Sunday, April 12, 2015

।।भासबोध।। ११२३ ते १२०० + अध्याय चौथा १२०१ ते १५०० + अध्याय पांचवा १५०१ ते १६५४

प्राक्तन ! एक कारण । प्राक्तन ! आलस्यासि निमंत्रण । प्राक्तन ! कृतिशीलासि आव्हान । भेदून, करण्या क्रमणा ।। ११२३ प्राक्तन ! म्हणे विधिलिखितं । प्राक्तन ! 'हरी' भरवसा पात्र ?। प्राक्तन ! भरवेल कवळ मुखांत । म्हणावे शहाण्याने ?।। १२२४ प्राक्तन ! दावेल यश ?। प्राक्तन ! पळवेल विघ्नासं ?। प्राक्तन ! घडवेल विनासायांस ?। कार्य ! निद्रिस्त व्हा बिनघोर ।। १२२५ प्राक्तन ! ना वारेल उचित कर्म । प्राक्तन ! ना धारेल संपदेचे वर्म । प्राक्तन ! ना सजवेल विरूप चर्म। निसर्गदत्त ।। ११२६ तीन वर्षाची कवळी पोरं । माय बापान्ला नाही घोर । खाईल कुल्यावर फटके चार । ना जर मागेल भीक ।। ११२७ पायाला अखंड चटके । अंगावर धडुते फाटके । मुख्यमंत्र्याचे वारस नेटके । मात्र बापासवे शाळेंत ।। ११२८ जेवढी वाढेल प्रजा । मंत्रि'गणां'ची मजाच मजा । 'तापला तवा, पोळी भाजा' । अध्यादेश काढिती ।। ११२९ कुणा आली कणव दया । हृदय द्रवले, वोसंडली माया । पालन पोषण कराया । नेती पोरे स्वगृही ।। ११३० सवरु-शिकुनि मोठी झाली । ठाव स्रोताचा घेऊ लागली । मुळाशि येवुनि ठाकली । विचारण्या जाब ।। ११३१ डळमळतील सिंव्हासने । गडबडतील चांचरत वचने । डबडबतील अंत:करणे । कांहींची, कथेने ।। ११३२ दुर्गा शस्रधारि पाहोनी । भयभीत तळवे जुळवित दोन्ही । करतील दयेसाठी विनवणी । पापि नराधम अतिरेकी ।। ११३३ परिस्थिती होवू शकते ऐसी । मदांध उधळती संपदेसी । करोनि रिकामी जर धनराशी । प्रामाणिक कष्टकऱ्यांची ।। ११३४ पुराण इतिहासांत ऐशा कथा । अभ्यासता ग्रंथ, गाथा । किती टोकदार व्यथा । असते, येते कळोनी ।। ११३५ तान्हेला शुष्ककंठ तान्हा । मातेसही फुटेना पान्हा । घास नसल्याने क्षुधाशमना । कारणे रडती कळवळत ।। ११३६ तैसीच अवस्था जनतेप्रती । हाल अपेष्टा रोज भोगती । मधुचंद्र कधि, कधि झगडा, युती । जखमांवर चोळिती मीठ ।। ११३७ अनुभवाच्या प्राशुनि विषा । बोलला अमृताची भाषा । ऐशा माउली ज्ञानेशा । दंडवत ।। ११३८ माय-तात जरि रागेजले । बोबडे गोड तरि तान्हे बोले । नाही कांही नवल वर्तले । वडवानळावरी जळ ।। ११३९ ऐसेचि असते निरागसपण । निर्मळ हृदय, अंत:करण । दाम-दंड-भेदादि लक्षणं । अनैसर्गिक सूड, द्वेषापोटी ।। ११४० हे सगळे वृध्दापकाळी । उपदेशार्थ येते उफाळोनी । अनुभव उकळोनि, गाळुनी । अर्का संपृक्त निव्वळ ।। ११४१ ज्ञानार्जनासाठी असोशी । धारोनि मनि करितो तपासी । जाणा उज्वलेल भविष्यासी । शिष्य खरां ।। ११४२ प्रज्ञा लौकिकर्थि ग्रंथावगत अध्ययना । म्हणे आवश्यक असतोच कणा । तैसीचि इतर संगीत-नृत्या-अभिनय कलागुणा । स्रोतरूप आपोआप ।। ११४३ पण समाजभाग गतिमंदासही । कसब कांही तरण्या जीवनप्रवाही । जाणेनि, अभ्यासोनि न्यून त्याचेही । सुयोग्य दावावा पथ ।। ११४४ हे जो केरेल सहज साध्य । गुरु खरेचि होईल तो वंद्य । मन:पूर्वक श्रध्येय नि आराध्य । शिष्यासि ऐशा ।। ११४५ अशा या प्राक्तनाची अतर्क्य रूपे, पाहावयाची । होवू देत पांपणी काठांची । दहिवरे प्रळयजळं ।। ११४६ कां मी लिहितो भरताडं । कुणि उघडलं तरी कां हे बाड ? उघडोनि निद्रिस्त कवाड । पांपण्यांची ?।। ११४७ पूर्वरंगोत्तर आरती, मग उत्तररंग । कीर्तनाची दोन जरि भिन्नांग । उपदेशगर्भी मनरंजन अमोघ । वक्तेबुवा गाती अजोड ।। ११४७ डफ ढोलकी खंजिरी । पायी चाळ चढवुन नारी । लचकत मुरडत फडावरीद । कांचनसंध्या सजवाया ।। ११४८ वेणू, वीणा, एकतारा । डमरु, ढोल ताशे नगारा । तमगर्भी निद्रिस्त धरा । जागवाया नादावती ।। ११५० प्रारंभी 'जय राम कृष्ण हरि' गजर । एकात्म चित्त साधण्या एकत्र । संवादिनी सूर संगे थाप तबल्यावर, । टाळ करिती तोड योग्यस्थली ।। ११५१ धूलीकणहि दावितो अस्तित्व । पांपणीत ! स्पर्शिता क्षणभर अंधत्व । मुंगीसाठी आधारतत्व । होतसे गरज पडतां ।। ११५२ ना दिसति सुरक्षा रक्षक । वा लघु छपविलेले छायक । मग शोधतिल शार्वीलिक ?। कैसे, आणि कोठे ?।। ११५३ मशिद, चर्च, गाभारा । जीवास राखण्या बरा । प्रतिकृति न्या बाजारा । सजवा, पूजा वा बोळवा ।। ११५४ आगंतुक अतिथी आले । तर कामी येते उरलेसुरले । भर टाकुनि त्यांत वाढिले । क्षुधाशांत्योत्तर प्रसन्नता ।। ११५५ रांधू-वाढोनि स्वयंपाक । गृहिणी करिती झांकपांक । निवान्त निद्रा आपसुक । सुख समाधानाने ।। ११५६ 'पोकळी' हेची मूलतत्व । भ्रामक असते अस्तित्व । 'निर्गुण निराकारा'चे ममत्व । विरघळते स्वस्थळी ।। ११५७ कोण येतो कोण जातो । कधी कांही फरक पडतो ?। एकमेकांसि फक्त जाणवतो । पोकळी निरव, निस्तब्ध ।। ११५८ प्रार्थना, करावी प्रारंभवेळी । प्रांत:, माध्यान्ह वा सांध्यकाळी । सद्विचारासोबत, योग्यस्थळी । कार्यसिध्दी नि:शंक ।। ११५९ आपुले साधन कर्मयोग । कार्यस्थळि सर्वांशी संयोग । अनुभवाचे समृध्द जग । त्यांसि पारखे 'संत' ।। ११६० कशास पाहातांत 'पोकळी' । घेउन भिक्षेची झोळी । कोण टाकितो पुरणपोळी । 'पोकळीं'मध्ये ! हेरिती ।। ११६१ या म्हणावे जमिनीवरी । पडोनि पाहा संसारी । सांभाळा माय-बाप, पोरे, अस्तुरी । पोकळी वोसंडेल क्षणार्धांत ।। ११६२ नेमाने वाचा भक्तिबोध । जर अंत:करण होईल क्षुब्ध । सोडा दैवी 'चमत्कारांचा' शोध । एकचि उपायो, कार्यमग्नता ।। ११६३ चार दिसांची भातुकली । लाटणे, पोळपाट, टोप, पातेली । खेळणी सगळी इवली इवली । पंचमहाभूता हाती जीवमात्र ।। ११६४ कधि भात राहातो कच्चा । 'पोळी करपेल ! झडकरि उलथा' । पत्नीवर आरडे कपाळी मारित हाता । 'नवरे'पण जरि लटके ।। ११६५ साहित्य ? गूळ, शेंददाणे । चैनचं, मिळाले जर फुटाणे । बाळ ? बाहुलीचे रडण्, हसणे । हौस, नसते मोल तिला ।। ११६६ तेथे असते सुखचि सुख । प्रसन्न चेहरा संपता 'स्वयंपाक' । वेदना, दु:खांच्या झळा नाहक । ना फिरकत कधी इथे ।। ११६७ म्हणोनि नेहमी वाटते कां ?। 'सरोचि नये हे' ऐसे बालका । मोठेपण मारिते हाका । आपदांना आवताण ।। ११६८ संतांची सदुपदेशी उक्ती । शिष्य येरे गबाळे दुर्लक्षिती । 'जागविण्या' स्मृती वा जयंती । वर्तन करिती अर्वाच्य ।। ११६९ सद्हेतूने, वस्तींतिल गांजलेले । निवडुनी, समजाविले, उद्बोधिले । तरिही मर्कटलीलांनी उच्छादले । सामान्यांस त्यांनी ।। ११७० सुरक्षेची काय शाश्वती ? । विश्वस्ताची फिरली मती । फिरविण्या पाठ मिळाली संपत्ती । माहिती 'त्यांना' देईलं ।। ११७१ उंबरठ्याआंत ठेवला । ऐसा कैसा 'देव' भजिला, पूजिला । जर नाही अवडंबरे प्रदर्शिला । कळावे कसे वस्तींत ?।। ११७२ आम्हा सोडवा, करा मोकळे । बेड्या न चढवा बळेबळे । जत्रा उत्सवांचे सोहळे । वृथा भोग, शीर्षशूळ ।। ११७३ अरूपासि कसले अस्तित्व ?। 'मनासि दिसते' ? कल्पना भ्रामक । 'दावा आम्हासि!' म्हणतां कारणे अनेक । सांगती 'अध्यात्म'वादी ।। ११७४ 'जाउन एकांती,तप:श्चर्या करा, । ऐहिकाच्या मोहासि मारा । उपदेश ऐका, पण श्रध्दापूर्वक भरा । झोळ्या आमच्या नेमाने' ।। ११७५ न जमले, चिंता सोडा । सज्ज पाप-पुण्य व्यापारा । खर्चीला कांही आम्हाला मुद्रा । लुटा सुख बिनघोर !।। ११७६ उगा का म्हणावे 'माया' ?। कसब लागते तंत छेडाया । अंगुलि अग्रभागी जपाया । कष्ट प्रारंभी बहु ।। ११७७ सवयीने सुयोग्य कठोरता । कराग्रा कालांतराने लाभता । तंत स्वरांकित सहज होता । समाधी, साक्षात्कार ।। ११७८ विविध रंग फिरता अति वेगे । शुभ्राचाचि भास राहतो मागे । हे सारे विज्ञानयोगे । जाणती सहज बालकेही ।। ११७९ विश्व सारे विज्ञान भारितं । 'माया' संबोधिणे नाही शोभत । तेचि सत्य जगरहाटींत । प्रमाणींत संशोधनोत्तरी ।। ११८० अनाकलनीय म्हणजे कां माया ?। कळोनि रिचवा-पचवाया । तयार असावे मन-वाचा-काया । भ्रम सारे निवारण्या ।। ११८१ राजकारण, व्यवसाय । निरुद्यागेयासि 'तरणोपाय' । 'पोटभरि'साठी खेचिती पाय । मतदारांचे, कर्दमांत ।। ११८२ सत्ता, संपदा येते, जाते । जाणती कलाकार, गुंड, नेते । टांगती तलवार देते । डोक्यावरची.. भान सदा ।। ११८३ अदृश्य झाले गाड्या-घोडे ?। परत ठोठवा कवाडे । अश्वासनांचे दावून गाठोडे । भीक मागण्या मतांची ।। ११८४ कोण कसा कधी फिरेल । मन, बुध्दी विचलित होईल । शत्रूचेही गोडवे गाईल । निसर्ग जसा अवकाळी ।। ११८५ कोणाची कोणाशी युती । कोण जाईल कोणाच्या सांगाती । सदासर्वदा मनांत भीती । सर्वसामान्यपणे ।। ११८६ आवरा आवरा शिष्य'गण' । दावितांति अवलक्षण । संतोपदेश, कर्मयोगि विलक्षण । भाकड भरुनी वितरती ।। ११८७ सांगतील अतर्क्य कर्मकांडे । 'ना तर जालं नरकाकडे' । वेळीच घालण्या साकडे । मुद्रा' म्हणती, 'टाका ओंजळींत !' ।। ११८८ ऐसा चाले व्यापार । पुण्याचि भरण्या घागर । जिथे असते प्रार्थनाघर । श्रध्येय इष्टाचे ।। ११८९ तबके, नारळ वा चादरी । वाढविण्या, चढविण्या करती वारी । पिंडीसमोर वा पीरावरी । नेमाने ! दुर्लक्षुनि कर्मधर्म ।। ११९० ऐशांस कैसे समजावावे ?। उपाय कोणते योजावे ?। ज्यायोगे निरसन व्हावे । अंधश्रध्दांचे ?। ११९१ परंतु परंपरावादि कर्मठ । बसले कवटाळोनि 'कुबट' । प्रतिष्ठापोनि 'जाल'मठ । वारावे कैसे ।। ११९२ सोडावे लागेल अहिंसातत्व । तुकोब्बांचे स्मरोनि 'अभंग'त्व । लाठीधारी नेतृत्व । लागेल स्वीकाराया ।। ११९३ दहा महिने पूर्ण झाले । जे मानसी संकल्पिले । पूर्णत्वास नेण्यास,आपुले । साहाय्य मागितो पामर ।। ११९४ धाडा 'समर्थ' एक ओवी । त्या आधारे वाटते चढावी । शतके बारा ! अर्पावी । घोषित, 'इदं न मम' ।। ११९५ लावोनि उत्तम 'व्यसन' । मागे सरणे, दुर्लक्षुनं । चक्षु देवोनि विलक्षण । नका झाकूं 'दृष्टि' माझी ।। ११९६ दहा मास अति दाहक । थंड गारवा शिडकला 'पावक' । ऊर्जा आंच आनंदोद्भावक । लेखनाची ! अनुभविलि मियें ।। ११९७ वेदनाशमनार्थ फुंकर । जो घालितो, जावा न कधीच दूर । स्वार्थी जरि 'असला' विचार । प्रामाणिक परि, जाणा ।। ११९८ भवतालचे दु:ख, विवंचना । अस्वस्थता हरघडी मना । 'स्व'त्वास देण्यास दाना । ओंजळींत घेतले म्या ।। ११९९ प्रेरणास्रोत प्रवाही, 'समर्थ' । ठावके नाही, कितिसा सार्थ । ओहळ ओढाळ अंतर्मनांत । उचंबळला जो ।। १२०० (२२ एप्रिल १०१५, विनायकी चतुर्थी, प्रभांतकाली १० वाजता) अध्याय चौथा: बालपण विखारू नका त्यांचे । शिकवतीलचि प्रसंग अनुभवाचे । सांगोनि 'भीषण' भविष्याचे । हिरावू नका आनंद ।। १२०१ वारसा देता तुम्हीचं ना ?। मग कशास करिता 'सावध' मना ?। रुजता, फुलता, फळतांना । हर्ष कल्लोळी लोळू द्या ।। १२०२ उद्याच्या दु:ख, वेदना । सांगा, चुकल्या कधी कुणा ?। आणि वारण्या त्यांना । 'बलवंत' ते होतील ।। १२०३ नका करू फार चिंता । प्राक्तनांतली सुखे, व्यथा । 'परतविण्या अरिष्टा, चालवा हाता' । शिकवण द्या कष्टांची ।। १२०४ हरळीवरच्या सुखद वाटे । कशास त्यावरचे दावता काटे ?। सुखी पैरण सहज कुणा भेटे ?। विचारा मनासी ।। १२०४ घरगृहस्थी, संसार वाढवितो । सुख-दु:खे झेलोनि परतवितो । कोण स्वान्त:सुखाय जगतो ?। एकलकोंडा ।। १२०५ निसर्गाने दिले अनमोल जिणे । हिंस्र, जीवजंतू, जित्रापासह जगणे । 'घर' सर्वांचे स्वाभाविक होणे । अनिवार्य ।। १२०६ विखूरले, विसविशींत ऊर्जास्रोत । तंत्रज्ञानें केले जर संपृक्त । पुराण, इतिहास होईल ज्ञात । दृक्श्राव्यांतुनी ।। १२०७ ऊर्जाचि केवळ अखंड अमर्त्य । अस्तित्व तिचे विविध रूपांत । पंचमहाभूती सर्वांगांत । विघटित वा एकवट ।। १२०८ जे दिसते ते आहे अथवा होते । अवकाशस्थांचे सत्य विज्ञान सांगते । परावर्तित प्रकाशयोगेचि असते । वा भासते, 'अस्तित्व' ।। १२०९ प्रकाशवर्ष, 'महा'कालगणन । प्रवास प्रदीर्घ, अगम्य निलक्षण । दृष्टिपथांत तेजोकिरण । येता ! म्हणा 'आहे तिथे' ।। १२१० परंतु जाणा, तो केवळ भ्रम । 'आहे'चे प्रमाण दूरस्थ तम । मोजण्या अपुरे, अक्षम । प्रगत तंत्रही ।। १२११ गुन्हा न केला तरी दाखल । गुन्हा केला तरि ना दखलं । ऐसे सत्ताधारी गुंड नि रक्षकदल । जगावे सामान्याने कैसे ।। १२१२ आत्महत्या जर झाली सफल । मरत जगण्यातुन सुटालं । पण जर प्राक्तनें अर्धमेले सापडाल । तर मारतील जगतांना पुरते ।। १२१३ काय फ़रक पडतो 'त्यांना' ?। कशास सोडतील सिंव्हासना ?। नशेंत सत्तेच्या असतांना । ज्ञानेंद्रिये मृतावस्थ 'त्यांची' ।। १२१४ वयांत येता जडतो जीव । प्रेयासाठी सर्व हावभाव । हसणे, झुरणे, रडणे प्रभाव । दाविती उत्कट काळी ।। १२१५ मग बोहले, बाशिंग, चौघडे । नवे पर्व जगण्यांतले वेडे । संसारवेलीवर गोंडस बछडे । आनंदकंदा ना पारावार ।। १२१६ अन्न, वस्त्र, निवारा या गरजा । पुरविता ओहोटीस लागते 'मजा' । 'फक्त आतां तू राणी, मी राजा' । शब्द विरती हळूहळू ।। १२१७ कालांतरे पालथे होते । घरभर छकुले रांगू लागते । पडते, झडते, खट्याळी दाविते । प्रेमपात्रास मात्रा वात्सल्य, ममतेची ।। १२१८ 'घर' होते आप्तांच्या हृदयी । पोरे, अस्तुरि, माय-बापा ठाई । चार भिंती, छप्पराखाली डोई । बांधण्या क्रमप्राप्त, मृत्तिकाखनन ।। १२१९ घर ! दोघांचे ? नाही राहात । घर ! प्रार्थना, परवचादि संस्कारस्रोत । घर ! अबालवृध्द आप्तांसमवेत । सजविण्या, शमविण्या सौख्य, आपदा ।। १२२० घर ! मृत्तिकेंत तुलसीबीजं । घर ! शेंजेवर शांत नीजं । घर ! बंधन सिंधुचि अखंड गाजं । गृहस्थाश्रमी ।। १२२१ नका दृष्ट लावू त्यांसी । एकरूप झाले संसाराशी । हसत सदा राहू दे मानसी । 'विरक्ती, अध्यात्म' लादू नका ।। १२२२ करंटी दांपत्ये ऐसी कैसी । जीव जन्मासि अजाणता घालिती ?। पोरके सोडोनी दूर जाती ?। अश्राप, मुक बिचारे जीव ।। १२२३ शोधत हिंडावे लागते त्यांना । माया, वात्सल्य शांतवना । लपवावी की दाखवावी कोणा । आसवे, जैशा पागोळ्या झडीनंतर ।। १२२४ शिष्याची मानसिकता । नेहमीच धारावी कार्य करिता । काय शिकवेल, कोण नकळता । कोठे, कधी अनिश्चित ।। १२२५ कर्मेंद्रिये कार्यरत असतां सगळी । ज्ञानेंद्रीये ठेवावी मोकळी । अतिरिक्त, भरावी मगज पोकळी । ताज्या, नव्या जाणिवांनी ।। १२२६ श्रवण, मनन, अध्ययन । अखंड करावे ज्ञानार्जन । तदनंतर अनुभव कथन । करणे, शोभते ज्येष्ठांसी ।। १२२७ संकलनापूर्वी टिपण । क्रमवारीने प्रसंगांचे लिखाण । ऐसा संकेत सर्वसाधारण । असावा साहित्य निर्मितींत ।। १२२८ तसे पाहू जाता । कोण जगी सर्वज्ञाता । जो समजेल 'झालो आतां' !। मृतचि जाणावा ।। १२२९ ज्यांस सर्वज्ञान मिळेल । जो स्वर शुध्दोत्तम गाईल । कसब लंघोनि जाईल । इहलोकी राहात नाही ।। १२३० म्हणोनि जाणावे अंतरंगी । न वागा-बोलावे अतरंगी । सर्वसुखप्राप्त असा जगी । ना ठावके, कोण झाला ।। १२३१ विश्लेषण, समीक्षा, मर्मभेद । चिकित्सोत्तर, विद्वानांशी वादविवाद । चर्चा प्रेक्षकाभिमुख मग सुबोध । अजमाविण्या परिणाम ।। १२३२ सारे अखेर लक्षितांसाठी । विद्यार्जन, अध्ययन करिति बहुपाठी । अर्काच्या मात्रा शेवटी । उतरावावया कंठांत ।। १२३३ प्रत्येकाची कर्मकथा, प्रवास वेगळा । हुरहुर, आपदा, आनंद आगळा । तरि सामान्यतः सगळा । सरिखाचि 'मनुष्य' ।। १२३४ अंगण सारवुनि सड़ा-शिंपणं । उष:काली रंगावली रेखुन । उडळुन ज्योतीने, वृंदावन। वंदन करुनि परतसे ।। १२३५ वेणी- फणी, मुखमार्जन । आन्हिके उरकोनि अभ्यंग स्नानं । मन:शांतिस्तव योगाचरण । करोनि, जुंपतसे संसारा ।। १२३६ नियोजन, पुरवठा, प्रक्रिया । स्वयंपाक आप्तांसि सुखवाया । नित्यनेमाने अविरत काया । झिजविते, सुगृहिणी ।। १२३७ पति-मुलांची मग पाठवणी । वृध्दांची दुखणीबाणी । कुणा औषध, कुणास पाणी । दुर्लक्षुनि देतसे स्व-व्यथा ।। १२३८ सहज सरते दुपार । करिता झांकपाक, आवरसावर । दोन पळांच्या विश्रामास प्रहर । शोधता होते दमछाक ।। १२३९ संध्याकाली निरांजन धूप । श्लोक, परवचादि संस्कार प्रदीप । मुलांसि ! मग दृष्टिक्षेप । पतीकडे, प्रेमभरे ।। १२४० हा खरा कर्मयोग । आप्तांसि देत सुखोपभोग । दावाया हिला 'अध्यात्मिक जग' । 'पळपुट्यां'नो, धजू नका ।। १२४१ सारेचि कां अवतरले पळपुटे । म्हणति, मी परमारार्थाकारणे झटे'। सोडोनि घरे, तोडोनि नात्यांते । 'भोगोत्तरी' संतपद ?।। १२४२ त्यांचेही असेल कांही म्हणणे । रोज रडत जगत मरणे । दर क्षणी पावकाशी लढणे । होत असेल असह्य ।। १२४३ म्हणोनि सुखवाया पळभर । अवलंबित पति-पत्नि परस्पर । बेभानी, नशा, नेते उंचावर । जातो सहजचि तोल ।। १२४४ कोण एक शुक्रजंतू । बीजांडांत पाहातो रुतू । कदाचित विनाहेतू । जाते जडोनि निमिषांत ।। १२४५ दुर्भागी साकारतो जीव । विनाकारण, कार्यभाव । पदरी भविष्याचा अभाव । घेवुनि सडत पडत तडफडतो ।। १२४६ दोघे पांगती दोन दिशांना । वेशास टांगत, 'लग्न' संस्था, वचनांना । चुरगळून, तोडित नाळ ।। १२४७ एवढं सगळे करुनि सायास । जन विचारिती 'काय करतेस ?'। संसारासि 'काम' मानावयास । जडावते मन त्यांचे ।। १२४८ ।। दास-वाणी ।। जेणे जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयास नाही कामना । जयास नाही कामना । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/५६ ज्याने सर्व प्रकारच्या चवींवर विजय प्राप्त केलाय. खाण्यापिण्यातले हवे नको संपून गेलय .जीभ हे ज्ञानेंद्रिय तसेच कर्मेंन्द्रिय ही आहे म्हणून ज्याचा बोलण्यावरही ताबा आहे. वासना म्हणजे अपूर्ण इच्छा . कामना म्हणजे वासनांचे प्रकटीकरण . जो पूर्णतृप्त म्हणजे निर्वासन झालाय . इच्छाच संपवून टाकल्याने जो निष्काम झालाय तो खरा सत्वगुणी . कशास करिता खटाटोप ?। कामनांना द्यावया निरोप । श्रमले, कष्टावले रूप । जनांचे न दिसें ? आंधळ्यांनो ।। १२४९ अविरत उपदेशांचे जंजाळ । सामान्यांसि सदासर्वकाळ । दावोनि, 'आपत्तीचे मूळ, । पाप पूर्वजन्मिचे' बरळता ? ।। १२५० सहनशीलतेलाही असतो अंत । स्मरण, संतां'नो, राहू दे मनांत । करतील, करवतील आकांत । दंड, भेद अवलंबुनी ।। १२५१ राम ! मनुष्यत्वाचा आदर्श । म्हणवित त्याचे 'दास' । सुखाचे चार घास । सामान्यांचे कां गिळता ?।। १२५२ खरेच वदला हे, सांगा, तुम्ही ?। विश्वास कैसा राखावा मनी ?। 'बोघ(?)' अतर्क्य दूर ठेवोनि । पळू पाहतिल लक्षिते ।। १२५३ वारंवार छळदायी ठरते । ठेवा हृदयी तुमच्यापुरते । किंवा मूर्ख, भाबड्या श्रवणार्थे । अध्यात्म, मोक्ष, गत्यादि भाकड ।। १२५४ नका आणु आतां दृष्टीपुढती । मोक्ष, उपास-तापास, भक्ती । आमुच्यापासोनि निवृत्ती । घ्या, भले जर असला ! ।। १२५५ निर्गुणाच्या शब्दांगी 'गुण' । म्हणजे नाही त्यासि वेसण । असले अनाकलनीय येडेपण । कां बा करिता ?।। १२५६ 'सगळे' म्हणतां, 'त्यागावे' । अन् भजन तुमचे आळवावे । आळवावर 'पत्र पतितं तोयं' पाहावे । पाऱ्या-वाऱ्यासारखे नश्वर ?।। १२५७ हाती घ्या तरवारी, भाला । मज पाप्यावर घाला घाला । 'मोक्ष' शतप्रतिशत तुम्हाला । जर हवा मरणोत्तर ।। १२५८ फाडुनि कोल्हे, कुत्री पार्थीवास । खातिल क्षुधाशमनार्थ । पाहण्या सोहळा तो खास । आवंतण धर्ममार्तंडांसि द्या ।। १२५९ संधी तुम्हसि मिळेल 'कुंभां'त । नग्न निर्लज्जांच्या मांदियाळींत । पाडा, तोडा, ओढा फररटत । भक्तांसि करमणूक पळभरी ।। १२६० लावणी जैसी शृंगारिक । ओवी जैसी भक्तिभावजनक । शब्द जैसै विविधभावांचे दर्शक । तैसे आम्ही जाणिजे ।। १२६१ वृध्दापकाळी आपोआप । निवृत्ती उघड़ते झाप । वासनांना लागते झोप । झेप नष्टत्वाकडे घेता ।। १२६२ सेवा निरपेक्षपणे करिती । परि कोठेही न 'झळकति' । ना कधिही कार्याची मागती । पावती कुणाकडे ।। १२६३ 'कर्ते'अनेक ऐसे ठाई ठाई । दख़ल कोणी जरि घेत नाही । वंचितांप्रति कार्यप्रवाही । लंघून जाती कल्लोळ ।। १२६४ ना याचना ना मस्ती । केवळ समाजकारणी प्रवृत्ती । आधी याचना मग मस्ती । दृश्यमान 'राजकारणी' ।। १२६५ शासनानुदाने सुखावती । पुलाव-पुऱ्यांनी क्षुधाशांती । धाक-दपटशा जनतेप्रती । 'पाळलेल्या' गुंडांचा ।। १२६६ संघ, शाखा, परिषदा, मंडळे । अनुदानासाठी खटाटोप सगळे । मंत्री, संत्री मान्यतेसाठी वेगळे । निकष लाविती सोईने ।। १२६७ मग कशाला मागतील हिशेब ?। मांडवली, सारवासारव आपोआप । विरोध, मतभेद पावती लोप । मिळतां खिरापत सर्वांना ।। १२६८ कधि अस्तुरिची प्रतारणा । कधि पति'राज' हाणती वाहाणा । कधि आप्तां(?)ची लुडबुड बुडविण्या । संसार 'लाडक्या'चा भवसागरी ।। १२६९ कधी अपुरा अन्न, वस्त्र, निवारा । भाग पाडे पोरके करण्या पोरा । संकटांचा वादळवारा । असेल होत कारण ।। १२७० तरिही ऐसे कैसे निर्दय । होती पालक, बाप-माय । रक्तवांछित होत नाही हृदय ?। हात छकुल्याचा सोडतांना ।। १२७१ कधि जन्मत:च व्याधिग्रस्त । छकुल्याचे हाल वाढतांत । दारिद्र्याने आधीच त्रस्त । नाइलाजे त्यजून त्याना, सोडिती ।।१२७२ भक्ती ! केवळ प्रार्थना, पूजा, आरती ?। भक्ती ! केवळ देते अध्यात्मिक उन्नती ?। भक्ती ! केवळ तोडते नाती ?। गृहस्थधर्माची ।। १२७३ वोसंडुनि छकुल्यांचा, वाहे उल्हास । पाउले थीरकती नाचण्यास । उचंबळ मायेच्या हृदयांस । आनंदविभोर घर सारे ।। १२७५ मन ! परजाणिवेपल्याड । मन ! अजोड, बंद कवाड । मन ! टिपण्या, शोषण्या अखंड । अथांग, अनंत पोकळी ।। १२७५ मन ! सहजपणे अप्राप्य । मन ! अवघड, अनाकलनीय, अजेय । मन ! मूलत:, निर्व्याज,निष्पाप । जैसी माती कुंभाराची ।। १२७६ मन ! शोधते सुयोग्य विरंगुळा । मन ! वात्सल्याच्या विविध कळा । मन ! प्रेम, ममताभावे जळा । पांपणीकांठी साकळते ।।१२७७ मन ! असते कर्मनायक । मन ! साधते सारासार विवेक । मन ! मोहक वा भयानक । कल्पनांचे जनस्थानं ।। १२७८ कोणा, 'मानं' हानीची 'सल' । कोणा पाहावेना आप्ताची घालमेल । कोणा गुंतल्या संपत्तीचे मोल । करि अस्वस्थ ।। १२७९ बघा बघा मारेकरी,गुन्हेगार । ज्याच्या नांवाचां जयजयकार । अजब न्यायदानाचा प्रकार । जणु कुतरे मेले पदपथी ।। १२८० 'राम ?' 'शास्त्री ?' नांवे नुसती । इतिहास, बखरी केवळ सजविती ?। अप'मान' झाल्याची पुरती । 'सल' ठुसठुसेल जन्मभरी ।। १२८१ ऐसे कैसे झाले भोंदू ?। नामवंतांचे हृदय, मेंदू । दुष्कृत्यासि पाहती भेदू । दिखाव्यास्तव केवळ ?।। १२८२ निरुद्योग्यासि आनंद अनावर । शहर-वाड्या-वस्त्यांभर नवल वर्तेल अवनीवर । गेला जर बेलगाम, उद्दाम, गजाआड ।। १२८३ मने आपली मुर्दाड झाली । घट्टे पडोनि, शिणली, थकली । पराभूत करण्या अनिष्ट 'कली' । झेपावेल कुणि 'वैनतेय ' ।।१२८४ कधी उगवेल तो भास्कर ?। शस्त्रधारी, लेवून पर । आमुच्या आकांक्षांचा आधार । जडावल्या पांपण्या ।।१२८५ उपदेशाचा अतिरेक टाळा । वेळीच स्वत:स सांभाळा । क्रोधाग्नीच्या अन्यथा, ज्वाळा । भिडोनि तुम्हा जाळतील ।। १२८६ भयगंड नका कुरवाळू । हातांतुन गळतेच वाळू । उपासना जपजाप्याकडे वळू । पाहता ! ठरेल व्यर्थ ।। १२८७ जे ठरले आहे होणे । ते अशक्य आहे टळणे । म्हणोनि हिरमुसून बसणे । बरे नव्हे संसारी ।। १२८८ 'कर्मानेच मिळते फळ, । कठोर परिश्रमांची कळ । जीवघेण्या परिस्थितीचा जाळ । सोसावा लागतो त्यासाठी ।। १२८९ एक श्वान बाहेर अंगणांत । एक घरांत खाटेवर व्याधिग्रस्त । करोनि प्रत्येकजण व्यस्त । व्यवस्था, आपल्या पंरीने दोहोंची ।। १२९२ ऐसी अवस्थेप्रत कां यावे । कशास उगा श्वास चालावे ?। काळीज नियमित धडधडावे । अकारण ?।। १२९३ तैसे हे जगणे काय कामाचे ?। विनाकारण भार गृह,धामाचे । क्रूरपण कराल मृत्यूचे । जाणवावे येथेही ?।। १२९४ भूतांनो, नजरे समोर अंधारी । म्हणत, कण्हत चालणे कुठवरी ?। पुरे झाले, वाटे परोपरी । तरि भोगणे ! प्राक्तन ।। १२९५ कधि होईल आनंद-सोहळा ?। जीव पार्थिवापासोनि वेगळा । संपतील अस्तित्वात्या झळा । कुणा ठावे ?।। १२९६ सारे पंचतत्वागाठी । तेच ठरविणार आहुती । कैसी, कोठे विलयांती । द्यायची,आम्हा क्षुद्रांची ।। १२९७ दुराग्रह तरुणाईंत स्थाई । परंतु तिच्यापासोनि सुटका नाही । सिमित ठेवणे श्यक्य होई । मोजक्यांसी ।। १२९८ ज्याने जिंकिला अवगुण । खचितचि जाईल ओथंबुन । हर्षोल्हासाचा श्रावण । वर्षेल सरी सुखाच्या ।। १२९९ दिसो लागला आतां पैल । चित्त, वृत्ती, जाणिवा सैल । सुख, विषाद, वेदना, शल्य । निमाले ! उजळल्या सहस्र ज्योती ।। १३०० (१० महिने, २५ दिवस) दान मागोनि थोडेचि मिळते । पसाय, पसरोनि पदराते । जेंव्हा कष्टवावे शरीरांते । प्रसाद कवळाचा, प्रतिसाद ।। १३०१ प्रसाद ! मिळावा काय कारणे ?। प्रसाद ! त्या वाचोनि अडते जिणे ?। प्रसाद ! इतरासाठीही मागणे ?। जोपासणे कृतिक्षती ।। १३०२ कर्मेंद्रिये जर असतील कार्यरत । लक्षित परिणाम कष्टाने साधत । प्रसाद 'कवळ' मुखापर्यंत । सहजपणे येईल ।। १३०३ प्रसाद फुकटा न मागता । वृत्तींत रुजवा कार्यप्रवणता । 'आळस' व्यसनाची दाहकता । जनसामान्यांना घातक ।। १३०४ 'दान' 'नमोजि आद्या'स मागावे । 'माउलीं'नी वाटले, सद्भावे । अपेष्टा पाहाता हृदय द्रवावे । ऐसा बालयोगी, निष्पाप ।। १३०५ विषहि पचविले स्नेहार्द्राने । बोचरे बोल ऐकविले प्रतिष्ठानें । निष्ठा, निरागसता, निर्मळता प्रतिष्ठेने । रुजविती, जोपासली,सत्कर्मांत ।। १३०६ रेटत दररोजचे जिणे । कालापव्यय नामस्मरणे । 'प्रसादा'ची प्रतीक्षा करणे । 'जन्मा'वर अन्याय ।। १३०७ भक्ती, जपजाप्य उपासना, । ठावके एवढेचि होते भाबड्यांना । भिक्षा मागोनि उदरभरणा । न वाटतसे लाज ।। १३०८ 'माउली'स ज्ञात नव्हते । फुकटखाऊ, मिळण्या आयते । सोकानलेले बोके होते । संधी ऐशा शोधीत ।। १३०९ बाहेर प्रतीक्षेंत प्रार्थनास्थळी । भाबडेयांची जिथे मांदियाळी । 'दान देउनी भरतिल झोळी । खचितचि' वदति विश्वासें ।। १३१० जे वांछील ते त्यां मिळेल । रंध्रांतुनि जर स्वेदगंगा वाहील । म्हणे 'हरी खाटल्यावर देईलं' । 'पसायदान'भक्त, जाणा ।। १३११ 'तुक्या' संसार अविचारे सोडोनी । लागला 'इट्या' च्या भजनी । श्वापदेसुध्दा अपत्ये पत्नि । नाही वाऱ्यावरी सोडतं ।। १३१२ त्यजिला संसार जयाचिये आवडी । त्याने भवसागरी कधि कावडी । वाहोनि, जपली शेतीवाडी?। कैसा ? ज्यास ना अस्तित्व ।। १३१३ पोटावर हात ठेवोनी । मुख सताड उघडोनी । लांब पाय पसरोनी । बसल्याजागी निद्रिस्त, तो आळशी ।। १३१४ मुखावरची माशी न वारे । चिर्रविचित्र ध्वनि करित घोरे । जगण्यांतल्या अमूल्य मारे । वेळेस ! तो आळशी ।। १३१५ सांगो जावे कार्य कांही । कधीच नाकारित नाही । प्रत्यक्षांत टाळू पाही । सबबी देत ! तो आळशी ।। १३१६ दोन वेळा भरपेट । न चुकता अन्नग्रहण करित । हालचाली पासोनि मुक्त । ठेवितो, तो आळशी ।। १३१७ जो आयतखाउ सोकावला । ज्याने कार्यभाग नाकारला । विकृत व्यसनांच्या आहारी गेला । खचितचि जाणा, तो आळशी ।। १३१८ ऐशांसि करावा प्रतिबंध । विवाहोत्तर नाते संबंध । जोडण्या ! करावा प्रबंध । ठेवण्या दूरचि त्यासी ।। १३१९ अग्रभागी ? चर्चेंत केवळं । किंवा सामान्यत: मुखदुर्बळ । कार्यप्रवणतेस कैसे बळं । मिळावे यांना ?।। १३२० आर्त विश्वाचे रिचवुनी । प्रदीप्त तर्क-बुध्दीनं करोनी । गीतासार सामान्य जनी । जागविले योग्याने ।।१३२१ हाच होता अज्ञानाचा 'रेडा' । श्रवणेंद्रियांना देउनि वेढा । स्वर्णानुभवाचा ! उध्दरिले मूढा । श्वासागणिक योग्याने ।।१३२२ योगी ! वैश्विक ऐसा असतो । योगी ! परमार्थासाठीच जगतो । योगी ! स्वत्व क्षणोक्षणी विस्मरतो । म्हणती 'माउली' त्या कारणे ।।१३२३ ना एकही कठोर व्यंजन । उक्त ओवी, मृदु संभाषण । दृष्टांत-रूपक-उपमादि अलंकरणं । 'मराठीच्या बोलू' ममत्वे केले ।। १३२४ धर्माचरण, माणूसकी विरहित । कर्म-कठोर रूपे होती, भिंत । स्वार होवोनि, निमिषार्धांत । निवृत्ति-ज्ञान-सोपान-मुक्ते चालविली ।। १३२५ प्रामाणिकासि घाला आळा । भ्रष्टाचार जपा, सांभाळा । तोच तारून नेतो कठिण काळा । 'तत्व'ज्ञान सद्यकाली ।। १३२६ प्रामाणिकासि काय मिळते ?। प्रामाणिकासि केवळ सत्य कळते । प्रामाणिकासि कधी न फळ ते । लाभते सहजी ।। १३२७ प्रामाणिक ? वेडा रे वेडा । प्रामाणिक ? झारींतला खडा । प्रामाणिक ? उघडा पाडा । जोपासण्या दुष्कृत्ये ।। १३२८ सहज सद्भावापोटी। परिवार, आप्तेष्टासाठी । सत्कृत्ये कोटिच्या कोटी । घडूं नये, कां ? सांगा ।। १३२९ कशास, बैठकीस गिरद्या गाद्या । लाजविति ज्या मारेकरी गारद्या । खंडोनि सत्कर्मांच्या नद्या । 'आलस्य' बेटे निर्मिती ।। १३३० जळ उधळे तुषार बिंदुरूपे । तेजोशलाका किरणरूपे । समागमे प्रसवती रंगरूपे । शतछटा सजविती ।।१३३१ संतपदाची प्राप्तोनि गादी । सुकर्म ? नाइलाजे उपाधी । ऐसे झाले या आधी । बहुतवेळा ।।१३३२ कुणा 'बाबा' चा छकुला । जन्मला उध्दरण्या सद्यकाला । डिंडोरे पिटोनि म्हणति झाला । 'बालयोगी' ! मूढ खुळे ।। १३३३ गांगरोनि जाय बालक । झुंडी लोटता हेतुपूर्वक । फळे-फुले-मिष्टान्न-उदक । वाहण्या त्यां 'चरणी' ।।१३३४ हे तर सर्वज्ञात विज्ञान । अशीच खेळती मने, मन । द्वेषा पासोनि प्रीतिची जाण । मग तमगर्भी इंद्रधनू ।।१३३५ लांगूलचालन अथवा नमन । करो नये अकारण । पारखोनि घ्यावे चरण । स्वाभिमानि सामान्य जनांनी ।। १३३६ चारित्र्याचे वृथा हनन । जोखोनि वरवरचे लक्षण । अंतर्मनाचे बारीक निरिक्षण । कृतीपूर्व करणे अनिवार्य ।। १३३७ मनना आधी सारासार विचार । बोलण्या आधी निवडोनि शब्दभांडार । लिहिण्या आधी आधार । पूर्वानुभव, परिणामांचा घ्यावा ।। १३३८ कोठोनि येते कळेना । स्रोताचा उगम, ठिकाणा । वाटतो कधी 'वेडेपणा' । शब्दकर्दम, छळवादी' ।। १३३९ तेजोशलाकांची कवळिक । जणु अलवार झाला पावक । प्रसन्नवेळी जैसा पाळितो विवेक । प्रमादांप्रति अपत्यांच्या ! पिता ।। १३४० जिगिषा करते मात । सर्व आपदा संकटांत । असेल उर्जा वातावरणांत । घरात, आप्तेष्टांत, सकारात्मकं ।। १३४१ अज्ञातांतुन मूर्तरूप सांडणे । सगुण साचणे, साकळणे । जड होवोनि निखळणे । जाणे, न परतण्यासाठी ।। १३४२ अनंताचा एक अंश । न टळतसे कर्मोत्तरी ऱ्हास । जे जे पावते जन्मास । नाश त्यां सोबतीला ।। १३४३ तरिसुध्दा प्रसन्नता । मनास देते उभारी, पाहाता । नित्यनूतन रूपे साकारता । पंचतत्वांची, भवताली ।।१३४४ मित्रा ! दे हात हातांत ! मित्रा ! नको आतां अश्रुपात । मित्रा ! धीराने क्रमणा उर्वरित । करूया ! देत आधार परस्परा ।। १३४५ मी जाणतो वेदना तुटण्याची । अखेरची गांठ सुटण्याची । वस्त्र, विसविशींत भंगण्याची । शांतवन नसे सोपे ।। १३४६ आठवणींच्या मग लाटा । आर्द्र पांपण्या ठेवोनि परतता । हुंदक्यांचा असह्य भाता । अविरत ! आवरणे कल्पनांतीत ।। १३४७ जैसा पुळणीवरी कल्लोळ । निरखुत असते प्रकांड आभाळ । शशि आभावी ओहोटीची वेळ । जाणतो केवळ निसर्ग ।। १३४८ आपण ना संत, शिष्योत्तम, महंत । टाळली अखंड खोटेपणाची संगत । सावरित दु:ख, वेदना मनांत । जिणे झाले सवईचे ।। १३४९ मी मूर्ख ! लाचार शब्दांचा । मार्ग चोखाळितो व्यक्त होण्याचा । जगराहाटींत नाचक्कीची श्यक्यता । जाणेनि आहे मनोमनी ।। १३५० प्रयत्नांची कराल पराकाष्ठा । जागविण्या तेजोरूप निद्रिस्ता । विज्ञानाच्या दाविता चेष्टा । परि मूलस्रोत ? भास्कर ।। १३५१ ऊर्जा अखंड अविनाशी । स्थित विविधरूपे अवकाशी । पंचमहाभूत निसर्गाशी । जीवाचे मैत्र राखिते ।। १३५२ संधिकाली मनांत हुरहुर । शंका-कुशंकांचे काहूर । सयी भूतकाळांत दूरवर । नेती ! दहिवर पांपण्यांत ।। १३५३ ठसे विहंगम पक्ष्यांचे । अवकाशी तोरण नक्ष्यांचे । विलक्षण सौंदर्य निसर्गाचे । रोज नवे, जणु बहुरंगदर्शी ।। १३५४ स्मित ! मनुष्यांच्या लढण्याचे ?। स्मित ! मनुष्यांच्या आपदा-विपदांचे ?। स्मित ! मनुष्यांच्या प्रयत्नांचे ?। लंघण्या सहजी त्यांना ।।१३५५ मनुष्यांच्या संहारक नीतीनं । विश्वासघाताच्या भीतीनं । निसर्गचक्षु हिरवाईचं मन । पर्णपापणी आड, डोळेच अश्रू झाले..।। १३५६ सुबीज सुभूमींत रुजणे । मशागत,निगराणी करणे । फळाआधी, मोहरणे, फुलणे । कलांतराने ! नैसर्गिक सहजक्रिया ।। १३५७ रंग किती ? विविध छटा !। इंद्रधनूसहि न येती सांगता । कोठे आरंभ वा सांगता । अनाकलनीय, विलक्षण ।। १३५८ अवनी असे सहृदय माय । तुडविती अब्जावधी पाय । ओठांतुनि परि 'हाय' । कोणी सांगा ऐकिली ?।। १३५९ नांगरणी, पेरणी, पुरेसे पाणी । इतुकेचि अपेक्षिते धरणी । बीजास भंगुन अंकुरलेणी । साकारिते म्हणत, 'कल्याणमस्तु ।। १३६० मूळ शोषिते अन्न-पाणी । कोरांटी, कोरफडीच्या पर्णी । कांट्यावरती पुष्पालंकरणी । अलवार होतसे ! किंकारणे ।। १३६१ निषिध्द वा स्वीकारयोग्य । पृथेस नसते कधीच भय । मंदगती वा कुशाग्रमतिमय । अपत्य जैसे मायेसी ।। १३६२ कधि भेगाळल्या दुष्काळाची छाया । कधि पर्जन्याची अपार माया । पंचतत्वांची अमोघ किमया । रचनात्मक वा संहारक ।। १३६३ रोज अनुभवती जन भाबडे । 'कां घडे' पडे जरि कोडे । भोंदूंत्च्या उपदेशांचे कोरडे । कोरडे पाठीवरी झेलिती ।। १३६४ वाहतो तमारि कावड । देह-मनाचे कवाड । उघड ! नाही सवड । तुज अाता दिनभरी' ।। १३६५ घुटमळते उंबऱ्यांत । कार्य ! उरक, जरा पळत । भान ज्ञान-कर्मेंद्रियांत । भरुनि, सजग हो ! मनुष्या ।। १३६६ टळते कां आवर्तन ?। काळीज ? अविरत स्पंदन । पाहिजे तयार मन । गाठण्या 'सम' ! अंत्योदयि !।। १३६७ संपदेचा दुष्काळ । आपदांचे जंजाळ । गिळावया कळिकाळ । सज्ज सदा ।। १३६८ स्थिती कर्मयोग्यांची ऐसी । काडीही न मिळे आधारासी । 'हवा गिळा, जगा, पिऊन उपदेशासी । मरता मरता !' सांगती 'शास्ते' ।। १३६९ 'जे' नाही त्याला जोखू पाहातो । कल्पनेनेचि वर्णन करितो । ब्रह्म 'दावण्या'सि असमर्थ असतो । मात्र लावितो व्यसन ।। १३७० श्रोता हवा जाणकार ?। मग काय मूर्ख कर्मकार ?। कसब नाही नजरेवर । साधते परिणाम ?।। १३७१ जो पाहू शकतो दृश्य । जाणतो त्यांतला आशय । लेख वा बोल ? निरुपाय । ऐशा निरक्षरासी ।। १३७२ एक छानसा दृष्टांत । ओवींच्या पुष्ट्यार्थ । ज्याचे अंतिम फलित । समजेल सहजी ।। १३७३ जलधारांनी, पारदर्शी । प्रतिबिंबांची लेउन नक्षी । विश्वभर होती साक्षी । मार्ग ! ओसरता पर्जन्य ।।१३७४ प्रतिबिंब तसे फसवेची । सत्य नेमके उलटे वेची । स्वमनांत उमटतचे ते चि । खरा ? भास अबोध !।। १३७५ प्रतिबिंबासाठी वृष्टी । आर्द्र ओलेती सृष्टी । चाळविण्या निर्मळ दृष्टी । निसर्गक्रीडा ।। १३७६ दाढी, जटा, झोळी, छाटी । रुद्राक्ष, भस्म कशासाठी ?। क्षुधाग्नी चेतता पोटी । येती कां कामासी ?।। १३७७ अध्यात्म ? केवळ मृगजळ । अध्यात्म ? भ्रमाचे मूळ । अध्यात्म ? निरुद्योग्याचा खेळ । हवेंतला ।। १३७८ अध्यात्म ? कृतिफल मारक । अध्यात्म ? विघ्नसंतोषधारक । अध्यात्म ? बचनागी विख । धरू जाता मराल फुके ।। १३७९ अध्यात्म ? मोक्षदिशा भाविकासि । अध्यात्म ? रुक्षदिशा कर्मयोग्यासि । अध्यात्म ? 'पक्ष'दिशा गतप्राणासि । तद्वत जाणा ।। १३८० आंधळिया चर्मचक्षु । आळशिया कर्मचक्षु । काळकोठडिया बंद गवाक्षु । फोल तैसे जिणे माझे ।। १३८१ पौर्णिमोत्तरी विलोभनिय । चंद्रास्त नि रविउदय । एकसमयावच्छेदे उभय । भिन्न जरि दिशा ।। १३८२ अनुभव ऐसे आवर्जून घ्यावे । निसर्गाचे खेळ पहावे । एकरूप त्यच्यशी व्हावे । हरखून चित्तवृत्ती ।। १३८३ परंतु वळावेचि लागेल । अन्यथा योग कैसा येईल । शरीर जरा कष्टवाल । तर सुखावेल मानस ।। १३८४ कोणा चुकली का जरा ?। कोवळिकीसाठी परंतु धरा । सज्ज असतेच आधारा । पुराणे गळते, नवे फळते ।। १३८५ जैसे कर्दमांत कमळ । नित्य पवित्र गंगाजळ । जैसे राहाते निर्मळ । प्रदूषित केले जाता ।। १३८७ कमलपत्र, ओघळूनं । टाकिते, न घेता अंगास लावोनं । जैसे अथांग विद्वज्जन । दुर्लक्षिती नकारात्मकता ।। १३८८ लोभस जरी विविध रंग । मूळ, शुभ्राचेचि अंग । करण्या, विश्वेषण्या अभंग । तेजोशलाका समर्थ एकमेव ।। १३८९ म्हणोनि न चळावे, ढळावे । गोंधळ दुर्लक्षोनि क्रमत राहावे । भवतालिच्या कुकर्मास वारावे । निग्रहाने ।। १३९० पार्थीवपण मरणोत्तरीचे । गर्भांकुरण जन्माआधीचे । तमांतरि सूक्ष्म तेजोरेखेचे । जगणे निरव, नि:शब्द ।। १३९१ जर वास्तव्य 'देवा'चे । आहे निश्चित ठाई माझे । तैसेचि असणार इतरांचे । देही ! आपोआपची ।। १३९२ निष्ठा राखणे जीवमात्रांशी । खग, खेचर वा जलचराशी । तैसी भवतालच्या मनुष्यांशी । असणे स्वाभाविकं ।। १३९३ सुहृद, आप्त बहु असणे । निष्ठा नात्यांवर ठेवणे । त्यांच्या ! म्हणजे 'बदलणे' । होतसे कां ?।। १३९४ श्वासोछ्वास सजीवांचा । धमन्यांच्या कार्यकारणाचा । व्याप, वाटतो कां त्याचा । जगत असता, तयांना ।। १३९५ पंचपंच उष:काल की हुरहुरती सांजवेळ । न कळे जेंव्हा येई झाकोळ । खिन्न वा प्रसन्न आभाळ । पाहावे तैसे रूप त्याचे ।। १३९६ मायावी तमाची सारी । दिनकर-दर्शन पूर्वोत्तरी । झाकोळांत मनाची अधांतरी । होतसे अवस्था ।। १३९७ अनुभव उतरावा शब्दांत । म्हणोनि गेलो लिहित । विद्वज्जनांनी केले प्रोत्साहित । अभिप्राय, देवुनि कसोट्यांती ।। १३९८ कण कण मुंग्या वेचिती । वारुळांत वाहून नेती । संचिताची 'संपत्ती' । कठिण समयी साहाय्यभूत ।। १३९९ अनुभवला जो आनंद । पूर्ण होण्या आधी अब्द । वर्णायासि अपुरे शब्द । माझ्या 'गरीब' झोळीमधे ।। १४०० (दिनांक ८-९ जून २०१५,, मध्यरात्री ००.३२) वृक्षाभवताली प्रेमभरे जैशी । वेल बिलगते नाजुकशी । ना त्याच्या आधारासी । सोडतसे ।। १४०१ जीवनरस तरुवराचा । शोषुनी ! शोध आधाराचा । घेता करिती त्यास पृच्छा । 'बांडगुळ कां बा होशी ?'