गुरुवार साठी ।। दास-वाणी ।। येकांती मौन्य धरून बैसे । सावध पाहातां कैसें भासे । सोहं सोहं ऐसे । शब्द होती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/०७ अत्यंत शांत निर्जन स्थळी बसावे. सावधपणे फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास आत घेताना 'सो' असा आवाज येतो तर शांतपणे सोडताना 'हं' असा आवाज आपल्याला ऐकू येतो. तोच आपला अंतर्नाद, जाणीव, स: अहम् म्हणजे सोहम् ! खरं तर रोज, आपली सांसारिक जबाबदारी, आप्तेष्ट पालनपोषणार्थ अर्थार्जनासाठी कर्मयोगव्रत आचरण केल्यावर, केवळ स्वतः:साठी म्हणून चार क्षण आपल्या घरी निवान्त हसावं, मन विचारशून्य करून, त्यालाही निर्लेपपणाच्या आनंदाचा अनुभव द्यावा, आणि मग परत भवसागरांत उडी मारावी असं प्रत्येक कष्टकरी जीवाला वाटंत असतं ! अशा वेळी स्वतःला, फक्त स्वत:च्याच श्वसोछ्वासाचा ध्वनि एकू यावा, असंही वाटत असतं.. पण.. गर्दी आणि गदारोळ । किंकाळ्या, आर्ताचा कल्लोळ । अवतीभवती विखारी खेळ । जळो जाय 'मी' पणं ।। १३ ऐसे कोठे निवांत स्थलं । वृध्दींगत करील आत्मबलं। प्रोत्साहित करून वृत्ती सकल । मन होइल तवान ।। १४ आणि समजा अशी जागा, एखाद्या टेकडीवर, आरण्यांत मिळालीच, तर मग मनांतल्या मनांत राखून ठेवलेलं, साचलेलं, ओथंबून आलेलं, कुणा जिवाभावाच्या सुहृदांचे सांगण्यासाठी, मी.. भावसूत्रांत शब्द ओवीन । गूढार्था स्पर्शेन ओवानं । मनाचिये गुंथीची वीण । करू पाहेन पामरे ।। १५ सद्यकालांत, अशी कृत्रिम 'शांतिस्थलं', अनेक ठिकाणी उपलब्ध असतांत, निसर्गरम्य शांतिस्थळे । दृष्टिक्षेपांत निर्मळजळे । अन् त्यांत विविधरंगी कमळे । बहुअसती ।। पण ती सर्वसामान्यांच्या, ज्याला त्याची नितांत आवश्यकता आहे, त्याला ती सहजासहजी प्राप्य असतांत कां ? कारण, परंतू यासाठी लागती मुद्रा । मी निष्कांचन, दळभद्रा । करण्या श्वासावर लक्ष केंद्रा । संधी कैची ?।। अशी स्वतःचा समजूत घालत, त्याला, डोळे मिटून, मनांतल्या मनांतच स्वत:च्या विरंगुळ्याचा मार्ग शोधावा लागतो ! ********* अरुण काकतकर. भक्तिबोध-31 म्हणुनि कां त्यागून संसारी। जाती जनलोकं?।। मागील भागात सांगितल्याप्रमाणे, जर असे एकांतस्थल एकाग्र होण्यासाठी सहजी प्राप्त झालेच तरी तिथं किती काळ मन रमेल ? सवयीचे आबालवृध्द, आजूबाजूचा समाज, इष्ट मित्र-मैत्रिणी, अगदी वैरीसुध्दा यांच्याशिवाय करमेल ? काही वेळानं कर्म-कर्तव्यांचं स्मरण होईलच. अगदी सर्वसंगपरित्याग केलेल्याला सुध्दा, शरीरधर्म, आन्हिकं स्वस्थ बसू देतील ? विचार करून पाहा ! कल्पना करून पाहा ! तुम्हाला जाणवेलच, की.. आजूबाजूस आप्तांचा मेळा । तरचं मिळतो मनाय विरंगुळा । विशेषतः मावळतीच्या वेळा । करितो एकांडेपणा खिन्न ।। 