Friday, August 16, 2019

चित्र-शब्द

[25/12/18, 06:37:06] Arun Kakatkar: धगधगतोय चुलींत वन्ही शमवायला जठराग्नी बाराचं कोडं कुणाला चुकलंय तत्वज्ञान येऊन सगळं भाकरीशी थांबलंय [27/12/18, 07:12:06] Arun Kakatkar: त्रिशुळधारि शाखशिखा दिमाख कमळाचा अनोखा दिठींत सामावून घेऊं एका संहार आणि सर्जन [27/12/18, 07:12:06] Arun Kakatkar: उर्ध्वगामी नजर निगळींत उर्जासार जगणे मरणोत्तर देतांहें दृष्टि [27/12/18, 08:16:48] Arun Kakatkar: भागिरथी, पार्वती महादेवा भवती फेर धरोनि नाचती प्रीतवेड्या [28/12/18, 07:33:34] अरुण काकतकर: डवरलि तरुशिखा जणू हिरकणिस लाभे कोंदण दिठी मनास संभ्रम परि सजविते कुणास कोण तेजाने स्निग्ध जरी माखे आदित्य बाळ अवकाशी वर येतां दाहक प्रखरेल जाळ [29/12/18, 09:05:22] Arun Kakatkar: धूळवाटेला एकाकीं छाया प्रकाश दाटले तरूं मोठाले अजस्त्र कवळायाला वाकले दूरवेरी नीरवाची अनाहत नादकथा ऐकायाला कोणा कशी आवडेल मूक व्यथा ? [30/12/18, 06:44:58] Arun Kakatkar: सरळसोट उभा कडा पाठीशी, लक्षवेधि विखारी उधळेल सहजी मनसुबे, लक्षभेदि [30/12/18, 07:08:57] Arun Kakatkar: निळा निळा कान्हा भाळी शुभ्र नाम टीळा अवकाशी पूर्ण शशीं बिंबाचा सोहळा डुचमळे जळ बिंब लाटांवर स्वार धिटाईची चर्चा कौतुकानं रानभर विस्तारतां परिघ लाटेलाटेंत अंतर बिंबांमनी थरकाप काळीज कापर झुरुमुरु चांदवा अल्वार उतरला धरेवर विसाव्याला जरा पहुडला शहारली धरा जरा हव्याशा स्पर्शाने तृणपाती अर्ध्याराती डोलली हर्षाने [30/12/18, 07:08:57] Arun Kakatkar: या रचनेंतले पहिले दोन चरण आदरणीय उषाताई मंगेशकरांच्या, केवळ अप्रतिम अशा संकल्पचित्रावर आधारित आहेंत.. [31/12/18, 07:16:43] Arun Kakatkar: तसेच दिवस त्याच रात्री जशा सुख, वेदना गात्री देहाचं वाढतय क्षीणपण झिजतोय हळू कण कण अथांगाचा असीम पसारा क्षुद्र राखेजला मी निखारा तिमिरापासून तिमिरापर्यंत जायचं उदयास्त भोगत काळोखंच अंतिम सत्य उजेड ? फसवं मिथ्य पुढंपुढं धावत पळंत जगायचं कडू गोड रिचवंत [01/01/19, 07:44:22] Arun Kakatkar: लांबली सावली संपूटत जाईल जसजसा डोइवर तेजोनिधी चढेल बारसे करित दिवसांचे मााणुस बसला परिवलन नि क्रमेचा नेम नाहि कधि चुकला [01/01/19, 08:20:36] Arun Kakatkar: सावली जन्मते विरून जाण्यासाठी माउली ठाकते सदैव आठवं-काठी काळोख, वेदना, सुखें काळ भारितो थरथरता सुरकुतला माथ्यावर असतो [01/01/19, 16:40:58] अरुण काकतकर: सावली दिसभरी अवतीभवती असते सावली विरुनि माध्यान्ही देही जाते सावली जन्म कशि घेइल अंधारांत ? सावली राहते प्रतीक्षेंत गर्भस्थ [02/01/19, 06:34:19] Arun Kakatkar: कुंपणाच्या आंतच बर ‘रूपडं’ म्हनत्यांत ‘लय भारी’ कोमेजल्यावर सांजला किती असतील डफधारी ? लुटून घेते कोड कवतीक डोळे जोवर फाडून बघत्यांत देव्हाऱ्यांत जागा