।। १४०२ कोठेही साठवा । कसेही पाठवा । ज्याने ठाव घ्यावा । काळजाचा ।। १४०३ करतो जो धावा । त्या वाचविण्या धावा । पडत्या झेला घावा । वरचेवर ।। १४०४ अवडंबर सत्शीलतेचे । श्रेय उगा सत्कार्यांचे । प्रदर्शन सत्कृत्यफलांचे । टाळावे सहेतुक ।। १४०५ सत्कर्म व्हावा सहज स्वभाव । सत्कार्यासाठी असावा सत्कारणभाव । स्वार्थोत्तरी परार्थ अभाव । नोहे बरा ।। १४०६ शब्दचि घडे अ-क्षरांमुळे । क्रम अर्थवाही तरचि आकळे । अन्यथा स्वरूप निरर्थ वेगळे । होई जनांसि अगम्य ।। १४०७ जर दिसेना 'परब्रह्म' कोठे । तर्कबुध्दीस कशी भेंटें ?। प्रतिमा ! कैसे साटे-लोटे । परस्परांचे जुळावे ।। १४०८ 'दिसलाच नाही तरी माना । सत्य तेथेचि' म्हणे 'जाणा !'। ऐशा उपदेशांचा फोलपणा । लक्षांत घ्या वेळीचं ।। १४०९ अवकाशांत, पोकळीचे अंत:करणं । दावी अमोघ आकर्षणं । तेजोशलाका, प्रकाशकिरणं । वेगाने ओढिते गर्भांतं ।। १४१० परिणामी तमरंगी । होते भवताल सर्वांगी । 'पेटते' काळी होळी अंतरंगी । वैज्ञानिक विश्लेषण ।। १४११ कुणि लता नाजुकशी । कुण्या गृही कुंपणाशि । सावरींत सुमनांसी । गंध, मकरंदासह आतुर ।। १४१२ बलवान निरखिते शरिरा । भविष्यांतल्या आधारा । आश्वासक पर्णपिसारा । छाया, झळा वारण्या ।। १४१३ बालपणी वेळ, सामर्थ्य । असते परि नसे 'अर्थ' । स्वप्न न होतसे सार्थ । त्या विना ।। १४१४ तरुणाईंत अर्थ, सामर्थ्य । बहुप्रमाणांत स्थित । भोगण्या पळ नाहीत । परंतु ! ऐसी दशा ।। १४१५ वार्धक्यांत वेळ, माया । पाहे सर्वथा उतू जाया । सामर्थ्य नसे कवळाया । सुखाचा ग्रास ।। १४१६ शुभ्र कळ्या, पुष्पे वनांत । सांजवेळी, समई, निरांजनांत । आपापल्या जागी स्थित । तेवती निरव, संथपणे ।। १४१७ सुधारित: जेथे जडते अतीव प्रीती । मन धुंडाळते विविध क्लृप्ती । जोडण्यास रेशिमनाती । धडपड सदासर्वकाळ ।। १४१८ प्रेम ! भाषा-शब्दाक्षरांचे । प्रवृत्त करितसे रचनेच्छें । लिखाणोत्तरि अर्थ वेचे । तर्क-बुध्दी संदर्भें ।। १४१९ 'जळांत आपण समाधानी । परंतु जर धारील अवनी' । वत्सासि माय सांगे समजाउनी । तळमळेल जीव ।। १४२० जळचरा समवेत जळचर । जळांत राहून कैसे वैर ?। सुहृदावर माणूस वार । पाठीवरी करे ! स्वार्थापोटी ।। १४२१ प्रतीक्षाहेतू जर थांबाल । 'वाहन' घोकीत 'घेऊन जाईल'!।मांदियाळी मार्ग क्रमेल । पायी ! सहज जगी ।। १४२२ कोण जन्मला सर्वगुणी । कलंकित अवघी धरणी । सद्भाव मनुष्यांत शोधोनि । दुर्लक्षावे अवगुण ।। १४२३ जैसा कलंकधारी शशी । सुखवे शीतलप्रकाशी । नाकारित भेदाभेद ! जनासी । धरेवरी सर्वत्र ।। १४२४ आयुष्य सुखद जर नाती । सांभाळित पुढे नेती । नाती जर असतिल रेशिमगांठी । जगणे कंद आनंदाचा ।। १४२५ अपराध वारण्या विधाने । स्वत:च करित राहाणे । जोखेनि स्वत:स सजा देणे । शहाणपण कोणते ?।। १४२६ जगण्यावरी कां प्रीती ?। मरणास अन् कां निवृत्ती ?। जगणे सुंदरता खोटी । मरण वेदनादाई सत्य ।। १४२७ विद्रोहाची आहे परंपरा । लंघण्या परतंत्र-सागरा । परतविला 'विंग्रज गोरा' । घेरुनी क्रांतिबले ।। १४२८ प्रतिबिंबित वसुंधरा । कुठल्या संथ सागरा । बहाल करेल सर्वांग सुंदरा । होउनि मायारूप ?।। १४२९ अनुभव सहसा सर्वांना । वाटे घडोनि गेली घटना । प्रतिबिंब तेचि जाणा । मानस सरोवरी ।। १४३० शोध घेते विज्ञानं । अवकाशी, दूरदर्श लावोनं । तरंगांचे सारखेपणं । जुळते-मिळते कां ।। १४३१ तेज माया, तम सत्य । फल माया, कर्म सत्य । ठेवू,रुजवू नित्य । जाणिवेंत ।। १४३२ नाही उतरले । रुसूनी थांबले । व्यकुळ झालेले । बघा शिवार ।। १४३३ थांबल्या थेंबात । किरणें झेलतं । नाहते रंगांत । इंद्रधनू ।। १४३४ कोठेही पाहावे । कसेही भोगावे । मन रेंगाळावे । सईंमधे ।। १४३५ जणु विहंग हर्षविभोर । लंघोनी कडा कपार । झेपावतो जळावर । मत्स्यभक्ष टिपण्या ।। १४३६ काय साधेल ओठ शिवोनी ? । पित्त येईल वर उसळोनी । औषधी एकचि त्याच्या शमनी । व्यक्त होत राहाणे ।। १४३७ पंचमहाभूतांची निपज । अंकुरले एक बीज । रुजले, करतांना गूज । पृथेशी ।। १४३८ शुभ्र, गुलाबी मधे हरित । सजली वनराई विविध रॅगांत । झुळुक स्पर्शाने लाजत, शहारत । तृण, पत्री आषाढी ।। १४३९ संथपणे आकाशी विहरतं । मेघदूताशी स्पर्धा करीतं । परबळे उर्ध्वगामी होतं । झेपावला, वैनतेय ।। १४४० तुर्रेदार पर्णांची नक्षी । काळ्या कातळाच्या वक्षी । ठेवोनी जुळ्यांना साक्षी । हले-डुले ।। १४४१ धरा, धरणि, पृथा, अवनि । अभिषेकातुर गगनी । मेघ सज्ज जलकुंभपाणि । दामिनि उजळति सोहळा ।। १४४२ कधि गारा, कधि धारा । स्तब्ध अचंबित वारा । पिसेभारित पिसांचा पसारा । पसरुन हर्षविभोर मोर ।। १४४३ आषाढ ? मुसमुस जळगर्भी । आषाढ ? गुपचुप चुंबाचुंबी । आषाढ ? चुळबुळ करित गोपी । अधिर अधर, क्लान्त नेत्र ।। १४४४ जगणे आंता अकारण । का न कवळे मरण ?। भेदरून, गलबलून । जीव पाहता भवताल ।। १४४५ धारा, पावसाच्या बाहेर । धारा, जडावती अंतर । धारा, विरह ! दुरावल्या घोर । कुरतडत बळावतो ।। १४४६ हरळीवर उदास, खिन्न । झाकोळ ? भैरविमंथन । कां हुरहुरे उगाच मन ?। होतांना एकांडे ।। १४४७ कसा कराल प्रवास ?। आहे छळवादी पाऊस । हाती धरोनी तडितेस । ढोल-ताशे वाजवेल ।।१४४८ टक्क डोळे, पण अंधार । दृष्टि जाय न दूर फार । कोसळतो धुंवाधार । लुटत स्वानंदाला ।। १४४९ थेंब एक अनुभवावा । पाऊस अवघा जाणेनि घ्यावा । झेलावा, रुजवावा, जपावा । चिंब ओल्या मनांत ।। १४५० पांपणीकांठचा दहिवर । दावे बरसणारे अंतर । विचारांचे माजता काहूर । अदृश्य जरी ।। १४५१ दीर्घदिनांति लघुनिशा । निसर्गचक्राची भाषा । धरेच्या कलत्या आसा । श्रेय ! विज्ञान देतसे ।। १४५२ ऋतुचक्र झाले संभव । घटना, अब्जाब्द पूर्व । मनुष्ये घेतला ठाव । गणिती सिध्दांते ।। १४५३ जैसी, उजाड असता गावे । बीज नसता काय रुजावे ?। जल-कर्ब घटक अभावे । असती झाली अवस्था ।। १४५४ ऋजुभावे झुकलेली । तरुस्पर्शे लाजलेलि । गर्भभारे वाकलेली । कलिका ? मुग्धा ? प्रौढा ? ।। १४५५ सुंदर जरतारी गाभा । न लगे बाह्य आभा । कल्पनेंतल्या नभां । असोशीने बाहण्या ।। १४५६ विविध छटा घेउनि हिरवा । डोळियां देतसे गारवा । एकपर्णी घेतसे विसावा । सांवरीत संसार ।। १४५७ वर दाटले झाकोळ । खाली हिरवाई कल्लोळ । आशा-निराशेचा खेळ । पंचतत्वांचा ।। १४५८ कोण्या मनी हर्षोल्हास । कुणा खाई भय, भास । कुणा निशा,कुणा दीस । होती असह्य ।। १४५९ सारे मनाचेच खेळ । कुठे गुंता, कुठे पीळ । थकल्याचा होतो काळ । व्यतीत फुका,सोडवीता ।। १४६० सावरि जणु शाखांवर । पाचुस मउशार बहर । 'कधि येइल श्रावण सर ?'। पुसतसे सख्याला ।। १४६१ नभानन जळ झाले । प्रतिबिंबी साकळले । प्रत्यक्ष ? प्रतिमा ? न कळे । जणु माया नगरी ।। १४६२ जणु मौत्तिक मालिका । उजळत राही मार्गक्रमिका । कृत्रिम तेजोशलाका । तरि बहु आश्वासक ।। १४६३ हुरहुरती सांजवेळ । लेउन चमकदार माळ । मोजते उरलेले पळ । प्रतीक्षेचे, सखयाच्या ।। १४६४ धारा साकळल्या घनांत । थेंब थांबले पांपणीत । उतरतील क्षणार्धांत । स्पर्श, गारव्याचा होता ।। १४६५ सांज सकाळ भासतांत । जुळ्या जणू, झाकोळांत । कधी विरह कधी प्रीत । दाटून याव्या जशा ।। १४६६ शब्दमालिका मनांत । उच्चरिता धारिते भावार्थ । 'कविता' पदवी प्राप्त । पावते प्रतिष्ठासाहित्यांत ।। १४६७ सरळसोट कुणि सज्जन । पिळवटोनि कुणि अंत:करण । काटेरी, कुणि पर्णहीन । रानकुटुंबी सदस्य ।। १४६८ राही, रखमा जळापाळी । सवती तरी भासवीत 'खेळीमेळी'। मत्स्यावतारी प्रतीक्षाकाळी । गोंडस, गोजिऱ्या ।। १४६९ कृष्णविवर आकर्षिण्या सजग । ओलांडोनि प्रकाशावेग । गिळण्या तेजोस्फुल्लिंग । दूर अवकाशी कोठेतरी ।। १४७० मन आसावतां सुखा । मेघांतली शुभ्ररेखा । दु:खास करिते पारखा । विकृतानंदासि ।। १४७१ निरव निवांत । सारा आसमंत । स्तब्ध नि संथ । तरंगही ।। १४७२ दृश्याची चौकट । हिरवाई दाट । जळाभाळ अलोट । अधरोर्ध्वी ।।१४७३ पाखंरांची नक्षी । वनराई साक्षी । तळ्याच्या गवाक्षी । प्रतिबिंबली ।। १४७४ वृत्ती ! भिन्न प्राकृतिक । वृत्ती ! गुणावगुण विश्लेषक । वृत्ती ! प्रेरक मारक तारक । व्यक्तीमाजी ।। १४७५ मन ! बंदिवान भृन्ग । मन ! देहांतरी शृन्ग । मन ! विनाअंस्तित्व अपंग । जीवमात्र ।। १४७६ संपदा ! क्रियाशीलारि । संपदा ! कधि असह्य वेदनाकारी । संपदा ! भ्रामक प्रतिष्ठाधारी । जगण्यात ।। १४७७ अश्या 'देवा' कांहो ध्यावे ?। नाव 'त्या'चे कांहो घ्यावे ?। निरांजन, धूप, नैवेद्ये तोषवावे ?। काय भले करेल 'हा' ?।। १४७८ संरक्षिण्या पिलांस सिध्द । तीक्ष्ण चंचू, जणु आयुधं । अवकाशाचा घेत वेध । रिपुदमना ।। १४७९ नुसतांच परस्पर शब्दवेध । उभय मने अबोध । समीप तरिही रूढी-रीतीबध्द । कां अजुनी ?।। १४८० काक सूकर जळस्थित । हरि हरीण दिवाभीत । गुणावगुण निसर्गदत्त । वावरती लेऊनी ।।१४८१ तळव्यावर मेंदीची नक्षी । पाठीवर आवेगाची नख्शी । नवनीत, बीजांकुरास कुक्षी । स्वाभाविकं ।। १४८२ तरारल्या कपोली । वनराणी ल्याली । उन्मुक्त लाली । अवचित ।। १४८३ अस्फुट सीमांच्या बळे । मुग्धपण, लज्जा, वात्सल्य आकळे । शक्तितत्व वर्धमानी उजळे । स्थित्यंतरी ।। १४८४ 'मृत्युपश्चात' वगैरे जीवन । प्रतिपादिणे वेडेपण । विखारी फोलपटांचे बीजांकुरण । पोषक अंधश्रध्देस ।। १४८५ ही 'असली' साहित्य(?)कृती । प्रतिष्ठा, संपदा, मान्यताप्राप्ती । परीक्षक, विश्लेषकांची मती । कैसी झाली विकृत ।। १४८६ रुजणे ! स्रोतांत समर्पित होणे !। रुजणे ! मूकपणे विरघळणे, विरणे !। रुजणे ! अस्तित्व विस्मरुनि जाणे!। अंकुरण्या पुन:पुन्हा ।। १४८७ अंकुरणे ! बीजांतुनि होणै मुक्त !। अंकुरणे ! प्राणानी होणे युक्त !। अंकुरणे ! अवकाश भारणे रिक्त !। अस्तित्वहेतु ।। १४८८ ठोका ! जगण्याचा अनुपम झोंका !। ठोका ! चुकण्याचा सदैव धोका !। ठोका ! विस्मरण्या अनावर भुका !। मोजा, अनंतकाल ।। १४८९ जाणीव ! जगण्याचे लक्षणं ?। जाणीव ! सुख-दु:खांचे भवन ?। जाणीव ! नेणिवेचे अवतरण ?। रिते जरी, विलक्षण लख्ख !।। १४९० कृष्णास दृष्ट लागों नयें । धवल विचलित होवू नये । रंगसंतुलन ढळू नये । समसंख्य, समांतर ।। १४९१ जनांत वा रानांत । पटमांडणी नेहमीच सार्थ । वसते बुध्दीच्या बळांत । अभिन्नता ।। १४९२ वास्तू ! केवळ निवारा ?। वास्तू ! अवहालिक, गवाक्ष, द्वारा ?। वास्तू ! पोकळीचा पसारा !। मनुष्येविण ।। १४९३ वास्तू ! असावी आश्वासक । वास्तू ! व्हावी नित प्रेरक । वास्तू ! विश्रामाधार, सकारात्मक । अबालवृध्दांना ।। १४९४ वास्तू ! असावी उब मायेची । वास्तू ! असावी वनराई छायेची । वास्तू ! असावी क्लान्त समयिची । झुळूक शीतळ ।। १४९५ वास्तु ! देत राहिली अभय । वास्तु ! झाली अक्षर-माय । वास्तु ! कोणत्या बळे ओवीमय । साहित्यसरितेतटी ? न कळे !।।१४९६ पंचतत्वांना केवळ नमन । सजग ठेवुनी अष्टावधान । ज्ञान-कर्मेंद्रियांचे संतुलन । राहावे अंतकाळी, प्रार्थना !।। १४९७ देहावर पर्ण वल्कली । पुष्प बीरुदावली सजली । वनराणी सज्ज झाली । श्रावण शृंगारा ।। १४९८ दिशादाते झाले दास । उलटले दशाधिक अडीच मास । सहस्राधिकपंचशतक वोतण्यास । ओवींत मानसतल्लोळ ।। १४९९ प्रवास आनंदविभोर । घेउन आला इथवर । उद्देशपूर्तीचा महासागर । लंघणे, अजून बाकी ।। १५०० (पहाटे ४.५०, दिनांक १५-०७-२०१५) राही, रखमा जळापाळी । सवती तरी भासवीत 'खेळीमेळी'। मत्स्यावतारी प्रतीक्षाकाळी । गोंडस, गोजिऱ्या ।। १४६९ कृष्णविवर आकर्षिण्या सजग । ओलांडोनि प्रकाशावेग । गिळण्या तेजोस्फुल्लिंग । दूर अवकाशी कोठेतरी ।। १४७० मन आसावतां सुखा । मेघांतली शुभ्ररेखा । दु:खास करिते पारखा । विकृतानंदासि ।। १४७१ निरव निवांत । सारा आसमंत । स्तब्ध नि संथ । तरंगही ।। १४७२ दृश्याची चौकट । हिरवाई दाट । जळाभाळ अलोट । अधरोर्ध्वी ।।१४७३ पाखंरांची नक्षी । वनराई साक्षी । तळ्याच्या गवाक्षी । प्रतिबिंबली ।। १४७४ वृत्ती ! भिन्न प्राकृतिक । वृत्ती ! गुणावगुण विश्लेषक । वृत्ती ! प्रेरक मारक तारक । व्यक्तीमाजी ।। १४७५ मन ! बंदिवान भृन्ग । मन ! देहांतरी शृन्ग । मन ! विनाअंस्तित्व अपंग । जीवमात्र ।। १४७६ संपदा ! क्रियाशीलारि । संपदा ! कधि असह्य वेदनाकारी । संपदा ! भ्रामक प्रतिष्ठाधारी । जगण्यात ।। १४७७ अश्या 'देवा' कांहो ध्यावे ?। नाव 'त्या'चे कांहो घ्यावे ?। निरांजन, धूप, नैवेद्ये तोषवावे ?। काय भले करेल 'हा' ?।। १४७८ संरक्षिण्या पिलांस सिध्द । तीक्ष्ण चंचू, जणु आयुधं । अवकाशाचा घेत वेध । रिपुदमना ।। १४७९ नुसतांच परस्पर शब्दवेध । उभय मने अबोध । समीप तरिही रूढी-रीतीबध्द । कां अजुनी ?।। १४८० काक सूकर जळस्थित । हरि हरीण दिवाभीत । गुणावगुण निसर्गदत्त । वावरती लेऊनी ।।१४८१ तळव्यावर मेंदीची नक्षी । पाठीवर आवेगाची नख्शी । नवनीत, बीजांकुरास कुक्षी । स्वाभाविकं ।। १४८२ तरारल्या कपोली । वनराणी ल्याली । उन्मुक्त लाली । अवचित ।। १४८३ अस्फुट सीमांच्या बळे । मुग्धपण, लज्जा, वात्सल्य आकळे । शक्तितत्व वर्धमानी उजळे । स्थित्यंतरी ।। १४८४ 'मृत्युपश्चात' वगैरे जीवन । प्रतिपादिणे वेडेपण । विखारी फोलपटांचे बीजांकुरण । पोषक अंधश्रध्देस ।। १४८५ ही 'असली' साहित्य(?)कृती । प्रतिष्ठा, संपदा, मान्यताप्राप्ती । परीक्षक, विश्लेषकांची मती । कैसी झाली विकृत ।। १४८६ रुजणे ! स्रोतांत समर्पित होणे !। रुजणे ! मूकपणे विरघळणे, विरणे !। रुजणे ! अस्तित्व विस्मरुनि जाणे!। अंकुरण्या पुन:पुन्हा ।। १४८७ अंकुरणे ! बीजांतुनि होणै मुक्त !। अंकुरणे ! प्राणानी होणे युक्त !। अंकुरणे ! अवकाश भारणे रिक्त !। अस्तित्वहेतु ।। १४८८ ठोका ! जगण्याचा अनुपम झोंका !। ठोका ! चुकण्याचा सदैव धोका !। ठोका ! विस्मरण्या अनावर भुका !। मोजा, अनंतकाल ।। १४८९ जाणीव ! जगण्याचे लक्षणं ?। जाणीव ! सुख-दु:खांचे भवन ?। जाणीव ! नेणिवेचे अवतरण ?। रिते जरी, विलक्षण लख्ख !।। १४९० कृष्णास दृष्ट लागों नयें । धवल विचलित होवू नये । रंगसंतुलन ढळू नये । समसंख्य, समांतर ।। १४९१ जनांत वा रानांत । पटमांडणी नेहमीच सार्थ । वसते बुध्दीच्या बळांत । अभिन्नता ।। १४९२ वास्तू ! केवळ निवारा ?। वास्तू ! अवहालिक, गवाक्ष, द्वारा ?। वास्तू ! पोकळीचा पसारा !। मनुष्येविण ।। १४९३ वास्तू ! असावी आश्वासक । वास्तू ! व्हावी नित प्रेरक । वास्तू ! विश्रामाधार, सकारात्मक । अबालवृध्दांना ।। १४९४ वास्तू ! असावी उब मायेची । वास्तू ! असावी वनराई छायेची । वास्तू ! असावी क्लान्त समयिची । झुळूक शीतळ ।। १४९५ वास्तु ! देत राहिली अभय । वास्तु ! झाली अक्षर-माय । वास्तु ! कोणत्या बळे ओवीमय । साहित्यसरितेतटी ? न कळे !।।१४९६ पंचतत्वांना केवळ नमन । सजग ठेवुनी अष्टावधान । ज्ञान-कर्मेंद्रियांचे संतुलन । राहावे अंतकाळी, प्रार्थना !।। १४९७ देहावर पर्ण वल्कली । पुष्प बीरुदावली सजली । वनराणी सज्ज झाली । श्रावण शृंगारा ।। १४९८ दिशादाते झाले दास । उलटले दशाधिक अडीच मास । सहस्राधिकपंचशतक वोतण्यास । ओवींत मानसतल्लोळ ।। १४९९ प्रवास आनंदविभोर । घेउन आला इथवर । उद्देशपूर्तीचा महासागर । लंघणे, अजून बाकी ।। १५०० (पहाटे ४.५०, दिनांक १५-०७-२०१५) अध्याय पांचवा: ।। दास-वाणी ।। वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी । वडिलाऐसा व्याप न करी । म्हणौनिया ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१२ वडिल म्हणजे आधी जन्मलेला . मोठा भाऊ , बाबा ,काका ,मामा हे सर्व वडिल . कर्तृत्ववान वडिल आणि निकम्मा धाकटा असे ब-याच ठिकाणी दिसते. मोठया लोकांचे काबाडकष्ट , चिकाटी प्रामाणिकपणा हे गुण अंगी न बाणता नुसताच बेधडक व्यवसाय सुरू केला तर तो वाढणार तर नाहीच , उलट बुडेल आणि भीक मागायची पाळी येईल . जाणपणनिरूपण समास . ************* धाकुलेपणाचे लाड कोड । 'वडिलां'चे कौतुक गोड । वृत्तीत करिती बिघाड । परिणामी यशक्षती ।। १५०१ म्हणोनि असावे यथोचित । धाकुल्याप्रति माया, प्रीत । जगराहाटींची रीत । आवर्जुन दावावी ।। १५०२ रोजचे आमुचे जगणे । साक्षांत मृत्यु अनुभवणे । काळजाचा ठोका थांबणे । संपणे, मग सई केवळ ।। १५०३ देह आळसावलेला । जरी उन्हानं तडकला । तृणपर्णा समवेत सुखावला । 'मुळांत'ला पिळदार ।। १५०४ स्तोम, वारी कुंभाचे । सावट भेगाळत्या दुष्काळाचे । हाल खाइना जनतेचे । श्वानसुध्दा ।। १५०५ राहुट्यांसाठी मारामारी । हैराण पुरवठा-कारभारी । लांगूलचालनी सत्ताधारी । सदैव व्यग्र ।। १५०६ साधूंनी भरल्या मतपेट्या ? रित्या करती धान्य कोठ्या ! चिलिमी गांजा फुंकत राहुट्या । नग्नावर रक्षा फासती ।। १५०७ विश्वसंग म्हणे त्यजिला । तरी राहुटींत जीव अडकला । जळे उत्सर्जितांनि नासावयाला । धावती नग्न ।। १५०८ अंगावर फासुनी रक्षा । हावरट अपेक्षिती भिक्षा । निर्लज्जपणाच्या सर्व कक्षा । लंघती सहजी ।। १५०९ धाडा यांना सीमेवरी । चमत्कारास्त्र विविध परी । संहारण्या अतिरेकी अरि । संमोहुनि जाळांत ।। १५१० कसला कुंभ ? कोठले अमृत ?। थेंब भेगाळल्या भुईंत । वा कोरड्या पांपणी काठांत । कां न सांडे ।। १५११ प्रदर्शिती सवंग, ओंगळ । विनाच्छादित काय अमंगळ । विकृतिचा समग्र गाळ । उपसती साधू, किंकारणे ?।। १५१२ नासत जळे, स्नान 'शाही' । खिरी, आमट्या, विविध चवी । मिष्टान्ने रोज नवी हवी । यांना, गांज्या फुंकण्या आधी ।।१५१३ इकडे संत, महंत, बाबा । तिकडे वाळवंटी काबा । वळवळती अमानुष जिभा । 'धर्मा'च्या, सर्वदूर ।। १५१४ एकीकडे अभियाने । दुसरीकडे अनुदाने । राखण्या मौला, साधूंची मने । वेठीस जनसामान्य ।। १५१५ हिरमुसली अंत:करणे । भोगिती रोजची मरणे । एकेदिवशी पेटून उठणे । हल्लाबोल स्वाभाविक ।। १५१६ परी ! भिन्न प्रकार । परीं । रंग पंखांवर । परी ! कथेंतला बहार । शब्द एक बहुआयामी ।। १५१७ ।। दास-वाणी ।। कांहींयेक पुर्ते कळेना । सभेमधें बोलों राहेना । बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०३/२२ कुठल्याही विषयामधील संपूर्ण ज्ञान नाही , समजून घ्यायची इच्छाही नाही .आगाऊपणा करून लोकांसमोर बोलू नये , आपले हसे होईल हे ही समजत नाही. हा जे बोलतोय ते वायफट आहे ,लबाडीचे आहे हे सर्वांना कळून चुकते. अशी करंटलक्षणे समर्थ त्यागार्थ सांगताहेत . ********* करंटे कोण वोळखिले । भोंदू, साधू फसवे बोकाळले । विज्ञाने उघड केले । मायाजाल त्यांचे ।। १५१८ करंटे जगी सकलजन । शिष्य, महंत वगळुन । स्वमनि अतर्क्य बिंबवुन । उपदेशिती व्यर्थ ।। १५१९ करंटे भरती पोटे । आप्तजनांची बहुकष्टे । पोथ्यां, पुराण, भाकडांत गोते । खाण्या नाकारती ।। १५२० साधू नित्य पसरणार झोळी । जो अस्तुरी-पोरे सांभाळी । 'करंटा', त्यास भाबडी-भोळी । संबोधिती, कृपणपणे ।। १५२१ अक्षद्वय स्पष्टवते । बुंध्यांतुन खुणावते । काष्ठशिल्पी वसते । कोठे ? जाणा !।। १५२२ ********** ।। दास-वाणी ।। मननसीळ लोकांपासी । अखंड देव आहिर्निशीं । पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०१/२२ अध्यात्मिक ग्रंथांचे सतत वाचन श्रवण करणारे लोक परमेश्वराच्या सतत चिंतनमननात राहतात . परमेश्वराचाच निदिध्यास लागल्याने देव त्यांच्यापाशीच अहोरात्र असतो.(अह - दिवस , निशी - रात्र ) त्यांचे पूर्वसुकृत म्हणूनच त्यांना हे भाग्य प्राप्त होते. त्याला खरोखरीच तोड नाही. 'सत्यवादाचे तप केले अमित कल्प ' त्या जन्मोजन्मी केलेल्या तपाचे फळ म्हणजे ज्ञानेश्वरी असे ज्ञानदेवानी म्हटलय. ************ नाही भूत ना भविष्य । जगणे निगडित वर्तमानास । संचयासि, विनियोगावे अहर्निश । श्वासापर्यंत अखेरच्या ।। १५२३ निरीक्षणोत्तर मननं । वाचनोत्तर तर्क-बुध्दिने पारखुनं। प्रतिक्षिप्तावे व्यक्त होवूनं । मोकळे व्हावे ।। १५२३ फळ अध्ययन, मननाने । मिळतेच ! जैसे कर्माने, । कष्टोत्तर प्राप्त यशाने । जगणे सुसह्य ।। १५२४ ज्ञानराजांचा दाखला । वारंवार देता कशाला ?। न मानता भूत-भविष्याला । वांछिले पसायदान ।। १५२५ हर्षोल्हासं उमलतो । विविधरंगी, वृक्ष-वेलींवर 'तो' । निसर्ग किमया दावितो । वर्णावी कैसी, न कळे ।। १५२६ उदयवेळी प्रहुल्लित होणे । अस्तवेळी सर्वांगे मिटणे । चक्रांकित जगणे मरणे । जणु झाले प्रतिबिंबितं ।। १५२७ मेघदूतांची आभाळमाया । शांतिदूतांची छत्रछाया । ऐसे द्विदल भाग्य लाभाया । हवे सुकृत गांठीशी ।। १५२८ बुडखा शाख पाहूनं । हेलावले, द्रवले मन । पांपणींत साकळून । राहिले पाणी ।। १५२९ ऐसे माजले पंचतत्वारि । कैशा योजाव्या शासनपरी । अवलंबिण्या मानसिकता खरी । सत्ताधाऱ्यांत वसे अभावाने ।। १५३० पृच्छा करावी वाटते श्वानासी । पुच्छ वृथा कां डोलविशी । भिडेल मनुष्यांच्या काळजासी । लाचारी, स्वाभिमानारि तुझी ?।। १५३१ काळ्या आईचा पान्हा । मुळांतून लुचे तान्हा । पाणियाचे वाळे कान्हा । मिरवतसे ।। १५३२ कान्हारूप जाले रोप । आप लोळे आपेआप । काढला रानाचा राप । फळो आला ।। १५३३ ।। दास-वाणी ।। अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौली ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/२३ या नामस्मरणाचे महत्व शब्दांनी सांगता येण्याच्याही पलीकडे आहे. अफाट आहे तरीही मी प्रयत्न केला आहे.आजपर्यंत लक्षावधी जीवांना या नामस्मरणाद्वारे मुक्ती मिळाली आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अनेक वस्तू देव दानवांनी आपापसात वाटून घेतल्या. अत्यंत जहाल असे हलाहल विष मात्र कुणीही न घेतल्याने भगवान शंकरानी प्राशन केले .त्याने प्रचंड दाह झाला. आपल्या जटेत दाह शांत होण्यासाठी चंद्राला सामावले म्हणून चंद्रमौली. तरीही आग शमेना. रामनामाचा जप सुरू केला आणि शंकरदेव शांत झाले. रामनाम देवांनाही तारक आहे. 'हलाहल सहजी प्राशूनं । चूळ अमृताची टाकेनं । वेचोनि मौत्तिक कणं। समृध्देनं जनसामान्या' ।। १५३४ मनोमनी संकल्प केले । संस्कृतास, प्राकृतरूप दिले । गीतासार पोहोचविले । वदविले जनरेड्याकडून ।। १५३५ ऐसी होती माउली । इतिहासे अनुभवली । शब्दरूपे माडिली । सच्चिदानंदे ।। १५३६ मेघांना देती साथ । उंचावले तेजोगेंद । एकवटोनी अभेद । धावती प्रतिमा ।। १५३७ हिरव्या पगडीला मिळाले । शुभ्र तुऱ्यांचे झालर-झेले । मेघडंबरीशी स्पर्धाधीन झाले । होवुनी ऊर्ध्वगामी ।। १५३८ ।। दास-वाणी ।। असो हीं अनुभवाची द्वारें । कळती सारासारविचारे । सत्संगें करून सत्योत्तरें । प्रत्ययासि येती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०४/१५ परमार्थाचे दरवाजे हे अनुभवायच्या गोष्टी आहेत.वेदादि ग्रंथांचे अध्ययन करून सार असार , नित्य अनित्य , आत्म अनात्म गोष्टी जाणून घ्यायच्या.सद् गुरूंची सेवा करून त्यांच्या सहवासात राहून सत्याचा मार्ग धरायचा तरच ब्रह्मानुभव येण्याची शक्यता आहे. सद् गुरू पादसेवन भक्तीला पर्याय नाही. रोजचे सुख-दु:ख, जीवनानुभव । लंघण्या रौद्रस्वरूप सागरभव । जणू कर्मयोग्या हाती नाव । गाठण्या पैल ।। १५३९ आप्तार्थी अविरत झटावे । त्यांच्या चिंतेंत सदा राहावे । कष्ट करित झगडावे । समजावा कां 'ब्रह्मा'नुभव ।। १५४० करूनी पाहावा संसार । सांभाळत अस्तुरी, पोरं । मग चाखू अनुभवाचे गर । आंबट गोड तुमच्या ।। १५४१ भवताली सत्कर्मकारांची गर्दी । लावून व्यसने 'अध्यात्म'वादी । नका होवू कर्मयोगाचे गारदी । 'संत'(?)जन हो ।। १५४२ युवा, पोक्त, मधे वृध्द । आरण्य राखण्या सिध्द । तृण पर्णांना देत छेद । उर्ध्वगामी नभाकडे ।। १५४३ म्हणुनचि ग्रास 'परब्रह्म' । अवलंबावा कर्म 'धर्म' । केवळ ! त्याच्याप्रती प्रेम । म्हणोनि असावे ।। १५४४ कुडी ! मन भावनांचे घर । कुडी ! जळता सर्व निराधार । कुडी ! माया भारले अंतर । तमपासूनि तमापर्यंत ।। १५४५ कबऱ्या मेघांना झालरं । गर्द हिरव्याची बहार । कडा सजवे पोपटी किनारं । आनंदविभोरं मन होई ।। १५४६ सारे निसर्गचे राज । अशी नवलाई रोज । देतो मनांस इलाज । खंतावल्या ।। १५४७ समांतर प्रतिबिंब जळी । काय कळेना दडले तळी । रंग-रूप पाहिले डोळी । परि मन आकळेना ।। १५४८ नाही वरलिया रंगा भुलायचे । रंग कसे कळावे अंतरंगाचे । पारखो-जोखोनि अनुभवायचे । म्हणोनि, 'मनुष्य'पणं ।। १५४९ विस्तीर्ण परिघाचा पसारा । जळनिधीस सावरे किनारा । हीरव्यागार, ऊजायुक्त परिसरा । पारावार न दिसे ।। १५५० गालिचास तृण मउशार । पाउलासि स्पर्श अलवार । उभारीत तरतरींत आपुले कर । की पर पर्णतरुचे ?।। १५५१ प्रशान्त संथ जलनिधी । नीरवास विपुल अवधी । अवकाश-बिंब कवळण्या सिध्दी । साधिली तपश्चर्यें ।। १५५२ ।। दास-वाणी ।। येथील येथे अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊन जातें । सांगाना कां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०८/२८ आयुष्यभर हाडाची काडे करून मिळवलेली संपत्ती ,जमीनजुमला ,बंगले , गाडया ही संपूर्ण कमाई मृत्यूच्या वेळी इथेच सोडून द्यावी लागते ना ? एकतरी गोष्ट पुढच्या जन्मासाठी होईल म्हणून नेता येते का ? मृत्यूनंतर जीव या जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांची पुरचुंडी बरोबर घेऊनच पुढील जन्मात पदार्पण करतो. या जन्मातील कर्म हे पुढील जीवनातील दैव आहे हे लक्षात घेऊनच संपत्तीची हाव टाकून परोपकाराकडे ओढा वाढवावा हाच विवेक होय . ******* कळेना नेमके हेचि । तारांबळ जनसामान्यांची । स्वप्ने उराशि पुनर्जन्माची । आवळोनि, प्रतीक्षिती मृत्यू ।। १५५३ पुण्य म्हणजे संपत्ती ?। पुण्यें मिळते सद्गती ?। पुण्याचे हिशेब करिती । म्हणे चित्रगुप्त दूत ।। १५५४ ज्याने सांभाळला संसार । माय-बाप, अस्तुरी, पोरं । त्याने केला परोपकार । आयुष्यभरी निश्चित ! जाणा ।। १५५५ कासेला लज्जा रक्षणार्थ लंगोटी । हाती कमंडलू, अभावाने छाटी । कशास हवी यांना राहुटी । फुका कारण खर्चाला !।। १५५६ मुळातल्या गांजेकसा । कशास हवी वेगळी नशा ?। अध्यात्माचा फसवा आरसा । दाविती भाबड्यासीं ।। १५५७ नशा ! देई बुध्दिभ्रम । नशा ! सहसा विकृतिचा उद्गम । नशा ! अतर्क्य कल्पनांचे सृजन । विविधरूपे ।। १५५८ व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ?। की शासकीय निरिच्छेचे लक्षण ?। भोंदू (संधि)साधूंना लोटांगण । नग्नतेस घालिति किं कारणे ? ।। १५५९ कसले गौरविता आखाडे ?। कसले नाचविता ध्वजांचे घोडे ?। जे देऊ पाहती नंगेपणाचे धडे । कां बां त्यांची कवतिके ?।। १५६० इकडे दर्गा, पल्याड मंदिर । पवित्र मेरी, तिकडे गुरुद्वार । प्रार्थना ? निमित्त, धर्मकांडांचे आगार । ठाईठाई ।। १५६१ धर्म म्हणजे गुंडांचा हैदोस ?। धर्म म्हणजे भाबड्या भोळ्यांना त्रास ?। धर्म म्हणजे माणूसकीला गळफास ?। नेमके काय ?।। १५६२ धर्म ! असतो कष्टकऱ्यांसी ?। धर्म ! असतो आपदा, हर्षोल्हासासि ?। धर्म ! असतो परमार्थासी ? जाणा फोलपण धर्माचे ।। १५६३ धर्म ! म्हणजे मंत्रोच्चार ?। धर्म ! म्हणजे पूजा, पाठादि अवडंबर ?। धर्म ! म्हणजे रक्षा, रुद्राक्ष, भिक्षाज्वर ?। दुर्लक्षिण्या आप्त स्वकीय ?।। १५६४ धर्म ! मेघांचा, बरसणे !। धर्म ! तरुवरांचा, छायाकारणे । धर्म ! वायूचा, पुनरुज्जीवन संभवणे । निसर्गांत ।। १५६५ धर्म ! विरावा कर्मकेंद्री । धर्म ! विझावा सहृदयांतरी । धर्म ! विरघळावा खडिसाखरेपरी । मनुष्यतत्वांत ।। १५६६ धर्म ! लीनतेचे व्हावे वर्म । धर्म ! हीनतेचा व्हावा तम । धर्म ! माणूसकीचा उद्गम । व्हावा धरेवर ।। १५६७ धर्म ! विद्वेषाचे कारण । धर्म ! झगडे, तंटे, युध्दांसि आवतण । धर्म ! सामान्यांचे मरण । सत्य हेचि अंतिम ।। १५६८ धर्म ! रक्ताचा कोणता, धमनींत ?। धर्म ! शक्तीचा कोणता, शौर्यांत ?। धर्म ! भक्ताचा कोणता, प्रार्थनास्थळांत ?। वेगळी जरी श्रध्देये ।। १५६९ धर्म ! उत्सव, बेहोषीस कारण । धर्म ! वादळे, संकटांना कां ना कारण ?। धर्म ! कर्पूरासम शुध्दिकारक प्रमाण । कां न व्हावा ज्वलनोत्तरी ?।। १५७० धर्म ! का न व्हावा वात्सल्य, माया । धर्म ! का न व्हावा, शहारणारी काया। धर्म ! का व्हावा, अडथळा पाया ?। होवोनि बेडी ?।। १५७१ धर्म मानतो निसर्गखुणा । धर्म सांगतो 'श्रध्येये तीच जाणा' । 'धर्म' आरडत घालिती धिंगाणा । पार्थिवांशी घालीत सांगड ।। १५७२ धर्म ! उपजीविकेचे साधन । धर्म ! विरंगुळ्याचे क्षण । धर्म ! न उधळावा बेभान । ही अल्प अपेक्षा ।। १५७३ धर्म ! कोसळतो भक्तांवरी । धर्म ! जाळितो भक्तांच्या जमाती । धर्म ! चेंगरून मरती, तरि कवटाळिती । भाबडे भयभीत ।। १५७४ धर्म ! दावितो सदैव भीती । धर्म ! अडसर 'माणूस'कीं प्रति । धर्म ! कर्मठांच अतर्क्य नीती । विमा अपवाद जगभरी ।। १५७५ धर्म ! प्रतिपादितो काकबळी । धर्म ! पार्थीवासि वस्त्रावंकारे उजळी । धर्म ! अधर्म्यांस चूल वेगळी । सांगतो मांडण्यासी ।। १५७६ ************* ।। दास-वाणी ।। देव अनुकूळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवाब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/२३ ज्याला परमेश्वर अनुकूल होत नाही त्याने विचारपूर्वक आपली कृत्ये आठवावी. पूर्वजन्मातील पापकर्मेसुद्धा या जन्मी दुर्दैव म्हणून येऊ शकतात.अशा जीवाला संसारसागर तरून पलीकडे मो्क्षाच्या तीराला पोहोचता येत नाही.आत्मस्वरूपाची भेट न घेताच मृत्यू पावतो म्हणून समर्थ त्याला आत्महत्यारा म्हणतात. या जन्मातील आपले कर्मस्वातंत्र्य वापरून जो दुष्कृत्ये टाळून सत्कर्मे करीत राहील त्याला कालांतराने मोक्ष निश्चित आहे . ************** स्वतंत्राने कसेही वागणे । म्हणजे इतरांसि लोटणे । पारतंत्र्यात ? आणि दुर्लक्षिणे । कामना त्यांच्या ? अश्लाघ्य !।। १५७७ पै पै करुनी अल्पसंपदा घडवंचीत । कामास जी येइल संकटांत । दानासाठी ती स्वहस्ते खर्चीत । जाणे ! अस्तुरीस कष्टप्रद ।। १५७८ ऐसे भाबड्यांसि लाविती भजनी । 'साधू'न संधी लुटती सोने, नाणी । म्हणती, 'अर्पिण्या, 'त्या'च्या चरणी । न दिसे, जो ! भेटणे दूरचि ।। १५७९ भरभरूनी लेकरे, वृध्द बापे बाया । म्हणती 'चला दर्शन घ्याया' । गर्दीत मरती चेंगरुनि पोरे, जाया । बेफिकिरीची परिसीमा ।। १५८० यात्रा तीर्थाटनासि जाती । प्रवासांत अपघातग्रस्त होती । अनुकळण्या त्यास संधी न देती । आत्महत्यारी ॥ १५८१ कोणता येतो देव ?। जो देऊन अमृतानुभव । परतोनि संसाराचा भव । असंभव जो दावेल ?।। १५८२ दयार्द्र ओढिती कलेवरे । परिचर, औषधोपचारे । बेशुध्द आपदाग्रस्तासि वाटावे बरे । म्हणुनी झटती अहर्निश ।। १५८३ कोण करंटा होतो सिद्ध । मतिमंद भक्त निर्बुद्ध ? की जो करण्यात मग्न प्रबुद्ध । 'त्या'च्या भक्तास ?॥ १५८४ साधनेकरिता एकटपण । कधि प्रसवते हेकटपण । हट्टांतुनं क्रोधाचे स्रवणं । अनिवार्य 'ताप'सासी ।। १५८५ भाबडे कष्टविती शरीरे । संगती घेउनि अस्तुरी पोरे । गावांत समग्र घरे दारे । ओसाड, उघडी ।। १५८६ तिकडे साधू साधती संधी । अनुदानाचा भोगत निधी । पक्वान्न झोडीत राहुटीबंदी । होत ! घोरती बिनघोर ।। १५८७ ह पाहिलेंत चित्र उलटे ? । माणुसकीसहि लज्जा वाटे । भाविकांची रिकामी पोटे । सांगा ! ते जाणतील ? ।। १५८८ वाचतांना गाथा, ग्रंथ । जर भावला कांहि दृष्टांत । शोधण्या साहित्यालंकार स्रोत । रेंगाळले मन ! वावगे काय ?।। १५८९ वारंवार होण्या एकाग्र । मन राहिले जर व्यग्र । तर्क-बुध्दी मूलत: कुशाग्र । हरवोनि बसेल संवेदना ।। १५९० रुजण्या सुफळण्या आशय । पळभर 'रवंथ' नको काय ?। अन्यथा 'अपचना'चे भय । अभ्यासांशि जाणा सदा ।। १५९१ उपदेश जरि योग्य असला । शिष्याप्रति पोहोचवायला । सुचल्या जर क्लृप्त्या 'सत्' गुरुला । दिनु जाणा 'सोनियाचा' ।। १५९२ वृध्दांच्या वेदनाध्वनींचे श्रवण । अस्तुरिच्या लाडक्या बोलांचे श्रवण । आनंदविभोर चित्कारांच् श्रवण । छकुल्यांच्या ! कोणती भक्ती ?।। १५९३ कीर्तन ! घणाच्या घावांचे । कीर्तन ! कर्मयोग्यांच्या नावांचे । कीर्तन ! शब्द-श्रुतीं पल्याडल्या भावांचे । कोणती भक्ती ?।। १५९४ स्वेदगंगेत बीजांस भिजविणे । मायेच्या छायेंत, रुजविणे, फुलविणे । कळेने पांपणी पाणावणे । काळजांतल्या ! कोणती भक्ती ?।। १५९५ जराजर्जर मायबाप स्मरणे । तान्हांसि आठवोनि स्मित करणे । मनोमनी पाहाणे । आप्तस्वकीयांसि ! कोणती भक्ती ?।। १५९६ सेवा ! दीन, दुबळ्यांची । सेवा ! अपंग, अनाथांची । सेवा ! अथक् कृतिप्रवणांची । कोणती भक्ती ?।। १५९७ वास्तव्य वा वास नकोचि समीप । 'अभाव' देव होणे टळेल आपोआप । नसलेपण स्वप्नांतही पाहाणे.. पाप । थांबता श्वास, मुक्तीसत्य ।। १५९८ वंदन ! पंचमहाभूतांना । वंदन ! शशि भास्कर तारकांना । वंदन ! सप्तस्वर, द्वादशाधिक दोन श्रुतींना । अविरत आमुचे ।। १५९९ तरिही विभोर उत्सवहेतु । बांधण्या सांधण्या विचार, सेतू । न बाळगता अश्रध्द किंतू । मनांत ! आणिली मिरवणुकीने ।। १६०० आणोनि, विधिवत प्रतिष्ठापिली । मनोभावे न्याहाळिली, पूजिली । उत्तरपूजोत्तरी विसर्जिली । वाहुनी अ-क्षता ।। १६०१ सुख वाटले निरखिता । उचंबळली वेदनांची गाथा । तरी मागणी उध्दरण्या करिता । न केली, निग्रहाने ।। १६०२ न चर्चिले सर्वांगी भस्म । न रुद्राक्षांचे कांही काम । न जटा, जप-तपादि धर्म(?)कर्म । नाहक आम्ही अवलंबिले ।। १६०३ कोठे म्हणे सांडले 'अमृत' । वडवानली 'पुण्य'प्राप्त्यार्थ घृत । दमल्या भागल्या भुकेल्या पोटांत । घातले घास कोणी ?।। १६०४ अरे विटाळू नका रे माणूसकी । काय घेवोनि जाल उरले बाकी । वस्त्र-प्रावरणे छानछोकी । ओरबाडतील कुडिवरोनी ।। १६०५ लक्षवेधी जर दिसाल । कार्यदाते विचार करतील । तत्पश्चात मुद्रा लागतील । हातासि, करण्या गुजराण ।। १६०६ मिळाल्या ग्रासाचे वाटे । करोनि सारखे, जितुकी पोटे । राखोनि, द्यावा कणव वाटे । त्यासी, ममत्वाने ।। १६०७ इहलोकी प्रपंचांत । कुटुंबियांच्या क्षुधाशमनार्थ । झटत राहाती दिवस-रात्र । कसा पाहावा 'परमार्थ' ?।। १६०८ 'स्व' पलीकडले जे जे । त्यांसि संगोपन काजे । शिरावर वाहिले ओझे । कां न मानती 'परमार्थ' ?।। १६०९ तसे 'अति' जगणे व्यर्थचि । वेळ 'ती' कोणती ? माहितीची । नसते स्वप्नांतही कल्पायाची । जनसामान्यांनी ।। १६१० जरि आराध्य इष्टदैवत । तरि प्रत्यक्ष भेटणे दुरापास्त । असोनि पुरते माहीत । भज-पूजती आनंदहेतु ।। १६११ कसे 'पुरेसे' वाटावे ? । अस्तुरी-पोरां ओठी ग्रास पडावे । कष्टोत्तरी फळ पुरेपूर मिळावे । अपेक्षिणे काय अनिष्ट ?।। १६१२ नाद ! नवजाताच्या टॅंहॅं चा नाद ! छकुल्याच्या खिदळण्याचा नाद ! मायेच्या हांकेचा अनावर, अनिवार्य ।। १६१३ घर्षण मूळ कारण घर्षण नादासि आवंतण घर्षण तेजोशलाकेचे अऱ्कुरण ऊर्जारूपे अवघी ।। १६१४ सामान्यासि ग्रंथस्वरूप मूक बधिरासि अक्षररूप तैसे नेत्रहीनासि ध्वनिरूप ज्ञानार्जना हितकर ।। १६१५ कर दोन्ही, उर्जास्रोत । जोडोनि तळवे एकवट । अखंड असावे कार्यरत । अभावदेवा दुर्लक्षुनी ।। १६१६ विविध निसर्गरम्य स्थळे । रचनाशास्त्र आदर्शशी, देवळे । शिल्पाकृती पार्थिव उजळे । निरांजन, समया मंद प्रकाशांत ।। १६१७ वस्त्रालंकारे टाकिती लेपुनी । उट्या, गंधाक्षतांच्या पुटींनी । सजवू पाहाती लावण्य-लेणी । घडविली पाथरवटें जी ।। १६१८ कोठे शोधाल त्याला ? बडव्याच्या कोंडाळ्यांत घुसमटला । नाहीच प्राणप्रतिष्ठापिला गेला । मुळांत अस्तित्वहीन ।। १६१९ मणभर चढवतील सुवर्णझळाळी । कणभर अन्नास पारखी जनावळी । करतील ! पंचपक्वान्नें भिक्षेची झोळी । भरतील 'साधूं(?)' ची जरी ।।१६२० अस्थिव्यंगस्थ जराजर्जर । अष्टवक्र, शुष्क शरीर । परि मुखावर तवान सर्वदूर । लालिमा आवाहनास सज्ज ।। १६२१ फुललेला सालंकृत गुलमोहर । धरी छाया तळिच्या तृणावर । हलेना त्यावरुनी नजर । पांपणी मिटेना ।। १६२२ धर्म म्हणजे संप्रदाय ?। धर्म म्हणजे पोळल्या मना उपाय ?। धर्म म्हणजे खरे काय ?। कोडे सर्वसामान्यांना ।। १६२३ धर्म म्हणजे अनुष्ठानं ?। धर्म म्हणजे हवी भक्षक यज्ञ ?। धर्म म्हणजे जगण्याचे विज्ञान ?। कां पडावा प्रष्ण ?।। १६२४ धर्म म्हणजे परंपरा रीती ?। धर्म म्हणजे 'पाप' घडण्याची भीती ?। धर्म म्हणजे श्रध्देयाप्रती प्रीती ?। कसे जाणावे ?।। १६२५ धर्माला काय अधिष्ठान ?। धर्माला काय हवे असते ? मन की धन ?। धर्माला काय आधार ? वेद, पुराणं ?। मुळांत जे अनाकलनीय ।। १६२६ धर्म म्हणजे साधी राहाणी ?। धर्म म्हणजे कणवेने पांपणींत पाणी ?। धर्म म्हणजे सुखसमाधानाची पुष्करणी ?। व्हावी निर्विवाद ।। १६२७ धर्माचरणे साधते काय ?। धर्माचरणे साधते भवतरण। कार्य ?। धर्माचरणे साधते सत्कर्मतात्पर्य ?। जगतांना ?।। १६२८ धर्म म्हणजे संस्काराची चौकट । धर्म म्हणजे ना वेद, मंत्र बिकट । धर्म म्हणजे मानवकल्याणाचे यत्न धीट । व्हावे साहाय्यभूत भवसागरी ।। १६२९ धर्म म्हणजे कर्तव्यपूर्ती । धर्म म्हणजे कार्यमग्न निवृत्ती । धर्म म्हणजे कर्मयोगनीती । समजावी सर्वकाळ ।। १६३० धर्म ! अपंगांसी आधार । धर्म ! छिन्नमनावर फुंकर । धर्म ! आश्वस्त परिसर । असावा सदा ।। १६३१ धर्म ! नसावा व्यसनाधीन नशा । धर्म ! नसावा तमगर्भी निशा । धर्म ! असावा तेजोद्भव कवडसा । तृणांकुरा ऊर्जादाता ।। १६३२ धर्म ! सप्तरंगांचा आविष्कार । धर्म ! नादावले सप्तसूर । धर्म ! बावीस श्रुतींचा तंतकार । सुखकर अबालवृधांसि व्हावा ।। १६३३ धर्म ! रूप, रस, गंध । धर्म ! श्रवण, स्पर्शाचा आनंद । धर्म ! संथ, शांत, कल्लोळ कंद । ज्ञात व्हावा सर्वदूर ।। १६३४ धर्म ! म्हणजे छाटी, चिमटा ?। धर्म ! म्हणजे दाढी, जटा ?। धर्म ! म्हणजे उत्तरदायित्वाचा वाटा । झुगारोनि होणे परागंदा ?।। १६३५ धर्म ! म्हणजे कालबाह्य पुराणे गाथा ?। धर्म ! म्हणजे हाक अनाकलनीय अज्ञातां ?। धर्म ! म्हणजे अथांग खोल गर्ता ?। लोभसवाणी ।। १६३६ धर्म ! म्हणजे नामस्मरण उफराटे ?। धर्म ! म्हणजे जप-पाठ,जोवरी न ऊर फाटे ?। धर्म ! म्हणजे भवसागरी आधार बेटे । कां न व्हावी ?।। १६३७ धर्म ! माझा कोणता म्हणावा ?। धर्म ! जन्मदात्रिचा असावा ?। धर्म ! जन्मदात्याचा वा कल्पावा ?। 'टाकलेले' जाणावे कोणधर्मी ?।। १६३८ हिमरूप धारिते जेंव्हा जळ । कठोर कुठार धारदार, सहस्र गजबळ । सहजी भंगीत जलनिधि कल्लोळ । अवतरे भाग आठवा ।। १६३९ वरकरणी प्रवाही निर्मळ । निर्झरी नितळ स्वच्छ जळ । परि तळाशी साचतो गाळ । जैसी परमार्थोत्तरि उद्विग्नता ।। १६४० उत्सर्जितांतुन साखर ? । निसर्गाचा 'चमत्कार' ? । परंतू विज्ञानाचा आधार । निर्विवाद ।। १६४१ मुळाशी वोतले जळ । तोडुनि गुरुत्वाकर्षणबळ । हिरवाइत विविधरंगी पुष्प, फळ । त्यां वेरी पोचते वर पोहोचे ।। १६४२ जे सापडले कचऱ्यांत । आणुनी पाळले घरांत । प्रेमभरे घेतले कुशींत । त्याचे 'कुल' कोठले ?।। १६४३ महाल होता परिपूर्ण । चंबूगवाळे, अस्तुरी, छकुले घेऊन । कर्मकार त्यजती भावबंधन । तान्ह्याची 'वास्तू' कुठली ? ।। १६४४ नका म्हणू 'माझे माझे'। अखेरिस येथेच सोडोनि जायचे । कुळ, वास्तू, संपदा, प्रतिष्ठेचे । 'लोढणे' ! मूकपणे ।। १६४५ कशास कालापव्ययी वारी । कशास प्रदूषित कर्दम पंढरी । जर 'भगवंत' हृदयांतरी । कशास आटापिटा ।। १६४६ निरभ्र आभाळ वा झाकोळ । सारे निसर्गाचे खेळ । विज्ञान करु पाहे उकल । सहस्रकांतुनी ।। १६४७ अंकुराचे वाढणे फोफावणे । अळीचे फुलपाखरू होणे । इंद्रधनुत रंग भरणे । निसर्ग चक्रमेनिक्रम सारे ।। १६४८ करू धजाल पूजा पाठ ?। मिसर्ग खचितच फिरवेल पाठ । पुरणपोळीच वा जाड रोठ । कर्मांचेचि केवळ फळ ।। १६४९ अवर्षण वा अतिवृष्टी । निसर्गाधीन अवघी सृष्टी । जप तप आळवण्यादि गोष्टी । फोल ! सायास व्यर्थ ।। १६५० 'कर्तव्य' जाणा एकचि धर्म । पहिल्या अखेरच्या मधले वर्म । श्वासाच्या । नमविण्या कांड कर्म । तोकडे, फाटके जीर्ण सारे ।। १६५१ आपण सारे य:कश्चित । जन्मल्यावर मृत्यू निश्चित । तेल संपता विझतेचि वात । नवल त्यांत कसले बा ? ।। १६५२ किती चढवाल श्रीफळ लेणी ?। जलधीस घालाल गवसणी ?। अवकाशांत तडितेची हिरकणी । धजाल कवळण्या ?।।१६५३ मेद आणि उमेद । केवळ उकाराचा भेद । एक मारक दुसरी साद । जगण्याला ।। १६५४

