Wednesday, March 25, 2015

।।भक्तिबोध।। दमड्या अव्हराव्या...? पर्यंत

भक्तिबोध-40 दमडय़ा अव्हेराव्या आम्ही? निस्पृहता धरू नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडो नये । वोळखीमधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 14/01/04 स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृह म्हणजे निरिच्छ. स्वतःसाठी काही हवे असे मनात सुद्धा न येणे.निस्पृहलक्षणात लालसेला स्थान नाही.निरिच्छपणे, निरपेक्षपणे, काहीही लाभाची अपेक्षा न धरता, कार्य करून, कुणाचे आशीर्वाद घेत, ज्याची इच्छापूर्ती झाली, त्यांच्या नजरेंतला कृतज्ञभाव बघत सुखावण कुणाला आवडणार नाही ? पण हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा अंतरी बाळगत जगत राहाणे, भवसागरात आधीच गटांगळ्या खात, आजूबाजूला तशाच अवस्थेत इतस्ततः तरंगणार्या कुटुंबियासाठी. बुडत्यांसाठी आधाराचा ओंडका हेणार्याला शक्य आहे. हा निरिच्छपणा, निरपेक्षपणा, सहज म्हणजे जन्मतः थोडासा प्रमाणांत कां होईना बालकाच्या अंगी असावा लागतो, जो पुढे, योग्यता संस्काराने वृध्दिंगत करता येतो. याची पहिली पायरी म्हणजे मिशलेले एकटयाने न हडपता त्यात इतराना वाटेकरी `करून’ घेण्याचा संस्कार ! वस्तींत, जमांतींत, समाजांत राहाणार्याला हे शिकवावे लागत नाही. `जीवो जीवन्त जीवनम’ या उक्ती प्रमाणे, एकमेकां साहाय्य करींत, आला दिवस साजरा करींत, पुढे पुढे चालावच लागतं. दासांच्या कालांतर ते तपश्चर्येनं ज्ञानार्जन करून, सदुपदेश करीत असतांना त्यांचे शिष्य’गण’, रघुवीराच्यानांवानं आरेळ्या देत कुठलं `समाजकार्य’ करीत, झोळी सामान्यांच्या द्वारांत, त्यानं घाम गाळून मिळविलेल्या कमाईंतून शिजवलेल्या घासांतला वाटा मागण्यासाठी रुंदावत, `भिक्षांदेही’ करीत होते, कोण जाणे ? दात्याच्या अंगणांतली लांकड, सरपणासाठी, भिक्षेच्या बदल्यांत कुणी फोडून दिल्याचे कुणाच्यातरी ऐकिवांत असलं तर मला कळवाल ? ते काळी ते श्यक्य होते । निष्क्रिय भोंदू `संत’ कोते । पोट भिक्षेने भरत होते । कार्मिकांच्या दानांतुनी ।। 57 निस्पृहता कशासाठी ? । फुकटे फिरती अवती-भवती । कष्टसाध्य प्रयत्नांती । दमडय़ा अव्हेराव्या आम्ही?।। 58।। अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-40 दानाने माजती फुकटे। श्रीमंती वाढवू। कष्टेविण मागील भागातल्या आशयाचा संदर्भ घेऊनच आजचा विचार मांडत आहे! जेव्हा, भिक्षेकर्यांना उमगते की भाबडी जनता, दानाने मिळणार्या `पुण्या’च्या लोभाने, आपल्या `आशीर्वादा’साठी, झोळीत भिक्षा `पाडता’ यत.. म्हणजे इकडून भिक्षादान केले की तिक डे पुण्याच्या घडय़ात भर पडून आपण हळूहळू `पुण्यात्मा’ होणार या भ्रामक (अंध)श्रध्दापूर्वक भावाने हरखून जात…आणि परस्पर आपली `12′ चा वेळ भागवतायत, तेव्हा त्यांची कर्माबाबतची स्पृहाच नाहीशी होवून, त्या दृष्टीने कां होईना `निस्पृह’ होतात ! भिक्षेची झोळी रुंद । भोजन करी अनिर्बंध । दात्यापाठी बोल अर्वाच्य बेबंद । उच्चरिती ते भोंदू ।।69।। निष्क्रिय आळशी गांजेकस । फासुनी रक्षा अंगास । तप्श्चर्येचा उभारती आभास । सावध ऐशांपासून ।।70।। दानाने माजती फुकटे । कुरण आपले ऐसे वाटे । तुपाचे भरुन नेती लोटे । स्वगृही वोतावया ।।