Saturday, June 2, 2012

एक सत्यकथा..चक्रावून टाकणारी.

एक सत्यकथा..चक्रावून टाकणारी. ज्यांनी, न्यायासनानं निर्वाचित केलेल्या न्यायमंडळाचे सदस्य म्हणून कधी एखाद्या दाव्याचं काम, न्यायप्रदानांत साहाय्यभूत होणेहेतू, बघितलं असेल, त्यांनाही...सर्व साक्षी-जवाब नोंदवून झाल्यावर आणि ते लक्षपूर्वक ऐकल्यावरही...विचार करायला प्रवृत्त करेल असी ही एक सत्यकथा ! तुम्हाला रहस्यमय हत्या, खून वगैरे गोष्टी ऐकाय-वाचायला आवडतांत ? प्रष्ण तसा निरर्थक, कारण सर्वसामान्यपणे असं कांही उत्कंठावर्धक वाचाय-बघायला कुणाही वाचक-प्रेक्षकाला आवडेलंच ना ? अगदी कायदा-सुरक्षा आणि न्यायदंड विभागाला सुद्धा डोकेदुखी ठरेल असं कांहीतरी घडलय या घटनॆंत..अगदी वेगळीच कलाटणी देणारं कांहीतरी... १९९४च्या, न्यायवैद्यकशाश्त्र परिषदेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभांत, अध्यक्षहोदयांनी ही, एका ’मृत्यू’ची(...खून ?..)आवाक्‌करून, विचार करायला लावून मेंदूचा भुगा करायला लावणारी.. ’कथा’ सांगितली...उपस्थित श्रोत्यांना सुन्न करणारी... तर ही ती घटना...२३ मार्च १९९४ रोजी वैद्यकीय अधिकार्‍यानं, रोनाल्ड्‌ ओपस्‌च्या मृतदेहाची तपासणी केली. त्यानं निष्कर्ष काधला की रोनाल्ड्‌ला मरण आलं ते एका बंदुकींतून सुटलेल्या आणि डोक्याच्या कवटींतून आरपार गेलेल्या गोळी मुळं. रोनाल्ड्‌नं, आत्महत्या करण्याच्या उद्देशानं, एका दहा मजली इमारतीच्या गच्चीवरून खाली झेप घेतली होती.. त्याच्या उद्देशाच्या पुष्ट्यार्थ त्यानं त्याच्या खिशांत एक चिठी स्वतंच्या खिशांत ठेवली होती..असो पण, तुम्ही लाख ठरवाल हो, तस होईलचं याची खात्री तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी देवू शकतांत कां ? तर झालं असं की उडीमारल्यावर, दहापैकी नवव्यामजल्यासमोर रोनाल्ड‌चा, मृत्युप्राप्ति-इच्छुक देह आला आणि त्या मजल्यावरच्या एका घराच्या खिडकींतून, कांच फोडत, सणाणत आलेली बंदुकीची गोळी त्याच्या मेंदूंतून आप्रपार गेली आणि त्याला अक्षरश: क्षणार्धांत, यमसदनाप्रत’ धाडती झाली ! दिवदुर्विलास म्हणावा की दु:खांतली समाधानाची (कसलं कर्माचं समाधान ?) बाब म्हणावी, पण ना रोनाल्ड्‌ला किंवा ना, ज्याच्या बंदुकींतून गोळी सुटली होती त्याला माहीत होतं, की त्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर कांही दुरुस्तीचं कामचालू असल्यामुळं जरा खाली एक जाळी पक्की बसवली होती त्या दिवशी...कामगार पडुन होणारी संभाव्य दुर्घतना टालण्यासाठी ! त्या जाळींनं, रोनाल्ड्‌चं आत्महत्येचं (सु?) नियोजित स्वप्न पार धुळीस मिळवलं असतं कदाचित.. नवव्या मजल्यावर्च्या ज्या घरांतून, ती’ जीवघेणी’ गोळी सुटली होती तिथं एक जरा पोक्त, प्रौढ जोडपं राहात होतं. कांही कारणावरून त्यांच्यांत त्या दिवशी सकाळपासूनच केरबुर सुरू झाली होती आणि वाद वाढतावाढता त्याच पर्यवसान, निरर्गल भाषा, शिव्याशाप देत, एकमेकांच्या कुळांचा उद्धार करीत कडाक्याच्या भांडणांत होत होतं.शेवटी’क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥ स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥ या चतु:सूत्रीप्रमान, पुरुषीअहंगंडानं पछाडलेल्या ’नरा’(धमा ?)नं आपली बंदूक स्वभार्येवर रोखून, तिच्यासकट भांडणाला संपविण्याच्या हेतून, चाप ओढला आणि... गोळी सुटली पण गृहस्थाचा नेमचुकून, ती इच्छित लक्षाला..