भक्तिबोध २१-०८-२०१५ शुक्रवार पर्यंत

भक्तिबोध-50 मासा, कासव आणि निद्रावस्थेतील ज्ञानदृष्टांत तुर्येसंदर्भांत शर्माजी आणखी एक अप्रतिम उदाहरण देतात. कासव आणि मासा यांची तुलना ते करतात ! कासवाला निसर्गानं पाण्यांत आणि जमिनीवर, दोनीही माध्यमात जीवनशैली सहजपणे विनासायास, व्यतीत करण्याचे वरदान दिले आहे. परंतु माशाला फक्त पाण्यातच आपले जीवनक्षेत्र मर्यादित कराव लागते. पाण्याबाहेर त्याचा जीव कासावीस होतो. ते म्हणतात पाणी म्हणजे `माया’आणि अवनी किंवा भूमी म्हणजे प्रदीप्त, पवित्र धरा ! म्हणजे माशाला त्या प्रदीप्त पावित्र्याचा अनुभव घेण्यासाठी मृत्यूला कवटाळावे लागते किंवा जळतळाच्या भूभागावर जाऊन ते दिव्यानुभव घ्यावा लागतो. तरीसुध्दा ती अतृप्तेच्छा किंवा अपूर्णानुभवच ठरतो. कारण माशाला बाधित दृष्टी, म्हणजे अविद्ये समान..असल्यामुळे तो त्या पूर्ण प्रदीप्त दिव्यानुभवापासून वंचितच राहातो आणि जळातळीच्या, भूभागाजवळच्या जळाचे स्वरूप, म्हणजे `माया’, कर्दम मिश्रित गढूळंच असतं. तुर्या नसलीच जर गाभ्यांत । चर्या असली जरि अस्तित्वांत । सूर्यासहि आणणे टप्प्यांत । तिला ! दुरापास्त ।। 1072 ते पुढ विवेचन करतात की गाढ़ निद्रा तुम्हाला काही प्रमाणात, समाधी अवस्थेची अनुभूतीसुध्दा देते. गाढ़ निद्रावस्थेत तुम्ही जागृत जगाकरिता जवळपास मृतावस्थेत असता. पण समाधी अवस्थेत तुम्ही विश्वाच्याकरिता मृत असूनसुध्दा अभौतिकदृष्ट्या जागृतावस्थेतच असता. जर गाढ निद्रा अभेद्य तमाधीन असेल तर समाधी अभेद्य तेजोमयी असते. म्हणजे तुर्या ही निर्विवाद समाधी आहे पण निद्रापूर्व ज्या चार ऊर्ध्वगामि स्तरांमधून ती स्थित असतें, त्यांच्यांतल्या सीमांचे आकलन अत्यंत सूक्ष्म किंवा अस्पष्ट असते. तुर्या ! पायाचा पाषाण । तुर्या । अस्तित्वाचा प्राण ! तुर्या । कार्य, भाव, कारण । मनुष्यासी ।। 1077 त्याकारणे निसर्गे तुर्या । निवारण्या भंग भया । जगण्यांस देते छाया । आशीर्वचतरुपी ।। 1079 इतके सोपे ज्ञान । देवोनि दृष्टांत, उदाहरण । कां न करिती कीर्तन । शिष्यगण, महंत ?।। 1080 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-51 ईश्वर कैसा असेल नश्वर । पंचमहाभूती तो तर स्थिर। जेया धरेवर अवतरते, वाढते ते जरावस्थेत पानगळीप्रमाणे पर्णहीन शुष्क शाखांवर, नव्या कोवळिकीला, पालवीली जागा करून देण्यासाठी झडून जाते म्हणजेच ज्याला आपण मृत्यू अथवा लय अथवा नष्ट होणे म्हणतो. ते सगळं नश्वर! पण निसर्गांत पंचमहाभूतांच्या स्वरूपांत, म्हणजे भूमी, जळ, अवकाश, हवा किंवा वारा आणि तेज ह्या गोष्टी कधी नष्ट झालेल्या कोणी पाहिल्यांत? ज्याप्रमाणे ती अवतरली कशी ते गूढ आणि अज्ञात तसेच त्यांची लयसुध्दा सर्वसामान्य, मर्यादित वर्षांचे आयुष्य जगणार्या मनुष्यांना अज्ञातच राहाणार ना? मग त्या मूलतत्त्वांना `ईश्वर’ असं संबोधून त्यावर भरवसा न ठेवतां, नश्वर बाबींच्या `भजन-पूजनांत स्वतःला झोकून द्या!’ अशी शिकवण, संताचे शिष्यगण आणि महंत आपदा-विपदने घेरलेल्या भाबडय़ाना कां करीत राहातात? ईश्वर कैसा असेल नश्वर । पंचमहाभूती तो तर स्थिर । ज्ञानेंद्रियांना देतो साक्षात्कार । क्षणोक्षणी अखंड ।। 119 धूप-दीप, फळ-पुष्पे सगळी । बांग, शंखध्वनि वा टाळी । नश्वराची गोतावळी । बांडगुळे आगंतुक ।। 120 ऐशा नश्वरांची मांदियाळी माजली सकळ धरातळी । मागे जनता भाबडी, भोळी । धापा टाकित धावताहे ।। 121 या मूलतत्त्वांना, त्यांच्या लहरीपणाला वेसण घालणे शक्य आहे? `उदंड झाले पाणी, स्नानं संध्या करावया।’ असे विश्वांत सर्वदूर घडणे शक्य आहे? पाहा विचार करून! पंचमहाभूतांना वेसण । वैज्ञानिक संशोधाने प्रयत्न । हेचि प्रार्थना पूजन । अज्ञात शक्तिचे ।। 1103 अजाणतेपणी पुष्प-बुक्कदि उधळणे । उपास सायास, नैवेद्य अर्पणे । अभावदेव प्रसन्नता प्रतीक्षिणे । फोल अनादिकाळापासोनी ।। 1104 `चमत्कार’ होती फसवणूक । निरक्षरांची अप्रत्यक्ष पिळवणूक । करीत होते भोंदू अध्यात्मिक । सर्वदा सदा ।। 1105 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-52 गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा । गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा। श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अति तत्पर गुरूभजनी । सिद्ध साधु आणी संतजनी । गुरूदास्य केलें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 05/01/ 42 रामाने वसिष्ठ ऋषी अन् श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींची शिष्य भावाने भक्ती आणि दास्य भावाने सेवा केली, मगच त्यांना ब्रह्मचर्याश्रमात सर्व विद्या प्राप्त झाल्या. अनेक सिद्धपुरूष, साधुसंतानासुद्धा ज्ञानप्राप्ती गुरूचरणांच्या सेवेनेच झालीय. देवांच्या अवतारांन सुद्धा गुरूशिवाय तरणोपाय नाहीच. गुरूनिश्चय समासात श्रीगुरूची महती समर्थ सांगताहेत. गुरु हवाच मार्ग दावण्या । गुरु हवाच संकटांत सावरण्या । गुरुकृपाच जनसामान्या। तारते भवसागरी ।। 124 गुरु करितो ज्ञानवृध्दी । गुरु वारी आपदा, व्याधी । गुरु देतो शिकवण साधी । प्राप्त परिस्थिति रिचविण्या ।। 1106 गुरु तम भेदी अज्ञानाचा । गुरु परिचय देई पंचमहाभूतांचा । गुरु आग्रही कृतिशीलतेचा । सत्कर्मांसाठी ।। 1107 गुरु जाणतो शिष्यमति । गुरु साधतो योग्य गति । गुरु वृध्दिगत ग्रहणशक्ती । करितो प्रमाणांत ।। 1108 गुरु मार्गदर्शक सखा । गुरु विपदेस विन्मुखा । गुरुसि घाला हाका । प्रकटेल हात देण्या ।। 1109 गुरु अंतर्बाह्य विवेक । गुरु सत्प्रवृत्ती, जनक । गुरु अशिष्यासि पावक । सजग सदा ।। 1110 गुरु ज्ञानगंगेचा उगम । गुरु शिकवी भेद, दंड, साम । गुरु आदर्श मानव राम । पाहावा सदा ।। 1111 गुरु रूपधारी कोणीही । गुरु मित्र, वैरी, शार्वीलिकही । गुरु, निसर्गाची वही । पंचमहाभूती ।। 1112 गुरु वेधतो शिष्योत्तम । गुरु सर्वांवरी करि प्रेम । गुरु उध्दरण्या सक्षम । मूढांसीही ।। 1113 गुरुवर असावी निष्ठा । गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा । गुरु ज्ञानामृताच्या घटा । दडवित नाही कधिही ।। 1114 गुरु भीम, बलवान महारुद्र । गुरु शिष्यगणा सुभद्र । गुरु तर्क-बुध्दि-आकलन समुद्र । जीवमात्रा ।। 1115 गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा । गुरु वारी शिष्याच्या आपदा । गुरु वेदांच्या वेदा । निरूपतसे ।। 125 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-53 शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी । माझे एक सुहृद, सारंग कुलकर्णी, मला रोज दासांची ओवी पाठवीत. अजूनही त्यांनी तो उपक्रम सुरूच ठेवला आहे. त्या ओवीवरची माझी प्रतिक्रिया, ओविरूपांतूनच अवतरूं लागली. साधारण 150 ओव्या लिहिल्यावर मी त्या कांही प्रथितयश संत-साहित्य अभ्यासक, लेखक, कवि, विचारवंत प्रथितयशांकडे अभिप्रयार्थ पाठवायला सुरुवात केली. कारण आशय दासांच्या, कालबाह्य संकल्पनांना छेद देणारा होता. पण एकांही प्रथितयशानं नाराजीचा सूर न लावतां, भरभरून कौतुक करींत लिखाणाला शुभेच्छाच दिल्या. एका वैद्यकीय उच्चशिक्षित, औषधीशास्त्रांतल्या स्नातकोत्तर पदवीधरानं, मी पुनर्जन्मित अध्यात्मिक आहे कीकाय असे आश्चर्यमिश्रित विधानही केले. म्हणजे ज्या `पुनर्जन्म’ संकल्पनेला मी छेद देण्यासाठी कांही ओव्या लिहिल्या, त्यांच्या मुळाचाच वेध घेतला त्यानं ! माझे सगळे लिखाण मी कष्टकरी कृतिशील कर्मयोगी असूनही आपदाग्रस्त असणार्यांच्या जीवनावुभवांतून प्रसवले आहे. मला कुठलाही उपदेश करायचा नाही. केवळ अंधश्रध्दांचे खंडन, वैज्ञानिक दृष्टिसंवर्धन, निसर्ग आणि पंचमहाभूतांना वंदन एवढेचं हेतु लिखाणामागे आहेत. या आमचे पोटीचं आजपर्यंत 1117 ओव्या लिहून झाल्यांत आणि स्रोत अजून भरभरून देतोय मला! कां ते ठावके नाही.. म्हणून.. नका मला म्हणू `स्वामी’ । सुख-दुःख, जीवनानुभवी । नाही भरीत वृथा चरवी । उपदेशाच्या क्षीराने ।ऑ। 126 मी साधा सरळ सामान्य । पोटार्थी कारसेवक मनी धन्य । तारावयास येत अन्य । सहसा नसे कुणी ।। 127 मी एक प्रस्तरखंड । शेंदुर चढविति विनाखंड । अंकुरू लागला भयगंड । मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल ।। 1116 शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी आशयाची रेटारेटी । टाळोनि न टळें त्यांत ।। 1117 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-54 दांभिक, ढोंग्यांचे माजले रान । अपप्रवृत्तीने होती बेभान। शिष्य विकल्पें रान घेतो । गुरू मागें मागें धावतो । विचार पाहों जाता तो । विकल्पचि अवघा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 19/07/07 अनधिकारी मूर्ख शिष्य अध्ययन साधना न करता शंकांचा भडिमार करतो आणि गुरू मठाला मिळत असलेल्या भल्या मोठया देणगीच्या लोभापायी बाबापुता करत शिष्याच्या मागे मागे धावतो. विचार केला तर गुरू कोण आणि शिष्य कोण असा संभ्रम निर्माण होतो. अशा दांभिक गुरूंमुळे सामान्यजनामध्ये परमार्थाविषयीच संशय निर्माण होतो. श्रद्धा घटते. शिष्य व्हावा यशस्वी । म्हणोनि त्यांसि शिकवी । अध्ययन अध्यापनापूर्वी । करि गुरु विषय-आशयाचे ।। 1118 परंतु परीक्षाकाळी । साहाय्यास जाणे जवळी । यशोमाला पडावी गळी । म्हणोनि ! हेतू अनिष्ट,अश्लाघ्य ।। 1119 अध्ययनार्थ उच्चश्रेणी वर्गांत । जर असला धडे घेत । कस त्याचा जोखण्यांत । सहभाग कनिष्ठाचा कां बा ?।। 1120 गुरुसि मिळत नाही सवड ?। की लोळत पडण्याची आवड ?। मग ज्ञानार्पण, अध्यापनाची कावड । घेवोचि नये ऐशाने ।।1121 ऐसे धुंडाळोनि खेचा । जनक्षोभ मुसळाने ठेचा । जखडा ऐशा घालोनि पेचा । कि सुटो नये ।।1122 सद्यकाळ हा,शैक्षणिक क्षेत्रांत, वर्षभर अध्ययनोत्तर परीक्षा, मूल्यांकनांचा काल आहे. विविध ठिकाणी यांत होणार्या गैरप्रकारांची वार्तांकने आपण वाचतो-पाहातो आहोत. कांही वरिष्ठ `नेते’ मंडळीसुध्दा अशा प्रकारांचे समर्थन करताहेत आणि शासकीय अजगर सभा-सम्मेलने-अनावरण-उद्घाटने, चिंतन शिबिरे यांत सुस्तमग्न आहे. हे आपले दुर्दैव आपणच मतपेटींत टाकलेले ! तेव्हा भोगूया आपल्याच कर्मांची फळं ! काय ? दांभिक, ढोंग्यांचे माजले रानं । अपप्रवृत्तीने होती बेभानं । गुरु कोणं कळेना शिष्य कोण । माळेचे मणि एका ।। 128 धावले पाहिजे शिष्याने । गुरुमागे असोशीने । ग्रंथगुह्य, संस्कार ज्ञानाने । पूर्णत्वप्राप्ती साधावया ।। 129 साधना साधकाचे ध्येय । गुरुमुखांतुन उलगडते प्रेय । धना साठी इतर पर्याय । तद्नंतर अनेक ।। 130 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-55 गुरु होतो वात्सल्याचा झरा। गुरु दीपस्तंभ एकमेव आधारा। प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 08/06/46 प्रज्ञा म्हणजे वैचारिक प्रगल्भ बुद्धी. अनन्य म्हणजे एकनिष्ठ. साधक निष्ठावान आणि प्रज्ञावंत असेल तर ज्ञानप्राप्ती एका क्षणात होते. पण भक्तिभावाशिवाय फक्त प्रज्ञा त्या टप्प्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. सत् शिष्य कसा असावा ते समर्थ सांगताहेत. यापुढे जिथं जिथं भक्तीचा उल्लेख कींवा संदर्भ येईल तिथं तिथं मी त्याचा अर्थ प्रेम, उत्कंठा, असोशी असांच मानणारे आहे. कारण `भक्ती’ म्हणजे भजन-पूजन, उपास-तापस, जपजाप्य, आरत्या, तथाकथित ‘तीर्थ’स्थलांच्या यात्रा हेतु, अगदी उतारवयांत सगळ्या गैरसोई साशीत प्रवास, नवल बोलणे फेडणे असा (ग़ैर)समज रूढ आहे. ज्ञानार्जनासाठी असोशी । धारोनि मनि करितो तपासी । जाणा उज्वलेल भविष्यासी । शिष्य खरां ।। 1142 प्रज्ञा लौकिकर्थि ग्रंथावगत अध्ययना । म्हणे आवश्यक असतोच कणा । तैसीचि इतर संगीत-नृत्या-अभिनय कलागुणा । स्रोतरूप आपोआप ।। 1143 मेधा, प्रज्ञा, बुध्दीचे द्वार । सहजसाध्य करिते ज्ञानसागर । काठोकाठ अपरंपार । वोसंडुनि वाहावया ।। 131 तरि अंतरी उत्कंठा, तृषा । तळमळ, शुध्द अभिलाषा । साधकाचे ठाई सहसा । व्हावी दृश्यमान ।। 132 आणि मग हे सगळं तुम्हापाशी असेल, तर मग.. गुरु होतो वात्सल्याचा झरा । गुरु, दीपस्तंभ एकमेव आधारा । गुरु, भेदतो तमाच्या परा । तेजोनिधी दाविण्या ।। 133 पण समाजभाग गतिमंदासही । कसब कांही तरण्या जीवनप्रवाही । जाणेनि, अभ्यासोनि न्यून त्याचेही । सुयोग्य दावावा पथ ।।1144 हे जो केरेल सहज साध्य । गुरु खरेचि होईल तो वंद्य । मनःपूर्वक श्रध्येय नि आराध्य । शिष्यासि ऐशा ।। 1145 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-56 सुसंस्कृत करणे हेच गुरूचे खरे कौशल्य सूकर पूजिले विलेपने । म्हैसा मर्दिला चंदने । तैसा विषयी ब्रह्मज्ञाने । विवेके बोधला ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 05/03/58 डुकराची पूजा अंगभर सुवासिक द्रव्ये चोपडून केली तरी पुढच्या क्षणात ते उकिरडयावर लोळणार. रेडयाचे चंदन लावून शरीर रगडले तरी तो शेणातच बसणार. त्याचप्रमाणे छानछोकी ऐषारामाची आवड असलेल्या विषयासक्त शिष्याला ब्रह्मज्ञानाचा विवेक कितीही समजावला तरी मूळ चैनीची वृत्ती बदलेल काय ? शिष्य कसा नसावा हे शिष्यलक्षण समासात समर्थांनी सांगितलय. विविध देश-प्रदेशांत, निसर्गाचा अविभाज्य भाग असलेले जीवमात्र.. हिंस्र श्वापदं, गुर-ढोरं, मर्जार-श्वानादी पाळीव प्राणी, विविध कारणांसाठी उपयुक्त ठरली आहेत. अगदी हिंदू दैवतांची वाहने.. मूषकापासून सिंहापर्यंत… शिरोभागासाठी.. घोड़ा (तुंबरू), गजवदन, विघ्नहर्त्यासाठी, मत्स्य, नक्र(मगर), सूकर म्हणजे वराह, विष्णू अवतारासाठी मान्यताप्राप्त आहेत. ग्रीक पुराणदेवतासुध्दा अशा कांही प्रकारच्या आहेत. ग्रीस, इजिप्तनधल्या पिरॅमिडसतकेच सिंहाचा शिरोभाग आणि गरुडाचे पंख ल्यालेले स्फिंक्सही, सर्वदूर सुपरिचित आहेत. असं असतांना कुशिष्याच्या तुलनेसाठी दासांनी या जीवमात्रांचा उल्लेख कां बरं केला असेल.. विकृतीला ना जातपात । पशु-पक्षी-मानव सर्वांत । लक्षणे दावी सतत । अतिरेकी ।। 134 सुकर-म्हैस, यक्ष-राक्षस । कुणास चुकला मद-मोह-पाश। ऐशा जीवमात्रास । हेटाळावे कां कुणी ।। 135 तसेच, ज्ञानोपासनेसाठी, गुरुगृही दाखल होऊ पाहाणार्या.. भले तो पापी, संतापी, अनाचारी कां असेना… त्यांचे व्यक्तिमत्व, अंतःकरण उपदेशाने शुध्दीकरणाद्वारे सुसंस्कृत करणे हेच गुरूचे खरे कौशल्य आणि तीच गुरूंचीही कसोटी.. शिष्य, बर्या-वाइटासहित । स्वीकार करावा गुरुगृहांत । धरुन हात हातांत । गुरुने न्यावे सन्मार्गी।। 136 अरुण काकतकर 9822021521 मुखपृष्ठ » संपादकीय » भक्तिबोध-57 प्राक्तन! एक कारण। प्राक्तन! आलस्यासि निमंत्रण। प्राक्तन! कृतिशीलासि आव्हान। भेदून, करण्या क्रमणा।।1123 प्राक्तन! म्हणे विधिविखित। प्राक्तन! `हरी’ भरवसा पात्र?। प्राक्तन! भरवेल कवळ मुखांत। म्हणावे शहाण्याने?।।1224 प्राक्तन! दावेल यश?। प्राक्तन! पळवेल विघ्नासं?। प्राक्तन! घडवेल विनासायांस?। कार्य! निद्रिस्त व्हा बिनघोर।। 1225 प्राक्तन! ना वारेल उचित कर्म। प्राक्तन! ना धारेल संपदेचे वर्म। प्राक्तन! ना सजवेल विरूप चर्म। निसर्गदत्त।। 1126 अशा या प्राक्तनाची अतर्क्य रूपे, पाहावयाची। होवू देत पांपणी काठांची। दहिवरे प्रळयजळं।।1146 तीन वर्षाची कवळी पोरं। माय बापान्ला नाही घोर। खाईल कुल्यावर फटके चार। ना जर मागेल भीक।।1127 पायाला अखंड चटके। अंगावर धडुते फाटके। मुख्यमंत्र्याचे वारस नेटके। मात्र बापासवे शाळेंत।।1128 जेवढी वाढेल प्रजा। मंत्रि’गणां’ची मजाच मजा। `तापला तवा, पोळी भाजा’। अध्यादेश काढिती।।1129 कुणा आली कणव दया। हृदय द्रवले, वोसंडली माया। पालन पोषण कराया। नेती पोरे स्वगृही।। 1130 सवरु-शिकुनि मोठी झाली। ठाव स्रोताचा घेऊ लागली। मुळाशि येवुनि ठाकली। विचारण्या जाब।।1131 डळमळतील सिंहासने। गडबडतील चांचरत वचने। डबडबतील अंतःकरणे। कांहींची, कथेने।।1132 दुर्गा शस्रधारि पाहोनी। भयभीत तळवे जुळवित दोन्ही। करतील दयेसाठी विनवणी। पापि नराधम अतिरेकी।। 1133 परिस्थिती होवू शकते ऐसी। मदांध उधळती संपदेसी। करोनि रिकामी जर धनराशी। प्रामाणिक कष्टकर्यांची।।1134 पुराण इतिहासांत ऐशा कथा। अभ्यासता ग्रंथ, गाथा। किती टोकदार व्यथा। असते, येते कळोनी।।1135 तान्हेला शुष्ककंठ तान्हा। मातेसही फुटेना पान्हा। घास नसल्या कारणे क्षुधाशमना। रडती दोघे कळवळत।। 1136 तैसीच अवस्था जनतेप्रती। हाल अपेष्टा रोज भोगती। मधुचंद्र कधि, कधि झगडा, युती। जखमांवर चोळिती मीठ।।1137 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-59 परब्रह्म चारी दिशांना, अस्तित्व जाणवत नाही तळघरामधे उदंड द्रव्य । भिंतीमधे घातले द्रव्य । स्तंभी तुळवटी द्रव्य । आपण मधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 17/05/21 पूर्वजांनी घराच्या तळघरात, जाड भिंतींच्या पोकळीमध्ये, खांबामध्ये आणि तुळईमध्ये जागोजागी अमाप संपत्ती भावी पिढीसाठी जपून ठेवलीय. परंतु हे माहीतच नसल्याने हलाखीत दिवस काढतोय. त्याचप्रमाणे परब्रह्म आपल्या चारी दिशांना कोंदाटले असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. अज्ञानापोटी ओढवून घेतलेले हे पारमार्थिक दारिद्य्रच नव्हे काय ? घरोघरी आता बालकांमध्ये आनंदी आनंद आहे. कारण वर्षभर, खांद्यावर दप्तरांचं ओझं.. म्हणजे पुस्तकांचं. दुपारी मधल्या सुटीत मित्र-मौत्रिणींसेबत खायला खाऊचा डबा, नंतर.. हां..पाण्याची बाटली, या सगळ्यासकट, साधारण 2।।/3 शेर.. म्हणजे 100 शेरांचा एक मण व्हायचा पूर्वी.. त्या शेराच्या मापामधला..तर असं ओझं घेऊन, कुणी चालत तर कुणी सायकलीनं, कुणी आईच्यामागे स्वयंचलित दुचाकीवर बसून तर कुणी बाबांच्या चार चाकींतून..शाळेंत येऊन, त्रैमासिक चाचण्या देत, वार्षिक परीक्षा देऊन, थकलेली शरीरं आणि मनाला विश्रांतीचे.. म्हणजे मज्जा करायचे दिवस आलेंत. कुणी मामाच्या गावाला तर कुणी मावसभावाच्या मुंजीला किंवा लां।़।़बच्या दादाच्या लग्नाला, आई-बाबांसोबत जाणार, तर कुणी गिरिभ्रमण किंवा कोकणांतल्या स्वच्छ मउशार पुळणींवर, वाळूचे क़िल्ले बांधायला किंवा ओल्या वाळूत स्वतःच बोटांनी कोरलेलं नांव, येऊन परतणार्या लाटेंत विरघळून जातांना पाहात, टाळ्या वाहवून नकळत निसर्गाच्या गमतींना दाद देणार ! घरांच्या भिंतींत दडवून ठेवलेलं सोनं नाणं जरी मिळालं, आणि निसर्गानं बहाल केलेलं निरामय आरोग्य नसेल तर, ते ‘धन’ काय कामाचं ? अवघा निसर्ग धनभारित । जीवमात्र सारा ऋणाइत । आपल्याचि कर्माचे फलित । कु-हाड घाली पायावरी ।। 142 `ये रे बाळा’ म्हणे काळी आई । परंतु माजली `इमलेशाही’ । वपन करुनी वृक्षवल्ली, वनराई । कुठे फेडतिल ही पापे ? ।। 143 समोरचे सुवर्णपात्र । अव्हेरित मनुष्यमात्र । कथिला देउनि मानपत्र । डोहाळे जाणा भिकेचे ।। 144 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-59 `माणुसकी’ धर्माचरणी । हेचि पाळू व्रत । इकडे दृश्य तिकडे देव । मध्ये सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ।ऑ। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 08/10/66 दृश्य म्हणजे जे इंद्रियांद्वारा समजते, उपभोगता येते ते. निर्गुणाच्या साधनेला लागल्यावर एक एक गोष्ट निरसन करता करता शून्यावस्था प्राप्त होते. यापलीकडे खरा आत्मदेव असतो. साधक अज्ञानाने शून्यावस्थेलाच ब्रह्म मानतो. हे मानणे सुद्धा जिथे संपते ती ब्रह्मस्थिती . इंद्रीया जाणवे तेचि खरे । अदृश्याचे वर्णन, अंदाज सारे । `कालापव्ययी’ व्यर्थ पसारे ।आ निरुद्योगी मांडिती ।। 145 दशदिशांना पसरलेल्या, अज्ञात तमोगर्भी, केवळ भास्करतेजाच्या साहाय्याने, ज्ञानेंद्रियांकरवी जाणवणारे आपले क्षुद्र, अत्यल्पजीवी जगणे ! त्यात `ब्रह्म’ कसे असू शकते ? मुंबईच्या चौपाटीवर शहाळ्यांतलं पाणी पिऊन ते फेकणार, तोच त्यांतून एक इच्छापूर्ती महाकाय प्रकट झाला नि मला म्हणाला, `वत्सल, तुझे काय प्रिय करूं सांग ? काय हवे ते माग ! हा तुझी सेवक क्षणार्धांत तुजसमोर सेवेसाठी सादर करेल !’ मी आनंदांत होत्सांता त्याला म्हणालो, ‘ मला एक शंभर क्षेत्रफळाचा, स्यंपरिपूर्ण गाळा पाहिजे आहे रे ! देशासाठी कां मिळवून ?’ माझी मागणी ऐकून महाकाय क्रोधित होत, परत रिकाम्या शहाळ्यांतलं जाऊ लागला. जातांना मला म्हणाला, ‘अरे मराठी माणसा, ती मागणी मी जर पुरी करू शकलो, तर प्रथम मींच नाहीं कां जाणार तिथं निवासासाठी ? मराठी म्हणून जन्मलास ना ? आपल्या आई-बाबांच्या कर्माची फळं निमुटपणे भोग नां !’ तरी एका बाबीकरिता, सर्वधर्म संस्थापक-आद्य वगैरेंचे मनःपूर्वक आभार मारायला हवेंत.. शिशु, वृध्द, ऋग्ण, गर्भवती । कर्मकांडापासून यांना मुक्ती । धर्ममार्तंडही देती । हे ही नसे थोडके ।ऑ। 146 हृदयस्थ माया-ममतेची निगराणी। सत्य-शिव-सुंदरदर्शने पांपणींत पाणी । `माणुसकी’ धर्माचरणी । हेचि पाळू व्रत ।ऑ। 147 जपू झरा, धरा, तारा । भवतीचा संपन्न निसर्गपिसारा । हव्यास, आक्रोशापरता बरा । उपकारक सर्वदा ।ऑ। 148 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-59 महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले।। कैचे घर कैचा संसार । कायसा करिसी जोजार । जन्मभर वाहोन भार । सेखीं सांडून जासी ।ऑ। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 03/10/48 काय माझे घर घर, माझा प्रपंच, माझी माणसे करत बसला आहेस. स्थावर जंगम मालमत्ता जन्मभर सांभाळण्याचा कुटाणा चालू आहे तुझा. ओझी वाहिलीस आयुष्यभर. शेवट काय होणार ? हे साठवलेले सगळे इथेच टाकून तू एकटा मृत्यपंथाने निघून जाशील, तुला कळणार देखील नाही. वैराग्य निरूपण समासात समर्थ व्यावहारिक गोष्टीची मर्यादा स्पष्ट करतात.परत परत ही कर्मयोगाची गाडी, `ब्रह्म’ नावाची अदृश्य, जाणिवेविणा वावरणारी कोडी, भाबडय़ा-भोळ्यांच्या मनात कोंबण्याचे अश्लाघ्य कर्म ही भोंदू साधुसंत, महंत मंडळी किती काळ आडवणार ? ते नसलेपणी उगा खुणावणारे भाकड, भाकर कमवायला जाणार्या कृतिशीलाला, `वैराग्य’ घे आणि शोध जा `ते’ ! नाहीतरी इथेच सोडून जायचे आहे ना सगळे ? (मग त्यातले थोडे माझ्या झोळींत ओत) !’ अशा धमक्या किती युगे देत राहाणार? आणि हीच जर इतिकर्तव्यता असेल जगण्याची तर… मग जन्मास यावेचि कां बा ? । जर संसाराची साहेना आभा । अर्ध्यावर रडगाण्याची मुभा । पळपुटय़ाचे लक्षण ।। 149 धूलीकणहि दावितो अस्तित्व । पापणीत ! स्पर्शिता क्षणभर अंधत्व। मुंगीसाठी आधारतत्व । होतसे गरज पडतां ।ऑ। 1152 अनादि अनंताच्या कालगणनेंत आपले `असणे’ म्हणजे एका क्षणाच्या पद्मांशापेक्षाही क्षुद्र ! मग त्याविषयी विरक्ति कां उगा प्रकट करत बसायची नि रडगांण्यात स्वतःला आणि आप्तेष्टांना लोटायचं ? जन्म ? तमांतरि तेजोरेखा । जन्म ? नियतीस, खेळण्या सारखा। जन्म ? सर्वांगपरिपूर्णतेस पारखा। जाणा जीवमात्रांस ।ऑ। 150 अरुण काकतकर 9822021521… मुखपृष्ठ » संपादकीय » भक्तिबोध-60 जयास जैसें भासले । तेणें तैसें कवित्व केलें । जयास जैसें भासले । तेणें तैसें कवित्व केलें । परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 09/05/23 पिंड ब्रह्मांड रचनेविषयी ज्याला ज्या प्रकारे भासले, समजले त्या तशा शब्दात कवीने वर्णन केले आहे.मुळात वेदानाही जे अवर्णनीय वाटते त्या निर्गुण ब्रह्माचे अनेकांनी केलेले आकलन हे स्वानुभवाच्या कसौटीवर निवडूनच घेतले पाहिजे. मुळांत `निर्गुण’ या शब्दंतच त्याचा अर्थ अध्याऋत आहे. त्याला ‘ब्रह्म’ असे संबोधल्या बरोबर, `नाम’ असणे हा एक गुणं नाही कां आपोआप प्राप्त होत ? मग ते ‘निर्गुणत्व’ आपोआप नाहीसे नाही कां होत ? उल्लेख टाळ्या किंवा अनुल्लेखतत्व पाळाल तरंच निर्गुणत्व प्राप्त होतं, अशी माझी… कदाचित विचित्र असेल… पण ठाम धारणा आहे. जाणिव म्हणजे खरे ज्ञान । सशब्द अथवा निरव कारण । जगरहाटीसाठी पैरण । चिलखती ।। 151 जाणिवेविणा बरोबर सगुणत्व हातांत हात धरून चालत असते. आणि त्यांचीही ‘जाणीव’ मन धारण करीत असते. पंच ज्ञानेंद्रियापैकी कांहींनीतर किंवा एकत्रपणे अस्तित्व जाणवतो त्यालाच सगुण साकार मानतो मी ! आणि मग त्याच्याशी नाते संबंधातले विविध बंध.. सख्यत्व, माया, प्रेम, तिरस्कार, मत्सर आदि भावना… निर्माण होतांत. जैसे भावेल तैसे ध्यावे । त्यंस मांडोनि भजा-पुजावे । आळवावे, गोडवे गावे । इष्टाराध्याचे ।ऑ। 152 हा ऐसा शब्द-प्रवाहो । त्रिकाळ पसरुनी आपुले बाहो । कवळू पाहे ‘अपात्र’ कां हो । नवलचि, मजसारखे ।। 153 मी एक सर्वसामान्य माणूस ! जे पाहिलं, अनुभवला त्या आधारे अवघड संकल्पनांचा अन्वयार्थ शोधायला प्रयत्न करतोय. आणि त्या प्रक्रियेला आनंदसुध्दा लुटतोय! अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-61 नेमाने वाचा भक्तिबोध । नेमाने वाचा भक्तिबोध । जर अंतःकरण होईल क्षुब्ध । सोडा दैवी `चमत्कारांचा’ शोध । एकचि उपायो, कार्यमग्नता।। 1163 कारण आजकाल, प्रार्थनास्थळांच्यासाठी, विश्वस्तांद्वारे वा शासनाद्वारे नियोजित सुरक्षाव्यवस्था पाहांता हसांवे की रडावे, समजोनासे झाले आहे. भोळे भाबडे, आपदा विपदांच्या निराकरणासाठी, त्यांना वारण्यासाठी ज्या श्रध्येयाकडे विनवणी करतांत तो.. `देव’ स्वतःच भेदरलेला । बुध्द, ख्रिस्त, महादेव वा अल्ला । `जर झाला अतिरेकी हल्ला’ । म्हणती, ‘लपावे कोठे ?’।। 846 राहावे सुखरूप भक्तनिवासी । म्हणजेच खोल त्याच्या मानसी । सापडणे कठिण `मारेकर्यासी’ । म्हणती, एकमताने ।। 847 पण तिथं तरी… सुरक्षेची काय शाश्वती ? । विश्वस्ताची फिरली मती । फिरविण्या पाठ मिळाली संपत्ती । माहिती ‘त्यांना’ देईलं ।। 1171 शिवाय….. उंबरठय़ाआंत नुसता वंदुनि ठेविला । ऐसा कैसा ‘देव’ भजिला, पूजिला । जर नाही अवडंबरे प्रदर्शिला । वस्तींत कळावे कैसे ?।। 1172 पण हौस भक्त, महंतांसी । ओरबाडिती स्वमनासी । काढून ‘थरथर कांपणार्यासी’ । भर चौकांत ठेविती मधोमध ।। 848 मग रंगते ‘रक्षणस्पर्धा’ । भाबडय़ांचा जीव अर्धाअर्धा । हिरव्या-भगव्या-निळ्यांची त्रेधा । वाचविण्या अनुयायी ।। 849 कारण… भक्ताविणा कसला ‘देव’ । कसली ध्यान धारणा, श्रध्दाभाव । संपदाप्राप्तिप्रती सिध्द नाव । प्रवाही कसे बडवे ढकलतील?।। 850 इकडं भेदरलेला जमांत म्हणतेय… ना दिसति सुरक्षा रक्षक । वा छपविलेले लघु छायक । मग शोधतिल शार्वीलिक ?। कैसे, आणि कोठे?।। 1153 मशिद, चर्च, गाभारा । जीवास राखण्या बरा । प्रतिकृति आमुच्या न्या बाजारा । सजवा, पूजा वा बोळवा ।। 1154 आम्हा सोडवा, करा मोकळे । बेडय़ा न चढवा बळेबळे । जत्रा उत्सवांचे सोहळे । वृथा भोग, शीर्षशूळ ।। 1173 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-62 माया नाना रूपे धरी । अदृश्याचा चक्रव्युह । मने तीन वृत्ति एक माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी । माया नाना रूपे धरी । ब्रह्म ते अरूप ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 06/05/08 गुणमायेपासून जे जे निर्माण होते ते सर्व विकारी म्हणजे बदलत जाणारे आणि अंती नाश पावते. ब्रह्म मात्र अविचल आणि शाश्वत असते. सर्व चराचर सृष्टी ही मायेपासून निर्माण झाली. ब्रह्म स्वतः निष्क्रिय आहे. माया अनेकविध रूपांनी आणि रंगांनी प्रकट झालेली आपल्याला प्रत्यक्ष दिसते मात्र परब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे दिसत नाही. त्याची अनुभूती सद्गुरू कृपेनेच होऊ शकते. अरूपासि कसले अस्तित्व ?। `मनासि दिसते’? कल्पना भ्रामक। `दावा आम्हासि!’ म्हणतां कारणे अनेक । सांगती `अध्यात्म’वादी ।। 1174 `जाउन एकांती,तपःश्चर्या करा, । ऐहिकाच्या मोहासि मारा । उपदेश ऐका, पण श्रध्दापूर्वक भरा। झोळ्या आमच्या नेमाने’ ।। 1175 न जमले, चिंता सोडा । सज्ज पाप-पुण्य व्यापारा । खर्चीला कांही आम्हाला मुद्रा । लुटा सुख बिनघोर !।। 1176 जो `ब्रह्मा’ मागे धावला । त्याचा कर्मभाव बुडाला । भवसागर लंघायाला । `ब्रह्म’ न होई आधार ।। 159 अदृश्याचा चक्रव्युह । परत-मार्ग भयावह । सामान्यांनी त्याचा मोह । न बाळगणेचि बरे ।। 160 कारण समाजात जगत असताना, सामान्य नागरिकांना इतकी व्यवधानं कशी राखावी लागतात, हे त्या (संधी) साधु, विरक्त (?), निरिच्छ (?), निर्मोही (?) व्यक्तींना कसं उमगांव!? कारण आपल्यासारख्याला, मगज दोन कृती एक । मने तीन वृत्ति एक । बहुअवधानि मती एक । व्यक्तीमाजी ।। 161 या पलिकडची कुठलीही शक्ती निसर्गाने दिलेली नसते ! अरुण काकतकर 9822021521 अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये। न अधिकार ठेवण्या नांवें। भक्तिबोध-63 कां मी लिहितो भरताडं । कुणि उघडलं तरी कां हे बाड ? उघडोनि निद्रिस्त कवाड । पांपण्यांची ?।। 1147 ना तत्ववेत्ता, ना मी संत । भाव धारण करुनी मनांत । उर्जा फुंकू पाहातो शरीरांत । जगण्यासाठी अवसान ।ऑ। 154 शिरावर कां बा मग हे ओझे । पाप, पुण्य? कोणत्या काजे?। कवळ केवळ जे माझे । नियती कां देइना?।। 155 जरा म्हणजे असतो शाप ?। जरा जीवमात्रांसि आपोआप । जरा जीवनानुभवाचे रोप । वृक्षरूपी, वितरण्या छाया।। 1100 कां सगळे वृध्दापकाळीच मनी । उपदेशार्थ येते उफाळोनी ? । अनुभव उकळोनि, गाळुनी । अर्क संपृक्त निव्वळ !। 1141 मी एक प्रस्तरखंड । शेंदुर चढविति विनाखंड । अंकुरू लागला भयगंड । मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल।। 1116 शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी । आशयाची रेटारेटी । टाळोनि न टळें त्यांत ।। 1117 दासच सांगोनि गेले । नाही कांही जर लिहिले । अनुभव व्यर्थ गेले । रोजचे अनमोल ।। 1094 `हे भ्रामक, खोटें’ सांगोनि अस्वस्थ। करणे ! त्यांसि, नाही रास्त । `अभावदेवा’वरी भिस्त । ठेविती भाबडे! ही चिंता।। 1061 पण जाणीव सत्याची देणे । लिहित चाललो याचि कारणे । कर्मावर श्रध्दा वळविणे । श्रेयस्कर! सांगा कोणी।। 1062 कोण कुठला यःकश्चितं । सारेच माझे अनिश्चितं । भयावह गर्दी गोंधळांत । दिवाभीत मी ।ऑ। 1065 मी कां अजुनी `आहे’ ?। कोणत्या कारणे श्वास वाहे ? । प्राण कां न सुटो पाहे ?। देहांतुनी ।। 1066 मन आजकाल अशांत । म्हणे, ‘चल विजनवासांत । नसेल कोणी स्वकीय आप्त । अपेक्षिण्या परस्पर ।ऑ। 1067 परंतु `पळणे’ योग्य नव्हे । अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये । न अधिकार ठेवण्या नांवें । ऐशास ! मजला राहील।। 1068 अरुण काकतकर 9822021521 ।।भक्तिबोध।। दिनांक २२-०४-२०१५ बुधवार साठी. नेमाने वाचा भक्तिबोध । जर अंत:करण होईल क्षुब्ध । सोडा दैवी 'चमत्कारांचा' शोध । एकचि उपायो, कार्यमग्नता ।। ११६३ कारण आजकाल, प्रार्थनास्थळांच्यासाठी, विश्वस्तांद्वारे वा शासनाद्वारे नियोजित सुरक्षाव्यवस्था पाहांता हसांवे की रडावे, समजोनासे झाले आहे. भोळे भाबडे, आपदा विपदांच्या निराकरणासाठी, त्यांना वारण्यासाठी ज्या श्रध्येयाकडे विनवणी करतांत तो.. 'देव' स्वत:च भेदरलेला । बुध्द, ख्रिस्त, महादेव वा अल्ला । 'जर झाला अतिरेकी हल्ला' । म्हणती, 'लपावे कोठे ?'।। ८४६ राहावे सुखरूप भक्तनिवासी । म्हणजेच खोल त्याच्या मानसी । सापडणे कठिण 'मारेकऱ्यासी' । म्हणती, एकमताने ।। ८४७ पण तिथं तरी... सुरक्षेची काय शाश्वती ? । विश्वस्ताची फिरली मती । फिरविण्या पाठ मिळाली संपत्ती । माहिती 'त्यांना' देईलं ।। ११७१ शिवाय..... उंबरठ्याआंत नुसता वंदुनि ठेविला । ऐसा कैसा 'देव' भजिला, पूजिला । जर नाही अवडंबरे प्रदर्शिला । वस्तींत कळावे कैसे ?।। ११७२ पण हौस भक्त, महंतांसी । ओरबाडिती स्वमनासी । काढून 'थरथर कांपणाऱ्यासी' । भर चौकांत ठेविती मधोमध ।। ८४८ मग रंगते 'रक्षणस्पर्धा' । भाबड्यांचा जीव अर्धाअर्धा । हिरव्या-भगव्या-निळ्यांची त्रेधा । वाचविण्या अनुयायी ।। ८४९ कारण... भक्ताविणा कसला 'देव' । कसली ध्यान धारणा, श्रध्दाभाव । संपदाप्राप्तिप्रती सिध्द नाव । प्रवाही कसे बडवे ढकलतील ?।। ८५० इकडं भेदरलेला 'जमांत म्हणतेय... ना दिसति सुरक्षा रक्षक । वा छपविलेले लघु छायक । मग शोधतिल शार्वीलिक ?। कैसे, आणि कोठे ?।। ११५३ मशिद, चर्च, गाभारा । जीवास राखण्या बरा । प्रतिकृति आमुच्या न्या बाजारा । सजवा, पूजा वा बोळवा ।। ११५४ आम्हा सोडवा, करा मोकळे । बेड्या न चढवा बळेबळे । जत्रा उत्सवांचे सोहळे । वृथा भोग, शीर्षशूळ ।। ११७३ ********* अरुण काकतकर . ।।भक्तिबोध।। दिनांक २५-०४-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। करूणाकीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटे । श्रोतयांची श्रवणपुटें । आनंदे भरावी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०२/१२ कीर्तनभक्तीमधे नवरसांपैकी करूणारस प्रधान असावा. करूणा म्हणजे कींव नाही. अपार निस्वार्थ प्रेमभाव म्हणजे करूणा. त्या करूणानिधी परमेश्वराची कथा स्पष्ट, स्वच्छ खणखणीत आवाजात करावी की त्यायोगे श्रोत्यांचे कान इकडचेे तिकडचे ऐकूच शकणार नाहीत. त्या सर्वांची मने आनंदाने तृप्त होऊन तेही भजनामधे तल्लीन होतील. ************* 'करुण' ! राजा सर्व रसांचा । 'करुण' ! स्रोत माउली हृदयिचा । 'करुण' ! पहावा गाउलीच्या नेत्रिचा । रुध्द होतसे कंठ ।। १०५५ कीर्तन ! सहज सोपे माध्यम । कीर्तन ! वाचा, देहबोलींचे धाम । कीर्तन ! थकल्या, श्रवणी विश्राम । उभारी आणण्या परतुनी ।। १०५६ वेणू, वीणा, एकतारा । डमरु, ढोल ताशे नगारा । तमगर्भी निद्रिस्त धरा । जागवाया नादावती ।। ११५० प्रारंभी 'जय राम कृष्ण हरि' गजर । एकात्म चित्त साधण्या एकत्र । संवादिनी सूर संगे थाप तबल्यावर, । टाळ करिती तोड योग्यस्थली ।। ११५१ पूर्वरंगोत्तर आरती, मग उत्तररंग । कीर्तनाची दोन जरि भिन्नांग । उपदेशगर्भी मनरंजन अमोघ । वक्तेबुवा गाती अजोड ।। ११४७ त्याच प्रमाणे, ऐतिहासिक काळांत, लावणी.. मग ती फडावरची नृत्यासमवेत असो वा बैठकींत नायकिणीनं गात, अंगविक्षेपादि अदांनी सजवत, सरदार दरकदारांच्या महालांतली असो... हलक्या प्रकारचं मनोरंजन समजलं जाई. युध्दमोहिमांत, थकल्या सैनिकींच्या विश्रामवेळी, मनं रिझवायला, नवा तकवा द्यायला, फडसुध्दा बरोबर जाँत असंत. पण तिथंसुध्दा प्रारंभी.. डफ ढोलकी खंजिरी । पायी चाळ चढवुन नारी । लचकत मुरडत फडावरती । कांचनसंध्या सजवाया ।। ११४८ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २८-०४-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। दृष्टांती काही अपूर्व आले । अंत:कर्ण तेथेंचि राहिले । कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/२२ निरूपण ऐकायला बसला. मूळ तत्व समजण्यासाठी एखादा छानसा दृष्टांत सांगितला गेला. ते उदाहरणच इतके आवडले की मनाने तिथेच रेगाळला. निरूपण पुढे निघून गेले तिकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.