Wednesday, March 25, 2015

।।भासबोध।। १००६ ते १०६७

।। दास-वाणी ।। जैसें बोलणे बोलावें । तैसेंचि चालणे चालावे । मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०९/२३ आपण जसे बोलतो, जे विचार लोकांना समजावून सांगतो त्याप्रमाणेच जर आपली वागणुक असेल तर सहजच सामान्य जनांचा आपल्यावर विश्वास बसून ते तुम्ही सुरू केलेल्या सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेतील. समर्थ आपल्या महंतांना ताकीद देतात. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. वचने लागती पाळावया । नको वाटते पळावया । अपेक्षापूर्ती टाळावया । मन नाहि धजावत ।। १०५७ कशासि फसवावे कोणासी । वचने देउनि अश्यक्यशी । अपेक्षाभंग मनासि । दाहक असतो साहावया ।। १०५८ ।। दास-वाणी ।। करूणाकीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटे । श्रोतयांची श्रवणपुटें । आनंदे भरावी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०२/१२ कीर्तनभक्तीमधे नवरसांपैकी करूणारस प्रधान असावा. करूणा म्हणजे कींव नाही. अपार निस्वार्थ प्रेमभाव म्हणजे करूणा. त्या करूणानिधी परमेश्वराची कथा स्पष्ट, स्वच्छ खणखणीत आवाजात करावी की त्यायोगे श्रोत्यांचे कान इकडचेे तिकडचे ऐकूच शकणार नाहीत. त्या सर्वांची मने आनंदाने तृप्त होऊन तेही भजनामधे तल्लीन होतील. 'करुण' ! राजा सर्व रसांचा । 'करुण' ! स्रोत माउली हृदयिचा । 'करुण' ! पहावा गाउलीच्या नेत्रिचा । रुध्द होतसे कंठ ।। १०५५ कीर्तन ! सहज सोपे माध्यम । कीर्तन ! वाचा, देहबोलींचे धाम । कीर्तन ! थकल्या, श्रवणी विश्राम । उभारी आणण्या परतुनी ।। १०५६ ।। दास-वाणी ।। भेद ईश्वर करून गेला । त्याच्या बाचेन व वचे मोडिला । मुखामधें घास घातला । तो अपानी घालावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२७ ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, स्त्री पुरूष, पशू पक्षी प्राणी यांनी काय काय कामे करावीत हे ईश्वराने ठरवून दिलेले असते. कर्म आणि उपभोगातील विविधतेला भेद असे म्हणतात. 'सर्वं खलु इदम् ब्रह्म ' हे सर्व जग एकच ब्रह्म आाहे हा अध्यात्मिक सिद्धांत आहे. पारमार्थिक पातळीवर योग्यही आहे. परंतु व्यावहारिक दृष्टया भेद असणारच ना ? अन्नाचा घास तोंडातच घालावा लागतो ना ? सर्वच ब्रह्म आहे असे मानून तो गुदद्वारात घातला तर चालेल? ईश्वरनिर्मित कर्मभेद हे कुणाच्या बापालाही बदलता येणार नाहीत. तसा प्रयत्नही कुणी करू नये. निसर्गे निर्मिले जीव । विज्ञान, दृश्य विश्वांत धाव । तरी घेऊ बघती अखंड ठाव । दूरदूरच्या अज्ञाताचा ।। १०५२ ।। दास-वाणी ।। उफराटया नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१६ लोकांना मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. राम च्या उलट मरा हे उलटे रामनाम. इतकेच नव्हे तर शंभर कोटी श्लोकांचे रचलेले रामायण हा आपणा सर्वांसाठी वाल्मिकी ऋषींचा प्रसाद आहे. याचा अजून एक अर्थ निघतो. आपण वैखरी वाणीने प्रत्यक्ष उच्चार करून रामनामाचा जप करतो. परा हे वाणीचे पहिले स्फुरण, जिथे शब्द,अर्थ, श्वास काहीही नसतानासुद्धा नामस्मरण सुरूच असते. म्हणून परावाणी हे उफराटे नाम. सर्वश्रेष्ठ नामस्मरण. वाल्मिकींनी या उफराटया नामाने स्वत:चा उद्धार केला आणि समाजाचाही. नामस्मरणाचा महिमा समर्थ साधकांना सांगताहेत. बोकाळिले 'उफराटे' कर्म । साधूचि देउ लागले दम । नग्नावस्थेंत वसविण्या ग्राम । 'कुंभ'स्थळी, आग्रहती ।। १००६ ठाइ ठाइ करा उफराटे । इठा इठा म्हणोनि 'इटु' भेंटें ?। समज ग़ैर भ्रामक खोटे । प्रसविती कोण्या गर्भी ?।। १००७ आंता येईल कुंभमेळी । नग्न साधूंची मांदियाळी । 'तपश्चर्या' करणे रानोमाळी । सोडोनि, लांजवितील बाया-बापड्या ।। १००८ राष्ट्राला काय उपयोग यांचा । वृथा अपव्यय मनुष्यबळाचा । लावुनि चाप प्रशिक्षणाचा । पाठवा सीमा रक्षिण्या ।। १००९ पोशितो कोण यांना सांगा ?। सांगतो कोण 'भिक्षा' मागा ?। फसवे तापस, खोट्या योगा । भुलू नका बापडे हो !।। १०१० ।। दास-वाणी ।। संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण । सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०४/०८ वस्तू किवा व्यक्तीविषयी अनाठायी आसक्ती, आपुलकी नसणे. स्वत:चे संपूर्ण समर्पण. देहाच्या कोडकौतुकाविषयी यत्किंचितही प्रेम नसणे. अनुकूल, प्रतिकूल घटनांपासून पूर्ण अलिप्तपण. समाधानी शांत सहजावस्था. उन्नत अवस्थेतील मन. परमेश्वराची साक्षात अनुभूती (विज्ञान). या साधकाच्या सातही अवस्था एकच असून सिद्धावस्थेकडे प्रवास होत होत मुक्ती हे अंतिम फलआहे. सगळी व्यवधाने अबाधीत । लागती राखावी संसारांत । सुख-दु:ख-आपदा-आनंदांत !। सहभागी स्थितप्रज्ञेने ।। १०११ भवसागरी नौका वल्हविणे । सिध्दीपेक्षा अवघड साधणे । एकटे राहोंनि 'विश्वचिंता' करणे । अकारण निरुद्योग ।।१०१२ ।। दास-वाणी ।। नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवांचें पूजन करावें । नाना उपचारी आर्चावें । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/१७ परमेश्वराचे वास्तव्य, संतांचे जन्मगाव, कार्यक्षेत्र, समाधीस्थल ही तीर्थक्षेत्रे मानावीत. त्या ठिकाणी अध्यात्मिक स्पंदने तीव्र असतात. वेगवेगळया तीर्थक्षेत्रांच्या वारंवार यात्रा कराव्या.