Tuesday, April 7, 2015

।।भासबोध।। १०६८ ते ११२२

परंतु 'पळणे' योग्य नव्हे । अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये । न अधिकार ठेवण्या नांवें । ऐशास ! मजला राहील ।। १०६८ सणवार असे पर्वणी । एकत्र जमून ग्रामस्थ गृहिणी । झिम्मा, फुगड्या फेर धरुवि गाणी । गात होत्या मुक्तरवे ।। १०६९ आधुनिकतेच जरि पेहेरावांत । माया, ममता तीच उरांत । प्रगतं संकल्पना संगोपनातं । प्रत्यक्षांत उतरवे माता ।। १०७० जिजाऊंनी घडविला शिवबा । ज्ञान-कर्मेंद्रियांचा देत ताबा । सुयोग्य गुरु अन मोकळ्या नभा । निष्णात केले सर्वतोपरी ।।१०७१ तुर्या नसलीच जर गाभ्यांत । चर्या असली जरि अस्तित्वांत । सूर्यासहि आणणे टप्प्यांत । तिला ! दुरापास्त ।। १०७२ तुर्या ! भाग जगण्याची असतो चौथा ' तुर्या ! महति तिची ऐका । तुर्या ! अस्तित्व सांभाळणारी नौका । भवसागरी ।। १०७३ तुर्या ! पायाचा पाषाण । तुर्या । अस्तित्वाचा प्राण ! तुर्या । कार्य, भाव, कारण । मनुष्यासी ।। १०७७ घट वरचा ! द्राव दृश्यमान । घट मधला ! द्रावासि झाकलेपण । घट तळाशि ! द्रावास सगळ्या आधार कोण ? भंगला जर ।। १०७८ त्याकारणे निसर्गे तुर्या । निवारण्या भंग भया । जगण्यांस देते छाया । आशीर्वचतरुची ।। १०७९ इतके सोपे ज्ञान । देवोनि दृष्टांत, उदाहरण । कां न करिती कीर्तन । शिष्यगण, महंत ?।। १०८० कसब मुळांत असल्याविणा । अर्थ नाही प्रशिक्षणा । साक्षरतेचे महत्व जाणा । सांगोनि थकला डेबू ।। १०८१ थांबले जरि वाचन श्रवण । मगज विचारांचे निधान । अखंड कार्यरत, राखते भान । जितेपण जोवरी ।। १०८२ आदि अंत न ज्याचा ठावे । त्यांसी कैसे संबोधावे । दशदिशांनी आपुल्या प्रभावे । निसर्ग खेळे 'बाहुल्यां'शी ।। १०८३ नश्वर म्हणजे नाशवंत । बुवा, बाबा असो वा महंत । त्यांच्याच नादी भयभीत । भाबडे लागती ।। १०८४ निसर्गाच्या विविध तऱ्हा । उध्वस्त करिती घरसंसारा । तेल घालोनि ठेवावा पहारा । लागतो नजरेचा ।। १०८५ पानगळ, पुन्हा पालवी । आषाढांत जळे नवी । श्रावणांत वाटे हवी हवी । सणवारांची बरसांत ।। १०८६ शरदातले टिपुर चांदणे । निरभ्र आकाशाचे लेणे । शिशिरांत हुडहुडीची आवंतणे । परतुनि येण्या शिलेदारा ।। १०८७ प्रीती, अक्षरांच्या वळणावर । आसक्ती शब्दांपल्याडल्या आशयावर । भक्ती लेवुनी साहित्यसंपदेचे पर । ज्ञानमार्गे झेपावी ।। १०८८ ऋचा, श्लोक आर्या, ओवी । गण-गौळण, लावणी आसमंत घुमवी । फटका, पोवाडा, वा मुक्तछंद, नवी । गीतांचीच रूपे अभंग ।। १०८९ वर्णन, निरूपण, निवेदन, कथा । निबंध, दीर्घांक, चरित्र, गाथा । समीक्षा, विश्लेषण वा ग्रंथा । संशोधनोत्तर मांडणी अनिवार्य ।। १०९० जैसे, वर्णनहेतु निरीक्षण। निरुपणपूर्व आकलन । दीर्घांक फुलविणे प्रसंगांतून। उदाहरणार्थ ।। १०९१ समीक्षापूर्व बारकाव्यांचा अभ्यास । चरित्रासाठी जीवनानुभव विशेष । आशय करितो, गाथा, वा ग्रंथास। आकलनयोग्य अध्याययोगे ।। १०९२ शुभ्र मेघमाला नभांत । अवतरू लागल्या तरंगता । झालर कृष्णवर्ण कडांत । हळुहळु होइल दृश्यमान ।। १०९३ मग बाष्फ उर्ध्वगामी । प्रवेशेल अंतर्यामी । जलकुंभावतार वर्षाग्रामी । दासच सांगोनि गेले । नाही कांही जर लिहिले । अनुभव व्यर्थ गेले । रोजचे अनमोल ।। १०९४ होतील प्रसवोत्सुक ।। १०९५ मेघडंबरांत गर्जेल गाज । घुमूलागतिल मृदंग, पखवाज । मधूनच