Tuesday, November 12, 2013

एकाकि दूरवर

एकाकि दूरवर निवांतशी वनराई, नि:शब्द शांतता भरली ठाईठाई तरुवरे वेढिला संथ जलाशय हासे, सलिलांत बिंबवित नभ, विहगांचे ठसे मग झुळुक एक अवखळशी गिरकी घेई, अलवार स्पर्श जळअंकी करुनी जाई नाच-या लहरि मग धावत कांठाकडे, शतकंठांचे जणु स्वरावलिस सांकडे....

Tuesday, October 8, 2013

सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद

यांतल्या प्रत्येक ओळींत तुम्हाला नजीकच्या भूतकाळांत आपल्या आजूबाजूला घडलेल्या आणि आपली मन सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद दिसतील..मनांत साकळलेले प्रष्ण दिसतील.. सरणार कधी सण प्रभो तुझे रे, उतरणार ही नशा कधी चिरडु-चेंगरुनी मरणाची अन्, फिटेल कां हो हौस कधी देवदर्शनोत्तर अपघाती मृत्युभेट टळणार कधी.. साधुसंत बेगडी तयांच्या, बेडि करी पडणार कधी.. माणुस असुनी श्वापदवृत्ती, अंतरिची त्यजणार कधी.. तेलाने जगण्याच्या ज्योती निमालणे थांबेल कधी..

Wednesday, June 12, 2013

जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं

गीतरामायणाच्या या चित्रमुद्रणा दरम्यान, रोज उशिरा, काम संपल्यावर, चित्रकुटीत म्हणजे बाबूजींच्या पुण्यांतल्या घरी भोजनमैफल रंगायची बाबूजीं बरोबर, श्रीधर, सुधीर(मोघे), श्रीकांत पांरगांवकर, केशव बडगे, प्रसिद्ध संगीतकार रामभाऊ फाटक, अजित सोमण अश्या नामचिन व्यक्ती असायच्या आणि मला सुद्धा त्यांत सहभागी करून घेतलं जायचं. तो काळच असा होता, कौटुंबिक जिव्हाळा, नाती, प्रेम, आपुलकी वात्सल्य जपण्याचा. मग गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगायचा. मग बाबूजी आणि रामभाऊंचे वाद वगैरे गम्मत झाल्यावर ‘आमटी आणि ताक यांच्या समप्रमाणांतल्या मिश्रणाने तयार होणारा ऍमटॅक् हा पदार्थ उत्कृष्ट असून जागतिकस्तरावर तो अफाट लोकप्रिय होवू शकतो, आणि आपण उपहारगृह सुरू केल्यावर, होच नांव त्याला देऊ !’ या बद्दल त्यांच एकमत व्हायचं. अशाच एका रात्री, कॅन्टोनमेंट् भागांत, रामभाऊंच्या एका मैत्रिणीकडे जायच ठरलं. त्यांचे पति सैन्यदलांत कर्नल होते. दूरदर्शनच्या ऍंम्बॅसडर् मधे आठ अधिक एक चालक बसून इप्सितस्थळी पोचलो. साडे अकरा.. फक्त.. वाजले होते..यजमान युगुल घरी नव्हतं. मग ते येईपर्यंत तिथंच बंगल्याच्य हिरवळीवर बसून, बरोबर नेलेलं लिंबूपाणी, नारळपाणी, ताक अश्या पेयां(?)बरोबर चकल्लस सुरू झली. यजमान आल्यावर, आणखी रसद आली..पिठलंभात, पापड अश्या बेतानंतर, परतून पुण्यांत पोचायला अडीच वाजले. पहिलं घर श्रीकांतचं. तो उतरला आणि घराच्या दिशेनं निघाला.. दरवाज्यांत उभी होती, पांरगांवकर-अर्धांगिनी प्रभा.. रणचंडीचा अवतार धारण करून, ‘काकतकर कुठैत ?’ ती गरजली आणि मी डुलकींतून खडबडून जागा झालो. माझ्या पत्नीनं.. निरंजनानं काळजीपोटी विजय देवांना फोन् केलावता. ती दोघ नुकतीच पांरगांवकरांकडे येऊन गेलिवती..मला शोधायला.. मग काय ? घरी गेल्यावर, वाट पाहात थांबलेल्या विजयरावांनी कान पिळून, एकंदर रागरंग बघून, काढता पाय घेतला आणि मग.. नच सुंदरि करु कोपा दे ना मज.. वगैरे मनधरण्या, पुरुष सुलभ... अश्या खूप गमती.. पण काम पण खूप झालं. ते दिवस जणू की होते पिंपळपानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानी दृश्यमान हर क्षणी मज अप्रुप होते सगळे जणु की स्वर्ग समृद्ध जाहला नूतन जीवन सर्ग कधि सामान्यातच असामान्य प्रकटले कधि कुणी फाटका वैश्विक उक्ती बोले कधि प्रचिती येई बौधिक श्रीमंतीची कधि विद्वज्जड आढ्यता, कर्मकांडांची तो सुहासिनीचा केवळ आशीर्वाद आधारा स्मरुनी कृतज्ञ अन् कटिबद्ध राहील सदा जाण तिची.. माझा शब्द मनरंजन निर्मळ, विशुद्ध.. आम्हा वेद नियती सगळांना सगळच भरभरून देते असं नाही. स्नातकोत्तर, पुढच्या मार्गक्रमणासाठी, दिशा मिळण्याच्या प्रतीक्षाकालावधी दरम्यानच्या दिवसांत, मला कधी स्वप्न सुद्धा पडण्याची सुतराम श्यक्यता नव्हती, की मी, सरधोपट मार्ग चोखाळणार-या मुंबईतल्या एका कुटुंबांतला मुलगा, चित्रवाणी नामक एका, त्या काळांत फारशा परिचित नसलेल्या माध्यमांत, माझं भविष्य घडविणार आहे.. जाउ दे पुढे, ज्यांना भरभरुनि मिळाले मी पाहत आहे मागे कितिजण उरले जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं बाकींची आलिमिळि गुपचिळीच राखेनं..

Tuesday, June 4, 2013

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना असलेल्या राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या.. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही.. नसावा बहुधा !! १..शांपूच्या बाटलींतल्या संपृक्त द्रावानं तळ गाठला, की आम्ही त्या बाटलींत थोड पाणी घालून, ते विसळंण, पुनःपुन्हा वापरतो. काय करणार.?. कांटकसर अंगवळणी पडलिये नां..! २..दंतमंजनार्थ मलम..Paste.. तेंव्हाच आम्ही संपलं असं म्हणतो, जेंव्हा, पत्र्याचं आच्छादन पिळून, खालपासून वर पर्यंत गुंडाळून सुद्धा त्यांतून कांहीही फलित मिळत नाही तेंव्हा ! ३..मी जेंव्हा भाजी बाजारांत जावून, १००य१५० रुपयांची भाजी खरेदी करतो, तेंव्ह त्या भाजीवाल्या/ली कडे, आल्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या..दोन कां होईना.. कांड्या, कढीपत्ता आणि एकदोन मिरच्या, ‘तशाच’, म्हणजे ‘फुकट’, पिशवींत टाक अशी मागणी करतो.. तो मसाला माझ्या जन्मसिद्ध हक्काचा असल्या सारखा.. ४..मला कांही कारणानं, समारंभांत, आप्तेष्ट, स्नेही आदी मंडळींनी, प्रेमादरानं दिलेल्या भेट वस्तू, मी संधी मिळतांच, कुणा नवपरिचिताला, किंवा माझ्यासाठी फारशा महत्वाच्या नसलेल्या व्यक्तीला, त्याच्याकडच्या आमंत्रणानंतर, नाइलाजानं, नाखुषीनं जावून, व्यवस्थीत पुख्खा झोडून (नाइ’लाजा’नं ?), मजकडून भेट म्हून प्रदान करतो. आणि साज्या निर्लज्जपणाचा कळस, कहर म्हणजे, मी त्या मिळालेल्या भेटवस्तूचा चकचकीत आच्छादन-कागदसुद्धा पुनर्वापर करींत, कांटकसरीच्या संस्कारांची बूज राखतो. ५..शोभेच्या वस्तू ठेवायच्या, कांचांची पारदर्शक दारं असलेल्या कपांटांत आलेल्या पाहुण्यानं डोकावून, त्यांतल्या, मी हौसेनं खरिदलेल्या चिनी मातीच्या, कषाय-पेय-धारक-संचाचं कौतुक करून, किंमत विचारली, की मी मनोमन सुखावून, खरिदल्या किमतीच्या दीडदोनपट बढाके दाम सांगतो. पण त्या पाहुण्याला हे माहीत नसतं की मी स्वतः त्यांतून चहा-कॉफी वगैरे कधीच पीत नाही. हाः..हाः..हाः.. फुटलं तर नुस्कानी नको रे बाबा.. ६..घरांत कांही कार्य आहे.. अलंकार घडवून पत्नीला सुखावून, तिचं कौतुक भरलं स्मितहास्य झेलंत, कसचं, कसचं म्हणत मान ताठ करायची आहे. तेयासाठी सराफकट्ट्यावर जावून सुवर्ण खरेदी करायची आहे.. असं कांही नसतांनासुद्धा मी सोन्याच्या आजच्या भावाची चिंता करीत बसतो. ७..माझ्या चित्रवाणीसंचाचा, किंवा दृक्श्राव्य-तबकडी-दर्शकाचा दूरनियंत्रक.. म्हणजे Remote हो..जोंव्हा मला सहकार्य करेनासा होतो, तेंव्हा मी तो, खिळखिळा होईस्तो, सर्व बाजूंनी ठोकतो, आपटतो, उघडून, उगाचाच, त्यातलं तंत्रज्ञान अवगत असल्याच्या आविर्भावांत, त्यांत पारंगत असल्यासारखा आंतले भाग उचकटत बसतो, पण साधी गोष्ट की त्याचा ऊर्जा स्रोतसंच..Battery of cells..बदलंला पाहिजे हे माझ्या लक्षांत येत नाही, किंवा लक्षांत येवऊनसुद्धा अवलंबकृती करीत नाही.. खिशांतले चार चव्वल खर्ची पडतील म्हणून.. ८..कधीकाळी, बायको-मुलांनी फारच हट्ट केला तर.. म्हणजे मुलांचा हट्ट आणि भार्येचं डोळे वट्टारणं.. चौपाटीवर जावून भेळ-पाणीपुरी खायचा बेत करतोसुद्धा मी, बरंका,, पण पाणीपुरी खावून झाल्यावर, दोनचार डाव मसाल्यांचं पाणी ढोसल्यावर, हायहुई करीत, तिखट लागलं म्हणून, भेळवाल्या भय्याकडे, साधी कोरडी पुरी, फुकट मागायची सवयच लागली आहे मला एका साध्या पुरीचे कुणी पैसे देतं कां सांगा बरं मला... आणि जर कां भैयानं ती नाकारली तर मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते, मी बरोबरच्या कुटुंबियांना शरमेनं मान खाली घालावीशी वाटेल, अशा पद्धतीनं आकांडतांडव करतो.. आजूबाजूला गर्दी जमेस्तो.. ९..कुणाकडचं, दुपारच्या भोजनाचं जर निमंत्रण मिळालं मला, तर यजमानाला, अतिथी पूर्ण समाधानानं भरपूर, यथेचित जेवला हे समाधान मिळावं या प्रमाणिक आणि शुद्ध हेतूनं, त्यादिवशीच्या सकळच्या नाश्त्याला फाटा देतो, नि जवळजवळ उपाशीपोटी पोहोचतो इप्सित स्थळी.. १०..माझे सदरे, जुने दिसायला लागल्यावर, मी ते शय्याभूषा म्हणून वापरायला सुरुवात करतो. ते आणखी जुने वाटायला लागल्यावर, मी, खास होळी, धुळवड, रंगपंचमीसाठी म्हणून, बासनांत बांधून ठेवतो.दोनचार वर्षांनी मग जेंव्हा ते फारच जीर्णशीर्ण दिसायला लागातांत, तेंव्ह, नाइलाजानं, अत्यंत जड अंतःकरणानं, पत्नीच्या हवाली करतो.. पोच्छ्या म्हणून वापरायला.. ११..तसा पिझ्झाबिझ्झा घरपोच मागवायला मला जिवावरच येतं. पण काय करणार, मुलाभाळांसाठी करावं लातं ना कधीकाळी, सठीसमाशी..त्यांतल्या त्यात एक, माझ्या कांटकसरीच्या संस्करांना पूरक गोष्ट म्हणजे, त्या वितरणकुमारांना, ‘वरदक्षिणा घ्यायला बंदी असते म्हणे.. मग मी खूप आग्रह करतो त्यांना प्रेमपूर्वक.. नशीब, घालून दिलेला नियम तोडणारा, त्यांतला एखादा भेटला नाहिये मला.. नाइतर पंचाईतच नां.. मग आतां तो अगदीच नाहा नाही म्हणतोय अशी खात्री झाल्यावर, मी कोडगेपणानं त्याच्या मागं लागून, चारपांच, आमचुरा आणि मीर्चीच्या भुकटीच्या पुड्या पदरांत पाडून घेतोच.. दुस-या दिवशई सकाळी, मॅगीवर छिडकून, ती आणखी चविष्ट करायला.. आणि... छिद्रान्वेषी लोक कितीही आणि कांहीही म्हणोंत.. कांही गोष्टी म्हणजे, पुणेकरांची मक्तेदारी आहे असं मुळीच नाही हं..! उदाहरणार्थः दुधाची प्लास्टिक् पिशवी विसळून ते पाणी, मूळ दुधांत मिसळणे, आदल्या दिवशीच्या पोळ्या कुस्करून, त्यांत तूप-साखर किंवा तूपगूळ घालून त्याचे छान लाडू करणे वगैरे. हे सगळ तर आम्ही करतोच, पण तुम्हाला सांगतो, माझी आई दोन लाजवाब पदार्थ करायची.. छान, बिनडागाच्या, केळीच्या सालांची, डाळ घातलेली भाजी आणि वांगी, भोपळा, भेंड्या यांची देठं चिरून, त्यांत दही, तिखट, मीठ घालून केलेली देठी.. आम्ही उदबत्ती पाण्यात भिजवून लावतो.. जास्त वेळ टिकते.. अमृतांजनाच्या किमती वाढल्यापासून, कांही दुकानदारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ आम्ही, त्याला दुवा देत, घेतो.. म्हणजे, उघड्या बाटलींत बोट घालून त्याला लागलेलं अमृतांजन कपाळाला चोळून घ्यायचं.. फक्त एक रुपयांत.. हे सगळ आम्ही कां करतो..? विनोद निर्मिती करायची म्हणून.. ? गैरसमज, मनांतून काढून टाका..! आज आमच्या सारख्या सर्वसामान्यानं, असा निगुतीनं संसार केला नाही, तर मरण्यासाठी विष विकत घ्ययलासुद्धा दमड्या उरणार नाहींत. जनहो..!!

Thursday, May 23, 2013

रमेश गोविंद वैद्य

रमेश गोविंद वैद्य संस्कारानं मित-मृदुभाषी, सहृदय, प्रसन्नचित्त, शिक्षणानं कायदेतज्ज्ञ वकील, व्यवसायानं जाहिरात संकल्पक, लेखक, वृत्तीनं सक्षम कवि-रुबाईकार असा आमचा मित्र रमेश गोविंद वैद्य..याचा परिचय मला करून दिला, आणखी एका सुहृदानं.. १९८०-८१ मधे बहुधा.. २३, मुकुंद निवास, डी.एल्. वैद्य रोड, दादर, या माझ्या मुंबईंतल्या वास्तव्याच्या ठिकाणी, ८० ते ८७ हा सातवर्षांचा कालखंड, आम्ही सर्वांनी श्रवण, दर्शन, घ्राण, रसना आदि ज्ञानेंद्रियांनी, म्हणजे त्वचेचा सहभाग फक्त रोमांच जाणिवेपुरतांच हं..अक्षरशः भोगलाय ! आम्ही म्हणजे कोण माहीत आहे..आजकालचे सगळे प्रथितयश.. डेबू देवधर, सुधीर मोघे, त्या काळांत माझ्याशी.. कां कुणास ठावकी.. पण खूप जवळीक साधून असलेला, म्हणजे किमान तसं अगदी बेमालूमपणे भासविणारा सुधीर गाडगीळ, अरविंद हसबनीस, चंद्रशेखर गाडगीळ, विलास आडकर आणि शिवानंद पाटील..या यादींतले तीघे आतां हयात नाहीत पण ते लौकीक जगासाठी.. आमच्या मनांत ते रुजलेत, वाढलेंत बहरलेंत आणि बरसलेंत.. शब्द-स्वरांच्या स्नेहमयी वर्षेंत चिंब भिजवीत.. अक्षरशः काव्यशास्त्रविनोदाचं वारं रोज अगदी पंचपंच उषःकाली..म्हणजे थोडक्यांत सगळ्या हस्ती जागृतावस्थेंत येवून माणसांत आल्यावर..वाहायला लागायचं.. मग जाऊन येऊन, सुरेश वैद्य, आनंद मोडक, श्रीकांत पांरगांवकर, चंदू काळे, सदानंद चांदेकर अणि पुण्यातले अनेक कलाकार.. उभरते, प्रथितयश.. स..ग्गळे. अगदी आदरणीय, सुप्रसिद्ध, जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त सुद्धा एका रात्रीचा निवारा घेवून गेलेंत २३ मुकुंद निवासांत.. आणि विख्यात संगीतकार रामभाऊ कदम.. माझी पेटी घेवून, रात्री ११ ते पहाटे तीन पर्यंत.. लिहायला लागलं तर एक लठ्ठमुठ्ठ कादंबरी होईल या वास्तूवर.. असाच एक ‘दिवस’ रमेशला घेवून आला आमच्या त्या मठींत.. आणि, उंबरठा ओलांडल्या क्षणापासून रमेश मग आमच्या परिवारांतला एक होवून गेला. जशी सुधीरनं.. मोघेंच्या हं.. शब्दधून तीथं लिहिली, एका हिंदी चित्रपटासाठी गीतं रचली संगीतबद्ध केली, डेबू नागीण किंवा खानदान च्या छायाचित्रणांत व्यस्त असायचा, चंद्या गाडगीळनं बाकीशब्द आणि कांचनसंध्या स्वरांकित केली, तशाच अनेक रुबाया किंवा अन्य काव्यप्रकारांच्या ज्योती, रमेशनं तिथं उजळल्या पाजळल्या.. त्याच दरम्यान त्याची ही कादंबरी, व्हिक्टोरिया टर्मिनस्, महानगर मधून प्रकाशित होतं होती. सगळ्यांना एकत्र सवड असेल तेंव्हा तो, क्रमशः प्रसिद्ध होणारं ते लिखाण वाचून दाखवीत असे. ‘यह मुंबइ मेरि जान’.. देणारी आणि चुकलांत माकलांत तर घेणारी सुद्धा.. अशा या मायामोहिनीचे नखरें आणि तिच्या त्या गुबगुबींत पंज्यामधे लपलेली नखं.. दोन्हीचं यथार्थ, रोमांचक वर्णन, रमेश ऐकवायचा आणि आम्ही अंतर्मुख व्हायचो.. कारण आमच्यापैकी प्रत्येकजण, पोटार्थी, रोजमरा की जींदगी जगण्याचा एक अविभाज्या भाग म्हणून.. त्या चरकांतून घाम गाळत थकलाभागला घरी.. त्या मठींत येत होतां..त्यामुळं ब-या जवळच्यांच्या जगण्याचा जणू आरसाच असल्याचा भास व्हायचा ऐकतांना.. रमेशला मी कधी, खिन्न, दुःखी, खंतावलेला पाहीलाच नाही इतक्या वर्षांत..कायम हसतमुख, प्रसन्नमुद्रा. पण कधीकधी अंतर्मुख, तंद्री लागलेला मात्र अनेक वेळां पाह्यलय त्या काळांत..ही तंद्री बहुतांशी अध्यात्मिक भासली मला.. उगा सृजनाचा आव आणलेली कधीच नव्हती ती.. कारण त्याच्या रचना सहजप्रसवा असतांत.. आयुष्याचे चढउतार, अनुभव, निरीक्षणं यांचं शब्दरूप असलेल्या.. या रचनांनी जशी मला भुरळ पडली ,तशीच, एका अतिशय संवेदनशील आणि कवितेच्या शब्दांमधल्या अध्याऋताची विलक्षण जाण असणा-या चंद्य़ाला.. चंद्रशेखर गाडगीळलाही पडली आणि रुबायांना अप्रतिम स्वरकोंदणं मिळाली. त्या काळांत, मुंबई दूरदर्शनची मेट्रोवाहिनी...म्हणजे दुसरा मनोरंजन-स्रोत.. सुरूं झालिवती. त्या वाहिनीसाठी मी या, प्रगल्भ पण उपेक्षित कलाकाराच्या रुबायांवर बेतलेले दोन कार्यक्रम केले. तसा वरकरणी.. आणि अंतःकरणीसुद्धा खरं तर..अत्यंत साधा सीधा, अगदी लक्षमणच्या कॉमन् मॅन इतका, फाटका दिसणारा हा माणूस, स्वरचित रुबाया सादर करायला लागाला की, जितक्या अलवारपणे तो एखाद्या छोट्या समूहाला मोहून टाकतो, तितक्याच सहजतेनं, पहिल्या दहा-बारा मिनिटांतच, कुठल्याही जाणकार वयोगटाच्या, पांचशे हजार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला लागतो. आणि मग, रुबाई घाटाला साजेसे विविध विषय, प्रेमापासून प्रेतापर्यंत, भोगापासून वैराग्या पर्यंत, आणि कळ्यंपासून पुतळ्यांपर्यंत, कधी तिरकस फटकेबाजी करीत. कधी निष्ठुर सत्य सांगत आपल्याला अंतर्मुख करतांत, आणि प्रसंगी खळखळून हसायलासुद्धा लावतांत.. हे सगळ आज लिहायचं निमित्त म्हणजे, व्हिक्टोरिया टर्मिनस् चं वाचन होतय.. पुण्यांत. आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दप्रपंच.. हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा आमचा हा आनंदी निरागस, निर्व्याज, निरपेक्ष जिवलग सखा, यंदा त्र्यहात्तरींत प्रवेश करतोय.. या वळणावर त्याला, निरामय आरोग्य, अभिष्ट चिंतून आणखी खूप, गूढार्थी शब्दलेणी, त्याच्याकडून पुढच्या काळांत मिळतील, अशी खात्री बाळगूया ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Friday, May 17, 2013