816।। संध्येचा येथे तेजोविलय । अन्यठिकाणी भास्कर उदय । दोन्ही घडते एकचि वेळ । परिणाम अस्तोदयस्थळी ।। 817।। निरांजनास मिळते तूप । दरवळतो आसमंती धूप । कराग्री लक्ष्मीचे रूप । तिकडे मावळती पलिकडे ।। 818।। पार्थीवास मिळते तिरडी । नवजात करते रडारडी । दुःखानंदाश्रूंच्या लडी । एकाच विश्वांत ।।819।। हा सारा वैश्विक विरोधाभास.. अं हं… परस्परविरोधी सत्य स्वीकारतच एकेक पळ अनुभवतच `पळत’ सुटायचं असतं आपणा सर्व जनसामान्यांना.. कारण केवळ आपण संसार थाटलेला असतो म्हणूनच नाही तर जगण्याचा आनंद घेतांना, ते जगणं, स्वतःबरोबरच इतरांसाठीही सार्थ करून दाखवायचं असतं… कोठे मोटेवर ललकारी । पर्जन्याअभावी कोठे हाल भारी । म्हणुनि कां त्यागून संसारी । जाती जनलोकं ? ।। 820।। अगदी आयुष्याच्या अखेरीसही, आपलं संचित सुकर्म, पुढच्या पिढीच्या कल्याणार्थ, त्यांच्या स्वाधीन करून जाणंच श्रेयस्कर नाही कां ? भिववति जरि संध्याछाया । मावळतीली सुवर्णमाया । आश्वासक उद्याचा पाया । रंग मिसळती तमगर्भी ।। 821।। भय कधीच संपत नाही । जगण्याची धरून बाही । क़ायम, सर्वदा ठाईठाई । `पळ’ म्हणते, ‘थांबू नको ।।822।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-32 सूर्योदयाविना दिवस उजाडला तर… न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 07/08/22 सूर्यदेव दिसेनासे झाल्यावर अवघ्या पृथ्वीतलावर अंधार दाटलेला राहातो, त्याचप्रमाणे ज्या क्षणी वाचन, चिंतन, मनन, निदिध्यान थांबते त्याच क्षणी ज्ञानाची अवस्था नष्ट होऊन अज्ञानाचा अंधःकार साधकाच्या जीवनात भरून येतो, टिकून राहतो. श्रवण सतत केले पाहिजे हा संदेश समर्थ श्रवणनिरूपण समासात देतात. जसा सूर्यास्तानंतर अंधार । डोळसासही भासे सर्व निराधार । तडफतील अवघड जीवमात्र । जैसा जलधिविना जलचर ।। तसंच कांहीसं, वाचन-चिंतन-श्रवण-मननाविना ज्ञानतृषार्थाचं होईल असं दास सांगू पाहताहेत त्यांच्या उपदेशांत. पण मनांत आलं की खरोखरी जर असा, सूर्योदयाविना दिवस(?) उजाडला, तर पंचमहाभूतांपैकी एकाचा आधारच नागासाकी होईल आणि, जर लयास भास्कर गेला । ना परतुन उदयास कधिही आला । जीवमात्रांचे कळिकाळा । निमंत्रण स्वाभाविक ।। 837 मग विसरा योग-भोग । अंत्योदयास समजा जाग । संजीवन समाधीचा अवघे जग । घेईल अनुभव आपोआप ।। 838 ज्ञान-कर्मेंद्रिये, श्वसनक्रिया । जाण, विचार, तर्क-बुध्दी विलया । जातील ! अगम्य अवकाश माया । राहील ? कोण जाणे !।। 839 सर्वसामान्य वाचन, चिंतन, श्रवण । जपजाप्य, उपासना, धारणे ध्यानं । शब्द फोल, अस्तित्व अर्थहीन । होतील अनायसा ।। 