कडाडेल वीज । उजळिंत अकाली झाकोळ ।। १०९६ आसुसले प्राणिमात्र । एकवटोनि मन, गात्र । उंचावतील शुष्क नेत्र । आभाळमाया टिपावया ।। १०९७ पुलकित होइल अवनी । धावत सेइल वर्षाराणी । भूमि, तरुवर उदंड पाणी । जडावेल आसमंत ।। १०९८ आधार ! चहुबाजूंनी असावा । आधार ! दशदिशांतुनि भासावा । आधार ! स्वत:च नसावा । निराधार ।। १०९९ जरा म्हणजे असतो शाप ?। जरा जीवमात्रांसि आपोआप । जरा जीवनानुभवाचे रोप । वृक्षरूपी, वितरण्या छाया ।। ११०० अध्ययन, साधना, आकलनासाठी । अध्ययन, साधना, कृतिशीलतेसाठी । अध्ययन, साधना, स्पर्धेसाठी । जिण्याकारणे रोजच्या ।। ११०१ दातृत्व ! मुळांतले सहज । दातृत्व ! असावे निर्व्याज । दातृत्व ! सत्कर्मांची व्यर्थ गाज । टाळावी, हेतुपूर्वक ।। ११०२ पंचमहाभूतांना वेसण । वैज्ञानिक संशोधाने प्रयत्न । हेचि प्रार्थना पूजन । अज्ञात शक्तिचे ।। ११०३ अजाणतेपणी पुष्प-बुक्कादि उधळणे । उपास सायास, नैवेद्य अर्पणे । अभावदेव प्रसन्नता प्रतीक्षिणे । फोल अनादिकाळापासोनी ।। ११०४ 'चमत्कार' होती फसवणूक । निरक्षरांची अप्रत्यक्ष पिळवणूक । करीत होते भोंदू अध्यात्मिक । सर्वदा सदा ।। ११०५ गुरु करितो ज्ञानवृध्दी । गुरु वारी आपदा, व्याधी । गुरु देतो शिकवण साधी । प्राप्त परिस्थिति रिचविण्या ।। ११०६ गुरु तम भेदी अज्ञानाचा । गुरु परिचय देई पंचमहाभूतांचा । गुरु आग्रही कृतिशीलतेचा । सत्कर्मांसाठी ।। ११०७ गुरु जाणतो शिष्यमति । गुरु साधतो योग्य गति । गुरु वृध्दिगत ग्रहणशक्ती । करितो प्रमाणांत ।। ११०८ गुरु मार्गदर्शक सखा । गुरु विपदेस विन्मुखा । गुरुसि घाला हाका । प्रकटेल हात देण्या ।। ११०९ गुरु अंतर्बाह्य विवेक । गुरु सत्प्रवृत्ती, जनक । गुरु अशिष्यासि पावक । सजग सदा ।। १११० गुरु ज्ञानगंगेचा उगम । गुरु शिकवी भेद, दंड, साम । गुरु आदर्श मानव राम । पाहावा सदा ।। ११११ गुरु रूपधारी कोणीही । गुरु मित्र, वैरी, शार्वीलिकही । गुरु, निसर्गाची वही । पंचमहाभूती ।। १११२ गुरु वेधतो शिष्योत्तम । गुरु सर्वांवरी करि प्रेम । गुरु उध्दरण्या सक्षम । मूढांसीही ।। १११३ गुरुवर असावी निष्ठा । गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा । गुरु ज्ञानामृताच्या घटा । दडवित नाही कधिही ।। १११४ गुरु भीम, बलवान महारुद्र । गुरु शिष्यगणा सुभद्र । गुरु तर्क-बुध्दि-आकलन समुद्र । जीवमात्रा ।। १११५ मी एक प्रस्तरखंड । शेंदुर चढविति विनाखंड । अंकुरू लागला भयगंड । मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल ।। १११६ शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी । आशयाची रेटारेटी । टाळोनि न टळें त्यांत ।। १११७ शिष्य व्हावा यशस्वी । म्हणोनि त्यांसि शिकवी । अध्ययन अध्यापनापूर्वी । करि गुरु विषय-आशयाचे ।। १११८ परंतु परीक्षाकाळी । साहाय्यास जाणे जवळी । यशोमाला पडावी गळी । म्हणोनि ! हेतू अनिष्ट,अश्लाघ्य ।। १११९ अध्ययनार्थ उच्चश्रेणी वर्गांत । जर असला धडे घेत । कस त्याचा जोखण्यांत । सहभाग कनिष्ठाचा कां बा ?।। ११२० गुरुसि मिळत नाही सवड ?। की लोळत पडण्याची आवड ?। मग ज्ञानार्पण, अध्यापनाची कावड । घेवोचि नये ऐशाने ।। ११२१ ऐसे धुंडाळोनि खेचा । जनक्षोभ मुसळाने ठेचा । जखडा ऐशा घालोनि पेचा । कि सुटो नये ।। ११२२

No comments:

Post a Comment