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २)

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २) गेल्या सपताहांत आपण, नकारात्मकतेच्या व्याधींतून बाहेर पडण्याच्या, पांच सोप्या युक्त्या दृष्टीपथांत आणल्या, त्यांची दखल घेतली.. आज ऊर्वरित पांच उपाय, उपचारांचा विचार करूं.. ६..राहून गेलेल्या आणि करण निकडीचं असलेल्या कामांची यादी, स्मरणपत्र म्हणा हवं तर.. जमेल तिथं, घरांत जागोजागी, लावा.येताजाता तुमच्या नजरेस ती वारंवार पडेल याची काळजी.. नाही नाही,, खात्री वाटली पाहिजे. जेवणाचं मेज, शीतपेटी, आरसा, बेसिन वरचा, कपाटावरचा, प्रसाधन मेजावरचा.. ज्याला आपण मराठींत, ड्रेसिंग् टेबल् म्हणतो.. दरवाजामागे, पुढे. वाहनाचं इप्सित-स्थल-मार्गक्रमण-सुविधा चक्र.. म्हणजे आपलं स्टिअरिंग् व्हील् हो... अशा या कांही जागा तुम्हाला, सहज सुचल्या म्हणून सांगतोय.. काराण नजरेआड ते मनापल्याड गेलंच म्हणून समजा.. म्हणून हा खटाटोप. कामं ठेवा नजरेसमोर अन् वावरा बिनघोर.. जोडीला, गंमत म्हणून, ती कामं व्हायच्यी आधी आणि नंतर तुमचा चोहेरा, अनुक्रमे, कसा होता आणि होईल हे दर्शविणारी व्यंगचित्र लावा..पहा ती तुम्हाला आपोआप उत्तेजना देतांना तुमच्या ओठांवर एक हलकी स्मितरेषा फुलवतांत की नाही ते.. ७..मित्रमंडळींबरोबर कुटुंबियांसमवेत, तुमच्या, नजीकच्या भविष्यांतल्या उद्दिष्टांबद्दल सतत च्रचा. निचार विनिमय, सल्लामसलत सुरूं ठेवा..हेतू जाहीर करा..त्यामुळं आपोआपच तुम्हाला ते साध्य करण्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागेलं, आणि त्या दिशेनं तुम्ही वाटचाल करूं लागाल. स्वतःबरोबर एक कार्यपूर्तता-काल-दर्शक करार करा, त्याच्या प्रती मित्रमंडळी कुटुंबिय यांना किंवा अन्य कोणीही, जे तुमचा उत्साह वृद्धिंगत करूं इच्छितांत, अशा सर्वांना वाटा. त्यापैकी झालेल्या कामांबद्दल, त्यांना मधूनमधून कल्पना द्या, अभिप्राय घ्या.. आणि कार्यपूर्तीसाठी स्वतःलाच कालमर्यादेचं रिंगण आखून द्या. ८. स्वतःच्या नाउमेदीला कुरवाळत बसूं नका. जेंव्हा जेंव्हा निरुत्साही वाटेल, तेंव्हा तेंव्हा त्या जाणिवेला लगाम घाला. सर्वसामान्यतः, ही एक सवय असते की आपले प्रष्ण सुटण्यात अडचणी येत असतील किंवा उत्तर मिळत नसेल तर त्या प्रष्णाच्यामानानं आपण स्वतःला अल्पकुवतधारक समजायला लागतो. हा अनुभव आपणापैकी बहुतेक सर्वांनी कधीनाकधीतरी घेतलेला असतो. त्यावर तोडगा म्हणजे.. मनातल्या नकारात्मकतेला तीलांजली देवून, त्यांच्या जागी सकारात्मकतेच्या बीजांची पेरणी करा. स्वतःला बजावा की हे प्रष्ण आपल्याला वाटतायत त्यामानानं खूपच क्षुल्लक आहेत. उदाहरणारथ, मला हे कसं जमणार.. मी यांतनं कसा बाहेर येणार.. असं रडत बसण्या ऐवजी, हे करणं मला अत्यंत आवश्यक आहे.. एकावेली एक अशा छोट्याछोट्या क्लृप्त्या शोधत मी ते कसंही करून मिळवेनच.. असं घोकत रहा. ९.. दीर्घ श्वास घ्या.. रात्री शांत झोप घ्या.. सकाळी उठून आन्हिकं उरकल्यावर एक छानपैकी Shower घ्या. आणखी एक युक्ती माहीत आहे..ब-याच वेळा कामास येते प्रातःकालीन वैचारिक गोँधळांत.. आदल्या रात्री, मेंदूची नैराश्यदायी विचारांनी चाळण केली असताँना, पोटाच्या स्नायूंची, श्वासाबरोबर, संथपणे, आंतबाहेर हालचाल करीत, योग सदृश व्यायाम करा. म्हणत रहा.. मी आता यानंतर मस्त ताणून देणार आहे. पूर्ण विश्रांती घेतल्यावरच उठणार आहे. उद्या जागं होतांना, या उद्वेगजनक मनावस्थेंतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी, मी प्रसन्न, ताजातवाना आणि उत्साही, गतीशील मानसिकता घेवून डोळे उघडलेले असेन. मग स्नानासाठी अंगाला जलधारांचा स्पर्श झाला की हळूहळू आपोआपच विचारांना सकारात्मकता, अडचणींतून सुटकेचं तंत्र, समोर उभ्या ठाकलेल्या प्रष्णांची उत्तरं.. सगळं माझ्याकडूनच प्राप्त होईल.. हे सगळ अनुभवा, आणि कोडी सुटल्यावर आणि कोँडी फुटल्यावर हा मंत्र तुमच्या मनोव्याघिग्रस्त आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणींना देवून त्यांचा दुवा घ्या १०.. वाणीची, उच्चाराची शक्ती, ताकद, बलं फार मोठं असतं. मरा मरा, हे म्हणताम्हणता वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालाच की नाही...शब्दांच्या, वाक्यांच्या, साध्यासाध्या उच्चारांत, अनुक्रमे अक्षरांवरच्या, शब्दांवरच्या आघातांवर बदल करून बघा.. दूर जाणारा एखादा मागे वळून पाहांत जसा परत फिरतो तश्या सकारात्मक संधी तुमच्या भवती आपोआप गोळा व्हायला लागतील. अडचणींच्या विचारांभवती रुंजी घालण्यांत, त्यांना कुरवाळण्यांत अमुल्य वेळ दवडण्यापेक्षा, लाभाचे हिशेब करीत वृद्धीची गणितं मांडण्यांत व्यस्त रहा.. या छोट्याछोट्या बाबी तुमच्यांतल्या नकारात्मकतेला बाहेरचा रस्ता दाखवितांना, सकारात्मकता रुजवतील आणि तुम्ही, नाइलाजानं, नकळत जोपासत असलेली स्थितिप्रियता लोप पावून, ती गतिशीलतेंत, उपक्रमशीलतोंत परीवर्तित होईल. तुमची विचारशक्ती हे एक कसब असल्याप्रमाणे तुम्ही जोपासत रहा, कुशाग्रता वाढवा, आणि त्यांवर स्वर व्ह एखाद्या कुशल योद्ध्या सारखे. तुमचा सकारात्मक प्रवेग वाढल्यावर तुमची ऊर्जा आपोआपच पुनरुजेजीवित होइल आणि तुम्ही तुमच्या मनाचा, वागणुकींतला तोल सहजगत्या पुनर्प्राप्त कराल.. ..इति

Monday, May 13, 2013

दशसूत्री.. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत

दशसूत्री उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत कधीकधी आपल्याला खूप थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं, किंवा उदास, एकलकोंड वगैरे वाटायला लागतं. पण तस वाटल तरी काळजी करण्यासारख कांही नसत त्यांत. हे सगळ जगण्याचा, जिवंतपणाचा भाग असतो.. एवढच नव्हे तर ते सगळ म्हणजे जिवंतपणाचा पुरावासुद्धा असतो. कारण, मी मागं एकदा नमूद केलय तसं.. सुखं वाटावी घरोघरी दुःख आपल्या गांठीच बरी.. त्यामुळ आपण ते ओझ वागवत हिंडत असतो आणि स्वतःला उदासवाण, केविलवाण करून घेत असतो वारंवार..आयुष्य लाटांसारखं असतं. त्यामुळं त्याला चढ-उतार अर्थातच असतांत.. कधी पुळणीवर लोळण तर कधी नभाकडे झेप.. नाही कां.. कुठे आणि कुणाचं जिणं चढ-उताराविणा आहे.. अगदी रावा पासून रंका पर्यंत.. सगळ्यांचीच एक गत.. सुटका नाहीच.. कितीही किंमत मोजा.. कधीकधी असं वाटत असेल तुम्हाला, की आतां मनाची उभारी, उदासी झटकून कामाला लागणं वगैरे अशक्यप्राय गोष्टी आहेत. पण असं वाटलं तरी खचून जावू नका, कारण असे तुम्ही एकटेच नाही आहांत..आपण सगळेच समवेदनांकित आहोत. जोएल् सिम्स् म्हणतांत की, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून आणि अभ्यासांतून, मी अश्या निराशाजनक क्षणांमधून बाहेर कसं पडायचं याचं एक तंत्र विकसित केलं आहे. मी परत उभारी धेवून, ऊर्ध्वगतिशील आणि क्रियारत व्हायला शिकलो आहे. तर.. उत्तिष्ठ, जागृत, प्राप्यवरन्निबोधित हे ते दहा उपाय.. लक्षांत ठेवा ही एक तात्पुरती अवस्ता असते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असकांत. तुम्ही सद्धा या नाण्याच्या खालच्या बाजूला पाहता आहांत असं समजा. पण याचा अर्थ असा थोडाच आहे की त्याला वरची बाजूच नाही तुमची चलनगती आणि प्रेरणाबल जेंव्हा मंद वाटेल तुम्हाला, तेंव्हा तुमच्या राखीव ऊर्जेची गुंतवणूक करा आणि परिस्थिती बदलत असल्याची जाणीव अल्पकाळांतच तुम्हाला व्हायला लागेल. जिवावर आलेलं असतांना सुद्धा उठा आणि मस्त फेरफटका मारून या. थकलांत तर कुणा मित्राला दूरध्वनी करा. पहा तुमचा उत्साह आणि उमेद परतते की नाही तें.. आपली एक भ्रामक समजूत असते की, आपल्या जिवाला तेंव्हाच बरं वाटत, जेंव्हा कांहीतरी भरघोस वैयक्तिक लाभ होतो. पण खरं तर तसं नसतं. पहिलं एक पाऊल पुढे टाकून बघा तर खरं..मग पुढच. आणि मग हळूहळू अंतर कापत वाटचाल सुरू करायची.. सुरू ठेवायची.. ज्या दिवशी चित्तवृत्ती उल्हसित नसतील, त्या ताळ्यावर आणायच्या असतील त्या दिवशी. सुरुवात करा थोड्याश्या व्यायामानं किंवा, रोजच्या आन्हिकांच्या निमित्तानं शारीर हालचालीनं मग आपोआपच तुम्ही स्वतःला बजाऊ धजाल.. त्या काशीनाथ घाणेकरांनी गायलेल्या चित्रपटगीतांतल्या सारखं.. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आणि चमत्कार झाल्यासारखं, हळूहळू तुमची व्यायामची गोढी वाढायला लागेल अन् वृत्ती तजेलदार, प्रफुल्लित होतील..मनोगतींला एक प्रकारची प्रेरणा मिळेल.. आणि हे करीत असतांना एका वेळी एकच उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवा, आणि त्यावरच लक्ष केंन्द्रित करा. कारण कधी कधी, कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित असं म्हणत, आपण एकाच वेळी अनेकविध कामांचा विचार, प्रक्रिया, कृती यामधे गुंतल्यावर, एक ना धड, भाराभर चिंध्या या (अ)न्यायानं बोजवारा उडतो आणि मग मनाचिये गुंथी गंफियेला शेला तितरभितर होतो, बिघडतो, आणि थकवा जाणवायला लागतो..आपणच ओढवून घेतलेला, शिंगरू मेलं हेलपाट्यानं.. तसं.. कांही विशेष नसतं बरं कां हे.. अगदी सग्गळ्यांच्या बाबतींत, हे कधीना कधीतरी घडतचं... या सगळ्यावरचा एक जालीम उपाय म्हणजे, एकावेळी एकाच प्रकल्पावर काम करा. शांतपणे आणि उत्तम रीतीनं तो पार पाडा. त्या यशामुळं आपोआपच, तुमचा उत्साह द्विगुणित होईल आणि तो ऊर्जास्रोत तुम्हाला पुढच्या प्रकल्पाला पुरेसा उत्साह, उमेद, बल.. पुरवेल. नाउमेदीच्या अशा काळांत, जिथं कांही सकारात्मक काम, समारंभ सुरू आहे अशा एखाद्या मित्राकडे, आप्तस्वकीयाकडे गेलांत तर तुमच्या मनाची जड अवस्था नकळत गळून पडेल आणि हलकं वाटायला लागेल. काळजी एकच घ्या की ज्या स्नेह्या किंवा आपताकडे जाल, तो स्वतः उमद्या स्वभावाचा आणि अगदी आगंतुकम्हणून गेलांत तरी स्वागतोत्सुक असायला हवा. नाहीतर त्याचा आंबट चेहेरा बघून तुमचं तोंड आणखी कडू व्हायचं.. आणि मदत मागा.. संकोच कसला करता.. अशा क्षणी निकटवर्तियांनीच एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हायचं असतं..महाजालांतल्या एखाद्या संकेतस्थळांतूनसुद्धा मित्रत्वचे, सुखदायी सल्ले मिळून जातांत कधीकधी..अवलंब करून बघायला काय हरकत आहे.. नाउमेदी अवस्थेंत, नकळत मन सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतं. आणि हेच कधीकधी तुमच्या निरुत्साहाच मूळ कारण होतं. विचारांची गाडी रुळावर आणा आणि विचारप्रवाहाला अशा ठिकाणी वळवा की जिथं उतार.. आणि उतारा सुद्धा.. मिळेल आणि आपोआपच गतिमानता प्राप्त होईल.. सव्तःचा स्वतःशी संवाद वाढवा अगदी अंतर्मनांत वादावादी, संघर्ष झाला तरी चालेल.. घर्षण देत ऊर्जेला जन्म..आणि फेकून देतं गारठा.. आखडलेपण.. मी हे नाही करूँ शकत पेक्षा, पहाच तुम्ही मी कसं पैलतिराला लावतो तारू, असं म्हणत रहा.. (क्रमशः)