840 परंतु जे वैज्ञानिक, शास्त्री, अवकाश-संशोधक विविध उपकरणांद्वारे, त्या अगम्य पोकळीचं गम्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या मते, नजिकच्या भविष्यकाळांत, म्हणजे साधारण पुढच्या काही अब्ज वर्षांत तरी असं काही घडण्याची श्यक्यता नाही. तेंव्हा त्या विचारानं विचलित न होता मार्गक्रमणा करीत राहू या! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-33 महिलांची आक्रमक दुर्गाशक्ती हा रूढींवरच विजय! पूर्वीच्या म्हणजे अगदी नजीकच्या भूतकाळातल्या काही भ्रामक समजुती, अंधश्रध्दा आणि त्यांचे फोलपण यांचा परामर्श घेऊन, त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण, आजच्या काळातील परिस्थिती विचारात घेऊन करूया ! उदाहरणार्थ, ज्या काळात, मुलींना `पदर’ आला, किंवा त्यांना मासिक पाळी येऊन, त्यांचे पूर्ण स्त्रीमध्ये रूपांतर व्हायचे तेव्हा रजोदर्शनाच्यावेळी अतिरिक्त रक्तस्रावामुळे, दौर्बल्य येऊन, विशिष्ट आहाराची आणि शारीर विश्रांतीची गरज भासत असे. अशा दिवसात, रोजच्या परिश्रमांतून तिची मुक्तता व्हावी या हेतूने एका जागी बसवून ठेवण्याची अत्यंत उपकारक प्रथा होती. परंतु काही मूर्ख तथाकथित `सोवळ्या’ कर्मठांनी, ही बाब धार्मिक चौकटीत बसवून तिला `ओवळे’पण स्वतःच्याच अधिकारात बहाल करून, तिच्यावर, सर्वसामान्य समाजजीवनात सहभाग घेण्यावर बंधने आणली, रजस्वला म्हणे ओवळी । जरि नुकतीच उमलेलि कळी । टाळालं जर तिला सद्यकाळी । संहार-दुर्गा पहाल ।। 856 कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या गर्भगृह प्रवेश आंदोलनाच्या निमित्तानं, 3/4 वर्षांपूर्वी महिलांनी आपली ही आक्रमक दुर्गाशक्ती प्रदर्शित करून जुनाट रूढींवर विजय मिळविला हे एका अर्थी बरेच झाले. तिथल्या पुरुष पुजार्यांना हलवून तिथे महिला राज्य प्रस्थापित केले ! तुमच्या आठवा माता, भगिनी । `बाजूस’ बसविले त्यांनाही कोणी । दिलेली प्रजोत्पनार्थ लेणी । दुर्लक्षुनी ! हेटाळिले ।। 857 निसर्गाने, प्रजोत्पादनासाठी जी व्यवस्था, शिस्त, नियम घालून दिले आहेत त्यांचा वैज्ञानिक तर्क बुध्दीनं विचार करून त्याप्रमाणे आचरण करायला नाकारणारी, ही `कुबट’ मंडळी सुधारतील अशी आशा करणे हा सुद्धा मूर्खपणा ठरावा इतकी परिस्थिती सध्या बिघडलेली आहे. जगण्यांत पडता कोडे । कशास अभाव`देवास साकडे ?। निसर्गनियमांचे नियमित धडे । आचराल तर उलगडेल ते ।। 858 अरुणकातकर 982202121521. भक्तिबोध-34 हृदयस्थ विषवल्लीचे `अतिरेकी’ काही महिन्यांपूर्वी, अगदी आपल्या सीमेलगतच्या, शेजारी राष्ट्रात, एक भीषण हत्याकांड, अतिरेक्यांनी घडविले. `अतिरेकी’ या संबोधनाला, धर्म, जात, पंथ देश, प्रदेश काही नसते! मळातल्या सर्वसामान्य, बर्या-वाईट विचारांचे घरटे मनात बांधून निसर्गाने जन्माला घातलेल्या, माणसांना, त्यांच्या हृदयस्थ विषवल्लीला खतपाणी घालून, सूडभावनेला भडकविण्याचे काम, काही मूठभर बहिस्थ शक्ती करीत असतात. कारण या विश्वाची सत्ता त्यांना, लोकांना भीतीच्या दडपणाखाली क़ायम ठेवून, मिळवायची, उपभोगायची असते. उदाहरणार्थ, तपश्चर्येने; मिळालेल्या पुण्याचा माज चढल्यामुळे, रावणाने, म्हणे सर्व देवांना आपल्या सिंहासनखाली दडपून ठेवले होते, तसेच काहीसे! या सगळ्या हत्याकांडांतली, मनाला आणखी व्यथित करणारी, गोष्ट म्हणजे आपण मनुष्य म्हणून जन्म घेण्याऐवजी, जंगली श्वापद म्हणून जन्म घेतला असता तर बरे झाले असते असे वाटायला लावणारी लाजिरवाणी बाब म्हणजे, त्या हत्याकांडात बळा पडलेले जीव कोवळी शाळकरी बालके होती हो ! बालके निरागस भोळी । शतकोत्तर पंचदश गेली । म्हणजे `गोळ्या’ खाउन मेली । अतिरेक्यांच्या ।। 859 कुणि आला कां हो प्रेषित । वाचविण्या त्यांना धावत ?। संकट कोण्या सूडाने प्रेरित । होते अनाठाई ?।। 860 ते तर सूड भावनेनं प्रेरित, दुष्कृत्य होते ! पण अगदी आपल्या, बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..।। अशा प्रगती प्रदेशांत सुध्दा, अंधश्रध्देपोटी अतर्क्य नवस बोलले जातांत, आणि निरागस, छकुल्यांना, तान्ह्यांना त्यांचे आई-बापच, काळजाचा (?) दगड करीत त्यांना फेकताच, उंचीवरून खाली.. कच्या बच्या तान्ह्यांना । भींतीवरून खाली फेकतांना । कुठल्या श्रध्देचा पान्हा । माय-बापांनी प्राशिला ?।। 861 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-35 आतां येतील चैत्रजत्रा युवावर्ग, पोक्त, वयस्क मंडळींना, त्यांच्या तथाकथित कल्याणार्थ जर कोणी अतर्क्य, उपाय, म्हणजे विस्तवावर चालणे, पाठीवर अणकुचीदार लोखंडी आकडे लावून, टांगून घेऊन प्रदक्षिणा घालणे, ओलेत्याने दंडवतावस्थेच, दोन दोन, तीन तीन मैल अंतर, मंदिरापर्यंत लोळत जाणे वगैरे… कोणी अंधश्रध्देने पछाडलेला आप्त जबरदस्तीने करायला सांगू लागला, तर विरोध नोंदविण्याइतकी किंवा असा उपचार(?) टाळण्याइतकी परिपक्वता आलेली असते. पण तान्ह्यांना, स्वतःच्या गोंडस छकुल्यांना, जन्मदाते माय-बापच जेव्हा उपचारहेतू मृत्यूच्या खाईंत ढकलू पाहातात, तेव्हा विचारावसे वाटते, कुणांत रंगला सांगा `देव’ । रासक्रिडा की सारिपाटाचा डाव । सीतेसाठी सुवर्णमृगापाठी धाव । कां त्या दुष्टाने घेतली ।ऑ। 862 जर `तो’ असलांच, आणि `त्या’ला पाप-पुण्य, खरा, भोळाभाबडा भक्त आणि भोंदू बाबा, साधू-महंत, निर्मळ-निरपेक्ष प्रार्थना आणि झटपट इच्छापूर्तीसाठी नवस-सायासांची लाच-लालूंच यांतला भेद कळत असेल, तर मग, कां नाही उपटत समाजाचे कान ?। कां देत नाही जन्मदात्यांना भान ?। कां न राखितो सहृदयतेचा मान ?। म्हणे संकटविमोचक !।। 