Wednesday, September 3, 2014

।। भासबोध ।। १५६ ते १६६

।। दास-वाणी ।। येेक शस्त्र झाडू जातां । दोनि दिसती तत्वता । नाना तंतु टणत्कारिता । द्विधा भासती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०८/२१ तलवार दांडपट्टा अशी शस्त्रे अत्यंत वेगाने फिरवली तर ती एकाऐवजी दोन दोन फिरताहेत असा भास होतो. तंतुवाद्याच्या तारेवर बोट फिरवले तर कंपनगतीमुळे दोन तारांचा भास होतो. तसेच मायेमुळे भासणारे सृष्टीचे अनेकत्व आहे. सर्व जीव हे मूळत: एकरूप म्हणजेच ब्रह्मरूप आहेत. षड्ज-पंचमांतुन स्वयंभू गंधार । द्वैतातुनी तृतीय स्वराकार । सहज विज्ञान, ना चमत्कार । तरंगमेळाने साधतसे ।। १५६ नेत्र दोन, दृश्य एक । बाहु दोन, लक्ष एक । चरण दोन, दिशा एक । जगी असे स्वाभाविक ।। १५७ जिव्हा दोन भक्ष एक । कर्ण दोन श्रवण एक । श्वास दोन, जीव एक । जिण्याकारणे ।। १५८ ।। दासवाणी ।। माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी । माया नाना रूपे धरी । ब्रह्म ते अरूप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०५/०८ गुणमायेपासून जे जे निर्माण होते ते सर्व विकारी म्हणजे बदलत जाणारे आणि अंती नाश पावते. ब्रह्म मात्र अविचल आणि शाश्वत असते. सर्व चराचर सृष्टी ही मायेपासून निर्माण झाली. ब्रह्म स्वत: निष्क्रिय आहे. माया अनेकविध रूपांनी आणि रंगांनी प्रकट झालेली आपल्याला प्रत्यक्ष दिसते मात्र परब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे दिसत नाही. त्याची अनुभूती सद् गुरू कृपेनेच होऊ शकते. जो 'ब्रह्मा' मागे धावला । त्याचा कर्मभाव बुडाला । भवसागर लंघायाला । 'ब्रह्म' न होई आधार ।। १५९ अदृश्याचा चक्रव्युह । परत-मार्ग भयावह । सामान्यांनी त्याचा मोह । न बाळगणेचि बरे ।। १६० बहुअवधानि मती एक । व्यक्तीमाजी ।। १६१ पत्नी-कन्या-स्नुषा गौरी । सह-कार्य-धर्मा गौरी । वामा-भामा-रमा गौरि । आदराव्या बहुमाने ।। १६२ ।। दास-वाणी ।। गुरूशिष्या येकचि पद । तेथें नाही भेदाभेद । परी या देहाचा समंध । तोडिला पाहिजे ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२९ साधनेला सुरूवात करताना शिष्य आणि गुरू वेगवेगळया पातळीवर असतात. गुरू साधकाला हळुहळु स्वत:च्या अध्यात्मिक पातळीवर खेचत असतो. साधनेच्या परमोच्च पातळीवर परब्रह्माची अनुभूति दोघानाही सारखीच येते. ब्रह्म अभेद असल्याने गुरूशिष्य भेदभाव त्याच्या पायी नाही. इथे अट एकच आहे ती म्हणजे शिष्याने देहबुद्धीला कायमची सोडचिठ्ठी दिली पाहिजे. ' देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ' . गुरु असावे अनेक । ज्ञानस्रोत-प्रवाह पूरक । क्षेत्रवृध्दी कालागणिक । जाणोनि असावी ।। १६३ ज्ञानाच्या वाढती कक्षा । रोज नवे आयाम, दिशा । पुरविण्या क्षुधा-तृषा । क्षमताधारक विरळाची ।। १६४ परतुनी शब्द तेच तेच । मन म्हणे 'वेच वेच' । िवश्रामा समय हाच । दृष्टीपथांत परिसीमा ।। १६५ गुरु असावे ऐसे ख़ास । कसब, कौशल्ये व्यक्तिविशेष भरवुनि शिष्यांना घास सकस । करिति जे निष्णात।। १६६

No comments:

Post a Comment