झुंजुरका लोटत्याल उंद्या निर्माल्यांत [04/01/19, 06:52:48] Arun Kakatkar: ताई, तुझ्या अंगांगावर छान छान फुलं मोठी कधी होणार आम्ही लहान लहान मुलं कधी मिळणार सगळे आगळे खेळायला रंग पिछाडायला लागणार आणखी किती जंगजंग खुडून तुला कोणी माळेल केसांत की गुच्छ करून नुसता मिरवेल हातांत देव्हाऱ्यांत नेऊन तुला रेखतील पुष्पावली ? कीं फूलदाणी रचून ‘आज’ म्हणतील ‘हौस भागली’ ? [04/01/19, 07:32:19] Arun Kakatkar: जांभळा, काळा करील कराल काळ क्रूर विरून जाईल अस्तित्व अवकाशांत दूर म्हणून सगळे भोगून घ्यायचे वाट्याचे क्षण कळणार नाही कसे झिजले बधीरलेले कण [05/01/19, 07:52:46] Arun Kakatkar: कुट्ट काळ्या रंगाला सावलीसुद्धा लाजली देह मुद्रा शुभ्रावत राखी भुरी झाली [05/01/19, 08:04:46] Arun Kakatkar: कबरी भुरी झाली असं म्हणूया.. [06/01/19, 07:58:27] Arun Kakatkar: डोंगर दऱ्या, माळरानं उल्हसित करतांत दर्शनानं वाटा शोधत जातांना दूर सुखावते दिठीं पुरेपूर दिसत नाही त्यांना भवतालाचा गंध तेवढांच काळजाला देतो आनंद काळजाला असते जाणीव फक्त स्पर्श, नाद, रसना दृष्टी देतांत मुक्त [07/01/19, 07:58:07] Arun Kakatkar: इवलिश्शी दुचाकी अन् केवढा मोठा घाट कशी पार करायची चढावरची वाट पण वारं भरलं उरांत तर कांहींच अवघड नाही नुसती कल्पनांच बाहूवरची उसवतेय बाही [07/01/19, 11:58:54] Arun Kakatkar: मागणीप्रमाणे पुरवठा.. 😊😊 [08/01/19, 06:44:30] Arun Kakatkar: काटकोनी कोन्यांमधे ज्ञानाचं भांडार गणराज चौकटींत सावरंतांयत आकार फुलदाणीं रचून ठेवलिये आत्तांच वर टापटीपिनं पसरलाय आनंद घरभर [09/01/19, 06:52:01] Arun Kakatkar: एकाच चौकटींत सांकळल्या जिण्याच्या छटा साऱ्या बालपण, यौवन, पोक्तपण, जरा यशापयशाचे डोंगर नि दऱ्या [09/01/19, 06:52:01] Arun Kakatkar: खुरपले जातील पिवळे तण दाणे लुटतील मनुष्ये, द्विजगण क्लान्त तरुतळी सावली शोधेल तोडंत तेंच डोंगर बोडके करेल भूते खेळी मग अतर्क्य दावतील क्षणार्धांत भवताल उध्वस्त करतील भजन-पूजन, यज्ञयाग ठरतिल कुचकामी भेगाळल्या माळरानांची फक्त उरेल भूमी [10/01/19, 06:18:37] Arun Kakatkar: ही असतिल खरि की असतिल बेगडि सुमने परि शोभा यांची सहज जिंकिते मने पर्श्वांत पटल साजेसा नि मिणमिण दिवे काळीज हरखुनी दृश्यच्या केंद्री धावे [11/01/19, 09:00:19] Arun Kakatkar: अल्याड निवांत पल्याड आकांत अल्याड, पल्याड कोठे ? ही भ्रांत सारे मनांतले आपूल्या सोहळे जशी वेळ तसे वृत्तींतले खेळे अल्याड सुखशय्या ! पल्याड व्याधि व्यथा घालणे झेलणे घावांच्याची गाथा कोण्याओठी वेद कोण्याभाळी स्वेद भूतांठाईं मात्र नाही भेदाभेद [12/01/19, 06:25:03] Arun Kakatkar: ब्रम्हा विष्णू महेश सारे कल्पनेचे खेळ पुष्पत्रयीचा झुंजूमुंजूत आनंदाशी मेळ सत्य शिव नि सुदर एकवटलंय इथं दैवान दिली दिठी ! आजझाली सार्थ.. [13/01/19, 07:15:17] Arun Kakatkar: चिकन्या सुपारीचा जीवघेना ठसका *********** १९८९ मधे लिहिलेली लावणी राम कदमांनी संगीतबद्ध केली.. जयश्री, माधुरीनं गायली.. नंदकिशोरच्या शिष्येनं नृत्यांकित केली.. दूरदर्शन करितां ********* चिकन्या सुपारीचा जीवघेना ठसका अडकित्ता घेतांना हात वाइच हिसका पानं कवळी,कवळी, चुन्याचि लावा कळी घरुन कातगोळी आंत बसवा पंचम घाला थोडा, बांधा गोविंद विडा वरुन लवंगीचा ठसवा फडा करंडा घाटांत थोडा बसका हौस मनी भारी, मारा पिचकारी दिसेल मग स्वारी, राजबिंडी आवळा कसुन करी, घुसळणिची दोरी लोण्याचि करा चोरी हिरवा चुडा मनगटी हुइल पिचका विड्याची गोडी बखेडा मोडी लावतिया जोडी राघू-मैना अडखळे व्हटि थोडी, बोली बोबडी लावुन लाडीगोडी, करा की माझी दैना नका घेउ तुमी रुसव्याचा धसका [14/01/19, 08:16:21] Arun Kakatkar: मूळ... My child arrived just the other day
He came to the world in the usual way But there were planes to catch and there were bills to pay
He learned to walk while I was away And he was talking 'fore I knew it and as he grew
He'd say, "I'm gonna be like you, dad
You know, I'm gonna be like you" And the cat's in the cradle and the silver spoon
Little boy blue and the man in the moon
"When you coming home, dad?" "I don't know when
We'll get together then, son, you know we'll have a good time then" When my son turned ten just the other day
Said, "Thanks for the ball, dad, come on and let's play
Can you teach me to throw?" I said, "Not today
I got a lot to do" he said, "That's okay" माझं रूपांतर... कालच कि वो प्वार झाली कौतुकाची मला सुईण म्हनत व्हती 'साखर घ्या वाटायाला' 'झालं सगळ येवस्थित,चिंता नका करूं' दाणं भरवा चोचीत, लइ ग्वाड हाये पाखरूं' तिफण फिरवायाची आता कराया होवी घाई बियाणं आनल्याबिगर पेरणी व्हनार नाई प्वार रांगायाला लागन्या आधी सर झडींची होवी कोंभ रुजन्याआधी तिला झबली आणू नवी खिदळणतेय बांधावरच्या झोळींत पाहा द्वाड आधी हुंकार नि बोबडे बोल नकळत ग्वाड 'मला बी तिफन गोफन तुज्यावानी होवी पोळ्याला सर्ज्यास्नि' म्हनल 'झूल घालू नवी ?' 'चांदव्यावरचा ससा गोरा कापसाचा गोळा देश्याल आणून ?' चेहेऱ्यावर भाव भाबडा भोळा, 'ठकी बी पायजे, संग खेळाया भातुकली पावनं रावळं येत्याल, करन भात पायली पायली !' 'कंदी येशील परतून बाबा, जेवाया पंक्तींत ?' 