कुठपर्यंत काय वाचलय काहीच कळेनासे झाले. जे लक्षात ठेवायला हवे तो सिद्धांत आणि अनुषंगित महत्वाचे विषय समजलेच नाहीत. श्रोता अवलक्षणनिरूपण समास. *************** वक्ता, वक्ताचि नव्हे श्रोतेविण । असं म्हटलं जातं ! कां तर कुठलीही, कलाकारी, कसब, अदाकारी अजमावायला जर कोणी नसेलंच, तर कलाकारांसाठी आपले प्रयत्न वृथा वाटायला लागतांत. पाहायला, ऐकावया, जोखायला कोणीतरी समोर हवंच ! भले मग ते कौतुक असो वा निंदा वा कांही सूचनावजा टिपण्णी... पण ती आवश्यक असते. जसा कुठलाही प्राणी ओरडणी, हंबरला, गुरगुरला किंवा गरजला तर त्याला प्रतिक्षिप्त होणारा प्रतिसाद अपेक्षित असतो किंवा त्यानं केलेला कंठनाद हा कुठल्यातरी नादाची प्रतिसादस्वरूप असतो ! म्हणून, श्रोता जर श्रवणादरम्यान? वक्तव्यापासून विचलित होवू लागला, तर दोष श्रोत्याचा नव्हे तर तो वक्त्याचा असतो, याच भान विशेषत: तथाकथित विद्वानांनी कायम राखायला हवं... तुमचे लाभो तुम्हासचि दृष्टांत । झगडणे, मरत असता जगण्यांत । स्वेदबिंदूंची कष्टकार्यांत साथ । देते समाधान ।। १००१ अध्यात्म प्रचारा उचलता लेखणी । स्वेदबिंदूंची करुण कहाणी । व्यथा, वेदना दुखणी-बाणी । दृष्टिआड करू नका ।। १००२ उपाय 'उपासना' सांगो नका । ना बोलतो नवस फुका । कष्ट करितो कार्यश्रध्द मुका । उपास ना घडवे आप्तांसी ।। १००३ उलथुनि अनंत ब्रह्माडे । ज्ञानेंद्रियासि सताड उघडे । ठेवोनि, धुंडाळिता न सापडे । तो 'नायक' ।। १००४ म्हणे 'शोधा अंतरंग । दिसेल त्याचे स्फटीकांग । नमस्कार त्यासि साष्टांग' । म्हणे 'घाला' ।। १००५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-०४-२०१५ बुधवार साठी. । दास-वाणी ।। गुरूशिष्या येकचि पद । तेथें नाही भेदाभेद । परी या देहाचा समंध । तोडिला पाहिजे ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२९ साधनेला सुरूवात करताना शिष्य आणि गुरू वेगवेगळया पातळीवर असतात. गुरू साधकाला हळुहळु स्वत:च्या अध्यात्मिक पातळीवर खेचत असतो. साधनेच्या परमोच्च पातळीवर परब्रह्माची अनुभूति दोघानाही सारखीच येते. ब्रह्म अभेद असल्याने गुरूशिष्य भेदभाव त्याच्या पायी नाही. इथे अट एकच आहे ती म्हणजे शिष्याने देहबुद्धीला कायमची सोडचिठ्ठी दिली पाहिजे. ' देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ' . ************ गुरुगृहांत प्रशिक्षणोत्तर, शिष्य स्वत:, कांही अन्य ज्ञानस्रोतांचा शोध घेऊन आपली ज्ञानसमृध्दी वाढवूलागला, तर गुरुने त्यास आक्षेप न घेतां, त्यांच कौतुक करीत त्यानं शोधलेले प्रवाह, विशुध्द, निर्मळ आणि निर्धोक आहेंत याची खातरजमा करून, प्रोत्साहित करणं हे चांगल्या गुरूचं लक्षण. समर्थांच्या काळापासून आज, सगळ्यांचं ज्ञानशाखा इतक्या विस्तारल्या गेल्या आहेंत कीं त्यांची माहिती एकाच व्यक्ती किंवा गुरुकडून मिळणं अपेक्षित नाही. जसं वैद्यकशास्त्रांत, गमतीनं म्हणतांत की, बोटाच्या पेरापासून ते रक्तवाहिन्यांच्या अंत: किंवा बाह्य आवरणापर्यंतच्या, विविध व्याधींसाठी वेगवेगळ्या उपचारपध्दतीं आणि चिकित्सक उपलब्ध आहेंत. म्हणून, गुरु असावे अनेक । ज्ञानस्रोत-प्रवाह पूरक । क्षेत्रवृध्दी कालागणिक । जाणोनि असावी ।। १६३ ज्ञानाच्या वाढती कक्षा । रोज नवे आयाम, दिशा । पुरविण्या क्षुधा-तृषा । क्षमताधारक विरळाची ।। १६४ गुरु असावे ऐसे ख़ास । कसब, कौशल्ये व्यक्तिविशेष । भरवुनि शिष्यांना घास सकस । करिति जे निष्णात।। १६६ दासे रचिली मंदिरे । प्रस्थापिले शक्ति-गाभारे । बलवंत करविण्या शरीरे । वेशीबाहेर, स्मशानांत ।। १६७ ऐशा विरळा संतासि । जखडून अंधश्रध्द भाकडांशी । भाबड्यां पाठवू पाहाती कुण्यादेशी । 'लुंगे'सुंगे 'साधू' 'बुवा' ।। १६८ शिष्यांना उचित मात्रा । शिष्यांना ऊर्जा गात्रा । शिष्यांशिरि सदैव छत्रा । धरितले, तो गुरू ।। १६९ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-०४-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। मृत्तिका खाणोन घर केले । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें । परी तें बहुतांचे हें कळलें । नाहीच तयासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/१०/३४ अगदी खोलवर पाया खणून उंच च्या उंच घर बांधले .माझ्या कर्तृत्वाने ते बांधलय असा अभिमानाने दृढनिश्चय केला. ऐटीत राहू लागला . त्याच घरात कालांतराने उंदीर ,घुशी ,पाली ,डास ,ढेकूण इ अनेकजण राहायला आले . कितीही काळजी घेतली तरी ते पूर्णपणे जाईनात . माझे घर असा शंख केलात तरी त्यावर अनेकांची मालकी असते . मी म्हणजे अहंकार . ममत्व म्हणजे माझे माझे . या दोघांचा त्याग म्हणजे परमार्थ . *********** वयांत येता जडतो जीव । प्रेयासाठी सर्व हावभाव । हसणे, झुरणे, रडणे प्रभाव । दाविती उत्कट काळी ।। १२१५ मग बोहले, बाशिंग, चौघडे । नवे पर्व जगण्यांतले वेडे । संसारवेलीवर गोंडस बछडे । आनंदकंदा ना पारावार ।। १२१६ अन्न, वस्त्र, निवारा या गरजा । पुरविता ओहोटीस लागते 'मजा' । 'फक्त आतां तू राणी, मी राजा' । शब्द विरती हळूहळू ।। १२१७ कालांतरे पालथे होते । घरभर छकुले रांगू लागते । पडते, झडते, खट्याळी दाविते । प्रेमपात्रास मात्रा वात्सल्य, ममतेची ।। १२१८ 'घर' होते आप्तांच्या हृदयी । पोरे, अस्तुरि, माय-बापा ठाई । चार भिंती, छप्पराखाली डोई । बांधण्या क्रमप्राप्त, मृत्तिकाखनन ।। १२१९ घरगृहस्थी, संसार वाढवितो । सुख-दु:खे झेलोनि परतवितो । कोण स्वान्त:सुखाय जगतो ?। एकलकोंडा ।। १२०६ निसर्गाने दिले अनमोल जिणे । हिंस्र, जीवजंतू, जित्रापासह जगणे । 'घर' सर्वांचे स्वाभाविक होणे । अनिवार्य ।। १२०७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१-०५-२०१५ शुक्रवार साठी. आज कर्मयोगींचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा दिवस. गेल्या शतकांत, तंत्रज्ञानानं घेतलेली झेप विलक्षण आहे. अणुचं विघटन होतांना बाहेर पडणाऱ्या अणूच्या अंतरंगातल्या महाप्रचंड ऊर्जास्रोताची शक्ती, मनुष्यानं, उत्क्रांतीद्वारे विकसित झालेल्या बुध्दिबळाच्या साहायानं हस्तगत केल्यामुळं, आणि तिची विनाशकारी चेतना दुसऱ्या महायुध्दांत अनुभवल्यामुळं, मानवजात खदखदा हसतेय. पण हे कुठपर्यंत ? माणसाचा 'भस्मासुर' होईपर्यंत ! तंत्रज्ञान विकसित होतय आणि हातांचं आणि एकूणच कर्मेंद्रियांचं काम कमी होतय. पण महजाचं म्हणजे मेंदू, तर्क-बुध्दीचा वापर अधिक प्रमाणांत अपेक्षित असल्यामुळं प्रशिक्षणाच्या शाखा विस्तारतायत.. नेत्रहीन, कर्णबधीरांना, अस्थिव्यंगधाृयांना, कामाच्या, अर्थार्जनाच्या, स्वावलंबनाच्या संधीच्या कक्षा, या प्रशिक्षणानं अधिकाधिक रुंदावत जाणार आहेंत. त्यांचा आत्मविश्वास वृध्दिंगत होत जाणार आहे. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेंत पुढे पुढे कर्मेंद्रियांची म्हणजे, हात, पाय वगैरेंची गरज नामशेष होवून, जशी शेपटी झडली तशी झडून जायचीसुध्दा श्यक्यता आहे. ही 'भीषणावस्था' टाळायची असेल तर कांही कामं, कर्मेंद्रियांना कार्यरत ठेवण्यासाठी शिल्लक ठेवणं क्रमप्राप्त आहे. ऊर्जा अविनाशी आहे. म्हणून भविष्यात कदाचित.. विखूरले, विसविशींत ऊर्जास्रोत । तंत्रज्ञानें केले जर संपृक्त । पुराण, इतिहास होईल ज्ञात । दृक्श्राव्यांतुनी ।। १२०७ ऊर्जाचि केवळ अखंड अमर्त्य । अस्तित्व तिचे विविध रूपांत । पंचमहाभूती सर्वांगांत । विघटित वा एकवट ।। १२०८ जे दिसते ते आहे अथवा होते । अवकाशस्थांचे सत्य विज्ञान सांगते । परावर्तित प्रकाशयोगेचि असते । वा भासते, 'अस्तित्व' ।। १२०९ प्रकाशवर्ष, 'महा'कालगणन । प्रवास प्रदीर्घ, अगम्य निलक्षण । दृष्टिपथांत तेजोकिरण । येता ! म्हणा 'आहे तिथे' ।। १२१० परंतु जाणा, तो केवळ भ्रम । 'आहे'चे प्रमाण दूरस्थ तम । मोजण्या अपुरे, अक्षम । प्रगत तंत्रही ।। १२११ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०२-०५-२०१५ शनिवार साठी. ।। दास-बोध ।। तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरी प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काये करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/६७ साधक श्रवण मनन वाचन अशी साधनेला सुरूवात करतो. अनेक धर्मग्रंथांचे सतत अध्ययन करून त्याला वाटू लागते की ब्रह्माविषयीचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला आता झालय. हळूच नकळत आळसावतो. नंतर स्वत:च ठरवतो की आता ब्रह्मज्ञान तर झालच आहे मग नित्य नैमित्तिक साधनेची आता मला गरजच काय ? परिणामी साधना सुटल्यावर पुन्हा शून्यापासुन करावी लागते. तेव्हा ज्ञानोत्तर साधनेला पर्याय नाहीच. ********* तसे पाहू जाता । कोण जगी सर्वज्ञाता । जो समजेल 'झालो आतां' !। मृतचि जाणावा ।। १२२९ ज्यांस सर्वज्ञान मिळेल । जो स्वर शुध्दोत्तम गाईल । कसब लंघोनि जाईल । इहलोकी राहात नाही ।। १२३० म्हणोनि जाणावे अंतरंगी । न वागा-बोलावे अतरंगी । सर्वसुखप्राप्त असा जगी । ना ठावके, कोण झाला ।। १२३१ शिष्याची मानसिकता । नेहमीच धारावी कार्य करिता । काय शिकवेल, कोण नकळता । कोठे, कधी अनिश्चित ।। १२२५ कर्मेंद्रिये कार्यरत असतां सगळी । ज्ञानेंद्रीये ठेवावी मोकळी । अतिरिक्त, भरावी मगज पोकळी । ताज्या, नव्या जाणिवांनी ।। १२२६ श्रवण, मनन, अध्ययन । अखंड करावे ज्ञानार्जन । तदनंतर अनुभव कथन । करणे, शोभते ज्येष्ठांसी ।। १२२७ संकलनापूर्वी टिपण । क्रमवारीने प्रसंगांचे लिखाण । ऐसा संकेत सर्वसाधारण । असावा साहित्य निर्मितींत ।। १२२८ कांहीच करो नये अती । इतुके कि वोसंडेल मती । मन वेडाचारा भोवती । रुंजि मग पाहे घालू ।। १७२ अतिशहाणा करि वमन । शेवाळ माजलेले ज्ञान । स्वयं घसरोनि त्यावरुन । कोलमडू पाहे ।। १७३ प्रमाणांत विद्वत्ता । सत्कारणी लावीता । नूतन शुध्द ज्ञानस्रोता । प्रवाहवेणा आपोआप ।। १७४ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-०५-२०१५ सोमवार साठी. गृहस्थाश्रमी, दारांतून पाऊल आंत ठेवल्याबरोबर, स्वत:च्या सांसारिक विवंचना क्षणभर बाजूला ठेऊन, आपल्या श्रमपरिहारार्थ लगभग करणारी पत्नी, मुद्रेवर प्रसन्नता दाखवणारी माय, करेला मिठी मारून कांहीतरी मागण घेऊन लाडलाड बोलणारी कन्या, या सगळ्या आपल्या शक्तिदेवता असतांत ना ! म्हणून... पत्नी-कन्या-स्नुषा गौरी । सह-कार्य-धर्मा गौरी । वामा-भामा-रमा गौरि । आदराव्या बहुमाने ।। १६२ अंगण सारवुनि सड़ा-शिंपणं । उष:काली रंगावली रेखुन । उडळुन ज्योतीने, वृंदावन। वंदन करुनि परतसे ।। १२३५ वेणी- फणी, मुखमार्जन । आन्हिके उरकोनि अभ्यंग स्नानं । मन:शांतिस्तव योगाचरण । करोनि, जुंपतसे संसारा ।। १२३६ नियोजन, पुरवठा, प्रक्रिया । स्वयंपाक आप्तांसि सुखवाया । नित्यनेमाने अविरत काया । झिजविते, सुगृहिणी ।। १२३७ पति-मुलांची मग पाठवणी । वृध्दांची दुखणीबाणी । कुणा औषध, कुणास पाणी । दुर्लक्षुनि देतसे स्व-व्यथा ।। १२३८ सहज सरते दुपार । करिता झांकपाक, आवरसावर । दोन पळांच्या विश्रामास प्रहर । शोधता होते दमछाक ।। १२३९ संध्याकाली निरांजन धूप । श्लोक, परवचादि संस्कार प्रदीप । मुलांसि ! मग दृष्टिक्षेप । पतीकडे, प्रेमभरे ।। १२४० हा खरा कर्मयोग । आप्तांसि देत सुखोपभोग । दावाया हिला 'अध्यात्मिक जग' । 'पळपुट्यां'नो, धजू नका !।। १२४१ वृध्दापकाळांत, मंदिरांत, भजन कीर्तनाच्या मिशाने, कापसाच्या फुलवाती वळत असतांना, किंवा आजकाल, सद्य परिस्थितीनुसार, कांही सामाजिक कार्यांत सहभागी होतांना सुध्दा, त्या ज्नमजांत 'माते'चा एक कान ाणि मन:चक्षु, स्वगृहाच्या दिशेनेच सरसावलेला असतो. कारण तिला कुठल्याही 'संतपदा'ची अपेक्षा नसते.. सारेचि कां अवतरले पळपुटे । म्हणति, मी परमारार्थाकारणे झटे'। सोडोनि घरे, तोडोनि नात्यांते । 'भोगोत्तरी' संतपद ?।। १२४२ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-०५-२०१५ गुरुवार साठी. कधी कुठल्या अनाथालयाला भेट दिली आहेत ? तिथल्या निरागसांच्या डोळ्यांतलं 'वाट पाहाणं' निरखुनी आहेत ? कधीतरी दिसतील नि घेऊन जातील 'घरी' या वेड्या आशेपोटी... करंटी दांपत्ये ऐसी कैसी । जीव जन्मासि अजाणता घालिती ?। पोरके सोडोनी दूर जाती ?। अश्राप, मुक बिचारे जीव ।। १२२३ शोधत हिंडावे लागते त्यांना । माया, वात्सल्य शांतवना । लपवावी की दाखवावी कोणा । आसवे, जैशा पागोळ्या झडीनंतर ।। १२२४ त्यांचेही असेल कांही म्हणणे । रोज रडत जगत मरणे । दर क्षणी पावकाशी लढणे । होत असेल असह्य ।। १२४३ कधि अस्तुरिची प्रतारणा । कधि पति'राज' हाणती वाहाणा । कधि आप्तां(?)ची लुडबुड बुडविण्या । संसार 'लाडक्या'चा भवसागरी ।। १२६९ कधी अपुरा अन्न, वस्त्र, निवारा । भाग पाडे पोरके करण्या पोरा । संकटांचा वादळवारा । असेल होत कारण ।। १२७० तरिही ऐसे कैसे निर्दय । होती पालक, बाप-माय । रक्क्तलाछित होत नाही हृदय ?। हात छकुल्याचा सोडतांना ।। १२७१ कधि जन्मत:च व्याधिग्रस्त । छकुल्याचे हाल वाढतांत । दारिद्र्याने आधीच त्रस्त । नाइलाजे त्यजून त्याना, सोडिती ।।१२७२ कसले शासन कसली व्यवस्था ?। कोण जाणते ऐसी दुरवस्था । प्रजा वाढवी तरच सत्ता । मतपेटीद्वारा ! 'त्यां'ची स्वप्ने ।। १२७३ म्हणोनि सुखवाया पळभर । अवलंबित पति-पत्नि परस्पर । बेभानी, नशा, नेते उंचावर । जातो सहजचि तोल ।। १२४४ कोण एक शुक्रजंतू । बीजांडांत पाहातो रुतू । कदाचित विनाहेतू । जाते घडोनि निमिषांत ।। १२४५ दुर्भागी साकारतो जीव । विनाकारण, कार्यभाव । पदरी भविष्याचा अभाव । घेवुनि सडत पडत तडफडतो ।। १२४६ दोघे पांगती दोन दिशांना । 'लग्न' संस्था, वचनांना । चुरगळून, तोडित नाळ ।। १२४७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-०५-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। जेणे जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयास नाही कामना । जयास नाही कामना । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/५६ ज्याने सर्व प्रकारच्या चवींवर विजय प्राप्त केलाय. खाण्यापिण्यातले हवे नको संपून गेलय .जीभ हे ज्ञानेंद्रिय तसेच कर्मेंन्द्रिय ही आहे म्हणून ज्याचा बोलण्यावरही ताबा आहे. वासना म्हणजे अपूर्ण इच्छा . कामना म्हणजे वासनांचे प्रकटीकरण . जो पूर्णतृप्त म्हणजे निर्वासन झालाय . इच्छाच संपवून टाकल्याने जो निष्काम झालाय तो खरा सत्वगुणी . ********* अरे निरुद्योग्यांनो ! कष्टोत्तर कमाईतून भाकरी खायच्याऐवजी, भाकड सांगणं पुरे करा कि रे मित्रांनो ! कशास करिता खटाटोप ?। कामनांना द्यावया निरोप । श्रमले, कष्टावले रूप । जनांचे न दिसें ? आंधळ्यांनो ।। १२४९ अविरत उपदेशांचे जंजाळ । सामान्यांसि सदासर्वकाळ । दावोनि, 'आपत्तीचे मूळ, । पाप पूर्वजन्मिचे' बरळता ? ।। १२५० सहनशीलतेलाही असतो अंत । स्मरण, संतां'नो, राहू दे मनांत । करतील, करवतील आकांत । दंड, भेद अवलंबुनी ।। १२५१ राम ! मनुष्यत्वाचा आदर्श । म्हणवित त्याचे 'दास' । सुखाचे चार घास । सामान्यांचे कां गिळता ?।। १२५२ खरेच वदला हे, सांगा, तुम्ही ?। विश्वास कैसा राखावा मनी ?। 'बोघ(?)' अतर्क्य दूर ठेवोनि । पळू पाहतिल लक्षिते ।। १२५३ वारंवार छळदायी ठरते । ठेवा हृदयी तुमच्यापुरते । किंवा मूर्ख, भाबड्या श्रवणार्थे । अध्यात्म, मोक्ष, गत्यादि भाकड ।। १२५४ नका आणु आतां दृष्टीपुढती । मोक्ष, उपास-तापास, भक्ती । आमुच्यापासोनि निवृत्ती । घ्या, भले जर असला ! ।। १२५५ निर्गुणाच्या शब्दांगी 'गुण' । म्हणजे नाही त्यासि वेसण । असले अनाकलनीय येडेपण । कां बा करिता ?।। १२५६ 'सगळे' म्हणतां, 'त्यागावे' । अन् भजन तुमचे आळवावे । आळवावर 'पत्र पतितं तोयं' पाहावे । पाऱ्या-वाऱ्यासारखे नश्वर ?।। १२५७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-०५-२०१५ बुधवार साठी. केवळ आपल्या संसारावर, त्या योगे जोडल्या गेलेल्या आप्तेंष्टांच्या नात्यांना सांभाळत, कर्मयोगी मारिगक्रमणा करणाऱ्या, गृहस्थांना, हे अध्यात्मवादी त्यांच्या कृतनिश्चयापासून कां ढळले पाहातांत ? सर्वसामान्य माणसं, बऱ्याच वेळेसा, आपल्या घासांतला वाटा आपदाग्रसतांना देत असतांत. कारण करुणा, दया हे नियर्गानं मनुष्याला दिलेले निर्मळ अलंकार आहेंत. ते, अगदी त्रयस्थावरजरी, निसर्गप्रकोपामुळं संकट कोसळले तरी सजग होवून, त्याच्या खिशाला परवडेल अशा पध्दतीनं, प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे दातृत्वक्षम होतांतच. तरीसुध्दा, जणू कांही त्यांना परमार्थाची जाणंच नाही अशा गैरसमजुतीनं म्हणा किंवा फुकटखाऊ वृत्तीमुळं म्हणा, कांही 'परिवार' विविध रूपं धारण करून आकर्षित करूं पाहांत असतांत. अशांसाठी, सर्वसामान्यांनी दिलेला संदेश काय सांगतो पाहा.. वारियामाजी परिमळू । पाणियामाजी गंगाजळू । कळकामाजी सुरेल वेळू । तैसे आम्ही जाणिजे ।। वृक्षामाजी कल्पतरु । अश्वामाजी अबलख वारू । पर्वतीमाजी मलय नि मेरू तैसे आम्ही जाणिजे ।। भक्तीमाजी आर्जव प्रीतीमाजी मार्दव शक्तीमाजी वीरभाव तैसे आम्ही जाणिजे ।। वैखरीमाजी देववाणी देवतामाजी चक्रपाणि ललनांमाजी आदर्श गृहिणी तैसे आम्ही जाणिजे ।। झळाळीमाजी सुवर्ण शस्त्रांमाजी रामबाण औषधीमाजी अमृतकण तैसे आम्ही जाणिजे ।। वृत्तीमाजी सरळभावी उक्तीमाजी किंचित कवी रीतीमाजी अपार निगर्वी तैसे आम्ही जाणिजे ।। रूपामाजी अति सामान्य कोपामाजी सात्विक जाण दीपामाजी निरांजन तैसे आम्ही जाणिजे ।। दु:खामाजी सहनक्षम सुखामाजी आनंदधाम शोकामाजी नियत संयम तैसे आम्ही जाणिजे ।। गृहामाजी घरकुल विरहामाजी भक्त व्याकुळ कलहामाजी युक्त गोपाल तैसे आम्ही जाणिजे ।। पावकामाजी ऊर्जास्थल दाहकामाजी परित्राणा़ बल भाविकामाजी भक्तवत्सल तैसे आम्ही जाणिजे ।। लावणी जैसी शृंगारिक । ओवी जैसी भक्तिभावजनक । शब्द जैसै विविधभावांचे दर्शक । तैसे आम्ही जाणिजे ।। १२६१ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-०५-२०१५ शुक्रवार साठी. ।। दास-वाणी ।। लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे येक । साधन करिती ब्रह्मादिक । हे ठाउकें नाही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/७१ सामान्य लोकांपेक्षा मुमुक्षु आणि साधक हे खरतर वरच्या पातळीवरचे. परंतु साधनामार्गात आवश्यक असलेली बंधने पाळत असताना मौजमजा करणारे बहुसंख्य टिंगलटवाळी करतील या धास्तीने साधकाला लाज वाटत असते. मोकळेपणाने तो नाम घेत नाही. खर तर ब्रह्मा विष्णु महेश सुद्धा देवपदावर असूनही साधना करतच असतात. हे लक्षात घेता नि:संकोच नि:शंक साधनेतच हित आहे हे साधनप्रतिष्ठानिरूपणात समर्थ सांगताहेत. ************** सामान्यांची साधना । लढत जगणे, हेचि जाणा । तरी त्याची निर्भत्सना । 'कर्मठ' 'ज्ञानी' कां करिती ?।। १७५ कारण ते तर पळपुटे । आव आणिती तद्दन खोटे । भाळी आठ्यांचे मुखवटे । चढवुनि करिती कुकर्म ।। १७६ श्रध्देयांचं मुखदर्शन घेण्यासाठी प्रार्थनास्थळी जातांत भाबडे भोळे. त्यांना तिथं दिसते एक मूर्ती.. परंपर्नं, संस्कारांनी, त्या मूर्तीलांच 'देव म्हणा' असं बजावलेलं.. अं हं.. धमकावल्लं असतं. पण त्यांना तिथं काय अनुभव येता ? धर्माचे दलाल, पूजारी त्या बिचाऱ्यांच्या हातांतली, पूजा साहित्याची तबकं हिसकावून घेतांच नी त्यांची कराळं आदळतात त्या पार्थीवाच्या चरण युगुलावर किंवा देहुडा म्हणजे दीड पायावर.. गोंडस, निरागस गोजिरवाणी । निसर्गाची जिवंत लेणी । आदळती पार्थिवाचरणी । अबालवृध्द नि आया-बायांना ।। १७७ असले तर हेच रूप । 'देवतत्वा'चे इवले रोप । कां पदरी धारिता पाप । छळणुक त्याची करोनिया ?।। १७८ गुरु असावा जाणकार । अव्हेरुनि साधनेचे क्लिष्ट द्वार । घालून ज्ञानप्रबोधी फुंकर । चैतन्यमूर्ती जसा ।। १७९ कर्कश,गोंधळ,दंग्याचा उत्सव । हरवला कुठेतरी त्यांत देव । दुराचाराचे फुटले पेव । गुंड, मवाल्यांना पर्वणी ।। १८० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-०५-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। जो जनामधें वागे । परि जनावेगळी गोष्ट सांगे । ज्याचे अंतरी ज्ञान जागे । तोचि साधु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०१/१८ तो लोकांमधेच असतो. त्यांच्यासारखाच खात पीत असतो. त्याचे वेगळेपण हे त्याच्या वागण्यात आणि त्याने केलेल्या उपदेशात असते. निस्वार्थ असल्याने सुख दु:ख, हवे नको च्या पलीकडे गेलेला हा साधु समाजाला शांति, तृप्ती, आनंदात रहाण्याचे रहस्य शिकवतो. ज्याच्या अंत:करणात ' अहम् ब्रह्मास्मि ' हे ज्ञान जागृत असते तोच खरा साधु. ************* अनुभवावे नि सांगावे । रसवत्तेस सांभाळावे । जाणीवपूर्वक टाळावे । असत्य ।। १८१ गृहस्थाश्रमी माणसं आपोआपच निस्वार्थ होतांत. कारण स्वार्थ जपून, मुला-बाळांच संगोपन, संवर्धन, शिक्षण; वृध्द आई-वडिलांची सेवा-शुश्रुषेला, औषध-पाणी, आप्तेष्ठांबरोबरच्या नात्यांची, घट्ट होत जाणाऱ्या वीण, या सर्व बाबींना, गृहस्थधर्म स्वीकारलेलं दांपत्य, आपध्दर्म म्हणून, केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेमानं, जिव्हाळ्यानं, माया-ममता-वात्सल्य-भक्तींनं सांभाळतच असतांत. अगदी सहज, कुठलीही अभिनिवेश न बाळगतां किंवा दर्शविता ! मग, 'साधु'त्वाची सारी लक्षणं त्यांच्यामधे स्थित असतांना, त्यांना 'साधू' ही व्याख्या लागू पडण्यास अगदीच स्वाभाविक.. नाही कां ? स्वप्ने दाखवावी नित्य । कर्मकारास प्रेरणा-साहित्य । मात्र, साकारेल सत्य । राखावे तत्वांसी ।। १८२ आणि प्रेषित जन्नत: प्रेषित म्हणून जन्मांस येतो असं मानणं हा महामूर्खपणाच ! अगदी कृष्णापासून, येशूपर्यंत सर्व प्रेषितांच्या जन्मकथा अभ्यासल्या, तर ते सहज ध्यानांत येतं ! कुंती, कुमारी माता ! जन्मत: गोठ्यांत । प्रेषितास ! कोणी आणिले या जगतांत ?। भेदांतीत तरि शिकवणी सर्वधर्मात । धरेवरी सर्वत्र ।। १८३ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ११-०५-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। संकल्प विकल्प तें चि मन । जेणेकरिता अनुमान । पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०८/०६ अंत:करणातील एक कप्पा म्हणजे मन.ते संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प म्हणजे एक निश्चय. विकल्प म्हणजे त्याला पर्याय. मन निश्चित निर्णयाला कधी पोचत नाही. दोलायमान, अस्थिर, चंचलता ही मनाची वैशिष्टये. अनुमान म्हणजे तर्क. मनाचेच कार्य आहे ते. तो कुतर्कही असू शकतो. होय नाही, हे का ते , असे का तसे या गोधळातून मनाला बाहेर काढते ती बुद्धी. अंत:करणाचाच पुढचा कप्पा. ती निश्चयात्मक आणि निर्णायक असते. बुद्धीच्या ताब्यात मन असणे अत्यावश्यक. मन ! परजाणिवेपल्याड । मन ! अजोड, बंद कवाड । मन ! टिपण्या, शोषण्या अखंड । अथांग, अनंत पोकळी ।। १२७५ मन ! सहजपणे अप्राप्य । मन ! अवघड, अनाकलनीय, अजेय । मन ! मुलत:, निर्व्याज,निष्पाप । जैसी माती कुंभाराची ।। १२७६ मन ! शोधते सुयोग्य विरंगुळा । मन ! वात्सल्याच्या विविध कळा । मन ! प्रेम, ममताभावे जळा । पांपणीकांठी साकळते ।।१२७७ नवाचे विभाग असतांतच ! एका बाबीचा विचार करीत असतां, इतर अनेक बाबींचे मनांत स्मरण असणे, त्यांच्या कार्यवाहीचे नियोजन करीत राहणे, हा आपला सर्वांचा दररोजचा अनुभव आहे. यालाच विविध वियवधानं राखणं म्हणतो आपण.. अंत:करण, मन, बुध्दी । त्रिस्तरीय विचारशुध्दी । अवलंबीतो तो बोधी । लौकिकार्थी, शहाणा ।। १८४ संकल्प, विकल्प मिशें । मन होई वेडेपिसे । बुध्दी, चातुर्याच्या पाशे । सोडवी गुंता ।। १८५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १२-०५-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०१/०१ ज्ञानेंद्रिये, कर्मेंन्द्रिये, पंचविषय, पंचप्राण यांच्या द्वारे पंचमहाभूतिक देहाचे चालणारे दैनंदिन व्यापार म्हणजे प्रपंच होय. यात खाणे पिणे, उद्योग व्यापार, देहाच्या सर्व क्रिया उपभोग हे सगळेच आले. दिवसाच्या किंवा आयुष्याच्या पूर्वार्धात यांचा आस्वाद घेतल्यावर निदान उत्तरार्धात तरी नेटाने सतत पारमार्थिक चिंतन करत राहावे. विवेकी जनहो इथे आळस करू नका . ************** मंगेश तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलय की बालपणी माझ्यावर, सर्वसामान्य कुटुंबांत होतांत तसे सुसंस्कार झाले. पण संत साहित्य वाचतांनाचा माझा अनुभव कांहीसा बुचकळ्यांत पाडणारा होता. कारण, कांही उपदेशपर ओव्या, अभंग वाचून झाले की त्यांच संत महात्म्याच्या, आधिच्या आशयाला छेद देणाऱ्या ओव्या वाचनांत यायच्या नि मनांत गोंधळ व्हायची ! हे खरे की ते ? मघाशी वाचलेले ? यांना नेमके काय म्हणायचं आहे ? तशी कांहीशी अवस्था माझी आज होते आहे. घर संसार त्यजून, परमार्थाला लागा, आत्मशोध घ्या असं ९९ वेळा सांगीतल्यावर। दास अचानक नेटक्वीन संसाराची भलावण कशी करू लागले ? पडल्या विवाह बेडीला । जडल्या मग दृढ प्रीतीला । सर्वदा अतुट नात्याला । राखावे निष्ठेने ।। १९१ केलींत वाटते चोरी ?। कबुली मग द्यावी खरी । सुखवाया पोरे, अस्तुरी । झगडावे अखंडित ।। १९२ आधी झाल्या ना आणा भाका ?। आंता आरडा न करा फुका । मुकाट वल्हवा नौका । भवसागरी ।। १९३ आधी केलांत बैल पोळा । आंता सावरा गोंधळा !। समजावले अनंतवेळा । दुर्लक्षिलेत कां बरे ?।। १९४ पण गंमत असते संसारी । सुखदु:खाच्या विविध परी । आनंद,वेदनांनी घेरले तरी । सामोरे जा नेटाने ।। १९५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १३-०५-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळाले सर्वहि । आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०८/२७ उपाधी म्हणजे लावून घेतलेले काम. मुळातला जो शुद्ध 'मी' आहे तो ब्रह्मरूप असल्याने त्याला उपाधी नाहीच. मायेच्या प्रभावाने त्या जीवाला सर्व नातलग प्राप्त होतात. ही माणसे जीवनात येण्यासाठी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध कारणीभूत असतात.त्या सर्वांची उपाधी जीव या जन्मात लावून घेतो. त्यांच्या येण्याजाण्याने खंत आनंद दोन्ही वाटता कामा नये अशी साधकाची स्थिती असली पाहिजे. शिकवण निरूपण दशक , उपाधीलक्षण निरूपण समास. ************* आप्त-स्वकीयांच्या अपेक्षा स्वाभाविक । शमवाया क्लृप्त्या अनेक । भले असा अनभिषिक्त साधक । नसे पर्याय शोधासी ।। १९६ उच्च-श्रेणी साधक । नाचि व्हावा नात्यांचा जनक । जैसा विश्वामित्र अव्हेर-नायक । भोगलोलुप ।। १९७ ऐशा नरें आरण्य । मानावा निवास धन्य । लौकिक जगणे समाज-मान्य । नाकारण् हितकर ।। १९८ एक गोष्ट मात्र खरी धरती राहिल आभारी न पडले जर संसारी नर-नारी समस्त ।। १९९ आध्यात्माची धरतिल कास भोगतील केवळ भक्तिभावास कामंधतेचे त्यजतिल पाश वाढवणार नाही प्रजा ।। २०० सद्यकाळाची गरज । मर्यादित राखणे निपज । जीवमात्रांचे अतिरिक्त बोज । साहेना पंचमहाभूता ।। २०१ म्हणून संकटे अनेकविध । जलधि-भूवर निसर्गक्रोध । सजिवांचा घेउन वेध । व्यक्त विश्वांत होतसे ।। २०२ आजकाल अपेक्षा अवास्तव । दक्षिणा शब्दचि असंभव । शिष्य-गुरू भेदभाव । मानणारे विरळाची ।। २०३ बीज रुजत नाही तो । फळाची प्रतीक्षा करितो । जुजबी 'ज्ञान' मिळता पळतो । शिष्य जाणा आजचा ।। २०४ 'मुद्रा' प्राप्ती प्रथम । मिळविणे मग 'प्रेम' । वळोनि पाहणे 'गुरुधाम' । ज़मावे कैसे शिष्यांना ?।। २०५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १४-०५-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। कांही उपाधी करू नये । केली तरी धरू नये । धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०१/३० आपल्या हौसेखातर समाजसेवेचे ओढवून घेतलेले काम म्हणजे उपाधी. एक तर निभावण्याची ताकद नसेल तर ते कार्य सुरूच करू नये. सुरू केले तर त्या कार्याला चिकटुन बसू नये. मला संस्थेत पर्याय नाहीच हा भ्रम निर्माण होतो ************** गेल्यांच पंधरवड्यांतली वार्ता आठवली या निमित्तानं. देशांतल्या असंख्य अशासकीय संस्था, ज्यांचं कार्य आता आवश्यक नाही किंवा थांबले आहे किंवा नावापुरत्याच उरलेस्या आहेंत, त्यांना जर मीळत असतील तर ती अनुदानं बंद करून, त्या संस्थांच बंद करण्याचा अधियादेश काढण्याचा शासन विचार करीत आहे. यापैकी कुत्सित संस्थांनी, मिळालेल्या अनुदानाचा, देणग्यांमधून खर्ची पडलेल्या रकमांचा हिशेबच जनतेपुढे मांडलेला नाही. त्यांत भर पडली ती डाॅ. सुधीर रसाळांच्या वक्तव्याची. ते म्हणाले, साहित्यपरिषदेचे सध्याचे सदस्य, पदाधिकारी पाहाता, त्यांचा साहित्यक्षेत्रांतला अधिकार(?) पाहाता, लेखकांना त्या परिषदेचा कितपत उपयोग होतो हे ठरविणे अवघड आहे. मग अशा परिस्थितींत, ती कार्य(?)रत ठेवण्यांत काय हंशील आहे ? अमरपट्टा घेवोनी येथे । कोण सांगा जगी जन्मते । 'वेळ' येतां सकळ जनांते । सामोरे जाणे क्रमप्राप्त ।। २०६ कार्य सुरूच राहाणे । हितकर ! जाणती संस्थापक 'शहाणे' । निरपेक्ष निष्ठांवंताचा धांडोळा घेणे । चतुरपणे करिति ते ।। २०७ नाहीतर 'गोपाऴकाला'। कार्याचा ! निश्चित ठरलेला । मग भवतिच्या कर्दमाला । धुणे होई दुरापास्त ।। २०८ नाहीतर शेवाळ माजते । साचल्याची दुर्गंधी येते । कार्यप्रवाहा खीळ बसते । लया जाती परिश्रम ।। २०९ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-०५-२०१५ शुक्रवार साठी. ।। दास-वाणी ।। जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यात मिसळावा । राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०१/०४ महंताने प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा ठाव घ्यावा. त्याचा आणि आपला आत्मा एकच आहे हे समजून समाजामधे मिसळून जावे. दुसर्यांच्या अंत:करणाचा सतत शोध घेत एकरूप व्हावे तरच नियोजित साधना अन कार्य करवून घेता येते. आत्मवत परावे ते मानीत जावे । हे चातुर्यलक्षण समर्थ आत्मदशकात सांगताहेत. ********** संवेदना नावाची संस्था पुण्यांत, दुर्धर व्याधीग्रसत, आपदा-विपदांची, नकळत शिकार झालेले, विस्थापित सांसाठी भराव कार्य करते. देशभरांतल्या अशा अनेक संस्था निरलसपणे, निरपेक्षपणे काम करीत आहेंत. हे सर्व कार्य, कारे करते आणि लक्षित यांची मन एका भावनिक पातळीवर आल्याशिवाय होवून शकत नाही. कधी कधी निसर्गसुध्दा वेदना, अगदी शमवणं श्यक्य नसलं तरी कमी करायला, आपल्या नियंत्रणांतल्या पंचमहाभूतांकरवी करीत असतो पण त्यासाठी बाहेर पडून त्यांच्या सानिध्यांत जाणं आवश्यक असतं. आणि ते सुध्दा हातपाय, श्वासोछ्वास व्यवस्थित चालत असतांनांच ! कारण ही संधी परत परत मिळत नाही गेली वेळ परत येत नाही. 'पुण्य गांठी बांधा नि पुढील जन्मी माणूस म्हणूनच जन्म घ्या' वगैरे महंत, संतांच्या सदुपदेशाला विकृत स्वरूप देऊन, राजकारण्यांसारखं ' मत दो और अच्छे दिनोंकी राह देखो' या धर्तीवरची खोटी आश्वासनांना केराची टोपली दाखवा... निसर्गांत नित्य रमावे । श्वासोच्छ्वास मोकळून टाकावे । वारा पाण्यासंगे खेळावे नाचावे । समर्पित व्हावे अग्नितत्वी ।। २१० निसर्ग अनुभवा पुरेपूर । कवडसे तरंगता जळावर । सप्तरंग प्रकटती लाटांवर । संधी एकाचि जन्मि, जाणा ।। २११ पुनर्जन्म थोतांड । चार्वाकाने केले बंड । अर्धज्ञानी कर्मठ धर्मंार्तंड । जरि आरडले संतापे ।। २१२ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १६-०५-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होता साधनाचा । ठाव नाहीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध :२०/१०/२७ मायेच्या प्रभावाखाली जे जे दृष्य दिसते त्याचा कारणासकट उलगडा झालाय.पंचमहाभूतासह ज्या असंख्य तत्वांचे शरीर बनलय त्यांचे निराकरण झाले. ही सर्व तत्वे आणि दृष्य म्हणजे माझे खरे स्वरूप नाही. अखंड केलेल्या साधनेमुळे मी ब्रह्मस्वरूप आहे हे विमळज्ञान मला उमगलय. तेच मला साधायचे होते. साध्य सिद्ध झाल्यावर ज्या साधनेमुळे हे प्राप्त झाले ती साधना सुद्धा आपोआप संपुष्टात आली. समर्थ सिद्धपुरूषाची स्थिती वर्णन करताहेत जे साधकासाठी उद्दिष्ट असले पाहिजे. ******** हे 'ब्रह्म' संबोधलं जाणारं, सारखं सारखं 'मी मी' कां करतय ? कोण तू ? अनंत, अवाढव्य, असीम अशी आपली नांव देत बसतो ती अवकाश नांवाची पोकळी तरी तशी आहेकां ? ते तिचं तिला तरी अवगत आहे कां ! क्षणोक्षणी अतिवेगानं, पण आपल्या दृष्टीनं अतिसंथपणे घडणाऱ्या घटितांची कल्पना आहे कां ? मग कुणी 'क्षणभंगुर' कशासाठी 'मी मी' म्हणून आरडा करतय ? विज्ञानावर कुरघोडी । करू पाहाती 'संत' बेगडी । 'लागों अदृश्य ब्रह्माची गोडी !' । आग्रहती परोपरी ।। २१३ गतीसही आळा बसतो । विरोध जैसा बळावतो । अशावेळी कास धरितो । विज्ञानाची, मानव ।। २१४ आणि अनाकलनीयाचा शोध घेत राहाण्यासाठी, आणखी आणखी पलीकडचं, पोकळीतलं माहीत विहावं, कदाचित प्रकाश, ध्वनि तरंग रूपानं, म्हणून नवनव्या दुर्बिणी विकसित होतायत, 'उत्क्रांत' बुध्दी वापरून...। हेच जाणा उत्क्रांत रूप । बुरसटल्या विचारांचे आक्षेप । बुध्दीकसाने उजळुनी दीप । 'सत्य' दावे 'मानव' ।। २१५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १८-०५-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। नट नाटय कळा कुसरी । नाना छंदे नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०२/२१ हे गणेशा तू एक कुशल नट आहेस. मोठया कौशल्याने तू अभिनयकला प्रगट करतोस. नृत्यकौशल्यातही असंख्य तालांवर तू सहजतेने थिरकत असतोस. टाळ, मृदुगांसारखी अनेक वाद्ये तुझ्या सभोवती आपोआप ताल धरतात कारण ताल ही तुझीच निर्मिती आहे. नृत्य करता करता त्या तालावर तूच हुंकार भरतोस जे नृत्याचे उपांग मानले जाते. गणेश स्तवन समासात नृत्यगणेशाचे समर्थांनी केलेले साक्षात वर्णन ! ******* कांही कांही दृश्य, दर्शनानेच नजर सुखावून जातांत, मन प्रसन्न करून जातांत, जरी आपल्याला माहीत असतं की, याला नवस बोलून, नुसतं याच्या नांवाचा जप करून, उपास-कापाल करून कांहीही, 'खाटल्यावर', बसल्याजागी मिळणार नाहीये ! 'कर्मानेच मिळते फळ, । कठोर परिश्रमांची कळ । जीवघेण्या परिस्थितीचा जाळ । सोसावा लागतो त्यासाठी ।। १२८९ असा हा गणेश.. जो दरवर्षी आपल्याला प्रतीक्षा करायला लावतो... अहा विविध कलांच्या कळा । पहा आनंद भिडे आभाळा । मुद्रा,पदन्यास,अभिनय बळा । महिरप देती बहुुविधरूपे ।। २१६ विरळा असतो आनंद । सुखदायि पळांचा कंद । 'समाधान' पुष्पांतरि मकरंद । हितकर निरामय सर्वकाळ ।। २१७ बाप तोलतो चंद्र-भागिरथी-त्रिशुळा । माय वितरे परित्राण बळा । परशु-पाश-मोदक तुंदिला । सावरण्यांत पुत्र व्यग्र ।। २१८ सहज रिचविति हलाहल । विकृतींसाठी होती कळिकाळ । क्रूर-कृतघ्न्यां तम-डोहाचा तळ । पंचमहाभूते दाविती ।। २१९ तेचि जाणा तांडव । नृत्याचाचि क्रुध्द-भाव । आवर्षण, जळोद्रेक संभव । रूपे संहारक मूलतत्वांची ।। २२० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १९-०५-२०१५ मंगळवार साठी. नमस्कार, असे वरवरचा। अंतर्ध्वनि फुत्कराचा । जीव घुसनमटे सद्भावाचा । बहुधा मागे ।। २२१ नमस्कार, दर्शनी कळा । अंत:स्राव विखारी भळाळा । उसळती द्वेषाच्या ज्वाळा । असूयेपोटी ।। २२२ वरवर पाहाता कीर्तन । आंत तमाशाचेच दर्शन । काय येतील मनी योजून । कळणे अवघड, सद्यकाळी ।। १२९० कोण अपराधी, कोण सज्जन । ठरविण्यासि न्यायासनं । विहित जरि प्रस्थापिते शासनं । विधिज्ञ करति सिध्द भलतेची ।। १२९१ छोट्या छोट्या प्रमादाबद्दल, सर्वसामान्यांना बेड्या ठोकायला सज्ज असलेले सुरक्षा(?)रक्षक, समोर सत्ता, संपदेचा तक्षक 'आ' वासून सरपटत येतांच, सर्वांगे, धरणीवर लोळणघेऊन अट्टल गुन्हेगारांना शरण जातांत.. गुन्हा न केला तरी दाखल । गुन्हा केला तरी बेदखल । कसले शासन, सुव्यवस्था, रक्षकदल । बेगडी अवघे 'मेळोनी'।। या पासून वाचण्यासाठी, संसार सोडा, पाश तोंडा, हात जोडा.. तपश्चर्या करा असा सदुपदेश(?) करणाऱ्यांना कर्मयोगी आजकाल धीटपणे सांगू पाहतोय.. कशासाठी गूहा वा घळ ?। कफ़नों, छाटी वा जपमाळ । दाढ्यीमिशांचे जंजाळ । साधते काय ?!। २२३ वेदना हुंदक्यांची जननी । व्यक्तण्या अर्थपूर्ण ध्वनि । पड़ता जाणिवेच्या कानी । अवतरे ओवी ।। २२४ परिक्रमा, तीर्थाटन । कशास जप तप होमहवन । वास्तव विस्तवापासून । अखेरीस पळति कां ?।। २२५ खवळता क्षुधेचा हुताशन । खळगींत ग्रासाचे हवन । क्रमप्राप्त ! पहिला चरण । आकळेना अध्यात्मी ।। २२६ अशांनी मी सावध करणे अयोग्य आहे कां ? जनहो घालितो तुम्हा साकडे । निवडून बाजूस सारा खड़े । भोंदू, ढोंगियांचे वावडे । असो द्यावे अंतरी ।। २२७ करो नये अति कधी कांहीही । कल्पना सजग जरि झाल्या प्रवाही । सोडावी लागतेच कधीतरी बाही । निवतांना ज्योत मंद ।। २२८ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २०-०५-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदे वेदांत श्रृती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०१/१५ हा ग्रंथ लिहिण्याआधी मी अनेक ग्रंथांची संमती म्हणजे अभ्यास केला आहे. चारही वेद, वेदांत म्हणजे उपनिषदे, श्रृतिग्रंथासहित सहाही शास्त्रे तर अभ्यासली आहेतच. याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे अध्ययनातून स्वत:ला आलेली प्रचीती किंवा आत्मानुभवाचा वाटा दासबोधाच्या रचनेमधे फार मोठा आहे ********** सुचत जाते तैसे लिहितो । सांगा काय म्यां पाप करितो । ना अढी कशाची मनी धरितो । जुळवितांना अक्षरे ।। २२८ गर्व न शिवो माझ्या मना । 