Thursday, May 9, 2013

वैनतेय

वैनतेय बिन लादेनच्या अल् कायदा या अतिरेकी संघटनेनं.. बलाढ्या अमेरिकेच्या सर्वसामान्य नागरिकांवर, १२ वर्षांपूर्वी, एका सकाळी ऐन गर्दीच्यावेळी लादलेला निर्घृण अतिरेकी हल्ला.. आठवतो..? हा प्रष्ण विचारणंच मुळी, त्या घटनेन हळव्या झालेल्या, उद्विग्न, उध्वस्त काळजांवर मानसिक अत्याचार आहे.. विश्वातल्या, उत्क्रांतावस्थेंतल्या माणसाच्या इतिहासांतला, ९ सप्टेंबर २००१, हा एक काळाकुट्ट दिवस.. अखेर उत्क्रांती काय, भोगलोलूपतेपोटी, किंवा ऐहिक सुखांमागे धावण्यापुरतीच असते ? त्यापेक्षा जंगली, हिंस्र श्वापद बरी.. त्यांच्यांत सुद्धा एक केवळ क्षुधासंतोषी शिस्त असते..सूड वगैरे अभावानच दिसतो.. त्यांच आक्रमण केवळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणापोटीच असतं..पण, धर्मगुरूंनी दाखविलेली शांततामय सहजीवनाची दिशा, माणुसकीची शिकवण, सर्वसामान्य माणसांसारखा जन्मलेल्या, वाढलेल्या अमानुषांचा समूह, सूडग्रस्त मानसिकता आणि अधर्मांधता या दोन अवगुणांनी पूर्णपणे झाकोळत, जेंव्हा अशी कृत्य करायला सरसावतो, धजावतो, तेंव्हा माणसांतलं पशुत्व शोधण्यापेक्षा, त्या मागची कारणं शोधणं आवश्यक वाटायला लागतं. World Trade Center नावाच्या, अमेरिकेच्या अनेक मानबिंदूंपैकी एक, अशा या इमारतींवर, ९ सप्टेंबर २००१, अमेरिकेंत, सुरक्षाव्यवस्थेला पाचारण करण्यासाठी वापरतांत तो क्रमांक, ९/११, या एका सर्वसामान्य सकाळी कांही क्षणांच्या अंतरानं दोन प्रवासी वायुयानं धडकली.. चालक होते.. स्वप्राणाहुती अर्पणोत्सुक, बिन लादेनच्या आत्मघातकी पथकांतले अतिरेकी.. कडक सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढीत, Men in black च्या तीक्ष्ण नजरांच जाळ भेदीत.. प्रवाशांमधे बेमालूम मिसळत, घुसलेले.. रोजी रोटी कमावण्यासाठी, रोजच्या सारखं, कुटुंबातल्या अबालवृद्धांचा निरोप घेवून वाहेर पडलेल्या कर्त्या-धर्त्या हजारो नरनारींची स्वप्न अक्षरशः धुळीला मिळाली त्या सकाळी.. कांही निमिषार्धांत.. पण.. खरखरं अद्भुत तर पुढेच आहे.. हे वाचा आणु उरांत, मनांत खोलवर रुजवा, जोपासा.. ते आपलेया आयुष्यांतल्या भयाण, भीषण निराशाजनक अवस्थेंतून नुसतं बाहेरच काढणार नाही तर भयमुक्त करीत नवसंजीवनी देईल.. आपल्या सर्वांना, दुस-या महायुद्धांत, संसुक्त फौजांनी, हिरोशिमा-नागासाकीवर केलेल्या अणुबॉंब हल्ल्यानंतर, बेचिराख झाल्यावर सुद्धा, कांही वर्षांतच, अथक् परिश्रमानं, परत पंख उभारून, झेप घेत, जगाच्या नकाशावर एक प्रगत देश म्हणून नांव कोरणारा जपान सुपरिचित आहे.. हे या छायाचित्रांत तसंच कांहीस असणारं, अपकृत्याची चीड, संताप, उद्वेग मनांत खदखदत असतांनासुद्दा, या हल्ल्यांत नाहक बळी गेलेल्या सहस्रावधी नागरिकांविषयी हळहल, करुणा, कृतज्ञता. संवेदना, सहानुभूती या सर्व भावनांच एकत्रित दर्शन घडविणारं स्मारक आहे..अतिर्क्यांनी उध्वस्त केलेल्या, वर्ल्ड् ट्रेड् सेंटर् च्या अवशेषांतून साकारलेलं.. त्या स्मारकाचं नांव आहे,, यू एस् एस् न्यूयॉर्क् अविस्मरणीय, अप्रतिम, अविश्वसनीय... २४००० सहस्र किलो भग्नावशेषांतून हे, नव्या धर्तीच्या युद्धनौकाप्रकारांतलं पांचवं अवाढव्य जहाज बांधण्यांत आलं. आणि त्याचं कामही त्याच्या कणाकणांतून वाहाणा-या कर्तव्यपूर्तीच्या स्रोताचं प्रतिनिधित्व करणारं.. अतिरेकी विरोधी सुरक्षा.. या जहाजावर ३६० नाविक आणि ७०० शस्त्र-सज्ज, प्रतिकार आणि परिमार्जन कुशल लौसैनिक जवान, त्यांच्या जलयानं आणि आक्रमक, वेगवान जलवाहनांसह, कायम स्वरूपी तैनांत असतील लॉसेंजिलिस् राज्यांतल्या अँमाइट् मधल्या एका, भव्य बद्ध पोलाद-ओतशाळेंत, या भगनावशेषांमधले सगळे लोखंडी अवशेष वितळविण्यात आले. आणि य्तातून साकारला गेला या नौकेच्या मुख्य आधाराचा कणा, ज्याला KEEL, म्हणतांत जहाज-बांधणी तंत्रज्ञानांत. ९ सप्टेंबर २००९ या दिवशी जेंव्हा, साच्यामधे, वितळलेलं पोलाद ओतलं जात होतं, तेंव्हा, तितँ उपस्थित असलेल्या, अमेरिकन नौदलाच्या कॅप्टन् केविन् वेन्सिंग् नं वर्णन केल्यानुसार, त्या ओतशाळेंतले उंचेपुरे बलाढ्य शरीराचे कामगार, कर्मचारी, पांपणीकांठावरचे अश्रु कसेबसे आवरत ती प्रक्रिया, अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणानं न्याहाळत होते. त्या सर्वांसाठी ती एक आंतरात्मिक जाणिवेची, कांहीतरी महत्वाची खूणगांठ बांधण्याची घटिका होती.. मी जेंव्हा, ओतशाळेंतून आलेल्या त्या पोलादाला स्पर्श केलां, तेंव्ह माझं सर्वांग शहारून गलं एका वर्णन करण्या पलीकडच्या, विलक्षण जाणिवेनं..ओतशाळेचे प्रक्रिया प्रमुख व्यवस्थापक ज्युनिअर् शेवर्स सांगत होते. त्याच्या, नौदलाची, सुसज्ज अशी एक युद्धनौका या अस्तित्वा पलीकडे असा एक वेगळा आयाम आणि किती महदार्थ निगडित होता याची आम्हां सर्वांना पुरेपूर जाण होतं होती क्षणोक्षणी.. त्यांनी आम्हाला तात्पुरतं बेसावध गाठलं असेल कदाचित, पण आम्हाला ते चितपट, किंवा पूर्णपणे नेस्तनाबूत कधीच करूं शकणार नाहीत..आम्ही परतलो आहोंत.. पूर्ण क्षमतेनिशी.. या जल-पदार्पण केलेल्या विलक्षण स्मरकाचं बोधवाक्य आहे.. 'Never Forget'

Wednesday, May 1, 2013

प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोली

*** मागील भागांत सुरुवातीलाच प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोलीचा उल्लेख पाहिला. या देहबोलीचाच भाग म्हणजे, नर-नारी(सामान्यत:) प्रेमांत पडायच्या आधीची अवस्था..नजरबंदी. आधी नजरबंदी आणि मग स्वामित्वाच्या हव्यासापोटी ’नजर-कैद’ ’ति’ची किंवा ’त्या’ची आधी ’डोळ्यांत वाच माझ्या, तू गीत भावनांचे’ आणि मग लगेच, Wishful thinking, तू नजरेने 'हो' म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ? वगैरे ओघानं आलंच.. असच असतं प्रेम.. अधीर, निलाजरं तरी लाजरं, बावरं, आसुललेलं.. आतां आसुसलेलं शब्दाचा आसु हा अविभाज्य आहे की नाही.. मग त्याची पण तयारी ठेवावी लागते प्रेमींना बरं ! मग शेर बोलायला लागतांत’ बोझ होता जो गमों का तो उठा ही लेते जिंदगी बोझ बनी हो तो उठायें कैसे ।। बोझ, गम.. प्रेमभम्गाचा.. म्हणजे आसूं आलेच की हो ! नैना बरसे रिमझिम रिमझिम पिया तोरे आवन की आस.. वगैरे.. या नजरबोलीचा उपयोग कांही प्राणीसुद्धा, वेगबेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी करतांत, पण आपण सध्यातरी ओहक्त प्रेमभावनेचाच विचार करूंया ! ज्ञानदेवांच्या एका अभंगांत.. देहा लाजिलिये, शब्दा रुसलिये । कासवीचे दूध देवोनिया बुझविले माय ॥ काय सांगो तिचा नवलावो, । महालोभेविण कैसा येतो पान्हाओ ॥ कासवी आपल्या पिलांना, नजरेंतून वात्सल्य, अभय, आश्वासनरूपी दूध देवून त्यांचं संगोपन करते अशी एक समजूत आहे. कूट अभंगांतला हा अभंग मला, प्राचार्य राम शेवाळकरांनी निवडून दिलाव्‌ता, एका अल्बम्‌साठी. त्याच अभंगांतल्या अखेरच्या ओवींत ’आवसेचे चांदिणे’ असा उल्लेख आहे आणि तेच त्या अल्यम्‌चं शीर्षक आहे. त्यांतला हा अभंग मी स्वरबद्ध केलाय आणि देवकी,, देवकी पंडितनं तो गायलाय्‌ ! ते कशाला ? गाईच्या डोळ्यांत नेहमीच एक वात्सल्य मिश्रित करुणा दिसतेच की ! प्रेमाचाच प्रकार.. वात्सल्य.. वत्साप्रत.. छकुल्याप्रत..पुत्राप्रत.. उसळणारा, ओसंडणारा प्रेम-स्रोत..करुणोद्भव पान्हा.. कविवर्य माणिक गोडघाटे तथा ’ग्रेस’ची ओळ आठवा, ’गाइचे डोळे, करुण उभे की सांज निळाईतले’ हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या, ’वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले’ या गीतांतली ही पुढची ओळ. १५ ऑगस्ट्‌ १९८६.. लक्ष्मी क्रीडा मंदिरामधे, आमच्या ’आनण्दघन’ या कार्यक्रमांत, बाळासाहेबांनी ते गीत गायलं. माझ्याकडे आहे त्याची चित्रफीत. चिमुकल्याच्या चिंतेंत, काळजींत अतीव प्रेमापोटी, तन-मनानं एकरूप झालेल्या ’माय’च्या पाठीलासुद्धा डोळे असतांत. मग ते अंगणांत जावू लागलं की तिचा जीव घाबराघुबरा होतो, कुठं पडेल झडेल म्हणून. कवयित्री इंदिरा संतांनी बाळाची वांछा आणि आईच्या जिवाची घालमेल, त्यांच्या बाळ उतरे अंगणी.. या कवितेंत व्यक्त केली आहे... अशा या, तळहातावरच्या फोडासारखं जपून लहानाची मोठी केलेली मुलं जेंव्हां, पिलांस फुटुनी पंख, तयांची घरटी झाली कुठेकुठे, आतां आपुली कांचन संध्या, मेघडंबरी सोनपुटे अशी मोकळ्या आवकाशांत झेपावतांत.. आणि उरतांत मग वृद्धावस्थेंतली दोघं... वर्षानुवएष आनंदाचे, संघर्षाचे, संकटांचे प्रसंग एकमेकांच्या साथीन निभावतांना, मुरलेल्या लोणच्यासारखं प्रेम मिठीमधे कवटाळून. त्यांतून कांही कारणानं तातौरतं दुरावायला लागलंच तर मग कांसाविशी आणखीच वाढते. अण्णा.. अण्णा माडगु्ळकरांनी ती हृदयीची साद किती छान आणलिये, ’ऊन पाऊस’ या चित्रपटांत ! वृद्ध नायिका म्हणते.. ’या कातरवेळी.. पाहिजेस तूं जवळी..’ या जवळिकींतली कोणा एकाची साथ सरते आणि मग आयुष्य रिकामं भासायला लागतं, नजर तासनतास शून्यांत लागत असते. काय असतं तिकडं ? पैलतीर ? त्या तीरावर परत सहजीवनाची आंस घरणारा जीव, ऐहिकांतला सहचर किंवा सहचरी, येरे येरे पावसा.किंवा येगयेग सरी गात उभे असतांत ? पण तिकडं जायचं म्हणजे इथले पाश सोडून, बंधमुक्त होवून, बाकीबाबांच्या शब्दांत त्या मृत्यू-प्रेमामुळं म्हणांवसं वाटतं आंता माझ्या व्यथा कथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषणं, ना ये मला सांगता आणि अखेरीस, विझवून दीप सारे मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया... काय गंमत आहे पाहा. ते सगळं शाश्वत, आयुष्यभर उपभोगून झाल्यावर, मग आपण, ’विश्वामित्री पवित्रा घेवून, ’इदं न मम’ म्हणायला तयार असतो ! कृतघ्न.. मनुष्यसुलभ.. हो की नाही ? या शिवाय इतरही नातेसंबंधातलं ’प्रेम’ म्हणजे उदाहरणार्थ भ्रातृप्रेम.. भरत, श्रीराम यांच्यांतलं...परत गदिमांची आठवण अनिवार्य आहेच, कर्तव्यप्रेमापोटी सिंव्हासन अव्हेरणारा राम, भरताला सांगतोय ’पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे कर्तव्यप्रेम की दैववादामुळं निर्माण झालेली हताशा ? कारण रावणमर्दनानंतर, आयोध्येंत, स्वत:च्या नीरक्षीरविवेकी राजा, या प्रतिमा-प्रेमापोटी सीतेला विजनवासांत धाडणार्‍या रामाचं प्रेम कुठल्या चौकटींत बसवायचं ? मधुराभक्ती..राधेची, माई माई.. तुम बिन कैसे कैसे जिऊम री म्हणणार्‍या मीरेची... हे प्रेमचं.. अतिथीप्रेम.. चिलियाबाळाची आहुती अतिथीचा जठराग्नी विझवण्यासाठी.. प्रेमच ! सत्ताप्राप्तीसाठी कैकयीचं, भरताचं अगदी स्वाभाविक पण फारसं कल्याणकारी जरी नसलं..पुत्रप्रेम...तरी प्रेमचं.. सौंदर्याचं प्रेम(?) स्वत:च्या भोगलोलूपते-लालसेपोटी... रावणाचं.. भिक्षुकाच्या वेषांत आलेल्या देवाधिदेव इंद्राला, शिधा द्यायला आलेली न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा, ही नार करी बेजार, थांबवा दंगा कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात.. अशा अवस्थेंतया माझ्या स्वरचित लावणींतल्या लावण्यवती सारखे निसर्गालंकार लेवून आलेली यजमानीण पाहून, भरती आलेलं शारीर जरी असलं तरी शेवटी प्रेमचं ना ? *****

Tuesday, April 30, 2013

प्रेम.. शब्द एक, पण

प्रेम.. शब्द एक, पण व्यक्त व्हायच्या पद्धती, प्रकार, देहबोली, शब्दकळा अनेक.. कविश्रेष्ठ, ज्ञानपीठ-पुरस्कार प्राप्तकर्ते कुसुमाग्रज त्यांच्या, ’प्रेम कुणावर कराव.’ या गाजलेल्या कवितेंत म्हणतांत त्याप्रमाणे, ’ज्याला तारायचं त्याच्यावर तर करांवच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं.. प्रेम कुणावरही करावं..’ संपूर्ण कविता तर प्रेमाची महती सांगतेच पण त्यांतल्या या एका ओळींत, कविवर्यांवी, केवढा मोठा ’भाव-प्रदेश’ कवळलाय्‌ ? या कवितेच्या अंतिम चरणांमधे तर कुसुमाग्रजांनी ’प्रेम-भावनेचं अधिष्ठानच प्रस्थापित केलय्‌ ! ते म्हणतांत, कारण, प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि.. भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा.. ऎकमेव..... आणि खरच, तस बधितलं तर प्रेम-भावनाच निसर्गानं माणसाला बहाल केली नसती तर ? द्वेष, मत्सर, हेवेदावे, भांडणं यांचा जन्म झालां असतां ? या प्रत्येक भावाचं उगमस्थान म्हणून प्रेमाकडे पाहायला गेलं तर, उदाहरणं, दृष्टांत, रुपक लिहितालिगिता एकेक दीर्घ निबंध होईल.. पन मनाला एक बौद्धिक चाला म्हणुन करून बघा ! गंमत म्हणून.. तर असं हे, सर्वपरिचित, सामान्य अर्थानं जगण्याच्या एका हळव्या वळणावर भेटणारं प्रेम..त्याच्या आगमनाच वर्णन, आमचे कविराज मित्र इतकं छान करतांत.. ते म्हणतांत दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित सोनेरी ऊन येत तसच कांहीस..पाउल न वाजवता आयुष्य़ांत प्रेम येतं... सुधीर मोघेंची ही १९७७ साली ताजीताजी असलेली कविता, मी आजचे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार आनंद मोडककडनं स्वरबद्ध करून घेतलिव्‌ती आणि युवदर्शनच्या गीतसंध्या कार्यक्रमांत सादर केलिव्‌ती ! मराठी पॉप्‌ या शीर्षकांतर्गत. नंदू भेंडेनं ती गायली होती इतकी उत्कटपणे.. क्या केहेने.. आतां या प्रेमानं, अत्यंत प्रेम पूर्वक धमन्यांम्धे प्रवेश केल्यावर मग ’प्रेम-पात्रा’चं प्रणयाराधन.. त्यासाठी आजकाल CCD, तसं त्याकाळी एकांतस्थळं शोधणं होत असे.. शांताबाई शेलक्यांच्या शेलक्या रचनांमधली ही रचना तोच चंद्रमा नभांत तीच चैत्र यामिनी ’एकान्ती’ मजसमीप तीच तूहि कामिनी चैत्र.. वसंतसखा चैत्र.. चित्तवृत्ती खुलवणारा-फुलवणारा, चेतवणारा चैत्र..तापल्या उन्हाच्या कांहिलीला सामोर जातांना, बृक्षांच्या शाखांतून उसळणारा स्राव दृश्यमान करणारा आणि निसर्गाचा हा आगळावेगळा मत्तगंध आभाळांत उधळणारा चैत्र..त्यांतली रात्र.. कधी हिंदलाय्‌त अशा रात्री ? किंबा सागरकिनारीच्या, पुळणीवरच्या प्रणयरम्य घटिका सरल्यानंतर.. बा.भ. बोरकरांच्या शब्दांत विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेलं ओसरल्यावर आपण सजणे, अशीचं ओलं उरेलं एक जलधिसान्निध्यांत वाढला पोसलेला कवी, किती सहजपणे आपल्या रोजच्या सृष्टींतलं रूपक.. सागर-कल्लोळ.. कल्लोळ म्हणजे लाट.. आणि किनारा यांचं.. देवून जातो पहा.. सग्ग्ग्गळ अगदी तस्सतस्से असतं की नाही ? पण याचं, अगदी समीप आलेल्या प्रमपात्रानं, नायकाचं प्रम अव्हेरलं, किंवा ती, कदाचित तिच्या मनाविरुद्ध, ’दुसर्‍या कुणाची झाली तर.. मग ? दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले थबकले न पाय जरी, हृदय मात्र थांबले.. बेशीपाशी, उदास हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली सुरेश भटांचा शेर आणि सुधीर मोघ्यांनी स्वरावलेला आणि, श्रीकांत पांरगांवकरच्या सुरांनी भारावलेला...१९८१.. रंग माझा वेगळा, कार्यक्रमाची सुरुवात.. आतां या प्रेमाची परिणिती विवाह बंधनांत झाल्यावर, अर्थातच नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर, अहं त्याच्या आधीच, ताज्याताज्या नवरदेवांवर ’प्रसंग’ गुदरतांत, आधी किरकोळ कारणानं रुसवे-फुगवे, धुसफुस, अश्रुपात, आणि मग मनधरणी.. कशि तुज समजाउ सांग कां भामिनि धरिशि राग बाकिबाबांच्या संस्कृतोद्भव शब्दकळेनं सजलेली ही कविता... ज्याचं बुवांनी..पंडित अभिषेकींनी शुद्ध कल्याण रागांत बांधलेलं, एक अप्रतिम गीत करून गायलय्‌... ती कविता या प्रेम प्रदेशांतल्या एका अवघड वळणाचं.. घडता घडता बिघडलेलं आणि बिघाडावर शरणागतीची धाड घालून, पुनर्घडण करू पाहाणार्‍या परिश्रमांचं.. यथार्थ दर्शन घडविते. याचं शृंगारकाला दरम्यान, म्यान केलेल्या कुरबुरी लपवत आणखी एक शरणागती.. मानापमान नाटकांतली प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मला, मीचं चुरीनं चरणं, दास हो मी तुझा कृष्णाजी प्रभाकर खाडिलेकरांनी, १९११ मधे लिहिलेल्या संगीत मानापमान या नाटकांतलं, मास्टर दीनानाथांनी संगीतबद्ध करून, गाऊन 'Once more' घेत, लोकप्रिय केलेलं हे पद. याची मूळ चाल गोविंदराव टेंब्यांची तितकीच श्रवणीय.. आणि मग रागेजल्या भामिनीला आवरतांना पतिराजांची तारांबळ.. अशीच, प्रेमाचा आणखी एक आयाम धसमुसळ प्रेम, दर्शविणार्‍या पदांत नच सुंदरि करु कोपा. मजवरि धरि अनुकंपा कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला धरुनीया केसाला दंतव्रण करि गाला.. हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा.. अरे काय प्रेम की मारामारी ? हो, मारामारीचं पण प्रेमोद्भव.. तर, अशा या प्रमाचं व्यक्त होण्याच्या कांही नमुने तुमच्यासमोर मांडतांना मजा आला मला. पण अजून आपण या युगुल-प्रेमाच्या टप्प्यापर्यंतच पोहोचलो आहोंत, हे लक्षांत आलय कां तुमच्या ? अजून त्याला परिणामोत्तर, तिसरा आयाम प्राप्त व्हायचाय.. त्यानंतर हा प्रेम प्रवाह कुठल्याकुठल्या उताराकडं धावतो ते पुढच्या भागांत पाहू.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Friday, April 19, 2013