पत्नीला.. न लागता खिडकीचं तावदान फोडून, बाहेर ’पडू’ घातलेल्या, रोनाल्डो नामक, आधीचं निराशेने ग्रस्त होवून मृत्यूप्रत प्रवासास निघालेल्या रोनाल्डोच्या मस्तकाला भेदून मेंदू छिन्नविछिन्न करीत पार झाली. आता, एखाद्यानं खून करण्याच्या हेतून झाडलेली गोळी इच्छित लक्षा ऐवजी तिसर्य़ांच व्यक्तीला लागून तो ’परलोकवासी’ झाला तर अर्थातच त्या तिसर्‍या व्यक्तीच्या खुना बद्दल, गोळी झाडणारा खुनी ठरतोचं, नाही कां ? त्या नवव्या मजल्यावरील गृहस्थावर जेंव्हा सदोष महुष्यवधाचा आरोप ठेवण्यांत आला, तेंव्हा गृहस्थानं, आपल्या पत्नीसह...जिचा तो खून करणार होता खरं म्हणजे..आरोपाचा निषेध करू लागला. बचावात्मक पवित्र्यांतल्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्या बंदुकींत गोळ्या भरलेल्या आहेत याची दोघांनाही कल्पना नव्हती. आणि पत्नीनही पुष्ट्यार्थ विधान केलं की, ’अहो ! यांची ही फार पूर्वीपासूनची सवय आहे. कांही छोट्सं भाण्दन झालं, की हे माझ्यावर बंदूक रोखून,"’घालू कां गोळी ?" असं धमकावतांत...त्यांना स्वत:ला आणि मलाही तो बार ’फुसका’ आहे हे ठाऊक असतं !’ गृहस्थ पण परोपरीनं, त्याचा खून वगैरे करण्याचा अजिबात हेतू नव्हता हे सांगत होता. ह्या सगळ्या ’वायफळ’ स्पष्टिकरण, बचावानंतर, अर्थातच, बंदूकींत ’अनवधानानं’ राहिलेली गोळी, अगदी अहेतू सुटली असं गृहित धरल्यावर, रोनाल्डोचा मृत्यू हा एक अपघात मानला गेला. काय गंमत आहे पाहा, ’दैव देतं, पन कर्म नेतं’ हा वाक्प्रचार, या घटनेच्या बाबतींत कसा चमत्कारिक रितीनं खरा ठरत होता. उडी मारल्यानंतर, आठव्या मजल्यावरच्या ’संरक्षक’ जाळीनं, रोनाल्ड्‌ला वाचवलं असतं कदाचित, पण यमदूताचा फास बंदुकीच्या गोळीरूपानं त्याच्या गळ्या भोवती आवळला गेला होता. या खटल्यातल्या या अतर्क्य घटनेच्या मुळाशी जायचा जेंव्हा, बचावपक्षाच्या वकिलानं प्रयत्न केला तेंव्हा त्याला आणखी एक धागा, जोडप्याच्या बचावासाठी मिळाला.. कोण्या एका व्यक्तीनं, घटना घडली त्या दिवसाच्या सहा महिने आधी, त्या पति-पत्नीच्या चिरंजीवांना, त्या बंदुकींत गोळ्या भरतांना म्हणे बघीतलं होतं ! आणि Lo and behold !!.. आईनं चिरंजीवांना दरमहिन्याला मिळणार्‍या ’खर्ची’च्य रकमेमधे भारी प्रमाणवर्कपात करायला सुरुवात केली होती त्याचा राग चिरंजीवांच्या मनांत होता. त्याला आपले पिताश्री, घरगुती भांडणानंतर, दरवेळी आईला बंदूक रोखून धनकावतांत हे ही पक्क माहीत होतं, त्यानुळ आईचा सूड, परस्पर वडिलांच्याहस्ते घेण्यासाठी, महाशयांनी, ’कधीतरी तें बंदूक रोखतीलचं..’ या खात्रीनं, बंदुकींत गोळ्या भरून ठेवल्या होत्या. काय(दुष्ट)शक्कल होती !. पण परिणामत:, चिरंजीव हे खुनी ठरत होते रोनाल्ड्‌चे.. जरी त्यांनी स्वत: बंदुकीचा चाप ओढला नव्हता तरी.. पुढे आणखी तपासासाठी शोधयंत्रणा आणखी खोलांत शिरली.. आणि एक अतर्क्य वळण मिळालं या’चित्तरकथे’ला.. त्या चिरंजीवांचं नांव होत..रोनाल्ड्‌..मृत्युमुखी पडलेला दुर्दैवी(?) जीव. आईला मारण्याच्या प्रयत्नांना येणार्‍या अपयशामधून आलेल्या नैराश्येच्यापोटी, ’आपण स्वत:चं जीव देवून, हा सगळा छळ संपवुया !..’ असा (अ)विचार करून त्यानं दहाव्या मजल्यावरच्या सौधवरून मृत्यूप्रत उडी घेतली होती..आणि योगायोगानं काय घडलं हितं ? तुम्ही जाणतांच ! रोनाल्ड६६तर आता या जगांत नव्हता. त्यानं स्वत:चा खून केला होता. त्यामुळं, न्यायासनानं, आत्महत्या’ म्हणून खटला बंद केला.. अखेरीस !

No comments:

Post a Comment