Sunday, December 8, 2019

दर्पण..

चित्राधारित अल्पाक्षरी

मन कातर कातर, बहु आहे शंकेखोर, शेवाचे सूत अखेर, धरु पाहे, तुटेवेर आतां पुढचे फुटवे, लेउन वस्त्र नवे, जैसे सज्ज थवे, झेपावया जागल्या विकृती, शमनाची भ्रांती, कोरल्या आकृती, परिणामी.. सुस्नात होत हे विवस्त्र झाले कोण भवतालाचे उघड्या जराहि नाही भान पाहति त्यां झाकूं वल्लरी नि कांही पाने भरदिवसा कां शोभते असे वागणे ? कुणा कामिनीस कुंतलशोभा कोण्या दिठीस धवलप्रभा सुखविण्या सख्या साजिऱ्या, रंभा कोणी सांगा खुडेल कां ? युगानुयूगे उभा उन पाऊस झेलींत तपश्चर्येने लाभते प्रभामंडल पार्श्वांत फळे, फूले नी सावली जीवमात्रा अवीरत सारी संकटे गीळून कडू जहर पोटांत बहरला सोबति शेजारि कां पालवि न अंगभरी ? भाळी आभाळ तेचं ओलं मुळाशीहि तीच शुष्क शाखशिखा केवि ? कां, काळजास बोच ? मृद्घंटिकांचा सोपान वर वर वल्लरी समान हळूंच एखादी झुळुक येइल नादलुब्ध भवताल होवून जाील पतवंडांच्या विळख्यात हरखले पणजोबा घर कसं भरलं वाटे छकुल्यांनी घेतलाय ताबा उरावर घेती उशा तर कोणी ओढे मिशा नि:शब्द अवखळपणा हीच लळ्याची भाषा वर ओथंबले जळ नको टेहाळूं साकळं होरपळलेल्या जीवा अंगी जीरवं गारवां धगधगती काहीली, आजपातूर भोगली, भूतां दया कशी आली ? आणि मोत्यें ओघळली ? हळूहळू गाभूळेल शुष्क घनावळी शुभ्रा गडगडांट प्रसववेद नंतर अमृतधारा पोळल्या तनामनांस ना थारा ना उसंत पिसे जडे, कधि सुखविल मृद्गंधित शीत वात ? उजळले विश्व अन् स्वर्णकांति कल्लोळे सघनांच्या कलशी आतुरलेली जळे टेकीला आली वर्षा, सुटका करा ! हरण करोनी नातर पळवुन नेइल वारा ‘त्या’नं दिल्या प्रभेचं वाणं रातभर मिरवत राह्यलो छान आतां सांजेवेरी ‘तो’ तळपेल सारं विश्व ऊर्जेनं भारेल पालवल्या शाखांचे पाश सोडून हळूंच दूर जाईन निघून आम्ही तुम्ही सारे मर्त्य, धरेवरचे नाशवंत, तेज तमाचा खेळअविरत, अखंड अमोघ अनादि अनंत मन अधीर अधीर, ‘हवे केशर केशर, ऊघडोनी रसद्वार, चाखूं साखर साखर’ भर वस्तीमध्ये मिटुनी पिसारा घेतं अन् सारे माखुनी अंग प्रीतरंगांत मोराचा डौल पाहांता हरखे भान वळविल कां तो परि मान मला पाहून वारा ! आवेगे अवकाशाला घुसळे वारा ! सजल स्वर्णांगी चुंबित कवळे वारा ? त्याची ना झेपावेल्या तमा वारा, वा वादळ झेलीत करेल क्रमा वारूचे कां वाऱ्याने भरले कान ? कां असा उधळला बेबंद नि बेभान ? आसूड फडकवा ओढा पाठीवरती, कायमची जिरवा याची आजच मस्ती जेथे जातो तेथे, काळोख सांगाती, तेजाशी जरी नाती, म्यां पाहतो जडवाया.. लंघू जाता भव, वेदनांचे तांडव, ऐसे कां अनुभव, यावे मसी ? हे कुणी तोडले पान ताठ मानेचे जरि अंगण होते भवती सवंगड्यांचे उमलेल्या कळ्या फुलांना नाचायाते कीं संपविले असुयेने अतूट नाते ? राधा, मीरेमधे ठाकला हरि पीतांबरधारी काविळजडल्या अनंगसंगोत्सुका फेरा धरती नारी हिरव्या पैठणीवर सांडली हळद..कोण्या नववधुची कावरिबावरि कवळी बाळी सून व्हायची त्या घरची पापणींत साकळ मायेच्या रुद्ध कंठ अन् तातांचा पानापानावरी पाहाटे ओलावा दवबिंदूंचा किती वाचावे चेहेरे किती विक्राळ आकार गर्भी आहे दडलेली सौदामीनी भयंकर दूर गाज गडगड मग तडितेचा कडाड ऊजळेल कणकण जळ आभाळ पहाड झड सुखाच्या सरींची जीवमात्रा अमृताची हिरवी चढेल झूल जादू कोण्या कुंचल्याची ? समृद्धीपोटी, प्रसवले तेज भूतांचेची राज्य सर्वदूर रचनेचा तोल, विलक्षण अनिमिष रंगसंगतीही खास साधिलीभूतें जुडलेल्या होत्या या ! स्मरते कधिकाळ ? चुरगळून टाकिलि कुणी पाकळी नि पाकळी ? कळीकळी परि उमलुनी जन्मतील लक्ष फुले सजवित भूतांचि घरे झडणे ! व्रत घेतले अलवार झोकांत एकेक ऊतरे राघू कसे सारे चोचींविना पांख पसरोनी कुणी अनावर राही दूजा दूर सखीविणा स्तब्ध चराचर काळोख असीम स्वप्न सत्याच्या सीमेवरचा निशेचा प्रहर अंतिम एक विव्हळणे, कीं अवसान उसने ? वेदना शमनार्थ क्षीण भुंकणे ? एकाकीपणाची चरचर हुंदका व्यापलेला काळीजभर कोसाकोसावर, धरेाईचा धरून पदर प्रतीक्षा अव्याहत, फटफटेल.. हवा झुळकेल.. पान हलेल.. खार बिटिबिटी चित्कारेल जीवघेण निश्चल सरेल हळूहळू क्षितिज चाहूल देत लागेल उजळू पुनर्जन्माच्या प्रसववेदना सुखावणार दु:ख कालचक्राचा एक आरा चुंबेल जिण्याला मागे ठेऊन चाकोरी खुणा चार थेंब आणि एखादी सर फुलून आलंय सगळं रंगांचं घर पर्णसंपुटी हिरवीकंच पिवळाधमक, लालभडक तशी रोजचाच येरझार पण आज मात्र आर्द्र बहर चिमुकल्या अजून कांही कळ्या पापण्या मिटून झोपलेल्या जाग येतांच पाहातील तर रंग होतील दिठीभर सजल शामघन सजले ओथंबुन वर