863 कधीकधी वृत्तपत्रांतल्या, नरबळीच्या, मानवत सदृश घटना वाचनात आल्या तर मन पेटून उठते ! मानवतच्या पारध्यांना मृत्युदंड झाला, त्यावेळी मी त्या फाशी देण्याच्या प्रक्रियेतला, सहभागी साथीदार होतो. पण त्याने काय साधले ? बळी गेलेल्या कवळ्या कळ्या न्यायासन परत आणू शकले ? जोपर्यंत गेलेला परतून येत नाही, आणि जे शक्य नाही, त्याला न्याय कसे म्हणायचे ? म्हणून, आतां येतिल चैत्रजत्रा । अंधश्रध्दांना नशेची मात्रा । चेंगरुनि, चिरडुनी शरीरे, गात्रा । विकलांग होतिल भाबडे ।। 864 काय साधता बाया-बापडय़ांहो ?। सत्कर्माचा मार्ग नाही गडय़ाहो । संतांनी फोडला टाहो । टाळण्या, आयुष्य वेचिले ।। 865 अरुण काकतकर 9822021521…. भक्तिबोध-35 कल्पनेची झेप मोठी! कल्पना चावला, पहिली भारतीय वंशावली, अवकाश वैज्ञानिक ! नासा नं तिला अवकाशयानांतून संशेधनासाठी पाठवले तेव्हा परत एकदा प्रत्येक भारतीयांचे हृदय अभिमानाने भरून आले. लहानपणापासूनच, कल्पना वैज्ञानिक.. अवकाश संशोधनासाठी. वैज्ञानिक व्हायची स्वप्न पहांत होती पण कल्पनाही कधी कल्पनाही केली नव्हती की संधी तिला नासा..नॅशनल् एअरोनॉटिक्स् अँड स्पेलिंग ऍडमिनिस्ट्रेशन्तर्फे तिला ही संधी मिळेल आणि कल्पनाजगतांतला अनुभव घेता येईल. दुदैवान तिच्या अवकाशयानाला अपघात होऊन तिचा मृत्यू ओढवला. तेव्हा कल्पना करणे ही विज्ञानांतली साधनाच असते, संशोधनावर तिला प्रत्यक्षरूप देण्यासाठी.. कल्पनांचा प्रत्यक्षपूर्ती कल्पनेची झेप मोठी । दशांगुळावर जगजेठी । प्रसविण्या कोठडी वा कोठी । सहजभावे स्वीकारी ।ऑ। 30 कल्पनेचे पंख मोठे । अवकाशहि भासे छोटे । शुष्क शाखेसहि कोंभ फुटे । कल्पनाजगी ।ऑ। 31 ज्यूल्स व्हर्न नावाच्या एका परदेशी लेखकाने अनेक वर्षांपूर्वी, परग्रहांवरच्या मोहिमांवर, अप्रतिम कादंबर्या लिहून ठेवल्या आहेत. सगळ्या कल्पनाजगतांतून सफुरलेल्या.. अवकाश यात्रेसंबंधीच्या या कादंबर्यातल्या ऐंशी टक्के प्रसंग, विज्ञानानं प्रत्यक्षांत आणल्या आहेंत. जॉर्ज् ऑर्वेल नावाच्या अशाच एका परदेशी लेखकानं.. 1984.. ही कादंबरी 1984 च्या कितीतरी आधी कांही वर्ष लिहून ठेवली होती. त्यां एक जागतिक शास्ता, रयतेतल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष राहावं म्हणून छायकाची व्यवस्था करतो. त्या कादंबरींतलं ते कल्पनाचित्र आज प्रत्यक्षात आलेले आपणे अनुभवतोच आहोत. मी ज्या `मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांत’ काम करतो, तिथे, रुग्णांना भेटायला येणार्या अभ्यागतांवर नजर ठेवण्यासाठी जवळपास शंभर छायकांची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी टिपलेली दृश्य एका कक्षात एकाच छोटय़ा पडद्यावर अवलोकनार्थ उपलब्ध असतात. कल्पनेचे बळ किती