तेथील गैरसोयींचा पाढा न वाचता अत्यंत श्रद्धेने त्या दैवताची मनोभावे पूजा करावी. पत्र, पुष्प, फल, तांबुल, वस्त्रे इ अर्पून मुख्य परमेश्वर एकच सर्वव्यापी आहे या भावनेने ते ते दैवत पुजावे. ही खरी अर्चनभक्ती. बहुस्थली प्रवास, निरीक्षण । हे जाणत्या शहाण्याचे लक्षण । तेथल्या कार्याची शिकवण । रुजविणे मनोमनी, हीच अर्चना ।। १०१३ ।। दास-वाणी ।। नमस्कारें दोष जाती । नमस्कारे अन्याय क्ष्मतीं । नमस्कारें मोडली जडतीं । समाधानें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/१५ मनापासून विनम्र भावाने परमेश्वराला केलेला नमस्कार भाविकाचे काम, क्रोध, लोभ, अहंकारादि दोष नष्ट करतो. आपणाकडून केल्या गेलेल्या अन्यायाचेही परिमार्जन होते. व्यावहारिक जीवनात सुद्धा कोणाशीही वर्षानुवर्षे बिघडलेली नाती निव्वळ एका सप्रेम नमस्काराने समाधानपूर्वक पुन्हा प्रस्थापित होतात. वंदनभक्तीचे पारमार्थिक आणि ऐहिक असे दोन्ही लाभ समर्थ सांगताहेत. नमस्कार जणु शरणागती । व्यक्तण्या आदर, आपुलकी, प्रीती । स्मितमुद्रा असावी सांगाती । अभ्यागता सुखविण्या ।। १०१४ ।। दास-वाणी ।। भंगली देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं । सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतन चि कार्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०७/०४ दास्यभक्तीमधे देव माझा मालक आणि मी त्याचा दास म्हणजे इमानी तत्पर नोकर असा भाव मनात हवा. या दासाने जुनी पडकी देवळे पुन्हा बांधून काढावीत. त्यासमोरील मोठे जलाशय, तलाव डागडुजी करून पाय-या कठडे व्यवस्थित करावे. ओवरी, धर्मशाळा इत्यादी भाविकांच्या राहण्याच्या जागा साफसुथ-या ठेवाव्या,गरज पडल्यास नवीन बांधून सुद्धा काढाव्यात. या सर्व गोष्टी विनम्रपणे करून दास्यभक्ती पार पाडावी. भंगली मने दुविधांनी । त्यांसि सांधावे प्रथम करोनि । जातिल रानोमाळी उडोनि । बांधिली नाहि जर आळ्याने ।। १०४६ मग देवोनि अन्न-पाणी पुरेसे । क्षुधाशांती-तृषा शमवीलसे । ज्यामुळे निरामय होतसे । तवाव देह ।। १०४७ आजकालची मंदिरे वेगळी । विज्ञान मूर्त अवतरते स्थळी । संशोधक, शास्त्रज्ञांची मांदियाळी । मोहोळ जणु मधुमक्षिकांचे ।। १०४८ पायऱ्यांवरी जीवजंतू । मनुष्यांसि अपायह्तु । आढळले तर नि:पातू । त्वरित करणे अनिवार्य ।। १०४९ विज्ञानांमृतांच्या पुष्करणी । दिठींत साठवाव्या क्षणोक्षणी । होईल प्रतिबिंब त्यांत पाहोनि । तर्क-बुध्दी प्रयोगक्षम ।। १०५० ऐशा कांही निवडक ओव्या । बालकांनी अभ्यासाव्या । निश्चित देतील दिशा नव्या । विज्ञाननिष्ठा बळावण्या ।। १०५१ ।। दास-वाणी ।। सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/०७ संसारातल्या अडीअडचणी येत जात राहणारच. त्यांची चिंता करून त्या कमी होणार नाहीत. उलट प्रापंचिक अडचणीत सुद्धा जो फक्त परमेश्वराचेच स्मरण ठेवतो . निरूपण, कीर्तन, कथा जे जे काही बोलायचय ते फक्त ईश्वराविषयीच बोलत राहातो तो खरा देवाचा