कृष्णाचा कालखंड

कृष्णाचा कालखंड पारंपरिक संशोधकांच्या मते, कलियुग सुरू झालं, ख्रिस्तपूर्व ३०१२ मधे. महाभारतीय युद्ध किंवा कृष्णाचं परलोकगमन यांच्याशी या कालगणनेंचा काय संबंध आहे हे स्पष्ट होत नाही आणि ते इथं महत्वाचही नाही. त्यामधे साघारणतः ३५ वर्षांचा फरक आहे आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या आणि त्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या तुलनेंत तो नगण्य आहे. अनेक महान खगोलशास्त्रज्ञ आणि कुंडलीकार भविष्यवेत्त्यांनी ग्रहगोलांच्या स्थानांच्य तौलनिक अभ्यासानंतर, दिननिश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे या आधी. प्राचार्य श्रीनिवासराघवन हे त्यापैकी एक महनीय नांव. त्यांनी, महाभारत युद्धाचा दिनांक ख्रिस्तपूर्व २२ नोव्हेंबर ३०६७ हा, निश्चितही केला आहे. पण यामधे, प्राचीन ग्रहस्थितींची नोंद अचूक असल्याच गृहित मानलं गेलय, जे सहजासहजी स्वीकारार्ह होणं जरा दुरापास्त वाटतं. म्हणजे याचा अर्थ त्यांचा होरा चुकीचा होता असं नाही. पण थोडा साकल्याल विचार होणं आवश्यक आहे. कांही संशोधकांच्या मते, ख्रिस्तपूर्व ३१०० इतकं मागं जाणं बरोबर नाही कारण, आर्यांचा भारत प्रवेशच मुळी ख्रिस्तपूर्व १५०० मधला मन्यताप्राप्त असा आहे. आणि म्हणून महाभारतयुद्ध आणि कृष्ण हे साहाजीकच त्यानंतरचेच. परंतू भरतवर्षावरच्या आर्यांच्या आक्रमणाची शक्यता आणि मुळातच तो सिद्धांत विज्ञानानं नाकारला आहे. मोहंजोदरो आणि हरप्पातल्य उत्खनना दरम्यान मिळालेल्या लेखांची उकल करतांना, वेदांचा उगम हा ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांच्या बराच आधीचा आहे हे ही स्पष्ट झालय. त्यामुळं हे होरे सहजी निकालांत निघतांत. एकमेव मुद्दा, ज्यावर चर्चा होवू शकते तो म्हणजे, विख्यात पुरातत्ववैज्ञानिक एस् आर् राव यांच्या संशोधनांतूल प्रकाशांत आलेलं. सौराष्ट्र किना-यालगत जलधिस्थ झालेलं द्वीरका बेट, जी, त्यांच्या मते कृष्णाचीच ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष अस्तित्वांत असलेली द्वारका होय.. पण पुराभिलेखांच्या निरक्षरतेमुळे हे निष्कर्ष कितपत ग्राह्य मानता येतील या विषयी मतभेद असू शकतांत. त्यामुळं आणि हरप्पा इथ सापडलेले पुराभिलेख, जे ख्रिस्तपूर्व १५०० पेक्षा जळपास १००० वर्ष मगच्या काळांतले आहेत त्या ऐतिहासिक पुराव्यावरून वरून, राव महोदयांनी शोधलेली द्वारका ही कृष्णाची नक्कीच नव्हे हे स्पष्ट होतं. आतां कांही वेगळ्य दिशेनं कृष्णकाळाचा शोध घेऊन पाहू. अश्वलानं, महाभारताच्या ग्रंथकर्त्यांना, म्हणजे जैमिनी आणि वैशंपायन यांना प्राचीन असं संबोधलं आहे, त्या अर्थी महाभारतीय युद्ध आणि तो यांच्यांत किमान एक शतक इतका कालखंड गेला असणार असं गृहित धरायला हरकत नाही. त्यानं केलेल्या नोंदी प्रमाणं, पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर, हिंदू पंचागातल्या भाद्रपदमासांत, जमिनीखालची बीजं अंकुरित होतांत. आज ही प्रक्रिया जेष्ठ किंवा आषाढांत होतांना दिसते. म्हणजे त्याच्या काळांत वर्षाऋतु आरंभ जेष्ठमासा ऐवजी श्रावणांत होत असावा, जसा तो आज होतो म्हणजे जवळपास सत्तर दिवस अलिकडे. पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाच्या अवकाशी चमत्कारामुळं ऋतुंचंसुद्धा, स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांच्या तुलनेंत, दर ७२ वर्षांनी एक दिवस या प्रमाणांत पार्श्वगमन होतं. आणि हिंदू पंचांग हे स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांवरूनच मांडलं गेलय हे सर्वश्रुत आहे. याचाच अर्थ, अश्वलानं नोंदलेला वर्षाऋतु आरंभ हा ७० गुणिले ७२ म्हणजे जवळपास ५०४० वर्षांपूर्वीचा किंवा ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपू्र्वींचाच आहे. अश्वल हे कहोल कौषीतकी, या कौषीतकी ब्राह्मण वेदकालांतल्या तापसांपैकी ऋषींचे अनुयायी होते. ते महाभारतांतल्या अनेक व्यक्तिरेखांचा उल्लेख करतांत. शिशिरऋतुचा प्रारंभ म्हणजे आज आपण महाशिवरात्र साजरी करतो तो असाही उल्लेख दिसतो. परंतू शिशिरऋत्वारंभ २१ डिसेंबरला तर महाशिवरात्र १ मार्चच्य आसपास असते. हा परत एकदा पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाचा परिणाम. म्हणजेच कौषीतकिच्या काळापासून, ऋतुचक्र ७० दिवस मागे गेले आहे, ५००० वर्षांपूर्वी. महाभारत युद्धाचं वर्ष हे ख्रिस्तपूर्व ३१०० याचा हा आणखी एक पुरावा. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर आलेल्या कांही तत्कालीन ग्रीक प्रवाशांनी नमूद करून ठेवलेल्या बाबींप्रमाणे, आणि तत्कालीन उपलब्घ ऐतिहासिक दस्तऐवजानुसार, कृष्णाविषयी आणखी कांही रोचक माहिती मिळते. प्लिनी, हरि-कृष्णापासून नामोद्भवलेले हेरॅकल्स् असा उल्लेख करतो. ग्रीस मधल्या मॅथोरा नामक एका महत्वाच्य़ा नगराच्या, सौरसेनी जमातीमधे हेरॅकल्स्.. कृष्णानुयायी.. हे बहुमानप्राप्त मानले जात. आपण त्यांना शूरसेनी आणि मथुरा असं संबोधू, कारण शूर हा वसुदेवाचा जन्मदाता म्हणजेच कृष्णाचा पितामह होता. भारतीय हेरॅकल्स्.. कृष्ण.. ग्रीक उल्लेखाप्रमाणे, अलेक्झांडर आणि सॅंन्ड्राकोटोस् यांच्या आधी म्हणजे अंदाजे इसवीसन ३३० पूर्वी, १३८ पिढ्या अस्तित्वांत होते. एक पिढी म्हणजे सामान्यतः वीस वर्षे असा, भारतीय साम्राज्यांच्या संदर्भांत अदाज केला, तर १३८ गुणिले २० म्हणजे २७६० अधिक ३३० म्हणजेच ख्रिस्तपूर्व ३०९०. कलियुगाचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०० असा परंपरेने नोंदलेला, या आकड्यांच्या सर्वसामान्य गणितीय परिभाषेने किती तंतोतंत जुळतो ते पहा. थोडक्यांत, तांत्रिक आणि अनेकविध स्रोतांमधून उपलब्ध प्रत्यक्षदर्शी पुराव्यांवरून आपण, परंपरेनं गृहित आणि मान्यताप्राप्त कलियुगारंभ हा सहाभारत युद्धाच्या अगदी समीपकाल अश्या निष्कर्षाप्रत अगदी सहज पोहोचू शकतो. आणि या भरपूर पुराव्यानं कृष्णाचं ऐतिहासिकत्व निर्विवादपणे सिद्घ होतं. इति.. Prof. N.S. Rajaram www.swordoftruth.com September 4th, 1999 :

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?’ "वेदकाळाच्या अखेरच्या कांही वर्षांत, श्रीकृष्ण हा एक ऐतिहासिक पुरुष अस्तित्वांत होता. पारंपरिक भारतीय पुरावे हे या विधानाला पुष्टी देणारे आहेत. पण पाश्चिमात्य वसाहतवादी आणि धर्मप्रसारकांनी मात्र या ’इतिहासा’ला वेगळं रंगवत त्याचा विपर्यास करण्याचाच सातत्यानं प्रयत्न केला. ’इतिहास की पुराण ?’ आपण सगळे भारतीय, आणखी एक कृष्णजन्मोत्सव साजरा करायच्या उंबरठ्यावर असतांनाच, एक प्रष्ण, जो सगळ्यांच्याच मनांत खदखदत असतो: कृष्णकथा ऐतिहासिक की पौराणिक ? भारतीय हिंदूंच्या तृषार्त आत्म्यांची पोकळीं व्यापण्यासाठी कृष्ण ही निर्माण केली गेलेली केवळ एक प्रतिमा ? या प्रष्णांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... एक आदरयुक्त प्रेम, ओढ, असोशी यांनी व्यापलेलं व्यक्तिमत्व म्हणून कृष्ण हे भारतीय परंपरा आणि इतिहास या मधे आजवर, अबाधित राहिलं आहे. वसुदेव-देवकीनंदन आणि यादवकुळाचा राजपुत्र असलेला कृष्ण, बहुतेक हिंदूंनी, विष्णुअवतार म्हणून ग्राह्य धरलेला असतो. पण आजच्या वैज्ञानिक आणि तंत्र्ज्ञानाच्या प्रगती नंतर, अगदी हिंदूंना सुद्धा, कृष्णाच्या खर्‍या अस्तिवा किंवा नास्तित्वाबद्दल जाणून घेण आवडेल. कृष्णाच ऐतिहासिकत्व जाणून घेण्याची इच्छा, प्रक्रिया हे कांही नवल वाटण्याजोग आहे असं मुळीच नाही. संशोधक-विद्वान गेली जवळपास दोन शतक या माहितीचा वेध घेताहेत. विशेषत:, जेंव्हापासून कांही युरोपीय संशोधक, लाखो-करोडो भारतीयांचा हृदयस्थ असलेल्या या प्रतिमा-परमेश्वराच्या श्रद्धेचा मागावर आहेत. त्या संशोधकांनी निष्कर्ष काढला आणि त्यांना मानणार्‍या कांही भारतीयांनी सुद्धा तो स्वीकारला.. की कृष्ण हा प्रत्यक्षांत कधीच नव्हता आणि तो केवळ एक काल्पनिक भाकड आहे. एक अत्यंय उथळपणे काढलेला आणि बेगडी विद्वत्तेची झालर लावलेला निष्कर्ष होता तो. पण आतां या लेखमालेंतून श्रीकृष्णाच्या ऐतिहासिकतेबद्दलचे आणि हा इतिहास लवळपास पांच हजार वर्षांपूर्वीचा कसा आहे, याचे पुरावेच वाचायला तुमच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. महाभारत या महाकाव्यातल्या पात्रांबरोबरची त्या काळांतल्या दीडदोन शतकं असलेली श्रीकृष्णाची नाती, संबंध, संवाद जर आपन लक्षांत घेतले तर कृष्णाची ऐतिहासिकता आपोआपच प्रस्थापित होते, आणि कालख्डाच्या अचूकतेबद्दल म्हनायचं तर महाभारतांतल्या घ्टनाक्रमांचे उदाहरणार्थ युद्ध वगैरे.. नेमके दिनांक...तिथ्या म्हणूया हवंतर... निश्चित झाले की आपोआपच कृष्णाच्या आयुष्य़ाच्या तिथी आपल्याला स्थूलमानाने प्राप्त होतील. आअणि अशारितीनं मालखंदाची निश्चिती म्हणजेच त्याच्या ऐतिहासिकतेचा आणि पर्यायानं अस्तित्वाचा, पुरावा. लवळपास शतकभरापूर्वी, प्रसिद्ध बंगाली साहित्यकार बंकिमचंद्र चटर्जींच्या कृष्ण संदर्भांतल्या लिखाणांतून प्रकाशांत आलेल्या आणि पुतातत्ववेत्त्यांच्या संशोधनानं पुष्टी दिलेल्या बाबी मला मार्गप्रदीप ठरल्या आहेत. कृष्णाचा मागोवा घेत असतांनाचे कांही पुरावे: कृष्णद्वैपायन किंवा वेदव्यास म्हणजे आपल्याला आज ज्या स्वरूपांत माहीत आहेत त्या चार वेदांच्या निर्मितीला प्रेरणाभूत असलेल्या व्यक्तिमत्वाची धाकटी पाती म्हणजे कृष्ण, एक वेदकाळांतली विभूती होती, असं भारतीयांकडे उपलब्ध असलेली माहिती सांगते. व्यास अर्थातच अगदी प्रारंभीच्या आणि मूळ महाभारतकथेचे कर्ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यासकृत महाभारतांतल्या कालखंडातल्या कांही पात्रांची नांव, उपलब्ध असलेल्या, पांच हजार वर्षांपूर्वीच्या, तत्कालीन लेखांमधून किंवा हरप्पनकालीन शिक्के यामधून उजेडांत आली आहेत.उदाहरणार्थ, व्यास-शिष्य पैला, कृष्णाचा स्नेहसखा अक्रूर, वृष्णी, कृ्ष्णाचे पूर्वज यादव, श्रीतीर्थ, म्हणजे द्वारकेची तत्कालीन संज्ञा, वगैरे. या सगळ्या अभ्यासाला छेद देणार्‍या कांही बाबी म्हणजे, अठराव्या शतकांतल्या, कांही ’विद्वानां’नी प्रसृत केलेल्या कल्प कथा.. म्हणजे आर्यांच भारतीय भूखंडावरचं आक्रमण. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी जेंव्हा मोहंजओदरो-हरप्पाचं उत्खननं होवून प्राचीन अवशेष उजेडांत यायला लागले, तेंव्हा या ’कल्पकथे’ला आणखी एक पुरवणी जोडण्यांत यायला लागली, ती म्हणजे आर्य आणि द्रविड यांचं युद्ध. पुरातत्व संशोधनोत्तर, विज्ञानानं आता या दोनीही बाबी नाकारल्या आहेत. आपल्याला आतां माहीत आहे की हरपा संस्कृती वेदकालानंतर उदयाला आली. विख्यात व्याकरणकार पाणिनीच्या ग्रंथांत, महाभारतांतल्या अनेक पात्रांचा उल्लेख आहे. उदाह्रणार्थ: वासुदेव म्हनजे कृष्न, अर्जुन, नकुल, कुंती वगैरे. वेदकालीन साहित्यकृतींमधे, महाभारतांतली पात्र जागोजागी आढलतांत.. कथकमधे विचित्रवीर्य, शिखंडी, कौशितकीमधे यज्ञसेन, ब्राह्मण, ऐतरेय ब्रह्मणमधे अभिमन्यूचा नातू जनमेजय आणि शतपथ ब्राह्मणमधे परिक्षित... आणि ही यादी न संपणारी आहे. बौद्धिक साहित्यांतल्या कुणाल जातकामधे, भीमसेन, अर्जुन, नकुल सहदेव आणि युधित्तिल.. युधिष्ठिर चं पाली रूप.. यांच्या बरोबर, कृष्णा, म्हणजे द्रौपदीचाही निर्देश आढळतो. कुरु जमातीतला धनंजय आणि द्रौपदी यांच्या स्वयंवराचा उल्लेख धुमकरी जातकांत पाहायला मिळतो. याच कृतींत, इंद्रप्रस्थाचा युधिष्ठिर, कौरवांचा पूर्वज म्हणून, आणि विदुरपंडित यांचा उल्लेख आहे. शिवाय महाभारतांतली, कृष्णासह वर उल्लेखिलेल्या पात्रांचा उल्लेख, सूत्रपितक, ललितविस्तार आदि बौद्ध साहित्यकृतींमधे आढळतो. हा उल्लेख कृष्णा आणि त्याच्या उपदेशाबद्दल फारसा आदरपूर्वक किंवा निर्मळ नसला तरी, तो तिथं अनिवार्य म्हणून आलेला आहे हेंच मुळी, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या ऐतिहासिकतेच्या स्वीकाराचं द्योतक आहे. त्या साहित्यकारांनी त्याचं महाभारतांतलं अस्तित्व नाकारलेलं नाही. वेदांकडे परत एक दृष्टिक्षेप टाकतांना, छंदोग्य उपनिषिदामधे, कृष्णासंदर्भांत एक अत्यंत रोचक उल्लेख आढळतो. ’देवकिनंदन कृष्णाला घोर अंगिरस म्हणतो..मला तुझ्या आश्वासनांनी तृषामुक्त केलय’ आणि प्राण असेपर्यंत त्यानं फक्त, ’तू अ क्षत.. अविनाशी, अच्युत..कालातीत, आणि प्राण संहित,.. जीवनप्रवाह.. आहेस’ या त्रिसूत्रीचीच आराधना केली. देवकीनंदन कृष्ण म्हणजे अर्थातच महाभारतांतील कृष्ण. भगवद्गीतेमधे नंतर कृष्णानं केलेला उपदेशाचं मूळ त्यानं घोर अंगिरसाकडून देदांविषयीचं ज्ञान मिळवितांना, केलेल्या विश्लेषण, विचार, चर्चा, त्यातून विकसन पावलेल्या संकल्पना याम्त असावं. गीता म्हणजे आपण सर्व उपनिषदांचा अर्क किंवा गाभ्याचासांख्य तत्वज्ञानाच्या प्रकाशांत घेतलेला वेध म्हणू हकतो. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे गीतेचं हे मूळ घोर अंगिरसाच्या शिकवणींत आहे हे एका हरप्पन लेखांत नमूद केलेलं आपल्याला आढ्ळतं.. तो संदेश असा, ’घोर: दाता: द्वयु: अर्क:, म्हणजे घोरानं दिलेले दोन घनपाठ..पहिला उपनिषदं आणि दुसरा सांख्य तत्वज्ञान. म्हणून, भगवद्गीतेंत श्रीकृष्णानं सांगितलेल्या, वेदांत आणि सांख्य तत्वज्ञानाच्या संमीलनाचा शिल्पकार, ख्रिस्तपूर्व तीन सहस्रकाच्या कालखंडांत असलेला घोर अंगिरसच होता. महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हेणजे हरिवंश किंवा भागवताप्रमाणे, उपनिषिदं, जातकं, सूत्र, किंवा ब्राह्मण ऐतिहासिक परंपरेचे भाग नव्हते. त्यामुळं नामोल्लेखांच कारण केवल केवळ, ती परिचित असणं एवढाच असूं शकतो. इतक्या विविध कालखंडांत लिहिल्या गेलेल्या अनेक बहुआयामी ग्रंथांमधे जेंव्हा कृष्ण आणि महाभारतांतली इतर पात्र यांचा उल्लेख सर्वसंचारी असा उपलब्ध होतो तेंव्हा, त्यांच्या ऐतिहासिकतेबद्दल किंचितशीही शंका कुणी उपस्थित करूं नये. आतां कृष्णाच्या अस्तित्वाच्या कालखंडाच्या अभ्यासाकडे आणि संशोधनाकडे पाहूं..