असते हे यावरून सहज जाणता येते ! अरुण काकतकर 9822021521… मुखपृष्ठ » संपादकीय » भक्तिबोध-35 चरण ऐसे दाखवा कोणी.. आपल्या उक्ती-कृतीचा, कुणावर, कशावर काय परिणाम होईल, ते आधीच जाणून जो बोलेल, वागेल, तो शहाणा, विचारी असे म्हणतात. समोरच्या व्यक्तीच्या उक्ति-कृतीवर प्रतिक्षिप्त होताना तर या बाबींचा जरा जास्तच विचार करायला लागतो. कारण त्या उक्ती-कृतीने आपल्या मनात, बरे, वाईट.. सुखावणारे, खंतावणारे विविधरंगी तरंग उठवलेले असतात. त्यावर, लगेच प्रतिक्षिप्त झालं तर भावनेच्या आहारी जाऊन, कदाचित स्वभावतः अभिप्रेत परिणाम साधणारी उक्ती-कृती साकार होत नाही. म्हणून प्रतिक्षिप्त होण्याआधी, विस्तारपूर्वक, योजनाबध्द संथ, शांत, तरंगविरहीत मनोवस्थेत पहिलं अक्षर रेखलं तर कदाचित इप्सित साधण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडतं. कारण अक्षर शब्दाचा गुरू । शब्द वाक्याचा आधारु । ग्रंथास ओढिती वाक्यांचे वारू । वाचकाप्रति न्यावया ।। 37 म्हणून बीजरूप असतं अक्षर, जे रुजून अंकुररूप धारण करून त्याचा, वाचकांना ज्ञानमार्गप्रदीप होणारे ग्रंथ होतात. इथं, वाचकाऐवजी, श्रोता, आप्त-स्वकीय, कौटुंबिक सदस्य किंवा अगदी शत्रु.. कोणीही असूं शकतं. असा, एखाद्याच्या वक्तव्याचा सारासार विचारकरून, लगेच उत्तर न देता, समजुतीनं संवाद करणारे लोक आता अभावानेच सापडतील. नजीकच्या इतिहासात, असे अनेक महात्मा होऊन गेले की ज्यांची वक्तव्य सुभाषितं झाली. आणि त्यांच्या शिष्यांनी त्याच्या गाथा, ग्रंथ लिखित करून, भविष्यातल्या पिढय़ांना उपलब्ध होतील अशी व्यवस्था करून ठेवली. असे लोक आदर्श असतांत, की ज्याची वागणूक पाहून तसं आचरण आचरण करावं ! चरण ऐसे दाखवा कोणी । रुध्द कंठे आसवे पांपणी । क्षणभर ज्याच्या भ्रमणी । सुखावेल जीव ।। 38 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-36 रंग ! आनंदाचा निधी । नजरेस घालतसे भुरळ रंगपंचमी निमित्त मायबाप वाचकांना शुभेच्छा, आयुष्यामध्ये सुखदुःखा सर्व रंगांचे प्रमाण जर योग्य असले तर आपोआपच, जगणे सुसह्य, आनंददायक होते आणि हे प्रमाण योग्य राखणे हे सर्वस्वी आपल्याच हाती असते ! संकटांत शांत राहून, ते निवारण्यासाठी नियोजन करणे आणि आनंदाने हरखून न जाता, तो सर्वांना वाटत, सगळ्यांनी त्यात सह- भागी करून घेत, `साजरा’ करणे घडलं तर आनंद द्विगुणित, बहुगुणित होतो, आणि मग इतरही आपल्याला त्यांच्या आनंदांत आपल्याला सहभागी करून घ्यायला प्रवृत्त होतात. संकटसमयी आपोआपच, एकमेकांचे हात मदतीसाठी सज्ज होतात. थोडक्यात, यालाच सुखदायी सहजीवन म्हणत असावेत कां? अनुभवी ज्येष्ठ, विद्वान, विचारवंत ? सुख ! जखमेवर फुंकर । सुख ! ना आनंदा पारावार । सुख ! निरव शांतीचा परिसर । वांछिती सकलजन ।