सखा. सुदाम्याने श्रीकृष्णभेटीमधे स्वत:च्या दारिद्रयाचा उल्लेखसुद्धा केला नाही. भगवंताने त्याची अडचण जाणून त्याला भरभरून समृद्धी दिली. निरपेक्ष सख्यभक्तीचे फळ हे मिळतेच. संसाराची अखंड चिंता । पोखरीत मनास असता । कसले कीर्तन, नामस्मरण, कथा । भाकड सारे कां सांगावे ?।। १०१५ तत्वांशी फारकत घेणे । एकमेकांसि 'समजुन' घेणे । वेळप्रसंगी 'वेल्हार'ही करणे । म्हणजेचि राजकरण भौ !।। १०१६ विधानगृहांत 'हमरी-तुमरी । खुळ्या कार्यकर्त्यांत सुरामारी । हाकलली जाती मुक्ती 'बिचारी' । गळ्यांत गळे विरेधकांचे ।। १०१७ कधी उघडणार डोळे जनता ?। कधी मिळणार महत्व मतां ?। कधी आपदांतुनि मुक्ता ?। मिळणार ।। १०१८ 'निर्लज्ज' प्रतिष्ठित सिंव्हासनी । आपलीचि पापे, कर्मकहाणी । केवळ भूल-थापांची खेळणी । गाजरासम निर्दय दाखविती ।। १०१९ अपंग, अजाण बालके, गर्भवती । सोडोनि, इतरांच्या न पडो कवळ हाती । कष्टेविण ! व्हावी राष्ट्रनीती । स्वप्न माझे ।। १०२१ न टाळती समागम । शेधित हिंडती शृंगारधाम । हेटाळिति परि अपत्यजन्म । श्वापदांपेक्षा अक्षम्य ।। १०२६ 'त्याची' म्हणजे कोणाची । आंस आहे दृढभेटीची । युगानुयुगे मनुष्याची । न ढळे पांपणी ।। १०२७ भेंटवाना एकदा 'त्या'ला । वाजत गाजत कधि आलासे वाटला । परंतु प्रस्तर वा मातीचाच् निघाला । कृतिशून्य ! देखता ।।१०२८ पंचमहाभूते हरघडी भेटतांत । दुखवित, सुखवित येत-जातांत । भवसागरी कधि नाव बुडवित । मार्ग पैलाचा दाविती ।।१०२९ म्हणोनि निसर्गा द्या मान्यता । तोचि जन्म-स्थैर्य-विलय दाता । 'त्य'च्या, बासनांतल्या भाकड कथा । जाउद्या विस्मरणांत ।।१०३० लागेल कटु, पण आहे सत्य । आपदेंत कधि सख्खे अपत्य । 'कर्तव्य' म्हणोनीही नाही कृत्य । धजते करावया ।।१०३१ धुडाळण्या वेळ हवा । कष्टकऱ्या कसा मिळावा । घरी परततां आप्तांचा मेळावा । घेरतो घासासाठी ।।१०३२ श्रीमंतास उत्तम उद्योग । शोधुनि सापडला तर माग । काढोनि, गरिबांसि थांग । सांगा सत्वरी ।।१०३३ युगानुयुगे मनुष्ये शोधला । कर्महीन होवेनि वेडाचार केला । तन-मन-धने, प्रार्थिला, पूजिला । दिसला, श्रविला, जाणवला नाही 'तो' ।।१०३४ स्वीकारिता आव्हाना ? दाखविता 'तो' ? उगा वल्गना । गरिबांच्या शिणल्या तना-मना । कृपया सोडा मोकळे ।।१०३५ चमत्कारास नाहीच अस्तित्व । विश्वांत सारे निसर्गाचे कर्तृत्व । कार्यकारणभावे युक्त । संपृक्त विज्ञान सर्वदा ।।१०३६ कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। अभावदेवासंबंधी भ्रामक समजुती । भाबड्यांच्या ऐशा ।। १०३७ एकतरी मुहूर्त ओवी । आजच्या दिशी रचावयास हवी । फटफटतांना पहाट नवी । पाडव्याची।। १०३८ ।। दास-वाणी ।। काया माया दो दिसांची । आदिअंती अवघी ची ची । झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०८/३८ हे शरीर आणि त्याने आयुष्यभर हाडांची काडे करून मिळवलेली संपत्ती दोन्ही नाशिवंत आहेत. ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार आपले आयुष्य एक क्षण सुद्धा नाहीये. जन्माला येतानाही वेदना, मरताना सुद्धा त्रास हालअपेष्टा आणि अतृप्ती. एकंदरीत कायमच फजितीचे आयुष्य जगणा-या मानवाने संपत्ती आणि उत्कृष्ठ पेहरावाच्या बळावर स्वत:ची थोरवी मिरवावी काय ? मान्य करीता ना 'पुनर्जन्म' ? मग, काया नाशवंत कायम । हाड़ा-मांसाशि नेइल यम । कां सांगता बरे ?।।१०३९ जगत असतांना समाजांत । हसत राहाणे अप्रस्तुत ?। पेहेराव, बोलणे, चालणे इत्यांदितं । थोरवी कां वर्ज ?।। १०४० काया वाचा नि मन । तिन्ही एकत्र करून । क्रमणे म्हणजे जीवन । क्षणार्धांत नाशवंत ।। १०४१ चित्तवृत्ती मोकळून । द्यावे स्वत:ला झोकून । खुलवून फुलवुन मन । जगणे यापुढे ।। १०४२ आले आले संमेलन । लोटले अवघे भक्तजन । देखण्या, अनुभवण्या घुमान । 'नामा' मुळे नांवरूपास ।। १०४३ व्यासपीठावर आजी माजी । सिंव्हासनी प्रतिष्ठापित पंतोजी । परंतु साहित्यिक 'फौजी' । 'नेमा'ने राहती अनुपस्थित ।। १०४४ उभे राहतिल देखावे, प्रदर्शने । मंडप सजतिल झालरीने । फांशी घेतल्यांच्या नांवाने । कवियंमेलने 'गलबल'तील ।। १०४५ सण वार गृहिणींस पर्वणी । त्या दिशी मिळून साऱ्याजणी । सजुनि, आभूषण् अलंकारांनी । मुक्तांगणी खेळतं असतं ।। १०५३ परा, पश्यन्ती, वैखरी । संस्कृत अर्थवाही जड जरी । व्यक्तण्या योजना त्रिस्तरी । समजाववावी तत्वज्ञांनी ।। १०५४ आकर्षण असणे नैसर्गिक । प्रतिसाद तेवढाचं आवश्यक । अन्यथा विकृत कृति जनक । नर-नारींमधे ।। १०६० 'हे भ्रामक, खोटें' सांगोनि अस्वस्थ । करणे ! त्यांसि, नाही रास्त । अभावदेवावरी भिस्त । ठेविती भाबडे ! ही चिंता ।। १०६१ पण जाणीव सत्याची देणे । लिहित चाललो याचि कारणे । कर्मावर श्रध्दा वळविणे । श्रेयस्कर ! सांगा कोणीतरी ।। १०६२ पाहता पाहता दृष्टांत झाला । 'राम' मनुष्यांत आणुनी बसविला । सामोरा गेला सुख-दु:खाला । कर्मयोगी सामान्य ।। १०६३ परि तत्वनिष्ठा राजपदाची । त्यजुनी प्रीती स्वपतिनीची । अपेक्षापूर्ती सर्वसामान्यांची । मूकपणे केली 'आदर्श' ।। १०६४ कोण कुठला य:कश्चितं । सारेच माझे अनिश्चितं । भयावह गर्दी गोंधळांत । दिवाभीत मी ।। १०६५ मी कां अजुनी 'आहे' ?। कोणत्या कारणे श्वास वाहे ? । प्राण कां न सुटो पाहे ?। देहांतुनी ।। १०६६ मन आजकाल अशांत । म्हणे, 'चल विजनवासांत । नसेल कोणी स्वकीय आप्त । अपेक्षिण्या परस्पर ।। १०६७ परंतु 'पळणे' योग्य नव्हे । अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये । न अधिकार ठेवण्या नांवें । ऐशास ! मजला राहील ।। १०६८

No comments:

Post a Comment