Tuesday, September 9, 2014

।।दासबोध।। ।।भासबोध।। १६७ ते १८३

।।दासबोध।। आणि ।।भासबोध।। दासे रचिली मंदिरे । प्रस्थापिले शक्ति-गाभारे । बलवंत करविण्या शरीरे । वेशीबाहेर, स्मशानांत ।। १६७ ऐशा विरळा संतासि । जखडून अंधश्रध्द भाकडांशी । भाबड्यां पाठवू पाहाती कुण्यादेशी । 'लुंगे'सुंगे 'साधू' 'बुवा' ।। १६८ शिष्यांना उचित मात्रा । शिष्यांना ऊर्जा गात्रा । शिष्यांशिरि सदैव छत्रा । धरितले, तो गुरू ।। १६९ कां बोधाचा दुष्काळ । प्रतीक्षा क्षणक्षण पळपळ । शब्दांकित प्रभातकाळ । कैसा व्हावा ? ।। १७० की क्रोधाचा हा उद्रेक ? । पाठभेद पाहुनी प्रत्येक । केली पापे जणू लाखलाख । मानती 'दास' भक्त ।। १७१ ।। दास-बोध ।। तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरी प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काये करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/६७ साधक श्रवण मनन वाचन अशी साधनेला सुरूवात करतो. अनेक धर्मग्रंथांचे सतत अध्ययन करून त्याला वाटू लागते की ब्रह्माविषयीचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला आता झालय. हळूच नकळत आळसावतो. नंतर स्वत:च ठरवतो की आता ब्रह्मज्ञान तर झालच आहे मग नित्य नैमित्तिक साधनेची आता मला गरजच काय ? परिणामी साधना सुटल्यावर पुन्हा शून्यापासुन करावी लागते. तेव्हा ज्ञानोत्तर साधनेला पर्याय नाहीच. कांहीच करो नये अती । इतुकेकि वोसंडेल मती । मन वेडाचारा भोवती । रुंजि मग घालू पाहे ।। १७२ अतिशहाणा करि वमन । शेवाळ माजलेले ज्ञान । स्वयं घसरुनि त्यावरुन । कोलमडू पाहे । १७३ प्रमाणांत विद्वत्ता । सत्कारणी लावीता । नूतन शुध्द ज्ञानस्रोता । प्रवाहवेणा आपोआप ।। १७४ ।। दास-वाणी ।। लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे येक । साधन करिती ब्रह्मादिक । हे ठाउकें नाही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/७१ सामान्य लोकांपेक्षा मुमुक्षु आणि साधक हे खरतर वरच्या पातळीवरचे. परंतु साधनामार्गात आवश्यक असलेली बंधने पाळत असताना मौजमजा करणारे बहुसंख्य टिंगलटवाळी करतील या धास्तीने साधकाला लाज वाटत असते. मोकळेपणाने तो नाम घेत नाही. खर तर ब्रह्मा विष्णु महेश सुद्धा देवपदावर असूनही साधना करतच असतात. हे लक्षात घेता नि:संकोच नि:शंक साधनेतच हित आहे हे साधनप्रतिष्ठानिरूपणात समर्थ सांगताहेत. सामान्यांची साधना । लठत जगणे, हेचि जाणा । तरी त्याची निर्भत्सना । 'कर्मठ' 'ज्ञानी' कां करिती ?।। १७५ कारण ते तर पळपुटे । आव आणिती तद्दन खोटे । भाळी आठ्यांचे मुखवटे । चढवुनि करिती कुकर्म ।। १७६ गोंडस, निरागस गोजिरवाणी । निसर्गाची जिवंत लेणी । आदळती पार्थिवाचरणी । आया-बाया ।। १७७ असले तर हेच रूप । 'देवतत्वा'चे इवले रोप । कां पदरी धारिता पाप । छळणुक त्याची करोनिया ?।। १७८ गुरु असावा जाणकार । अव्हेरुनि साधनेचे क्लिष्ट द्वार । घालून ज्ञानप्रबोधी फुंकर । चेैतन्यमूर्ती जसा ।। १७९ कर्कश,गोंधळ,दंग्याचा उत्सव । हरवला कुठेतरी त्यांत देव । दुराचाराचे फुटले पेव । गुंड, मवाल्यांना पर्वणी ।। १८० ।। दास-वाणी ।। जो जनामधें वागे । परि जनावेगळी गोष्ट सांगे । ज्याचे अंतरी ज्ञान जागे । तोचि साधु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०१/१८ तो लोकांमधेच असतो. त्यांच्यासारखाच खात पीत असतो. त्याचे वेगळेपण हे त्याच्या वागण्यात आणि त्याने केलेल्या उपदेशात असते. निस्वार्थ असल्याने सुख दु:ख, हवे नको च्या पलीकडे गेलेला हा साधु समाजाला शांति, तृप्ती, आनंदात रहाण्याचे रहस्य शिकवतो. ज्याच्या अंत:करणात ' अहम् ब्रह्मास्मि ' हे ज्ञान जागृत असते तोच खरा साधु. अनुभवावे नि सांगावे । रसवत्तेस सांभाळावे । जाणीवपूर्वक टाळावे । असत्य ।। १८१ स्वप्ने दाखवावी नित्य । कर्मकारास प्रेरणा-साहित्य । मात्र, साकारेल सत्य । राखावे तत्वांसी ।। १८२ कुंती, कुमारी माता गोठ़्यांत । प्रेषितास कोणी आणिले या दुनियेंत । भेदांतित तरि शिकवणी सर्वधर्मात । धरेवरी सर्वत्र ।। १८३

No comments:

Post a Comment