तरंगती भुते अतर्क्य सहसा जरी तहानल्यां वर देती गाभुळल्या आभाळी जळवंती काळी तडितांचे तांडव अन् गाजेची गभिर हाळि कुण्या देशीचं पांखरूं अंगणांत ऊतरलं चोचीं वासल्या भरण्या दाणं चार ते टीपलं सारे विश्व झेपावोनी याने सहजी लंघले दाणापाण्याची संगत पाहूनी घर केले तडकलेली काय देई जरेचे जरि दाखले आधार नाजुक वल्लरीला त्यांसि व्हावे वाटले ऊन पाउस वादळे जरि कितिक भिडली, झेलली काळजांतरि प्रीत त्यांतुनि आजवेरी राखिली तैसा आकार जैसे पात्र मोकळोनि पसरले अवघी गात्रं पतित तोय वा सलिलाचे गोत्र विस्तारवादी सर्वत्र चहूकडे तिच्या अंकी मनुष्यांचाची वावर जळ वंचीत गर्भाला आहे उपाय, उत्तर ? मेघावळींतले उमाळे पात्यांवर कोसळले धावत धावत शर्यत लावत धराईकडे ओघळले चिंब चिंब होत साऱ्या कणाकणांत सुखावली माती, अंग झाडून गाभुळेल आतां पिकावायला बक्कळ मोती रंगलाय रास प्रीतरंगी छटाभेद हिरवाई अंगी कुणाला सांगा सजवतंय कोण ? कुणा द्याल कवडी कुणाला होन ? निरखूंया पारखूंया दूरूनच सुगंध लुटंत हरखूंया, भान हरपूं या ! वनराणीनं माळलिये मोगरी जपा, नाइतर खुडतील पोरी उमलूं देत कळ्या,फूलं वल्लरींची सानुली बाळं नका लावूं हात उगा जा, सगळ्यांना बजावून सांगा तनावर धारा नि कानांत वारा शेपटी उंचावत वासरूं चौखूर धराईच्या लेकरांना बी तसंच औंदा बेबंद रानी माजवायचय काहूर त्यांत थोडं सुकं शोधून थांबाव हे बरं जाळींत अडकला पाय तर कांही नाही खरं ‘जितं मया ! जितं मया !’ उच्च रवे गाती आनंदे पंचमहाभूते नाचती सुमनांचे सुरेखसे करुनि अलंकरण मनोहारि रचनेचे भवती कोंदण की पुष्पे रचिली फुलदाणीमधि जिने ? कसबाने सहजी ललना जिंकिल मने ? सानुली डौलदार कवळी भोगतील सुखदु:खे सगळी जरेने पडतिल विवळी पानगळीकाळी नियमाने सारा आटला ओलावा पीत सर्वांगी दाटले प्रीत,माया,नातीगोती मर्मबंधही तुटले देह गळोनि पडता कणकण होतो माती किती सजवाल शेज ? वीरो जायचे शेवटी हिने कोणा वेधीले वर ? खार वा उंदीर ? आषाढीचा आहे घडला कीं उपास दिसभर ? झेप घ्याया धावे मन क्षुधार्त खळगी दे रे बाबा पांडूरंगा हिला वानवळी वेगी तसेचं राहुंदे तिथेंच हातहि लावुं नकांच जिणे सरेल सांजेला रोजचीच ही कथा इवल्याशा कुड्यांभवती भंडाऱ्याचा साज खंडोबाची म्हाळसेच्या कानी कुजबूज सारी श्रद्ध्येये साकार जर निरखाल भवताल अनुभव ठाईठाई तुम्हां भूतेंच देतील मागे जलद भुरा फिकट पुढे तीन तंतांची भेट जेथे छेद तेथे भासे गाठ स्तर भिन्न जरी विश्व जर त्रिमितीतले एका पातळींत आले दृष्टीभ्रम असले अनिवार्य कां ग बाये आज अशी धराईला चुंबण्या असोशी काय श्वशुरगृही सोशिशी अपेष्टा हाल नको कलंडू इतुकी पाठ नको होवू भुइसपाट पायदळी तुडविलीजाण्या आंत सावर, आवर स्वत:ला कुणा प्रीत, कुणा भ्रांत रगराटीमधे सहसा रीतं बुडलेली तुपांत नसतांत पांचीही बोटे बहुधा नको बाळे पाहू मान उंचावोन जिण्याची जाण, वेध आधी आपुले आपणची सांभाळावे सारे योग्य ती अंतरे, राखोनिया धसमुसळा वारा करील लगट परागकण इतस्तत: उधळेल मुक्त मोकळी मजेदार अन् बिनभिंतीची शाळा हिरवाईच्या वावरि उमलला शुभ्र खडूंचा मळा नितळ नि निर्मळ थेंब जळाचे पाकळ्यांत थबकले पर्णभार भवतालांतिल सारे लगट पाहुनी हसले चोंच नि चक्षूं अल्याडपल्यांड नाजुकसं दडतया पाना आड पायाची पकड पाहा कशी आहे पक्की काय वेधायचंय याला नक्की ? जळावरी जळ लोळे झाले बांगड्यांचे तळे थेंब थेंबा भिडती तरंग रिंगण घेती नवल नवेन्मेषाचे दिठिमधे सुख नाचे पसरोनी पसा एकटा हा मागतो पसाय निष्पर्ण शाखाशिखेवर निश्चयाने ठाय अंजुलींत पडलं अमृत सर्वांगी रुजवेल नसानसांत भिनवून हा नवी हिरवाई सजवेल किती हा आवेग किती उंच झेप नवचैतन्याचे ऊर्ध्वगामी रूप स्मरणी असूंदे धावतांना वर मूळे खोलवर असतांत आधार खचल्या पायावर नसते कांही स्थीर होते दुरापास्त शुष्कावल्यां नीर अंबाड्यावर माळलिये कळ्यांचींच वेणी मधोमध पिंजर रेखून सजली हिरवाई रानी पावसाच्या झिम्म्यानंतर सर सर संतत धार पसरला नाजुक पसा, त्याला मोत्यांचाही भार तमारितीर भेदतील क्षणांत जातील आरपार मग अवघ्या आसमंतांत इंद्रधनूची बहार कांही हिरे,मोती कांही कांही वैडूर्य हिऱ्यांना पैलूं पाडता पाडता थकला कारागिरं किती किती रत्नांच्या झेलाव्या सरी कुबेराचा जवाहिरी करतोय खाली तिजोरी बोलावताहेंत छकुल्यांना दूरवरचे झुले पण कोणी असे ते साखळ्यांनी जखडले ? आला आला श्रावण आता पारंब्यांचेच हिंदोळे वटवृक्षाला चिंता आमची दाढी धरेवेरी गळे केशर बिंदित बहरे पिंजर भाळी पसरे धवल ऊत्तरियांभवती पीत नेसुं फेर धरे परि हिरवे कां कोंदण कुणा दिले कुणि आंदण ? खुडुनि सजविले गृहांस रानाईंचे हरुनि प्राण कुठल्या नशेंत बाबा जीवमात्रांना दावलीस निशा रक्त पिऊन हाडं चघळंत आता पुसत बसलायस मिशा ये भानावर, बघ संहार मनुष्यत्वानं केलेला प्रतिकार कळिकाळाला देत मात होतायत एकमेकांना आधार असे छप्पन पावसाळे आधी भोगून झालेंत सगळे बांध काळजाला घालून पुन्हा वेठिस धरूंच साकळली जळे लोभस निळा निळा शाम भाळी अस्तावला नाम शमल्या वादळाने कीं आतां गाठले निजधाम ? आहे शंकेला कां जागा होता घातला धिंगाणा ? नसते देणे घेणे याला निष्फळ पूजा पाठ, जाणा ! पूर्ण विकसित कोणी कोणी विस्तरण्या उद्युक्त परि ऊर्जेचा उचंबळ अविरत कणा कणांत, दृश्यमान हिरव्या चुड्यांची अोंजळ मधे विसावे धवल केशर पेरण देठांतील दृश्यां पूर्णत्व देईल ? निळ्या चोवीसही पऱ्या फेर धरुनी नाचणाऱ्या कोठे कोणी नेल्या आऱ्या परिघा आधार देणाऱ्या ? शक्र जरी आक्रमला वक्र दृष्टी वारायाला चक्र हवें तर्जनीला व्यूह सारे भेदायाला प्रत्यक्ष तेज:पुंज देदीप्यमान प्रतिमा फिकटलेली किंचित म्लान दर्पणाचं कसब कसाला लागलं दिठींनं मात्र त्यांतलं सत्यंच हेरलं इवला एक मोदक, त्याला एवढं मोठं पात्र ? कसं पोटभर जेवेल भुकेजला उमापुत्र ? ना भाज्या, आमट्या, कोशिंबिरी ना मूदीवर साजुक तूप, पिवळ्याधम्मक वरणांवरंच खरंतर खुलतं त्याचं रूप चटण्यां, पापड, कुरडया, भजी, कांहींच कसं नाही ना मागमूस पंचामृताचा आणि खिरीचाही सुगरण रांधते आप्तांसाठी थकेपर्यंत गात्र नैवेद्याचं ताटं आपल व्हावं निमित्त मात्र शाश्वती, रक्षण, दायित्व शा र दा जाणा आधारतत्व पेलतांना पालकत्व खूणगांठ असावी ज्याने जाणिले त्रैक्षरी मर्म अवलंबीलल केवळ विहित कर्म स्थित तेथेचि यशस्वितेचे वर्म असते सहसा बाकी टपकली शेजारी, मी नाही पडलो अजून तरी मायेसंग तिच्या कुशींत आहे तगलो कोण कधी कसा येईल काठी वाकडी घेऊन मायेला ओरबाडंत उगा मला नेईल खुडून मला दिसतंय एक भलं मोठं वानर तारेवरची कसरत करंत भरलय आभाळभर पिसाळून विस्कटलेंत त्याच्या अंगावरचे केस मरुतपुत्र हनुमान जणूं उत्सुकलाय झेपेस सरळसोट वावभर उभा पर्णहीन उघडा तर धावरीच्या मनगटावर कंच हिरवा चुडा गोठ पाटल्या पिवळ्याधमक कांचनझळाळाची मधूनंच चमक तहानल्या शुष्क कंठांत रित्या करून अमृत धारा कानांत वारं भरल्यागत आभाळभर उधळलाय मेघपिसारा दृष्ट कुठं न लागो म्हणून हळूंच भूतांनी लावलिये तीट झेपावलं पांखंरूं पाहा आज कसं झालय धीट मोहांत पडावं अशी लालचुटुक, भूतांनी रेखलेली ? अं हं ! अग्न्यास्त्र षड्रिपुंवर रोखलेली दूर राहूनंच घ्या भरून दिठींत खुडूं पाहाल तर दाह घेईल मिठींत डोंबाऱ्याचे खेळ तंतांवर मेघावळ बांधोनी नभजेला इवल्या घट्ट वक्षांवर यूगायूगांतून चाले भूतांची आगळी क्रीडा उगा मनुष्ये उचलती कोडी ऊकलाया वीडा उमलताचि हसत हसत पसरति परिमळा होतं खुडिले जर नाहि कोणि पाहायची चांदरात परि स्वप्ने कां पहावि ? कुणि ना देणार हवी ? माळुनी कोमेजतांच देह निर्माल्ये व्हावी ! खेळत सारेंच डाव अंकुरतो लढत जीव मरण कुंपणापाशी आपेआप सरे धाव राकट रापल्या मिठींत मघईची पान पण खिडक्यांतून दिसतांयत वस्त्यांची रानं रंगवायला विडा कात, चुना हवा थोडा माडीवर सुटेल मग पिरतीचा तिढा तंताला कवळत फुललेली वल्लरी आक्रमू पाहातेय मुक्त मोकळं आभाळ पण आवरा सावरायला सांगतेय कां तिला परतलेली मेधांची माळ ? गर्गरा क्रुद्ध वर सघन चक्र भर्भरा वात निर्दिशा, वक्र कर्करा शस्त्र फिरविता शक्र थर्थरा भूत, खेचर नि नक्र सौधांतली तृणपाती, झुकोनि डोकावीती निरखून पाहाती गमती पातीच्या धाकल्या हे ठाय मधे सानुले असे कां कवळे ? की जराजर्जरें वृद्धां कवळे पिवळे ? पण लक्षवेधि ते सत्य कांहिंही असले पांथस्त कितितरी दृष्टिभ्रमाने फसले कोसळतोय धुंवाधार तरी पालवी कां फुटना घरटं लपवाया पांखराला आडोसा कांही मिळना ओसरल्यावर चिंब सरी नसानसांत चाहूल बोचरी खराटल्या निष्पर्ण शाखांमधून झोंबरा करल मुशाफिरी जलदांवर मारून फुली तंतानि पाठवण केली कवळ्या तमारि किरणांनी पर्णचक्र नि राई न्हाली ही अशी मनुष्ये अजुनी निद्रितावस्थ कां बरें ? जग ऊब पिउनि जरि सारे कर्माप्रति देइ हाकारे प्रीतरंग शिखेवर कामदेवाचा शर वेधण्या ध्यानस्थ कुणी काननि कोठे शंकर ? तपोभंग होइल मग तांडव प्रसवेल आग शांत वना करावया मोहिनि अवतार योग प्रत्येकाच्या वेगळ्या छटा रंग, आकार मोठा छोटा खुडल गेलं तर मग मात्र समर्पणाच्या आगळ्या वाटा कुणी गुंफलं जाईल हारांत कुणी श्रध्येयाच्या गर्भगृहांत