'हे ? उपजे कैसे' ठावके ना । सांभाळण्या या 'अ-क्षर' धना । बळ द्यावे, वाचक-श्रोत्यांनी ।। ९४८ 'हे भ्रामक, खोटें' सांगोनि अस्वस्थ । करणे ! त्यांसि, नाही रास्त । अभावदेवावरी भिस्त । ठेविती भाबडे ! ही चिंता ।। १०६१ पण जाणीव सत्याची देणे । लिहित चाललो याचि कारणे । कर्मावर श्रध्दा वळविणे । श्रेयस्कर ! सांगा कोणीतरी ।। १०६२ मी आवाहन करतो, ब्रह्मचारी राहून, तत्ववेत्ते, संत, साधू होवून, अविरत उपदेश करीत राहाणाऱ्यांना... करुनी पहा ना संसार । सौख्यदायी ! जरि कष्ट फार । शुष्क शाखांवरी जैसा मोहोर । बहरतो पुनःपुन्हा ।। २२९ धडपडणे, पडणे, ठेचाळणे । परत उभारी धरोनि पळत राहाणे । हीच ग्रंथाची जिवंत पाने । आम्हांसाठी ।। २३० आत्मभान, प्रचिती क्षणोक्षणी । सुख, समाधान, दुखणीबाणी । जगण्याच्या वेदोपनिषिदांचे वैयाकरणी । अनुभवसिध्द आम्ही ।। २३१ श्रुती, दोन स्वरांमधे जैशा स्थित । रीती, संस्कारी तैशाचि असतांत । जिणे सरेतो संसारी, माय-तांत । गांती ! तकरारी विना ।। २३२ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २१-०५-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/०९ फक्त स्वत:चे आई वडिल, बायको मुलगा, सुन मुलगी यांची जबाबदारी मानतो. त्यांच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट करतो. माझ्याशिवाय यांचे कसे चालेल अशी धारणा मनात ठेवतो तो रजोगुण. सामाजिक जाणीवेचा अभाव अाणि स्वार्थप्रवण वृत्ती ही रजोगुणाची वैशिष्टये ! नाती जी जोडली स्वये । संगोपन कृतनिश्चये । करणे मन-वाचा-काये । सेवाभाव कां नसे ? ।।२३३ आधी भाकरी घरच्या ?। शक्ति-समयानुसार मग इतरांच्या । जागवाव्या जाणिवा सेवेच्या । याचि उपाये ।। २३४ घरी पोरे उपाशी । झोळी पसरे इतरांपाशी । समाजसेवेची बक्षिशी । कैसी द्यावी ऐशा नरा ?।। २३४ कुटुंबांत वाकडी तोंडे । इतरांसाठी चूल मांडे । कर्तव्याची बूज मोडे । सेवाभाव हा कैसा ? ।। २३५ धनिकांसी परोपकार । शोभून दिसतो अपार । ज्यांचे पोट हातावर । अशांस ते अशक्यप्राय ।। २३६ गरीबचि जाणतो व्यथा । भोगतो रोजचि वेदनांच्या कथा । अर्धा घास भुकेल्या भूता । सदय हृदये घालितो ।। २३७ यांना कसले, सत्व-रज-तमाच्या व्याख्या सांगता ? त्यांच्या जगण्या वागण्या बोलण्यांत क्षणोक्षणी हे तिन्ही प्रकट होत असतांत ! उपदेशाचा अतिरेक टाळा । वेळीच स्वत:स सांभाळा । क्रोधाग्नीच्या अन्यथा, ज्वाळा । भिडोनि तुम्हा जाळतील ।। १२८६ कारण ते परोपरीनं सांगताहेत... आम्हा वर्जचि सत्वगुण। रक्ताच्या नात्यांची जाण । राखत अंतरी त्यांचे भान । जगतो अविरत नेटाने ।। २३८ टॅंह्यॅं टॅंह्यॅं रडे बालक । त्राही त्राही आरडे पालक । नाही कांही, परिचालक । म्हणे उपाय मजपाशी ।। २३९ म्हणोनि आंता 'उत्तष्ठित' । खडबडून 'जाग्रत' । सुवर्णमध्य साधत । सावरा स्वतःच संसारी ।। २४० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २२-०५-२०१५ शुक्रवार साठी. आपल्या मायभूमींतल्या शास्त्र , तंत्रज्ञ, संशोधकांनी, अथक आणि पराकाषेचे प्यत्न, बुध्दी पणाला लावून, मंगळाच्या दिशेन पाठविलेलं अवकाशयान, ज्या दिवशी यशस्वीपणे झेपावून, नुकतेच पंख फुटलेल्या पांखराप्रमाणे, मातृप्रेमाच्या कक्षा सोडून, जगांतल्या बऱ्या-वाईटाचा अनुभव घ्यायला, पण नियंत्रित विहार करीत जातं, तद्वतच, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षा भेदून पुढची लक्षित क्रमणा करूं लागलं तो दिवस, जागतिक स्तरावरच्या अवकाशविज्ञान क्षेत्रांत, सुवर्ण क्षण बहाल करून गेला माझ्या मायभूला ! आणि, ज्या दिवसाची, आतुरल्या श्रवणेंद्रियांनी, आणि नजरेन, सारे देशवासीय वाट पहांत होते, तो स्वर्णक्षण अवतरला तो अानंदघनाचा घट घेऊनच.. मी, एक विज्ञाननिष्ठ भक्त सुध्दा, आनंदविभोर होत्साता लिहून गेलो... अवकाशाला गवसणी । कल्पिली होती कधी कोणी ?। परंतु अथक प्रयत्नांनी । गवसली माझ्या हिंदुराष्ट्राला ।। २४१ गोपुरे, लोलकाकृती परिचयखुणा । परग्रहांच्या अवतरणोत्सुक अवकाशयाना । अचुकतेसाठी केली योजना । विज्ञाननिष्ठ तापसांनी ।। २४२ जेंव्हा कधी प्राचीन काळी, आपण ज्या संस्कृतीचे वारस आहोंत ती उदयांस येत असतांना, या अवनीवरच, दुसऱ्या बाजूला आणखी एक प्रगत संस्कृती, उदयाला येत होती... आर्य संस्कृती पावली उदया । पश्चिम क्षितिजी प्रस्थापित 'माया' । प्रचिनातिप्राचीन समया । तेवल्या ज्योती एकसमयावच्छेदी ।। २४३ कौतुकाने मंगळाच्या । प्रसन्न, भारली चित्ते नि वाचा । वैज्ञानिकांची वैश्विक झाली चर्चा । अभिनंदन करतांना ।। २४४ अशक्य वाटाव्या नजरांना । अशा वैशिष्टयपूर्ण प्रस्तररचना । शक्ति-बुध्दि अबलंबितांना । साधल्या तत्कालीन तंत्रज्ञांनी ।। २४५ तळाशी घुमट वर्तुळाकृती । मध्यांतुन ऊर्ध्वगामी निमुळती । प्रार्थना स्थळांच्या आकृती । विश्वभर ऐशा कां ?।। २४६ ऐशा रचनेस, म्हणते विज्ञान । घर्षणविरोध होतो किमान । जलचर, खे-चर, वसु-धन । मुखाशी पाहा निरखुनी ।। २४७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २३-०५-२०१५ शनिवार साठी. । दास-वाणी ।। जेणे जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयास नाही कामना । जयास नाही कामना । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/५६ ज्याने सर्व प्रकारच्या चवींवर विजय प्राप्त केलाय. खाण्यापिण्यातले हवे नको संपून गेलय .जीभ हे ज्ञानेंद्रिय तसेच कर्मेंन्द्रिय ही आहे म्हणून ज्याचा बोलण्यावरही ताबा आहे. वासना म्हणजे अपूर्ण इच्छा . कामना म्हणजे वासनांचे प्रकटीकरण . जो पूर्णतृप्त म्हणजे निर्वासन झालाय . इच्छाच संपवून टाकल्याने जो निष्काम झालाय तो खरा सत्वगुणी . कशास करिता खटाटोप ?। कामनांना द्यावया निरोप । श्रमले, कष्टावले रूप । जनांचे न दिसें ? आंधळ्यांनो ।। १२४९ अविरत उपदेशांचे जंजाळ । सामान्यांसि सदासर्वकाळ । दावोनि, 'आपत्तीचे मूळ, । पाप पूर्वजन्मिचे' बरळता ? ।। १२५० सहनशीलतेलाही असतो अंत । स्मरण, संतां'नो, राहू दे मनांत । करतील, करवतील आकांत । दंड, भेद अवलंबुनी ।। १२५१ राम ! मनुष्यत्वाचा आदर्श । म्हणवित त्याचे 'दास' । सुखाचे चार घास । सामान्यांचे कां गिळता ?।। १२५२ खरेच वदला हे, सांगा, तुम्ही ?। विश्वास कैसा राखावा मनी ?। 'बोघ(?)' अतर्क्य दूर ठेवोनि । पळू पाहतिल लक्षिते ।। १२५३ वारंवार छळदायी ठरते । ठेवा हृदयी तुमच्यापुरते । किंवा मूर्ख, भाबड्या श्रवणार्थे । अध्यात्म, मोक्ष, गत्यादि भाकड ।। १२५४ नका आणु आतां दृष्टीपुढती । मोक्ष, उपास-तापास, भक्ती । आमुच्यापासोनि निवृत्ती । घ्या, भले जर असला ! ।। १२५५ निर्गुणाच्या शब्दांगी 'गुण' । म्हणजे नाही त्यासि वेसण । असले अनाकलनीय येडेपण । कां बा करिता ?।। १२५६ 'सगळे' म्हणतां, 'त्यागावे' । अन् भजन तुमचे आळवावे । आळवावर 'पत्र पतितं तोयं' पाहावे । पाऱ्या-वाऱ्यासारखे नश्वर ?।। १२५७ ********* अरुण काकतकर. सख्यभक्तीचे निरपेक्ष फळ सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 04/08/07 संसारातल्या अडीअडचणी येत जात राहणारच. त्यांची चिंता करून त्या कमी होणार नाहीत. उलट प्रापंचिक अडचणीत सुद्धा जो फक्त परमेश्वराचेच स्मरण ठेवतो .निरूपण, कीर्तन, कथा जे जे काही बोलायचय ते फक्त ईश्वराविषयीच बोलत राहातो तो खरा देवाचा सखा. सुदाम्याने श्रीकृष्णभेटीमधे स्वतःच्या दारिद्रयाचा उल्लेखसुद्धा केला नाही. भगवंताने त्याची अडचण जाणून त्याला भरभरून समृद्धी दिली. निरपेक्ष सख्यभक्तीचे फळ हे मिळतेच. संसाराची अखंड चिंता । पोखरीत मनास असता । कसले कीर्तन, नामस्मरण, कथा । भाकड सारे कां सांगावे ?।। 1015 तत्वांशी फारकत घेणे । एकमेकांसि `समजुन’ घेणे । वेळप्रसंगी `वेल्हार’ही करणे । म्हणजेचि राजकरण भौ !।। 1016 विधानगृहांत `हमरी-तुमरी । खुळ्या कार्यकर्त्यांत सुरामारी । हाकलली जाती मुक्ती `बिचारी’ । गळ्यांत गळे विरेधकांचे ।ऑ। 1017 कधी उघडणार डोळे जनता ?। कधी मिळणार महत्व मतां ?। कधी आपदांतुनि मुक्ता ?। मिळणार ।। 1018 `निर्लज्ज’ प्रतिष्ठित सिंव्हासनी । आपलीचि पापे, कर्मकहाणी । केवळ भूल-थापांची खेळणी । गाजरासम निर्दय दाखविती ।। 1019 अपंग, अजाण बालके, गर्भवती । सोडोनि, इतरांच्या न पडो कवळ हाती । कष्टेविण ! व्हावी राष्ट्रनीती । स्वप्न माझे ।। 1021 न टाळती समागम । शेधित हिंडती शृंगारधाम । हेटाळिति परि अपत्यजन्म । श्वापदांपेक्षा अक्षम्य ।ऑ। 1026 `त्याची’ म्हणजे कोणाची । आंस आहे दृढभेटीची । युगानुयुगे मनुष्याची । न ढळे पांपणी ।। 1027 अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-89 युगानुयुगे मनुष्ये शोधला । कर्महीन होवेनि वेडाचार केला । `ग्रेस’.. .अर्थांत कविवर्य माणिक गोडघाटे, त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या वळणावर, कर्करोगग्रस्त असतांना, मी जिथं काम करतो, त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांत, जवळपास दोन वर्षं, उपचारहेतु होते. त्यांचा माझा परिचय होता पण तो तितकासा जवळिकीचा नव्हता. शिवाय ते मला त्यांच्या अप्रतिम.. कधीकधी अनाकलनीय. रचनांमधून भेटत होतेच ! पण रुग्णालयांतल्या त्यांच्या वास्तव्यादरम्यान, ते `त्या’ला मानणारे असल्यामुळे, `त्या’च्या अस्तित्वावर चर्चा झाली.. मी विचारलं तुम्हाला भेटतो `तो’ ?’ म्हणाले, `हो’.. मी विचारलं `मग आम्हाला कां नाही भेटत ?’ ‘तपश्चर्या करावी लागते !’, `आम्ही पोटार्थी.. तपश्चर्येला कसा, कधी कुठे वेळ मिळणार ?’ उत्तर मिळालं, पण संदिग्ध, असंच कांहीतरी… भेंटवाना एकदा `त्या’ला । वाजत गाजत कधि आलासे वाटला। परंतु प्रस्तर वा मातीचाच् निघाला । कृतिशून्य ! देखता ।ऑ।1028 पंचमहाभूते हरघडी भेटतांत । दुखवित, सुखवित येत-जातांत । भवसागरी कधि नाव बुडवित । मार्ग पैलाचा दाविती ।ऑ।1029 म्हणोनि निसर्गा द्या मान्यता । तोचि जन्म-स्थैर्य-विलय दाता । `त्य’च्या, बासनांतल्या भाकड कथा । जाउद्या विस्मरणांत ।।1030 लागेल कटु, पण आहे सत्य । आपदेंत कधि सख्खे अपत्य । `कर्तव्य’ म्हणोनीही नाही कृत्य । धजते करावया ।ऑ।1031 धुडाळण्या वेळ हवा । कष्टकर्या कसा मिळावा । घरी परततां आप्तांचा मेळावा । घेरतो घासासाठी ।।1032 श्रीमंतास उत्तम उद्योग । शोधुनि सापडला तर माग । काढोनि, गरिबांसि थांग । सांगा सत्वरी ।।1033 युगानुयुगे मनुष्ये शोधला । कर्महीन होवेनि वेडाचार केला । तन-मन-धने, प्रार्थिला, पूजिला । दिसला, श्रविला, जाणवला नाही `तो’ ।।1034 स्वीकारिता आव्हाना ? दाखविता `तो’ ? उगा वल्गना । गरिबांच्या शिणल्या तना-मना । कृपया सोडा मोकळे ।।1035 चमत्कारास नाहीच अस्तित्व । विश्वांत सारे निसर्गाचे कर्तृत्व । कार्यकारणभावे युक्त । संपृक्त विज्ञान सर्वदा ।।1036 कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। अभावदेवासंबंधी भ्रामक समजुती। भाबडय़ांच्या ऐशा ।।1037 अरुण काकतकर 9822021521 ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-०५-२०१५ शनिवार साठी. नुकतीच, चालू महिन्याच्या, दिनांक १८ रोज़ी, 'प्रभात'नं निर्माण केलेल्या, 'संत ज्ञानेश्वर' या बोलपटाच्या प्रदर्शनाला ७५ वर्ष झाली. मला, त्या 'संभवामि युगेयुगे' बाळांचं नेहमीच कौतुक वाटत आलं आहे, आणि निसर्गदत्त प्रतिभेच नवलं, 'एकसमयावच्छेदे'करून ! त्या महायोग्यानं वयवर्ष १६ ते २१ या कालावधींत, गीतासार उलगडणाऱ्या, ९००० ओव्या सांगीतल्या आणि संजीवन समाधी घेतली.. अखेरीस त्यांनी दान मागितली... प्रसादाचं दान... स्वत:साठी ? छे छे.. निरिच्छ, निर्विकार झालेल्या त्या युवकाला काय गरज होती कशाचीही ? त्यांनी 'शांतवन' मागीतलं रंजल्या-गांजल्यांसाठी.. त्या बोलपटांत दाखविलेल्या 'चमत्कारां'चं माझ्या बुध्दीला झालेला आकलन, त्या निमित्तानं मी मांडतो आहे... आर्त विश्वाचे रिचवुनी । प्रदीप्त तर्क-बुध्दीनं करोनी । गीतासार सामान्य जनी । जागविले योग्याने ।।१३२१ हाच होता अज्ञानाचा 'रेडा' । श्रवणेंद्रियांना देउनि वेढा । स्वर्णानुभवाचा ! उध्दरिले मूढा । श्वासागणिक योग्याने ।।१३२२ निसर्गानं त्यांना अशीकांही अवर्णनीय साहित्यनिर्मिती प्रतिभा दिली, की त्याच्या जवळपाससुध्दा, आज ७५० शतकानंतर, एकही संत, साहित्यीक पोहोचू शकला नाही.. असा असतो योगी... योगी ! वैश्विक ऐसा असतो । योगी ! परमार्थासाठीच जगतो । योगी ! स्वत्व क्षणोक्षणी विस्मरतो । म्हणती 'माउली' त्या कारणे ।।१३२३ ना एकही कठोर व्यंजन । उक्त ओवी, मृदु संभाषण । दृष्टांत-रूपक-उपमादि अलंकरणं । 'मराठीच्या बोलू' ममत्वे केले ।। १३२४ धर्माचरण, माणूसकी विरहित । कर्म-कठोर रूपे होती, भिंत । स्वार होवोनि, निमिषार्धांत । निवृत्ति-ज्ञान-सोपान-मुक्ते चालविली ।। १३२५ माझं हे विश्लेषण, खास अंधश्रध्दा बोकाळवणाऱ्या 'अभ्यासकां' साठी... ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २८-०५-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/११ एखादा जाणकार श्रोता पुष्कळ सभा, कीर्तने, निरूपणे वर्षानुवर्षे ऐकत असतो. यथावकाश त्याच्या ज्ञानात खूपच भर पडलेली असते. त्याला कुठलाच विषय नवीन वाटत नसल्याने तो सभेमधे वाक्यावाक्याला अडथळे आणतो. पांडित्य दाखविण्याच्या हव्यासात तो इतर श्रोत्यांचे श्रवण सुद्धा बिघडवतो. हा श्रोता ज्ञानी असला तरी अवलक्षणीच मानावा. ************ एकुणांतच ज्ञानार्जनाची साधना आणि त्यांच्या कक्षा रुंदावते चालल्या आहेंत. त्यामुळे क्रमिक पुस्तकांच्या साहाय्यानं शाळांमधे केलं जाणारं अध्यापन, आणि विद्यार्थ्यांनी आधुनिक साधनांच्या साहाय्यानं मीळविलेलं विषयपूरक ज्ञान, यामधली तफावत, सकारात्मकरित्या अधोरेखित होते आहे. तोच प्रकार सर्वसामान्य जनांच्याबाबतींतही घेतो आहे. हे जरी सत्य असलं तरी, ज्ञान किंवा माहितीचं वितरण चाल्लेली असतांना वक्त्याचा अधिक्षेप होणं बरं नाही. पण कांही वक्त्यांना, त्यांच्या वागण्या-बोलण्याला वेसण घालणं कधीकधी अनिवार्य होवून बसतं... बेभान वक्त्याची, अनावर । सहसा टाळिते नजर । म्हणोनि भले वाटू दे अडसर । लक्ष वेधण्या मधेमधे ।। मंच मिळतांच सुटतांत । विषयांतरी बरळतांत । त्यांना भानावर आणणे क्रमप्राप्त । होते नाइलाजे ।। २७७ वेदना, व्यथेचा आवाज । विरून जातो, गर्जता मत्त गाज । बहुधा असते जी विनाकाज । भाटांना सुखावण्या ।। २७८ गरिबांचा जो कैवारी । जो असतो परोपकारी । 'सत्ता'धा-सास त्रास भारी । सहसा होतसे ।। २७९ कार्यकारणभावाचे भानं । सहजचि जाती विस्मरुन । गांजल्या शंकांचे रानं । अडसर वाटे ऐशांना ।। २८० व्हा आक्रामक, प्रष्णकर्ते । शोधा वाचाळ निष्क्रिय नाकर्ते । विद्वान जरि म्हणविती ते । उत्तरदायित्व त्यांसि शिकवा ।। २८१ ********* अरुण काकतकर. भक्तिबोध-91 कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। संत तुकोब्बांची पत्नीसुध्दा, पंढरपूरच्या विठ्ठलाला, ‘त्यो काळ्या’ म्हणून संबोधित असे ! कारण काळ्याशार दगडांतून, त्या कसबी मूर्तिकारानं, ते अद्वितीय `सावळे परब्रह्म’ घडविलं होतं. पण ते निष्प्राण आणि इतकं निष्क्रीय होतं.. आहे.. हे आवडीला स्वानुभवांनं कळलं होतं. ‘त्या’च्या नसण्याबद्दल तिला खात्री होती, म्हणून सामान्यतः कोणीही माता अवलंबील तो सरधोपट मार्ग अवलंबून, तिनं गांवांतल्या वैद्यबुवांच्या निरोप धाडला. 4 की 5 अपत्यांना जन्म देण्याचं परमपुण्यकृत्य झाल्यावर, त्यांच्याकडं पाठ फिरवून, `विठ्ठल विठ्ठल’ करीत रानावनांत फिरणार्या पतीबद्दल नि त्याला कारणीभूत झालेल्या `इटय़ा’ बद्दल तिनं काय, वागणुकीची भलावण करीत तिनं आरती ओवाळणं अपेक्षित होतं ? तिनं आणि देहूच्या आप्तस्वकीय, ग्रामस्थांनी, स्वाभाविक प्रष्ण विचारले, तर त्यांत ग़ैर काय होतं ? स्वीकारिता आव्हाना ? दाखविता `तो’ ? उगा वल्गना । गरिबांच्या शिणल्या तना-मना । कृपया सोडा मोकळे ।ऑ।1035 व्याधिग्रस्त अपत्याला, वैद्यबुवांच्या औषधी लागू पडेनांत तेंव्हा ते सुध्दा म्हणाले, ‘आमचे उपाय थकले ! याचे पिताश्री, विठ्ठलाला सांकडं घालून चमत्काराची वाट पाहातायत ना ? पाहूया, काय होतं ते !’ पणं असे चमत्कार घडले नाहीत-नसतांत आणि घडणार नाहींत… चमत्कारास नाहीच अस्तित्व । विश्वांत सारे निसर्गाचे कर्तृत्व । कार्यकारणभावे युक्त । संपृक्त विज्ञान सर्वदा ।ऑ।1036 कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। अभावदेवासंबंधी भ्रामक समजुती । भाबडय़ांच्या ऐशा ।ऑ। 1037 तो तर 450 वर्षांपूर्वीचा काळ होता. पण आजही, वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत होवूनसुध्दा, असे महाभाग त्या ‘अभावदेवा’ च्या मागे लागून, ‘चमत्कारा’ च्या प्रतीक्षेंत असतांतच ! असो.. अरुण काकतकर 9822021521.. भक्तिबोध-92 अंधश्रद्धा बोकाळणार्या `अभ्यासकां’साठी… ३०-०५-२०१५ शनिवारसाठी नुकतीच, चालू महिन्याच्या, दिनांक 18 रोज़ी, ‘प्रभात’नं निर्माण केलेल्या, `संत ज्ञानेश्वर’ या बोलपटाच्या प्रदर्शनाला 75 वर्ष झाली. मला, त्या `संभवामि युगेयुगे’ बाळांचं नेहमीच कौतुक वाटत आलं आहे, आणि निसर्गदत्त प्रतिभेच नवलं, `एकसमयावच्छेदे’करून ! त्या महायोग्यानं वयवर्ष 16 ते 21 या कालावधींत, गीतासार उलगडणार्या, 9000 ओव्या सांगीतल्या आणि संजीवन समाधी घेतली.. अखेरीस त्यांनी दान मागितली… प्रसादाचं दान… स्वतःसाठी ? छे छे.. निरिच्छ, निर्विकार झालेल्या त्या युवकाला काय गरज होती कशाचीही? त्यांनी `शांतवन’ मागीतलं रंजल्या-गांजल्यांसाठी.. त्या बोलपटांत दाखविलेल्या `चमत्कारां’चं माझ्या बुध्दीला झालेला आकलन, त्या निमित्तानं मी मांडतो आहे… आर्त विश्वाचे रिचवुनी । प्रदीप्त तर्क-बुध्दीनं करोनी । गीतासार सामान्य जनी । जागविले योग्याने ।ऑ।1321 हाच होता अज्ञानाचा ‘रेडा’ । श्रवणेंद्रियांना देउनि वेढा । स्वर्णानुभवाचा ! उध्दरिले मूढा । श्वासागणिक योग्याने ।ऑ।1322 निसर्गानं त्यांना अशीकांही अवर्णनीय साहित्यनिर्मिती प्रतिभा दिली, की त्याच्या जवळपाससुध्दा, आज 750 शतकानंतर, एकही संत, साहित्यिक पोहोचू शकला नाही.. असा असतो योगी… योगी ! वैश्विक ऐसा असतो । योगी ! परमार्थासाठीच जगतो । योगी ! स्वत्व क्षणोक्षणी विस्मरतो। म्हणती `माउली’ त्या कारणे ।ऑ।1323 ना एकही कठोर व्यंजन । उक्त ओवी, मृदु संभाषण । दृष्टांत-रूपक-उपमादि अलंकरणं । `मराठीच्या बोलू’ ममत्वे केले ।ऑ। 1324 धर्माचरण, माणूसकी विरहित । कर्म-कठोर रूपे होती, भिंत । स्वार होवोनि, निमिषार्धांत । निवृत्ति-ज्ञान-सोपान-मुक्ते चालविली ।ऑ। 1325 माझं हे विश्लेषण, खास अंधश्रध्दा बोकाळवणार्या `अभ्यासकां’ साठी… अरुण काकतकर 9822021521 भक्तिबोध-89 रुजता, फुलता, फळतांना । हर्ष कल्लोळी लोळू द्या आज 1 जून… पाहाता पाहाता, अर्ध वर्ष सरत आलं ! बाळगोपाळांची सिटी संपून, पंधरवड्यांत, बालवाडी ते महाविद्यालय अशी सगळी अध्यापन-मंदिरं गजबजून जातील. कांही बालकं, आई-बाबा, ताई-दादा, आजी-आजोबांच्या लाडाकोडाच्या छत्राखालून बाहेर पडत, पंख पसरायला शिकण्यासाठी, शिशुवर्गांत दाखलं होतील.. आणि गलबलतील सगळ्या कुटुंबियांची काळजं, त्या छकुल्यांचे विरहदर्शक रडवेले चेहेरे बघून.. पण हे अटळ असतं ना, जगांत कसं वागावं हे समजून घेण्यासाठी ? बालपण विखारू नका त्यांचे । शिकवतीलचि प्रसंग अनुभवाचे । सांगोनि `भीषण’ भविष्याचे । हिरावू नका आनंद ।। 1201 वारसा देता तुम्हीचं ना ?। मग कशास करिता `सावध’ मना ?। रुजता, फुलता, फळतांना । हर्ष कल्लोळी लोळू द्या ।। 1202 उद्याच्या दुःख, वेदना । सांगा, चुकल्या कधी कुणा ?। आणि वारण्या त्यांना । `बलवंत’ ते होतील ।। 1203 नका करू फार चिंता । प्राक्तनांतली सुखे, व्यथा । `परतविण्या अरिष्टा, चालवा हाता’ । शिकवण द्या कष्टांची ।। 1204 हरळीवरच्या सुखद वाटे । कशास त्यावरचे दावता काटे ?। सुखी पैरण सहज कुणा भेटे ?। विचारा मनासी ।। 1204 चार दिसांची भातुकली । लाटणे, पोळपाट, टोप, पातेली । खेळणी सगळी इवली इवली । पंचमहाभूता हाती जीवमात्र ।। 1164 कधि भात राहातो कच्चा । `पोळी करपेल ! झडकरि उलथा’ । पत्नीवर आरडे कपाळी मारित हाता । `नवरे’पण जरि लटके ।। 1165 साहित्य ? गूळ, शेंददाणे । चैनचं, मिळाले जर फुटाणे । बाळ ? बाहुलीचे रडणे, हसणे । हौस ! नसते मोल तिला ।। 1166 तेथे असते सुखचि सुख । प्रसन्न चेहरा संपता `स्वयंपाक’ । वेदना, दुःखांच्या झळा नाहक । ना फिरकत कधी इथे ।। 1167 म्हणोनि नेहमी वाटते कां ?। `सरोचि नये हे’ ऐसे बालका । मोठेपण मारिते हाका । आपदांना आवताण ।। 1168 अरुण काकतकर 9822021521… ।।भक्तीबोध।। दिनांक ०२-०६-२०१५ मंगळवार साठी. कालच्या भागांत, आपण, अद्यापनगृहात जाऊन, औपचारिक शिक्षण घेऊ शकणाऱ्या, एकुणांतल्या कांही टक्के भाग्यवान बालकांबद्दल चर्चा केली. पण अशी कोट्यवधी बालके या देशांत आहेत की ज्यांना विविध कारणामुळं औपचारिक शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहींत. कधी दारिद्र्य, तर कधी अपंगत्व.. कधी दुर्गम दऱ्याखोऱ्यांतलं वस्तीचं ठिकाण, तर कधी घरांतच एकुणांतल्या 'शिक्षण' या विषयाची अनास्था.. यांतल्या पहिल्या दोन समस्यांमुळ, जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण होवूनसुध्दा, जागतिकस्तरावर संगीतकार म्हणून दिगंत कीर्तिवंत झालेलं एक व्यक्तिमत्व माझ्या.. अं हं... जिथंजिथं स्वरभक्त 'कानसेन' आहेंत तिथं ते, त्यांच्या रचना ऐकतांच नतमस्तक होतांत, गहिवरतांत, प्रतिभावीष्कारानं अचंबित होतांत.. जिगिषा करते मात । सर्व आपदा संकटांत । असेल उर्जा वातावरणांत । घरात, आप्तेष्टांत, सकारात्मकं ।। १३४१ सप्तकांतरि सप्तक । षड्जभिन्न जणु जनुक । स्वरसंचार श्रुतिधारक । दिला 'हृदया' 'दीना' ने ।। अनवट बंदिशि ऐशो ऐशा । जणु 'विजा' हिमतप्तशा । उचलून बासन पाशा । आत्मसात बहु केल्या ।। ज्ञानोब्बा तीर्थस्थानी असे । शिवबा स्फुल्लिंगांत विलसे । नामवंत कीर्तीवंत आदर्श ऐसे । नेमस्तले बालपणापासून ।। समर्थ, वैनतेय विनायक । राष्ट्रप्रेमाचे पावक । तेजोभूषण नायक । शोषिले, रुजविले अंत:करणी ।। गोविंदाग्रज, कुसुमाग्रज । शेळके कुलोत्पन्ना अग्रज । शब्दकळांचे विविध बाज । स्वरावले आकळुनी ।। शब्दार्णव मथिला जिज्ञासे । अर्थार्णव शोषिला अतिध्यासे । आपेगांवि, प्रतिष्ठानि, निवासे । प्रदक्षिली माउली, प्रेमभरे ।। भट, महानगर, गोडघाटे । स्वरावला शब्द गोड़ वाटे । आरती प्रभ्वादि कवि मोठे । गीतरूपी मांडले ।। मीरा, तुलसी, ज्ञानदेव । भक्तिरसपूर्ण भाव । रचनांचा घेता ठाव । सिध्दावस्था साधती ।। कल्पनांची स्पष्टपणे । योग्यतेची पूर्ण जाण । तरंगाचे नेमकं वज़न । कंठरवे प्कटविले ।। आनंदघनाचे दर्शन । रुध्दकंठी विसरून भान । भगिनिप्रेम श्रेष्ठ निधाना नंतर । या परते सांगिजे ।। हा स्वरयोगी, आजही, शास्त्रीहाॅल चाळींत वास्तव्य असतांना, प्राथमिक शाळेंतल्या त्याच्या शिक्षिका, श्रीमती जोशीबाईंची आवर्जून आठवण सांगतांना गहिवरतो. ********* अरुण काकतकर. ।।भक्तीबोध।। दिनांक ०३-०६-२०१५ बुधवार साठी. या घरकुलांत सुरुवातीला संपदांचं दुर्भिक्ष आणि आपदांचं मोहोळ होतं. पण 'संभवामि युगेयुगे' असे बारा स्वर आणि बावीस श्रुतींच्या राज्ञी, अशा चार भगिनी होत्या. कळत नकळत, घरांत राबता असणाऱ्या संगीतक्षेत्रांतल्या ज्येष्ठांचे, श्रेष्ठांचे वागण्या-बोलण्या-गाण्यांतले संस्कार अबोध मनावर होत होते.. प्रचंड वाचन-मनन-विश्लेषणोत्तर, घरांतल्या स्वरसम्राज्ञी बरोबर चर्चा, विवेचनानधून ज्ञानवृध्दी, प्रायोगिकता यांची निपज, निगराणी हा कलाकार स्वत:च करून घेत होता. सगळं होतं, पण कौतुक करायला एका व्यक्तींची कमतरता होती.. वडिलांची.. अतर्क्य, अगम्य, अभेद्य बुध्दिमत्ता, स्वरझेप असलेल्या वडिलांची.. फक्त गणित, विज्ञान, इतिहास, भूगोलाचं ज्ञानार्जन म्हणजेच 'शिक्षण' असं मानणाऱ्या समाजाला, कर्तृत्वाचा वस्तुपाठ दिला या 'पांच बोटे अमृताची' असलेल्या भावंडांनी.. निष्ठेनं केलेली भक्ती, साधना.. मग ती कोणत्याही ज्ञानशाखेची असो.. तुम्हाला यशाच्या परमोच्च शिखरावर प्रतिष्ठित करतेच.. सदनि सजे सिध्द स्वर । धरुनी मायादराची पांखर । पवित्र दवबिंदुचा कापूर । जपून जाणिला संगोपिला ।। ख़र्च मंद्र तारांतही । गंभीर नर्मार्त स्वरप्रवाही । ऐसा गायक अनुभवला नाही । म्यां तरी बांपडे ।। सागर गाजेची गभीरता । वेणूनादि आर्तता । गायीच्या नेत्रिची व्यथा । एकवटली सृजनांत ।। ताना मुरक्या गमक पलटे । श्रवणांतहि अवघड वाटें । परि सच्चिदानंद भेंटें । अंतरि दाटे गिरिव्रज ।। हृदय मस्तका मधे गळा । भाव स्रोतांचा उगम आगळा । काव्यांतली स्पष्टकळा । आशयघने खुलविली ।। उत्रांत पेशींची पाळेमुळे । विकार-विचारांची दळे । श्री हरी शंख स्पर्शबळे । नियती नेई उन्नयना ।। कधी दैव चमत्कृती । दावी हर्षलाची व्याप्ति । असंभवाची येता प्रचिती । स्नेह निष्ठा ढळू नये ।। शब्द मौक्तिकांचे कोंदण । भावस्वरांनी ओथंबुनं । मृद्गंधाची ताजगी घेऊन । वर्षती पंच-दशकों ।। आतां थांबले पाहिजे । गुणावगुण वर्णिले जे जे । स्नेहाधिकारे जाणिजे । निखळ आणि प्रामाणिक ।। ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-०६-२०१५ गुरुवार साठी. गेल्या कांही दिवसांत, बालकांच्या, अध्यापनवर्गांत प्रवेशाचं वय, शिक्षकांना देण्यांत येणाऱ्या, जनगणना, निवडणुकांपूर्वी, मतदारयाद्या करणं वगैरे कामांबाबत, सकारात्मक, नकारात्मक, वायफळ खूप चर्चा झाल्या. एकीकडे डाॅ. आंबेडकर, संत गाडगेबाबांच्या नावाचा जयजयकार, पुतळ्यांना तुरे-हार घालतांना, 'शिक्षणाशिवाय, साक्षरतेशिवाय प्रगतीला पर्याय नाही' अशी भाषणबाजी, शास्त्यांकडून आणि विरोधकांकडून केली गेली. तुम्हा-आम्हाला आतां कळून चुकलय की हे सर्व मतपेटींत पडणाऱ्या एकगठ्ठा मतांकड एक डोळा ठेवूनच केलं जातं. प्रत्यक्षांत ते अध्यादेश केराच्या टोपलींतच फेकले जातांत. शिक्षण आनंददायी असावं याबद्दल शंकाच नाही. पण नावडत्या विषयांत रमणं, हे शिशुवर्गांतल्या छकुल्यांना, ज्यांची अवधीनक्षमता, केवळ २।। मिनिटं किंवा त्याहीपेक्षा कमी असते.. त्यांना मानसिक ओझं वाटू शकतं याचा किती शिक्षणतज्ज्ञ विचार करतांत ? अध्ययनप्रक्रिया आकर्षक असावी यासाठी किती आणि कसे प्रयत्न केले जातांत हा एक संशोधनाचा विषय ठरतो... शिक्षण कसले आनंददायी । शिक्षण बौध्दिक कष्टांची खाई । आळसावल्या निद्रेप्रत नेई । क्रीडावेळी बालका ।। शिक्षण म्हणे विद्यार्थी केंद्रित । उपदेश पण अघोषित । प्रौढी वा प्रलोभनांनी प्रवृत्त । शिक्षण म्हणे न्यावे ।। कळकळ तळमळ त्याग । शिक्षकाचा अविभाज्य भाग । प्रशिक्षणाने कां हा संयोग । होतसे सांगिजे ? जेथ विद्यार्थी ज्ञानार्जन तत्पर । माथ्यावर नसे छप्पर । गुरुजनांचा वापर । अन्य कामी होतसे ।। अधिका-यांच्या भेटीवेळी । शिक्षकगणांची स्वागतपाळी । नाश्ता चहा कोंबड्या केळी । घामेजुनि आणिती बापुडे ।। कसले कौतुक नि गौरव सोहळे । तोचतोचपणाचे लोभस जाळे । 'आ' वासुनी बिचारी बाळे । आश्वस्तती पळभरी ।। ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-०६-२०१५ शुक्रवार साठी. अध्यापनप्रक्रियेंत, सर्वांत प्रभावी दृक्श्राव्य माध्यमकुठलं ? हा प्रष्ण मी नेहमी मी अनेक शिक्षकांना विचारतो. उत्तर वेगवेगळी येतांत ! खंडू-फळा, बरोबर ध्वनितबकड्या, चित्रवाणी, संगणकावरचं महाजाल... वगैरे वगैरे.. मग त्यांना सांगावं लागतं की तुम्ही स्वत: जर विद्यार्थीगणांच मन जाणलत, तर तुमच्याइतकं दुसरं प्रभावी दृक्श्राव्य माध्यम असूंच शकत नाही... पण जर बालकं अशा शिक्षकांना वंचित झाले तर... उरल्यांचे ऐसे हाल । गळफास वा हलाहल । थकली शरीरे फोल । अपयशा अर्पिती ।। सुजला सुफला भूमी । 'अर्थ' प्रवृत्त संस्थांची काय कमी । पदव्यांची गोंडस हमी । कोणालाही मिळतसे ।। शैक्षणिक साहित्य, सुविधा । गुरुजनांची मने द्विधा । वर म्हणावा की आपदा । सदा शंका खातसे ।। चित्रवाणी संगणक । पेट्या विषयवार अनेक । वापरतां मोडेल कां ? साशंक । मन होतसे क्षणोक्षणी ।। नेमणुका बदल्या निलंबने । 'बोलण्यां'ची विविध दालने । सर्वांतुन सर्वदा उणे । होतसे मात्र शिक्षणं ।। 'खुर्च्याधिकारांचा' हव्यास । बंगले, गाड्यांची मिजास । साक्षरतापूर्तिचा सुवास । कधिकाळी येइल कां ? असे निश्चित मात्र एक । नवी पिढी महा जागरुक । माध्यमांचे प्रयत्न नेक । याला असती कारण ।। युती असो वा कडबोळे । मतांच्या मधाचे पोळे । जरी डंख नांग्यांनी झाकोळे । सत्तालोलुप धुंडती ।। कधी मग माश्यांचा उद्रेक । 'गांधी' फोडांची आवक । 'ओल्या'संगे 'सुख'नाशक । धोका भविष्यगर्भांत ।। 'प्रबोधन' 'संक्रमण' शब्द भोळे । सहकर्म प्रलोभनबळे । सिंव्हासनांशी सगळे डोळे । नसे लवतही पांपणी ।। तरारले जरि तृषार्त कोंभ । वर विद्यावर्षणाचे मळभ । भांडवल करण्या चटावली जीभ । उपाय सांगा कोणतां ? तदर्थ समित्या, आदेश । मुक्त कुरणांचे प्रदेश । कार्यकत्परतेचा आभास । आंता सर्वा ठावका ।। हे तर भावनांचे वमन । न होय प्रष्णांचे शमन । केवळ शब्दांमाजी असे दम न । सत्य ह एकमेव ।। संस्था राष्ट्रभाषेंत संस्थान । परिपूर्ण असे हे नामाभीधान । एकाधिकारेच्छा मनोमन । 'महर्षारण्ये' माजली ।। ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-०६-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंवीण तत्वता । कार्य न चले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२१ परमेश्वरापाशी पोहोचण्यासाठी जी नवविधा भक्ती सांगितली आहे तिची सुरूवात श्रवण आहे. ऐकणे ही पहिली पायरी अत्यावश्यकच. त्यानंतर मनन, चिंतन येते. मग मनात ज्ञान मुरायला लागते आणि शेवटी आचरणात येते. श्रवणाशिवाय पुढचे सर्व टप्पे अशक्य, त्यामुळे अन्य कोणतीही ज्ञानसाधने श्रवणापुढे कनिष्ठ होत. ********** एक बालिका, मुळांतली आंध्रप्रदेशांतली. मातृभाषा तेलुगु. पण...४/५ वर्षांचीच असेल... कंठ इतका मधुर आणि हरकती, मुरक्या इतक्या सहजपणे उलगडत जांत होत्या, की मी थक्क होवून, डोळे मिटून सद्गतींत होत, हिचं कसं कौतुक करावं ? कुठला पुरस्कार द्यावा याचा शोध घ्यायला लागलो. त्याच दरम्यान, मी दहावीच्या, मराठीच्या क्रमिक पुस्तकांतल्या, माउलींनी सांगीतलेल्या मराठी गौरवपर ओव्या, प्राचार्य राम शेवाळकरांकडून, विद्यार्थीगणांसमोर त्यांना, ध्वनिचित्रमुद्रण करीत, समजावून देण्याच्या प्रकल्पांत व्यग्र होतो. मनांत आलं, या ओव्या या कंठसिध्द छकुलीकडून गाऊन घेतल्या तर ? मग मींच रचना करून, मराठीचा गंधही नसलेल्या त्या चिमुकलीकडून, तिला केवळ ३/४ वेळा ऐकल्यावर. आणि तिनं, श्रवणेंद्रियांना प्राण एकवटंत, सगळ्या रचनांचे स्वर कंठोद्गत आणि शब्द मुखोद्गत करून, पडद्यावर अप्रतिमपणे सादर केल्या... अशी असते श्रवणाची शक्ती.. पण.. कांही 'विद्वानां'च, केवळ स्वत:चा आवाजावरच प्रेम असतं.. बहुधा स्वतःव्यतिरिक्त । इतरांचे संवाद, ध्वनिसंकेत । नावडणारेच बहुसंख्येंतं । आढळतांत सहसा ।। २८२ ऐकत जावे सर्व कांही । परंतु त्याची धरुन बाही । अवलंबून राहाणे बरे नाही । आधारास्तव कदापी ।। २८३ स्वमति, मंथनोत्तर विचार । स्वानुभव, जगण्यातिल अपार । संयम, विवेक सारासार । स्मरावा कृतिपूर्व ।। २८४ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-०६-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१९ सगुण म्हणजे ज्याला रंग रूप आकार आहे असे मूर्त स्वरूप. कुठल्याही स्वरूपातल्या मूर्तिरूप देवता समोर नसतील तर आणि ऐकणारे श्रोते विद्वान अभ्यासू असतील कीर्तनकाराने अद्वैत शास्त्रांचे निरूपण जरूर करावे. 'अहम् ब्रह्मास्मि ' हा भाव समजण्यासाठी श्रोता जाणकारच हवा. *********** 'जे' नाही त्याला जोखू पाहातो । कल्पनेनेचि वर्णन करितो । ब्रह्म 'दावण्या'सि असमर्थ असतो । मात्र लावितो व्यसन ।। १३७० श्रोता हवा जाणकार ?। मग काय मूर्ख कर्मकार ?। कसब नाही नजरेवर । साधते परिणाम ?।। १३७१ जो पाहू शकतो दृश्य । जाणतो त्यांतला आशय । लेख वा बोल ? निरुपाय । ऐशा निरक्षरासी ।। १३७२ एक छानसा दृष्टांत । ओवींच्या पुष्ट्यार्थ । ज्याचे अंतिम फलित । समजेल सहजी ।। १३७३ ऐका एक सुरसा कथा । शब्दांनी सजली होती गाथा । ग्रंथ होता पुरेपूर सर्वथा । परंतु निरक्षरा काय त्याचे ?।। २८६ कोणे एकाने आणिले चित्र । उलगडू लागला आशयाचे गोत्र । निरक्षराने तेंव्हा मात्र । प्रतिबंधिले ।। २८७ कारण, समजणे सोपे । जाणवते आपोआपें । शब्देविण आशय छापे । सहजचि चित्र ।। २८८ विद्वान, ज्ञानियांच्या जगी । प्रगल्भांची मांदियाळी जंगी । अक्षरांचा उदोउदो जागोजागी । निरक्षरा अप्राप्य ।। २८९ शब्दसंभार ऐकताक्षणी । अर्थाची समूर्त लेणी । ऐसी असावी मांडणी । समग्र ग्रंथांची ।। २९० चित्रमयता सोपी नसे । अभावानेच प्रतिभेंत विलसे । सहजी अनुभवास न येतसे । पढत पांडित्यांत ।। २९१ श्रवणेंद्रियांची सजगता । उच्चारेच्छेची करिते पूर्तता । मेधा तर्कबळे विश्लेषिता । साकारते चित्र ।। २९२ कधीतरी वाटतं, हे सर्व लिहायला, सांगायची माझी योग्यता आहे कां ? मग मी अंतर्मुख होत विचारक राहातो.. कां असले अक्षर-पांप । विधानार्थाना येई दर्प । की मज डसला सर्प । अहंकाराचा ?।। २८५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-०६-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती । तेचि पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१० मंदिरामधे कीर्तन सुरू आहे. समोर राम, कृष्ण, शंकरादि कुठल्यातरी दैवताची सुंदर मनोहारी रमणीय मूर्ती आहे. श्रोते छान सगुणाच्या आख्यानासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी जर कीर्तनकाराने निर्गुण ब्रह्माचे निरूपण सुरू केले आणि परमेश्वराच्या सगुण रूपाचे खंडण सुरू केले तर तो ज्ञानी असला तरी मूर्खच ! पढतमूर्ख मानावा. ********* म्हणजे, कालच्या भागाचा संदर्भ पाहिला तर अटी दोन ! 'ब्रह्म' महात्म्य, निर्गुण तत्व समजावून सांगायचे, तर म्हणे 'जाणकार' श्रोता समोर हवा. कारण सगळे शब्द 'हवें'तच विरायचे. हातांत पण नुसती 'हवा' नि निरुपणोत्तर, मनांत रुजते तीही फक्त आणि फक्त 'हवा'च ! आणि 'सगुण', म्हणजे मूर्तिकारानं, पाथरवटानं तयार केलेला सुबह, विलोभनीय आकार ! त्याचं वर्णन करतांना 'निर्गुणा'चं महात्म्य सांगणे म्हणजे पढतमूर्खाचं लक्षण ! मग अशा 'निर्गुणा'बद्दल मंदिरांत तोंड उघडायचंच कशाला ? सगळ्या 'जाणकारां'ना घेउन वक्त्यानं, इतर कुठही जावं... कौतुक करावे पाथरवटाचे । काष्ठ-पाषाण-मृद् कसबकाराचे । अनुल्लेखे टाळण्या-याचे । उपटावे कान ।। २९३ समूर्त-सगुण-साकार ठाकले । जेंव्हा प्रस्तरें घाव सोसले । स्वेदगंगेंत चिंब झाले । छिन्नी-हातोडीसह हात ।। २९४ मूर्तीचे मंद स्मित । भरून वाहते काळजांत । ओघळते प्रेय अश्रुरूपांत । सांगा श्रेय कुणाचे ?।। २९५ परतुनी शब्द तेच तेच । मन म्हणे 'वेच वेच' । विश्रामा समय हाच । दृष्टीपथांत परिसीमा ।। १६५ कां बोधाचा दुष्काळ । प्रतीक्षा क्षणक्षण पळपळ । शब्दांकित प्रभातकाळ । कैसा व्हावा ? ।। १७० की क्रोधाचा हा उद्रेक ? । पाठभेद पाहुनी प्रत्येक । केली पापे जणू लाखलाख । मानती 'दास' भक्त ।। १७१ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १०-०६-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। हरिनामे प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायणनामें पावन जाला । अजामेळ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१७ दैत्य, राक्षस कुळातला असुनही प्रल्हाद सतत नारायण नारायण असे नामस्मरण करायचा. त्याचे वडील हिरण्यकश्यपु. विष्णुच्या द्वेषापोटी स्वत:च्या मुलाला सुद्धा हर प्रयासाने ठार करण्याचे प्रयत्न केले. केवळ नामस्मरणामुळे प्रल्हादाचे रक्षण झाले. अत्यंत पापी नामद्वेष्टया अजामेळ नावाच्या ब्राह्मणाने रोगजर्जर अवस्थेत स्वत:च्या नारायण नावाच्या मुलाला आर्ततेने हाक मारली, विष्णुदेवांना नाही. तरी देखील अजामेळ वाचला आणि पुढे उत्तम गतीस पावला. अभावितपणे केलेला नामोच्चारही जर तारून नेतो, तर समजून उमजून निष्ठेने केलेले नामस्मरण कितीतरी अधिक फलदायी ठरेल. होय ना ? ******** त्या समर्थ आदर्श रामाच्या, आदरणीय दासांना, किंवा सध्या त्यांचा 'बोध' सामान्यजनांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या प्रचारकांना माझी कळकळीची विनंती आहे की नामोच्चार आणि नामस्मरणाचे गोडवे गातांना, केवळ तेवढ्यानेच आपदा-विपदांच्या जंजाळांतून तरून जाल, असलं भाकड कृपया त्यांच्या मनांत रुजवू नका ! आधीच कर्मेच्छेबद्दल अनास्था असलेला समाज, केवळ तेवढच करीत राहील, ते सुध्दा मनांतल्या मनांत. म्हणजे ओठांची हालचाल करायचे कष्ट सुध्दा टाळतील... नाम घेत राहा बसून । कवळ मुखी येईल आपणहून । कृतिशीलतेस छेद देऊन । म्हणे 'मोक्ष' मिळतसे ।। २९६ हा कसला उपदेश ?। कां सुचला ऐशा 'संतास' ?। कर्मधर्माचा करण्या -हास । कसा बा सरसावला ?।। २९७ हा गीतासाराचा अवमान । आलस्यभावाला निमंत्रण । कर्मेच्छेचे निर्घृण वपन । या परते कोणते ?।। २९८ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ११-०६-२०१५ गुरुवार साठी. आवरा आवरा ऐशा नरा । सावरा सावरा सामान्यांच्या संसारा । भवरा भवरा, सुखसरितेच्या उदरा । अवजार कृतिनाशाचे जाणा ।। २९९ अध्यात्म,मोक्ष कल्पना भ्रामक । स्वेदगंगेंस आटविणारा पावक । भोंदू, संधिसाधूंची विकृत भूक । शमवेलही हा कदाचित ।। ३०० दाढी, जटा, झोळी, छाटी । रुद्राक्ष, भस्म कशासाठी ?। क्षुधाग्नी चेतता पोटी । येती कां कामासी ?।। १३७७ अध्यात्म ? केवळ मृगजळ । अध्यात्म ? भ्रमाचे मूळ । अध्यात्म ? निरुद्योग्याचा खेळ । हवेंतला ।। १३७८ अध्यात्म ? कृतिफल मारक । अध्यात्म ? विघ्नसंतोषधारक । अध्यात्म ? बचनागी विख । धरू जाता मराल फुके ।। १३७९ अध्यात्म ? मोक्षदिशा भाविकासि । अध्यात्म ? रुक्षदिशा कर्मयोग्यासि । अध्यात्म ? 