ऑ। 916 दुःख ! वेदना अपरंपार ! दुःख ! उद्ध्वस्त मनाचे घर । दुःख ! तमगर्भी वावर । शत्रूसहि नको लाभाया ।ऑ। 917 सुखदुःखांचे रंग वेगळेपणाबद्दल असले तरी प्रत्येक रंगाला, भवतालच्या परिस्थितीप्रमाणे अर्थवाहित्व प्राप्त होते ! उदाहरणार्थ, एका भगव्या रंगांत क्रांतीच्या बीजाप्रमाणेच. प्रियकराला `केसरिया’ रंगांत न्हायला लावून शृंगाराची बीजसुध्दा रोवण्याची शक्ती निसर्गाने बहाल केली आहे. तसा `काळा’ लौकिकार्थांत अशुभ तरी डोरल्यांतले मणी काळेच हवेंत. आणि आपल्या तान्ह्यला दृष्ट लागू नये म्हणून माउली, आपल्या डोळ्यांतल्यां काजळाची, एक हलकी रेखा त्याच्या कपोली रेखतेंच.. नाही कां ? रंग ! शुभ्राचे प्रतिनिधी । रंग ! आनंदाचा निधी । रंग ! नजरेंस सर्वां आधी । घालतसे भुरळ ।। 918 रंग ! प्रकटती विविधांगाने । रंग ! वापरा निगुतिने । रंग ! देणगी पेरिलि निसर्गाने । जळी-स्थळी-काष्ठी -पाषाणी ।। 919 रंग ! पंचमहाभूतांचे अंग । रंग ! कधि शश, कधि नाग । रंग ! सुशीतळ कधी आग । प्रोत्साहन योगा वा भोगा ।ऑ। 920 अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-40 विद्वत्ता शुचिता संधी शोधत पळे सरले जेमतेम बालपण । युवावस्थेंत पदार्पण । गीतार्थ सागोनि सकळजन । उध्दरले ।। `संभवामि युगेयुगे’ ऐसे । सभोवताली आपुल्या कितिसे ?। प्रखर तर्क-बुध्दि-ज्ञानप्रकाशे । आयुष्ये उजळिली ।। आपेगांवी फुफाटा, उल्लंघुनी काटेरी पायवाट । गांठिले पैठण, निर्भत्सना ऐकुनी थेट । नेवाश्यास, पैसाच्या स्तंभी टेकुनी पाठ । उक्तिल्या ओव्या नऊसहस्र ।ऑ। 932 अनाथ भावंडे वरकरणी सामान्य । कोणां ना कळली महती अनन्य । `पोरे संन्याशाची’, हेटाळणीचा पर्जन्य । संतत साहिला ।ऑ। 933 इवली मुक्ता धाकुल्यासाठी । `मांडे करिते’ शब्द ओठी । वन्ही साक्षात आला भेटी । धाकुल्यापाठी कौतुके ।ऑ। 935 चम्तकार ना, जाणा मथितार्थ । प्रबल इच्छाशक्तीने सार्थ । अपेक्षित फलासहित । साधतस्कर्मयोग ।ऑ। 936 एखादीच ज्ञानोब्बा माउली, पाहिली, श्रविली अनुभविली जवळपास सप्तदशकांपूर्वी, भाग्यवंतांनी! आणि आजकाल ? एक तर आपण विरक्त आहोत असे ते स्वतःहून कसे सांगणार किंवा समजावणार ? त्यासाठी, कोणीतरी शिष्य, अनुयायी हवा ना ? `महाराज विरक्त आहेत ! कांही स्वीकारणार नाहींत ! जर कांही द्यायचंच असलं तर आमच्याकडे द्या ! त्यांच मार्गदर्शन आम्ही यथावकाश तुमच्यापर्यंत पोहोचवू !’ ह म्हणायला माध्यम हवे नां? सिध्दास हवी प्रसिध्दी आज । शोधिती अव्याहत काज । सोडोनिया मनाची लाज । कमरेचे घेती डोइवरी ।ऑ। 