71।। दानें माजविले ऐतखाऊ । मिळेल ते वोरपून घेऊ। म्हणति `श्रीमंती’ वाढवू । कष्टेविण ।।73।। भाबडय़ा `दानशूरांना’ हे कळत नाही की अशा `अपात्री’ दानाने ते अशा फुकटय़ांची जमांत वाढवून, कर्मपरावृत्तीला नकळत प्रोत्साहित देतायत ! ‘अरे, एवढा धडधाकट आहेस ! भिक्षा मागण्या ऐवजी काम माग की ! ते कर आणि पुरेपूर मोबदला घेऊन जा ! कष्टाने मिळवलेली भाकर जास्त ग्वाड लागते मांडय़ा ल्येकरा !’ असे कोणी अनुभवी वृध्दा, या ऐतखाऊंना कानपिचक्या देऊन कां त्यांच्या डोळ्यांत झणझणींत अंजन घालीत नाही ? अर्थांत, भीक मागणे आणि कवळ्या कच्च्याबच्च्याचेच अपहरण करून, त्यांना अपंग करून भीक मागायला लावणे हा जिथे आपल्या `महान भारत’ देशातला एक व्यवसाय आहे, तिथे ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. गरीबाला गरीबच ठेवण्याचा `उद्योग’ राजकारण्यांमध्ये जारी आहे, तसेच काहीसे हे ! नाही कां ? अरुण काकतकर 9822021521… जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त । तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल पण श्रीकृष्ण आणि ज्ञानोब्बा माउली या वैश्विक अद्वितीय विद्वत्तामूतvची जन्मरास एकच म्हणजे वृषभ होती, असं मी कुठतरी कुणा तज्ञाकडून ऐकल्याचं स्मरतो ! वृषभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे आसक्ती आणि विरक्तींचा विलक्षण संगम! कृष्ण तर भोगी होता हे सर्वश्रुतच आहे, आणि तो योगेश्वर होता याला गीतेपेक्षा आणखी प्रमाण काय हवं? माउलींची विरक्ती वादातीत! तरीपण कधीतरी मांडे खायचा मोह झालांच की ! म्हणूनच `संभवामी युगेयुगे’ झाली तरी ती `मनुष्येच’ होती. सत्व-रज-तमाचा योग्य मेळ । मन-शरीरासाठी सर्वकाळ । घालोनि करी प्रतिपाळ । तोचि गोपाळ योगि-भोगी।।74 ऐसा ठेवावा आदर्श । शिरोधार्य ज्याचा स्पर्श । पंचमहाभूत सदेह सदृश । अंतर्लहरी कल्लोळवी ।।75 तारे-वारे-धरा-तेज । जळाचे सुखद हितगुज । सत्य-शिव-सुंदराचे बीज । एकवटले ते ठाई ।।76 तरीसुध्दा, `साधु साधु’ म्हणत, भाबडे-भोळे आणि त्यांच्या भोवती, मोक्ष-गत्यादि मोहक मोहोळांचे जाळे विणायला उत्सुक ऐतखाऊं साधूंची पिलावळ हा या विश्वाला मिळालेला शाप म्हणावा लागेल ! `स्वखर्चानं या आणि मंदिर उभारणीसाठी कार्यसेवा करा हा नारा कांहीवर्षांपूर्वी घुमत होता, आठवतय! त्या नेत्यांना राष्ट्रउभारणीसाठी अधिक प्रमाणांत कार्यसेवा करायला `भाविकां’ना उद्यपक्त करांवसं कां वाटलं नाही हे मला तरी कोडच आहे. जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त । श्रवणेंद्रिये राखिती निद्रिस्त । `असल्या’ हाका ऐकावया ।।77 काय म्हणोनि `कारसेवा’ । अन्य बसून सेविती मेवा । श्रेयाप्रती दावीत दावा । तथाकथित संत, ज्ञानी ।। 78 अरुण काकतकर 9822021521… भक्तिबोध-42 नात्यातले बंध टिकवण्याची जबाबदारी नवदाम्पत्यावर संसार उधळतां वार्यावरी । तरिहि चित्त थार्यावरी । ठेवोनि, प्रयत्न परोपरी । करिती तें धैर्यशील ।।87 माय-बाप-अस्तुरी । पोरे-सोरे किनार्यावरी । सोडून उपदेशाच्या आहारी । जाय तो शतमूर्ख ।।88 इथं, कुसुमाग्रजांच्या, गाजलेल्या, `कणा’ या कवितेचा नायक आठवतो ! तो म्हणतो, `मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून, सर फक्त लढ म्हणा’ पण हा संसार थाटतांना विचारपूर्वक नियोजन करांवं लागतं ! उतावळा गाठे बोहले । बाशिंग गुडघ्याला बांधिले । सजवे `तच्या’ कंठी डोरले । पाही स्वप्ने बेभानं ।।