पण एकंच प्राक्तन साऱ्यांचं निर्माल्य मातींतच मिसळायचं अरे मानसा मानसा किती घेरश्याल मला भवताली किती गर्दी जीव विझू विझू जाला ईमारतींनी घेरलं लागना जालं ऊन उंच झेपावं लागतं जरा पाहाया शोधून कसा मोकळा घ्यावा बा वारं हुंगूनिया श्वास ? ठेवलेस जखडोनी काहून बा तूं आम्हास ? दिवसा ‘ढवळे’ नि रातीला ‘काळे’ अशी याची करणी जीवान्ला बघून बेसावध आनतुया पांपणींत पाणी कुठं फेडश्याल पाप बाबा किती करश्याल हाल कर काळं, दाव निळं मोकाळलेलं आभाळ जलदांचे बेगडी रुसवे वा तंतांचे जाल फसवे झेपावती द्विजगणांचे थवे कर्मयोगी, लंघण्या टळते कधी कां जीवमात्रास वेळ मुखांत पडण्याची, घास ? अनिवार्य जगतांना क्लेश वारतांना क्षुधा-तृषा पिवळीजर्द उमलून कळी पांखराचं रूप ल्याली ‘काय होणार आपल ?’ चिंतेंत शिखेवरची धाकली कभिन्न काळे कावकावंत मग्न आपल्याच नादांत सोन्यानं पाऊं मढवेल ? भग्न स्वप्नच राहिल मनांत हिरवाईला अंगभर स्वर्णमयी शृंगार हीच असावी कां वर्षादायींची माघार पिवळा तवान तरार बहाव्याच्या पांदींत दाटतो गृहिणीच्या मनांत तेंव्हा बेत फराळाचा घाटतो इवल्या इवल्या झबल्याच्या छटा जांभळ्या छकुली मिरवतिये आपल्या पांच पाकळ्या पोपटी, गर्द हिरव्यानं गच्च भवताल दाटलय आगळा रंग लेउन मधे तान्हं पहा नटलय नको पुन्हा डोईवर आता मेघावळ नको काळ आभाळ नी अकाळी झाकोळ मात्र ग्रीष्म सरता सरता येशील ना पुन्हा ? तहानल्या मनुष्यांना देशील ना पान्हा ? कवडसे झेलतांना स्वर्णमयी झाली शाखा, शिखा, पर्णे सारी झळाळानं न्हाली उजळो निळेशार आभाळ वा दृश्यमान अवकाळी झाकोळ पोसणे घरट्यांतली पिलावळ कर्मयोगे अनिवार्य स्वकीय घऊन सांगाती झेपावत अथांग लंघती थव्याने धरेवर वेधती भक्ष, क्षुधाशमनार्थ अवखळ झुळुक विस्कटूं पाहे कुंतलशोभा न्हाल्यावरी लालचुटुक शृंगार आधींच सजलाय तीवर कटीवेरी कभिन्न काळ्या हातांचा उन्हापावसांत निघालाय राप तरी उचलून वर बाळीला कवतीक पाहातोय करूं बाप नम्रतेनं झुकून करतोय मुजरा निर्मिकाला शेमल्याचा शेव तवा वाईंच खाली आला तांबडा भडक शिरपेच लाल कसून डोईवर कोण्या मैनेकडं चाल्लाय लाल हिरव्या माडीवर लई झाला अंगणांत लपंडाव आतां घरला चला नायतर माय वढंत न्येइल धरून बखोटीला कुटं तरी बांध पोरेहो अवखळपणाला बी घाला निलाजरेपनी कमरेचं सोडून गुंडाळू नका डोईला दाटीवाटीनं साऱ्या सख्या सांगती हातांत गुंफून हात ‘प्रीतरंगी नेसूं असलं तरंच घेऊं खेळाया सांगाती आमच्यांत’ भवती गर्द गुंफण राईंत पोपटी हिरव्या पानांचं घरटं कोण खुडूंन नेईल ? उगां उरांत भयाला येतया भरतं कोण्या नारीसाठी माणके कोंदली स्वर्णमयी प्रभा भवताली दाटली बिंदी, कंठी, सर कानांत झुंबरे नथीसाठी मोती कोठे शोधावे बरे जाईजूई कळे दिसले वेलीवर सांगावा घेऊन परता सत्वर मणी लालसर हवा ओठावर मूकपणे कोणां कराया वाभरं आल्हादक तवान पिवळा हिरव्यागार पात्यांवर शिणल्या भागल्या मनावर हीच खरी अलवार फुंकर भिंतींमधल्या गवाक्षांतून जरा अंमळ डोकावा बाहेर सजल्या धजल्या भूतांचं दिठींत ओसंडेल माहेर रोज रोज सण आगळे निसर्गाच्या पोतडींत मात्र उघडूंन काळजाची कवाडं भराया होवी डोस्क्याच्या कावडींत तरुशाखांच्या काष्ठांमधली वा पोलादाची घडविलेली गवाक्षे सदैव असतांत भुकेली सत्य शिव सुंदर दाविण्या कवाडे ठेउया उघडी निरंतर जोखण्या बऱ्या वाईटांतले अंतर सारासार विवेके निवडोनि, दूर राखण्या अहित खळखळ करीत अवखळ मेघावळ तुझ्या मार्गांत जणू काटेरी बाभळ मला झाकोळ देऊं पाहील जर अधोगत केवळ ठरेल निष्फळ फुलावेरी पोहोचे पर्यंत पाखराचा अंमळ विश्राम गच्च भरल्या वल्लरींच मग आधाराला देतांत पर्णभार साजिऱ्या पंखावर रेखलिये भूतांनी सुबक नक्षी वनराईंत तरु, तृणपाती साऱ्या प्रवासाचे साक्षी वल्लरी अंकावर कांही कळे कांही पूर्ण फुलंत उमललेले मोहांत पडून दिठींत जरी साठले तरी तिथेंच बरे हसंत राहिलेले खुडून धातूं वा दगडाला वाहाल श्रेयासाठी प्रेयाचा बळी द्याल वाट पहांत कृपेची जर बसाल अंधपणाच्या जाळ्यांत वृथा फसाल पिसाळल्या वाऱ्यानं वाइच शेलाटी पाहिली कवळू नको नको म्हणताही गेला तिला घुसळू दमून बिचारीनं अखेर धराई जरी गाठली पर्णालंकृत डौलाची बूज तिनं राखली कातळ कणखर, डोंगर दूरवर शिरपेच आभाळाचा निळाशार हिरव्या राईनं दावाया साजिरं उघडलय गवाक्षाचं द्वार धराईच्या कुशींत डोलतय छकुलं बघतय कवतीक, भोगतय सुख अपार ‘आतांच लुटून आनंद घे बाळा नंतर झेलायचेत अंगार नी धुवांधार’ आभाळ उमलले निळे कीं शुष्क जलद जांभळे ? धवलांचे भवती तट अडविती कोसळारी