44 बरं, माध्यमं.. म्हणजे मुद्रित, ध्वनि किंवा दृश्राव्य.. उत्सुकच असतांत, `वैचारिक, परंपरावादी किंवा परिवर्तनवादी उक्तींना, लिखाणाला, किंवा कृतींना प्रसिध्दी द्यायला, त्यांवर सकारात्मक किंवा विरोधी चर्चा घडवून आणायला ! ज्यांना संधी मिळत नाही ते मग विविध प्रकारे, विविध व्यक्ती, संस्थांतर्फे पांठपुरावा करतांत सातत्यानं, एकदातरी `झळकायला’…. माध्यमांचे मोहक जाळे । विद्वत्ता शुचिता संधी शोधत पळे। मातीमोल तपश्चर्येची फळे । निमिषांत ।ऑ। 45 अशी अवस्था होते मग, शिष्यांमुळे त्या `विरक्त साधू’ ची…. अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-40 दमडय़ा अव्हेराव्या आम्ही? निस्पृहता धरू नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडो नये । वोळखीमधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 14/01/04 स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृह म्हणजे निरिच्छ. स्वतःसाठी काही हवे असे मनात सुद्धा न येणे.निस्पृहलक्षणात लालसेला स्थान नाही.निरिच्छपणे, निरपेक्षपणे, काहीही लाभाची अपेक्षा न धरता, कार्य करून, कुणाचे आशीर्वाद घेत, ज्याची इच्छापूर्ती झाली, त्यांच्या नजरेंतला कृतज्ञभाव बघत सुखावण कुणाला आवडणार नाही ? पण हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा अंतरी बाळगत जगत राहाणे, भवसागरात आधीच गटांगळ्या खात, आजूबाजूला तशाच अवस्थेत इतस्ततः तरंगणार्या कुटुंबियासाठी. बुडत्यांसाठी आधाराचा ओंडका हेणार्याला शक्य आहे. हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा, सहज म्हणजे जन्मतः थोडासा प्रमाणांत कां होईना बालकाच्या अंगी असावा लागतो, जो पुढे, योग्यता संस्काराने वृध्दिंगत करता येतो. याची पहिली पायरी म्हणजे मिशलेले एकटयाने न हडपता त्यात इतराना वाटेकरी `करून’ घेण्याचा संस्कार ! वस्तींत, जमांतींत, समाजांत राहाणार्याला हे शिकवावे लागत नाही. `जीवो जीवन्त जीवनम’ या उक्ती प्रमाणे, एकमेकां साहाय्य करींत, आला दिवस साजरा करींत, पुढे पुढे चालावच लागतं. दासांच्या कालांतर ते तपश्चर्येनं ज्ञानार्जन करून, सदुपदेश करीत असतांना त्यांचे शिष्य’गण’, रघुवीराच्यानांवानं आरेळ्या देत कुठलं `समाजकार्य’ करीत, झोळी सामान्यांच्या द्वारांत, त्यानं घाम गाळून मिळविलेल्या कमाईंतून शिजवलेल्या घासांतला वाटा मागण्यासाठी रुंदावत, `भिक्षांदेही’ करीत होते, कोण जाणे ? दात्याच्या अंगणांतली लांकड, सरपणासाठी, भिक्षेच्या बदल्यांत कुणी फोडून दिल्याचे कुणाच्यातरी ऐकिवांत असलं तर मला कळवाल ? ते काळी ते श्यक्य होते । निष्क्रिय भोंदू `संत’ कोते । पोट भिक्षेने भरत होते । कार्मिकांच्या दानांतुनी ।। 57 निस्पृहता कशासाठी ? । फुकटे फिरती अवती-भवती । कष्टसाध्य प्रयत्नांती । दमडय़ा अव्हेराव्या आम्ही?।। 58।। अरुण काकतकर 9822021521…