'पक्ष'दिशा गतप्राणासि । तद्वत जाणा ।। १३८० कधीकधी अतिबुध्दिवान मंडळी वेड्यासारखं वागतांत, कांहीबीही बरळतांत. कधी खरंच वेड तर कधी वेड पांघरुण् पेडगांवला जायचे प्रयास ! केवळ प्रसिध्दीसाठी विरोध, असेही हे 'मुखवटाधारी' असतांत... जरि असेल ज्ञानसमृध्दी । थोरांचीही चळते बुध्दी । भावुक जनता भोळी, साधी । बिचारी जाई भांबावुनी ।। ३०१ आवरा आवरा ऐशा नरा । विशेषत्वाने उत्साही शिष्यवरा । सदुपदेशाच्या विखारी अवतारा । जे जनमानसी रुजविती ।। ३०२ माहीत नाही कोणती । दासांची होती मन:स्थिती । केवळ नामस्मरणाची महती । सांगो धजले ।। ३०३ रूप आगळेचि सामोरे आज । काय घडले ? काय काज ?। दासांतरी अंकुरले बीज ?। कैसे नैराश्याचे ।। ३०४ हे शिवरायांचे गुरु । सकारात्मत्मकतेचे आधारु । बल-बुध्दी-वृध्दि निर्धारु । सदैव केला ।। ३०५ मागे शिष्यांचे कोंडाळे । 'गादी'वरी ज्यांचे डोळे । संस्थानाधिकार मधाचे पोळे । जिभल्या चाटित वेधिती ।। ३०६ मज नवल नेहमा वाटें । विश्वास ठेविती थोर मोठे । भाकडावरचे मुलामे खोटे । आकर्षिती त्यांसही ?।। ३०७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १२-०६-२०१५ शुक्रवार साठी. ।। दास-वाणी ।। ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/३१ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जरी काही कारणाने षोडशोपचार यथासांग पूजाविधी करता आला नाही तरी त्याची खंत न बाळगता मानसपूजा सुरू करावी. परमेश्वर सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्यामुळे आपण मनानेच कल्पना करून वाहिलेली पाने, फुले, फळे, गंध, अक्षता थेट त्याच्यापर्यंत पोहोचतातच. फक्त आपल्या मनात तो उत्कट अर्चनभक्तीचा भाव मात्र असावा. रामकृष्ण परमहंस कालीमातेची मानसपूजा नेहमीच करायचे. जर असशी सर्वव्यापी सर्वसाक्षी । उद्योग सोडोनि अबाल-वृध्दासी । मग वारी कां बा करविशी । फुका, कष्टप्रद ?।। ३०८ मनोमनी वेधतो आम्ही । सतर्क राहोनि दिशा दाही । उपजीविकेची साधने कांही । त्यासि संबोधा परमेश्वर ।। ३०९ प्रार्थना पूजेचे काय काज ? उदरभरणां घास रोज ?। आणि रात्री निवांत नीज ?। अट्टाहास त्याकारणेचि ना ?।। ३१० प्रांत:काळी छकुल्याचे हसू । वयस्कांचा सावरी स्पर्शू । अस्तुरिचा लाडिक कटाक्षू । लाभता सगळे पावते ।। ३११ क्षणोक्षणी पाठोपाठ । तिन्ही त्रिकाळ उपदेशाचे लोट । त्याने कां भरते पोटं । भस्मपट्टेधारींनो ।। ३१२ हातांत नाही घेत झोळी । वा पंचपात्र-पळी । कर्मोत्तरीच मिळते पोळी । आम्हासारख्यांना जगी ।। ३१३ कां दवडता उगा वाफ । म्हणतां 'वारितो आम्ही पाप !'। पडता पोळीवर अनासाय तूप । होता क्षणार्धांत अदृश्य ।। ३१४ जोडोनि दोन हस्तक । तुकवोनि एक मस्तक । समस्त आम्ही सांसारिक । विनम्र असतो सदा ।। ३१५ हे लिहीलं कोणीही, लिहावे । अंत:करण मथुनि व्यक्त व्हावे । धगधगते शब्द 'ओवीं'त जावे । मोकळणे हेतू ।। ३१६ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १३-०६-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेता जीवें । देवहि त्रासे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१३ त्या एका परमेश्वराशिवाय कोणीही संकटातून मला वाचवू शकणार नाही अशी ठाम श्रद्धा म्हणजे अनन्यभाव. तो असला की आपोआप योग्य तो मार्ग दिसतोच. आपल्या निष्ठा जर बदलत राहिल्या, अनन्यभाव ढळला तर आपल्याच देहात वास्तव्यात असणारा आत्मदेवही त्रासून जातो. आतून येणारे स्फुरण थांबते आणि कार्यही बिघडते. ************ जर वास्तव्य 'देवा'चे । आहे निश्चित ठाई माझे । तैसेचि असणार इतरांचे । देही ! आपोआपची ।। १३९२ निष्ठा राखणे जीवमात्रांशी । खग, खेचर वा जलचराशी । तैसी भवतालच्या मनुष्यांशी । असणे स्वाभाविकं ।। १३९३ सुहृद, आप्त बहु असणे । निष्ठा नात्यांवर ठेवणे । त्यांच्या ! म्हणजे 'बदलणे' । होतसे कां ?।। १३९४ श्वासोछ्वास सजीवांचा । धमन्यांच्या कार्यकारणाचा । व्याप, वाटतो कां त्याचा । जगत असता, तयांना ।। १३९५ म्हणजेच, कुटुंबीय किंवा आप्त-स्वकीयाशी, किंवा अगदी पाळीव प्राणी, गोठ्यांतली दुभती किंवा कृषिवलास उपयुक्त 'जित्राप' यांच्याशी, कर्मयोगी एकनिष्ठं स्वाभाविकपणे असतोच ! माहीत असोनि हे सारे । कां कष्टविती शरीरे । माय-बाप, अस्तुरी, पोरे । सुखवा ! 'देव' जाणा तिथेचं ।। ३१७ विचार आप्त-स्वकीयांचा प्रथम । विस्तारलेला कल्पद्रुम । देवोनि वात्सल्य-ममता प्रेम, । जोपासला जो आपणचि ।। ३१८ देव जर असला सर्व ठाई । आप्तांमधे तो कां नाही ?। सोडून पळण्याची घाई । भोगोत्तरि कां संतांना ?।। ३१९ ना मी रुजवू पाहातो विषवल्ली । माझी प्रामाणिक ही 'काका'वली । सद्भाव, निष्ठेने सरसावली । निर्मूलण्या अंधविश्वास ।। ३२० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-०६-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे तें येथार्थ । परी आपण मिथ्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/१०/१ ९ एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी शब्द आवश्यकच असतात. त्या वर्णनातून वस्तू समजली की शब्दांचे महत्व संपले. शब्दांनी सांगितले ते यथार्थ असल्यामुळेच जरी आकलन झाले तरी निव्वळ शब्द हे मिथ्याच मानावे कारण त्या वस्तूवर्णनापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. जिचे वर्णन शब्दांनी केले गेले ती मूळ वस्तूच सत्य मानावी. इथे वस्तू हा शब्द परब्रह्म या अर्थाने घेतल्यास उलगडा अधिक स्पष्ट होईल. *********** शब्दचि घडे अ-क्षरांमुळे । क्रम अर्थवाही तरचि आकळे । अन्यथा स्वरूप निरर्थ वेगळे । होई जनांसि अगम्य ।। १४०७ जर दिसेना 'परब्रह्म' कोठे । तर्कबुध्दीस कशी भेंटें ?। प्रतिमा ! कैसे साटे-लोटे । परस्परांचे जुळावे ।। १४०८ 'दिसलाच नाही तरी माना । सत्य तेथेचि' म्हणे 'जाणा !'। ऐशा उपदेशांचा फोलपणा । लक्षांत घ्या वेळीचं ।। १४०९ परतपरत वृथा खोटेपणा मनांत बिंबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बोलांचे काय करावे ? यांच्या अतर्क्य धीटपणाला आळा कोण घालणार ? डोळसांसाठी प्रतिमेचा ठसा । मेधा सहजचि रुजविते सहसा । श्रवणे वेधलेला शब्दार्थ योग्यसा । ताड़ून पाहते तर्काने ।। ३२१ केवळ प्रतिमा वा शब्द । वा वेगळा ठेवला अर्थ । जर तर्क ताडण्या असमर्थ । फोल ठरतो प्रयास ।। ३२२ भाषांमध्ये शब्द समानार्थी । उच्चार, लिपीरूपे विविध धारिती । प्रतिमेशि परि एकवटती । केवळ तर्कबळाने ।। ३२३ तर्काविना तथ्यहीन । भाषण, उच्चारण, लेखनं । असंबध्द, बेलगाम,बेभानं । केवळ जाणा 'नाद' तो ।। ३२४ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १६-०६-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/४४ रथ किंवा कुठलेही वाहन वेगात धावत असताना दोन्ही बाजूची जमीन तितक्याच वेगाने उलट दिशेने मागेमागे सरकत आहे असा भास होतो. प्रत्यक्षात जमीन स्थिरच असते. भौतिक शास्त्रातील दृष्टांत वापरून समर्थ सांगताहेत की मायेमुळे अनेक रंग रूप आकारांत व्यक्त झालेला मुख्य देव आपल्याला दिसतो, भासतो परंतु त्याचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार असेच आहे. (सूक्ष्म आशंका निरूपण समास ज्ञानदशक. ) अवकाशांत, पोकळीचे अंत:करणं । दावी अमोघ आकर्षणं । तेजोशलाका, प्रकाशकिरणं । वेगाने ओढिते गर्भांतं ।। १४१० परिणामी तमरंगी । होते भवताल सर्वांगी । 'पेटते' काळी होळी अंतरंगी । वैज्ञानिक विश्लेषण ।। १४११ ही जशी भौतिक विज्ञानांतली सत्यें, तशाच कांहीशा भासमान होतांत क्षिप्तप्रतिक्षिप्त क्रिया... भूमी जर धावली उलट्या दिशेने । वेग रथाचा वाढेल दुपटीने । भौतिक सिध्दते ऐशा लक्षणे । वैज्ञानिक सत्य ।। ३७१ कोठे सांगा दिसतो 'देव' । मूर्ती तर पाषाण संभव । 'त्या'च्या नावें उच्चरव । कोणत्या कारणे करावा ?।। ३७२ सुसंस्कृत, विकृत स्वभावता । माणसे विविध स्थळी भेटता । विशुध्द जोपासता वा नासता । कोठे असतो तुमचा 'देव' ?।। ३७३ आंता ऐका सांगणे । एकचि आहे मागणे । करोनि टाका आम्हास उणे । अध्यात्म, गति, मोक्षांतुनी ।। ३७४ आम्ही तर 'गति' प्राप्तं । जगता जगता मरणांत । मोक्ष आम्हा सदाचि परोक्ष । राहिला तर बरेचि ।। ३७५ असो थंडी, वारा, ऊन । स्वेदगंगेत आनंदे न्हाऊन । बांसगांव ठेवू बांधून । कुबट कद, सोवळी ।। ३७६ शिशिर, ग्रीष्म वा श्रावणसरी । सर्वत्र आम्हा आनंदाच्या परी । निर्ढावलेल्या कणखर शरीरी । झेलू, रिचवू, पचवू अखेरपर्यंत ।। ३७७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १७-०६-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। तेजीं असे परि जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनी असे परी कळेना । परब्रह्म तें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०४/३२ निर्गुण निराकार असलेले परब्रह्म हे सर्व चराचराला व्यापूनही शिल्लकच असते. तो ईश्वर अग्नीमधेही असतोच पण इंधनासारखा जळून संपत नाही. वायूमधेही अस्तित्वात असतो पण वावटळीबरोबर हलत नाही. तेच परब्रह्म आकाशात असते तरी जनसामान्यांना ते दिसत नाही. सिद्धपुरूषांना मात्र ते विमलब्रह्म ठायीठायी अनुभवास येते. ************ काय पडले आकाशांतुनी ? 'सिध्द' ? हे तर अध्यात्माचे वाणी । आद्य निसर्गाची लेणी । संबोधिती 'परब्रह्म' ?।। ३७८ नसते ज़र एक पेशीय जीव । 'अध्यात्म' ठोकण्या उत्क्रांत मानव । जाहले असते संभव ?। सांगा बरे ।। ३७९ आतां तरी या भानावर । पंचमहाभूतांचा आविष्कार । क्षणोंक्षणि देतीं साक्षात्कार । वंदनीय खरे तेची ।। ३८० हडपोनि संचित, करोनि निर्धन । वृध्द माय-तांत हताश पराधीन । देतां,दयानिधींच्या भरवशां सोडून । ऐसे करंटे वर्णांने कैसे ।। ३८१ मजपाशी नाही लौकिक, धन । 'शब्द' केवळ उपजीविके साधन । त्या आधारे मन तवाव, प्रसन्न । ठेवू पाहातो ।। ३८२ जर कांही अधिक उणे । लिहिले गेले उद्वेगाने । त्यासाठी 'क्षमस्व' म्हणणे । आवश्यक अखेरीस ।। ३८३ नाही अधिक्षेप करणे, अंतरी । बल वापरुन कर्म घरी-दारी । नाही केले ! विश्वास धरी । मायबापा ! अन्यायगर्भी संताप ।। ३८४ सोड सोड ना माझ्या अक्षरबाळा । धड धड वाजतो पडघम आगळा । वेड-सूड, मूळ विकृतविकार ज्वाळा । बघ मजला बाहती ।। ३८५ मी संतापी, करंटा भोगलोलूप । मज सगळे पुण्य नि पाप । सारखेचि ! अनुष्ठान-जप-तप । नावडलेच निरंतर ।। ३८६ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १८-०६-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। उंचनीच नाही परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरूष अथवा नारी । येकचि पद ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२४ त्या मुख्य देवापाशी कुठलाही भेदभाव नाही. मग तो राजा असो वा भिकारी, स्त्री असो वा पुरूष सर्वजण एकाच समान पातळीवर येतात. प्रत्येकाला साधनेअंती येणारा आत्मानुभव सारखाच उत्कट असतो . **************** साधना, साधना म्हणजे काय ? कांsssही केल्या संसार करणं साधंना, म्हणून ' करून करून भागले, देवपूजेला लागले' या म्हणीप्रमाणे', असल हरी तर देइल खाटल्यावरी' म्हणत, 'हरी हरी' करत बसणं म्हणजे साधना ? मुळीच नाही ! घेतलेली जबाबदारी, निर्माण केलेली नाती, सांसारिक कर्तव्य, नेटाने कार्यरत राहांत निभावणे म्हणजे जनसामान्यांची 'साधना' ! पण कधी कधी वाटतं.. मी लिहितो तो उपदेश ?। मलाच येउ लागला त्याचा वास । काय म्हणुनि 'सद्भावी' 'संतास' । 'पोकळ' मग म्या म्हणावे ।। ३८७ तरि निक्षून सागतो बाप्पा । ढोंगीपणा, भाकड, थापा । टाळा ! दावा निखळ रूपा । जैसे निसर्गे घडविले ।। ३८८ जीवजंतू वा उत्क्रांत मानव । स्थल काल भिन्न तरि एकच भाव। निसर्ग मर्यादेंत शोधणे ठाव । जगण्या !जोवर ना मरण ।। ३८९ जनकल्याण संतांचा श्वास । शब्द माझे, तर उत्सर्जित नि:श्वास । कदाचित बोधाचे भास । होइल ! परि फसूं नका !।। ३९० जर समान नर नारी । त्यजुनि संसार भोगोत्तरी । शोधाया मोक्ष-गति, द-या खोरी । सांगिती केवळ नरास कां ?।। ३९१ निसर्गे जखडिले नारीस । उच्चाटुनि 'मातृपदास' । श्वशुरगृही भोगत राहाते त्रास । परागंदा पती जरी ।। ३९२ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १९-०६-२०१५ शुक्रवार साठी. मी कांही प्रथितयश लेखक किंवा कवी किंवा कलाकार नाही. सुरुवातीला, १९६८ पासून अल्पाक्षरी स्वरूपांत, मनांत सातवें, सफुरलेलं व्यक्त करीत आलो. कधी कांही वाचल्यानंतर तर कधी कांही छानसं पाहिल्यावंतर तर कधी झाकोळीनं अस्वस्थ तर कधी स्वच्छ सूर्यप्रकाशांत प्रसन्नचित्त.. मन असतांना ओळी सुचत गेल्या त्या लिहून ठेवू लागलो ! उदा० १९६८ मधे दादरला मित्रवर्य प्रभाकर कारेकरांचं गाणं ऐकल्यावर आयुष्यांतली पहिली अल्पाक्षरी सुचली.. भाबडी... 'धन्य धन्य अजि मंगल दिनं हा, तहूकडे स्वरवलये झरती, नीर, पवन, रविकिरण जणू हे, ब्रह्मांडाचे गीतच गाती..' मग अनुभव वाढायला लागला तस विविध घाटांत लिहायला लागलो.. पण ओवी खास आवडती, कारण तो खराखरा 'मराठी' घाट.. ओवींत गुंफिता शब्दक्रमणा । नकळे कोठेनि मिळाली प्रेरणा । दासांच्या मार्गप्रदीप्तीविणा । बहुधा नसते झाले संभव ।। ३९३ आसने मर्यादित जरी । मात्र कामना अंतरी धरी । स्वप्नाळू बुभुक्षित चर्येवरी । भाव कांही मिटेना ।। ३९४ सर्व मण्यांची माळ एक । कुणि पोवळ्, पाचू वा मौत्तिक । सूत्रांतुनि ओघळणे स्वाभाविक । त्यांसा कैसे उमगेना ?।। ३९५ अंत येता नाही परतणे । प्रत्येक जीव अंतरि हे जाणे । 'वेळ' आली तरी झगडणे । आप्तां सांगे 'सोडू नका' ।। ३९६ सहज निवृत्ती कठिण फार । उसने अवसान करी जोर । 'बलवंत' आहे शरीर, अंतर । कथित राही परिवारा ।। ३९७ सनई, चौघडे, ढोल, ताशे । मर्तिक, विवाह वा बारसे । धनिकांघरी 'सोहळे' असे । होती ! सेवकां पर्वणी ।। ३९८ मी आरडतो कोणत्या काजे ?। कष्टकल्लोळांची वेदना गाजे । महानगरांत आयुष्य माझे । व्यतीत झाले ! म्हणोनी ?।। ३९९ शतके चार, अखंड प्रवास । मजसाठी कैसा महत्प्रयास । प्रेमभरे कवटाळा पामरास । उरी धरोनि, निरोप द्या ।। ४०० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २०-०६-२०१५ शनिवार साठी. ।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: ।। दास-वाणी ।। स्वप्नी बद्ध मुक्त जाला । तो जागृतीस नाहीं आला । कैचा कोण काये जाला । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। Tदासबोध : ०७/०६/६२ मी आणि माझे नातलग, संपत्ती, व्यवसाय यात गुरफटलेला आणि त्यातच परमसुख मानून धडपडणारा म्हणजे बद्ध. हा बद्ध एके दिवशी गाढ झोपला अन् त्याला आपण ध्यानस्थ बसलोय असे स्वप्न पडले. जागा झाला आणि पुन्हा नेहमीचेच उद्योग सुरू केले. पारमार्थिक जागृतीचा पत्ताच नाही. अशा स्वप्नातील मुक्तीला काय अर्थ ? परमेश्वरापायी चित्त एकाग्र तो खरा मुक्त ! *********** स्वकीय, आप्त, कुटुंबसदस्य यांची काळजी घेणं, त्याच्या निवारा, उदरनिर्वाहाच्या आर्थिकबाजूसाठी, काबाडकष्ट करीत, घाम गाळींत कार्यरत राहाणं, म्हणजे स्वार्थापलीकडला विचार, असं मानायला, 'अध्यात्म-तज्ज्ञ' कां कचरतांत. कार्यसमाधी लागणं म्हणजे बिनकामाच्या समाधीपेक्षा उच्चश्रेणीतली मानायला हवी खरीतर ! पण ते न मान्य करतां, 'परमार्थ करा' असा उपदेशपर आरडा करण्यांत कांय हंशील आहे ? सांगा बरं ! मनांत वसते येते ते स्वप्नी उमलते ।संसार,व्यापार कारणे चिंता असते । या विचारांत असता सामान्यजनांते । ग्रासते निद्रा ।। १ कष्ट, संकट, वेदना । व्यापीत असतां आप्तजना । मुक्तीच्या पाहाणे स्वप्ना । जाणा महत्पाप ।। २ हवी हविशी जर वाटे मुक्ती । मुळांत कोण्याकारणे अवतरती ?। संसार मांडुनी हे अवनीवरती । कहार होती गिळावया ।। ३ पटकुर पसरावे पदपथी । 'त्याच्या' नांवे दया मागती । त्यत्तीस कोटींपैकी किती येती । ऐशा निष्क्रीय निलाज-या भेटावया ।। ४ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २२-०६-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। श्लोक अथवा श्लोकार्ध । नाही तरी श्लोकपाद । श्रवण होता येक शब्द । नाना दोष जाती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०६/३२ वेद, पुराणे, उपनिषदे यांमधील एखादाच श्लोक किंवा अर्धा श्लोक अथवा नुसती ओळच काय निव्वळ एक शब्द जरी कानावर पडला तरी अनेक दोष नष्ट होतात. मग जर समजूनउमजून गुरूकृपेने जाणून घेउन तो आचरणात आणू शकलो तर किती पुण्यराशी जमतील? ********** ज्ञानार्जनासाठी शब्दच पाहिजे, तो श्रवणेंद्रियावाटे शोषून, मुखावाटे ध्वनित करणे जसे सामान्य मनुष्यांस श्यक्य आहे, तसे कर्णबधीरास शक्य आहे कां ? आपण सामान्यतः कुठल्याही बाबींचा विचार करतांना, सर्वसामान्यपणे सर्व ज्ञानेंद्रिये सजग असलेल्या मनुष्यांचाच विचार करतो. त्याही पलीकडे कांही क्षमता गजानन बसलेल्या किंवा जन्मत:च त्यां पासून वंचित असलेल्या व्यक्तींचा आपल्याला विसर पडतो. 'शब्द' काहींना ऐकायला-बोलायला, काहींना पाहायला अप्राप्य असतो. अशांसाठी वेगळ्या लिपी जागतिक संशोधनोत्तर ज्ञानार्जनासाठी दाखल झाल्या आहेंत. उदा० नेत्रहीनांसाठी ब्रेल, कर्णबधीरांसाठी तळहात, अंगुलीनिर्देशाद्वारे राबविली जावू शकणारी खुणांची भाषा वगैरे... तैसे कोठलेही ज्ञान । शोषित गेले कण कण । तर्काने परस्परांशी सांधून । विषय आकळतो परिपूर्ण ।। ५ उदाहरण एकलव्याचे । वा गर्भस्थित अभिनन्यूचे । अंकुरल्या, जोपासल्या कोंभांचे । त्यांनी केले वटवृक्ष ।। ६ पाहाता, ऐकता चाणाक्षपणे । विश्लेषतां परिणाम, कार्यकारणे । समोर येतो सहजपणे । अन्वयार्थ ।। ७ म्हणोनि गुरु चराचर स्थीत । जेथून जावे तेथे संगत । वावरती ! राखोनि सावधचित्त । असावे आपण ।। ८ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २३-०६-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। शैन्य अवघेचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०८/३९ राज्याचे सैन्यदळ जिवंत आणि ताकदीने सक्षम असताना राज्यकारभार करावा का एकूणएक सैनिक मरून गेल्यावर प्रशासन चालवावे हेही ज्याला कळत नाही त्याला राजा म्हणावे काय ? त्याचप्रमाणे आत्मा देहात असताना आणि देहरूपात आपण जिवंत असतानाच साधना करून मुक्ती मिळवली तरच त्यात अर्थ आहे. तोच खरा साधक मानावा. आत्मदर्शन समासात समर्थ सांगताहेत. 'मुक्ती मुक्ती' सर्वदा आरडती । 'उक्ती उक्तीं'त्रिकाल संगाती । 'भक्ती भक्ती' कां न आग्रहिती । कर्मयोगाची हे ।। ९ पाठपुरावा पळण्याचा । कर्मनिष्ठेपासून ढळण्याचा । सर्वसंगपरित्यागाचा । उपदेश, सांगा, योग्य कां ?।। १० रणांगणी वा भवसागरी लढतां । कमकुवत शरीर, मने होता । सैन्य, प्रजा कामी येतां । सत्ता गाजविण्या कुणि नुरेल ।। ११ म्हणुनि राखावे समाजभान । 'मी' म्हणावे, 'सेवक प्रधान' !। ऐसेचि वदले असावे, 'जाण, । राजा' दास शिवबासी ।। १२ मग आपोआप स्वानिनिष्ठा । जागेल स्वादिल्या मिठा । उद्योगारोग्य, संपन्न पेठा । सजवितील नगरि-देशा ।। १३ न्हाऊ-माखू घातलेली घरी । धुळींत लोळति सडकेवरी । रक्त-मांस एकचि जरी । गोमट्यासि न्याय वेगळा कां ?।। १४ 'देव' तुमचा आंधळा । प्रसाद भक्षुनी निद्रिस्त गोळा । काणा करोनिही डोळा । न पाहे तिकडे ।। १५ दुर्दैवी, प्रतीक्षेंत, मूढ । कधी मिळेल सुवर्ण कु-हाड । वाकोनि पाहती आड । तोल जाता होति मुक्त ।। १६ गति मिळता गर्तेंत जाती । 'मोक्ष' लोभाने सर्वस्व त्यजती । उखळे पांढरी करिती। बुवा, बाबा, भोंदूंची ।। १७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २४-०६-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। सदा स्वरूपानुसंधान । हे मुख्य साधूचे लक्षण । जनी असोन आपण । जनावेगळा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०९/०९ निस्वार्थ, अनासक्त, परोपकारी, दयाळू अशा अनेक सात्विक गुणांनी युक्त असलेल्या साधूचे मुख्य लक्षण म्हणजे तो सतत आत्मरूपाशी अखंड जोडलेला असतो. आत्मारामाशी एकरूप झाल्यामुळे तो समाजात वावरत असताना, समाजोपयोगी कामात व्यस्त असतानाही लोकांपासून अलिप्त असतो. शरीराने तो समाजात असतो पण कशातही गुंतत नाही हे सिद्धलक्षण होय. *********** गृहस्थाश्रमी, पति, पत्नी म्हणजेंच, कुटुंबांतील, आर्थपुरवठा, नियाजन, प्रक्रिया आणि क्षुधा-तृषाशमन यंत्रणा मंत्रीच ! इतर सदस्यांचं समाधान होइपर्यंत, स्वत: कुठलाही लाभ न घेणारे, स्वत:साठी कुठल्याही विशेषणांची अपेक्षा न ठेवणारे, वर निरुपणांत केलेल्या व्याख्येप्रमाणे, 'साधु'च नव्हेत काय ? मग त्यासाठी सर्वसंगपरित्यागाची काय आवश्यकता ? जनावेगळा कसा राहील ?। भुकेला कंदमुळे खाईल ?। भिक्षेसाठी झोळी करेल । पुढ ! जनताजनार्दनीच ना ?।। १८ सेवा, साधना वा परिचार । अखेरीस माध्यम शरीर । पोसाण्या लागते अन्न आणि नीर । कोठ शिजवतील बाबा, साधू ।। १९ आपला खारीचा वाटा । गरजूंना देण्या, अनेक वाटा । संसार करोनि नेटका । सद्भावे अर्पिती जन ।। २० भले राहा ब्रह्मचारी । अभ्यासूनि वेद चारी । सुविहित चालल्या संसारी । विचलित करु नका गृहस्था ।। २१ निसर्गे दिधल् दान । दुर्लक्षुनि करू नका अवमान । सुलक्षणे, सुज्ञपणे अवलंबुन । जिवंतपणी वा मरणोत्तर ।। २२ नर नारी कां दोनचि स्थिती । योजने या कारणे कोणती । विचार कोणी केला ? किती ?। नि:संगासि प्रतिपादिता ।। २३ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २५-०६-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। दिसे सकळांस सारिखा । पाहाता विवेकी नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०१/१९ समर्थांचा जो पारमार्थिक प्रचारक आहे, महंत हा सर्वांशी सारख्याच आपुलकीने वागताना दिसतो. कुणालाही कमी लेखत नाही, काही कमी पडू देत नाही. परंतु त्याचा विवेक सतत जागा असल्याने कोण कामाला येईल, कोण कोण निकम्मे आहेत याचा निवाडा त्याच्या मनामधे सतत सुरू असतो. सामाजिक कार्यामधे कार्यकर्त्यांची अचुक निवड ही त्या प्रकल्पाचे यशापयश ठरवत असते. ********** 'महंतां'नी कर्मयोगी आणि निकम्मे कोण हे जोखत बसण्याआधी, त्याच नजरेनं आत्मपरीक्षण करणंसुध्दा आवश्यक नाही काय ? 'ते' तर त्यत्तिसकोटी । त्यातला उपकारक जगजेठी । निवडून, दीन दुबळ्यांसाठी । नेमस्तेल, तो महंत ? ।। २७ गरीबांस कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ म्हणे 'ते' त्यत्तिसकोटी । वसंत असता उरी-पोटी । तरी क्षुधाशांतीसाठी । कपिला गोमाता रानोमाळ ।। २९ म्हणे 'शोध घ्या स्व अंतरी,। भेटतील तिथे 'दैवते' सारी !' । मग कशास करण्या वारी । प्रेरित वृथा करिति 'संत' ? ।। ३० कशास हवा महंत ? अंकुश घेवुनि जणु माहुत । अगम्य गति-मोक्षाप्रती जनमत । कोण्या कारणे रेटावया ? ।। ३१ तर्क बुध्दीच्या विश्लेषक कसोट्या । देणग्या निसर्गाच्या मोठ्या । ढोंगी, भोंदू संत 'माणसांच्या' । स्वार्थी हेतूंनी गाडल्या ।। ३२ संत-महंताना नकोच जाणकार । जनता राहिला जर भाबडी निरक्षर । तेंव्हाच झोळींत पडेल भरपूर । भिक्षा, दक्षिणा नि संपदा ।। ३३ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-०६-२०१५ शुक्रवार साठी. शिकवणनिरूपण दशकात समर्थ आपल्या महंतांना सूचना करताहेत. बहुत बोलणें ऐकावें । तेथें मौन्यचि धरावें । अल्पचिन्हें समजावे । जगदांतर ।। ********** काय साधेल ओठ शिवोनी ? । पित्त येईल वर उसळोनी । औषधी एकचि त्याच्या शमनी । व्यक्त होत राहाणे ।। १४३७ चर्चा करणे कां बा व्यर्थ ? चिंतनास जर देईल दिशा नि अर्थ ! मौन धारण्या निरर्थ । जावेचि कां ?।। ३४ उंच डोगरी चढोनि जावे । बहुत आरडा ओरडावे । हवेतर हवेशी भांडावे । हर्षोल्हासित होत्साते ।। ३५ *********** ।। दास-वाणी ।। आपल्या पुरूषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/१०/२७ आपल्या पराक्रमाने, कर्तृत्वाने कमावलेल्या स्थावरजंगम संपत्तीचा वापर अनेक सामान्यांना सुख देण्यासाठीच करावा. तेच वैभव तीच संपत्ती लोकांना त्रास देण्यासाठी वापरणे हे माणूसपणाचे लक्षण नाही. असा मदोन्मत्त हा माणसांतील राक्षसच समजावा. ********** हर्षोल्हास, सुख वाटावे सर्वांशी । वेदना दु:ख राखावी आपुल्यापाशी । कोठे न्यायचे असते 'त्या' दिशी । सांगा बरे ऐहिक ? ।। ३६ या विचारें थांबवू नका सुकर्म । काज जगण्याचे तेचि वर्म । करित राहिलांत निकामि धर्म । 'पूज्य' राहिल गांठीशी ।। ३७ तुमच्या अनाठइ 'धर्म'भावे । आळशी साधु भोंदू सेवतील 'खवे' । सागतील, 'असेचि करित राहावे । उभयतांच्या कल्याणार्थ ' ।। ३८ रक्षेने बरबटतील अंगे । नग्नदेही धावतील कुंमंडलु-त्रिशुळा संगे । शुध्द जळनिधीत करोनि दंगे । नासतील उत्सर्जिताने ।। ३९ 'पुरुषार्थ' शब्द कालबाह्य । सर्वक्षेत्रांत महिला सक्रिय । 'मानवार्थ' उपाधीचा अनुनय । करावा भविष्यी ! हे बरें ।। ४० पुरुष, तरिही व्यवहार निरर्थ । कुटुंबात अडचण, त्रास व्यर्थ। पेलण्या संसार रथ । असमर्थ, मोडके, जणु चाकं ।। ४१ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २७-०६-२०१५ शनिवार साठी. । दास-वाणी ।। बहुसाल बोलों नये । अबोलणे कामा नये । बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०१/६४ निस्पृह माणसाने नको तिथे अखंड बडबड टाळावी. बोलणे हिताचे असेल तर अवश्य बोलावेच. तिथे मौन बिलकुल नको. एकाच वेळी प्रचंड जेवण करू नये, तसेच दीर्घ मुदतीचे उपोषणही करू नये. आवश्यक तेवढेच अन्न नियमीत सेवन केल्यास कार्यक्षमता टिकते आणि वाढतेही. ************ असावे नेहमी मितभाषी । तसेच नेहमी मृदुस्पर्शी । मनांना गवसणी घालण्यासी । उपकारक सर्व हे ।। ४२ *********** ।। दास-वाणी ।। वये धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती । विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०३/१० नरपती म्हणजे राजा, वयाने कितीही लहान असला तरी त्याच्या राज्यातील वयाने खूपच मोठे असलेले वृद्ध सुद्धा त्या राजाला नमस्कार करतात. अधिकार वैभव हे वयापेक्षा कर्तृत्वावर अवलंबून असतात हे आपल्यामधील सारासार विवेकाने समजून घेतले पाहिजे. श्रेष्ठअंतरात्मानिरूपण समास. म्हणोनि वंदन ज्ञानोब्बांसी । लहानं जरि अचाट कर्तृत्वदर्शी । दशकोत्तरिषष्ठ वर्षी । घालावा शिवबासी मुजरा ।। ४३ ओवींत ना कठोर व्यंजन । रयतमनीची अपार जाण । संभवती क्वचितच युगांतुनं । ऐसे आदर्श योगी ।। ४४ हृदय आवेगे उचंबळे । पापणीकांठी नीर साकळे । जीवमात्र जगति सगळे । घेतांतच अनुभव ।। ४५ प्रेम, वात्सल्य, करुणा । परी काजांच्या नाना । परि पाहता परिणामा । असति मात्र एक ।। ४६ कुणा आंचती विरहज्वाळा । कुणा दुरावा क्षणिक साहेना । कोण्या मनी आनंद माईना । विविध स्वरुपी प्रकटे ।। ४७ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-०६-२०१५ सोमवार साठी. हे लिहितसे मी जरी । निगळेल कुणी भवसागरी ?। दखल घेवोनि परोपरी । विचार अन्या सांगेल ?।। ४८ नाही !... नका म्हणू उपदेश । कृपा मागतो तुमच्यापास । जगण्यातल्या कडु-गोड अनुभवांस । मांडण्या धजलो तुम्हापुढे ।। ४९ मज नसे तो अधिकार । नाही अभ्यास चिंतनाची धार । परंतु चिंता हृदयी अपार । भाबड्या, अबालवृध्दांची ।। ५० कैसा करतील उपदेश । ज्वलामुखीच्या तोंडास । जन्मत:च दैवाने गरिबास । धरिले ! होरपळत, आक्रंदती ।। ५१ नका दवडू समय अकारण । पुनःपुन्हा तेचतेच करुन पठण । जगण्यास आवश्यक उदरभरण । योग्य ते साधेल कां ?।। ५२ संकल्पना भ्रामक, कालबाह्य । तात्विक चिंतनाचे आरण्यकाव्य । कर्म करिता नसते संभाव्य । 'फोल'पट अखेरिस ।। ५३ 'अर्थ' असे सद्यकाली परम । निरर्थ गाळणे, त्यासाठी घाम । मोक्ष, काम वा धर्म । मिळवावा,भोगावा 'अर्था'ने ।। ५४ दारिद्रयाशी ज्याचा संग । भले प्रस्तर सहजि करि भंग । लौकिकार्थे तेचि खरा अपंग । जगाने त्याने मरणांत ।। ५५ मार्गक्रमण्या केवळ 'अर्थ' हवा । अन्यथा, क्षुधा-तृषेशि केवळ 'हवा' । मारा, चोरा, वा कर्जाने मिळवा । कारण 'अर्थ' महा-परम ।। ५६ 'अर्था'नेचि साधते सगळे । भोळ्या-भाबड्यासि गिळण्या बगळे । शुभ्र पर लेवून कावळे । भवसागरी 'ध्यानस्थ' ।। ५७ 'अर्था'नेच प्राप्त होई महत्ता । 'अर्थ' कारणे कोसळती महासत्ता । 'अर्थ' देतो आव्हान ललना-जगतां । विचलित करण्या तर्क-बुध्दी ।। ५८ कैसा वर्णू आनंद । मन होइ विभोर स्वच्छंद । पडेल कोणतेही बिरुद । उणेच, ओवण्या शब्दांमाजी ।। ५९ चक्र, अंकुश, पद्म, शुंडेवरी । मोदक सेवुनि पोटभरी । किलकिल्या नजरेचि पांखर धरी । भक्तावरी सर्वदा ।। ६० ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-०६-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा । जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०३/०९ ही शारदादेवी स्वत: तर सुंदर आहेच परंतु तिन्ही लोकातील प्रत्येक व्यक्त रूपाचे सौंदर्य ही तिचीच देणगी होय. परब्रह्माचे जे तेज आहे ते शारदेच्या द्वारा प्रत्येक व्यक्तीमधे प्रकट होते. ही शारदा वेदवेदांतांमधून शब्दरूपाने उमटते तेव्हा साधकाच्या दृष्य तरीहि मिथ्या संसाराचा निरास करते. साधकाचा मोक्षमार्ग मोकळा करते. शारदास्तवन समास. ********* 'शा' 'र' 'दा' त्रैक्षरी तत्व । शाश्वती रक्षण दायित्व । देवोनि आप्तांसि ! पूर्णत्व । पावाल, समाधाने ! ।। ६१ कळकाच्या वनांतून वेगाने धावणाऱ्या वाऱ्याच्या वाटेंत भृंगांनी कोरलेली छिद्रे आली की मंजूळ ध्वनिनिर्मिती होते.. अर्थवाही अक्षरसमूहांतून शब्द, अर्थवाही शब्दसमूहांतून चरण, तर्कशुध्द चरणांतून नादमय पद, किंवा संवाद किंवा वर्णनपर माहिती आदि भाषारूपं.. निळ्यांतून कबरा, त्यांतून पीत नंतर लालिमा आणि मग तमगर्भी निवण आदि रूपांतरांचं भान आणि ज्ञान, म्हणजे शारदा.. पण हे सगळं आकळायला तशी दृष्टी, तर्कसिध्द विश्लेषक बुध्दी हवी.. कळकाच्या बनांत शारदा । ग्रथाचिये पानांत शारदा । उदयास्ताच्या कनकांत शारदा । सर्वदा खुणावते ।। ६२ दृष्टी मात्र तैसी पाहिजे । मग तर्कांतुनि अर्थ निपजे । आपोआप पडघम वाजे । स्वसंवर्धनाचा ।। ६३ कसला 'कुंभ' कोण जाणे । अमृतबिंदू 'सांडले' म्हणे । नग्न देहांची प्रदर्शने । साधण्या धावति साधू, बाबा ।। ६४ ऐसे भ्रामक, भाकड कारण । परिणामी,नद्या जलनिधींचे प्रदूषण । मैला भरल्या गंगेचे करिती पूजन ?। कधी होतिल बा शहाणे ?।। ६५ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१-०७-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०५/२१ निर्भयता, दानी प्रवृत्ती, इंद्रियजय, स्वाध्याय, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, मृदुता, दया, तेज, क्षमाशीलता हे सर्व गुण दैवी संपत्तीचे अलंकार मानले जातात. मोक्षप्राप्त संतांना हे दागिने शोभतातही. असे हे श्रीमंत संत असंख्य सामान्यजीवांना देहबोधावरून आत्मबोधावर आणून ठेवतात. 'आपणासारिखे करिती तत्काळ ' हेच पारमार्थिक राजेपण होय. **********+ तळव्यापुढची पांच बोटे एकसारखी झाली, म्हणजे, अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करांगुली, सारख्याच लांबीची, तीन पेरांची झाली तर ? कधी कल्पना केलींत तर चक्राऊन जाल ! अंगठा दोनच्या ऐवजी तीन पेरांचा, इतर बोटांना समांतर झाला असतां तर द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून तो एकलव्याकडून मागीतला असतां ? निसर्गानं, विविध प्राण्यांना दिलेले विविध अवयव, विविध कार्यकारणांसाठी दिलेले आहेंत. तद्वतच हाताच्या पांचही बोटांची कार्य निश्चित आहेंत. त्याचप्रमाणे, व्यक्ती तितक्या प्रकृती नसत्या तर सगळेच यंत्रवत झाले असते. मग या 'साधूं'चा, आपणासारिखे करुनी ठेविले' हा दर्प कशास्तव ? त्यानं काय साधेल ? कोण अभागी भाग्यवान झाले । कुठल्यास्थळी रंकांचे राव झाले । कोण्या संत-महंते घडवियले । दाखवाना बाप्पा ।। ६६ 'मरा मरा' म्हणत वाल्याने । ऋषीपद प्राप्तिले अनवधानानं । मागल्या द्वारे प्रवेश संपदेने । करणे ! मान्यता पावली परंपरा ।। ६७ प्रज्ञा वा धनवंत जगी । जे जाहले ते तर कर्मयोगी । अध्यात्म, गतिची 'मिरगी' । टाळिली ! मांदियाळींत 'संतां'च्या ।। ६८ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०२-०७-२०१५ गुरुवार साठी. मागील भागांत वर्णन केलेले प्रज्ञावंत, जर कालांतराने धनवंत झाले असतील तर ते केवळ कर्मयोग अवलंबून, आचरूनच ! म्हणतांत ना, यशाचं शिखर गांठायचं असलं तर कांटेरी, अवघड वळणांची, चढ़-उतारांची, पावला पावलाला परीक्षा घेणारी, दमछाक करणारी वाट अनिवार्य असते. यशप्राप्तीनंतर, संपत्ती तुमचा ठावठिकाणा विचारक येतेच, तुमच्या मागे मागे... कालापव्यय अनाठाई । कधीच त्यांनी केला नाही । उजळल्या भवतिच्या दिशा दाही । तर्क, बुध्दी, श्रमाने ।। ६९ पण कांही प्रज्ञावंत, मिळवलेलं 'अक्षरधन' इतरांना वाटून, त्यांनासुध्दा समृध्दीचा मार्ग दाखवायला, अकारण टाळाटाळ करीत बसतांत, अनिच्छा त्यांच्या शब्दांतून, देहबोलींतून सुध्दा व्यक्त व्हायला लागते मग ! कारण विद्वज्जनांच्या 'कट्ट्यावर' आसन मिळाल्यावर, सामान्य ज्ञानार्थी जवळपास आलेला, त्यांच्या 'प्रतिष्ठे'ला धक्का पोहोचवेल की काय याची भीती वाटते त्यांना.... मृदु भावांचा मृद्निधी । साकारुन, वज्रलेप सर्वांगी । देऊन, म्हणती, 'वचने बोलकी' । काव्य-प्रस्तर फोडित बसा ।। ७० समज दृढ एक, दुर्बोधता । उकले-आकळेना तीच कविता । चर्चा-चर्वण, विरोध करिता । स्वानंद मिळवितो समीक्षक ।। ७१ गावे, सांगावे अगदी सहज । न आळविता अनवट 'भिन्न-षड्ज' । भारवाहक उपदेशांचे सावज । वृथा श्रोत्यां करो नये ।। ७२ रसिक अखेरच्या पंक्तीत । भेदरून मंचावरचे साठवित । श्रवण-दृष्टीद्वारे मनांत । शोधण्या येतो विरंगुळा ।। ७३ प्रथम पंक्ती विद्वान विश्लेषकांची । तदनंतर मूल्यधारी प्रवेशकांची । मागे फुलवाती वळणाऱ्यांची । गर्दी असते अधे-मधे ।। ७४ दुर्बोध ज्यांचा काव्य-स्रोत । सरस्वती सारिखा सदा गुप्त । दर्शना-स्नांनांस दुरापास्त । त्यांस म्हणती 'कविश्रेष्ठ' ।। ७५ सुबोध, साधे, सरळ नि सोपे । कां न लिहिती बाया नि बापे ?। कष्टेविणा कळेल आपोआपे । ते यांना वर्ज कां ?।। ७६ ********* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०३-०७-२०१५ शुक्रवार साठी. या भागांत, आपण दासांच्या दोन मूळ ओव्या आणि त्यावरची माझी ओवाबध्द प्रतिक्षिप्तें पाहूया... ।। दास-वाणी ।। तैसी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत । नेणोनि त्यागी भ्रांत । मंदबुद्धीस्तव ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०१/३४ माझ्या ग्रंथाची भाषा मराठी असली तरी त्यामधे अस्सल वेदांतांमधील सिद्धांतच सोप्या भाषेत मांडले आहेत. काही भ्रमिष्ट मंदबुद्धी लोक मात्र हे बोलीभाषेत आहे म्हणून त्याचा त्याग करताहेत. पूर्वी संस्कृत ही लेखनाची मुख्य भाषा आणि प्राकृत म्हणजे मराठी ही बोलीभाषा होती. ********** संवाद साधण्या बोलीभाषा । करण्या अंतरांत प्रवेशा । माहिती, वर्णने, नोंदी वितरण्या ग्रंथभाषा । ऐसी योजना असावी ।। ७७ लिहिले, बोलले ते पोहोचणे । लक्षित परिणाम साधणे । सायास त्याचसाठी करणे । क्रियेंतून अपेक्षित ।। ७८ ।। दास-वाणी ।। भरोन वैभवाचे भरीं । सद् गुरूची उपेक्षा करी । गुरूपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/३४ प्राप्त वैभवाच्या जोरावर आपल्या सद् गुरूचीही उपेक्षा करतो. ज्या गुरूकृपेमुळे आपल्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळाली ती गुरूपरंपरा लोकांना सांगण्यासही मुद्दाम टाळाटाळ करणारा शाहाणा असला तरी मूर्ख म्हणजेच पढतमूर्ख. ********* गुरु तर गुरुच होय । मग कोठल्याही रूपे उभा ठाय । नि:शब्द, निरव देवोनिजाय । ज्ञानामृत क्षणोक्षणी ।। ७९ गुरूसम नाही सखा । जीव एक, दोन देहांत सारखा । एक बोले, दुजा देइ हाका । अखंडित ।। ८० गुरु, जगण्यांतला पालकचि होय । तापल्या गोरसावरची देई साय । मथुनि देइ जैसि यशोदामाय । नवनीत बाल'ब्रह्मांडा' ।। ८१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-०७-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटी । आशागुणे हिंपुटी । करी तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/२२ जे जे चमकदार, शानदार दृष्टीला पडेल ते मनाला आवडेल इथपर्यंत ठीक आहे. ते सर्व वैभव आपल्यालाच प्राप्त व्हावे ही इच्छा निर्माण होणे, त्याची सतत चुटपुट लागणे हे अयोग्य. नुसते मनोरथ सिद्धीस जात नाहीत त्यामुळे हिरमुसला होतो हे रजोगुणी स्वभावाचे लक्षण होय. ********* मतपेटीमधे मतदारांनी, अधिकाधिक मते आपल्याचिन्हापुढील कळ दाबून, आपल्याला निवडून द्यावे, यासाठी सर्वच प्रथितयश पक्षांते उमेदवार, अतर्क्य आश्वासने बरळंत असतांत. कधीकधी ही आश्वासने, नेत्यांच्या संमती शिवायच दिली जातांत. उमेदवार निवडून येतांत आणि मग त्रिशंकु अवस्था झाली की युत्यांची कडबोळी, पावसाळ्यांत उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे, दृश्यमान व्हायला लागतांत. आतां वेळ असते सर्वाधिक बल असलेल्या पक्षाची, इतर पक्षांच्या उमेदवारांना, विहीत संख्याबळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या तंबूत दाखल व्हावं म्हणून आश्वासनं बरळण्याची. ते झालं की किरकोळ पक्षाच्या उमेदवारांना डावलण्याचा नवा उंदरा-मांजराचा खेळ सुरू होतो.. समोर सत्ता दिसत असून, मृगजळाप्रमाणे दूरदूर पळतांना पाहून 'किरकोळ' पक्षां आश्वस्त असून अस्वस्थ होतांत.. सारं कांही, ' ज्याच साठी केला होता अट्टाहास' तो 'दिसं ' न दिसल्याचं निखळ सत्य समोर आल्यामुळं... सद्यकाळी चळबुळ 'पक्षां'त । सत्तास्थाने ठेवेोनि 'लक्षां'त । किमान कांही कोटींत । संपदा वोरपण्या ।। ८२ चमक एकुटी काय करेल ? शंकाच असते किति टिकेल । परंतू फोलपण जाणतील । ऐसे बहुत विरळा ।। ८३ संपदा, सत्तेची धाकुली । भगिनी ! दाखवित वाकुली । अधिकारा पाठोपाठ गेली । रडत बसली निवृत्ती ।। ८४ जे 'त्याचे' ते कां वांछावे ? । मुखरस गळेतो अभिलाषावे । कर्ज, वा अपहार अवलंबावे । पात्रांत सामावण्या ?।। ८५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-०७-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। ज्येष्ठ बंधू बाप माये । त्यांची वचने न साहे । सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०६/२६ ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही. ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य. *********** माय, तांत, बंधू, सखा । जाणा जीवाच्या तुकड्या सारखा । त्यांना जो होईल पारखा । गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६ आज, एकूणचं विश्वभरांत, जेष्ठ नागरिकांच्या करुण कहाण्यांची स्ख्या वाढतेय !, त्यांच्या एकाकीपणाचा फ़ायदा घेऊन, त्यांनी आयुष्यभर काडीकाडी करून जमविलेली संपदा गिळंकृत करणांच्या मिषानं, त्यांच्या निर्घृण हत्या करणं, पोसता येण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं किंवा जबाबदारी झटकण्याच्या अमानुष मानसिकतेपोटी त्यांना उघड्यावर टाकून देणं आदि प्रकार वाढते आहेंत. हेच कशाला, जिच्यासाठी एकेकाळी जीव गहाण ठेवायची तयारी दाखविली, ती दिसली नाही तर, पिसे जडल्यासारखी अवस्था झाली, तिनं, विवाहोत्तर, कांही वैचारिक विरोध दर्शविला तर डोक्यांत राख घालून, तिला मुलाबाळांसहित घरी ठेऊन, 'गृहस्थाश्रम' त्यागून, अन्य बाबींच्या मागे धावणाऱ्या महाभागसुध्दा बहुसंख्येन वावरतायत... विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी । पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी । निंदनीय वर्तन तयांप्रती । अक्षम्यचि होय ।। ८७ डोईवरी आभाळमाया । काळी आई, मखमल पाया । तैसेचि वागवावे आप्तस्वकीया । तेचि होय 'माणूस'पण ।। ८८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-०७-२०१५ मंगळवार साठी. १५१ ।। दास-वाणी ।। आश्रमी अन्नाची आपदा । परी विमुख नव्हे कदा । शक्तीनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/५५ स्वत:च्या घरात अन्नाचा तुटवडा असतानाही आलेल्या पाहुण्याचे यथोचित स्वागत करून त्याला आदरपूर्वक जेवूखाऊ घालतो. त्याला अन्नावाचून कधीही परत पाठवत नाही . अतिथी देवो भव । या संकल्पनेनुसार जो दारात आलेल्या याचकाशी वागतो तो खरा सत्वगुणी. ************* घरी आलेल्या थकलेल्या, तहानलेल्या, भुकेलेल्या पांतस्थास, अतिथीस, स्वत:चा विचार न करतां तोषविण्याची आपली संस्कृती. पुराणांतली, चिलियाबाळाची कथा हा संस्कृतीचा अतिरेकी परिपांक ! अशी अपेक्षा, दानशूरत्वाची परीक्षा घेण्याच्या मिषाने, व्यक्त करणारे ऋषीमुनी तर 'धन्य'च, पण त्यागून धन्य, अतिथिसत्काराचे पुण्य गांठीशी बांधू पाहाणारे क्रूर, कांळजाच्या तुकड्याचे तुकडे करणारे काळीजविरहित आई-बाप.. अशांच्या पोटी जन्म घेणारी तान्ही किती दुर्दैवी, याची कल्पनाही करणं अश्यक्यच.. छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी । कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी । हा अविचार ? नाही ! जगराहाटी । कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९ म्हणोनि राखणे भाकरतुकडा । भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा । सुसंस्कृत गृहिणी देती धडा । परंपरा 'अतिथी' साठी ।। ९० सातजणांत एक तीळ । वाटता, मिळे सुख सकळ । कोणताही कठिण काळ । सहज होई सुकर ।। ९१ मारितो कां भूल थापा ? अतिशहाणा हा कोणं बाप्पा ? आवरा, अटकाव करा या पापा ? आरडती आढ्य, संभावितं ।। ९२ 'धर्मास लावितो चूड । उतरवा याचे वेड । करण्यास परतफेड । हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३ अध्यात्म मोक्ष, गती । हा स्वयंसिध्द मंदमती । कैसा जाणेल ? उपरती। यांस होईल ?।। ९४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-०७-२०१५ बुधवार साठी. १६७ ।। दास-वाणी ।। लोकी भले म्हणायाकारणे । भल्यास लागते सोसणें । न सोसता भंडवाणे । सहजचि होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०२/१३ लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर 'काय भांडकुदळ आहे हा माणूस' अस सहज ऐकून घ्यावे लागते. ************** काळोख असतो ठाय । प्रकाश पावतो विलय । तेज शोधीत जाय । क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१ मुकाट न राहता बोलावे । शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे । कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे । संभाषण ।। १०२ बरे, वाईट पाहावे तैसे । व्यक्तिसापेक्षच सहसा असे । भावांचे आयाम विविधसे । असावे संग्रही ।। १०३ खरं खरं समाजसेवेचं काम करणारा, सामान्य सेवक असो वा प्रजेच्या कल्याणार्थच केवळ झटणारा सिंव्हासनाधिपती राजा वा प्रधान सेवक असो.. एकाच वेळी सगळ्यांचं समाधान होईल अशा योजना राबविण्यांत कितपत यशस्वी होवू शकतो, हे गूढच आहे. कारण एका जनसमूहाला कल्याणकारी वाटणारे निर्णय, अन्यविचारी जनसमूहाला जाचक वाटूं शकतांत. त्यामुळं, टीकेला, निंदेला सामोर जाणं, बहुतांशी क्रमप्राप्त ठरतं... अंधारच असतो सत्य नि स्थाई । प्रकाशा मावळतीची घाई । जन्म सांगाती घेउन येई । मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४ कोण जाणे. अंधाराचा ध्यास । कां न बरवा वाटें प्रकाश ?। हीच बहुधा ओलांडण्या वेस । घालमेल जीवाची ?।। १०५ पुत्र कमावितो पुण्याई । आज मजला कामा येई । व्यक्तण्यास साहाय्यभूत होई । नकळत पण निश्चित ।। १०६ स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-०७-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. ************* मनुष्य एकपेशीय अस्तित्वापासून उत्क्रांत होत, आजच्या मन-बुध्दी-शारीर अवस्थेपर्यंत प्रगत झाला आहे. गंमत म्हणून सांगतो, हसण्याचं वरदान, मुद्रा ही फक्त मनुष्यालाच निसर्गदत्त मिळालेली देणगी आहे, मर्कटासारखे कांही प्राणी दांत विचकतांत पण आपण त्याला हसणे म्हणू कां ? स्मितहास्यापासून ते खळखळा हसण, या हास्याच्या विविध परींचा, सजीवांच्या जगतांतला, एकमेवाद्वितीय, अनभिषिक्त सम्राट केवळ मनुष्य'च ! पण हाच, निसर्गनिर्मित 'खास' जीवमात्र, कधीकधी वन्य, रानटी श्वापदांच्याही वर कडी करतो.. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १०-०७-२०१५ शुक्रवार साठी. भेटल्याविना नाहि जवळीक । पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ वर उल्लेखिलेले सर्व गुणावगुण, सर्व जीवमात्रांमधे सारखेच ! फक्त वसतीस्थानं, हवामान, ऋतुचक्र यामधील भिन्नतेप्रमाणे, अन्न, पचनक्रिया आदि भिन्न.. अहो हे सर्व, मनुष्यजन्म मिळालेल्यांनासुध्दा लागू होतं. वाळवंटांत सर्वरूप सारखा एकच रंग.. म्हणून त्याला छेद देण्यासाठी वस्रांच्या रंगांत खास गडद छटांचा वापर.. मैलोनमैल निरव शांतता.. तिला छेद देवून, एकांड्या पांतस्थास मार्गदर्शनपर, आश्वासक बांग किंवा घंटानाद.. 'माणुस'कीची जवळीक, जाग, उपलब्धता, 'मैत्र जीवांचं' सांगणारा याला उगाचंच भविष्यांत धर्माचं अधिष्ठान द्यायला लागले... याचीच पर्यावसन मग व्हायला लागलं फसवेगिरी करून सत्ता, संपदा मिळवण्यासाठी... शस्त्र, मोहजाल आदिंसाठी.. खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ११-०७-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. *********** आळस कधी येतो ? हाताला काम, बुध्दीला चालना देणारा सृजनात्मक विचार, विश्लेषण करण्यायोग्य परिस्स्थिती, जी तर्कबळाला प्रेरणा देईल अशी... नसेल तेंव्हा ! थोडक्यांत कर्मेच्छा, कष्ट करायची, शारीरिक, बौध्दिक क्षमता आणि असूनसुध्दा रामाच्या संधी'च उपलब्ध नाहीत किंवा असल्यातरी, वशिलेबाजीच्यी बजबजपुरीमुळं, इच्छुकापर्यंत पोहोचत नाहींत तेंव्हा ! आधी, जगण्यासाठी, क्षुधा-तृषाशमनोत्तर शरीर आणि पाठोपाठ मन आळसावून निद्रावस्थेला शरण जातांत. पोट भरलेलं नसलं तर मग अन्नप्राप्त्यर्थ, सुकर्मांच्या, उपलब्धता, संधी अभावी, आधी मन नी मग शरीर, कुकर्म करायला धजावतांत... दुश्चित्तपणा बळावतो.. कारण हातून घडत असलेल्या कुकर्मांची टोचणी, मनाला अखंड, एकाग्रतेपासून दूर सारू पाहाते.. ढळवू पाहाते... म्हणून प्राप्त परिस्थीतींत, कर्मोत्तर फलाच्या अपेक्षा न ठेवता शरीर आणि मन व्यग्र ठेवणं आवश्यक ठरतं.. निद्रादेवीची हाळी, निग्रहानं परतवीत... नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १३-०७-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. *********** वाचन करावं हे दासांनी सांगीतलय ते योग्यच आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ' रोज कांहीतरी लिहीत जावे' असाही उपदेश केला आहे. कारण वाचल्यानंतर, त्यांत व्यक्त झालेल्या विचारांना प्रतिक्षिप्त होतांना मनांत उठणारे तरंग, लाटा, वादळ, कधीकधी सुखद लहरीसुध्दा... या सगळ्यांना वाट मिळण्यासाठी व्यक्त व्हायलाच पाहिजे. म्हणजे कुढत न राहाता बोलायला, लिहायला हे हवंच ! पण या सगळ्याशी धर्माला निगडित करणं कितपत योग्य आहे ? याचाही विचार करायला हवा. सद्यकाली धर्मग्रंथांच्या वाचनापेक्षा, ग्रंथवाचन हाच धर्म होणं आवश्यक आहे... कारण विश्वभरांतल्या विविध विषयांवरचं इतकं विपुल साहित्य उपलब्ध आहे की, नुसतं विहंगावलोकन करायला सुध्दा एक आयुष्य अपुरं पडेल... वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ कृतींद्वारा या ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १४-०७-२०१५ मंगळवार साठी. वाचन, अध्ययनोत्तर, विद्यार्थीदशा संपल्यावर, पुराणकाली, गुरुगृहांतून किंवा गुरुकुलांतून शिष्य स्वगृही म्हणजे माय-तातांच्या किंवा विहित पालकांच्या घरी पुनरागमन करीत. त्यानंतर योग्य वय होतांच, उपवर कन्या, ज्येष्ठांच्या सहमतींनं निवडून विवाहबंधनांचा स्वीकार करीत गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडायला सज्ज होत. यथावकाश निसर्गनियमांनुसार कन्या-पुत्रप्राप्तीनंतर, त्यांच पालन-पोषण, अध्ययन इत्यादि सुरू होवून कौटुंबिक चक्र सुरू राहात असे. पण गृहस्थाश्रमाचं इतिकर्तव्य म्हणजे, पुढची पिढी जगराहाटींत प्राप्त परिस्थितीशी दोन हात करायला सक्षम होणं, ही असायची... कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ संत-महंत प्रतिपादंत असलेल्या 'अध्यात्मा'च्या नादी लागून, आप्तांकडे, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करीत, समाजांत अवहेलना करून घेण्याचं धोरण खरा 'कर्मयोगी' कधीच अनुसरत नसे कारण... वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रोज घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-०७-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. *********** 'देव' 'सगुण' म्हणजे मनुष्यांचे कोणते गुण दर्शवितो ? अरेच्च्या ! पण मी हे विसरलोच की तो 'देव' ! तो मनुष्यांचे गुणधर्म कसे दाखविणार ? मनुष्य 'पाहातो' तर 'तो' अांधळा.. मनुष्य ऐकतो तर 'तो' बहिरा.. मनुष्य बोलतो तर 'तो' मुका... मनुष्य संवेदनशील, तर 'तो' अंतर्बाह्य केवळ एक निष्ठुर प्रस्तर.. अश्या 'देवा' कांहो ध्यावे ?। नाव 'त्या'चे कांहो घ्यावे ?। निरांजन, धूप, नैवेद्ये तोषवावे ?। काय भले करेल 'हा' ?।। १४७८ 'उत्सव' करण्यायोग्य गुणवान कार्यकर्ते, सेवाभावी कृतिशील, यशस्वी उद्योजक, सर्जनशील साहित्यिक, कलाकार असतांना, मनुष्यांना 'उत्सवा'चं अवडंबर माजवायला, वरच्या वर्णनाबरहुकुम प्रस्तर किंवा मृत्तिकेची प्रतिमाच कां लागते ? मला नेहमीच सतावणारा प्रष्ण आहे हा... कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' । सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १६-०७-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. ******* कर्मयोग्याला लहरी असून चालत नाही.. कारण कर्तव्यं, पूर्ततेचं उत्तरदायित्व समोर उभं असतं.. कणाकणानं, क्षणाक्षणान उर्वरित कालावधीचं मापन, खंडन करीत... परंतू कुणाचीच, कसलीचं क्षिती न बाळगता, लहरीप्रमाणे वाहत राहाणारे, जाणावे महाभाग कांही कमी भेटत नाहीत, क्रमणा करीत असतांना... निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७ विसरुनि अरि 'नाग'पुराणे । मोरा मागे धावती ससाणे । कां'मत' ऐशांसि,किंकारणे । द्यावे सदस्यांनी ।। १३७ अभ्यासले म्हणे संत । सहिष्णुता तरी अंतरांत । कांही केल्या ना रुजत । पीठासनाधिष्टांच्या ।। १३८ कांही जात्याच देखणे । भरडती जात्यांत दाणे । भारुडादि लोकसाहित्य लेणे । संशोधिती निष्ठेने ।। १३९ संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।। १४० कांही साहित्य'दुर्वास' । परस्परांचा करिती दुस्वास । घरकुल जरि साहित्य'सहवास' । 'वांदरे' स्थितं ।। १४१ फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी । चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२ सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या 'नामे' साधते ।। १४३ 'नाम' घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।। १४४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १७-०७-२०१५ शुक्रवार साठी. 'कर्ता करविता तो हाये रं बाबा ! त्याच्या भरवश्यावर जगत्यांत, चालत्यांत मान्स ! त्याची करनी नि नारळांत पाणी..' पांपणीकांठी पाणी आलं तर तुमचं, स्वत:चं पाप आणि करुणा कहाणी ! पण पावसाळ्यांतलं धुंवाधार कोसळणारं पाणी, कडाडणाऱ्या सौदामिनी म्हणजे 'त्या'ची कृपावाणी, कुणी वीज पडून मेला तर ती 'त्या'ची शापवाणी... अशी 'त्यां'ची भलावण करणारी 'सु'भाषितं आपण जन्मापासून आपापल्या ज्येष्ठा, 'श्रेष्ठां' कडून ऐकत आलो नी बहुतांश जनता त्या उपदेशपर विधानांच्या आधीन राहून अधिकाधिक कार्यपरावृत्त होत राहिली. आप्तस्वकीय, अबालवृध्द संकटांत ? कर 'त्या'चा धावा.. कांही चांगलं घडलं, पोरं, स्वत:च्या मेहेनतीनं कष्टानं, उत्तमरित्या यशप्राप्त झाली ? ठेव समोर 'त्या'च्या गोडधोड नी बस डोळे किलकिल्े करून, 'तो' खरच खातबीत तर नाहीना ? याचं शंकानिरसन करायला ! अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' । कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दु:खाने । भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५ चिमणी चिल्ली घरट्यांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।। १४६ जन्माला घातल्यावर, स्वाभाविकपणे, पिलांचं संगोपन, निगराणी करून त्याला आत्मविश्वासीचे पंख देऊन, आभाळमायेच्या भरवश्यावर सोडण्याचं परमकर्तव्य, मादी सहजपणे, निरपेक्षपणे पार पाडींत असते.. पण तिचंसुध्दा श्रेय ओरबाडून घ्यायला 'तो' नसलेला, सर्वदा सज्ज असतो.... जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।। १४७ मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषत: रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १८-०७-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोध येणे । ऐसीं नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/२१ जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची. हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही. न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे. ************ मैत्र जुळायला प्रतिसाद, हाकेला प्रतिध्वनि, बिंबाला चालते-बोलते प्रतिबिंब हे सगळं आवश्यक असतं ! मैत्रींत गैरसमजामुळं वितुष्ट उत्पन्न झालं, दुरावा निर्माण झाला, विरहाग्नी पोळायला लागला, तर त्याच्या निवारणासाठी, मनांननांतली दरी सांधण्यासाठी, कोठल्यातरी एका बाजूनं, किंवा दोनीही बाजूंनी आपापल्या आग्रही, ठाम भूमिकेपासून, तीव्र भावनांना थोडा आवर घालीत, एकेक पाउल मागे सरणं आवश्यक असतं. पण याकरिता, ज्याच्याशी मैत्र जुळायचं तो किंवा ती शारीर रूपांत अस्तित्वांत असायला नको कां ? आपण 'काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेघ' असलेल्या लिखाणाशी किंवा एखाद्या सुंदर चित्राशी, वर वर्णन केलेलं सख्य करूं शकतो ? अशा निर्जीवावस्थेतल्य रूपाची आवड असणं वेगळं आणि सख्य किंवा मैत्र असणं वेगळं ! जो तो जाणितो स्वकर्माने । सुख-दु:ख भोगणे-निवारणे । वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे । अन्य कुणा ?।। १४९ सख्य, मैत्र राखते वैर दूर । वोलांडुनि मोद-क्रोध अपार । वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर । सवंगड्यांचे ।। १५० द्वापारयुगी मैत्रीच न्यारी । सद्यकाली माजले कलिधारी । लांगूलचालन दारोदारी । करिती 'दामा'साठी ।। १५१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २०-०७-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/२४ पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. ********* आत्मनिवेदन म्हणजे आपण ज्याला नाट्यशास्त्रांत 'स्वगत' म्हणतो ते असावे कां ? हे ' स्वगत' जेंव्हा कंठ-रसना-ओष्ठांद्वारे शब्दरूप धारण करतं तेंव्हा त्याला वेडाचाराचं विशेषण प्राप्त होतं. कारण मनांतल्या मनांत चाललेला स्वसंवाद, मग ती खळबळ, विसंवाद वा सुसंवाद असो.. हा मूक असावयास हवा. त्या योगे मुद्रेवरील भाव जरी बदलत गेले तरी पाहाणाऱ्याला त्यांचं प्रयोजन न कळल्यामुळं, तो विचित्रपणा वा वेडाचार भासबोध शकतो.. आणि तसही आजकाल, सद्यस्थितींत जनसामान्य ज्या परिस्थितींत मरत मरत जगत असतांत, त्यांना, असा आत्मसंवाद, आत्मनिवेदन करण्यासाठी सवड मिळूं शकते ? स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२ कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती । भीती भारते अंतर ।। १५३ पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखद:खा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी । आपणची जाणा ।। १५४ अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?। आकळेना ।। १५५ ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । 'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।। १५६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २१-०७-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजें वाया । पदार्थज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/०६ अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात. जागृती - जागेपण स्वप्न - झोपेतील जागेपण सुषुप्ती - गाढ झोप तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा. काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या . त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान. तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म. शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत. ************ आम्हासि ठावकी एकचि अवस्था । तिला विविध नामे संबोधिता । कर्मधर्म संभवतो विशेषत: । तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७ मनात कुजवुनि भोग, निद्रा । जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा । दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा । बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८ दासांनी वर्णन केलेल्या चार अवस्थांमधून, सामान्यजन कदाचित रोज जात असतील, पण संसारगाड्याच्या चाकोरीमधून, आप्तांच्या आणि स्वत:च्या जगण्याची, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची चिंता वाहांत असतांना, घट्टे पडलेल्या, चरचरलेल्या, संवेदनाहीन मनाच्या अंत:त्वचेला त्या खचितच जाणवत नसतील... साधूंना, समाजकल्याणार्थ, समाजानच कष्टाने कमावलेल्या भाकरतुकड्यांतला भाग, दान म्हणून झोळींत पाडून घेऊन, 'तपश्चर्या' वगैरे साठी अवधी वाढवायचा असतो ना ! अनेक मंचिले म्या विद्वत्जन। तयांनी मथिले तत्वज्ञान । परि सामान्य जनता जनार्दन । वंचितचि राहिला भाबडा ।। १५९ लाल दिव्यांच्या आधी गाड्या । मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या । सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या । कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६० पंचाधीक दशकांवरती शतकोटी । किड्या, मुंग्यासम जन राबती । त्यांच्या कल्याणासाठी । काय बा केले ?।। १६१ मी उन्हांत राहिन चालत । काटे जरि तळपायांत । तळपाया असिधाराव्रत । एकचि यशस्वितांना ।। १६२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २२-०७-२०१५ बुधवार साठी. ११३ । दास-वाणी ।। देखणे दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेच ज्ञान तें पामरें । अंतरली भगवंता ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२९ दिखाऊ श्रीमंती, डामडोल, भपकेबाज सत्संग आणि कानमंत्र देण्याचे भव्य सार्वजनिक कार्यक्रम इतकेच ज्ञान असणारे भोंदू गुरू असतील तर गरीब बिचारे अज्ञानी शिष्य भगवंताला कधी भेटू शकतील का ? ********** मुळांत अशा उपदेशकांची संपदाच मुळी, भाबड्यांच्या खिशांत हात घालून, आर्थिकदृष्ट्या त्यांना ओरबाडून, लुटून वाढलेली असते. भाबडे सजग झाले तर यांचा डामडौल, अर्थपिसारा. श्रीमंतपसारा कोलमडू शकतो. त्यामुळं, जसं राजकारणाचा, समाजकारणासाठी उपयोग न करता, त्याचा आधी व्यवसाय, आणि मग 'धंदा' करतांतकता, मतदारांना आपदाविपदांच्या गर्तेप्रति 'नेते' झालेले नेत्यांना, अशिक्षित मतदार साक्षर व्हायला नको असतो, तशीच कांहीशी गत, या श्रीमंत साधूंची झालेली असते... कारण कुठलही ज्ञान, उपदेश, पारखून, कसाला लावून मगच त्यांतल्या तत्वांचा अवलंब करणारा भाबडा राहात नाही आणि 'अशा' साधूंच्याकडे ढुंकूनही पाहात नाही. उलट अशा 'बडवे'गिरीचा निषेधच करतो... सद्यकाली ऐशीच करणी । अंधश्रध्दांचे जाल फेकोनी । 'व्यावसायिक' बडवे होवुनी । गरीब भोळे हेरिती ।। १६३ पण, आपणहून खड्ड्यांत उडी मारणाऱ्या, लांडग्यांच्या तोंडा जाणाऱ्या मूढांना कोण परावृत्त करणार... कैसे सावध करावे ?। पाठ 'अशांची' भाग पाडावे । सोडण्या ! आकळेना ।। १६४ जैसी श्वापदे कराल जंगली । तैशी सत्ता शर्यतींत धावली । परस्परांवर चिखलफेक केली । यथेच्छ ! जनसामान्य फासावर ।। १६५ कुणास नाही कसली क्षिती । सामोरे आलेले 'भक्ष' भोगिती । नासले-सडलेले करिती । 'लोकार्पण' ।। १६६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २३-०७-२०१५ गुरुवार साठी.(२०९) ।। दास-वाणी ।। अधर्मास स्वधर्मे लुटिले । कुकर्मासि सत्कर्में झुगटिले । लाटूंन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/४८ समर्थांच्या या संग्रामशूर साधकाने अखंड स्वधर्मपालन करून अधर्म नेस्तनाबूत केलाय. सत्कर्मांचेच आचरण करून वाईट कृत्यांना झुगारून दिलय. विचारपूर्वक आचरणाने अविचारांना हाकलून देऊन वाटेला लावलय. साधकलक्षण समासात समर्थांनी साधकाच्या समाजातील वर्तणुकीची पथ्ये सांगितली आहेत. ********** नेमाने खुरपिता तण । निश्चित वाढेल उत्पादन ? । मशागतीची तेवढीच जाण । कृषिवला हवी ।। १६७ अबालवृध्द वाऱ्यावरी । नाहक मारती शस्त्रधारी । विकृत मानसिकतेवरी । उपायो कोणता ?।। १६८ अहिंसा उपाय हिंसेवरी ?। निष्पाप जीवां मारेकरी । सर्वत्र युगानुगे अवनीवरी । खंडिती हा इतिहास ।। १६९ 'दया' शब्द त्यांना वर्ज । कितीही करा विनंत्या-अर्ज । संपदा, सत्तेचा लोभ, माज । दुष्कृत्या ठरते कारण ।। १७० सत्कृत्य शब्द फसवा । परस्पर विरोधी भावा । गोवत्स कधि, कधि छावा । गोंडस, तरि भिन्न वृत्ती ।। १७१ विषवल्ली रुजविणे । तुलसिवृंदावन लावणे । क्रिया एक परि भिन्न असणे । परिणाम ! स्वाभाविक ।। १७२ दुष्कृत्यांची जाणा महती । निवारण्या सुकृतांची माहिती । ज्यांना मान्यता लौकिकार्थी । अभावे त्यांच्या कैची ? ।। १७३ कोठलाही प्रस्तर कठोर । फोडितो वेगवान जळप्रहार । पेटता वडवानळ रौद्र । जळ शीतळ शमविते ।। १७४ परंतु जळ प्रळयवेळी । निसर्गाची अमोघ खेळी । प्रस्तरी वा वडवानळी । निराकरण्या ना सक्षम ।। १७५ ऐन दुपारचे तळपते ऊन । सर्व जीव सावली धरून । तरुवराचे हे योगदान । लक्षण सुकृताचे ।। १७६ वस्तींत माजतो दंगाधोपा । कसले सूड प्रसवती पापा । आधार माणुसकीचा खोपा । सदन निधर्मी सुकृताचे ।। १७७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २४-०७-२०१५ शुक्रवार साठी. चांगलं आणि वाईट, सुख आणि दु:ख किंवा उच्च, नीच या सर्व व्यक्तिसापेक्ष, प्रसंग सापेक्ष असतांत. एकसमयावच्छेदेकरून, दोन प्रसंग भिन्न समूहांना योग्य किंवा अयोग्य वाटू शकतांत. किंवा मी मागे एका भागांत नमूद केल्याप्रमाणे दोन भिन्न प्रवृत्ती दोन समूहांना सत्कर्मी किंवा कुकर्मी म्हणून स्वीकार्य अथवा त्याज्य वाटू शकतांत. एका देशासाठी अतिरेकी किंवा हेरगिरी करणारा, त्याच्या स्वदेशासाठी शूर सैनिक किंवा क्रांतिकारक ठरू शकतो. परदेशांत शासन भोगून आल्यावर स्वदेशांत त्याचा सत्कार करून पुरस्कारही मिळू शकतो.. लयापूर्वी जैसी स्थिती । तयापूर्वी होण्या उत्पत्ती । निसर्गाकडे कोणती ऊर्जा, शक्ती । जाणिले कोणी ।। १७८ मग कोणते द्ष्कृत्य । वा मानावे सुकृत । होईल लयाशिवाय स्थितं । उत्पत्ती जगती ?।। १७९ आपण सगळे क्षुद्र जीव । शोधीत बसतो कार्यकारणभाव । आकळेना त्यांसि देत सुटतो नांव । सुकीर्त वा दुष्कीर्त ।। १८० एक उत्तम दृष्टांत दिल्यावर हे चांगल्या वाइटाचं कोडं उलगडू शकतं. अगदी गृहिणींना येणारा अनुभव.. रोजचा.. दोसे करतांना सुरुवातीला ते तव्यावरून काढतांना तिकटतांत. नीट शिजल्या-भाजल्या न गेल्यामुळं पीठ चिकटून ताटांत पडतांत ते अर्धे कच्चे गोळे.... वेदना, दु:ख ! पण जरा वेळानं सगळ सुरळीत सुविहित व्हायला लागतं.. कुरकुरित, तपकिरी रंगाचे दोसे पानांत पडायला लागतांत.. सुख, आनंद.. आणि अर्थांत गृहिणीवर स्तुति सुमनांचा वर्षाव... हे सगळ होतं.. तवा 'मुरल्या'वर... तळहाती प्रारंभी फोड । कष्टकरी करती तडजोड । घट्टे होता त्याचे, बिमोड । होतो वेदनेचा ।। १८१ सवयीने सारे सुसह्य, सोपे । प्रारंभी मन थरकापे । मंथर नंतर आपोआपे । लागतो निवळू ।। १८२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-०७-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। ज्ञान विवेकें मिथ्या जाले । परंतु अवघेचि नाही टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०७/१८ साधना करता करता साधक ब्रह्मस्थितीला पोहोचला सत्य असत्याचा विवेक प्राप्त होऊन संपूर्ण दृष्य जग हे मिथ्या आहे असे ज्ञान त्याला झाले. म्हणून काय त्याने खाणे पिणे, उठणे बसणे आणि शरीराची नित्यकर्मे सोडून दिली काय ? तसे जर नसेल आता मला ज्ञान झालय, भजनाची मला गरज उरली नाही असे तू म्हणू शकतोस का रे बाबा ? ज्ञानोत्तर भक्तीचे महत्व समर्थ सगुणभजन समासात सांगतात. शब्द असावे सार्थ सुगंधी । संगीत अन् मोदाची नांदी । हृदयस्थ शांतीस योग्य संधी । भजनांत ।। १८३ भजन करावे स्वान्त:सुखाय । सुखांत रुजते ज्ञान निरामय । क्षणात आनंदाचा ठाय । सहजचि नकळता ।। १८४ ज्ञानांकुर रुजवुनी अंतरी । कोंभांच्या वाढल्या तरुवरी । मधुर फळे लगडणारी । चाखावी येथेचि जाणा ।। १८५ पिंडास कावळा शिवे । टोच मारण्या चोंच शिवशिवे । आनंदविभोर, कृतज्ञ भावे । नाचती आप्तजन ।। १८६ जेथे नाहीच कावळा । तेथे ठेवा पिंडगोळा । दर्भाचा मग मार्ग मोकळा । करोनि देई किरवंत ।। १८७ गुलाले माखिला पिंड । मनुष्यासही क्षुधाशमनखंड । रित्यापोटी जेंव्ह ब्रह्मांड । भुकेल्या लागे जाणवू ।। १८८ घाटावरि ठेविती पिंड । तटावर अनावर आसवे अखंड । ताटावर तेराव्यास किरवंत कर्मठ । ओठ शिवोनी नि:शब्द ।। १८९ 'उरकले कां रे बाबा ?'। पुसती जिवंत आज्ज्या-आजोबा । घेती वेदना, दु:ख ताबा । अस्तुरि, कच्च्याबच्च्यांचा ।। १९० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २७-०७-२०१५ मंगळवार साठी. तुम्हाला ती कथा माहीत आहे ? एका जराजर्जर, मृत्युशय्येवर तळमळत, 'म्हातारीचा प्राण कुडींला कधी एकदाचा सोडतोय' त्या क्षणाची प्रतीक्षा करींत, ' म्हातारीनं आपल्याला कांही ठेवलय की नाही ?' या चिंतेंत आसपास वावरणारे मुलं, सुना, नातवंड असं दृश्य... एवढ्यांत वृध्दा, 'वा वाsss के केsss' असं पुटपुटू पाहाते ! संबंधितांना वाटतं वारसहक्काबद्दल कामहि सांगायचय वाटतं म्हातारीला.. त्वरित थोरली सून मात्रा उगाळून, चाटण, अडकलेली जीभ सुटावी म्हणून, ओठांत देते.. अहो आश्चर्यम्.. म्हातारीची उजळलेली मुद्रा चिंताक्रांत... सगळ्यांचे कान, अमृतवाणी ऐकायला सरसावतांत.. पण हाय रे कर्मा.. म्हातारी कोपऱ्याकडे अंगुलीनिर्देश करून बरळते... 'वासरू केरसुणी खातय.. त्याला आवरा.. तात्पर्य: मोह पाठलाग करतो अंतिम क्षणापर्यंत... सर्वांगावर सुरकुत्या । अपचनाने अतिसार, वांत्या । 'जा दूर, येउ नको अंत्या' । श्वास लोभी आरडे ।। १९१ असो... या 'ओवीद्विशतकाची' वाटचाल संपतां संपतां मनांत येतं... कोण्या उद्देश्ये लिखाण ?। जागवण्या अंधश्रध्द जन । त्याकरिता आवश्यक प्रकाशन । लोकार्पणार्थ ।। १९२ मेंदू बुध्दीचा जन्मदाता । बुध्दि देते तर्कशुध्दता । हृदयिच्या भावाचा संगम होता । शब्द, भाषा समृध्द ।। १९३ जैसी असेल कर्मरीती । तैसीच येते प्रचिती । अध्यात्म, भक्ती, मोक्ष, गती । केवळ कल्पनाविश्व ।। १९४ कांहीच न देतो हरी । बैसल्या जीवा खाटल्यावरी । अर्जुनासहि तो वदे 'कर्म करी' । तेंव्हाचि कथा सुफल ।। १९५ पाहुनी अभेद्य श्रध्दा । पांपणींत ओथंबल्या जलदा । आतुर निवारण्या आपदा । भाबड्या भक्तांच्या ।। १९६ कोणी जोडिती हस्तक । कोणी घासतो चरणी मस्तक । 'त्याचे' आडते, मध्यस्थ, हस्तक । सावज घेरण्या टपलेले ।। १९७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-०७-२०१५ बुधवार साठी ।। दास-वाणी ।। गरळ आणि अमृत जाले । परी आपपण नाही गेलें । साक्षत्वे आत्म्यास पाहिलें । पाहिजे तैसें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/१९ साप किंवा नागाचे जहाल विष म्हणजे गरळ. कोणत्याही आजारातून निश्चित बाहेर काढणारे संजीवन द्रव्य अमृत. दोन्हींमधे जलतत्व आहे ते एकच आहे. त्याच प्रमाणे दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमधे सुद्धा आत्मतत्व एकच असते. हे समजले की आपली वर्तणुक सर्वांशीच चांगली आपुलकीची राहते. ********* म्हणूनच त्या बाळानं, ज्यांन गीतासाराच्या ९००० ओवी, भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी रूपानं, विश्लेषण, विवेचनोत्तर प्राकृतमधे विरचित करून, सर्वसामान्यांना पटेल, रुचेल अशा भाषेंत निगळण्यासाठी उपलब्ध करून, रेड्यातोंडून वेद वदविण्याला समांतर, सहसा अशक्यप्राय वाटणारं कार्य करून 'संभवामि युगेयुगे' ही बिरुदावली प्राप्त केली. त्या निष्पाप, निर्मळ मनाच्या छकुल्यानं म्हणूनच, त्या विश्वात्मकाकडे, अखेरीस गाऱ्हाण घालून मागणं मागीतलं, पसायदानाच्या.. प्रसाद म्हणून., रूपानं ! 'जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।' हा दृढविश्वास मनी राखत, सकारात्मकतेचं सशक्तरूप दृश्यमान करीत... पैठणाधीश 'धर्मकर्मठांची । गरळफेक पचवुनी चूळ अमृताची । गीता उकलत, ओवी ज्ञानोब्बांची । सालंकृत झाली ।। १९८ हलाहलाच्या हालाग्नींत । जनसामान्य होते पोळत । भावार्थदीपे त्यांना शमवित । कर्मधर्म सांगे ज्ञाना ।। १९९ सांगाल आजचा असा एक तरी महात्मा, जो 'दीनोध्दार' हेच जीवनाचं इतिकर्तव्य समजून कार्यरत आहे ? आहेंत.. असे बहुल आहेंत.. विविध प्रांतांत, देशांत, केवळ 'माणूसकी' हाच धर्म मानून कर्मप्रवृत्त आहेत.. पण या सर्वांचा शिरोमणी आपला 'ज्ञानोब्बा'... ऐसा कोणी अवतरेल ?। तमारि दीपस्तंभ होईल ?। लांडग्यांना सहजी वारील ?। शंका सद्यकाली ।। २०० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-०७-२०१५ गुरुवार साठी न केले अपेयपान । वा कधि अभक्ष भक्षण । पूजिली अवघी श्रद्धास्थानं । अकाल काळाघात टळेना ।। २०१ आनंदे जगला स्वच्छंदी । रंगला भिजला सुस्वरनादी । 'तृप्त मी ! घेउदे समाधी' । विनवणी परि ऐकेना ।। २०२ सूर्यकिरणां उगमस्थळि विघटिते । जळबिंदूतुन सत्व शोषिते । व्यघिविनाशक सहजचि होते । शुध्दस्वरूपी प्राशिता ।। २०३ (सूर्यपादोदकम् तीर्थम् जठरे धारम्यांमहं ।।) विरघळता हितकर क्षार, वायू । जळांत ! निरामय होण्या आयु । प्राशिता, कृत्रिम औषधी, उपायू । अनावश्यक ।। २०४ रुजल्यावर सहजचि वृध्दी । स्थैर्याची सखि समृध्दी । अस्तवेळि विकार, व्याधी । स्नभाविक जीवनक्रम ।। २०५ लिहिणे केवळ हव्यास । नका म्हणू, 'हा व्यास' । कक्षेचा विस्तारणे व्यास । जगण्याच्या ! हा हेतू ।। २०६ म्हणून अनुभवत जगतो । डोळसपणे जागर करितो । खंतावतो, उचंबळतो, रागेजतो । कल्लोळ अंतरी माजता ।। २०७ कुणि अवकाश वैज्ञानिक । कुणि सावकाश अज्ञान मानक । दोघेही निवडले पुरस्कारार्थ । साहित्यतीर्थे ? अचंबा !! ।। २०८ कुणि शतकी शतक खेळे । कुणि डबक्यांत वळवळे । दोघे एका मंचावर ? आगळे । दृश्य याहून कैचे ।। २१० कुणि स्वरांची मांडी दुकाने । वाहिन्यांच्या वाऱ्या करित नेमाने । थोरांच्या बाह्या धरुन राहाणे । धर्म निष्ठेने आचरती ।। २११ आग्रह असतो पुण्यनगरींत । 