Wednesday, August 24, 2011

दु:ख आपल्या गाठीच बरी


सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी
सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत
सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ
आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई
हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर
जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर
दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसली भेगाळली रानं

1 comment:

  1. खूप छान ओळी आहेत...अशाच अर्थाने हिंदी कवि रहीम म्हणतात-----
    रहिमन निज मन की व्यथा मन ही रखो गोय
    सुन लेहिगे लोग सब बाँट न लेहे कोय

    आणि माझ्या ओळी आहेत---
    दुःख:मंगलाक्षत,सुख कापरा सम
    उडून जाते
    अलकनंदा साने

    ReplyDelete