जळे ? तरु कवळू त्यांना पाही अलवार धरोनी बाही ‘परतणे लांबवूं नको, तुजवीण न जनन, मरणही’ आता दिसतोय गुलाबी नी भासतोय उबदार जरा वर येऊद्या मग सय झाकोळाची येणार समोर ठाकेल ते नको वाटतं कंटाळून मन वारायला जातं पण हवं तेंव्हा मागाल ते कसं सांगा मिळूं शकतं ? फादीवर चढून बसलिये कुणावर रुसून ? की उन्हाची ऊब धेतेय सावलींत बसून ? दिठी तीक्ष्ण एकाग्र वेध आहे घेत ‘झेप खारोटीवर’ ‘मनी’ माउच्चा बेत बैठकींतला डौल पाहून हसूं येतय खूप हुप्प्या आला एखादा तर सगळंच वाजेल सूप थोरल्या वा धाकुल्याची अपुरीचि अजुनी आहे उंची कुंपणा पल्याडची कैची रीती ? आकळण्या राज्य बाहेर कराल रासवटांचे निर्घृण, निष्ठुर वाटमाऱ्यांचे तोडोनि बाळांनो चुरगळणाऱ्यांचे नका अनुभवूं झाडं पानं फूलं फळं पान्हा पीत सुखावलं परी ऊन्हावीणं आतां सारी रयाचं जाईलं त्यांच्याबरोबर तण फोफावले मातींतून खूरपोनी हलकेंच होवे घ्याले सोडवून कोंदण हिरवे भवती केसरलडि ऊर्ध्वगती दृश्यवर्णनासि मती कुंठित होईल पिसाऱ्याला लागली रग म्हणून मिटून बसलास पंख पण त्याला कुठं तमा आहे ? अजून असह्य करतोय डंख जरावृत्त चादी पेरली तरी ओलांडू पाहातोय सीमा कसं वाटंत नाही याला, कीं ‘परतांवं आतां निजधामा’ सजला सौधांत निथळोनी रंगांत अंतर्बाह्य उजळींत कंदील मंदील लगटती देहाशी वस्त्रे पारदर्शी तमाचा तेजाशी स्पर्धाभाव मुक्त नी मोकळे निरभ्र आभाळ मंदिरी घुमतांत मृदुंग नि टाळ छत्र नी चामर गेली गगनावेरी माडाची डोलते चवरी वाऱ्यावरी झेपावे पांखरू वेधण्या भक्षाला परतोनी वासल्या चोचीं भरायाला व्यस्त अवघे विश्व कर्मयोगांत ऊर्जामंथनोत्तरी सुफल नवनीत उमलले पूर्ण एक दुजे अर्धोन्मलित जळें, वर्षा वा दवाच्या दोन्ही नाहीत सुस्नात ऐशा वागवीत देहास पळ पुढचे कैसे साहावे त्या परीस कोणी खुडोनि गाभाऱ्यांत अर्पावे आहे इवलंस पाखरूं पिवळ्या मोहक रंगाचं हिरवाईंत, पण लपलय छान फूल करून देहाचं वेध घेईल दिठी जर नीट पाहाल निरखून पण जाल जर खुडायला तर जाईल भुर्रकन उडून गच्च दाट हिरवाई कबऱ्या भुऱ्या आभाळातळी किती जीवांची आसऱ्याला तिच्या मांदियाळी तोडून उध्वस्त करूं जाल उभारायला खुराड्यांचं जाल भूतांच्या क्रोधाग्नींत क्षणांत ‘जळींत’ व्हाल इतकं निरभ्र नभांगण ? स्वच्छंद झेपावलेलं द्विजत्रय ? हे सारं खरं की स्वप्न ? सरलं कां अवकाळी सरींचं भय ? साळसूद वृद्ध अनुभवी मुद्रा शुभ्र जरी वागवी असूं शकते कां फसवी कळेल कांही पळांत शिखा, माथा जळहीन देह परंतु काळा कभिन्न कोसळण्या आतुरले मन भासे यांचे पांखरे भोळी बिचारी झेपावली आभाळावेरी परततील आपुल्या घरी होवोनि चिंब शांत निवांत निजलेंत सारे जीव उबेंत शेजेवरले जिण्यासाठी पळून चक्र अंग टाकून विसावलेले अवखळ चार उमललींत पंचपंच उष:काली हिरव्यागार देठावरती नाजुक पिवळी इवली इवली उनललींत चार उतावळी पंचपंच उष:काली हिरव्याकंच देठावरली नाजुक पिवळी इवली इवली किती रातींना दोडोनं ओरबाडलं आभाळं फांद्यांतून कोसळते आज चांदणे निखळं झूरूमूरू बिंब हासे श्वास घेऊन मोकळा लागे शिशिराची चाहूल शिर्शिरीच्या गोड कळा जितकं आखीव रुजवलं तितकंच रेखीव उगवलं मोकळे पसरले पात्यांचे पांख पाहून काळजं हलत्यांत हकनाक मधे हाय हुबा सोट सरळ वाकड्या नजरांचं वाराया गरळ सहा वल्ह्यांची शुभ्र नांव कापंत हवा शोधतेय गांव लंघून अंतर मावळती आधी किनाऱ्याशी व्हायला हवी संधी यौवना शुभ्रवस्त्रा सुस्नांत काळीज धडधडतंय उरांत पसे अवघे सहा पसरून पसाय मागतेय मनापासून कुठून तरी झुळुक येईल ओंजळींत बीज रुजवून जाईल वाट पाहूनी थकली झाकोळली जीणी सारी किती दिसांनी मासानी भासे चांदवा भाकरी निळाईंत टिळा शुभ्र शोभा नामाची आगळी भवताली वोसंडली स्तब्धता चांदणवेळी उगवतीचं निरभ्र आभाळ कित्ती जाणवतय अप्रूप तरुशाखा पर्णांचं त्यावर लोभस नक्षीरूप माया मोहजालांत अशा गुंतून जाते दिठी तरी रोज जगत राहायचं अशांच क्षणांसाठी विरंगुळा हाच आपला हाच विश्रामाचा पार सारं साठवून मनांत झेपावायचं घेऊन उभार धरतीच्या प्रीतविरहांत जागलाय जनूं रातभर रडून थकून गेल्या दिठींत उतरलय तांबर चुंबाचुंबी सरल्यावर याचा बदलेल रंग वन्हीवत सहवासात सारी सुखं होतील भंग सांजला रागेजली टाकल क्षितिजीपल्याड बुडवून अासवं गाळंत आळवेल मग दरबारी,अभोगीची धून व्यापून अर्ध नितळ निळं पुढं नको जाऊं झावळ्यांचे पंख आतां नको हलवून पाहूं बघूं दे आभाळ जरा मेघावळी विना भरवसा काय त्याचा पुन्हा फुटेल पान्हा शाखांवरून उतूं जात धरेवर आली डेरेदार झुडुपानं त्यांतली पसाभर ल्याली