'भूषण' म्हणावे त्यां, ऐसी रीत । नामचीन साहित्यिक अडगळींत । कुरवाळित स्वाभिमान ।। २१२ 'सरले' म्हणता कां सरिते । प्रवाहित राहावेच लागते सरितें । भविष्याची आव्हाने पसरिते । कर्म-कर्तव्य पूर्ततेची ।। २१३ तोचि सूर्य, तीच आभा । निळाईही आश्वासक तीच नभा । मनि धरोनि लाभ, लोभा । पळत सुटूं नित्यासारखे ।। २१४ तेच तेच सारे सारे । ठाई ठाई चराचरे । कर्म-कर्तव्याच्या उभारे । म्हणू, 'उत्तिष्ठत, जाग्रत' ।। २१५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३१-०७-२०१५ शुक्रवार साठी कसं असतं पाहा.. एखादा दिवस उजाडतो नि दासांच्या ओवीची भेट होत नाही. जीव कासावीस होतो.. कारण व्यक्त व्हायची, शब्दांची असोशी स्वस्थ बसू देत नाही. मग मनांतली खळबळ, निषेध, विरोध कांही अंशी आनंदतरंगसुध्दा, ओवी रूपानं अवतरायला लागतांत.. मोकळं वाटतं.. उपदेशाचा गंध.. (दर्प ?) या व्यक्त होण्याला येऊ नये याची विशेष काळजी घेत शब्दक्रमणा करीत राहातो.. परिणामत: परत परत सा रे सा रे । म ग ध नी प्रेमभरे । अवनीवरी तेजोभरे । तैसाचि पसा उजळेल ।। २१६ आकडे पुढे चालले । उदयास्त रोज पाहिले । अर्थहीन पळ जगलेले । भेडसावति आतांशा ।। २१७ हा मोजायाचा खेळ । चालेल असा किति काळ ?। त्यांतच चिरनिद्रा भूल ?। मिळो आंता !।। २१८ पण कांही विलक्षण रंग-रास घटना, स्वप्नवत असल्याप्रमाणे दृश्यमान होतांत, आणि, तत्क्षणीची प्रतिक्रिया म्हणून, अचंबित होताहोता मन भळाळू लागतं.. मावळती-गुलाल सलीलां । यमुना तीरी रासलीला । मधुराभक्तिच्या विविध लीला । रंगती गोकुळी ।। २१९ परत खोलवर घाव केलेले, निरुद्योग्यांनी प्रयत्नपूर्वक मशागतीनं भाबड्या अंत:करणांत रुजवू पाहिलेलं भाकड समोर येतं नि मन चित्कारून उठतं.. परत परत.. म्हणे अध्यात्माने आत्मोंन्नती । अर्थार्थ कर्मापासोनि मुक्ती । ज्याची नियत करंटी । तोचि जाणे घेऊ ।। २२० आत्मोन्नत मुक्ती फसवी । डोहाळे भिकेचे पुरवी । दारिद्र्याचे अस्मान दावी । आप्त-स्वकीयां ।। २२१ निसर्गें सृजनाचा वर । मगजग्रंथींत रुजविला पुरेपूर । अखंड अभिषेक कलेवर । करण्या दिला मनुष्यां ।। २२२ अलंकाराचा करण्या वापर । सुकृतार्थ विचार सारासार । करावा ! अन्यथा 'कलेवर' । होइल त्याचे निश्चित ।। २२३ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१-०८-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। मीपणे प्रपंच न घडे । मीपणे परमार्थ बुडे । मीपणे सकळहि उडे । येशकीर्तिप्रताप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/४७ ' मी ' पणाची सतत असलेली जाणीव म्हणजे अहंकार. प्रपंचामधे तर तो त्रास देतोच कारण मोठेपणाची कर्तृत्वाची जाणीव इतरांचा अधिकार मन मान्य करत नाही. परमार्थातही मी साधना करतो हा अहंकार परमेश्वरापर्यंत पोचू देत नाही. संपूर्ण शरणागतीशिवाय तो भेटत नाही. याच अहंकारापोटी भौतिक जगतातील यश, कीर्ती, प्रताप, मानमरातब यांनाही किंमत उरत नाही. विनम्रपण स्वीकारले तरच समाजमान्यता मिळते. ************** 'मी'पणांतला अहंकाराचा भाग गळून पडला की मग उरतो तो सकारात्मक नम्र स्वाभिमान, स्वत्वाशी कुठलाही तडजोड नाकारत, 'मोडेन पण वाकणार नाही' इतक्या टोकाची नसली तरी आग्रही भूमिका घेण्याचं पूर्ण समर्थन करीत खंबीरपण् पाठीशी उभा राहाणारा स्वाभिमान.. कारण जर 'मी'चं शारीर अस्तित्वच नाही तर मग प्रपंच ते परमार्थ यामधलं सगळं कोणाला चिकटविणार ? 'मी' च नाही तर भवताल । काष्ठ-पाषाण-तेज-सलील । जैसी कवडश्याची 'सल' । नेत्रहीनासि ।। २२४ 'अस्तित्व'चि जाणिते पंचतत्वे । ना जडती कसलीच ममत्वे । विचार, कल्पना, यश, कर्तृत्वे । नसलेपणासि फोल सर्वथा ।। २२५ 'मा'पण ज्याचे सरले । जगणे कशास मग उरले । मरण सुध्दा परवडले । तुलनेंत ।। २२६ संत ना मी, ना तत्ववेत्त । माझी तर शुध्द अनुभव-कथा । सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा । लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। २२७ कोण जाणे, कैसा पुनर्जन्म । हा तर केवळ अंधश्रध्द भ्रम । निसर्गे नेमुनि दिलेले विहित कर्म । करावे जोवरि हृदय सजग ।। २२८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०३-०८-२०१५ सोमवार साठी. जन्मला तो नाशवंत । मरणातुनी न होय उत्क्रांत । हे तर परंपरासिध्द निश्चित। विज्ञानसत्य जगन्मान्य ।।२२९ युगानुयुगं हे चक्र सगळे जीवमात्र.. पशु-पक्षी, वन्य, हिंस्र श्वापदं, पाळीव, कृषिकार्यासाठी, दूधदुभत्यासाठी गोठ्यांतलं जित्राप, सुरक्षेसाठी किंवा हौस म्हणून ठेवलेल्या, श्वान-मर्जारादि प्राणी... अनादि काळापासून जाणतायत ! तरीसुध्दा, सप्राण शरीराचं, श्वास थांबल्यावर झालेल्या पार्थीवाचं, मातीचं, जीवितावस्थेंत त्याच्याशी जडलेल्या भावबंधामुळं, प्रतिक्षिप्त व्हायला, ते अभावी अस्तित्व नाकारू पाहातांत आणि ते शोधण्याची पिसं जोडून मग भोंदू तंत्र, मंत्रोपचार करणाऱ्या बेगडी कृष्णकृत्यांच्या परिघांत येतांत... 'हे तर थोतांड !' म्हणे चार्वाक । एकदाच प्राक्तनी इहलोक । अभ्यासुनि उक्ती विस्मरती विवेक । पुनःपुन्हा 'संत' बरळती ।। २३० जे 'गेले'ते परतुनी आले ?। बाष्फ घनरूपे अवतरले ?। 'रक्षेंतुन' मूळरूपी प्रकटले ?। दावा ना मज कोणी ।। २३१ वास्तव कालातीत भीषण । आदर्शवादाची त्याला वेसण । युगानुयुगे, साधक, संत सज्जन । पाहती घालू ।। २३२ अशा अंधश्रध्दांना, जनमानसांतून हद्दपार करणं जमलं नाही तरी कमींतकमी वेसण घालून आवरण्याचं कां शास्त्यांनी करायला हवं, खरं तर ! पण ते तर अनुदानांची लयलूट करीत धर्माधिष्ठित 'नंगाचारा'ला उत्थापन देण्याचं कुकर्म करीत राहिले तर ? परि बदलेल सद्यावस्था ? । शर्यत लुटण्या सत्ता, संपदा । राजकारणे बरबटल्या कथा । ऐकता मन विषण्ण ।। २३३ व्याघ्रादिकांचि वृत्ति श्वापदी । कवळ कवळून करिति जायबंदी । नरडे फोडोनि होती आनंदी । शोणित-प्राशने ।। २३४ तैसेची तथाकथित 'समाजकारणी' । लटक्या प्रेमभरे कुरवाळुनी । करिती काळेंना अत्याचारी करणी । जैसा फुकरे मूषक ।। २३५ सगेसोयरे, आप्तेष्ट। नित्यनेमाने वास्तपुस्त । करत राहावे कर्म रास्त । सर्वांस जे हितकर ।। २३६ कर्म-कर्तव्य प्रामाणिकपणे । गृहस्थाश्रमी करीत राहाणे । बाळ-गोपाळ, अस्तुरी सुखविणे । हीच आमुची जीवनकला ।। २३७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-०८-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। भिक्षेने वोळखी होती । भिक्षेने भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०२/१३ गावोगावी, घरोघरी भिक्षा मागितल्यामुळे महंताचा जनसंपर्क वाढतो. लोकांच्या मनातील धर्माविषयीचे भ्रम महंत दूर करू शकतो. अत्यंत कमी मोजकीच भिक्षा महंत घेत असल्याने गरीबाला सुद्धा आर्थिक बोजा न पडता पुण्यप्राप्ती होते. (आताच्या काळात महंत म्हणजे कार्यकर्ते, भिक्षा म्हणजे सभासदत्व व देणगी घेणे) ********** जनसंपर्काच हे साधन, सद्यकालांत अतर्क्य वाटतं की नाही ? म्हणजे ज्या जनताजनार्दाबरोबर संपर्कांत राहायचं त्याच्याच खिशांत हात घालून, म्हणजे शार्विलिकी करून नव्हे तर, त्याहीपेक्षा धोकादायक, अध्यात्माधीष्ठित मोक्ष, गति, वगैरे, कर्तव्यच्युतीच्या मार्गाला नेणाऱ्या मोहजालांत, भवसागरांतल्या दु:ख, आपदा-विपदा, वेदनांनी त्रासलेल्या भाबड्यांना अडकवून, स्वान्त:सुखाय क्रमणा करण्यासाठी हा उद्योग, म्हणजे जनसंपर्क ? उदरनिर्वाहासि मागण्याने भिक्षा । दास म्हणति रुंदावते संपर्ककक्षा । परगृही शिजले ते 'मोक्षा' । कष्ट टाळोनि मिळवीलं?।। २३७ सद्यकाली नाकारला 'चंदा' । तर तोडफोडती उदिम, धंदा । गुन्हे करोनि परागंदा । होती कार्यकर्ते महंत ।। २३८ हेरोनि तोरणे,माळा, उत्सव । त्रस्त करिता अबालवृध्द बांधव । 'राजा'श्रयासि ही एकच ठेव । गांवगुंड 'महंतां'कडे ।। २३९ आजकाल अनोळखी चेहेऱ्याला कुठलही प्रमाणपत्र, ओळखपत्र नसतांना घरांत तर सोडाच, अंगणांत घेणही धोकादायक ठरू शकतं ! इतके मोहजाली सुवर्णमृग आणि जनतारूपी जानकीचं अपहरण करायला टपलेले रावण गल्लीपासून दिल्ली पर्यंत, बेदरकारपणे वावरतायत ! हा असला 'उपदेश' । कर्मयोगी साधकास । देशोधडीला हमखास । लावेल ना ? सांगा बरें !।। २४० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-०८-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावें । मरोन कीर्तीस उरवावे । येणें प्रकारें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/१०/१३ कधीतरी आपण नक्की मरणार आहोत.आपल्या चांगल्या वाईट कृत्याची वर कुठेतरी पक्की नोंद होतीय ही जाणीव म्हणजे मरणाचे स्मरण. व्यावहारिक, प्रापंचिक, सुखविलासापेक्षा जो हरिभजनात प्राधान्याने दंग असतो अशा उत्तमपुरूषाची कीर्ती तो मृत्यू पावल्यावरही खूप काळ टिकते, वाढतच जाते. ******** मरण कसले ?, म्हणाना 'मोक्ष' । 'आत्मा' शोधितो नवा 'कक्ष' । अध्यात्माला कोरे 'भक्ष' । आपोआप ।। २४१ कशास हवी, कुणास कीर्ती ? सय येतां पांपण्या पांणवती । हृदये आप्तस्वकीयांची हेलांवती । पुरेसे असते जनसामान्या ।। २४२ स्मरण कोणाचे ? किती ? कृत्ये विविधांगी करिती । प्रमाणांत त्यांच्या, व्यक्ती । राहती आठवांत ।।२४३ गद्गद होवुनी कुणी वंदे । आठवुनि जखमा कुणि क्रोधे । उच्चारण्या अपशब्द, ओठामधे । कर्माजोगी प्रतिक्रिया ।। २४४ नको कीर्ती नको पुतळे । टाळक्यावर बसतिल कावळे । 'कावकाव'त मिळुनि सगळे । मुद्रा भरतिल विष्ठेने ।। २४५ जगण्याची कला कां 'शिकविता'?। सहज श्वासना सारिखी असतां । 'रवि'तेजातळि रोज घडतां । 'शंकर' काय करील ? ।। २४६ शिबिरे की नृत्यांगणे ? । कालापव्यय विनाकारणे । द्विजास अवकाशी झेप घेणे । शिकवणारा एक मूर्ख ।। २४७ फोडिता शब्दांची अंतरे । त्यांतूनि प्रसवतील धनधान्यांची कोठारे ?। सुखावतील अस्तुरि आणि पोरे ?। क्षुधाशमनोपरान्त ?।। २४८ संधी गरजूंना काबाडकष्टांची । त्यांतूनि चरितारार्थ अर्थार्जनाची । भवसागर तरून जाण्याची !। व्हा प्रदीप त्यस्तव संतहो !।। २४९ म्हणे 'अध्यात्मिक अनाथ' । आणि सद्गुरू तारिल धर्माचरणांत । पण जगण्यासाठी घास ओठांत । देइल ऐसा गुरू ?।। २५० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-०८-२०१५ गुरुवार साठी. उपदेश हवेंत विरेल । जर श्रोता पुढती नसेल । भरल्या पोटीच सहसा पचेल । व्यर्थ बोध वा भक्तिधारा ।। २५१ एकतर ।। वक्ता वक्ताचि नव्हे श्रोतेविण ।। या उक्तीप्रमाण्, समोर जर ऐका-पाहायला श्रोता किंवा प्रेक्षक नसेल तर त्या भाषणाला, संवादाला, सादरीकरणाला काय अर्थ आहे. त्यापेक्षा स्वान्त:सुखाय स्वगत किंवा तालीम केलेली काय वाईट ? आणि असलंच कोणी समोर, तर ते, सादरीकरणांतला आशय, किमानप्रमाणांत तरी समजून घेणारं असावं, नाही कां ? पण अगदी जाणकार श्रोता, प्रेक्षक समोर असला आणि उपाशीपोटीच, जबरदस्तीनं बसवला असलां, तर त्याचं चित्त, सादरीकरणाकडे आकर्षित न होता, भुकेजलेपणामुळं विचलित होत राहाणार. त्यांतून, 'अध्यात्म, मोक्ष, गती' अशा सद्यकालांत केवळ कालापव्यय करणाऱ्या, कुठल्याही प्रकारच्या कार्यप्रवणतेपासून परावृत्त करणाऱ्या, अर्थार्जन होवून तदनंतर क्षुधाशमनासाठी शतप्रतिशत निरुपयोगी आशय 'उपदेशांत' असेल तर 'उपदेशाची' मात्रा नको, भूक भागेलं असं कांही दे..' म्हणत समोरच्यानं पोबारा केला तर त्याचा काय अपराध ? आधी भागवा शारीर गरजा । विशेषत: चालना देण्या मगजा । सजग करण्या चेतना,संवेदना, समजा । तवान हवे ना तन-मन?।। २५२ होईल साध्य, की राहील स्वप्न ?। ज़रि अर्पिले तन-मन-धन । जैसे ज्याचे कर्मावगुंठित प्राक्तन ।च तेचि पदरी पडेल ना ?।। २५३ भव्य आकार जरि बहिर्रूप । हृदयांत वात्सल्य, माया अमाप । विघ्नहर, आपदांचा सकोप । संहारकर्ता ।। २५४ चंद्रगुप्तासि चाणक्य जैसा । शिवरायांसि समर्थ तैसा । सत्तेसाठि नाहि पसरायचा पसा । मिळवायची लढोनि, हा केला उपदेश ।। २५५ शुंडेंत एकवटली शक्ती । कर्ण विस्तीर्ण उत्सुक ऐकण्या स्तुत्योक्ति । नेत्र किलकिले तरि तीक्ष्ण दृष्टी । पांखर सदैव भक्तांवरी ।। २५६ लंबोदरांत सहज रिचवे । सेवा जे करिती मनोभावे । ऐशांचा अपराध संभवे । जरि अनवधानें ।। २५७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-०८-२०१५ गुरुवार साठी. साठी. ऐसी ठेवावी गुरुने धारणा । ज्ञानतृषार्था शिष्य म्हणा । जळनिधी जगति कधि कोणा । अव्हेरतो कां ?।। २५८ योग्यता जोखावी गुरुंची । तेथे 'आवड-निवड' त्यांची । तीक्ष्णबुध्दी शिष्योत्तमांची । क्षीणबुध्दी बालकांवर अन्याय ।। २५९ भेगाळल्या भुईवर बीज रुजवी । निगराणी करुनि फुलवी, फळवी । झेलण्या वादळ-वारे मार्ग दावी । तोचि कसबी कृषिवलां ।। २६० धरुन हाती हिरा मुळांतला । घासुनि-पुसुनी चमकविला । 'वल्गना' करितो, 'मीच घडविला' । तो कसला गुरू ?।। २६१ मोकळिली सर्वत्र शारदा । विविध विद्याशाखांची संपदा । ज्ञान-विज्ञान, कर्मयोग, व्यवसायीसि सर्वदा । वरदायिनी ।। २६२ कळाकुसर, तंत-स्वर-ताल । ज्ञान भारले भवताल । अनंत अवकाशाचा तोल । शारदा सहजी सांभाळी ।। २६३ शाश्वती, रक्षण, दायित्व । वात्सल्य, प्रिती, ममत्व । कर्तृत्व, दातृत्वादि तत्वं । अंतरंगी उपजवी ।। २६४ असो राजा वा रंक । अनाकारण कुणा डंख । करू पाहेल ! तर हकनाक । सर्वनाश अटळ ।। २६५ जगा, जगूद्या हे सूत्र । मानवतेचा आधारमंत्र । अत्याचारासि दया मात्र । दुरापास्त ।। २६६ राम होता ना देव ?। मग चंद्रप्राप्ती कां झाली असंभव ?। झाली प्रतिबिंबित कल्पनेची धाव । कौसल्या मायेची ।। २६७ म्हणे होता बालहट्ट । वसतो जो 'बिंदू पासुनि सिंधूंत । बाल, युवा वा जर्जराशक्त । 'देव' कसा असेल हो ?।। २६८ विरंगुळा कथेचा रयतें । करमणूक आयती होते । परस्पर 'कार्य' सिध्दीस जाते । भाकड भाटांचे ।। २६९ संकटे झेलीत राज्ञी सीता । परपाशांतुन सोडवुनि आणिता । झाला राम आज्ञा करिता । अग्निदिव्याची ।। २७० रापाच्या मिशें वणवे । लाविती कृषिवव अननुभवी नवे । भडकतां अवघे रान पेटवे । विक्राळ पावक ।। २७१ अमर्यादित त्याची व्याप्ती । मरुतादी भूते साहाय्य करिती । शमविण्यासि जळनिधी अपुरे ठरती । प्रसंग बांका ठाकतो ।। २७२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-०८-२०१५ शुक्रवारसाठी. कर्मोत्तरीच अनुभव । तोचि जाणा योग्य 'देव' । त्याचाच जर असला अभाव । तर 'शोधेनि गवसेना' अशी स्थिती ।। २७३ केवळ म्हणे पदस्पर्शाने । शीळेंतुन अहल्येस मुक्त केले । मग स्वपत्नीस कां म्हणे । धाडिले वनांत ? ।। २७४ प्रष्णांची उत्तररामचरितांतं । उत्तरे सारी मिळतांत । आणि सिध्द करतांत । 'मनुष्य'पण रामाचे ।। २७५ म्हणोनि जरि दिसला नाही । कल्पनाचक्षूंनि न्याहाळी पाही । शब्दरूप 'त्या' ला दई । रसिकांसाठी ।। २७६ मात्र जाणा त्यांतील सत्य । ते कल्पनेचेचि क्रीडाकृत्य । 'दिसला, पाहिला', गर्जोनि नृत्य । आनंदविभोरें करू नका ।। २७७ काव्य, गीतांत बहुतेक । फसव्या प्रतिमा अनंत । सत्य प्रतिबिंबाचीचं भ्रात । तेथ नेमकी असते ।। २७८ उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांतादी । अनुप्रास, रूपक अलंकारांची यादी । लेखक, कवि, बुध्दिवादी । वसते याच्या संग्रही ।। २७९ विणोनि कल्पनाविश्वाचे जाल । हे सुखाशांचे दलाल । भाबड्या रसिकांसाठी कलाल । सहजी होती ।। २८० चढवुनि होता पुरेपूर नशा । 'गल्ला' जमता गुंडाळिती गाशा । वाचकास सोडोनि प्रदेशा । अतर्क्य, अनाकलनीय अनुभवण्या ।। २८१ जय जय भास्कराचार्या । अपाला प्रथम ऋचारचिता, आर्या । वेदरचनेच्या महत्कार्या । आरंभिले जिने ।। २८१ जयतु सुश्रुत शल्यचिकित्सक । अश्विनिकुमार, औषधोपचार संशोधक । कृषि, अवकाश वैज्ञानिक । जगणे सुखविण्या जे झटले ।। २८२ कोणास आत्मा मुळांत । दिसला, जाणवला भवतालांत ?। परमात्म्याचे कां मग 'भूत' । व्यथितांच्या गळी उतरविता ।। २८३ जगतों, चालतो, बोलतो । हसतो, खंतावतो, वेदना रिचवितो । संसारावर पांखर धरितो । तो धैर्यशील ।। २८४ 'संत' पण काय वेगळे ?। अतर्क्य बडबड, अगम्य जाळे । त्यांत भाबड्यांना ओढण्याचे चाळे । करिती ते संत ।। २८५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-०८-२०१५ शनिवार साठी संकटांत अविचल । सुकाळांत सुखे भोगीत । आकंठ बुडला संसारांत । तो खरा 'संत' ।। २८६ वाटते कां कमीपण ?। अभ्यासण्या त्यांची शिकवण । अनुभव, वागण्या-बोलण्यांतुन । कां दुर्लक्षिवा कथित 'संतांनी ।। २८७ वक्ता वक्ताचि नव्हे श्रोतेविणं । समोरचा ज्ञानतृषार्त जनगण । तृप्त श्रवणाने मन । समाधान पाहिजे पावले ।। २८८ प्रारंभी रीझवावी अंत:करणे । मग आकर्षूनि आशयाप्रत नेणे । उपसंहारे प्रोत्साहित करणे । असा क्रम सामान्यतः ।। २८९ कुणा कमी न लेखतो । स्मितभाष्यें सर्वांस सुखवितो । नेत्रांतली उत्कठा जाणितो । वक्तादशसहस्रेषु ।। २९० त्यां हृदयीचे स्वहृदयी रुजविती । रसिकत्वा परस्पर येइ भरती । देउ-घेवोनि समृध्द होती । वक्ते, श्रोते ।। २९१ जो संसारी आप्तांसाठी झटला । त्याने नाही कां परमार्थ साधिला ?। जपजाप्य, उपासनेसि नाही बसला !। बिघडले कोठे ?।। २९२ चिंतन चिंतांचे केले । वारण्यास उपाय शोधिले । भवसागर करून गेले । ते कर्मयोगी परमार्थी ।। २९३ जो ज्या जागी स्थित । करीत राहतो कार्य विहित । तोचि रोजच्या जगण्यांत । परमोच्चपदी ।। २९४ कोणी पाहिले जन्म अनेक ?। काय असते त्याचे प्रमाणक ?। कशाल मग स्मरता चार्वाक ?। म्हणे 'तत्वज्ञानी आम्ही' ।।२९५ शब्दरत्नाच्या भांडारा माजी । सद्यकाली वसती माझी । आपोआप वीण त्यांची । उपजवी आशया ।। २९६ स्वर-शब्द उठविती तरंग । उचंबळविती अंतरंग । अमूर्त आनंदाचे भाग । पिसे जडवित उधळिती ।। २९७ स्वरभारित आसमंत । रसिकत्व होई उत्क्रांत । ज्ञानेंद्रिये कांठोकांठ तृप्त । पांपणीकांठी दहिवर ।। २९८ हे तो होय सत्कीर्तल । हरेक पावला पुनर्तवान । विस्मरण्या शरीरे नि मन । आपदा विपदांना ।।२९९ थकले वाटे हृदय, मगज । क्षणिक विश्रामाची गरज । सप्तशतकी लहरींची गाज । भारतसे अंतर्मन ।। ३०० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१०-०८-२०१५ सोमवार पुन:पुन्हा पुनर्जन्म । कशास सारखे स्मरण । एकदाचि असते मरण । कां पडिती भ्रमांत ?।। ३०१ इतकी प्रगती करून, प्रयोगाअंती सिध्द करण्याची कांहीही आवश्यकता नसतांना, जनमानसांनं, युगानुयुगं वाहिलेलं अंध:श्रध्दांच जोखड उखड़ने फेकण्यासाठी विज्ञानानं अथक प्रयत्न, विशेषत: गेल्या दीड शतकांत केले. तरीसुध्दा श्राध्द-पिंडादि कर्मकांडांच वृथा आचरण सुरूचं आहे. आज जवळपास साठ प्रतिशत लोकांना त्यांतला फोलपण पटलं असलं तरी ते घरांतल्या ज्येष्ठ, वृध्द कधीकधी, विशेषत: ग्रामीण भागांत, निरक्षर महिला, पोक्त व्यक्तींच्या गळी उतरवणं कठीण होतं. मग नाइलाजानं बिचारे करीत राहातांत कर्मकांड... अक्षरे वाचू लिहू लागली । भाबडी शिक्षणाने सरसावली । आंता अंधश्रध्दांची काळी बाहुली । नको वाटे त्यांना ।। ३०२ आतां आवरा भाकडे । ना तर म्हणतिल 'खोटारडे' !। भिऊनि पाउल वाकडे । ना टाकेल कोणी ।। ३०३ आपदा, विपदांचा होता उद्भव । आरडतांना 'देवा धाव' ?। छकुले रडते मातेस्तव । कां मग रागेजता ।। ३०४ नजरेआड झाली माय । तर तान्हे मोकलते धाय । उभे ठाकते कसले भय ?। कुशींत घेईल कोण ?।। ३०५ प्रारंभी कल्पना, मग हुंकार । हुंकारोत्तर अक्षर, उद्गार । पाठोपाठ शब्दमोहर । आशयपरिमळ दरवळे ।। ३०६ बीजांकुराचा उद्गम । प्रवाहस्रोताचे धाम । तर्क-बुध्दि-चातुर्याचा आगम । शुंडाधारी सुंदर ।। ३०७ थेंब आधी, संततधार नंतर । पागोळी ठिबके तळ्यावर । होड्या। सोडित, जणू जळचर । भासती बालके ।। ३०८ तानसेनाची आर्त तान । जर करील शेष श्रवण । डोलू लागेल हरपून भान । हा हा:कार अवनीवरी ।। ३०९ निसर्ग मग जाणीवपूर्वक । झाला परित्राण योजक । शेषास श्रवणेंद्रिय धारक । सद्हेतूने नाहि केले ।। ३१० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ११-०८-२०१५ मंगळवार साठी. मला सगुण साकार निसर्गाची प्रार्थना, उपासना, आरती, आळवणी मान्य आहे. जरी मला माहीत आहे की ही अशी श्रध्दासुध्दा अंधश्रध्दांचं आहे, त्या प्रार्थना आळवणींतला फोलपणा मला माहीत आहे. कारण निसर्ग जितका संवर्धक, कल्याणकारी तितकाच तो विध्वंसक, हानिकारी आणि लहरी आहे. म्हणतांत ना.. 'असलं तर सूत, नाहीतर भूत' कसला प्रकार ! आतां स्तुतिपर कांही लिहावं म्हटलं तर मूर्तिकारानं, प्रस्तराच्या किंवा मृत्तिकेची, सगुण साकार केलेली छानशी गजवदन प्रतिमा मनांत ठेवून, आळवणीयुक्त शब्द लिहायला सिध्द झालो... प्रलयांतुन प्रसवण्या प्रसन्नता । चिंतामुक्ती देऊन चिंताक्रांता । भवसागरी तारक 'नेता' । सर्वदा होतो लंबोदर ।। ३११ तसच कांहीसं माया, ममता, वात्सल्यानं ओतप्रोत गुरूबाबतींतही जाणवलं, अन शब्द प्रवाहित झाले... पसरिता पसे दोन । जो देतो भरभरून । नाही पाहात मागे वळून । तोचि गुरु खरा शिष्याचा ।। ३१२ आधीच अवघडल्या शरीरी । कष्टविते गर्भधारी नारी । सांकडे घालण्या द्वारी । प्रस्तराच्या ।। ३१३ मी हे कां लिहितोय ? त्यांचं प्रयोजन काय ? राम ना, ना दास, ना मी समर्थ । जाणिला, आकळला जेवढा अर्थ । ओवी, उपदेश सद्यकालांत सार्थ । असे-नसे जोखिले ! इतुकेची ।। ३१४ मी मतिमंद, मूढ लेकरू । भ्रांत भुकेची ! काय करू ?। कष्टसाध्य भाकरिचा आधारू । कोण देइल जगण्याला ।। ३१५ जपजाप्य, नामस्मरण खूप केले । परि कांहींच ना साधिले । क्षणोक्षणी दिवस वाया गेले । फुकाची व्यथा ।। ३१६ गति वाढली, झाला कपाळ'मोक्ष' । माळेत ओवुनी, विविध मुखी रुद्राक्ष । पोथ्यां-ग्रंथ घेउनी हेरणारे भक्ष । 'अध्यात्मिक' कल्लोळ आसमंती ।। ३१७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १२-०८-२०१५ बुधवार साठी. सद्यकाली 'अध्यात्म' सा संकल्पनेची, शब्दाची, कृतीची जी कांही विकृत परवड सुरूं आहे ती विविध माध्यमांतून जनसामान्य.. जे खरे तर भोंदू 'अध्यात्मिक' गुरू, बाबा, अम्मा, माई यांचे लक्षित.. त्यांच्या समोर रोज उलगडतय ! पण त्यांची त्यावरची श्रध्दा, अंधविश्वास निपटून काढायला या घटना कितपत उपयुक्त ठरतील.. शंकांचे आहे. त्यामुळं या 'भ्रामका'चा भ्रमनिरास करायला, या जालांतून त्यांना, त्यांची युगानुयुगं पगडा असलेली मानसिकता बदलून, परिवर्तन करायला भरपूर कालावधीसाठी अथक परिश्रम, सर्वदूर पसरलेल्या सामाजिक संस्थांनी करणं क्रमप्राप्त आहे... अंतरी निरुपण, कीर्तन, प्रवचन । रिचवाया, रुजाया जिवंत हवे तन । परि पचन व्हायला अन्न । जर नसेल ? सर्व व्यर्थ !।। ३१८ प्रवचन, निरूपण, कीर्तन । करतील कदाचित समाधान । राखण्या शरीर, मनाचे कोंदण । पचनासाठी अन्न हवे ।।३१८ साधेल काय अध्यात्मज्ञान ?। आत्म्यास मिळेल समाधान । 'त्या'च्या निवासास परि तन । नसेल तर ? सर्व व्यर्थ ।। ३१९ रुचेपचेल ते केवळ सेवावे । अन्य 'अन्न' दुरोनि आदरावे । मोक्ष, गती, फसव्या 'पक्षां' चे थवे । दुर्लक्षावे खचित ।। ३२० तंत्र, यंत्र ना, मंत्र आधी । आवश्यक, ठरण्या लक्षवेधी । कार्यपूर्ती, वा मिळण्या सिध्दी । शाखाज्ञान जाणिजे ।। ३२१ मंत्रोत्तरी तंत्राची जाण । मग यंत्राची जडण-घडणं । साध्य करण्या कार्यकारण । साहाय्यभूत जे होते ।। ३२२ अर्थाची नका करूं गल्लतं । मंत्र म्हणजे नव्हे उपासना, व्रतं । विषयाशयाने असतो संपृक्त । लक्षवेधी नेमका ।। ३२३ जाणिवेस देतं प्रतिसाद । मगजांतरी तर्क-बुध्दी वाद । ज्ञान-कर्मेंद्रये आदेशानुरूप सावध । कर्यप्रवण तदनंतर ।। ३२४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १३-०८-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। जेणें देहबुद्धी तुटे । जेणे भवसिंधु आटे । जेणे भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०३/५० मी म्हणजे माझा देह. त्याचे संगोपन, लाड हेच आयुष्य असे वाटणे ही देहबुद्धी. जे जे दिसते, अनुभवाला येते ते सर्व चर अचर, स्थावरजंगम असा प्रपंचाचा पसारा म्हणजे भवसिंधु . कवित्व कशाला म्हणायचे ? जे नियमीत श्रवण केल्याने देहबुद्धी नष्ट होते. जगातील प्रत्येक गोष्ट नाश पावणारी आहे हे कळल्यामुळे प्रपंचावरील लक्ष उडून परमेश्वराकडे केंद्रित होते, भगवंताची साक्षात अनुभूती साधकाला प्राप्त होते तेच खरे कवित्व. तोच खरा कवी. ********* नाश होणे म्हणजे 'नाही'से होणे, नजरेला कायमचे अंतरणे, माक़ूल मिळण्या, हवेंत विरून जाणं, पंचतत्वांचा भाग होणे... पुनश्च 'अवतरण' न होणेहेतु... याला अपवाद फक्त ऊर्जा. तिलाच अध्यात्माच्या भाषेंत, 'आत्मा' म्हणत असावेत कां ? नाश कैसा पावेल कोण ?। अवतरेल ना घेउन पुनर्जन्म ?। 'तुम्ही'च देतां शिकवण !। मग अव्हेरिता कां ?।। ३२५ कल्पना, बीजरूपी कवित्व । त्याचीच निर्मिती 'देवत्व' । 'नसलेपणास' अस्तित्व । देती कवी ।। ३२६ अंतरंगी हरेकास होते प्राप्ती । अनुभवसमृध्दिची व्याप्ती । व्यक्त करण्या अल्पाक्षरी क्लृप्ती । अवगत असते कवीस ।। ३२७ कर्म, कष्टकऱ्यांचा 'भगवंत' । कालापव्ययी जपजाप्य व्यर्थ । 'अर्थ' होतो कार्योत्तरी कृपावंत । 'भवसिंधू'त तरावया ।। ३२८ विश्रामाच्या क्षणी कधी । थोडा शोधून त्यांत अवधी । देहधाऱ्यांच्या व्यथा, व्याधी । वेदनांचे जाणा कवित्व मूक ।। ३२९ कवित्व म्हणजे स्वप्न पाहाणे ?। कवित्व म्हणजे दिव्य लेणे ?। कवित्व म्हणजे प्रतिबिंबापल्याडचे जोखणे ?। व्याख्या उलगडा !।। ३३० सामान्य पाहातो स्वप्ने । सामान्य जाणतो मरण्यांत जगणे । सामान्यास सुख-दु:ख, संसारलेणे । मातीतला कवि-प्रतिनिधी ।। ३३१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १४-०८-२०१५ शुक्रवार साठी. शून्य म्हणजे नसलेपण । परि दाविण्या अस्तित्व लागते चिन्ह । तैसेचि 'देवा'चे 'पूज्य'पण । प्रस्तरांत ।। ३३२ नाकारू नका मुळांत काहीच । नकारांशिवाय, होकार नसतोच । जैसे तम-तेजाचे नातेच । परस्परावलंबी ।। ३३३ म्हणोनि उच्चारूच नका आहे-नाही । मूक रहोनि घडते ते पाही । प्रचिती दिसण्याने देई । तेचि सत्य ।। ३३४ 'पाहातो तो सर्व वरून' !। 'त्या'च्या 'धाका'चे असूद्या भान !। म्हणून सोडेल भयभीत करुनं । अंतरंगी तो भामटा ।। ३३५ दयार्णवासि कां बा भ्यावे ?। वात्सल्यमूर्ति मूळ स्वभावे । देई धीर पोटाशी धरुनी प्रेमभावे । क्षमाशील तो सत्पुरुष ।। ३३६ पुढती मांडोनि सुवर्णपात्र । वाढून देती नाचणिची भाकर । तेवढीच पचवेल व्याधिग्रस्त शरीर । ना दुसरा इलाज ।। ३३७ भाज्या, चटण्या, कोशिंबिरी । उजव्या, डाव्यामधे विविध परी । पंचपक्वान्ने आणि खिरी । परंतु सारे निषिध्द ।। ३३८ विटेवरी चढविती विटा । गिलाव्या नंतर इंद्रधनुषी छटा । अंतरंग सजवुनि धरिती वाटा । पाले आपली पाडुनी ।। ३३९ जे उभारिले, ते नाही माझे । सोडतांना मनावर नाही ओझे । कार्यपूर्ती कोणत्याकाजे । जाणितो निस्पृह कर्मयोगी ।। ३४० आस्तिकतर टोकाचा नास्तिकं । श्रध्दा त्यांची केवळ एकं । अस्तित्व 'त्या'चे सर्वभर, बाकी मिथिकं । जैशा वारूसि झापा ।। ३४१ अवकाश अखंड, अगम्य, अनंत । तमप्रवाह त्यांत कालातित । आकाशगंगेत तारे केवळ निमित्त । जैसे गेरूवरी ठिपके ।। ३४२ कुंभार, माळी, विणकर, तेली । अनंत भाषा, विविध बोली । 'उक्ति'वल्ली उमलत गेली । उन्मनावस्थी, 'इटु' कारणे ।। ३४३ कोणीच नव्हते 'पदसिध्द' संत । कष्टकरी, संसारी कार्यरत । शब्द, सहज आले ओठांत । कौतुकास्तव 'त्या'च्या ।। ३४४ जर्जरावस्था आणि श्वान । अवस्था बहुश: एकसमान । नाकरीत नाहीत अन्न । वटारती नजर अधिकासाठी भुंकता ।। ३४५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-०८-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। मुक्त क्रिया प्रतिपादी । सगुण भक्ती उछेदी । स्वधर्म आणी साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/०४ पारंपारिक शास्त्र, धर्म, परंपरा, रितीरिवाज यांना पूर्ण फाटा देऊन स्वैर वागणुकीचे स्वत:चेच नियम निर्माण करून नवीन पंथ तयार करणे. सगुण भक्तीचे उच्चाटन व्हावे असा प्रयत्न. स्वधर्म म्हणजे नेमून घेतलेले स्वकर्म निष्ठेने करत असलेल्या साधकांची टवाळी करणारा. ही तीनही लक्षणे पढतमूर्खाची आहेत. तो शाहाणा असला तरी मूर्खच मानावा. (उदा. - केजरीवाल) बहुधा विश्व सारे मूर्खांनी भरलेले ।महंत, साधूंच्या भाकडांनी भारलेले । सारे जपज्याप्य, उपासनेने तारलेले । स्वप्न त्यांचे म्हणावे कां ?।। ३४६ नियम-जननी सांसारिक गरजा । धर्मावडंबरांचा वाजला जरि बाजा । कर्मकांड परजून, 'प्रायश्चित्त' गर्जा । अविचल राहातील कर्मकारी ।। ३४७ सगुण म्हणजे चित्र, मूर्ती ?। त्यापुढे जे उगा ठाकती । परिणाम 'शून्य' असोनि माहिती । जाणा निरुद्योगी शतमूर्ख ।। ३४८ ताऱ्यांची उत्पत्ती, स्थीती, विलय । ग्रहगोलांचे त्यां भवती परिवलय । गणितज्ज्ञ ज्ञानियांचे ध्येय । वर्तविणे, मांडणे अचुक ।। ३४९ गणितशास्त्राची सर्वत्र व्याप्ती । शून्यापासोनि गणन अगणिती । विविधाकृतींत भूमिती । अनुभवा येते ठाइठाई ।। ३५० पारंपरिक ठरते कालबाह्य । नाविन्यांत घेते स्वारस्य । आधुनिक होती उपास्य । कालानुरूप ।। ३५१ मंदिरे तत्कालीन संस्कृतीकेंद्रे मोठी । सणावारी रीतीनुसार आप्तभेंटी । शास्रांनी स्वीकारिल्या विविध कोटी । साधण्या सुवर्णमध्य ।। ३५२ टाका फेडुन कुबट सोवळे । खुंट्यां, कोनाडे करा मोकळे । निरर्थ कर्मकांडांचे तोडुनी जाळे । मुक्त करा आसमंत ।। ३५३ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १७-०८-२०१५ सोमवार साठी. ।। दास-वाणी ।। धनधान्यांचे संचित । मन होये द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/१३ धनधान्याने आपली कोठारे तुडुंब भरलेली असावीत. मनामधे सतत पै आणि पै जोडण्याची अनावर इच्छा. अमाप संपत्ती जोडून सुद्धा राहाणीमान अत्यंत कंजूष आणि दरिद्री. येथील येथे अवघेचि राहाते हे न समजल्याने उपभोग न घेताही फक्त साठवत राहातो तो रजोगुणी. संचय करणे उपकारकचि । संसारांत गरज असतेचि त्याची । मुंग्यासुध्दा करिती कणाकणाची । वर्षाऋतूसाठी साठवण ।। ३५४ ज्याला वाटे विरक्त व्हावे । त्याने जन्मासचि न यावे । जगल्यांचे घास वाढवावे । स्वप्नी सांगोनि मायबापा ।। ३५५ महाररूपे गरिबांसाठी । रिकामी करविली धान्यकोठी । केवळ 'रजोगुणा' पोटी । केले सत्कृत्य ?।। ३५६ कोठारे भरली शिगोशिग । लुटावयास गरजू भुकेल्यांची रांग । लोकोपयोगी उदरभरण योग । साधणे.. काय पाप ?।। ३५७ घरधन्यास राहावेच लागते साधेपणी । अन्यथा ओंजळिची होते चाळणी । राखणे आप्तांसाठी अन्न-पाणी । होउन बसते अवघड ।। ३५८ अखेरीस संपदा न येते कामा । जेंव्हा जायची वेळ निजधामा । सुकृते दुष्कृत्ये केलेली 'जमा' । न बांधती तिरडीवरी ।। ३५९ मग 'पिंडा' वरली शिते । टोचावी लागतांत होवुन भुते । विसरतांत सर्वजण नाते । घरोघरी पोचता ।। ३६० कधि झुंझुरका विभोर आनंद । कधि जागवते वेदनांची साद । हा परस्पर, विसंवादी विरोध । आमुचे जगणे ।। ३६१ घरोघरी चुली मातीच्या । विविध भाषा प्रांत जातीच्या । तेढ, तंटे सरपण मुखि तिच्या । सज्जन माणसे घालिती ।। ३६२ त्यावर शिंजते रोज अन्न । पदार्थ, आवड, निवड भिन्न । तरी क्षुधाशांती, तृषा शमन । एकची हेतू ।। ३६३ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १८-०८-२०१५ मंगळवार साठी. कष्टसाध्य भाकरतुकडा । नाहि लागत सुखान् तोंडा । त्यांतही वाटा थोडा । मागतात देणारे ।।३६४ असते म्हणे ही रीत । कष्ट करण्या नाही देत । मन होते मग दिवाभीत । स्वीकारते 'व्ववस्था' मूकपणे ।। ३६५ व्यवस्थे विरुध्द ठाकणे । सामान्यासि कैसे जमणे ?। मरत जिणे जगत राहाणे । लाचार, लज्जास्पद ।। ३६६ सुंदर ध्यान समचरण 'इटु' बरवा । मुखदर्शना मधे 'दलाल' आडवा । धरुन टाळके चरणी बडवा । देण्या कपाळ'मोक्ष' ।। ३६७ भ्रष्टासि पाठविती घरी । सत्तेवर निर्वाचित पदाधिकारी । त्यासि पृच्छा जो करी । धनि पश्चात्तापाचा ।। ३६८ काळे,बरबटलेले कोठारी । गरिबांच्या घरट्यावर कुठारी । ऐशांची माजली बजबजपुरी । ताळ कुणास तंत्र ना ।। ३६९ जुने गेले, नवे आले । 'शपथे' करिता कोट्यवधी खर्चिले । ज्याच्या ओंजळींतुनि लुटले । मिळाले काय त्यांस ?।। ३७० मरणहि मागते 'चिरिमिरी' । पै पै राखिली संसारी । म्हणे, 'एखादी हवीच व्याधी तरी' । अन्यथा आम्ही यावे कसे ।। ३७१ निगुतिने केल्या संसारी । अडिअडचणिसाठी अस्तुरी । उरलासुरला पै पैसा भरी । घडवंचीवरि गाडग्यांत ।। ३७२ उपभोग जगतांना त्याचाही । 'मरण' घेउ देत नाही । औषधींसाठी खर्चिले सर्व कांही । तरिही काढावे लागते ऋण ।। ३७३ मंदिरी कांडी धुराची सुगंधी । सभोवताली कर्दम, असह्य दुर्गंधी । झोडिती मेजवानी उंदिर-घुशी-वराहादि । अवस्था प्रार्थनास्थळांची ऐसी ।। ३७४ राजवाडे कस्तुरि-वाळादि द्रव्ययुक्त । 'लाडक्या' रयतेमाथी आभाळ मुक्त । भोजनांत पक्वान्न, कदान्न विभिन्न बेत । ऐसी 'समानता' प्रदेशी ।। ३७५ कोण 'संत' म्हणोनि अवतारिला ?। अनुभवाने सुविचारी वचने बोलु लागला । हांसत सत्कर्म करोनि कृतार्थ झाला । 'हा संत' म्हणति सामान्य जन ।। ३७७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १९-०८-२०१५ बुधवार साठी. स्वाभाविक सुसंस्कारांच्या स्रोतापोटी, सत्कर्म, सत्कृत्य, सामान्य समाजासाठी सहज साध्य समजतो 'संत'... त्याला कुठे, कधी कां भेटला 'देव' ?। वाढला, जगला कटु-गोड घेत अनुभव । निगळुनि ! तरि अमृत शब्द-स्वर-भाव । बोलला, वागला तो 'संत' ।। ३७८ सकारात्मक, रचनात्मक देइ विचार । विशुध्द समृध्दीचे निर्देशितो द्वार । लावितो विवेके जगण्या सारासार । मार्गप्रदीप 'संत' जाणा ।। ३७९ उक्ती-कृतींत समाधानि घरी संसारी । झोळी घेउनि न ठाकितो परक्या द्वारी । पालकत्व आप्तांचे स्वीकारी । रयतेला नकळत उध्दरी, 'संत' ।। ३८० माया, ममता, प्रेम सगळं, इतरेजनांच्या कल्याणकारी कार्यासाठी देण्याआधी, स्वत:च्या कुटुंबियांची अन्न, वस्त्र, निवारादी बाबींची व्यवस्था लावून, कालापव्यय करीत न बसतां कार्यप्रवण होतो, तो 'संत'.. मनस्वी, सहृदय सेवाभावधारी । वेदना पाहून होतो व्यथित उरी । उपकारक कृतींस कार्यप्रवण करी । स्वत: ! तो 'संत' ।। ३८१ वेदनामुक्त ज्यांस त्याने केले । ओठावरी त्यांच्या स्मित पेरिले । उपजत मायेने उराशी धरिले । ते 'बाबा' म्हणती स्वयंस्फूरतीने ।। ३८२ मूलस्रोत माया, ममता, वात्सल्य प्रीतीचे । उर्जाबल 'कर्म'कारी, मधुराभक्तिचे। अ'धर्म'गर्भी धर्मकांड निराकरणाचे । कृतिपाठ देई तो 'संत' ।। ३८३ सत्कर्मांसाठी जन जागविती । सगुणांची बीजे रोविती । सेवाभावाची वाढविती रती । संसारी राहुनि दक्ष 'संत ' ।। ३८४ जो आहे तेच दर्शवा । मुखवट्याआड कांही न लपवा । आढ्यता, ढेंगास बळी न जावा । शिकवण देती कृतींतुनं ।। ३८५ श्राध्द, पक्षांचे अवडंबर । कशास ? येते ना सईंची सर। मुलळधार वा थेंब अलवार । सुखविण्या, दुखविण्या ।। ३८६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २०-०८-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०३ प्रयत्नांचे सातत्य म्हणजे कष्ट. या जगात फुकट प्राप्त झालीय अशी एकही गोष्ट नाही. फळ ही कष्टाची देणगी आहे. राज्य सत्ता तर सामुहिक प्रदीर्घ कष्टांचे फळ आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे. ही साध्याची गुरूकिल्ली आहे. सातत्याने जो करितो कष्ट । त्यास यश मिळतेचि निश्चित । माळ घेवोनि जपजाप्य करित । जर नाही बसला !।। ३८७ बसल्या जागी मिळतो घास । तान्हे,बालक,वृध्द,अपंगांस । म्हणावे लागते 'आ वास' । तरिही भरवितांना ।। ३८८ ।। दास-वाणी ।। येकदा मेल्याने सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वाचविना । तो आत्महत्यारा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०९ शिल्लक राहिलेल्या इच्छा (वासना) भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे एकदा मरून जीवाची सुटका होत नाही. पुन्हा जन्म घेतला की गर्भवासापासून,बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळया यातना भोगाव्याच लागतात.अशा जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तीसाठी साधना करून जो स्वत:ला वाचवत नाही तो आत्मघातकीच मानावा. गर्भस्थित अंडकोषी बीज फळले । बाल-युवा-पोक्तासि, वार्धक्य आले । जो जन्मला त्यासि न टळले । मरणही ।। ३८९ सुख-दु:ख भोग जगतांना सारे । इथेच मांडायचे पसारे । श्वास थांबता कांहीच न उरे । पार्थिव होई रक्षारूप ।। ३९० जनन मरण एकवार । तमगर्भच त्या आधी, नंतर । पुनर्जन्मादि भाकड वारंवार । जरि रुजवू पाहाती 'ते' ।। ३९१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २१-०८-२०१५ शुक्रवार साठी. साधना करणे सवयीचे । सामान्यासि वर्म त्याचे । उपजतचि अंगी असायाचे । साध्यहेतु कष्टकर्म ।। ३९२ आनंद भोगता ना वरचेवर ?। मग यातनांचे ओझ कां मनावर ?। जगण्याच्या या 'तऱ्हे'वर । नको कदापि नाराजी ।। ३९३ वासना, विकृती देहधारी । सत्कर्म-हंस मानस सरोवरी । परंतु मरणोत्तर सर्वोपरी । पावते लोप ।। ३९४ म्हणोनि धावती, करिती घाई । समोर दिसते नसलेपणाची खाई । सौख्यभोग मिळणे नाही । अंधार दाटता चहूकडे ।। ३९५ घडण्या घडविण्याची हीच वेळ । सर्वथा चहुकडे वैचारिक गोंधळ । पिसाळलं कुत्र खातय, दळतय आंधळं । सांभाळा मित्रहो ।। ३९६ शिक्षण जागवते सामाजिक जाण। नीर-क्षीर विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन । तेचि सत्य केवळ, बाकी विश्वासहीन । हृदयी धरा हा बोध ।। ३९७ चाळितो अक्षरे शब्द कल्पना बोली । वाटते,'कोठुनी झेप अशी घेतली ' । ना लायक व्यक्ती लेखणि तरि मी धरिली । कोण्या कारणे ? अचंबा !।। ३९८ 'इति' संगे घुमते, 'इदं न मन', ची गाज। हे माझे नाही आशयांतले ओज । कोठून येउनी, रुजले, फुलले बीज । विरलेली ऊर्जा संपृक्तली ।। ३९९ या अष्टशतकी अनुभवसिध्द ओव्या । वाचकांसी विचारप्रवर्तक व्हाव्या । प्रत्येकाने लिहावयास हव्या । पिढ्यांसाठी पुढच्या ।। ८०० हे तरंग, झटके, शब्दांची 'आकडी' । आशयाचि झाली कधी न वाट वाकडी । मज पडली होती जगण्यामध्ये कोडी। कावडींत मृगजळ वोसंडते ।। ८०१ लौकिकार्थी पापी अन् बहुव्यसनी । पाहता वेदना पण कणव दाटते मनी । हा असला सरडा फिरतो रक्तामधुनी । मुखवटे हे निसर्गदत्त ।। ८०२ नशेचा माझ्या होतो त्रास । 'आम्ही सारे साहावे कशास ?'। पाहांतांत मूकपणे एकमेकांस । भेदरूनि गृहवासी ।। ८०३ ************* अरुण काकतकर.