Wednesday, April 10, 2013

एका परदेशी पर्यटकाला दिसलेली वस्तुस्थिती

या लेखांतला मजकूर, पचनी पाडायला जरा जडच जाणार आहे वाचकांना. पण वस्तुस्थिती, एका परदेशी पर्यटकाला...इतिहासांत नाही तर अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी... दिसलेली, त्यानं अनुभवलेली आहे ही ! आणि वाचल्यावर तुम्ही कदाचित सहमतही व्हाल लेखांतल्या प्रत्येक विधानाशी. कारण सगळच वर्णन, त्या अवस्थेमागची कारणं, लाजिरवाणी आहेत, आपल्यासारख्या ’भारतीय’ म्हणवणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी ! सीन केली हे त्या पर्यटकाचं नाव आणि त्यनं नोंदविलेल्या अनुभवांची सूची, कोणताही पूर्वग्रह न बाळगता नजरेखालून नुसता न घालता, त्यावर, तुम्ही आम्ही, आपण सर्व ’भारतीयां’नी अंतर्मुख होवून विचार करेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यानं नोंदविलेलं सगळच ’घृणास्पद’, ’किळसवाणं’, ’निंदनीय’ निर्विवादपणे आपल्याला ठाईठाई पाहायला मिळतय आणि आपण सगळे राजकारण्यांनी दिलेले ’अति लोकशाही’चे नशीले मूग गिळून ’गप्प’ बसलो आहोंत. पण या कदवट सत्याला आपण ’डोळे उघडून’ सामोर जायलाचं हवं..आणि परिवर्तनासाठी वचनबद्ध. कटिबद्ध व्हायलाचं हवं ! सीन्‌ केली आपल्या ’नोंदवहीं’त लिहितो.. तुम्ही जर भारतीय किंवा भारतीय वंशाचे असाल तर, मी आधीच तुम्हला सावध करतो, आणि मला जाणीव..नाही खात्री आहे की मी जे लिहीत आहे ते तुम्हाला मुळीच रुचणार नाही. पेण या लिखाणांतल्या कठोर शब्दांपेक्षा त्यामागच्या मित्रत्वाच्या नात्यानं दिलेल्या सल्ल्याची दखल तुम्ही घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमचा असा एक मित्र की जो अतिशय प्रामाणिकपणं आणि कळकळीनं कांही विदारक सत्य तुमच्यापुढं ठेवतो आहे. आणि अखेरीस पाश्चात्य संस्कृतीच्या दुराभिमानानं, आंधळेपणानं, मी हे सर्व नोंदवत आहे असा गैरसमज कृपया करून घेवू नका. कारण तुम्हा भारतीयांना सद्यपरिस्थितीचं भान असूनसुद्धा तसचं राहायची आणि गर्तेप्रत जायची इच्छा असली तर मी कोण बापडा, वेगळं कांही सांगू इच्छिणारा ? तेंव्हा तुम्हाला जे रुचेल पचेल ते ध्यानांत घ्या आणि बाकीचं सोडून द्या. त्यामुळं काहीही बिघडणार नाही, याहून जास्त. कारण माझ्या असंलक्षांत आलय्‌ की भारतीय विशेषत: ’उच्चभ्रू’ भारतीयांना कशाशीच काहीही घेण नाहिये ! आणि निम्न-स्तरांतल्या गरीब जनतेला खरं तर, जगाला आदर्श वाटावा असा या भारतभूचा समृद्ध वारसां , उच्च संस्कृती, परंपरा माहीतही नाहीत किंवा त्या जाणून घ्यायला, रोजची भ्रांत भागवता भागवता वेळंही नाही. असो.. तरी पण... भारत हा सर्वतोपरी एक ’गोंधळ’ आहे. इतक सोपं वर्णन होवू शकतं, इथल्या एकुणातल्यां (अ)व्यवस्थेचं...पण त्यांत सुद्धा गुंतागुंत आहे...सुरुवातीला आपण भारताचे चार मूलभूत प्रष्ण बघू. ज्या ’चांडाळचौकडी’कडे, भारताला प्रगतीप्रत यात्रेला साखळदंडानं जखडून ठेवण्याची शक्ती आहे..मग इतर कांही मुद्यांकडे वळू. प्रदूषण..मझ्या मते सर्वप्रथन या बद्दल बोलायला हवं. केरकचरा, पाऊस नसतांनासुद्धा ओल्या खरकट्याच्या कुजलेपणानं चिलटं,, डास, माश्या, झुरळं आणि पर्यायानं उंदिर, घुशी, पाली आदिंच्या प्रादुर्भावाला उत्थापन देणारा दमटपणा धूर ओकणारी वाहनं, काय ’वाट्टेल ते’....अगदी नर-जनावरंचे मृतदेहसुद्धा...टाकलेल्याआणि ’तरंग’रूपानं आपल्या दृष्टीस पाडणार्‍या नद्या, नाले, ’उतून,उचंबळत’ आपली वाट सोडून रस्त्यावरून वाहणारे सांडपाण्याचे. मल-मुत्राचे किळसवाणे, दुर्गंधीयुक्त ’ओघाळ’, विनाकारण केवळ विकृत आनंदासाठी वाजवले जाणारे कर्ण करकश ’भोंपू’..मला कळत नाही की हा कुठल्या संस्कृतीचा भाग असूं शकतो का पण या आधी मी तो कधीही आणि कुठेही अवुभवलेला नाही. पंचतारांकित विश्वकीर्त ’ताज’ हॉटेल्‌च्या दरवाज्याला लागून, ’असह्य’ दुर्गंधी, क्षणोक्षणी हवेंत उधळणारा टाकाऊ वस्तूंचा ढिगारा असावा ? हाय रे दुर्दैवा..बाहेर आल्यावर आंत घेतलेल्या, आदरातिथ्याचा ’ताज्‌’या अनुभवाला छेद देणारा हा ’अतिप्रसंग, पर्यटकांनी कां म्हणून सहन करावा ? कांही कमी प्रमाणांत पण दिल्ले, बंगलोर, चेन्नईंतही ह्या ’वातावरणा’मुळं मला शारीरिक त्रास...सायनस्‌, कर्णपटलावर दुष्प्रिणाम,, अपचन, पोटांत ढवळणे यासारखे..सहन करावे लागले. शेण.. मग त्या बकरीच्या लेंड्या असो की गाई-म्हशींच उत्सर्जन किंवा मानवी विष्ठा..हा एक ’सर्वदूर मार्गप्रदीप भारतीय’ अनुभव. त्यांतून प्रेक्षणीय(?) स्थळां सभोवताली तर केवळ ’अवर्णनीय’ अगदी शब्दश:..परिसर ! रस्त्यांच्या मधोमध मुत्र्या, संडास, ते सोडून इतरत्र ’उत्सर्जन’ करू पाहाणारे बापडे, बाया... काय काय म्हणून सांगू ? शहराच्या जरा बाहेर पडाव आणि ग्रामीण भाग लागावा तोंच आढळतांत प्लस्टिक्‌च्या पिशव्यांनी जवळजवळ ’तुंबलेले’ रस्ते. रस्ते कसले हव्यातशा बांधलेल्या घरांच्यामधून दिसणार्‍या पायवाटा. अन्‌ हवेची शुद्धता ? शुद्धता कशाशी खातांत हे इथल्या हवेला अभावानच माहिती असावं बहुधा ! वाहनं जो धूर ओकतांत त्यांतल कर्बाचं आणि शिशाचं प्रमाण हे इतकं घातक असतं की, ते किती हितकारी आहे या पेक्षा ते किती घातक आहे याचंच मोजमाप घ्यायला हवं. ग्रामवासीच काय पण शहरी ..’नागरी’ जनतासुद्धा रस्त्यांवर हवा तो, तसा आणि तेंव्हा विविध प्रकारचा कचरा फेकत असतांत. . त्यांतल्या त्यांत दोन शहरं.. एक म्हणजे केरळ राज्याची राजधानी त्रिवेन्द्रम्‌ आणि दुसरं कालिकत... ही त्यांतल्यात्यांत स्वच्छ आणि ’सुसह्य’ वाटली. मला माहीत नाही, पण भारताच्या उत्पादक आणि उद्योजक शक्ती ताकद आणि क्षमता या सर्वांवर या सगळ्याचे दूरगामी परिणाम, जर परिस्थिती अशीच राहिली तर, निश्चित होतील. जुनाट, अनावश्यक, अडगळ सदृश परंपरांच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यांत अडकलेल्या या देशाला. सर्वप्रकारचं प्रदूषणांतून मुक्ती कशी मिळणार हा एक मोठा प्रष्ण आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा.. आवश्यक आणि अनिवार्य सुविधांची उपलब्धता. रस्ते, रेल्वे, बंदरं आणि विद्युतीकरण. विजेचा अखंद लपंदाव हा एक अत्यंत विनोदी आणि उद्विग्न करणारा प्रकार इथं अनुभवायला येतो. बहुतेक सर्व जनसामान्य त्यांनी किंमत मोजलेल्या विजेपासून दिवसेंदिवस वंचित असतांत. ताचा उत्पादकतेवर थेट परिणाम होऊन ती घटणारच ना ? (क्रमश:) *** भाग २ बंदरांमधली जुनात, बाबा आदमच्या काळांतली कालबाह्य यंत्रणा, आधुनिक तंत्रिक सुधारणा झालेल्या जगांतल्या, ’कंटेनर्‌’ हा्ताळ्ण्याची क्षमता असलेल्या बंदरांशी कशी स्पर्धा करणार ? रस्त्यांची अवस्थासुद्धा याहून कांही वेगळी नाही. माझ्या प्रवासा दरम्यान मी थायलंडमधे, जो देश युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेंत खूप मागसलेला सनजला जातो, तिथं फक्त, स्तरवृद्धी करून तयार केलेले, सर्वसामान्य रहदारीला बाधा न आणणारे. जवळजवळ दोनतृतियांश भूमीला सेवा देणारे असे द्रुतगती किंवा महामार्ग बघितले. आणि इथं ? एकेरी वाहतूक असलेले महामर्ग अभावानेच, वाहतूक नियमांची, जनतेनं केलेली ’ऐसी की तैसी’, रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रशासनाची उदासीनता. भ्रष्ट पोलिस-यंत्रणा, अंतर कापायला लागणारा तिप्पट वेळ, तीसतीस वर्ष जुन्या, देखभाल नसलेल्या, कार्बन्‌ मोनॉक्साइड्‌च्या विषारी फुफुसांना अत्यंत घातक धुराचे लोट आणि ऊष्ण बाष्फ ओकणार्‍या बसेस्‌.. यादी कमी आहे ? जो जो भारतीय, रेल्वेनं प्रवास करतो तो अत्यंत त्रासलेला असतो.. संतापजनक प्रकार असतो सगळा ! गेल्या पांच वर्षांत तर स्थिती आणखी बिकट झाली आहे, इतकी की पर्यायानं तिचा परिणाम मनुष्यबळाच्या क्षमतेवर आणि परिनामत: उत्पादकतेवर दिसणं अनिवार्य आहे. नुसती चुकशी करायला, खिडकीपर्यंत पोचायला अर्धा अर्धा तास घालवावा लागावा ? चारचार, पांचपांच दिवस आधी आरक्षण ’तुडुंब’.. मग काय करणार ? बिचारे प्रवासी, त्या भयानक अवस्थेंतल्या ’बस्‌’ नांवाच्या वाहनांत ’बस’तांत. दररोज जवळपास पांच कोटी भारतीय आणि अन्य प्रवासी दाखल होतांत रेल्वेंत प्रवासहेतु ! पांचशे प्रवासी तर रोज प्रतीक्षा यादींत असतांत. रेल्वे ही सर्वसामान्य जनांना परवडणारी आणि उपल्ब्ध सुविधा आहे इथं हे मान्य करायलाच हवं.अन गर्दी ? अबब ! स्वस्तातल्या विमान प्रवासाच्या आजकाल, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे फोफावलेल्या संधींमुळे ज्यांना परवडतो ते विमानप्रवास करतांत आणि मग उरलेली परचूटन ’जनता’ ?... ओथंबलेल्या रेवेच्या डब्यांतून अक्षरश: ढोरांसारखा प्रवास करते. पन ’कुणाला काय हो त्याचे ?’ रशिया, इज्रायल्‌ आणि अमेरिकेकडून शस्त्रखरेदीच्या, फायदेमंद ’उपद्व्यापा’पुढे, या देशाचं, इतर बाबींबाबत ’मंद’गती होणार सरकार, इथल्या नागरिकांच्या कल्यानकारी योजनांबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणी बद्दल किती गंभीर, कटिबद्ध आणि इच्छुक आहे याबद्दल मी खरंच साशंक आहे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, जो दोन भागांत विभागला जावू शकतो, ज्याला, एखाद्या नाण्याच्या दोन बाजूं सारख्या आहेत, तो म्हणजे नोकरशाही किंवा ’कचेरी’शाही आणि भ्रष्टाचार. निवास व्यवस्थेसाठी तिप्पट रक्कम, भमणध्वनिसुविधेचं SIM मिळवण म्हणजे, लालफितीचा अतिरेक, कारण छायाप्रती, हे प्रमानपत्र तो परवाना... अरे रे.. या सगळ्या जंजाळांतून कुणी डोक शाबूत राहून बाहेर येन मुषकिल. अशी ही ग्राहक सेवेची कथा आणि व्यथा. रेल्वेची तिकिटे मिळणे ? आणखी एक दुरापास्त अनुभव. गाडीचा क्रमांक शोधा ...तीस मिनिटे..मग अत्यंत ’अवधड’ परीक्षेच्या प्रष्णपत्रिकेसारखा अर्ज भरा.. मग ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत राहाणारी रांग... खिडकी पर्यंत पोचायला कमीतकमी आणखी अर्धा तास..आणि एक क्षुल्लक चूक.. तिथल्या कारकुनानं दाखविली की परत, ’येरे माझ्या मागल्या’.. रांग-शेपटा शेवटी ! सरकारला धनिकांच्या लांगूलचालनापुढे, किंवा स्वत: श्रीमंत होण्याच्या गडबडींत, सर्वसामान्यांचे प्रष्ण जणू कांही जाणवत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे काणाडोळा करतय्‌. उदाहरणार्थ, नगरपालिका धनिकवस्तींत स्वच्छतेच्या इतक्या सुविधा पुरविते की सामान्य वस्त्यांमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ, मनुष्यबळ पैसा आणि सर्वांत शेवटी.. इच्छाशक्ती अभावानंच असते. सरकारी पगारावर पोसणारे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयांत बहुश: हजर नसतांत कारण ते खाजगी व्यवसाय करण्यांत व्यग्र असतांत आणि रुग्णालयांत, सेवेकर्‍यांची संख्यासुद्धा पुरेशी नसते. मी आणखी कांही काळ बदलाची वाट पाहाण्याच्या मताचा होतो पण इथल्या नागरिकांनाच कशाची खंत वाटत नाहीत आणि बदल करण्याची त्यांची मानसिकताही मला जाणवली नाही.. भारताची आर्थिक राजधानी मुंबई,म्हनजे घाणीचं साम्राज्य, जिथं गलिच्छ झोपडपट्ट्या,, गरिबी हे माणुसकीचे शत्रू सर्वदूर माजलेत. कल्पनेपलिकडच्या अशा व्हिएतनाम किंवा इंडोनेशियामधल्या शहरां(?) इतक्या किंवा किंबहुना जास्त. अतिप्रदूषित मेदान हे सुमात्रामधल ठिकाण पण सगळ्यांय मोठे उंदिर आणि घुशी मी फक्त मंबईतच पाहिले बुवा ! मागासलेपणा ? मी समजू शकतो की जिथं नोबेल्‌पुरस्कार विजेते, अणुवैज्ञानिक, विख्यात अर्थशास्त्रज्ञ, समृद्ध उद्योगांचे जनक हे जन्म घेणं दुरापास्त आहे अशा ठिकाणी मला नवल वाटलं नसत. पण भारतांत हे सगळ आहे आणि भारतियांनी हे सगळ मिळवलय. पन अंतिम चित्र ? नुसतं धूसर नाही तर अंध:कारमय ! श्रीमंतांची काम करायला गरीब आहेतच आणि ते गरीबच राहाताय्‌त त्यामुलं ही दरी अशीच वाढत जाणार, रुंदावत जाणार. भातराकडे आणि भारतीयांकडे जगाला देण्यासारख पुष्कळ आहे... पण माझ्या आयुष्यांत हे ’देण’ बघण्याची, भोगण्याची मनिषा कितपत राहील याबद्दल मी साशंक आहे. मला तुम्ही हवंतर पाश्चिमात्य सांस्कृतिक सरंजामशहा म्हणा, किंवा वाया गेलेलं पोट्ट म्हणा, पण त्याच वेळी हेही लक्षांत घ्या की इथियोपिया सह, जगांतले जवळपास प्न्नास देश मी पालथे घातले आहेत एक पर्यटक म्हणून..आणि कुठेही, इथल्याइतक्या तक्रारयोग्य बाबींची भलीमोठी यादी मी वाचल्याचं मला स्मरत नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे निष्क्रीय आणि अनिच्छासक्त आणि स्थितिप्रिय भारत !! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar .

Monday, April 8, 2013

थोरांचे थेर

थोरांचे थेर आजकाल सजग वृत्तवाहिन्यांमुळे सगळं जग, हीना-दीनांच, एकसमयावच्छेदेकरून, आपल्या दिवाणखान्यांत क्षणोक्षणी दाखल होते असतं. अगदी ’चक्षुर्वैसत्यम्‌’ स्वरूपांत. फक्त इथं चक्षू असतो छायकाचा, कधी उघड तर कधी ’तहलका’ पद्धतीचा.. ’छुपा’ यांतलं दीनांच्या जग बहुतेक प्रेक्षकांना माहीत असतं कारण ते, म्हणजे जनसंख्येनं जवळपास ७५ ते ८० प्रतिशत, सर्वसामान्यांचं जिणं जगत असतांना त्या जगाचांच एक घटक असतांत. त्यामुळं त्यांना त्याचं अप्रूप नसत. फक्त ती समवेदना, समदु:खी बघून स्वत:च दु:ख हलकं करण्याची एक सुविधा म्हणून सुस्कारे सोडीत, चुक्‌चुक्‌ करीत, असले कार्यक्रम किंवा वृत्तांकनं बघितली जातांत. पण हीनांचं, म्हनजे हीन प्रवृत्तींचं दर्शन अशा वृत्तांकनांतून घडतांना, या हीन प्रवृत्तींच्या सीमा जेंव्हा थोरामोठ्यांपर्यंत विस्तारलेल्या समोर येतांत, तेंव्हा मात्र हे ’दीन’ थक्क होतांत’ ज्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती, प्रीती, नाती बाळगलेली असतांत ते, ’अशा’ प्रकरणांत गुंतलेले पाहाणं खूप कठीण होतं सर्वसामान्य जनांना ! कांही उदाहरणं... आनंदांत कसे जगावे किंवा जीवनांत कसे यशश्ची व्हावे वगैरे, जनसामान्यांच्या ’स्वप्नां’ना पंख देण्यासाठी , सुरुवातीस छोट्या समूहांसमोर, शब्दसांभार उधळून, जखमेवर फुंकर मारल्यासारखे करणारे एक बाबा, पुढेपुढे, जरा नांव कमवायला लागल्यावर, मोठमोठ्या सभागृहांमधे देशांत प्रमुख शहरांमधे, किंवा परदेशांत, मसीहा असल्यासारखे हिंडायला लागलेले पाहिले आणि माझ्या मनांत एक विचारांचं वादळ उठलं. हे ’बाबा’ शहरांत किंवा परदेशी जिथं, धनिकांची वस्ती जास्त आहे अशीचं ठिकाणं कां बरं निवडत असावेत ? कारण, ’जिथं संपत्तीचा पूर आणि अति श्रीमंती, तिथ कायमच हुरहूर आणि भीती’ हे सर्वमान्य वैश्विक विधान ठरावं इतकं सत्य आहे ! रोजी-रोटी कमावण्यासाठी कांहीच कष्ट करावे लागत नाहीत, मग करायचं काय ? मग सगळी ’करमणूक’ क्षेत्र ढुंदाळून झाल्यावर ही धनिक मंडळी कधीकधी वेळ घालविण्यासाठी असल्या बाबाफिबाच्या मागं लागतांत. पुढेपुढे अशा बाबांच्या प्रवचनांना उपस्थिती, ही एक प्रतिष्ठेची बाब होवून बसते आणि मग हे (संधि)साधू आपले ’रंग’ दाखवायला सुरुवात करतांत, आश्रम काढतांत, अध्यात्मिक दौरे आयोजित करतांत, वनुअषधींच्या नांवाखाली अनेक घातक गोष्टींचा चक्क ’व्यापार सुरू करतांत. हे आपन सगलं जवलपास रोज ऐकत वघत वाचत असतो. जनावरांच्या गुरकावण्यापेक्षा जशी हाकार्‍यांचीच आरडाओरड जास्त असते तसंच काहींसं खर्‍या विभूती आणि शिष्य़गणं(ग) यांचं असत. ते बिचारे अशा, त्यांच्यातल्या कांही अनिष्ट प्रवृत्तीच्या ’भोंदूंमुळे नाहक बदनाम होतांत प्राचार्य कै> राम शेवाळकर हे माझे ज्येष्ठ मित्र, समुपदेशक, विद्वान सल्लागार वगैरे.. त्यांचं एक वाक्य माझ्या कायम स्मरणांत आहे. ते म्हणायचे, ’लोकं आपल्याबद्दल बरं वाईट बोलतांत ना ? बोलू द्यावं त्यांना.. आपलं काम आपल्याबद्दल खरंखरं काय ते बोलतं.. बोलतं त्यापेक्षा दिसतं !’ अशा वक्ता दशसहस्रेषु व्युत्पन्नाच्या काळांत त्यांचा सहवास लाभावा, ओघवतं ओजस्वी अस्खलित वक्तृत्व कानावर पडाव आणि आज ते गेल्यावर कांही वर्षांतच ’वक्तादशसहस्रधारे शू’ अशा नेत्यांचे जनसामान्यांना बोल लावणारे बोल कानी पडावे ? हाय रे दुर्दैवा !! थोरांचे का हो ’असे’ अखेरिस होते ? थेरांचे त्यांच्या अवडंबर माजते कुणि सनई त्यजुनी सुंद्री फुंकित बसतो अन्‌ मृदंग सारुन टिमकी बडवित गातो सूर्यास दावुनी ’पाठ’ उजळु जग पाही जलधीची सोडुन साथ. ओंजळित राही कपिलेस जखडुनी कुणी वराहा पुजितो रुप्प्याचे ढकलुनि पात्र करटि चाटितो कुणि अभिनय करतां खराच ठोसा देई किंवा कोणाला कवळुन ’बोसा’ घेई विस्मरुनि वास्तवा तसाच वाहवत जाई कां भुरळ घालते ’अतिरेका’ची घाई ? मग अश्रू ढाळित भीक दयेची मागे आढ्यता प्रतिष्ठा तोडुन सगळे धागे कुणि संस्कारी, कुणि साक्षात्कारी विभुती फासते अंगभर कुणी राख अन्‌ माती वर जाता माया, मोह खेचती खाली बदलते क्षणांतच देहाची अन्‌ बोली भक्तांच्या भावा, ’जोगी’ दाखवि धुनी मग चिलीम फुंकित हसतो सगळे लुटुनी वरकरणी निगर्वी, शांत नि भोळा, साधा, जरि हात जोडि.. तो असतो भाई, दादा उच्चपदस्थ कांही कमरेखाली ढिले वलयाला त्यांच्या असती जन भुललेले स्वग्रामी जाता, कुणी वीर वा नेता कांपतांत नवत्या पोरी न्हात्या-धुत्या कुणि नशा नसेंतच टोचुन घेई ’हस्ती’ कुणि मारझोड करि ’टाकुन’ बरीच ’जास्ती’ हे कतघ्न ढकलिति शिडीस अगदी सहज, कां चढतो यांना यशश्वितेचा माज ? कुणि वनांत जाउन उगा मारे चिंकारा ’कायदा ? काय ? कोठला ?’ लाज ना जरा.. कुणि ’धुंद’ होतं वेगाने हाके वाहन पदपथावरिल ’गरीबां’ला देई मरण मग उजेडांत हा येता प्रकार सगळा, तर्जनी घालतो मुखांत ’साधा भोळा’ ’जनहितार्थ अर्जी ’ होते दाखल कोठे ’तो’ देई वकील लढण्या मोठेमोठे न्यायमंच बसतो, शोधित साक्षि पुरावे, ’तो’ निवांत हसतो ’बॉलीवुड’च्या गांवे कुणि करूं पाहातो दुष्कालावर ’विधी’ अन्‌ अनुदानाचा सहजच निगळे निधी की खुर्ची यांच्या जिभेस देई वेगा ? अन्‌ निलाजरे जन कां हो हसती ? सांगा ! कारणे सांगती जनवृद्धीची ’भारी’ ही वांती झाली इंदापुरिच्या द्वारी कुणि नेता कांही बाहीं सभेत बोले’ थोबाड विचकुनी ’चमचा-समूह’ डोले कुणि ’गुर्जी’ ओढी शिष्या शेजेवरती दावया धाक कुणि आहे अवतीभवती ? किंकाळि वेदना घुमते हवेंत, विरते.. दाबाया ’प्रकरण’ सज्ज यंत्रणा येथे तोफां-रणगाडे ’खोक्यातुन’ कुणि मागे कुणि निलाजरा अध्यक्ष ’लक्ष्य’ अन्‌ भोगे चाटण्या लोणि ना हुतात्म्यांस सोडिति ? पिंडांचे गोळे आधाशि हे, ओरपती ! गल्ली ते दिल्ली असेचं चालायाचे ? गर्तेच्या खाइत स्वत:स गाडायाचे ? *****

Thursday, March 28, 2013

जगण्याचा ’३१ मार्च’

जगण्याचा ’३१ मार्च’ परवा, माझा शाळेंतला वर्गमित्र भेटला. शाळेंत असतांना खूपच हुशार होता तो. इतका की त्याला एखाद्या विषयांत मिळालेल्या गुणांपेक्षा मला सर्व विषयांत मिळालेल्या गुणांची बेरीज सुद्धा कमी असायची. अर्थातचं तो वार्षिक परीक्षेंत पहिला तर आम्ही कांही दयार्द्रहृदयी गुरुजनांच्या कृपेने, वरच्या वर्गांत ढकलले गेलेले... असो.. तर त्याला म्हटलं ’बर्‍याच दिवसांनी भेटतोय्‌ आपण.. आज संध्याकाळी ये ना घरी ! जरा बसू...गप्पा मारत..’ (आजकाल हे स्पष्ट करायला लागतं नाही तर लोक कांहीबाही अर्थ काढीत बसतांत उगा !) तर म्हणला, ’नको बाबा मार्च अखेर आहे. सगळे हिशेब चुकते करून ताळेबंद करायचाय्‌. एका पैशाची तफावत झाली तर सरकारी हिशेब तपासनीस जीव खातांत..’ ’ठीकै बाबा.’ म्हणून निरोप घेतला आणि बोरकर..’बाकीबाबां’च्या दोन कविता आठवल्या,पहिली विझवून दीप सारे, मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया आणि दुसरी आतां माझ्या व्यथाकथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषण, ना ये मलाच सांगता मनांत आलं ! जगण्याच्या अखेरच्या दिवशी, सगळ्यांनाचं ताळेबंद द्यायचा असतो आपापल्या कर्मांचा, पाप-पुण्याचा... नाइतरी, कविवर्य रॉय किणीकरांनी त्यांच्या रुबायांमधे म्हटल्या प्रमाणे इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती तेंव्हा, आपण इतिहास घडविला की तुडविला ? त्याची नोंद झाली किंवा नाही ? सऽऽगळे जमा-खर्च स्मरून.. सगळे हिशेब द्यावे लागतांत बंद करून खाती, टांक मोडून जावं लागतं, सोडून नातीगोती मोह, माया, द्वेष, मत्सर, ममता, प्रेम, लळा, नावं वेगळीवेगळी तरी खेळ खोटा सगळा भाता वर-खाली तोवर ’तेवर’ उधळायचे धकधक थांबली की मग फक्त ’लाकूडं’ उचलायचे पण या हिशेबांत राहून जातो मरण्याला आलेला खर्चं म्हणतील, ’कसं फेडायचं हे ? थोडं कां झालय्‌ घरचं ?’ कारण अहो.महागाईच्या तापल्या तव्यावरचं.. महागलय्‌ मरण सुद्धा, दमड्या लागत्यांत लई पड झड, रोग राई, हजार तोंडांची खाई तपासणी अन्‌ औशीधपाणी, देतय कोण फुकाट ? कद्रावलेले आप्त, पाहून मरनारा जातो मुकाट लहानग्यांन्ला वाढवायचं की म्हातार्‍यांना जगवाय्‌चं ? उलटुन पडतोय घास, पाणी तरी बळं भरवायचं.. उर्ध्व लागला तरी लावत्यांत नाकाड्यावर नळी इस्पितळाची भर करायला उभी दागदरांची फळी ’मुलग्याला यायला येळ लागल ? ठेवा शीतगृहांत’ माती झाली तरी सैल सोडावा लागतुया हात तिरडीचे बांबू नि निखार्‍याला कोळसा, नाई सस्त सुतळ बी आवळायला ’वासा’ आता नाही येणे जाणे, गात वरात निघते, भजनी नी टाळकरी का भौ फुकटांत येते ? चिरीमिरी द्यावी लागते, भेटायला ’पास्‌’ जगन्याला तर हायेच, पर मरनाला बी त्रास ? तूप साजुक किरवंत मागतोय्‌ ’धाडतो’ म्हनतोय्‌ ’स्वर्गांत’ डोरल्यांतल्या वाट्या बी हळूच घालतांत खिशांत सरणावर लाकुडफाटा अखेर लागतोचं जाळाया कवटी फुटेस्तोवर कोण असतो आंसवं ढाळाया ? द्या फेकून रानांत, विसरून सुरकुतलेले हात आजचं जिणं जगून घ्या, कशाला उद्याची बात ? कोल्ही कुत्री ’मातीमोल’ खाउन, देतिल तरी दुवा उरल्यासुरल्या तुकड्यांच मुंग्या करतिल रवा आत्मा म्हनं जातो वर आभाळांत वस्तीला तितं कुठं जागा हाई ? गर्दी आलिया भरतीला ! एखादी सकाळ उजाडते मळभ घेवुन मनांत प्रष्ण उठवतो काहूर, घुमतो स्वत:च्याच कानांत आयुष्य अंगावर येतय्‌ मित्रा ! संपायचं कधी रे सगळं ? आंतल्या आंत कोंडतोय जीव ,चावी गहाळ, बाहेर नुसतच टाळं जगण बरोबर घेऊन आलय, मरणाचा वसा , म्हणून भोगला हरेक क्षण, भरून घेतला पसा खोटं खोटं जगायला खरीखरी हवा नि श्वास नवी वस्त्र ? नको.. आतां ’कोर्‍या’चाच ध्यास तिकाटण्यावर नको मडकं.. नको कर्मकांडं आलं तसच जाऊद्या गळक फुटकं भांड तुझी मदत काय मित्रा, या ’कार्यांत’ होणार आसवं गाळणारे सगळे माघारी घालवणार ? आपल्या माघारी उरलेल्यांना, आपलं मरण हा ’आंत बट्ट्याचा’ व्यवहार वाटू नये म्हणून मग म्हणायचं.. ( ही भावना, मी माझ्या ’नक्षत्रांचे दिवस’ या नव्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडली... की सांडली म्हणू ? पण आहे ! ) मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी ***** परत रॉय किणीकर.. हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ, या विदूषकाला नाहि रडाया वेळं लावून मुखवटे नवा खेळ चल लावू सोडून सावल्या पडद्यामागे जावू पडद्यामागे जावू

Wednesday, March 20, 2013

योग्य तेच जाणावे.. *******

ते दयार्णव, भूतमात्रांना स्वत:च्या तोंडचा घास काढून भरविणारे, एकनाथ, नामदेव, तुकोब्बादि संत कुठे आणि आटले स्रोत ओसाड जाहली गांवे, चिडिचाप वळचणी एकाकी अन्‌ दावे भुइ भेगाळलि तापले चहुकडे वारे, निष्पर्ण शाख अन्‌ सताड उघडी दारे पेटती रोज वडवानळ रानोमाळी, दुष्काळ, अवकळा, विदीर्ण अंतर जाळी अशा भीषण परिस्थितींत कुणि नालायक भक्तांना घाली न्हाऊ, अन्‌ म्हणे ’चला ! ओलेती राधा पाहू’ बांधा मुसक्या अन्‌ बसवा गर्दभ अंकी गेला हा तरिही राहिल वृत्ती बाकी तुकयाच सांगितो, ’हाणा पैजाराने, का ? जगावेच कां ? ऐशा नराधमाने ?’ सुज्ञांस याहू्नी जास्त काय सांगावे अभ्यासुन उक्ती, योग्य तेच जाणावे योग्य तेच जाणावे.. *******

Tuesday, March 19, 2013

मीनाताईं ’शब्दांच्या पलीकडले

दुपारी खूप उशीर झालाव्‌ता.. सकाळी १०ची शिफ्ट आहे असा निरोप मिळाल्यामुळं बहुतेक सगळे वाद्यवादक हजर झाले होते तासभर झाल्यानंतर चुळबुळ सुरू झाली त्यांतल्या ज्येष्ठ मंडळींच्या ’कंपू’त..’ये कौन काकतकर है ? उसको मालूम है ना के एक मिनिट ज्यादा हुवा तो दूसरी शिफ्ट्‌ का भी पैसे देने पडेंगे.. हम दूरदर्शन वगैरा नही जानते.. हमे हमारा पैसा इंडस्ट्रीके रेट्स्‌नुसार मिलनाही चाहिये.. और अगर काकतकरने नही दिया तो देख लेते है उसको...’ अस्वस्थता आतां अशी धमकीवजा शब्दांत उतरायला लागली.. फिरोजशहा मेहेता रस्त्यावरच्या HMVच्या ध्वनिकलागाराबाहेर एक एक जण जावू लागला कुणी वडापाव तर कुणी तंबाखू चोळायला तर कोणी पान चघळायला.. कोण बोलणार ? कारण वाद्यवादक ही जमात त्याकाळी, भल्याभल्या संगीतकारांना पण आवरत नसे इतकी त्यांची, म्हणजे जमातीची एकजूट भक्कम होती..( त्या काळी माझ्या, २३, मुकुंद निवास या, राहात्या दादरच्या घरा आगेमागे दोन प्रसिद्ध वाद्यवादक राहायचे.. समोर शहासदन मधे प्रभाकर जोग आणि पाठीमागे सीकेपी हॉल्‌शेजारी परशुराम बिल्डिंग्‌च्या कौलारू भागांतल्या एका छोट्या खोलींत, पार्सेकर.. श्रीधर पार्सेकरांचे बंधू... दोघेही अप्रतिम व्हायोलीन्‌वादक.. आणि मी करीत असलेल्या वर्णाला अपवाद ठरावेंत असे) बाबूजी.. अण्णा सुधीर फडके तर त्यांना ’दैत्य’ म्हणायचे... सगळे आपापल्या ’हुनर’मधे अत्यंत वाकबगार होते. पण एका सडक्या सफरचंदाची ’लागण’ टोपलींतल्या इतरांना होते ना ? तशी कांहीशी गत झाली होती या ’जमाती’ची.. कारण एरवी सर्वसामान्यपणे गाण्याची साथ आणि ’Take' साठी साथ यांत जमीन आस्मानाचा फरक असतो.. बीट्‌ टू बीट्‌.. बार‌ टू बार्‌.. वाद्यमेळ संयोजकानं आखल्याप्रमाणे त्या वाद्यावर तेवढा स्वरसमूह वाजवायला लागतो.. जरा इकडतिकड झालं तर परत पहिल्यापासून.. म्हणजे त्या काळी तरी.. १९८४मधे अशीच आजकालच्या मानानं ’असुविधा’ होती. पैसे खूप मिळायचे वाद्यवादकांना.. इतके की संगीतकार बस आणि लोकल्‌नं तर निरोपे म्हणजे ’मेसेंजर्‌’ आणि वादक त्यांच्या स्वत:च्या ’शोफर’चलित चारचाकी वाहनांतून अशी अवस्था होती.. त्यामुळे आजकाल इलेक्ट्रॉनिक्‌ वाद्य विशेषत: ’सिंथेसाइझर्‌’ आल्यापासून संगीतकार, वाद्यमेळ संयोजक यांनी हुश्श केलय. आतां आकुस्टिक्‌ ची सर.. म्हणजे चर्मवाद्य(तबला, ढोलकी, खंजिरी, डफ), तंतुवाद्य(सतार, सारंगी, व्हायोलिन्‌, दिलरुबा, संतुर), फूंकवाद्य‍(क्लॅरिनेट्‌. बांसरी, सनई, सुंद्री, सॅक्साफोन्‌) यांची सर आणि त्या स्वरांतला आत्मा इलेक्ट्रोनिक्‌ वाद्यातून मिळवता येणं श्यक्य नाही पण त्या .जमाती’च्या छळवादापेक्षा हा Compomise’ स्वीकारतांत बापडे.. बरं आतां तांत्रिक सुधारणांमुळे चुकलेले तुकडेतुकडे वेगवेगळे भरतां येतांत सुधार करून.. त्यामुळं सगळ्यां ’फौजे’ला एकत्र बोलाविण्याचं कारण नसतं.. तर जवळ जवळ दीड तासानं दिदी प्रवेश करत्या झाल्या, कारण, मीनाताईंच्या ’शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी दिदी गाणार होत्या ’माणसाला पंख असतांत’ या, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(१९७४) पहिले मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध मराठी लेखक ’ययाती’कार वि.स. खाडॆकरांच्या कथेवर आधारित चित्रपटांतलं एक गाणं ! ’ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’.. एक दलित तरुणी सामाजिक अन्यायाला कंटाळून करुणा भाकतेय देवाची... समाजरूपी सागरांतल्या, आजूबाजूनं जाणार्‍या होड्या, बोटी यांच्याकडून दुर्लक्षित बेटाप्रमाणं. असं दृश्यांकित रूपक साधणारा प्रसंग. गाण्याच्या ध्वनिमुद्रिका Out of Stock झाल्याव्‌त्या त्यामुळं पुनर्ध्वनिमुद्रण अनिवार्य होतं इतक्या वर्षांनी म्हणजे १९८४ मधे.. दिदी ध्वनिमुद्रणाला कलागारांत पोहोचल्याबरोबर सगळी चिडीचाप झाले. इतर चौकशी करतांना दिदींच्या कानावर वाद्यवादकांची कुरबुर पोहोचली.. वापरलेली भाषा, धमक्या..यासह. दिदींनी सगळ्या वाद्यवृंदाकडे एकदा पाहिलं. ऐंशी टक्के चेहेरे वरमले.. कारण दिदींची नाराजी किती नुकसानीची ठरू शकते याची त्यांना कल्पना होती. मधले व्हायोलीनचे स्वरसमूह अमरनं.. अमर हळदीपूरनं वाजवले.. क्या बात है.. मींड, मुरक्या.. सबकुछ लाजवाब. एका उत्तम गीताच, साक्षांत सरस्वतीच्या कंठातून अवतरलेलं स्वरस्वरूप ऐकायला मिळालं आणि धन्य झालो..पुनश्च.. आरोही नंतर ! कार्यक्रमासाठी मीनाताईंनी माझंही एक गीत निवडून मला आयुष्यभराचं ऋणी करून ठेवलं, ’आनंदघन क्षणांचा रावा दुरून यावा’ असे होते शब्द आणि गायलवतं श्रीकान्त पांरगांवकरनं, शिवाय ’सुरसुखखनि, तू विमला’ या नाट्यपदावर आधारित, शांताबाईंनी लिहिलेलं , तू असतां मज संगे..’ हे भावगीत आणि कांही बालगीतं उषाताई, विनय मांडके आणि सुरेशनं.. वाडकरांच्या... गाइली होती. ’असावा सुंदर चॉक्‌लेट्‌च बांगला’ गायलावता आरती काकतकर आणि दामले आणखी एक अशा तीन बालगायकांनी. या गाण्याचे मूळ गायक योगेश आणि त्याची लहान बहीण, बसले होते प्रेक्षकांत, शांताबाई आणि साक्षांत दिदींबरोबर. मीनाताईंनी सुरसुखखनि थेट बाबांच्या.. मास्टर्‌ दीनानाथांच्या ढंगात गायलं आणि ’ये जवळी..’ची मूळ बंदिश, ’ए सुगुराई..’ दिदींनी सादर केली मीनाताईंच्या कांही आठवणी सांगतांना.. गाण्या आधी.. मी विचारलं, ’दिदी, स्वर द्यायला सांगू कां अमरजींना ?’ माझ्याकडे पाह्यलं त्यांनी.. एक मंदस्मित केलं.. मी काय समजायचं ते समजलो आणि गप नियंत्रण कक्षांत पळालो.. सर्व वर्णन वाचल्यावर, कार्यक्रम किती उच्चकोटीचा झाला असेल हे मी सांगायची आवश्यकतां भासू नये नाही कां ? दुर्दैवानं हा कार्यक्रम दूरदर्शन कडे नाही.. पण माझ्याकडे प्रत आहे त्याची.. *****