89 तरुणपणी शारीर इच्छापूर्तीसाठी विवाहोत्सुक होणं, समाजनीतीप्रमाणं अगदीच स्वाभाविक असतं. पण केल्या विवाहानं, नुसती दोन माणसंच पति-पत्नी नात्यानं जोडली जात नाहींत, तर दोन कुटुंब, त्यांच्या आप्तेष्टांसहित जोडली जावून, अतूट बंध निर्माण होतांत. मग हे बंध टिकवण्याची, दृढ करण्याची जबाबदारीही नवदांपत्यावर पडते. यालाचं म्हणतांत संसार ! मग पुढच्या काळांत, अध्यात्म वगैरे बाबींच्या मागं लागून संसार दुर्लक्षिणारा महत्पापी समजावा ! क्षणोक्षणी सावध राहाणे । हे आम्हा सामान्यांचे जिणे । दृश्यादृश्य शत्रूंशी दोन हात करणे । मार्गक्रमितो अहोरात्र ।।90 परंतू याची खंत । मनाशी नाही यत्किंचित । जिणे `तसले’ गुळगुळित । संघर्षाविणा ओशाळवाणे ।।91 अशा संघर्षांतून वाटचाल करणार्या `भल्या’ मंडळींना, अध्यात्मा’चं व्यसन लावून, त्यांना कळपांत ओढीला उत्सुक असणार्यांपासून सावधच असायला हवं! अर्धपोटी उपदेश कैसा । रुचतो-पचतो न तो सहसा । पसरता जाणिवांचा पसा । अपेक्षा क्षुधाशांतिची ।।92 बाष्फवत् जिणे तुमचे-आमुचे । धरू पाहाता हाती न यायचे । कोणा नकळत विरून जायचे । जाणिवे पल्याड ।।93 अरुण काकतकर 9822021521… भाकरीसाठी अखंड भय आपापल्या श्रध्येयाच्या दर्शनार्थ, भाविक, भक्त ठिकठिकाणी, मंदिरांत प्रार्थनास्थळी, तीर्थक्षेत्री जात असतात. तिथे श्रध्येयाच्या प्रस्तराकृती समोर बहुधा डोळे मिटूनच कां उभे राहतात, हे मला एक कोडच आहे. खरेतर उघडय़ा डोळ्यांनी न्यहाळले तर पंढरपुरची विठ्ठलमूर्ती म्हणजे वात्सल्यमूर्ती. डोळ्यात अपार प्रेम, माया ओतप्रोत भरलेली, मूर्तिकाराने घडवली आहे हे ती `दृष्टी’ असणार्याच्या सहज लक्षांत येतं ! तशीच, श्रवणबेळगोळाची महावीराची भव्य, एक प्रस्तरचा डोंगर फोडून घडविताना, त्या मूर्तिकाराच्या सर्जनशीलतेबरोबरच त्याच्या रचना ज्ञानाचेसुध्दा कौतुक करावे तेवढे थोडेच असे वाटते ! पण लक्षांत कोण घेतो ? कसबी निपुण मूर्तिकार । आभूषणे वस्रालंकार । सजविण्या प्रस्तर निराकार । कोरिती छिन्नि-हातोडय़ांनी ।। 107 त्यास ना धर्म, संप्रदाय । कारागिरी हेचि कार्य । भाकरीसाठी अखंड भय । टोचतसे उदरांत ।ऑ। 108 मी माझ्या एका ।ऑ।भक्तिबोध।ऑ। भागांत `रंगमहती’ वर्णन करणार्या कांही ओव्या लिहिल्या होत्या. माझे सुहृद सुधीर जोगळेकरांना मी त्या पूर्वावलोकनार्थ पाठविल्या. त्यांना त्या भावल्यामुळे, त्यांनी त्या, झी वाहिनीच्या एक माजी निवेदिका शिल्पा देशपांडे यांना पाठविल्या. त्या वाचून त्यांच्या मनांत उचंबळलेला’रंगोत्सव कल्लोळ’ (कल्लोळ म्हणजे बंगाली भाषेंत `लाट’) मला पाठविला तो ओवी रूपांतच. तो असा.. रंग ! रंगाचिये डोही रंग ! एकला स्वतःही रंग ! धरुन राहतांत बाही अस्तित्वहेतु, शुभ्राची ।ऑ। रंग! वेदनेचे गीत रंग ! आराध्याचा हात रंग ! प्रभु अंतरात जणू वसे ।ऑ। रंग ! निर्मळाची साद रंग ! ईश्वरी संवाद रंग ! परा सर्व भेदाभेद मानवता जैसी ।ऑ। अशी ज्योतीनं ज्योत उजळत राहिली तर, ओवी चालत राहील अविरत। शब्द-भाव ओवीत स्वच्छंद। कांटेकोर पाळीत निर्बंध । वैयाकरणींचे ।ऑ। 109 अरुण काकतकर 9822021521…

No comments:

Post a Comment