गुलाबी रंगानं भारून भवताल चूर झालं लाजून सांज होतां झुळुक अलवार कोमेजली घेईल कवळून प्रत्यंच्या ताणायला अंगुष्ठ तर्जनिस भिडले तीराग्रें वेधुनि लक्ष यमपाशि जीव धाडिले कीं मृगमुद्रा साकारे शाखांच्या वळणां मधुनी चमकुनि उठतांत अनंत कल्पना विविध रूपांनी मऊ मऊ हरळी खुणावेय अल्याड शुष्क तांबडी धराई पसरलेली पल्याड माळीयाने बाधलेली मधे कुंपणाची जाळी नवलाईने पाहाती थोर, सान, दोन्ही बाळी लंघून लाटा अडथळ्यांच्या जिंकावी लागते शर्यत भागल कां बाराची येळ जर पडून राह्यलं घोरत सुटायचं पळंत घाईंत मुक्कामी पोचायच्या कष्ट करून चार दिडक्या कनवटीं लावायच्या भरवाया हुवा घास चोचींत भुकेजली असत्याल अस्तुरी, पोर कोनं बी येऊंजाउद्या, मरना ! उगा आपल्याजिवाला घोर गडणीं उजून डोळे मिटून पानांच्या कुशींत दोन लालचुटुक उमलंत कां हसतायत खुशींत ? तरुण तवान काळजं, फेर धरून भवती बघू निवडतांत दोघी विंझण्यासाठी किती ? नाजूक कायेवर कवळ्या फुटवे अजून ठाईठाई वळत पळत सारं कवळत कशापाई जायची घाई ? देह, बेचैन बेभान बेताल रोम रोम पसा होईल मनसोक्त मोकळून मथून मनाचा उधळत वारू पुढं जाईल दृष्टीभ्रम कांहीसा निरखून पाहाल जर शुभ्र फुलांच्या गुलछड्या जणुं प्रत्येक पानावर उगा मोहानं लगबगींत एखादी उचलूं जाल पसरला पसा येइल हातां मायेंत पूर्ण फसाल भिनत चाल्लाय काळा डंख की फुटतायत दिशांना गुलाबी पंख संधीकाल, निशा, उषा सुख कुणा, कुणा दु:ख कुणाला बोच, कुणाला नशा कुणा जिण्याची फाटकी दशा तर कुणी जगत मरतांना अजमावतो नशिबाचा फासा नाही सण नाही उत्सव फुटतया रोज तरी तांबडं निळाईचं नेसूं साजिरं कबऱ्या काठ-पदराचं लुगडं आभाळांतला गुलाल हुडहुडंत जाऊन वाकळींत घुसल दोन अधीर धसनुसळ्या जीवांच्या मंदी जाऊन बसल कुंचला कशाला ? काय चितारायाला ? येईल कुणी ? रंगारी कसबी कुठला की भोग कुणाच्या ललाटि रेखायाला धाडिला कुणी सांगावा सटवाईला ? झगमगे निळाई हसत अताशा रोज कां अशी अचानक रया हरपली आज ? कीं गूढच राहिल व्यथा, वेदना, गूज ? अशुभाची येई कानी उगांच गाज

Friday, August 16, 2019

चित्र-शब्द

[25/12/18, 06:37:06] Arun Kakatkar: धगधगतोय चुलींत वन्ही शमवायला जठराग्नी बाराचं कोडं कुणाला चुकलंय तत्वज्ञान येऊन सगळं भाकरीशी थांबलंय [27/12/18, 07:12:06] Arun Kakatkar: त्रिशुळधारि शाखशिखा दिमाख कमळाचा अनोखा दिठींत सामावून घेऊं एका संहार आणि सर्जन [27/12/18, 07:12:06] Arun Kakatkar: उर्ध्वगामी नजर निगळींत उर्जासार जगणे मरणोत्तर देतांहें दृष्टि [27/12/18, 08:16:48] Arun Kakatkar: भागिरथी, पार्वती महादेवा भवती फेर धरोनि नाचती प्रीतवेड्या [28/12/18, 07:33:34] अरुण काकतकर: डवरलि तरुशिखा जणू हिरकणिस लाभे कोंदण दिठी मनास संभ्रम परि सजविते कुणास कोण तेजाने स्निग्ध जरी माखे आदित्य बाळ अवकाशी वर येतां दाहक प्रखरेल जाळ [29/12/18, 09:05:22] Arun Kakatkar: धूळवाटेला एकाकीं छाया प्रकाश दाटले तरूं मोठाले अजस्त्र कवळायाला वाकले दूरवेरी नीरवाची अनाहत नादकथा ऐकायाला कोणा कशी आवडेल मूक व्यथा ? [30/12/18, 06:44:58] Arun Kakatkar: सरळसोट उभा कडा पाठीशी, लक्षवेधि विखारी उधळेल सहजी मनसुबे, लक्षभेदि [30/12/18, 07:08:57] Arun Kakatkar: निळा निळा कान्हा भाळी शुभ्र नाम टीळा अवकाशी पूर्ण शशीं बिंबाचा सोहळा डुचमळे जळ बिंब लाटांवर स्वार धिटाईची चर्चा कौतुकानं रानभर विस्तारतां परिघ लाटेलाटेंत अंतर बिंबांमनी थरकाप काळीज कापर झुरुमुरु चांदवा अल्वार उतरला धरेवर विसाव्याला जरा पहुडला शहारली धरा जरा हव्याशा स्पर्शाने तृणपाती अर्ध्याराती डोलली हर्षाने [30/12/18, 07:08:57] Arun Kakatkar: या रचनेंतले पहिले दोन चरण आदरणीय उषाताई मंगेशकरांच्या, केवळ अप्रतिम अशा संकल्पचित्रावर आधारित आहेंत.. [31/12/18, 07:16:43] Arun Kakatkar: तसेच दिवस त्याच रात्री जशा सुख, वेदना गात्री देहाचं वाढतय क्षीणपण झिजतोय हळू कण कण अथांगाचा असीम पसारा क्षुद्र राखेजला मी निखारा तिमिरापासून तिमिरापर्यंत जायचं उदयास्त भोगत काळोखंच अंतिम सत्य उजेड ? फसवं मिथ्य पुढंपुढं धावत पळंत जगायचं कडू गोड रिचवंत [01/01/19, 07:44:22] Arun Kakatkar: लांबली सावली संपूटत जाईल जसजसा डोइवर तेजोनिधी चढेल बारसे करित दिवसांचे मााणुस बसला परिवलन नि क्रमेचा नेम नाहि कधि चुकला [01/01/19, 08:20:36] Arun Kakatkar: सावली जन्मते विरून जाण्यासाठी माउली ठाकते सदैव आठवं-काठी काळोख, वेदना, सुखें काळ भारितो थरथरता सुरकुतला माथ्यावर असतो [01/01/19, 16:40:58] अरुण काकतकर: सावली दिसभरी अवतीभवती असते सावली विरुनि माध्यान्ही देही जाते सावली जन्म कशि घेइल अंधारांत ? सावली राहते प्रतीक्षेंत गर्भस्थ [02/01/19, 06:34:19] Arun Kakatkar: कुंपणाच्या आंतच बर ‘रूपडं’ म्हनत्यांत ‘लय भारी’ कोमेजल्यावर सांजला किती असतील डफधारी ? लुटून घेते कोड कवतीक डोळे जोवर फाडून बघत्यांत देव्हाऱ्यांत जागा झुंजुरका लोटत्याल उंद्या निर्माल्यांत [04/01/19, 06:52:48] Arun Kakatkar: ताई, तुझ्या अंगांगावर छान छान फुलं मोठी कधी होणार आम्ही लहान लहान मुलं कधी मिळणार सगळे आगळे खेळायला रंग पिछाडायला लागणार आणखी किती जंगजंग खुडून तुला कोणी माळेल केसांत की गुच्छ करून नुसता मिरवेल हातांत देव्हाऱ्यांत नेऊन तुला रेखतील पुष्पावली ? कीं फूलदाणी रचून ‘आज’ म्हणतील ‘हौस भागली’ ? [04/01/19, 07:32:19] Arun Kakatkar: जांभळा, काळा करील कराल काळ क्रूर विरून जाईल अस्तित्व अवकाशांत दूर म्हणून सगळे भोगून घ्यायचे वाट्याचे क्षण कळणार नाही कसे झिजले बधीरलेले कण [05/01/19, 07:52:46] Arun Kakatkar: कुट्ट काळ्या रंगाला सावलीसुद्धा लाजली देह मुद्रा शुभ्रावत राखी भुरी झाली [05/01/19, 08:04:46] Arun Kakatkar: कबरी भुरी झाली असं म्हणूया.. [06/01/19, 07:58:27] Arun Kakatkar: डोंगर दऱ्या, माळरानं उल्हसित करतांत दर्शनानं वाटा शोधत जातांना दूर सुखावते दिठीं पुरेपूर दिसत नाही त्यांना भवतालाचा गंध तेवढांच काळजाला देतो आनंद काळजाला असते जाणीव फक्त स्पर्श, नाद, रसना दृष्टी देतांत मुक्त [07/01/19, 07:58:07] Arun Kakatkar: इवलिश्शी दुचाकी अन् केवढा मोठा घाट कशी पार करायची चढावरची वाट पण वारं भरलं उरांत तर कांहींच अवघड नाही नुसती कल्पनांच बाहूवरची उसवतेय बाही [07/01/19, 11:58:54] Arun Kakatkar: मागणीप्रमाणे पुरवठा.. 😊😊 [08/01/19, 06:44:30] Arun Kakatkar: काटकोनी कोन्यांमधे ज्ञानाचं भांडार गणराज चौकटींत सावरंतांयत आकार फुलदाणीं रचून ठेवलिये आत्तांच वर टापटीपिनं पसरलाय आनंद घरभर [09/01/19, 06:52:01] Arun Kakatkar: एकाच चौकटींत सांकळल्या जिण्याच्या छटा साऱ्या बालपण, यौवन, पोक्तपण, जरा यशापयशाचे डोंगर नि दऱ्या [09/01/19, 06:52:01] Arun Kakatkar: खुरपले जातील पिवळे तण दाणे लुटतील मनुष्ये, द्विजगण क्लान्त तरुतळी सावली शोधेल तोडंत तेंच डोंगर बोडके करेल भूते खेळी मग अतर्क्य दावतील क्षणार्धांत भवताल उध्वस्त करतील भजन-पूजन, यज्ञयाग ठरतिल कुचकामी भेगाळल्या माळरानांची फक्त उरेल भूमी [10/01/19, 06:18:37] Arun Kakatkar: ही असतिल खरि की असतिल बेगडि सुमने परि शोभा यांची सहज जिंकिते मने पर्श्वांत पटल साजेसा नि मिणमिण दिवे काळीज हरखुनी दृश्यच्या केंद्री धावे [11/01/19, 09:00:19] Arun Kakatkar: अल्याड निवांत पल्याड आकांत अल्याड, पल्याड कोठे ? ही भ्रांत सारे मनांतले आपूल्या सोहळे जशी वेळ तसे वृत्तींतले खेळे अल्याड सुखशय्या ! पल्याड व्याधि व्यथा घालणे झेलणे घावांच्याची गाथा कोण्याओठी वेद कोण्याभाळी स्वेद भूतांठाईं मात्र नाही भेदाभेद [12/01/19, 06:25:03] Arun Kakatkar: ब्रम्हा विष्णू महेश सारे कल्पनेचे खेळ पुष्पत्रयीचा झुंजूमुंजूत आनंदाशी मेळ सत्य शिव नि सुदर एकवटलंय इथं दैवान दिली दिठी ! आजझाली सार्थ.. [13/01/19, 07:15:17] Arun Kakatkar: चिकन्या सुपारीचा जीवघेना ठसका *********** १९८९ मधे लिहिलेली लावणी राम कदमांनी संगीतबद्ध केली.. जयश्री, माधुरीनं गायली.. नंदकिशोरच्या शिष्येनं नृत्यांकित केली.. दूरदर्शन करितां ********* चिकन्या सुपारीचा जीवघेना ठसका अडकित्ता घेतांना हात वाइच हिसका पानं कवळी,कवळी, चुन्याचि लावा कळी घरुन कातगोळी आंत बसवा पंचम घाला थोडा, बांधा गोविंद विडा वरुन लवंगीचा ठसवा फडा करंडा घाटांत थोडा बसका हौस मनी भारी, मारा पिचकारी दिसेल मग स्वारी, राजबिंडी आवळा कसुन करी, घुसळणिची दोरी लोण्याचि करा चोरी हिरवा चुडा मनगटी हुइल पिचका विड्याची गोडी बखेडा मोडी लावतिया जोडी राघू-मैना अडखळे व्हटि थोडी, बोली बोबडी लावुन लाडीगोडी, करा की माझी दैना नका घेउ तुमी रुसव्याचा धसका [14/01/19, 08:16:21] Arun Kakatkar: मूळ... My child arrived just the other day
He came to the world in the usual way But there were planes to catch and there were bills to pay
He learned to walk while I was away And he was talking 'fore I knew it and as he grew
He'd say, "I'm gonna be like you, dad