Saturday, January 26, 2013

मनाला सुख-शांती देणारं ’धन’

’मनमोकळं’.. *** परवा, एका दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीमधे, भविष्यांच सदर, केवळ सवयीनं चाळतांना, माझ्या भविष्यांत, ’अचानक धनलाभ’ असं भविष्य वाचलं आणि हसूं आलं. अहो ! इतक दैव बलवत्तर असतं तर, अशी दांत कोरून पोट भरायची पाळी कशाला आली असती ? पण ’अहो आश्चर्यम्‌’.. खंरच झाला की हो ’धनलाभ’. आतां धन कशाला म्हणायचं हा ’ज्याचा त्याचा प्रष्ण’ नाही कां ? ’सोने-चांदी आम्हां मृत्तिके समान । देखता विठूला हरपते भान ॥’ म्हणणार्‍या महाराष्ट्रीय संतांच्या मांदियाळीला, ते ’सावळे परब्रह्म, आवडे या जीवा ।’ म्हणजेचं मनाला सुख-शांती देणारं तेच ’धन’.. माही कां ? एखाद्या माउलीला, कडेवरच्या छकुल्याच्या ओठावर फुललेलं हंसू, तर बाबा आमट्यांसारख्या ’संता’ला कुष्ठरोग्याच्या जखमा धुतांना मिळणारं समाधान हेचं धन ! अगदी निर्विवाद... तर त्याचं झालं असं की, मी जेंव्हा दूरदर्शनमधे कार्यरत होतो, त्या काळी घरगुती दृकश्राव्यमुद्रक...Domestic Video Recorders फारसे प्रचलित नव्हते असले तरी ते घरी आणणं आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखही नव्हत. आपण करीत असलेल काम पूर्ण झाल्यावर, ते तटस्थपणे पाहायची संधी म्हणजे तो कार्यक्रम जेंव्हा प्रक्षेपित व्हायचा तेंव्हा आणि तेंव्हाच ! कारण Off-Telecast recordong सुविधाच नसायची स्वत:कडे. कार्यक्रम निर्मितीची नशा एव्हढी असायची की निर्मिती दरम्यान साधी छायाचित्र काढून ठेवण्याचंही भान नसायचं. आजकाल 'Making' चं record ठेवण्यासाठे एक स्वतंत्र युनिट्‌ असतं म्हणे... कालायतस्मै:नम: त्यामुळे, हे ’वेचोनि धन’ आणण्यासाठी गेल्या कांही वर्षांत मी माझ्याच कार्यक्रमांच्या शोधांत झोळी घेवून हिंडतो आहे आणि बर्‍यापैकी (दृक्श्राव्य)माया जमविली आहे त्यांतून. अशाच शोधांत असतांना सुप्रसिद्ध लेखक, आपल्या लिखाणाच्या महतीनं राष्ट्रीय स्तरावर वाचकप्रियता कमावलेले, शिवाजीराव सावंतांच्या मुलाखतीचा, १९८५ मधे ’प्रतिभा आणि प्रतिमा’ साठी चित्रित केलेला.. कार्यक्रम मिळाला..मुलाखत चित्रित केली होती सिंव्हगडाच्या कल्याण दरवाज्यांत त्यांना आणि मुलाखत घेणार्‍या दोन संवादक.. कै. कविवर्य रविंद्र भट आणि माझे एक सन्मित्र ज्यांच्यामुळं माझा शिवाजीरावांशी वैयक्तिक परिचय झाला तें, विजय केसकर.. असे तीघे आणि कांही कुटुंबीय मंडळींना नेवून. चित्रीकरण चमूंत छायाचित्रकार श्रीकांत पुराणिक, आणि ध्वनिरेखक मुकुंद येवलेकर.. एक सहायक अभय काटे आणि मी स्वत: असे चारजण होतो. एका इतिहास-तज्ज्ञ लेखकासाठी याहून सुयोग्य पार्श्वभूमी चित्रीकरण स्थळ मलातरी त्यावेळी सुचलं नाही बुवा ! प्रतिभा आणि प्रतिमा या कर्यक्रमाच्या चित्रीकरणांत कांहीतरी वेगळ, वैविध्यपूर्ण करायला हवं या ऊर्मींतून, ’लेखकाला कलागारांत न बोलविता दूरदर्शननच लेखकाकडे जायचं ठरवलं. या आधी असा प्रयोग मुंबई केंद्राच्या अगदी सुरुवातीच्या आठवड्यांत आम्हीचं, म्हणजे निर्माते केशव केळकर आणि त्यांचा सहायक मी, मिळून केला होता सुप्रसिद्ध लेखक बाबूराव बागुल यांची प्रतिभा आणि प्रतिमासाठी मुलाखत चित्रित करतांना..किंवा कविवर्य आरतीप्रभु तथा चं.त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यावर आधारित ;गेले द्यायचे राहून’ या कार्यक्रमाच्या निर्मितीवेळी.. कृष्णधवल, सेल्यूलॉइड्‌ फिल्म्‌वर, किंवा १/२ इंच्‌ ओपन्‌ स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ मुद्रकावर चित्रीकरण करून... शिवाजीरावांच्या दारांत जावून आम्ही ’टक्‌टक्‌’ केलं आणि मग शिवाजीरावांनीच सुहास्य मुद्रेनं आमचं स्वगत केलं. कांही प्रष्णोत्तरं झाल्यावर मग ’मृत्युंजय’ आणि ’छावा’ या दोन कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानचे त्यांचे अनुभव चित्रित करण्यासाठी जवळच असलेल्या सिंव्हगडावर आपण कां जावू नये ? असा प्रस्ताव मी मांडला.. आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही सर्वजण गडाच्या कल्याण दरवाज्यांत.. जिथं वर्दळ कमी असते तिथं जावून छान बसायची जागा शोधून चित्रीकरणाला सुरुवात केली. मला इथं या कार्यक्रमांतल्या ध्वनिमुद्रणाच्या उत्कृष्टतेबद्दल विशेष उल्लेख करायलाच हवा, कारंण गडासारख्या उंचावरच्या बाह्यचित्रीकरण स्थळी, वातावरणांतील कुठल्याही इतर आवाजांचा Ambiance.. कुठलाही त्रास ऐकणार्‍याला होवू नये अशा पद्धतीनं तो आमच्या मुकुंदानं... मुकुंद येवलेकरनं.. तो मुद्रित केला होता. कधी संधी आलीच तर मजकडे असलेल्या या कर्यक्रमाचा जरूर लाभ घ्या खूप छान मुद्दे मांडलेंत शिवाजीरावांनी या कार्यक्रमांत पौराणिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानच्या अनुभवांबद्दल आणि एकूणच आगामी संकल्पाबद्दल, साहित्य चळवळीबद्दल ! ’रामायण’ हे आयुष्य कसं असावं हे सांगत तर महाभारत हे आयुष्य कसं असतं हे सांगतं.. महाभारतावर कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना मोकळ आकाश होतं पण छावा सारखी ऐतिहासिक कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना, नोंद झालेल्या प्रत्येक घटनेची, प्रत्यक्ष प्रसंगाची वेसण होती, त्यामुळं मृत्युंजयमधली भाषा अधिक लालित्यपूर्ण करतां आली आणि छावा मधल्या भाषेचा लहेजा वेगळा ठेवावा लागला.. त्यांत सुद्धा राजघराण्यांतल्या पात्रांच्या तोंडची आणि सर्वसामान्य मावळे सैनिकांच्या तोंडची भाषा यांतला फरक लक्षांत घेवून, ते भान ठेवून संवाद लिहावे लागले..’ खूप छान आणि अत्यंत शांतपणे मुद्दे मांडत , त्यांचं विवे्चन विश्लेषण करतकरत संवाद सहज खुलत होता.. चित्रीकरणाचे तीनचार तास कसे संपले हे कळलचं नाही... आणि मग सगळ्यांच्या पोटांत कावळे कोकलायला लागल्यावर आम्ही गडावरून पायउतार झालो.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Tuesday, January 15, 2013

’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’

’मनमोकळं’.. ( तुषार जी कृपया..) *** मोठ्या उत्साहानं योजलेल्या आणि पार पाडलेल्या एखाद्या कार्यक्रमाचा, अतर्क्य मानसिकतेचे प्रेक्षक असा फज्जा उडवितांत. म्हणजे आज ’Big boss आवडीनं पाहाणार्‍या आणि त्यांतला 'इमाम’ नांवांच्या सद्‌(?)गृहस्थांचा, अक्षरश: ’नंगानाच’ लाळा गाळत 'Enjoy' करणार्‍या प्रेक्षकांनासुद्धा मान’सिक’(Sick)तेची परंपरा आहे बरकां ! ज्या वृत्तपत्रानं, १९६३ मधे, मझ नांव, NDA, 31st Courseच्या Batch मधे, जे केवळ दोन उमेदवार ग्वाल्हेर एअरफोर्स्‌ सिलेक्शन्‌ सेंटर्‌ क्रमांक ३ मधून, Officer's Potentiality Test आणि Pilot's Aptitude Test यशस्वीपणे उत्तीर्ण होवून, वायुदलासाठी निवडले गेले त्यांतला एक म्हणून, माझं नांव गौरवानं छापलं, त्यांच वृत्तपत्रांत बरोबर वीस वर्षांनंतर, ’आरोही’संदर्भांत, अर्थाअर्थी माझा कांहीही प्रमाद नसतांना, भलंबुरं छापावं याचं खूप वाईट वाटल..! असो.. पण, प्रत्येक कार्यक्रमांतून, भेटलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वांच्या सहवासांतून, आम्हा सर्व तरुण, अननुभवी पण ऐकण्या-शिकण्याची जबर मनिषा बाळगून असणार्‍या निर्मात्यांची, ज्ञानवृद्धी होत होती.. नकळत ! ’आरोही’च्या दरम्यानं, असचं एकदा पंडित नरेन्द्र शर्मांनी सांगितलं, ’राम और रमा.. पति-पत्नी ! लेकिन भेद कैसा व्याकरणाधारि शब्दसूचित होता है, जानते हो ? राम मे ’र’ यह शक्तिरूप कठोर व्यंजनको आकार दिया गया है, क्यौंकी राम है पुरुष और रमा मे ’म’ जैसे ’मृदु’ व्यंजनको मिला है आकार स्त्रीत्व अधोरेखित करने हेतु. समझे ?’ मनांत म्हटलं आणि प्रत्यक्ष उच्चारलं सुद्धा, विनम्र होवून, ’त्रिवार-वंदन पंडितजी, त्रिवार वंदन.. !’ आतां थोड तंत्राविषयी.. चालेल ना ? १९८१ मधे, कलागारांत एकाच नेपथ्यावर, बहुछायक पद्धतीनं.. Multy-Camera.. पद्धतीनं चित्रितकेलेल्या, कविवर्य सुरेश भटांच्या, कृष्ण-धवल कार्यक्रमांतली दोन छायाचित्र सोबत देत आहे. एक वाइड्‌ अँगल्‌ लेन्स्‌नं घेतलेलं दृश्य ज्यांत, भटांबरोबर देवकी पंडित, श्रीकान्त पांरगांवकर आणि निमंत्रित प्रेक्षकांऐकी कांहीजण दिसताय्‌त, तर दुसरं कॅमेरा झूम्‌ इन्‌ होत फक्त भटांवर केंद्रित झाल्यावर, Fore-ground, soft-focus झालेलं दिसतय. हीच तर गंमत आहे झूम लेन्स्‌ची. अपेक्शित दृश्य समीप जावून दाखवितांना ती आपोआपच बाकीचा, पुढचा-मागचा सगळा फापटपसारा, अंधुक किंवा धूसर करून टाकते. या कार्य क्रमांतल्या सुरेश भटांच्या दोन रचना.. गझल नव्हेत..सुधीर मोघ्यांनी संगीतबद्ध केल्या होत्या. पहिली रंगुनी रंगांत सार्‍या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यांत सार्‍या पाय माझा मोकळा या रचनेंतली एक ओळ तर फारच, ’लाजवाब’ आहे. अगदी भटांच्या अंतरंगाच आणि, स्वत:ला ’भवसागरा’च्या खाईंत लोटतांना, संसाराच्या फाटल्या शिडाच्या फुटक्या होडींत, तुटक वल्ह मारीत, धडपडत, आक्राळ-विक्राळ लाटांमधे पडायला झांलंच तर गटांगळ्या खात, जिवाच्या करारानं ’पैल’ गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य माणसांचं यथार्थ चित्र डोळ्यासमोर उभं करणारी, ’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’ माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा’ तशीच आणखी एक पंक्ती त्यांच्याच एका धगधगत्या रचनेंतली, गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे.. सद्य परिस्थितीतच नाही तर, माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या हृदयांतला अंगार, जिथंजिथं म्हणून सत्तेकडून पिळवणूक होते तिथंतिथं शब्दरूप धारण करीत, कालांतीत झालेला, ... जगभर सर्वदूर.. आणि दुसरी दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले, थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले’ वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली . .मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन्‌ माझी हांक तुझ्या अंतरांत हुरहुरेल तर या गझल कां नव्हत ? सुरेश भटांनीच सागितल्याप्रमाणे, ’रदीफ-काफियाचं Format जमला म्हनजे ग्झल लिहिता आली असं नाही आणि ते तंत्र जरी वापरलं असलं तरी प्रत्येक शेरला वेगळ अस्तित्व, आशय नाही.. कारण, ’रंगुनी’ मधे ’स्व’ सगळ्या शेरमधे तर ’मग माझा’ मधे ’ती’ सर्व(शेर)व्यापी.. !’ मला त्यांची एक गझल स्वरबद्ध करायची होती एका प्रकल्पासाठी म्हणून मी त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलो असतांना त्यांनी हे सांगितलं.. अं हं ! ’बजावलं’ होतं मला..अणि गझल निवडून दिलाव्‌ता स्वत:च्या नव्या संग्रहांतून... लागले डोळे तुझे माझ्याकडे अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे कधी योग आलां तर ’इंद्रधनुष्य’ या त्यांच्या संग्रहांतली, ही खरीखरी ’गझल’ म्हणता येईल अशी रचना नजरेखालून जरूर घाला. मी ती स्वरांकित केली आणि गिरिश जोशीनं ती गायली आहे त्या प्रकल्पासाठी आणि हो ! बर्‍याच रसिकांना माहिती नसेल कदाचित म्हणून सांगतो की, ’मग माझा’च्या आधीचे चार चरण, हे सुधीरनं, सुरेश भटांच्याच संग्रहांतून शोधून सुरुवातीला जोडले होते.. ते इतके चपखल बसले की क्या केहेने ! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Thursday, January 10, 2013

काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!