'कसं सांगू पिल्ला तुला ? मस्नीच न्हाई म्हाईंत आल्यावर मातर तुला कुशीत लाडानं घेईन दीसभराचा शीण आणि इसरून जाईन' 'न्हाणूली झाली प्वार' माय कानांत बोले काळजीनं काळीज माजं हुरहुरत गलबले 'चिंता नुको करूं बाबा, मी झालीया धीट ! कोल्ह्या-कुत्र्यांना दूर ठेवन्याची शिकलिया रीत गोफनींत दगड लावुन टोळ, होले हेरन गडणींच्या हुर्दांत आन् राणी झाशी पेरन आन् राणी झाशी पेरन' [14/01/19, 09:00:52] Arun Kakatkar: प्रीतरंगामधे दडलंय इतकं कसं क्रौर्य कुठंलं करायला निघालाय सैतान अदय निर्घृण कार्य वासलेला जबडा अन् जीभ भडक लाल नजरेंत विखारी निखारा भाजतोय जणू जाळ शांत निवांत हिरवाईंत हे काय आक्रीत जवळ जाऊन पाहावं तर आगळींच रीत [15/01/19, 09:30:23] Arun Kakatkar: अर्धामुर्धा शुभ्र चांदवा अन् सोबत चमचम एक चांदणी मजेत हसंत खेळंत चाल्लेत निळ्या विस्तीर्ण प्रांगणी उजळाया लागलंय आभाळ फिकट हळूहळू करींत शाई उंचावल्या शाखांच्या बाहूंत मग जोडीला लपायची होईल घाई [16/01/19, 08:01:11] Arun Kakatkar: सुख दु:ख सुरकुतलेली एकवटलीत इथं घाव सोसत जिरवत झेललेले जिथं तिथं दिठीं अपार शांत निवांत पण सावध एकाग्र तीक्ष्ण संकटांचा घेत वेध उकलेल सारे प्रष्ण अगडबंब देहांत जरी डोळे इवलेले जिण्यासाठी अवघे सज्ज इरादे कसलेले [17/01/19, 09:06:51] Arun Kakatkar: खंडती शाखा कुणी सोलती वा शरीर अदय भूते वा मनुष्ये, नशिबि असती स्वार विस्तारलेला सोबती अन् पर्णभारा पाहुनी खंतावता मन आंतुनी ओलावते कधि पांपणी वाटणे हेवा कुणाचा लौकिकी असतो गुन्हा रेखिले भाळावरी, ‘त्यां’ सांगती, ‘तुम्हि सुख म्हणा !’ [18/01/19, 07:07:15] Arun Kakatkar: उगवल्या दिवसावर दिसताहे तृण राजी अंगांगातुनि तेवत आहे पाहा फुलबाजी अल्यापल्याड भवताली हिरवाइचि जरि सोबत तेजस्रोत प्रवाहींत सांकळला जो आंत मातिमाय एकच परि छकुल्यांच्या विविध परी अजब सोहळा दिठीस अवतरली जणू परी [18/01/19, 20:26:06] अरुण काकतकर: https://m.facebook.com/photo.php?fbid=10218724445687968&id=1404082902&set=a.10201331692360005&source=57&refid=52&__tn__=EH-R हुडहुडिंत ऐन सय हुरहुर काहुन लावी हैराण करितसे खेच द्वाड लाघवी -अरुण काकतकर [19/01/19, 06:51:12] Arun Kakatkar: ढेकळं लहान मोठी अपार त्यांवर पडलेंत कवडसे चार गळली पानं झाली पाचोळा करून पडलींत अंग गोळा कुठं अखंड चैतन्य झरा कुठं शुष्क भेगाळली धरा जिण्या मरणाचा संग्राम अथक उभ्या आयुष्याचं जणु छायारूपक दुतर्फा मार्गावर सार शांत शांत लाल, हिरवे, नारिंगी तरी कार्यरत पुढे दूरवेरी ना अडथळा वा धोका 'सावध', तांबडे जोडीनं करतायत फुका ? चुळबुळत कडेवरून उतरली खाली चार हिरव्यागार तृणपात्यांनी झेलली ती हळुवार कोणि उचलुन त्यांना अंजुलींत घेईल देवघरांत वाहायला लगबगीनं जाईल गोरी गोरीपान सगळी फुलं कित्ती छान हिरवाईच्या कुशींत विसावली छकुली सान खुडून नेईल कोणी नी मिरवतील प्रहरभर सांजेला विसरुन जातील कोमेजल्यावर पूर्णोन्मलित कांही, ताजी तांबडी लाल झुडुपांवरच कांहीं कळ्या, पानांची ओढून शाल पायवाट नी पायऱ्या साऱ्या तृणपात्यानी झाकल्यांत पांथस्थाला दूर, वर न्यायला तिथंच निस्तब्ध थांबल्यांत