You know, I'm gonna be like you" And the cat's in the cradle and the silver spoon
Little boy blue and the man in the moon
"When you coming home, dad?" "I don't know when
We'll get together then, son, you know we'll have a good time then" When my son turned ten just the other day
Said, "Thanks for the ball, dad, come on and let's play
Can you teach me to throw?" I said, "Not today
I got a lot to do" he said, "That's okay" माझं रूपांतर... कालच कि वो प्वार झाली कौतुकाची मला सुईण म्हनत व्हती 'साखर घ्या वाटायाला' 'झालं सगळ येवस्थित,चिंता नका करूं' दाणं भरवा चोचीत, लइ ग्वाड हाये पाखरूं' तिफण फिरवायाची आता कराया होवी घाई बियाणं आनल्याबिगर पेरणी व्हनार नाई प्वार रांगायाला लागन्या आधी सर झडींची होवी कोंभ रुजन्याआधी तिला झबली आणू नवी खिदळणतेय बांधावरच्या झोळींत पाहा द्वाड आधी हुंकार नि बोबडे बोल नकळत ग्वाड 'मला बी तिफन गोफन तुज्यावानी होवी पोळ्याला सर्ज्यास्नि' म्हनल 'झूल घालू नवी ?' 'चांदव्यावरचा ससा गोरा कापसाचा गोळा देश्याल आणून ?' चेहेऱ्यावर भाव भाबडा भोळा, 'ठकी बी पायजे, संग खेळाया भातुकली पावनं रावळं येत्याल, करन भात पायली पायली !' 'कंदी येशील परतून बाबा, जेवाया पंक्तींत ?' 'कसं सांगू पिल्ला तुला ? मस्नीच न्हाई म्हाईंत आल्यावर मातर तुला कुशीत लाडानं घेईन दीसभराचा शीण आणि इसरून जाईन' 'न्हाणूली झाली प्वार' माय कानांत बोले काळजीनं काळीज माजं हुरहुरत गलबले 'चिंता नुको करूं बाबा, मी झालीया धीट ! कोल्ह्या-कुत्र्यांना दूर ठेवन्याची शिकलिया रीत गोफनींत दगड लावुन टोळ, होले हेरन गडणींच्या हुर्दांत आन् राणी झाशी पेरन आन् राणी झाशी पेरन' [14/01/19, 09:00:52] Arun Kakatkar: प्रीतरंगामधे दडलंय इतकं कसं क्रौर्य कुठंलं करायला निघालाय सैतान अदय निर्घृण कार्य वासलेला जबडा अन् जीभ भडक लाल नजरेंत विखारी निखारा भाजतोय जणू जाळ शांत निवांत हिरवाईंत हे काय आक्रीत जवळ जाऊन पाहावं तर आगळींच रीत [15/01/19, 09:30:23] Arun Kakatkar: अर्धामुर्धा शुभ्र चांदवा अन् सोबत चमचम एक चांदणी मजेत हसंत खेळंत चाल्लेत निळ्या विस्तीर्ण प्रांगणी उजळाया लागलंय आभाळ फिकट हळूहळू करींत शाई उंचावल्या शाखांच्या बाहूंत मग जोडीला लपायची होईल घाई [16/01/19, 08:01:11] Arun Kakatkar: सुख दु:ख सुरकुतलेली एकवटलीत इथं घाव सोसत जिरवत झेललेले जिथं तिथं दिठीं अपार शांत निवांत पण सावध एकाग्र तीक्ष्ण संकटांचा घेत वेध उकलेल सारे प्रष्ण अगडबंब देहांत जरी डोळे इवलेले जिण्यासाठी अवघे सज्ज इरादे कसलेले [17/01/19, 09:06:51] Arun Kakatkar: खंडती शाखा कुणी सोलती वा शरीर अदय भूते वा मनुष्ये, नशिबि असती स्वार विस्तारलेला सोबती अन् पर्णभारा पाहुनी खंतावता मन आंतुनी ओलावते कधि पांपणी वाटणे हेवा कुणाचा लौकिकी असतो गुन्हा रेखिले भाळावरी, ‘त्यां’ सांगती, ‘तुम्हि सुख म्हणा !’ [18/01/19, 07:07:15] Arun Kakatkar: उगवल्या दिवसावर दिसताहे तृण राजी अंगांगातुनि तेवत आहे पाहा फुलबाजी अल्यापल्याड भवताली हिरवाइचि जरि सोबत तेजस्रोत प्रवाहींत सांकळला जो आंत मातिमाय एकच परि छकुल्यांच्या विविध परी अजब सोहळा दिठीस अवतरली जणू परी [18/01/19, 20:26:06] अरुण काकतकर: https://m.facebook.com/photo.php?fbid=10218724445687968&id=1404082902&set=a.10201331692360005&source=57&refid=52&__tn__=EH-R हुडहुडिंत ऐन सय हुरहुर काहुन लावी हैराण करितसे खेच द्वाड लाघवी -अरुण काकतकर [19/01/19, 06:51:12] Arun Kakatkar: ढेकळं लहान मोठी अपार त्यांवर पडलेंत कवडसे चार गळली पानं झाली पाचोळा करून पडलींत अंग गोळा कुठं अखंड चैतन्य झरा कुठं शुष्क भेगाळली धरा जिण्या मरणाचा संग्राम अथक उभ्या आयुष्याचं जणु छायारूपक दुतर्फा मार्गावर सार शांत शांत लाल, हिरवे, नारिंगी तरी कार्यरत पुढे दूरवेरी ना अडथळा वा धोका 'सावध', तांबडे जोडीनं करतायत फुका ? चुळबुळत कडेवरून उतरली खाली चार हिरव्यागार तृणपात्यांनी झेलली ती हळुवार कोणि उचलुन त्यांना अंजुलींत घेईल देवघरांत वाहायला लगबगीनं जाईल गोरी गोरीपान सगळी फुलं कित्ती छान हिरवाईच्या कुशींत विसावली छकुली सान खुडून नेईल कोणी नी मिरवतील प्रहरभर सांजेला विसरुन जातील कोमेजल्यावर पूर्णोन्मलित कांही, ताजी तांबडी लाल झुडुपांवरच कांहीं कळ्या, पानांची ओढून शाल पायवाट नी पायऱ्या साऱ्या तृणपात्यानी झाकल्यांत पांथस्थाला दूर, वर न्यायला तिथंच निस्तब्ध थांबल्यांत