प्रेक्षकांची मानसिकता अभ्यासण्यासाठी, कार्यक्रम संकल्पनेच्या उंबरठ्यावर असतांनाच, त्याबाबतचा अभ्यास अर्थातच, Formative Research आवश्यक असतो हे खरं आहे, पण तो केल्यानंतर सुद्धा अंदाज कोलमडतांत, होरा चुकतो, हमखास यशस्वितेच्या आत्मविश्वासाची, आत्मप्रौढीची दांडी गुल होते, धुंदीचे इमले कोसळतांत पत्त्यांच्या बंगल्यांसारखे.. परवां परवाच्या, भारत-पाकिस्तान क्रिकेट्‌ सामन्यांच्या शृंखलेप्रमाणे... असच, माझ्या एका कर्यक्रमाबद्दल घडलं १९८३ मधे. ’आरोही’ या कार्यक्रमाच्या निर्मितीची सूत्र त्या वर्षी माझ्याकडे सोपविण्यांत आली होती. १९८०-८१ पासून पाठपुरावा करीत, चिकाटी न सोडता, ’प्रभुकुंज’शी आदरयुक्त स्नेहबंध जोडले होते.. फक्त ’मॉं सरस्वती’ ची आराधना हा एकच हेतू मनांत बाळगून. त्यांतून मग ८२ ला बाळासाहेब..हृदयनाथ मंगेशकरांचा.. ’शब्दांच्या पलीकडले’ साकारला होता. तो खूपच गाजला होता. माझीही भीड चेपत चालली होती. माझ्या २३, मुकुंद निवास या मुंबईतींल डबल्‌रूम्‌ मधे येवून, मंगेशकर, पेटी ओढून तासभर, मूडांत येवून गप्पांच्या ओघांत छान गाऊन जाणे इतपत मोकळेपणा उभयतांमधे रुजलाव्‌ता.. त्याच नात्यांतून मी प्रस्ताव मांडला, ’बाळासाहेब, ’आरोही’सुरू करायचाय.. पहिला कार्यक्रम दिदींचा असावा अशी मनोमन इच्छा आहे. शब्द टाकाल कां ?’ छान कल्पना आहे. सांगतो दिदीला. पन अडचण म्हणजे दिदी लंडनला आहे हो. पंधरा दिवसांनी येईल. चालेल ?’ मनांतल्या आनंदाच्या उकळ्यादाबत म्हटलं, ’चालेल ? पळेल, पळेल..’” मग लागा तयारीला’ चला ! बालेकिल्ला तर सर झालाव्‌ता. कार्यालयांत मानस आंणि मिळालेला ’होकार’ कळतांच सगळेच सुखावले.. हुरूप आला’गाणी कुठली ? नेहमीच्या घिसीपिटी चित्रपट गीत ? अं हं त्यापेक्षा ’आरोही’ला नवी ओळख देणारी, स्वराच्या पावित्र्यानं श्रोते-प्रेक्षकांची मनं उजळून टाकणारी, कबीर-मीरादि संत कवींची तीन, आणि पंडित नरेंद्र शर्माजी रचित दोन, अशी योजना केली बाळासाहेबांनी. संगीत अर्थातच बाळासहेबांचं.. ध्वनिमुद्रन ’बॉम्बे लॅब्‌’ च्या ध्वनिकलागारांत करायचं ठरलं. बहुतेक १५,१६,१७ जुलै ८३. दिदी जवळ जवळ १५/१६ वर्षांच्या ’गॅप्‌’ नंतर अवतरणार होत्या तिथं. तिथंही मंडळी आनंदविभोर होती. बी.एन्‌. शर्माजी.. मुख्य मुद्रक.. तर जवळ जवळ सद्‌गतींत झाले होते. मधून मधून बाळासहेब मला सांगायचे, ’ दिदीचा फोन आलाव्‌ता.. म्हणाली काकतकरांना सांगा मी नक्की येतेय्‌.. कालजी करू नका..’ हे म्हणजे, सुदाम्याच्या झोळींत, हिरेजडित-सुवर्णपात्रांसह पंच पक्वान्नांच भोजन-दान पडल्यासारखचं होत बॉ मला तरी..! मुद्रनाच्या पहिल्या दिवशी सगळे उच्चश्रेणी वादक, वाद्यमेळ संयोजक अनील मोहिलेसह वेळेंत हजर झाले. दिदी आल्या. शर्माजी..बी.एन्‌.. नी पुष्पगुच्छ देवून स्वगत वगैरे केलं. व्हॉइस्‌-रूम्‌ मधे जातांना उंबरठ्याला अडखळून ठेच लागली त्यांच्या पावलाला. ’नोच आगई घुटनेमे, और मेरी घुटन बढने लगी.. धावपळ.. मला घाम सुटला.. Cold sweat..आणि हातपाय गार पडायला लागले..’ बर्फ आणा, बर्फ आणा..’ ! बर्फ आला... मग मी सेवेची आणखी एक संधी घेतली...’बालासाहेबांकडे बघितलं.. बाळासाहेबांनी नजरेनं होकार भरला आणि मी मग हळुवार हातांनी दिदींच्या घोट्यावर बर्फ फिरवला.. एक मंद स्मितरेषा उमटली त्यांच्या चेहेर्‍यावर आणि आजूबाजूच्या तीसचाळीस लोकांनी, ’हुश्श !’ केलं. नंतर तीनही दिवस सुविहीत मुद्रण झालं. बरोब्बर आठवड्यानं..२४ जुलैला चित्रीकरण निश्चित झालं होतं चासकरांनी खास सुशोभित मंच उभारला. प्रकाशयोजमा झाली.. सकाळपासून पाऊस रिपरिपत होतांच दुपारी १२ पर्यंत त्यानं रौद्र स्वरूप धारण केलं, त्यांतच भरतीची वेळ..वरळी भरली पाण्यानं... कशा येणार दिदी पेडर्‌ रोड्‌ वरून... परत काळजी.. संधी हुकते की काय.. पण कशी कुणास ठावूक.. ’सरस्वती’ अवतरली कलागारांत.. परत एकदा सगळ्यांच ’हुश्श !’प्रेक्षकांत होते खुद्द पं.नरेन्द्र शर्मा, शशिकला, सध्याच्या दोन प्रसिद्ध गायिका, देवकी आणि पद्मजा, पुण्याची गायिका अनुराधा मराठे, ठाण्याला रेल्वे ’ठप्प’ झाल्यावर माझी पत्नी तिला घेवून मुलुंडला आली आणि मग ’टॅक्सी’.. काय करणार ? छान ’एन्ट्री’ वगैरे घेतली दिदींची मंचावर आणि पांचही गाणी रेकॉर्ड्‌ झाली... सूत्रसंचालिका होती स्मिता..स्मिता पाटील.. तिच निवेदन नंतर तिच्या सोईनं रेकॉर्ड्‌ केल आणि संकलनोत्तर कार्यक्रम प्रक्षेपित झाला... दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून.. खूप खूष होतो स्वत:वर मी... पण दुसर्‍यादिवशी, मुंबईच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं, मोठ्ठा मथळा देवून फोटोसकट ’धिंड’ काढली माझ्या कार्यक्रमाची.. ’लताचा आरोही आणि चित्रपट गीतं नाहीत ? काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!’

’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?

’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?’** या लेखमालेच्या मागील भागांत, मी उल्लेख केलेला Bolex spring loaded कॅमेरा मला स्वखुशीनं वापरायला द्यायचे माझे त्याकाळचे पुण्यांतले स्नेही, विख्यात,आंतरराष्ट्रीय छायालेखक, ज्यांनी UNO साठीही काम केलं व्हिएट्नाम मधे, ते कै विजय परुळकर.. एकदा स्प्रिंग्‌ आवलली, हॅन्डल्‌ फिरवून की साधारण १० ते १५ सेकंदाचे ५/६ शॉट घेता यायचे, कारण भरलेल्या रिळांतच मुळी २॥ मिनिट चालेल एवढीच फिल्म असायची. जेमतेम १०० फूट.. त्या कॅमेर्‍याचं छायाचित्र मला महाजालावर उपलब्ध झालं, ते इथं देतोय्‌.. माहिती व्हाव म्हणून. कॅमेरा हाताळायला खूप सोईचा होता पण टेलिलेन्स्‌ वापरतांना फार काळजी घ्यायला लागायची.नुसत्या श्वासानं होणारी हालचालसुद्धा चित्रीकरणांत प्रतीत व्हायची. त्यामुळं एखाद समीप दृश्य घेतांना, श्यक्य असेल तेवढ्या कालावधीपुरता, दीर्घ श्वास घेवून, तो रोखून धरायला लागायचा. हा माझा लेख वाचल्यानंतर तुम्ही कधी कालजीपूर्वक बघितलतं चित्रपट पाहातांना तर तुम्हाला एखाद्या समीप-दृश्यांत...Close-up..जाणवू शकेल ती ’धक्‌धक्‌’.. वृत्तांकनासाठी छायांकन करतांना नेहमी वाइड्‌ अँगल्‌ लेन्स्‌चा वापर करायचं प्रशिक्षण आम्हाला मंडी हाउस्‌मधे दिलं गेलव्‌त १९७२ मधे.. कारण अशा छायांकनांत धावपळ असते, फोकस्‌ हमखास बदलू शकतो क्षणोक्षणी.. अर्थात, आग लागलीये, पूर आलाय्‌ अशा घटनांच्या वेळी दूरवरून, ट्राय्‌पॉड्‌ लावून, मीडियम्‌ किंवा टेली-लेन्स्‌चाच वापर करा हे आवर्जून सांगायला आमचे तेंव्हाचे, UNDP अंतर्गत आलेले प्रशिक्षक विसरले नाहीत हं ! दोन वेगवेगळ्या दृश्यांचा ’सार्थ मेळ साधण्याचं आणखी एक तंत्र, म्हणजे, एले्क्ट्रॉनिक्‌ इन-सेट्‌.. उदाहरणादाखल १९८४मधे चित्रित केलेल्या माझ्या एका कार्यक्रमांतलं, चलत्‌चित्रांतली चौकट स्थिर करून साधलेलं, Freez frame.. छायाचित्र देतोय्‌ इथं... छायाचित्रांत, ’जैत रे जैत’ चित्रपटांतल्या, स्मिता पाटीलवर चित्रित केलेल्या एका गीतामधल्या दृश्यावर, पार्श्वगायिका आशाताईंचं दृश्य चौकटीची शोभा बिघडू न देता, Composition चा आब राखत In-set केलेलं दिसेल तुम्हाला. या पद्धतींत, दृश्यमिश्रकाच्या Vision-mixer..साहाय्यानं एका फ्रेम्‌वर दुसर्‍याफेम्‌चा तुकडा चक्क कापून ठेवावा तसा परिणाम दिसतो. मणजे ’मूक-नायिका’ आणि ’पार्श्व-गायिका’ एकाच वेळी दृश्यमान करायला ही पद्धत मला उपयोगाला आली त्या वेळी. त्या काळांत, म्हणजे १९८२चं एशियाड क्रीडा स्पर्धा पार पदल्यावर आणि चौकटींत इंद्रधनुष्यांचे रंग दिसायला लागल्यावर, मुंबई दूरदर्शन कडे नवीनचं आलिव्‌ती ही सुविधा. असं कांही ’नवीन’ आलं की आम्ही निर्माते, आपल्या कार्यक्रमाची Visual value आणखी वरच्या दर्जाला नेण्यासाठी अक्षरश: त्यावर ’तुटून’ पडायचो अधाशीपणे.. कधीकधी अतिरेक व्हायचा.. अजीर्ण झाल्यासारखा.. कानपिचक्याही मिळायच्या दुसर्‍या दिवशीच्या Transmission Review Meeting मधे..पण कांही नवीन शिकतांना, कांही गोष्टी क्षम्य असतांत ना तसच कांहीसं ! कधीकधी अतिरेक व्हायचा.. प्रेक्षकांच्या अतर्क्य आणि चिकित्सक(?) अभिरुचीचा.. त्यांतल्या दोन-चार आठवणी इथं मांदायचा मोह मी नाही आवरू शकत. कारण असे प्रेक्षक, तथाकथित समीक्षकांच अस्तित्व हे स्थलांतींत आणि कालांतींत असतं.. पहिली एका गाजलेल्या सांगीतिक कार्यक्रमाबद्दल.. ’मत्स्यगंधा ते महानंदा’ या पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरांकित केलेल्या नाट्यपदांच्या, Review वजा कार्यक्रमांत, सूत्रसंचालिका वीणानं.. डॉ. वीणा देव.. ’लेकुरे’ हे मुद्रित संगीताचा गाण्याच्या वाद्यमेळासाठी उपयोग करनारं पहिलं नाटक’ असं विधान करून गेल्या.. त्यावर ज्योत्स्नाबाईंनी एका वृत्तपत्रांत ते विधान खोडून काढलं.. लगेच पुण्याच्या एका ’जळाऊ’ महाशयानं, ’असे सूत्रसंचालक बोलाव्‌ताचं कां ?’ अशी जाहीर वृत्तपत्रीय बोंब मारली... दुसरा प्रसंग जरा वेगळा.. पुण्याच्या थिएटर्‌ अ‍ॅकॅडेमीनं ’बदकांच गुपित’ या कविवर्य बा.सि.मर्ढेकरांच्या संगीतिकेवर, सु्दर नृत्यनाट्य मंचावर आणलव्‌त. ते पाहून मी त्याचं चित्रवाणी नाट्यरुप प्रेक्षकांसाठी सादर करायचं ठरवलं आणि चित्रित करून प्रक्षेपितही केलं.. अर्थात मी कदाचित एक चूक केली असेल ती ही, की चित्रवाणी माध्यम हे ग्रामीण भागांतल्याही घराघरांत पोहोचलं आहे हे लक्षांत न घेता, अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा अभ्यास, ज्याला Formative Research म्हणतांत तो न करतां आणि ’युवदर्शन’ कार्यक्रमांतर्गत ते सादर केलं.. झालं ! सवंग करमणुकीवर पोसलेल्या प्रेक्षकवर्गाच्या एका प्रतिनिधीनं एक पोस्ट्‌कार्ड्‌ धाडलं.. तत्परतेनं ! त्यांतला मजकूर, म्हणजे फक्त एक ओळ होती.. ’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?’ आतां बोला..

Sunday, January 6, 2013

’दृश्य-मेळां’चं तंत्र..

’दृश्य-मेळां’चं तंत्र.. रतीचे जया रूपलावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधेसारखा स्वाद, स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे जसा जन्मतो तेज घेउन तारा जसा मोर घेउन येतो पिसारा तसा येई कंठात घेउन गाणे असा बालगंधर्व आता न होणे बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनानिमित्त अण्णा... गदिमांनी ही शब्दसुमनांजली ’बालगंधर्वांना अर्पण केली होती... त्याला स्वरसाज चढवला होता.. विख्यात हरहुन्नरी ’पुल्दें’नी, आणि कंठ दिलाव्‌ता, गाभार्‍यांतल्या निरांजनांच्या ज्योती सारख्या शांत, पवित्र, आश्वासक, व्यक्तिमत्वाच्या आमच्या ताईंनी... माणिकताईंनी.. ! मला त्या मुलासारख वागवायच्या कारण श्रीकांत दादरकर माझा मित्र.. १९६८ पासून.. मला ही आठवण झाली कारण, मुंबई दूरदर्शन सुरू झालं १९७२ मधे आणि पुण्याचं सहक्षेपण केंद्र सुरू झालं बरोब्बर एक वर्षानं, म्हणजे २ऑक्टोबर१९७३ ला. तेंव्हाचे आकाशवाणीचे महासंचालक मुखर्जी यांना सोबत..Escort.. म्हणून मला पाठवलव्‌त कार्यालयीन कर्तव्य म्हणून..त्यांच्याबरोबर पुण्याला. उद्घाटन सोहळ्यांत तीन सौंदर्यवती युवती, दोन स्मिता.. पाटील (मराठा) आणि (गोळवलकर) तळवलकर.. कहाडे+सारस्वत....आणि एक पुणेकर, आकाशवाणीची निवेदिका, कोकणस्थ शोभा चितळे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करीत होत्या तीन वेगवेगळ्या पद्धतीची नऊवारी नेसणं, निवेदन करतांना मिरवीत.. आणि त्या सोहळ्यांत अण्णा.. गदिमांची ही रचना गायली गेली होती माणिकताईंनीच... बाल गंधर्व रंगमंदिरांतली तोन तैलचित्र पाहिली आहेत तुम्ही असतीलच नसलीत तर अवश्य पहा, त्यासाठी खास पुण्याला जावून ! एक स्त्रीवेशांतलं आणि दुसरं पुरुष वेशांतलं.. अशी एक वदंता आहे की कुणा एका महाभाग ’महा’पौरानं एका पुणे भेटीला आलेल्या परदेशी पाहुण्याला चित्रांचं वर्णन करतांना, ’This is Mr. Balagandharv and that is Mrs. Balagandharv' अशी ओळख करून दिलिव्‌ती म्हणे.. आपल्या अज्ञानाची आणि प्रथम नागरिक म्हणून त्यांना निवडून दिलेल्या पुण्याच्या इभ्रतीची लक्तरं, आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर मांडीत... या तैलचित्रांची चित्रकार होते गोपाळराव देउसकर.. बालगंधर्वांची अप्रतिम ही दोन तैलचित्र.. कलाकृती म्हणून फारच वरच्या दर्जाची, कलाकाराच्या प्रतिभेच्या दर्जाइतकीचं... कुंचल्याचे जादूगारच होते ते... त्यांच वास्तव्य, फर्ग्यूसन्‌ महाविद्यालयाच्या प्रांगणांतल्या बंगल्यांत असायचं... बंगल्याला शेंदरी फाटक..त्याला बाहेरून कुलूप.. आंतलं दार उघडं आंत अंधार... कुणी भेटायला गेलं की आंतून विचारणा व्हायची , ’कोण आहे ? ’ नाव सांगितल्यावर किल्ली हवेंतून यायची ती पाहुण्यांनी ज्गेलून फाटकाचं कुलूप काढून आंत प्रवेश करायचा.. मला हे माहीत आहे कारण, ब्हुतेक ’प्रतिभा आणि प्रतिमा’ मधे त्यांच्या सहभागासाठी विनंती करायला त्यांच्याकडे जायचा योग आला होता... जुइली तेंव्हा तिथं होती की नाही आठवत नाही.. असो.. तर मागील भागांतल्या छायाचित्रांतल्या In-set बद्दल.. In-set अनेक प्रकारे करतां येतो. ऑप्टिकली.. मल्टोपल्‌ एक्स्पोजर्‌ तंत्रानं.. म्हणजे एक दृश्य चित्रित करायच... एक्स्पोज्ड्‌ फ़िल्म्‌ कॅमेर्‍यांतून बाहेर न काढता रिवाइंड्‌ करायची आणि त्यावरच दुसरं दृश्य चित्रित करायचं... अर्थात याला कॅल्क्युलेटेड्‌ शॉट्‌ कॉम्पोझिशनचं बिनचुक तंत्रज्ञान आणि कसब अवगत असावं लागतं.. शालेयचित्रवाणीच्या एका कार्‍यक्रमांत मी असं एक दृश्य सुरेश भागवतवर चित्रित केलं होतं..झोपेंतून स्वप्नांत जातो आणि वाघ होतो, वगैरे..वगैरे.. ७५, ७६ साली असेल बहुधा.. दुसरा प्रकार म्हणजे, चित्रवाणी कलागारांत बहुछायक पद्धतीमधे (Multi-camera system), दोन इलेक्ट्रॉनिक्‌ छायकांनी टिपलेल्या दृश्यांच दृक्मिश्रका द्वारे..Vision-mixer एकत्रीकरण करणं.. पण याला प्रकाश योजना करतांना, पार्श्वभागी अंधार योजना, म्हणजे Limbo lighting करायला लागतं अन्यथा प्रतिमा एकमेकाच्या ’उरावर बसलेल्या दिसतांत.. आजकाल सगळ्या माध्यम प्रशिक्षण संस्थांत Thee point lighting शिकवतांना ह्या चौथ्या महत्वाच्या Light sourceचा विसर पदतो तथाकथित ’तज्ज्ञांना... दुर्दैव दुसरं काय ? झूम लेन्स्‌ नव्हती त्या काळी छायकाला Turret असायच.. तीन लेन्सेस्‌चं एक वाइड्‌ अ‍ॅंगल्‌.एक मीडियम्‌ आणि एक टेली बहुतेक ५०, ३५ १५ अंश कोनाच्या आणि विविध अशा फोकल्‌ लेग्थ च्या.. . दिग्दर्शकानं दिलेल्या सूचनेबरहुकूम, छायालेखल, त्यांच्या कॅमेर्‍याची लेन्स्‌ ’Mask' करायचे आणि मग दोन (किंवा अधिक) कॅमेर्‍यांच्या दृश्यांच मिश्रण, Vision-mixer द्वारे व्हायचं.. तो साधलेला परिणाम मागील भागात पाहिलांत... अशाच पद्धतीन तीन छायकांच्या दृश्यांचं मिश्रंण मी केलं होतं... अमोल पालेकरनं सादर केलेल्या ’दिवाकरांच्या नाट्यछटा’ या चित्रवाणीपटाच्या चित्रीकरणांत.. मी Bolex, spring loaded turret camera वापरायचो Hand-held.. गंमत म्हनजेत्यानं घेतलेल्या वाइड्‌ अँगल्‌ शोट्‌ मधे टेले-लेन्स्‌चं हूड्‌ दिसायचं, म्हणून आधी ते Dismount करायला लागायचं.. केळकर संग्रहालयांतल्या मस्तानी महालांतला, रजनी चव्हाणचे Shots.. १९८० मधले..